पुन्हा एकदा लोहगड

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
20 Dec 2011 - 9:21 am

नुकत्याच सरलेल्या पावसाळ्यात लोहगडला मुसळधार पावसात चिंब चिंब झालो होतो. धुव्वाधार पावसामुळे किल्ल्याचे फारसे फोटो काढता आले नाहीत. या रविवारी अनपेक्षितपणे लोहगडवारी पदरात पडली व किल्ला टिपण्याची हौस पुरेपूर भागवून घेतली.

१. पवना धरणाच्या बाजूने दिसणारा लोहगड

२. गडाची बळकट तटबंदी

३.गोमुखी बांधणीचा गणेश दरवाजा

४. बुरुजाच्या जंघ्यांमधून दिसत असलेली लोहगडवाडी

५. गडाचा दुसरा दरवाजा-नारायण दरवाजा

६.नारायण दरवाजा

७.नारायण दरवाजातून

८.गडाचा सर्वात प्राचीन हनुमान दरवाजा

९. सर्वात शेवटचा महादरवाजा

१०. गडावरून दिसणारी दरवाजांची संरचना

११. गडावरील दर्गा

१२. समोरच असलेला विसापूर किल्ला

१३. विसापूर-थोडा अधिक जवळून

१४. त्र्यंबक टाके

१५. नाना फडणीसांनी बांधलेला प्रशस्त हत्ती तलाव

१६. आभाळात घुसलेला विंचूकाटा-लोहगडाची एक माची

१७. विंचूकाटा

१८. विंचूकाट्याच्या शेवटी असलेला चिलखती बुरुज

१९. विंचूकाट्यावर उतरायचा मार्ग

२०. लोहगडावरचे प्रशस्त पठार

२१. किल्ला उतरताना

२२. बुरुजावर बसलेले मर्कट

आस्वादछायाचित्रण

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

20 Dec 2011 - 9:24 am | अन्या दातार

मजा आहे राव तुमची.
मस्त फोटो. दिल खुश हो गया.

नंदन's picture

20 Dec 2011 - 9:24 am | नंदन

मस्त आलेत फोटो. नारायण दरवाजातून टिपलेला आणि दरवाज्यांची रचना दाखवणारा फोटो विशेष आवडले.

अमृत's picture

20 Dec 2011 - 9:37 am | अमृत

छान फोटो आलेत...

अमृत

सुहास झेले's picture

20 Dec 2011 - 10:02 am | सुहास झेले

मस्त... !!

जबराट फोटो
विसापूर चा घेतलेला फोटो विशेष आवडला

अवांतर : वल्ली राव आता एकटे एकटे भटकू नका ;)

मी-सौरभ's picture

23 Dec 2011 - 6:28 pm | मी-सौरभ

अवांतर : वल्ली राव आता एकटे एकटे भटकू नका

आपल्या सल्ल्याचा विचार युद्धपातळीवर चालू आहे असे आमचा चिंचवड्च्या खबरी ने कॉलवले आहे....

सारेच मस्त आलेत फोटो.
पण त्यातही सातवा आणि दहावा म्हणजे कहर आहेत.
लकी यु. :)

५० फक्त's picture

20 Dec 2011 - 10:18 am | ५० फक्त

मस्त झाली आहे रे ट्रिप, आणि फोटो पण मस्त.

अवांतर - अवांतर : वल्ली राव आता एकटे एकटे भटकू नका - बघा बरं स्पा कसा सुधारला, गणपती पुळ्याला कुणाला तरी घेउन गेला होता, गावाला गेला होता, आणि तुमच्या सारखंच ज्याच्या बरोबर गेला होता त्या व्यक्तीचा एक सुद्धा फोटो काढलेला नाही.

लोहगड हे नाव सार्थ वाटतंय यातले काही फोटो पाहून..

मस्त रे वल्ली.. खूप छान दर्शन घडवलंस या सुंदर किल्ल्याचं..

किसन शिंदे's picture

20 Dec 2011 - 10:29 am | किसन शिंदे

मस्तच आहेत सगळे फोटो.

झकासराव's picture

20 Dec 2011 - 12:18 pm | झकासराव

वाह!
मस्त आहेत फोटो. :)
आतापर्यंत लोहगडाला ३-४ वेळा भेट दिली आहे पण आभाळात घुसलेला विंचुकाटा ह्या फोटोत जो अँगल आहे तो कधी लक्षात आलाच नाही. मी अशा जबरी अँगलमध्ये पाहिलेला विंचुकाट्याचा हा पहिलाच फोटो. :)

बाय द वे, एकाच दिवसात लोहगड आणि विसापुर करता येतात. तिकडेही चक्कर मारायची ना राव.
बरच पब्लिक लोहगडावर जात पण विसापुरला नाही जात. तो हि सोपा प्रकारातलाच आहे. :)

प्रचेतस's picture

20 Dec 2011 - 12:25 pm | प्रचेतस

विसापूरला एक दोन वेळा जाऊन आलेलो आहे. पाटणच्या बाजूने काट्याकुट्यातून वाट काढत मुख्य दरवाजातून चढून पलीकडच्या खोदीव गुहेनजीकच्या घळीच्या मार्गाने उतरलेलो आहे.

मनराव's picture

20 Dec 2011 - 12:54 pm | मनराव

मस्त....!!!!

मेघवेडा's picture

20 Dec 2011 - 3:08 pm | मेघवेडा

क्लास! झकास फोटो आहेत, मालक!

विंचूकाटा नेहमीच आकर्षक दिसतो! दरवाजांची संरचना दाखवणारा फोटोही मस्त! :)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2011 - 3:27 pm | अत्रुप्त आत्मा

वल्ली दा सलाम तुंम्हाला...! १नंबर आलेत फोटो... प्रत्येक फोटोन फोटो म्हणजे खरच लोहगड दर्शन आहे.

काय टिपून घ्यायला हवे, हे तुम्हाला चांगलेच कळतय! उत्तम तटबंदीचे सुरेख प्रकाशचित्र आवडले.

मात्र इतक्या मातब्बर तटबंदीत, अपेक्षा करावी असा राज-महाल कुठेही, कोणत्याही किल्ल्यावर दिसत नाही. हे मराठी राज्यकर्त्यांचे समाजवादी धोरण समजायचे की आक्रमकांनी काहीही भव्य-दिव्य-देखणे-नामचीन बांधकाम शाबूत ठेवले नाही ह्याचे द्योतक?

प्रचेतस's picture

20 Dec 2011 - 3:52 pm | प्रचेतस

मराठी राज्यकर्त्यांच्या किल्ल्यांवर दिसणारे भग्नावशेष हे त्यांच्या लढाऊ, झुंझार वृत्तीचे द्योतक आहेत. हे किल्ले म्हणजे परकीय आक्रमकांना शरण गेल्यामुळे शाबूत राहिलेले बांधकाम नव्हे, ती तर रणमैदानातील धगधगती अग्निकुंडच जणू.

मी-सौरभ's picture

20 Dec 2011 - 4:15 pm | मी-सौरभ

हा प्रतिसाद म्हंजे या सुंदर धाग्याच्या कळसावर फडकणारा भगवा झेंडाच आहे....

अत्रुप्त आत्मा's picture

24 Dec 2011 - 6:29 pm | अत्रुप्त आत्मा

या सुंदर धाग्याच्या कळसावर फडकणारा भगवा झेंडाच आहे.... येस..येस..येस..सौरभभाऊंशी एकदम सहमत+++++++++++++१११११११११११११११

अप्रतिम मित्रा ....

तु अजुन एक लोहगड वारी करावीच असे सुचवतो आहे ...

यशोधरा's picture

20 Dec 2011 - 6:14 pm | यशोधरा

दरवाज्याची संरचना आणि विंचूकाट्याचे दोनही फोटो फार आवडले.

रघुनाथ.केरकर's picture

20 Dec 2011 - 9:42 pm | रघुनाथ.केरकर

पोहचयचं कसं , एक दीवसात करता येतो का लोहगड?
जवळ्पास रहायचि काही सोय वैगरे आहे का?

प्रचेतस's picture

20 Dec 2011 - 9:54 pm | प्रचेतस

ते तुम्ही कुठं राहता यावर अवलंबून आहे.
पुणे-मुंबईत असाल तर एका दिवसात सहज जमण्यासारखा आहे.
लोकलने मळवलीला उतरून भाजेमार्गे साधारण २ तासात पायपीट करून गडावर पोहोचता येते किंवा लोणावळ्यावरून दुधिवरे खिंडीच्या अलिकडच्या फाट्यावरून खडबडीत गाडीमार्गाने थेट लोहगडवाडीपर्यंत गाडी नेऊन अर्ध्या तासात माथा गाठता येतो.

पैसा's picture

20 Dec 2011 - 11:37 pm | पैसा

काय किल्ला आहे! बुलंद आणि बेलाग. लोहगड नावाला शोभणारा खणखणीत पोलादी गड! वल्ली, मस्त टिपलाय एकेक फोटो!

पक पक पक's picture

21 Dec 2011 - 9:35 pm | पक पक पक

छान ,वल्लि तुम्हि काढलेले फोटो खुपच सुंदर आहेत.नुसते फोटो बघुन लोहगड ट्रेक केल्या सारखेच वाटले.

सूड's picture

21 Dec 2011 - 10:06 pm | सूड

फोटो छान आहेत. जरा ते वॉटरमार्कित करुन घ्या असे सुचवतो.

पाषाणभेद's picture

22 Dec 2011 - 7:50 am | पाषाणभेद

फारच छान ट्रिप अन फोटो

चिगो's picture

23 Dec 2011 - 4:28 pm | चिगो

लोहगडाला भेट दिलीय, पण एवढे सुंदर फोटोज काढता आले नाही. तिथल्या एका कड्यावरचे (मला वाटतं, तानाजी कडा असावा) भणाणते वारे अजूनही आठवतात आणि जाणवतात..

सुर्ब पिक्स, वल्ली..

मोदक's picture

9 Jan 2012 - 1:20 am | मोदक

विशेषत: विंचू काट्याचा जबरा...

मोदक.