( चापट गालाले लागते )

जीएस's picture
जीएस in जे न देखे रवी...
26 Nov 2011 - 8:52 pm

या कवितेचा वस्तुस्थितीशी काही संबंध आढळल्यास, एकाच नेत्याचे नाव सर्व घोटाळ्यांमधे वारंवार येणे हा जसा, तसाच तो ही एक योगायोगच समजावा.

[चाल : "काळ्या मातीत मातीत" या कवितेच्या पहिल्या २ ओळी.]

त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते
त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते
चमचे नाचती थयथय, 'पेपर' ढोल वाजविते
त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते

साखर स्वस्तात पाठविते, साखर महागात आणिते
साखर मध्यात साठविते, साखर तिजोरी भरिते \\१\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....

प्याकेज कोनाला असते, प्याकेज कोनाला मिलते
साहेब 'शहर' बांधिते, साहेब 'धरण' चोरिते \\२\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....

जमीन कोनाची असते, जमीन कोनाची दिसते
साहेब भूखंड गिळते, विळखा पुन्याले पडते \\३\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....

'दोस्त' दुबैत राहते, हैवान देशात सोडिते
हैवान फटाके फोडिते, साहेब विमान धाडिते \\४\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....

नारको चाचणी बोलते, ष्टांप साहेब छापते
तेलगी जेलात सडते, साहेब तिजोरी भरते \\५\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....

परजा पेटुन उठते, चापट गालाले लागते
अन्ना खुशीत हासते, 'फकस्त एकच' इचारते \\६\\

त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते
चमचे नाचती थयथय, 'पेपर' ढोल वाजविते..

हास्यकविता

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

26 Nov 2011 - 9:03 pm | अन्या दातार

आयला भन्नाट हो जीएस. मजा आली वाचून.

एकदम भन्नाट, सुसाट, मोकाट हो!!!
मूळ गाणं आणि विडंबनविषयाचे काय मस्त योग जुळून आलेत या कवितेत.
मान गये.

जोशी 'ले''s picture

26 Nov 2011 - 10:48 pm | जोशी 'ले'

ढिस्क्लेमर पन लय झ्याक

मोहनराव's picture

26 Nov 2011 - 11:03 pm | मोहनराव

<<परजा पेटुन उठते, चापट गालाले लागते
अन्ना खुशीत हासते, 'फकस्त एकच' इचारते \\६\\

त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते
चमचे नाचती थयथय, 'पेपर' ढोल वाजविते..>>

एकदम ढिंगच्याक आहे कविता! आवडली.

वाहीदा's picture

26 Nov 2011 - 11:11 pm | वाहीदा

या कवितेचा वस्तुस्थितीशी काही संबंध आढळल्यास, एकाच नेत्याचे नाव सर्व घोटाळ्यांमधे वारंवार येणे हा जसा, तसाच तो ही एक योगायोगच समजावा.
हे पण भन्नाट ! :-)

आशु जोग's picture

26 Nov 2011 - 11:15 pm | आशु जोग

कमाल केली बुवा !

आता मी साहेबांच्या भाटांच्या गालाव मारतो ही कविता

दादा कोंडके's picture

26 Nov 2011 - 11:21 pm | दादा कोंडके

एकदम चालीत वगैरे म्हणून पाहिली, मस्तच!

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2011 - 1:24 am | अत्रुप्त आत्मा

सम्द झाक उतरलय बगा.... बेस हाय इडंबन :-)

सुहास झेले's picture

27 Nov 2011 - 9:25 am | सुहास झेले

हा हा हा ... एकदम जबरा !!

ढुश्क्लेमर जास्त आवडला ;)

गणपा's picture

27 Nov 2011 - 10:09 am | गणपा

एकदम मीटर मध्ये बसतेय.

भीमाईचा पिपळ्या.'s picture

27 Nov 2011 - 10:53 am | भीमाईचा पिपळ्या.

कविता कि टविता अज्जिबात आवडली नाही. वडाची साल पिंपाळाला लावण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.
प्रत्येक ठिकाणी साहेबांचा बादरायण सबंध जोडणार्यांच्या बुध्दीची किव येते.

आदरणिय साहेबांचा द्वेष करणार्‍या धर्माच्या दुकानदारांची ही रडारड पाहून ड्वाले पाणावले.

बुध्दीभेद करणार्यांची साहेबांनी कधीच वाट लावली आहे. :)

अनाम's picture

27 Nov 2011 - 11:09 pm | अनाम

आणि तुम्च्या नाकाला झोंबलेल्या मिरच्या पाहुन आम्चे डोळे पाणावले. ;)

मदनबाण's picture

27 Nov 2011 - 12:56 pm | मदनबाण

जबराट ! ;)

किसन शिंदे's picture

27 Nov 2011 - 1:12 pm | किसन शिंदे

भन्नाट!!!!!!!!!!!

एकदम मीटरमध्ये बसवलयं.

प्याकेज कोनाला असते, प्याकेज कोनाला मिलते
साहेब 'शहर' बांधिते, साहेब 'धरण' चोरिते \\२\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....

हे जाम म्हणजे जाम भारी :D :D

अशोक पतिल's picture

27 Nov 2011 - 4:44 pm | अशोक पतिल

आत्ममूग्धता !!! नाक्यावरची टवाळ पोरे व इथले सर्व सारखेच . वाट्ले होते मिपा वर सभ्य , सु़सकॄत जनाचा वावर असेल,पण काही प्रमाणात ,आशा फोल ठरली.

दादा कोंडके's picture

27 Nov 2011 - 4:53 pm | दादा कोंडके

कविते इतकाच हा प्रतिसाद मनोरंजक असल्याचं निरीक्षण नोंदवतो.
आणि धागा वर आणतो!

आत्ममूग्धता !!! नाक्यावरची टवाळ पोरे व इथले सर्व सारखेच . वाट्ले होते मिपा वर सभ्य , सु़सकॄत जनाचा वावर असेल,पण काही प्रमाणात ,आशा फोल ठरली.

यांना चपला देण्याचा मान घ्या हो कुणीतरी..
इथले सगळे नाक्यावरची टवाळ पोरे आहेत तर मग अनावस्था प्रसंग येण्यापूर्वी टळा इथून लवकर.. ;-)

साने गुरुजींप्रमाणे सात्विक नेत्या वर अनाठायी ओढवलेल्या प्रसंगाची निवड्ली असल्यास त्याचा निषेध.
पु.लं. प्रमाणे डॉनशूर पुणेकरा वरचा हल्ला असेल तर खपवून घेतला जाणार नाही.
काव्य आवडले , पण याद राखा तुमच्या सारखे अनेक कवी आम्ही पाळून आहोत.

अविनाशकुलकर्णी's picture

27 Nov 2011 - 5:42 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त..काय वाजवली आहे..(कविता)

हरकाम्या's picture

27 Nov 2011 - 7:40 pm | हरकाम्या

लै झकास राव

अशोक पतिल's picture

27 Nov 2011 - 8:24 pm | अशोक पतिल

यांना चपला देण्याचा मान घ्या हो कुणीतरी..

मी जे लिहीले त्याने हेच सिध्द होते.

इथले सगळे नाक्यावरची टवाळ पोरे आहेत तर मग अनावस्था प्रसंग येण्यापूर्वी टळा इथून लवकर.

हुकुमशहि आहे वाटते.

स्वताच्या च स्वपनरन्जनात रहात असाल तर रहा.

आशु जोग's picture

27 Nov 2011 - 10:41 pm | आशु जोग

आम्हाला याबाबत असे वाटते
--
हा जनतेच्या सेवकावर हल्ला आहे.

केवळ साहेब नव्हे तर, मुलगी आणि पुतण्याही जनतेच्या सेवेत स्वतःला झिजवून घेत आहेत.

२० - २० आय पी एल ला १००० करोडोची करमाफी दिली. समाजाचा मोठाच फायदा झाला.

तेलगीने करोडो रुपये मिळवले. त्याला कोणत्याही मंत्र्याचा सपोर्ट नव्हता.
तेलगीनेही खोटेनाटे आरोपच केले. असल्या पापाच्या पैशाकडे साहेब ढूंकूनही पाहत नाहीत

९३ साली बॉम्बस्फोट झाले तेव्हा अनेक लोक मृत्यूमुखी पडले, पण त्यात संरक्षणमंत्री असलेल्या पवारांचा काहीच दोष नव्हता.
९३ साली संरक्षणमंत्री असताना साहेबांनी डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षणच केले.

पप्पू कलानीचे अनधिकृत बांधलेले सीमा रीसॉर्ट खणणार्‍या सुधाकराव नाईकांनाही
आम्ही पदावरून हटवले पण
पप्पू कलानी, हितेंद्र ठाकूर अशा सज्जन आमदारांचे संरक्षण केले.

पप्पू कलानी, हितेंद्र ठाकूर, अरुणभाई गवळी असे सज्जन आमदार साहेबांच्या पार्टीला
समर्थन देतात. साहेब अशा सज्जनांचे रक्षण करतात

त्यांची पापे झाकायला साहेब अजिबात मदत करत नाहीत.

साहेबांचा वाढदिवस आम्ही भाट लोक 'स्वाभिमान दिवस' म्हणून साजरा करतो.

सोनियांशी फारकत घेऊन पुन्हा सत्तेसाठी त्यांच्या पायाशी आम्ही गेलो कधीमधी तर बिघडलं कुठं

लवकरच आम्ही तो झापड मारणारा, सरदार नसून त्या वेशातला कुणी महाराष्ट्रातला *** जातीचा युवक आहे असे सिद्ध करणार आहोत.

फक्त ते प्रकरण बाहेर काढायला आम्ही निवडणूकीची वाट पाहत आहोत.

तोवर

आमचे भाट लेखक इमानी कुत्राप्रमाणे आपल्या लेखण्या झिजवत राहतील

अनाम's picture

27 Nov 2011 - 11:06 pm | अनाम

हा हा हा. पातील साहेब आवरा.
अहो कित्ती कित्ती हसवायच म्हणतो मी?
एखादा गचकेल की हो हसुन हसुन.

भीमाईचा पिपळ्या.'s picture

28 Nov 2011 - 11:55 am | भीमाईचा पिपळ्या.

हल्ली आंतरजालावरुन मोठ्या लोकांना टारगेट करुन त्यांची खिल्ली उडवण्याची लाट आलेली आहे. त्यांच्यावर होणार्या आरोपांची कोणतीही शहानिशा न करता बिनबुडाचे आरोप करायला/कट्ट्यावर ते विषय चघळायला अनेक जणांना आवडते.
आबांसारखे निष्कलंक प्रामाणिक माणसे साहेबांनी शोधून त्यांच्या कार्यक्र्तूवाला वाव दिला. अंजनीसारख्या ग्रामीण भागातला सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला हिरा साहेबांनी पारखून त्याला संधी दिली.
मातीत, शेता/बांधात रमणारा एक प्रतिभाशाली माणुस(नाधो) साहेबांनी हेरला. त्याच्या कलागुणांना वाव दिला. ह्याला कुणी भाट/कुत्रे म्हणत असतील तर म्हणोत बापडे. अखेर ज्याची त्याची समज असेच म्हणावे लागेल.

वरती प्रातिनेधीक म्हणून दोन उदा. दिली आहेत. अशी असंख्य उदा. आहेत. समाजाच्या निम्नस्तारातल्या विद्वान्/गुणी लोकांना साहेबांनी व्यासपिठ निर्माण करुन दिले. जे आतापर्यंत कधीच झाले नव्हते. म्हणूनच त्यांना समाजने प्रेमाणे जाणता राजा हि उपाधी दिली.

शह काटशहामधे साहेब पारंगत आहेत. तुम्ही आपटत बसा. साहेब म्हणजे साहेब आहेत आनि भारतात एकमेव आहेत.

प्यारे१'s picture

28 Nov 2011 - 12:02 pm | प्यारे१

पाटील तुमचा 'खरा पत्ता' काय हो?????

ना धों महानोर हे अतिशय उत्तम कवी आहेत.. यात तिळमात्र शंका नाही.
साहेबांनी त्यांना मदत केली हेही खरं. त्याचा आणि इतर गोष्टींचा काय संबंध?

अटलजी स्वतः उत्तम वक्ते आणि कवी आहेत म्हणून संपूर्ण पक्ष त्यांच्या सारखा होतो का?

वर लिहिलेली इतर काही चांगली कामं केली म्हणजे सगळ्या घटनांवर पडदा पडतो का?

मुद्द्याला मुद्दा -- माझं त्या सरदार मनुष्याच्या कृतीला अजिबात समर्थन नाही. विरोध आहे तर त्यांना पाडा, बारामतीत नाही तर गेले काही वर्ष हळू हळू कमी होतंय तसं सामर्थ्य हाणून पाडा, जेव्हा खासदार / आमदार कमी होतील तेव्हा आपोआप सुधारेल स्थिती.. वृद्ध मनुष्याच्या थोबाडीत मारून त्यांचं महत्त्व वाढवू नका आणि ते सर्वथा अयोग्य आहे.
मग साहेबांच्याबद्दल आस्था असणारे, अशोक पतिल, अजातशत्रू (यांची श्रद्धा अपेक्षित आहे) आणि पिपळ्याराव...
त्यानंतर पक्षाने केलेला तमाशा, रास्ता रोको, महापौराने शहर बंदचे आवाहन करणे याचं काय समर्थन आहे. त्या माणसाने नुकताच सुखराम यांनापण असाच फटका मारला होता. एक थोबाडित मारली तर "भ्याड हल्ला" असं वर्णन !
याचं समर्थन काय. मिपावरचे टवाळ तुम्हाला चपला देण्याच्या घाईत आहेत तर या सगळ्याला उत्तर द्या.

मी वाटचाल वाचलं आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल शंका नाही .. मग
१. गेल्या काही वर्षात ते परत कधीही मुख्यमंत्री का झाले नाहीत.
२. राष्ट्रवादीची संख्या दर निवडणूकीला का घटते.
३."लोकनेता" असलेली व्यक्ती -- अटलजींसारखी ही पक्ष संघटने पलिकडे सर्वांना आदरणीय वाटते तसे साहेबांच्या बाबतीत का होत नाही ? मग त्यांना लोकनेता का म्हणावे?
४. ठाण्याचे डॉ. संजीव नाईक यांची तथाकथित डॉक्टरेट साहेबांना माहीत नाही का.. मग ते त्यांना का परवानगी देतात?
सगळ्यात मोठा आक्षेप :
५. कुठल्याही गंभीर प्रश्नावर साहेब कधीही स्टेटमेंट का करत नाहीत ? इतक्या मोठ्या अनुभवाच्या आणि पदाच्या व्यक्तीने असे कायम जबाबदारी टाळणे योग्य आहे का?
६. लवासा शी संबंध नाही असे साहेब का बोलले? नंतर त्यांनि त्याला विरोध करणारे / पर्यावरणवादी इ. च्या विरोधात विधाने का केली?
७. सकाळचा मुखपत्र म्हणून वापर का होतो? साधी बातमी सकाळ त्रयस्थ पणे पत्रकाराच्या कर्तव्याने का देत नाही? सकाळचे उत्तम संपादक का बाहेर पडतात ?
८. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर साहेब स्पष्टपणे का बोलत नाहीत ... कोणत्या धोरणांमुळे गेल्या ७-८ वर्षात शेतकर्‍यांचं भलं झालं आहे? भाव आटोक्यात आले आहेत? आत्महत्या कमी झाल्या आहेत?
घड्याळ असलेली स्कॉर्पिओ म्हणजे ज्याच्या पासून सामान्य नागरिकाने शक्य तितक्या लांबून जावे आणि स्वतःला जपून असावे. अशी मानसिकता निर्माण झाली आहे हे साहेबांना माहीत नाही का? त्यांच्या जनसंपर्काचे, चतुरस्त्र बुद्धिमत्तेची, विलक्षण स्मरणशक्तिची अनेक उदाहरणे वाचली आहेत. अशा मनुष्याला हे माहीत नाही असे नाही.

राजकारणाच्या नावाखाली (there are no permanent enemies) काँग्रेस एस ते आत्तापर्यंत जितक्या कोलांट्या मारल्या त्या कुठल्या तत्त्वात बसतात?

माझा कुठल्याही घराणेशाहीला विरोध आहे -- शिवसेना असो, पंकजा मुंडे असो, गांधी परिवार असो वा शिंदे पायलट इ. त्यामूळे काही कारण नसताना बारामतीची जागा सुप्रियाताईंना देऊन खासदारकी पक्की करण्यालाही आहे.

जर तुम्ही बारामतीकर असाल - तर राजा शिरगुप्पे यांचा साधना दिवाळी अंकातला लेख वाचा. काटेवाडी पलिकडचे गाव अजून सुधारणेच्या प्रतिक्षेत का याचे उत्तर जमल्यास द्या...

कोणी माथेफिरुप्रमाणे एका मान्यवर व्यक्तीला मारणे हे अपमानकारक आहे म्हणून ती व्यक्ती धुतल्या तांदळासारखी होत नाही...

मी लिहिलेल्या मधील एकही गोष्ट या लोकांनी
खोडून काढलेली नाही

विषयांतर मात्र चालू आहे

मी लिवलेलं आपल्याला मान्य आहे असे समजतो

आयला,
इतका भन्नाट काव्य हमने वाच्याच नई ?

लै भारी

५० फक्त's picture

28 Nov 2011 - 12:12 pm | ५० फक्त

जबराच आहे हा प्रकार - एकदम आवडला.

काय मस्तच बसलिये कवितेतुन चपराक! आवडली आपल्याला

परिकथेतील राजकुमार's picture

28 Nov 2011 - 1:26 pm | परिकथेतील राजकुमार

माननिय साहेबांना टार्गेट करण्याचा हा टारगटपणा अतिशय निंदनीय आहे. देशात न्यायालये, कायदा ह्या सर्व व्यवस्था असताना देखील, स्वतःच एखाद्याला गुन्हेगार ठरवून त्याच्या नावाने हवे ते बरळणे हे अत्यंत घातक व चूकीचा पायंडा पाडणारे आहे.

मिपासारख्या प्रगल्भ संस्थळावरती अशी कविता बघून एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

(वरिल प्रतिक्रिया ही मी लिहीलेली असून, ह्या प्रतिक्रियेचे थत्ते चाचांच्या लेखनाशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

जीएस's picture

29 Nov 2011 - 5:18 pm | जीएस

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.