✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फुलांच्या रांगोळ्या-सप्तपदी विशेष

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Wed, 05/09/2012 - 17:39  ·  लेख
लेख
यापूर्वी इथे प्रदर्शित केलेल्या रांगोळ्या :-) http://www.misalpav.com/node/19262 http://www.misalpav.com/node/20308 या वेळच्या रांगोळ्यांमधे गेल्या दोन महिन्याच्या सिझन मधे काढलेल्या सर्व रांगोळ्या आहेतच. परंतू त्यातल्या स्पेशल आणी वेगळ्या आहेत त्या अधी डकवल्या आहेत... सप्तपदीच्या रांगोळ्या आणी काही स्पेशल ,वेगळ्या अगदी भरपूर वेळ देऊन काढलेल्या रांगोळ्यापण या वेळच्या भागात आहेत. आणी तश्याही सप्तपदीच्या दोनच आहेत...कारण दरवेळी त्यासाठी लागणारा वेळ,तसं काम करवून घेण्यास उत्सुक असलेला ''यजमान'' ...हे सगळच गणित जमतं असं नाही...कारण १ सप्तपदीची रांगोळी(गालिचा) काढायचा म्हटला तर...अदल्या दिवशी मार्केटयार्डातून फुलं घरी आणणे- १तास+ वेगवेगळ्या फुलांचं कंटींग-४ ते५ तास+ दुसर्‍या दिवशी(लग्न दिवशी) कार्यालयात मुहुर्त कितिचा आहे हे पाहुन ,,,त्याप्रमाणे अगदी कधी कधी पहाटे ५ वाजल्यापासून...सप्तपदी काढायला लागणारा वेळ ३ ते ४ तास= सगळे मिळून सात ते नऊ तास इतका वेळ या एका सप्तपदीला मोडतो...(अगदी पावला गणिक १तास असं म्हणायलाही हरकत नाही :-) ) त्यामुळे सप्तपदीच्या रांगोळ्या दोनच आहेत.... बाकिच्या नेहमी प्रमाणे.. :-) १)सप्तपदी... शेवटचा हात मारताना... अता चालवली पहा वधू....... ''ईषे एकपदी भव.....'' शेवटच्या सातव्या पदी... सखा सप्तपदी भव...। २) घरी येणार्‍या नव दांपत्यासाठी पायघड्या... ३)घरी प्रवेश केल्यावर-नामलक्ष्मी पूजना साठी... स्पेशल रांगोळी ४)आता इथुन पुढे नेहमीच्याच पुजेच्या आहेत..पण तरिही स्पेशल आहेत.. :-) आणी आता दी ऐंड विथ लव्ह स्मायली यावेळेसचे सगळे फोटो--- सॅमसंग प्राइमो मोबॉइल कॅमेरा... :-)

Book traversal links for फुलांच्या रांगोळ्या-सप्तपदी विशेष

  • ‹ फुलांच्या रांगोळ्या-२
  • Up
  • फुलांच्या रांगोळ्या-गुलछडी स्पेशल ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण

प्रतिक्रिया द्या
50630 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

झकास.. एकदम झकास......

गवि
Wed, 05/09/2012 - 17:47 नवीन
झकास.. एकदम झकास......
  • Log in or register to post comments

अत्रुप्त आत्मा साहेब, निवळ्ळ लाजवाब.

निश
Wed, 05/09/2012 - 17:48 नवीन
अत्रुप्त आत्मा साहेब, निवळ्ळ लाजवाब. कौतुक करायला शब्ब्दही अपुरे आहेत. निवळ्ळ लाजवाब. निवळ्ळ लाजवाब. निवळ्ळ लाजवाब.
  • Log in or register to post comments

+1

यकु
Wed, 05/09/2012 - 17:53 नवीन
सेम टू सेम ! लैच भार्री. एक निरागस प्रश्न: ते त्या पायर्‍यांवरच्या फुलांवरुन चालत कुठे जाणार आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

@ते त्या पायर्‍यांवरच्या

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/09/2012 - 18:06 नवीन
@ते त्या पायर्‍यांवरच्या फुलांवरुन चालत कुठे जाणार आहेत?>>> त्यांच्या स्वतःच्या घरात... अरे हो...आता कळलं असं का वाटलं..ते..? फोटू वरच्या मजल्यावरुन घेतला...त्यामुळे वरुन खाली जाण्यासाठी असा भास होत असेल... पण तसं नाही...हो यक्कूशेठ ... खालच्या पायरीवरुन वर त्यांच्या घरात जाण्यासाठी असं ..आहे हो ते..सगळ :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

+२

प्यारे१
Wed, 05/09/2012 - 18:05 नवीन
निव्वळ लाजवाब! @ पप्या, लग्न कर आता. अरे सत्यनारायणाची पूजा आहे घरी लग्नानंतरची. पायर्‍या चढून सत्यनारायणाचा प्रसाद घ्यायचा. कळ्ळं???? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

सत्य नारायणाची पुजा म्हणे !

यकु
Wed, 05/09/2012 - 18:25 नवीन
सत्य नारायणाची पुजा म्हणे ! :p सत्यं ब्रूयात हितं ब्रूयात!:p जागरण गोंधळ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आधी पूजाच. (ही ती अथवा ती ही

प्यारे१
Wed, 05/09/2012 - 18:29 नवीन
आधी पूजाच. (ही ती अथवा ती ही नव्हे. सत्यनारायणाची.) नंतर काय जो गोंधळ बिंधळ, जागरण जे काही असेल ते! ;) इयत्ता ६ वीत उत्तर दिलंय सगळ्यां समोर. घाबरतो का काय कुणाला! ;) काकाच्या लग्नाचा वाढदिवस होता. कुणीतरी म्हणे आज ह्यांच्या मीलनाला अमुक अमुक वर्षे झाली. मी म्हटलं असं कसं? आधी पूजा मग..... :) निरागस होतो हो तेव्हा.! :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

अप्रतिम

धनुअमिता
Wed, 05/09/2012 - 17:55 नवीन
सॉल्लिड......... शब्दच अपुरे पडत आहेत तुमची स्तुती करायला. चला आता इकडे फुले शोधणे आले
  • Log in or register to post comments

भटजीबुवा, लाजवाब

पिंगू
Wed, 05/09/2012 - 17:55 नवीन
भटजीबुवा, लाजवाब रांगोळ्या.. - पिंगू
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Wed, 05/09/2012 - 17:59 नवीन
सगळ्याच पुष्पवल्ल्या खास आहेत!
  • Log in or register to post comments

छान

विनायक प्रभू
Wed, 05/09/2012 - 18:18 नवीन
मस्तच हो.सगळी काटे नसलेली फुले.
  • Log in or register to post comments

अहाहा...

स्मिता.
Wed, 05/09/2012 - 18:31 नवीन
कसल्या सुंदर आणि रेखीव रांगोळ्या आहेत! नवदांपत्यांच्या पायघड्यांची सजावट तर फारच आवडली, तसंच बाकीच्या स्पेशल रांगोळ्याही स्पेशल्लच. भटजीबुवा, या रांगोळ्या बघून यजमान आणि देवबाप्पासुद्धा अगदी प्रसन्न होत असणार :)
  • Log in or register to post comments

झक्कास. गुर्जींनी आता

मृत्युन्जय
Wed, 05/09/2012 - 18:36 नवीन
झक्कास. गुर्जींनी आता हनीमूनसाठी बेड सजवण्याचे तेवढे बाकी ठेवलेले दिसतय. रांगोळ्या लैच दिलखेचक १० पैक्की १२ मार्क. :)
  • Log in or register to post comments

@गुर्जींनी आता हनीमूनसाठी बेड

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/09/2012 - 19:23 नवीन
@गुर्जींनी आता हनीमूनसाठी बेड सजवण्याचे तेवढे बाकी ठेवलेले दिसतय. >>> काही यजमान इचारतात ,ती पण सुपारी घेतो. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ही पुढल्या धाग्याची नांदी का?

गणपा
Wed, 05/09/2012 - 19:32 नवीन
ही पुढल्या धाग्याची नांदी का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@ही पुढल्या धाग्याची नांदी

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/09/2012 - 19:42 नवीन
@ही पुढल्या धाग्याची नांदी का? >>> :-D गंपा... आमचा नंदी करायचा इचार हाय काय..? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

सु आणि रे आणि ख. आपल्याला

गणपा
Wed, 05/09/2012 - 18:55 नवीन
सु आणि रे आणि ख. आपल्याला बुवा इतक्या सुंदर कलाकृतीवर पाय द्यायला आवडला नसता. :)
  • Log in or register to post comments

भटजीबुवा, लाजवाब रांगोळ्या..

राजघराणं
Wed, 05/09/2012 - 19:11 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

छानच !! बाकी वरुन पाचव्या

सूड
Wed, 05/09/2012 - 19:12 नवीन
छानच !! बाकी वरुन पाचव्या फोटोत फुलांवर चालणार्‍या त्या बै पाहून फुलांची दया आली. ;)
  • Log in or register to post comments

+१. भटजींना नम्र विनंती

५० फक्त
गुरुवार, 05/10/2012 - 08:10 नवीन
+१. भटजींना नम्र विनंती किमान वर वधु यांच्या आकारमानाकडे पाहुन फुले निवडावीत अशी नम्र विनंती. किमानपक्षी सुर्यफुल वगैरे जरा सहनशक्ती असलेली फुलं निवडत चला भटजी. बाकी, तुमच्या कलाकारीबद्दल वादच नाही, उत्तम उत्तम आणि उत्तमच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

गुर्जी... अप्रतिम कला आहे

स्पा
गुरुवार, 05/10/2012 - 13:20 नवीन
गुर्जी... अप्रतिम कला आहे तुमच्यात एकूण एकूण फुलांची रचना आवडली आणि प्रत्येक वेळी वेगळ डिझाईन __/\__ त्रिवार प्रणाम बाकी सूड आणि ५० शी सहमत, मॉडेल वेगळ वापरायला हव होतंत असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

भटजींना नम्र विनंती किमान वर

यकु
गुरुवार, 05/10/2012 - 21:08 नवीन
भटजींना नम्र विनंती किमान वर वधु यांच्या आकारमानाकडे पाहुन फुले निवडावीत अशी नम्र विनंती. किमानपक्षी सुर्यफुल वगैरे जरा सहनशक्ती असलेली फुलं निवडत चला भटजी.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ढिस्क्लेमर देत जा हो पन्नास फक्त.. मरायची पाळी आली हसून हसून
किमानपक्षी सुर्यफुल वगैरे
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हा हा... :)

दादा कोंडके
Sat, 05/12/2012 - 12:26 नवीन
मला तर ते सासूसासरेच वाटले पहिल्यांदा. पण रांगोळ्या सुरेखच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

+१

स्मिता चौगुले
Tue, 03/19/2013 - 09:33 नवीन
:) :) :) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आमचा सलाम घ्या गुरुजी!

रेवती
Wed, 05/09/2012 - 19:27 नवीन
आमचा सलाम घ्या गुरुजी!
  • Log in or register to post comments

शॉलिट्ट !

मदनबाण
Wed, 05/09/2012 - 19:58 नवीन
शॉलिट्ट ! :)
  • Log in or register to post comments

लय भारि .. कसला हौशी आहे तो

जेनी...
Wed, 05/09/2012 - 20:28 नवीन
लय भारि .. कसला हौशी आहे तो नवरा ..मस्तच .. :) ती पायर्‍या पायर्‍या वर तर रांगोळीची पायघडी ......कसल सुरेख वाटतय ..दिल्खुश एकदम .... काश ......:(
  • Log in or register to post comments

_/\_ अप्रतिम कलाकारी हो बुवा.

प्रचेतस
Wed, 05/09/2012 - 21:51 नवीन
_/\_ अप्रतिम कलाकारी हो बुवा.
  • Log in or register to post comments

क्लास सुरू करून शिष्य घडव रे..

मोदक
गुरुवार, 05/10/2012 - 00:25 नवीन
क्लास सुरू करून शिष्य घडव रे.. नाहीतर स्वतःच्या लग्नात मुंडावळ्या सांभाळत फुलं रचत बसावे लागेल. :-D (तिथेपण स्माईली सोडल्या नाहीस रे बुवा..)
  • Log in or register to post comments

@(तिथेपण स्माईली सोडल्या

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/10/2012 - 06:29 नवीन
@(तिथेपण स्माईली सोडल्या नाहीस रे बुवा..) >>> :-D काय करणार? मी त्यांना सोडतो रे,पण त्या मला सोडत नाहीत... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

+१.. हे मात्र अगदि खरे..

स्मिता चौगुले
Tue, 03/19/2013 - 09:32 नवीन
+१.. हे मात्र अगदि खरे..:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सुरेख!

साती
गुरुवार, 05/10/2012 - 01:33 नवीन
किमान यासाठीतरी घरी पूजा ठेवावी लागेल. (आता फूल ना फुलाची पाकळी शोधणं आलं!)
  • Log in or register to post comments

गुरूजी

अमृत
गुरुवार, 05/10/2012 - 10:06 नवीन
बहोत बढिया... बहोत खूब... कल्पकता आणि रंगसंगती खूप आवडली.... अमृत
  • Log in or register to post comments

पुरक कला

ऋषिकेश
गुरुवार, 05/10/2012 - 11:22 नवीन
तुमच्यातली कला तुमच्या व्यवसायाला पुरक आहे! उत्तम कलाकारी! सगळ्या रांगोळ्या आवडल्या
  • Log in or register to post comments

जबरदस्त ,रंगसंगती अप्रतिम

पियुशा
गुरुवार, 05/10/2012 - 13:11 नवीन
जबरदस्त ,रंगसंगती अप्रतिम साधली गेलिय :)
  • Log in or register to post comments

अहाहा.......... मानाचा मुजरा

जयवी
गुरुवार, 05/10/2012 - 14:18 नवीन
अहाहा.......... मानाचा मुजरा सरकार....... !! डोळ्यांचं पारणं फिटलं........ :)
  • Log in or register to post comments

उत्तम अप्रतिम

सुकामेवा
गुरुवार, 05/10/2012 - 14:28 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयवी

अतृप्त आत्मा बुवा...

इरसाल
गुरुवार, 05/10/2012 - 16:37 नवीन
अशक्य सुंदर कला आहे तुमच्या हातात. ही कला अशीच बहरत रहावो ही देवाजवळ प्रार्थना
  • Log in or register to post comments

वाव्व....ह्या रांगोळ्या

स्वातीविशु
गुरुवार, 05/10/2012 - 16:45 नवीन
वाव्व....ह्या रांगोळ्या स्वप्नवत वाटत आहेत. सुंदर, अप्रतिम,सुरेख, ....... आणखी शब्दच आठवत नाहीत.
  • Log in or register to post comments

क्लासच!

विसुनाना
गुरुवार, 05/10/2012 - 17:45 नवीन
सुंदर आहेत या फुलांच्या रांगोळ्या. :)
  • Log in or register to post comments

निव्वळ जबराट...

नाखु
Fri, 05/11/2012 - 11:01 नवीन
फुले * सुद्धा आप्ल्या सुबक रांगोळीने त्रुप्त झाली असतिल.. फुले = आडनाव म्हणुन नाही.
  • Log in or register to post comments

खुप खुपच सुंदर आहेत सगळ्या

जागु
Fri, 05/11/2012 - 11:41 नवीन
खुप खुपच सुंदर आहेत सगळ्या रांगोळ्या.
  • Log in or register to post comments

सुरेख............अप्रतिम.....

निवेदिता-ताई
Sat, 05/12/2012 - 08:58 नवीन
सुरेख............अप्रतिम...........रंगसंगती झकास......:)
  • Log in or register to post comments

वा वा!

चतुरंग
Sat, 05/12/2012 - 09:23 नवीन
अत्यंत मनोहारी रांगोळ्या आहेत! डोळ्यांचे पारणे फिटले! :) (फूलप्रेमी)चतुरंग
  • Log in or register to post comments

छान छान.

चिंतामणी
Sat, 05/12/2012 - 09:43 नवीन
अ.आ. अजून एक चांगला (कमीत कमी स्माइली असलेला ;)) धागा आवडवला.
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/25/2012 - 22:57 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

+१

स्मिता चौगुले
Tue, 03/19/2013 - 08:55 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मस्त

चाणक्य
Sat, 05/12/2012 - 12:08 नवीन
जमल्या आहेत रांगोळ्या. फारच छान
  • Log in or register to post comments

मस्तच भटजी..

चिगो
Sat, 05/12/2012 - 16:26 नवीन
एकदम सुबक, सुंदर पुष्परांगोळ्या गुर्जी.. लाजवाब..
  • Log in or register to post comments

सुरेख

sneharani
Sat, 05/12/2012 - 16:56 नवीन
सुरेख....अगदी सुरेख आहेत पुष्प रांगोळ्या!! :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा