साहित्यः
१ छोटी वाटी तुरीची डाळ, १/२ छोटी वाटी मुगाची डाळ, १/२ छोटी वाटी मसुराची डाळ, १/४ छोटी वाटी चणा-डाळ, २-३ टेस्पून उडदाची डाळ २-३ वेळा स्वच्छ धुवून पाण्यात ३०-४५ मिनिटे भिजवणे.
१ छोटा कांदा बारीक चिरून
१ छोटा टोमॅटो बारीक चिरून
१ टीस्पून बारीक चिरलेले आले
१ टीस्पून बारीक चिरलेले लसूण
१ हिरवी मिरची चिरून
२-३ बोर-मिरच्या / लाल सुक्या मिरच्या
१/२ टीस्पून जीरे
१/४ टीस्पून हिंग
१ टीस्पून हळद
२ टीस्पून लाल-तिखट (आवडीप्रमाणे)
१-१/२ टीस्पून धणेपूड
१-१/२ टीस्पून जीरेपूड
१ टीस्पून बडीशेप पावडर
१/२ टीस्पून गरम-मसाला
मीठ चवीनुसार
१/२ टीस्पून लिंबाचा रस
बारीक चिरलेली कोथिंबीर
४-५ टेस्पून साजूक तुप
पा़कृ:
भिजवलेल्या डाळीत चिरलेली हिरवी मिरची, आले व थोडीशी हळद घालून कुकरमध्ये चांगली शिजवणे. शिजलेली डाळ जराशी घोटून घेणे.
एका भांड्यात २ टेस्पून तुप गरम करून चिरलेला कांदा परतावा. कांदा गुलाबी रंगावर परतला गेला की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतावा.
त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल-तिखट, थोडीशी हळद, धणेपूड, जीरेपूड व बडीशेप पावडर घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतणे.
त्यात शिजवलेली पंचडाळ घालणे. डाळ किती दाट व पातळ हवे त्याप्रमाणे पाणी घालून उकळी आणणे.
उकळी आली की त्यात लिंबाचा रस घालून एकत्र करणे.
त्यावर थोडी कोथिंबीर व गरम-मसाला घालून एकत्र करणे व गॅस बंद करणे.
एका बुट्टीत २ टेस्पून तुप गरम करून जीरे, हिंग, लसुण व बोर-मिरच्या घालून फोडणी करणे व तयार फोडणी डाळीवर ओतणे.
गरमा-गरम पंचमेल डाळ / दाल जीरा राईस बरोबर सर्व्ह करा :)
प्रतिक्रिया
1 Dec 2011 - 7:56 pm | गणपा
भालेकरांच्या मतातली घालमेल आणि त्या वरच हा सानिकाताईंचा पंचमेल धागा पाहुन उगा मनी संशय आला?
पण वाचलो. ;)
अशी ही तडके वाली डाळ आणि सोबतीला वाफाळता जीरा राईस..... बास बाकी दुसरं काही नको.
बाकी बादलीतली डाळ पाहुन लग्नातली पंगत आठवली. :)
आवांतर : फटू खत्तरनाक आलेत.
1 Dec 2011 - 8:33 pm | मेघवेडा
बादलीत आमटी! क्लास! मस्त आहे! एकदमच झ आणि का आणि स!
2 Dec 2011 - 12:42 pm | पियुशा
मस्त मस्त
नक्की करुन बघायला हवी :)
1 Dec 2011 - 10:17 pm | रेवती
ए बाई, असे खतर्नाक फोटू देऊ नकोस.
दाल भारी दिसतिये.
आजकाल कोणत्याही पदार्थाची तयारी करताना तुझ्या पाकृ आठवतात.
यावेळी ३ नवीन स्टीलच्या चमच्यांची भर पडलिये.
एकदा तुझ्याकडच्या भांड्यांचे फोटू दे.
आम्हीही तशीच आणायचा प्रयत्न करू.
2 Dec 2011 - 12:45 pm | सानिकास्वप्निल
अगं ते ३ नवीन स्टीलचे चमचे नसून स्टीलसारखे दिसणारे काचेचे चमचे आहेत :)
भारतभेटीचा पूर्ण फायदा करुन घेतला आहे ;)
1 Dec 2011 - 10:23 pm | इंटरनेटस्नेही
सानिका ताईंच्या पाकृ म्हणजे इट्स अ क्लास इन इट्सेल्फ!
1 Dec 2011 - 10:49 pm | Mrunalini
झकास.... दाल फ्राय मला खुप आवडतो. पुण्यात Horn ok please नावाचे हॉटेल आहे. तिथे पण असच बादलीत डाल फ्राय देतात. सही असतो तो पण... त्याची आठवण करुन दिलीस. :)
1 Dec 2011 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा
झक्कास हो ताइ.... तुमच्या पा.कृ. सुबकपणा मुळे टप्प्या/टप्प्यानी केलेल्या सादरीकरणामुळे वाचायलाही नेहमीच उत्तम वाटतात... आणी आधी डोळ्यांनीच चाखल्या जातात... वा व्वा...मस्त मस्त एकदम. :-)
अवांतर-या डाळीच्या मुळे अशीच एक खमकी डाळ अठवली... पण तीला नाव मात्र वेगळच आहे.विदर्भातला हा पारंपारिक प्रकार आहे...पण त्याला म्हणतात मात्र मिरच्यांची भाजी :puzzled: >>. कुणाला माहित असेल तर टाका बरं पा.कृ. मागोमाग
अति अवांतर-हो...पण ही दाल पचायला खरच खमकी असते... विदर्भात असं म्हणतात की आधी इथली 'हवा' दोन दिवस खा..अणी मग (मिरच्यांची भाजी) मंजे डाळ... नायतर माणुस बसलाच जाउन २बाय ४ च्या खोलीत,,,पुढचे २ दिवस ;-)
2 Dec 2011 - 10:02 am | इरसाल
मिरच्यांची भाजी = दाय गंढोरी
2 Dec 2011 - 12:08 am | स्मिता.
बास!! याशिवाय आणखी काही बोलत नाही...
2 Dec 2011 - 4:13 am | सुहास झेले
ठार झालो... पाककृती जबरा आहेचं, फोटो कातील आहेत. गणपा म्हणतोय तसचं गरमागरम जीरा राईस आणि पंचमेल दाल काय मज्जा येईल....
हा प्रकार करणे शक्य आहे... लवकरच करून करून बघतो. :) :)
2 Dec 2011 - 5:34 am | प्राजु
आई शपथ्थ!!
तुझ्या पायांचा फोटो काढून इथून पुढच्या सगळ्या पाकृंच्या खाली देत जा.. तेवढच दर्शन होत राहिल. :)
काय ती मांडणी.. काय ती तयारी!! काय ती डाळ!! आहाहा!!
2 Dec 2011 - 8:19 am | प्रचेतस
खल्लास.
शब्दच संपले.
2 Dec 2011 - 8:35 am | चिंतामणी
ह्यापुढे काहिही सुचत नाही. नेहमी नवीन काय लिहीणार.
या पाकृमुळे दोन लोकांना जास्त आनंद होईल.
परा आणि फक्त ५०.
2 Dec 2011 - 9:57 am | शिल्पा ब
झकास. करुन बघते जमतेय का.
2 Dec 2011 - 9:58 am | प्यारे१
ए भाताचा 'टोप' आणा रे कुणीतरी...!
वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे,
सहजस्मरण होते आपल्या बांधवांचे,
कृषिवल कृषीकर्मी राबती दिनरात......
ह्या (हे जोरात) , करा सुर्वात. ;)
2 Dec 2011 - 10:06 am | इरसाल
दरवेळेस नवे चमचे आणि आता पळीसुद्धा बादलीसकट.
बाकी पाकृ एकदम भन्नाट !!!!!!!!!
अशीच एक डाळ इकडे उत्तरेत बनवतात. एकूण मिळून ५/६ तास लागतात म्हणे एकदम मंद आचेवर. नाव आहे मा-उडद-चने कि दाल. भरपूर क्रीम आणि वाढताना बटर टाकतात.
2 Dec 2011 - 11:43 am | परिकथेतील राजकुमार
तुम्ही ब्राह्मणभोजन वैग्रे घालता का हो ?
2 Dec 2011 - 11:47 am | जाई.
मस्त तोंपासु
2 Dec 2011 - 1:12 pm | सविता००१
केवळ जबरदस्त
झकास, अप्रतिम, सुरेख, इ.इ.इ.....................
संपले शब्द.:)
2 Dec 2011 - 2:28 pm | ५० फक्त
१२ व्यांदा मेलो, उरलेला प्रतिसाद थेट नरकातुन.
2 Dec 2011 - 3:24 pm | विशाखा राऊत
सही ! दुसरे काही लिहणार नाही _/\_
2 Dec 2011 - 8:13 pm | प्राजक्ता पवार
मस्तं !
फोटोदेखील अप्रतिम .
2 Dec 2011 - 9:04 pm | सानिका पटवर्धन
कालच केली होती ही दाल. छानच झाली होती. तूपावर केल्यामुळे चव एकदम वेगळी आली होती.
फोटोदेखील नेहेमी प्रमाणे अप्रतिम...
3 Dec 2011 - 10:04 am | कच्चा पापड पक्क...
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_ असे १०० प्रणाम.....
<<एकदा तुझ्याकडच्या भांड्यांचे फोटू दे.>>
खरच दे एकदा ......
3 Dec 2011 - 6:08 pm | jaypal
फोटो नेहमी प्रमाणे एकदम शोलेड बोले तो झक्कास :-)
3 Dec 2011 - 6:34 pm | पैसा
तुमच्याकडचं भांड्याचं कलेक्शन बघून मला कॉम्प्लेक्स येतो.
4 Dec 2011 - 8:04 pm | पप्पु अंकल
आजच बनवली....खुप आवडली....अर्थात याचे सारे श्रेय तुम्हालाच
धन्यवाद
6 Dec 2011 - 1:57 am | सानिकास्वप्निल
डाळ बनवून बघीतल्याबद्दल आणी ती आवडल्याबद्दल धन्यवाद :)