( चापट गालाले लागते )
लेखनविषय:
काव्यरस
या कवितेचा वस्तुस्थितीशी काही संबंध आढळल्यास, एकाच नेत्याचे नाव सर्व घोटाळ्यांमधे वारंवार येणे हा जसा, तसाच तो ही एक योगायोगच समजावा.
[चाल : "काळ्या मातीत मातीत" या कवितेच्या पहिल्या २ ओळी.]
त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते
त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते
चमचे नाचती थयथय, 'पेपर' ढोल वाजविते
त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते
साखर स्वस्तात पाठविते, साखर महागात आणिते
साखर मध्यात साठविते, साखर तिजोरी भरिते \\१\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....
प्याकेज कोनाला असते, प्याकेज कोनाला मिलते
साहेब 'शहर' बांधिते, साहेब 'धरण' चोरिते \\२\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....
जमीन कोनाची असते, जमीन कोनाची दिसते
साहेब भूखंड गिळते, विळखा पुन्याले पडते \\३\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....
'दोस्त' दुबैत राहते, हैवान देशात सोडिते
हैवान फटाके फोडिते, साहेब विमान धाडिते \\४\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....
नारको चाचणी बोलते, ष्टांप साहेब छापते
तेलगी जेलात सडते, साहेब तिजोरी भरते \\५\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....
परजा पेटुन उठते, चापट गालाले लागते
अन्ना खुशीत हासते, 'फकस्त एकच' इचारते \\६\\
त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते
चमचे नाचती थयथय, 'पेपर' ढोल वाजविते..
वाचने
6584
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
आयला भन्नाट हो जीएस. मजा आली
एकदम भन्नाट, सुसाट, मोकाट
ढिस्क्लेमर पन लय झ्याक
<<परजा पेटुन उठते, चापट
कविता बोले तो, एकदम झकास !!
कमाल केली बुवा ! आता मी
खत्तरनाक!
सम्द झाक उतरलय बगा.... बेस
हा हा हा ... एकदम जबरा !!
खण्खणीत.
कविता कि टविता अज्जिबात आवडली
In reply to कविता कि टविता अज्जिबात आवडली by भीमाईचा पिपळ्या.
आणि तुम्च्या नाकाला
जबराट !
भन्नाट!!!!!!!!!!! एकदम
आत्ममूग्धता !!!
In reply to आत्ममूग्धता !!! by अशोक पतिल
:)
In reply to आत्ममूग्धता !!! by अशोक पतिल
आत्ममूग्धता !!! नाक्यावरची
काव्य आवडले : विषय निवडीत खोड्साळपणा दिसतो आहे.
मस्त..काय वाजवली आहे..(कविता)
चापट
यांना चपला देण्याचा मान घ्या
आम्हाला याबाबत असे
In reply to आम्हाला याबाबत असे by आशु जोग
हा हा हा. पातील साहेब
In reply to आम्हाला याबाबत असे by आशु जोग
हल्ली आंतरजालावरुन मोठ्या
In reply to हल्ली आंतरजालावरुन मोठ्या by भीमाईचा पिपळ्या.
पाटील तुमचा 'खरा पत्ता' काय
In reply to हल्ली आंतरजालावरुन मोठ्या by भीमाईचा पिपळ्या.
मुद्दा काय आहे? उगाच पवारांचं समर्थन नको...
In reply to मुद्दा काय आहे? उगाच पवारांचं समर्थन नको... by मैत्र
मी लिहिलेल्या मधील एकही गोष्ट
आयला, इतका भन्नाट काव्य हमने
जबराच आहे हा प्रकार - एकदम
काय मस्तच बसलिये कवितेतुन
घॄणास्पद
धन्यवाद