( चापट गालाले लागते )
लेखनविषय:
काव्यरस
या कवितेचा वस्तुस्थितीशी काही संबंध आढळल्यास, एकाच नेत्याचे नाव सर्व घोटाळ्यांमधे वारंवार येणे हा जसा, तसाच तो ही एक योगायोगच समजावा.
[चाल : "काळ्या मातीत मातीत" या कवितेच्या पहिल्या २ ओळी.]
त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते
त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते
चमचे नाचती थयथय, 'पेपर' ढोल वाजविते
त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते
साखर स्वस्तात पाठविते, साखर महागात आणिते
साखर मध्यात साठविते, साखर तिजोरी भरिते \\१\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....
प्याकेज कोनाला असते, प्याकेज कोनाला मिलते
साहेब 'शहर' बांधिते, साहेब 'धरण' चोरिते \\२\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....
जमीन कोनाची असते, जमीन कोनाची दिसते
साहेब भूखंड गिळते, विळखा पुन्याले पडते \\३\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....
'दोस्त' दुबैत राहते, हैवान देशात सोडिते
हैवान फटाके फोडिते, साहेब विमान धाडिते \\४\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....
नारको चाचणी बोलते, ष्टांप साहेब छापते
तेलगी जेलात सडते, साहेब तिजोरी भरते \\५\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....
परजा पेटुन उठते, चापट गालाले लागते
अन्ना खुशीत हासते, 'फकस्त एकच' इचारते \\६\\
त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते
चमचे नाचती थयथय, 'पेपर' ढोल वाजविते..
वाचन
6583
प्रतिक्रिया
32