मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पंचमेल दाल

सानिकास्वप्निल · · पाककृती
Image removed. साहित्यः १ छोटी वाटी तुरीची डाळ, १/२ छोटी वाटी मुगाची डाळ, १/२ छोटी वाटी मसुराची डाळ, १/४ छोटी वाटी चणा-डाळ, २-३ टेस्पून उडदाची डाळ २-३ वेळा स्वच्छ धुवून पाण्यात ३०-४५ मिनिटे भिजवणे. १ छोटा कांदा बारीक चिरून १ छोटा टोमॅटो बारीक चिरून १ टीस्पून बारीक चिरलेले आले १ टीस्पून बारीक चिरलेले लसूण १ हिरवी मिरची चिरून २-३ बोर-मिरच्या / लाल सुक्या मिरच्या १/२ टीस्पून जीरे १/४ टीस्पून हिंग १ टीस्पून हळद २ टीस्पून लाल-तिखट (आवडीप्रमाणे) १-१/२ टीस्पून धणेपूड १-१/२ टीस्पून जीरेपूड १ टीस्पून बडीशेप पावडर १/२ टीस्पून गरम-मसाला मीठ चवीनुसार १/२ टीस्पून लिंबाचा रस बारीक चिरलेली कोथिंबीर ४-५ टेस्पून साजूक तुप Image removed. पा़कृ: भिजवलेल्या डाळीत चिरलेली हिरवी मिरची, आले व थोडीशी हळद घालून कुकरमध्ये चांगली शिजवणे. शिजलेली डाळ जराशी घोटून घेणे. एका भांड्यात २ टेस्पून तुप गरम करून चिरलेला कांदा परतावा. कांदा गुलाबी रंगावर परतला गेला की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतावा. Image removed. त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल-तिखट, थोडीशी हळद, धणेपूड, जीरेपूड व बडीशेप पावडर घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतणे. Image removed. त्यात शिजवलेली पंचडाळ घालणे. डाळ किती दाट व पातळ हवे त्याप्रमाणे पाणी घालून उकळी आणणे. उकळी आली की त्यात लिंबाचा रस घालून एकत्र करणे. Image removed. त्यावर थोडी कोथिंबीर व गरम-मसाला घालून एकत्र करणे व गॅस बंद करणे. Image removed. एका बुट्टीत २ टेस्पून तुप गरम करून जीरे, हिंग, लसुण व बोर-मिरच्या घालून फोडणी करणे व तयार फोडणी डाळीवर ओतणे. गरमा-गरम पंचमेल डाळ / दाल जीरा राईस बरोबर सर्व्ह करा :) Image removed.

वाचन 10237 प्रतिक्रिया 0