मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खरपूस आणि झणझणीत पेरी पेरी चिकन

मराठमोळा · · पाककृती
नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा या दालनात पाऊल टाकतोय कारण हा पदार्थ सर्वांनी (मांसाहारी लोकांनी) एकदा चाखावा असा आहे म्हणून. या चिकनच्या विविध रेसिपी उपलब्ध आहेत. सानिका आणि गणपा यांच्या पाकृंसमोर ही पाकृ जरा प्रेझेंटेशन आणि तपशील मधे मार खाईल यात वाद नाही. :) तर मग घ्या साहित्य. २ टे.स्पून पेरी पेरी सॉस ( मी तयार आणला होता, घरी करावयाचा झाल्यास कृती ही इथे ) २ मोठे चमचे लिंबाचा रस १ चमचा आलं पेस्ट २ चमचे लसूण पेस्ट १/२ कप लोणी मीठ चवीनुसार १/२ किलो चिकन . खाली दिलेल्या फोटोनुसार चिकन हे स्किन असलेलंहव आणि शक्यतो ब्रेस्ट पिसहवेत. (बोनलेस ब्रेस्ट फिलेट्स असतील तर उत्तम) Image removed. कृती १. चिकन स्वच्छ धुवून घ्या. २. चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्या. ३. चिकन गॅसवर १५ मिनिटे भाजा घ्या, साधारण अर्धवट शिजेल इतकं. (फ्लेम ग्रिल असल्यास उत्तम.) Image removed. ४. एका मोठ्या भांड्यात लिंबाचा रस, आलं-लसूण पेस्ट, मीठ, वितळलेलं लोणी, पेरी पेरी सॉस, आणि चिली फ्लेक्स (तडका मिरची मिक्सर मधून काढली की तयार चिली फ्लेक्स.) हे सर्व एकत्र करून घ्या. Image removed. ५. आता भाजलेल्या चिकनला सुरीने चरे करून घ्या, आणि वरील मिश्रणात चांगलं घोळवा. ६. २-३ तास मुरत ठेवा. ७. ओव्हन २०० डिग्रीवर प्री-हीट करा. ८. ओव्हन ट्रे वर अल्युमिनिअम फॉइल वर चिकनचे तुकडे व्यवस्थित पसरवून घ्या. ९. साधारण ४० मिनिटे २२० डिग्रीवर हीट करा. ही झाली तुमची खमंग, खरपूस, जिभेला चटका लावणारी पेरी पेरी चिकन डिश तयार. :) Image removed. आपला, मराठमोळा

वाचन 10880 प्रतिक्रिया 28