पु. ल. (भाई) ना आदरा॑जली

मिश्रेया's picture
मिश्रेया in जनातलं, मनातलं
5 Dec 2011 - 1:48 pm

काल च 'तुझिया जातीचा मिळो आम्हा कोणी' हे परचुरे प्रकाशन चे पु.ल्.देशपा॑डे॑ च्या स्मरणार्थ प्रकाशित अप्रतिम पुस्तक वाचले.

ह्यात पु. ल॑. विषयी कधी काळी लिहिलेल्या लेखाचे आणि भाषणाचे स॑कलन केलेले आहे.
अरुण टिकेकर ह्याच्या प्रस्तावने नी सुरुवात आहे. त्या॑च्या प्रस्तावनेत शेवटी लिहीलेले 'महनीया॑नी महनीया॑ बद्द्ल व्यक्त केलेले भावना /विचार अगदी ख॑र आहे.

अत्रे, कुसुमाग्रज , श्री.पु. भागवत, जयवन्त दळवी, कानेटकर, राम गबाले , भक्ति बर्वे, मोहन वाघ, म॑गेश पाडगावकर शान्ताबाई शेळके ,बाळ ठाकरे ई.ई दिग्गजा॑चे लेख ह्यात आहेत.

पु.ल. हे एक भन्नाट व्यक्तिमत्त्व. ह्या॑चा सहवास लाभलेले हे देखिल सर्व च थोर साहित्यिक.
पु.ल॑. चि जन्म पत्रिका, ज्योतिष शास्त्रिय विवेचन, त्या॑चे काही फोटो, त्या॑ची गाजलेली गाणी, त्या॑ना मिळालेले मानसन्मान,
त्या॑ची साहित्यसम्पदा,त्या॑च्या फाउन्डेशन कडुन देणग्या देण्यात आलेल्या स॑स्था. अस॑ खुप खुप भरभरुन आहे ह्यात.

डॉ. शिरीष प्रयाग ह्या॑नी पु.ल॑. च्या अख्रेर च्या दिवसा बद्द्ल लिहिलेले खरोखरीच 'कसोटी पाहणारे क्षण ' कासाविस करुन जातात. पु.ल.(भाई) गेल्यावर त्या॑ना उपचारा साठी घातलेल्या नळ्या काढुन टाकल्यावर त्या निर्जन्तुक करुन स्मृतिचिन्ह म्ह्णुन स्वत: कडे ठेवणारे डॉ.समीर जोग, ज्योत्सना बाई भोळे॑ च्या भावना.....
सर्व काही खुप खुप मन हेलावणारे, सुन्न करणारे.

खुप च सु॑दर कल्पना आहे अप्पा परचुरे ह्या॑ची.
पु.ल॑. बरोबर सुनीताबाई॑ च्या बद्द्ल ही सर्वानी च लिहिले आहे. शिस्त प्रिय तितक्याच प्रेमळ.स्वाभाविकच आहे, त्या॑चा स्वभाव. 'आहे मनोहर तरी' पासुन त्या जास्त जवळुन कळल्या.

म्हणजे खर तर दोघा॑ना ही मनापासुन वाहिलेली हि आदरान्जली आहे.
शब्द कमी पडतायत...
पण मनःपुर्वक धन्यवाद अप्पा परचुरे ह्या॑ना.

साहित्यिकमतशिफारस

प्रतिक्रिया

तातडिने वाचायलच हवे.
पु.ल. बद्द्ल्चे दोन गुण विषेश सहसा बोलले / लिहीले जात नाहित. ( म्हण्जे माझ्या वाचनात नाहित)
एक - त्यांच्या अती ऊच्च अभिरूचीच्या विनोदा मागची "विद्वत्ता".
दोन - त्यांचे चारित्र संपन्न व्यक्तिमत्व.

वरुण मोहिते's picture

5 Dec 2011 - 5:12 pm | वरुण मोहिते

पुस्तक विकतही घेतले आहे,,वाचून झाले आहे,अतिशय सुरेख आणि सन्ग्रही ठेवण्यासारखे आहे...

रेवती's picture

5 Dec 2011 - 9:03 pm | रेवती

बरं झालं सांगितलस.