फुलांच्या रांगोळ्या-२

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in कलादालन
3 Jan 2012 - 7:59 pm

गेल्या वेळेस टाकलेल्या ''माझ्या फुलांच्या रांगोळ्यां''ना स-मस्त मिपाकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. त्या नंतर हा भाग टाकेपर्यंत मधे बराच वेळ गेला.या वेळी टाकलेले फोटो हे गेल्या३ महिन्यात-म्हणजेच आमच्या भटजीगिरीच्या फुल्ल सिझन मधे काढलेल्या रांगोळ्यांचे आहेत,त्यामुळे थोडं रिपिटेशनं(ही) आलेलं आहे...असो,अता टॉस नंतरच्या समालोचनात फार वेळ न घालवता,डायरेक म्याच सुरु करतो...तेंव्हा लेट्स एंनजॉय दी गेम... :-)

सर्व फोटो मोबॉ-इल वरुन काढलेले आहेत,कृपया चांगले दिसवुन घ्यावेत ;-) (नवा क्यामेरा लवकरच येत आहे.)

हे ठिकाण

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

3 Jan 2012 - 8:19 pm | प्रचेतस

निर्विवादपणे सुंदर रांगोळ्या.

_/\_
भटजीबुवा तुम्ही खरेच हाडाचे कलाकार आहात.

पियुशा's picture

4 Jan 2012 - 11:42 am | पियुशा

अप्रतिम !
झक्कास !
जबरदस्त !
लय भारी ;)

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2012 - 4:00 pm | अत्रुप्त आत्मा

@-लय भारी ;-) >>> :-~ :puzzled: आँ...
पियुशा बै...लय भारी को डोळा क्युं मारी...? ..ऐसा लागत है,की श्रीखंड के सामने आई चाय के साथ खाने की खारी :-D

गणपा's picture

3 Jan 2012 - 8:25 pm | गणपा

नयनरम्य रांगोळ्या.

रेवती's picture

3 Jan 2012 - 8:37 pm | रेवती

अगदी हेच म्हणते.

मदनबाण's picture

3 Jan 2012 - 9:20 pm | मदनबाण

वा... सुंदर ! :)

(कला प्रेमी) :)

स्मिता.'s picture

3 Jan 2012 - 9:21 pm | स्मिता.

या भागातल्याही सर्वच रांगोळ्या खूप खूप आवडल्या. कितीही वेळा पाहिल्या तरी समाधान होत नाही. एवढ्या काटेकोरपणे या रांगोळ्या काढायला बराच संयम लागत असेल ना?
फोटो क्र. ५, ८, ११ मधल्या रांगोळ्या सगळ्यात आवडल्या. निशिगंध की तत्सम फुलांना एकात एक घालून केलेली झालर क्लासच दिसतेय.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2012 - 12:22 am | अत्रुप्त आत्मा

@-कितीही वेळा पाहिल्या तरी समाधान होत नाही>>> हा हा हा...थँक्यू
@-एवढ्या काटेकोरपणे या रांगोळ्या काढायला बराच संयम लागत असेल ना?>>> संयम लागतोच,पण पुढे पुढे सवयीचं होऊन गेल्यावर चिकाटी जास्त लागते... कारण रांगोळी काढता/काढता कंटाळा यायला लागला,तर उपयोगी पडते ती चिकाटीच...!
@-निशिगंध की तत्सम फुलांना एकात एक घालून केलेली झालर क्लासच दिसतेय...>>> फुलांच्या रांगोळीतलं हे सर्वात कंटाळा अणवणारं काम आहे,आधी तो निशिगंध कडक हवा,मऊ पडलेला नको हे पहावं लागतं,नंतर तो जिथे बेंड होतो तिथे तोडून मग एकात एक अडकवणे हे काम,ते झालं की मग तो एकापुढे एक रचत रचत तिरके गोल आकार देत जायचं... म्हणुन ती झालर आल्यासारखी दिसते.

स्मिता.'s picture

4 Jan 2012 - 4:40 pm | स्मिता.

फुलांच्या रांगोळीतलं हे सर्वात कंटाळा अणवणारं काम आहे,आधी तो निशिगंध कडक हवा,मऊ पडलेला नको हे पहावं लागतं,नंतर तो जिथे बेंड होतो तिथे तोडून मग एकात एक अडकवणे हे काम,ते झालं की मग तो एकापुढे एक रचत रचत तिरके गोल आकार देत जायचं... म्हणुन ती झालर आल्यासारखी दिसते.

तुमच्या चिकाटीला सलाम हो भटजीबुवा! (एवढा संयम आणि चिकाटी बहुदा भटजी लोकांत दिसत नाही)
राहून राहून वाटतं की आधी माहिती असतं तर आमच्या लग्नातल्या पुजेचा कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच दिला असता ;)

वपाडाव's picture

4 Jan 2012 - 4:46 pm | वपाडाव

राहून राहून वाटतं की आधी माहिती असतं तर आमच्या लग्नातल्या पुजेचा कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच दिला असता...

ही चुक आम्ही होउ देणार नाही.... भटजी फिस्क करा एकदाचं....
तारीख अन पोरगी नंतर ठरवु....

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2012 - 9:49 pm | अत्रुप्त आत्मा

@-राहून राहून वाटतं की आधी माहिती असतं तर आमच्या लग्नातल्या पुजेचा कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच दिला असता... >>> पुजा श्रावणात(ही) किंवा अन्य वेळीही करातात*... ;-)
*आधार-या पुजनाला दिवस मुहुर्त यांचं आगत्य नाही,पौर्णिमा किंवा इतर कोणत्याही दिवशी आपले मन प्रसन्न असेल अश्यावेळेला-तोच उत्तम मुहुर्त समजून हे पूजन करावे... ..(सत्य-नारायण कथा-अध्याय पहिला मधुन सा-भार..आणी साभार उचलू दिल्या बद्दल कथा लेखक-सूत महर्षी यांचे आभार ;-) )

अन्या दातार's picture

3 Jan 2012 - 9:24 pm | अन्या दातार

अप्रतिम!!!!

पैसा's picture

3 Jan 2012 - 9:27 pm | पैसा

पण याना मी रांगोळीपेक्षा पुष्पवल्ली म्हणेन!

सगळ्या रांगोळ्या सुंदर आहेत

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2012 - 12:09 am | अत्रुप्त आत्मा

वल्ली,गणपा,मदनबाण,अन्या,पैसा,जाईसाहित्ययात्री...
धन्यवाद...!

रांगोळ्या सुंदर आहेत ह्यात वादच नाही. एक छोटी सूचना कराविशी वाटते, बघा पटतेय का. रांगोळीच्या खाली एखाद्या डार्क (डार्क निळा, जांभळा वगैरे) किंवा ब्राईट (केशरी, पिवळा वगैरे) रंगाचं कापड जर घातलं तर रांगोळी चांगली उठून दिसेल असं वाटतं. वरील बहुतेक सगळ्या रांगोळ्या फरशीवर आहेत ज्या बरेचदा पांढर्‍या रंगाच्या असतात; त्यात काही काही रंग फारसे उठून दिसत नाहीत. एखाद्या प्लेन रंगाच्या पार्श्वभूमीवर फुलांचे/पानांचे रंग मस्त दिसतील असं वाटतं.

मलाही तसच वाटतं.
पांढर्‍या फरशीवर निशिगंध उठून दिसत नाही.
काहीजणांकडे नक्षिदार टाईल्स असतात, त्यावेळी भटजीबुवांची ही कला उठून दिसण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे. मी पुन्हा पुन्हा धाग्यावर येऊन फोटू पाहून जात आहे.;)
गुरुजी, तुम्ही अल्बम बनवलाय का? त्यातून यजमान रांगोळी निवडू शकतील असे काही करता का? तुमच्या नवीन क्यामेर्‍यावर फोटू काढा आणि चिकटवा अशी विनंती करते.

भटजी बुवा, तुम्ही यजमांनांना वास्तुरंगावलीशास्त्रानुसार टाइल्स बदलायला लावत जा, टाइल बदलायचं कंत्राट मला द्या, पार्टनरशिप मध्ये करु अपण धंदा...

रेवती's picture

3 Jan 2012 - 11:24 pm | रेवती

आणखी काही?;)
तुमचा पाय बरा झालेला दिसतोय्.......म्हणूनच सुचतायत या गोष्टी.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jan 2012 - 11:46 pm | अत्रुप्त आत्मा

पार्टनरशिप मध्ये करु अपण धंदा...>>> पन्नासराव,यजमानांच्या माझ्या न तुटणार्‍या कायमच्या धाग्यावर माझा बाजार उठवायचा इचार हाय काय तुमचा..? ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2012 - 12:24 am | अत्रुप्त आत्मा

@-पांढर्‍या फरशीवर निशिगंध उठून दिसत नाही.
काहीजणांकडे नक्षिदार टाईल्स असतात, त्यावेळी भटजीबुवांची ही कला उठून दिसण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे>>> उपाय सुचवत रहा...! मी त्याचा उपयोग रांगोळ्यांचं प्रदर्शन भरवणार आहे,तेंव्हा करणार आहे...!

@-मी पुन्हा पुन्हा धाग्यावर येऊन फोटू पाहून जात आहे.>>> ह्हा ह्हा ह्हा...थँक्यू

@-गुरुजी,तुम्ही अल्बम बनवलाय का? त्यातून यजमान रांगोळी निवडू शकतील असे काही करता का?>>>अल्बम आहे...यजमान निवडतात त्यातुन बरेच प्रकार...
@-तुमच्या नवीन क्यामेर्‍यावर फोटू काढा आणि चिकटवा अशी विनंती करते.>>> क्यामेरा उद्या येणार आहे... :-)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jan 2012 - 11:57 pm | अत्रुप्त आत्मा

मराठे साहेब..तुमच्या सुचना मला माझ्या कामाच्या जागी वर्कऔट करणं मुष्किल आहे.या सर्व रांगोळ्या मी पुजा चालू असताना मिळेल त्या वेळात,जश्या मिळेल तश्या जागेत काढत असतो... वरिल सर्व सुचनांचा विचार मला जेव्हा माझं खास रांगोळ्यांचं प्रदर्शन भरवायचं आहे तेंव्हा नक्की करता येइल... नव्हे,मी तो करणारच आहे,,,सुचक प्रतिक्रीयेबद्दल मनापासुन धन्यवाद.

सर्वच रांगोळ्या सुरेख आहेत.
शेवटून चौथ्या रांगोळीच्या दोन्ही बाजूला जी उभ्या सर्परेषांची नक्षी आहे ती पण तुम्हीच काढलीयेत का ? छान दिसतेय ती .

त्यासाठी रांगोळीने जाड नक्षी काढून त्यातून बोट फिरवतात असे वाटते.
तू शिकून घे बेसिक रांगोळ्या. लग्नकार्य, सत्यनारायण, मंगळागौर, हळदीकुंकू अश्या समारंभांना तुलाच उपयोगी पडतील.;)
तुझी हितचिंतक,
आज्जी.

५० फक्त's picture

3 Jan 2012 - 11:37 pm | ५० फक्त

''तू शिकून घे बेसिक रांगोळ्या. लग्नकार्य, सत्यनारायण, मंगळागौर, हळदीकुंकू अश्या समारंभांना तुलाच उपयोगी पडतील.'' वा वा, म्हणजे सुडचं काम झालेलं दिसतंय, मी म्हणलंच होतं त्याला इथला युजर आयडि लहान करुन घे, लगेच काम होईल, अशी अजुन एक दोन उदाहरणं आहेत, अंधश्रद्धा नाही ही.

सोकाजीरावांनी पण आपला युजर आयडी लहान करुन घेतल्याचे पाहीले.....................................

सूड's picture

4 Jan 2012 - 5:19 pm | सूड

अरे वा !! आज्जी इज़ बॅक अगेन !!
>>लग्नकार्य, सत्यनारायण, मंगळागौर, हळदीकुंकू अश्या समारंभांना तुलाच उपयोगी पडतील.

शेवटचे दोन पाशवी शक्तींचे सोहळे असल्याने त्यात पाशवी शक्तींनीच रांगोळ्या काढाव्या असं मत आहे. आणि आता तर पहिल्या दोनचाही प्रश्न नाही भटजींनाच बोलावणार रांगोळ्या काढायला. :D

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jan 2012 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा

@-उभ्या सर्परेषांची नक्षी आहे ती पण तुम्हीच काढलीयेत का ? छान दिसतेय ती .>>> होय ती बाजुची रांगोळीपण मीच काढलेली आहे... एकदा जमायला लागल्या की बोटांनी काढायच्या रांगोळ्यापण झकास येतात.रांगोळीची एक सरळ जाड लाइन टाकुन,मग एकाटोकापासुन इंग्रजी एस शेपमधे शेवटपर्यंत बोट फिरवत अणायचं,नंतर पुन्हा त्याच टोकाकडून उलट्याबाजुनी एसशेपमधे बोट फिरवायचं..झाली नागमोडी तयार... फुलांच्या रांगोळ्यांपेक्षा रांगोळीची फुलं काढणं सोप्प आहे.. :-) या बोटानी काढायच्या रांगोळ्या हल्ली झीमराठी वर सकाळी रामराम महाराष्ट्र मधे दाखवतात.

धन्या's picture

3 Jan 2012 - 11:20 pm | धन्या

क्लास !!!

दीपा माने's picture

4 Jan 2012 - 12:25 am | दीपा माने

आपले अभिनंदन! फारच छान रांगोळ्या आहेत. फुलांच्या रांगोळ्याना नेहेमीच्या रांगोळ्यांप्रमाणे जास्त दिवस जतन करता येत नाही कारण फुलं कोमजतात. फुलातल्या फुलातही काही फुले लौकर कोमजतात तर काही उशीरा!

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2012 - 9:15 am | अत्रुप्त आत्मा

@-फुलांच्या रांगोळ्याना नेहेमीच्या रांगोळ्यांप्रमाणे जास्त दिवस जतन करता येत नाही कारण फुलं कोमजतात.>>> आमचे काही यजमान फुलं कोमेजू नयेत यासाठी निरनिराळ्या युक्त्या वापरुन रांगोळी ४-४/५-५ दिवस ठेवतात,असाही अनुभव आहे.
@-फुलातल्या फुलातही काही फुले लौकर कोमजतात तर काही उशीरा!>>> हे बाकी खरं आहे,ते फुला-फुलांवर अवलंबुन आहे... ;-)
निसर्गाची करणी,त्याच्यावर आपण किती मारणार पाणी..? ;-)

धनुअमिता's picture

4 Jan 2012 - 2:01 pm | धनुअमिता

@-फुलांच्या रांगोळ्याना नेहेमीच्या रांगोळ्यांप्रमाणे जास्त दिवस जतन करता येत नाही कारण फुलं कोमजतात.>>> आमचे काही यजमान फुलं कोमेजू नयेत यासाठी निरनिराळ्या युक्त्या वापरुन रांगोळी ४-४/५-५ दिवस ठेवतात,असाही अनुभव आहे.

आम्हांलाही सांगा कि राव ती युक्ती

निसर्गाची करणी,त्याच्यावर आपण किती मारणार पाणी..?

हसुन हसुन डोळ्यात पाणी आले.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2012 - 10:53 pm | अत्रुप्त आत्मा

@-आम्हांलाही सांगा कि राव ती युक्ती...>>>....या युक्या किंवा उपाय,हवामान पाहुन करायच्या आहेत...
१) दर १ दिवसानी अ‍ॅस्प्रिनच्या पाण्याचा स्प्रे मारणे...थंडीत नुसतं पाणी चालतं.
२)२दिवसातुन एकदा-बाटलीभर पाण्यात चिमुटभर साखर टाकुन.त्याचा स्प्रे मारणे,यामुळे फुलं कडक राहतात.
३)उन्हाळा खूप असेल तर रांगोळीच्या खोलीत थंडावा राहिलसे पहाणे,(अगदी एसी सुद्धा लावातात काही जण)...
४)आणी सर्वात महत्वाचं-लहान मुलां***पासुन रांगोळीचं रक्षण करणे...
***उदा---
लाहान्या-आई..आई हे ब,काय?
आई-काय..?
लहान्या-हापी बद्दे...मी शगले गुलाब आन्ले...!
आई-कुठुन ते..?
लाहान्या-गुल्जींच्या लांगोलीत पल्लेवते...! (आणी गुलाब उचलताना लहान्या अमच्या रांगोळीत पडलावता=रांगोळीची इतिश्री)

धनुअमिता's picture

5 Jan 2012 - 11:43 am | धनुअमिता

खुप खुप आभार तुमचे ही युक्ती सांगितल्या बद्दल.

पाषाणभेद's picture

4 Jan 2012 - 12:37 am | पाषाणभेद

आपल्या हातात कला आहे गुरूजी

कौशी's picture

4 Jan 2012 - 3:34 am | कौशी

खुप छान आहेत रांगोळ्या ..

सुहास झेले's picture

4 Jan 2012 - 6:51 am | सुहास झेले

व्वा व्वा.... इतक्या सुंदर रांगोळ्या काढता, तरी तुमचा आत्मा अतृप्त कसा ;)

सुंदर कलाकुसर आहे, हा भाग देखील आवडला .... लगे रहो :) :)

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2012 - 9:05 am | अत्रुप्त आत्मा

इतक्या सुंदर रांगोळ्या काढता, तरी तुमचा आत्मा अतृप्त कसा ?>>> मुद्याचं बोल्लात...! आत्मा अत्रुप्त आहे,म्हणुन तर नव्यानव्या रांगोळ्या सुचतात...(आणी सौंदर्य(ही) राहतं ;-) )...! आत्मा त्रुप्त झाला,तर मुक्ति मिळेल...पक्षी-कामात पाट्या टाकल्या जातील,म्हंणजे खेळ खल्लास...आमचाही आणी रांगोळ्यांचाही..!
काय म्हणता.. ;-)

सुहास झेले's picture

4 Jan 2012 - 9:12 am | सुहास झेले

यप्प... असेच अतृप्त रहा ;) :)

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2012 - 9:20 am | अत्रुप्त आत्मा

असेच अतृप्त रहा>>> :-) ते आमचं आत्मलिखित(च) आहे... :-)

(पूर्ण इहलौकिक)-अत्रुप्त आत्मा

जयंत कुलकर्णी's picture

4 Jan 2012 - 7:52 am | जयंत कुलकर्णी

फुलोंकी रंग से........

व्वा व्वा भटजीबुवा मन कसं प्रफुल्लीत झालं हो सकाळी सकाळी. शेवटी ही जी कला आहे ही देखील नैसर्गिक आहे. एकच म्हणेन हे निसर्गाचं दान आहे आणि भटजी बुवांच्या हाती कलेचं मैदान आहे. व्वा व्वा बुवा मजा आला.

येऊ द्यात अशाच रांगोळ्या आणि लवकरात लवकर रांगोळ्यांचे प्रदर्शन भरो हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2012 - 8:59 am | अत्रुप्त आत्मा

धन्या,दिपा माने,पा.भे,कौशी,जयंत कुलकर्णि,सुहास झेले,चतुर चाणक्य...सर्वांना धन्यवाद..!

किसन शिंदे's picture

4 Jan 2012 - 9:23 am | किसन शिंदे

मस्तच आहेत सगळ्या रांगोळ्या.
वरून ५ व्या फोटोत ती गुलछडी एकात एक गुंफताना झाडूच्या काडिचा वापर केला होता कि अशीच एकमेकांत गुंफली आहेत?

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jul 2012 - 5:48 pm | अत्रुप्त आत्मा

@-झाडूच्या काडिचा वापर केला होता कि अशीच एकमेकांत गुंफली आहेत?>>> डायरेक्ट एकमेकात गुंफलेली आहेत... :-)

अवांतर- रांगोळी या प्रकारात आंम्ही कुठेही काडी करत नाही. ;-)

प्रभाकर पेठकर's picture

4 Jan 2012 - 10:28 am | प्रभाकर पेठकर

सर्व फोटो मोबॉ-इल वरुन काढलेले आहेत

आपल्या हातातील कला आणि मोबाईल दोन्ही उच्च प्रतिचे आहे.
प्रदर्शन भरवाल तेंव्हा आधी जरूर जरूर जरूर कळवा. भारतात असलो तर १००% भेट देईन.

मी-सौरभ's picture

4 Jan 2012 - 10:59 am | मी-सौरभ

बुवा: तुम्हाला आता अजुन प्रसिद्धी मिळेल अन कार्यं पण... ;)

अवांतरः पेठकर काका तुम्ही कुठल्या देशात् असता??

प्रभाकर पेठकर's picture

4 Jan 2012 - 1:56 pm | प्रभाकर पेठकर

पेठकर काका तुम्ही कुठल्या देशात् असता??

गेली ३० वर्षे मी, अरबस्थानातील एक देश, सल्तनत ऑफ ओमान (पुर्वाश्रमीचे 'मस्कत') इथे कार्यरत आहे. हा देश भारतापासून, विमानाने, अंदाजे अडीच तास अंतरावर आहे. दुबई-शारजा पासून, रस्त्याने, ४ तासांचा प्रवास आहे. म्हणजे आपल्या पुणे-मुंबई सारखेच.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2012 - 3:46 pm | अत्रुप्त आत्मा

@-तुम्हाला आता अजुन प्रसिद्धी मिळेल अन कार्यं पण... :-D अस्स काय...! मग सत्य-साई...बा...बां...सारखं मी ही म्हणतो,माय वर्क इज माय व्हिजिटिंग कार्ड ;-) कशे वाट्टे...?

जागु's picture

4 Jan 2012 - 11:38 am | जागु

जबरदस्त.

वपाडाव's picture

4 Jan 2012 - 12:19 pm | वपाडाव

मस्तच....

मृत्युन्जय's picture

4 Jan 2012 - 1:32 pm | मृत्युन्जय

कला आहे तुमच्या हातात. अभिनंदन. खुपच छान रांगोळ्या

निश's picture

4 Jan 2012 - 1:51 pm | निश

एकच शब्द : अफाटमस्त
सुंदर मनमोहक लय भारि वा छान मस्त ....

अहो कौतुकाचे सगळे शब्द अपुरे आहेत
म्हणुन म्हटल
अफाट अफाट अफाट अफाट अफाट.....................

धनुअमिता's picture

4 Jan 2012 - 1:53 pm | धनुअमिता

मस्त आहेत रांगोळ्या.

बघुनच मन एकदम प्रसन्न झाले.

येऊ द्यात अशाच रांगोळ्या .

ह्या सुंदर फुलांच्या सदाबहार रांगोळ्या हय तुमच्या टवटवित मनाचेच प्रतिबिंब आहेत...
कीती प्रसन्न वाटत असेन ना रांगोळी पुर्ण झाल्यावर

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2012 - 3:51 pm | अत्रुप्त आत्मा

@-कीती प्रसन्न वाटत असेन ना रांगोळी पुर्ण झाल्यावर...>>> प्रसन्न वाटतच,पण खरीखुरी प्रसन्नता किंबहुना समाधान वाटतं,ते आपल्या इथल्या सारखे प्रतिसाद ऑन दी स्पॉट मिळतात तेंव्हा...!

सविता००१'s picture

4 Jan 2012 - 2:03 pm | सविता००१

मस्त.....अप्रतिम.......सुंदर

पुष्करिणी's picture

4 Jan 2012 - 2:23 pm | पुष्करिणी

फारच सुंदर रांगोळ्या आहेत गरूजी , प्रदर्शन नक्की भरवा.

सर्व रांगोळ्या जबराटच आहेत .
गुर्जी
साष्टांग हो .
___/\___

अवांतर : सदर रांगोळ्यांची फी दक्षिणेतच घेता कि याचे वेगळे चार्ज :)

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2012 - 4:13 pm | अत्रुप्त आत्मा

@-अवांतर : सदर रांगोळ्यांची फी दक्षिणेतच घेता कि याचे वेगळे चार्ज >>> ते यजमान कित्ती प्रेमळ असेल त्यावर अवलंबुन असतं ;-)
अवांतर-विशेषतः कुणी लग्न लावण्यासाठी बाहेर गावी बोलावलं तर लग्नाच्या देवक ग्रहमखातली नवग्रह रांगोळी/शेवटच्या फोटोत आहे तशी लग्नात सप्तपदी/घरी येतानच्या पायघड्या/सत्यनारायणासमोरची रांगोळी/नंतरच्या एका विशेष- विवा=हिताच्या वयैक्तिक शो ची खोलितली सजावट...एवढं...एवढं..एवढं...सगळ आंम्ही आम्चं प्याकेज घेतलं तर पूर्ण फुकट करतो... :-D

अतीअवांतर-नंतरच्या एका विशेष- विवा=हिताच्या वयैक्तिक शो ची खोलितली सजावट..(या वाक्यावर कुण्णी..कुण्णी म्हणुन हसायचं नाही हं...)

michmadhura's picture

4 Jan 2012 - 5:22 pm | michmadhura

सर्वच रांगोळ्या सुरेख आहेत. १४ व्या फोटोतली सरस्वती मातेची मूर्ती पण दिसली असती तर अजुन छान वाटलं असतं.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jan 2012 - 11:59 am | अत्रुप्त आत्मा

@सरस्वती मातेची मूर्ती पण दिसली असती तर अजुन छान वाटलं असतं.>>> मोबॉ-इल क्यामेरा-त्यामुळे सगळ नाही अणता आलं,फटूत :-(

सोत्रि's picture

4 Jan 2012 - 5:43 pm | सोत्रि

गुर्जी,

निव्वळ सुंदर! मजा आली!!

कितीही वेळा पाहिल्या तरी समाधान होत नाही

लै वेळा सहमत!

- (गुर्जींची 'दक्षिणा' परवडेल का असा प्रश्न पडलेला) सोकाजी

तुम्ही प्रेमळ यजमान असल्याने गुरुजी तुम्हाला खास डिस्काउंट देतीलच की. :)

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2012 - 10:03 pm | अत्रुप्त आत्मा

@-- (गुर्जींची 'दक्षिणा' परवडेल का असा प्रश्न पडलेला) सोकाजी>>> :-D आंम्ही परवडणार्‍या दक्षिणेतली कामं(ही) करतो... ;-)

(परवडणारी दक्षिणा कबुल केलेले यजमान-आपल्याला बोलावतील का नाही?असा प्रश्न पडलेला)आत्मा गुरुजी ;-)

चिमी's picture

4 Jan 2012 - 5:56 pm | चिमी

मस्त , अप्रतिम, अफाट ...

आत्मशून्य's picture

4 Jan 2012 - 6:21 pm | आत्मशून्य

हेच म्हणायला आलो होतो.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2012 - 11:26 pm | अत्रुप्त आत्मा

किसनराव,प्रभाकर पेठकर,सौरभ,जागुताई,वपाडाव,मृत्युंजय,निश,धनुअमिता,गणेशा,सविता,पुष्करणी,स्पावड्या,सो.त्रि,michmadhura,चिमी,आ.शू....>>>

सर्वांचे मनापासुन आभार..! :-)

मानस्'s picture

5 Jan 2012 - 10:33 am | मानस्

सकाळच्या वेळी अश्या छान फुलांच्या रांगोळया पाहून मन अगदी प्रसन्न झालं.

हाय क्लास रांगोळ्या...
मोगँबो खुश्श्श्श हुआ ;)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jan 2012 - 11:35 pm | अत्रुप्त आत्मा

मोगँबो खुश्श्श्श हुआ ;-) <> मि.इंडिया भि खुष हुआ ;-)

ज्योति प्रकाश's picture

5 Jan 2012 - 4:04 pm | ज्योति प्रकाश

अतिशय सुंदर रांगोळ्या.पाहुन मन प्रसन्न झाले.अप्रतिम.

दिपक's picture

5 Jan 2012 - 4:13 pm | दिपक

डॉळ्याचे पारणे का काय ते.. ते फिटले. मस्तच :)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jan 2012 - 11:46 pm | अत्रुप्त आत्मा

मानस,प्यार्‍या,ज्योती प्रकाश,दिपक... थँक्यू ... :-)

मेघवेडा's picture

6 Jan 2012 - 3:15 am | मेघवेडा

अगदी वरचा क्लास! अतिशय सुंदर रांगोळी काढणारे कित्येक ब्राह्मण पाहिलेत! पण ही फुलांची असली भारी सजावट पहिल्यांदाच पाहिली! साला रांगोळी बघूनच यजमान खुश होणार! उच्चा उच्चच मिळणार! कसें?! ;)

सगळे तुमचे यजमान वश झालेले असणार तुम्हांला .. ग्यारंटी आहे!

प्रदर्शन भरवा खरंच.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jan 2012 - 9:09 am | अत्रुप्त आत्मा

उच्चा उच्चच मिळणार! कसें?! भाऊसाहेब आपण कोणत्या शाखेचे...? ;-) उच्चा वादी नवसूत्र बाष्कळ शाखाध्यायी की काय...? एकतर आपली गल्ली एकच आहे..किंवा आपण आमच्या गल्लीतल्यांचे नि-कट वर्तीय आहात...कसें...अं...? ;-)
मलातर जाणकार श्रद्धांदेवा असल्याचीही शंका येत हाय... :-D

अभिजीत राजवाडे's picture

7 Jan 2012 - 8:31 pm | अभिजीत राजवाडे

सुंदर कलाकुसर!!!

दिव्यश्री's picture

22 Nov 2012 - 6:16 pm | दिव्यश्री

मी आधी फुलान्च्या रान्गोळ्या पाहिल्या आहेत.पण सभासद नाही म्हणूण प्रतिसाद देता आला नाही.:(
आता देते,खुपच सुरेख,सुन्दर्,केवळ अप्रतिम असतात.......:)
शिकवणी मिळेल का?

विजय मुठेकर's picture

22 Nov 2012 - 8:29 pm | विजय मुठेकर

मले तर काय बी दिसत नाय........ लोकांचे प्रतिसाद आन फटु पन........
मंडळी कायतरी मदत करा की.....

डावखुरा's picture

22 Nov 2012 - 11:02 pm | डावखुरा

रांगोळ्या दिसत नाहीत

अत्रुप्त आत्मा's picture

22 Nov 2012 - 11:10 pm | अत्रुप्त आत्मा

संपादक संपादक.... धावा धावा...आम्चा धागा जिवंत करा... ;-)

दिव्यश्री's picture

22 Nov 2012 - 11:11 pm | दिव्यश्री

ओ गुर्जी शिकवणीच काय करताव?

तेच म्हणतेय ...... मला सुद्धा दिसत नाहीयेत. अत्रुप्त आत्मा.....तुमच्या रांगोळ्या जिवंत असतातच पण इथे आम्हालाही दर्शनाचा लाभ घेऊ द्या हो :)

गणपा's picture

23 Nov 2012 - 7:13 pm | गणपा

हुश्श जमलं बॉ एकदाच.

कौस्तुभ आपटे's picture

23 Nov 2012 - 7:23 pm | कौस्तुभ आपटे

सुंदरच.....
आईने इमेजेस सेव्ह करायला सांगीत्ल्यात. पुढल्या दिवाळीत काढ्ण्यासाठी :)

अभ्या..'s picture

23 Nov 2012 - 7:28 pm | अभ्या..

आत्माराव धन्य आहात हो तुम्ही
कला आहे राव. ईतके छान काम्पोझीशन ते पण फुलांचे आणि फक्त पूजेसाठी. वा वा.
आवडले. अगदी खूप खूप आवडले.
(जमल्यास त्या फुलांच्या रांगोळीसाठी का होइना पण तुम्हीच लावा आमचे लग्न ;) )

अत्रुप्त आत्मा's picture

23 Nov 2012 - 11:24 pm | अत्रुप्त आत्मा

@तुम्हीच लावा आमचे लग्न >>> कधी आहे??? ;-)

अभ्या..'s picture

24 Nov 2012 - 1:40 am | अभ्या..

तुम्ही लागा फुलं वेचायला. मुलगी राजी आहे. ती अन मी पटवतो घरच्यांना तोपर्यंत. ;)
जरा जास्त घ्या फुलं. रांगोळी मोठी पण हवी आणि आम्हाला जरा वेळ पण लागेल.
पण गुरुजी तुम्हीच पायजेत कंपल्सरी.

जयवी's picture

23 Nov 2012 - 9:33 pm | जयवी

अहाहा ...... डोळे निवले... !!
क्या बात है सरजी..... तुस्सी छा गये :)

निवेदिता-ताई's picture

23 Nov 2012 - 10:22 pm | निवेदिता-ताई

अरप्रतिम