थप्पड-शरद पवारांना की मुजोर झालेल्या लोकशाहीला?

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in काथ्याकूट
24 Nov 2011 - 4:55 pm
गाभा: 

साधारण आज दुपारी १ते२ च्या दरम्यान घडलेली ही घटना आहे. दिल्लीमधे मा.शरद पवार एका कार्यक्रमाहुन निघत असताना,एका तरुणाने (हरविंदरसींग) पवारांच्या दिशेनी चाल करत ''ये सब चोर है'' अशा आशयाची काही वाक्य उच्चारत पवारांना एक थप्पड लगावली.तो तरुण महागाइच्या कारणावरुन भडकुन तस वागला असं अता व्रुत्तवाहीनीवाले सगळेच सांगत आहेत. तो मनोरुग्ण आहे हेही याच व्रुत्तांतात ऐकायला मिळत आहे.अजुन आज रात्री/उद्या पर्वापर्यंत याचे अजुनही वेगवेगळे 'अर्थ' आपल्यासमोर येतिल. त्यात अण्णा हजारे यांनी एका कार्यक्रमातुन निघता निघता तिथल्या लोकांनी 'ही' माहीती दिल्यावर ,त्यावर आश्चर्य व्यक्त केल्याच्या आर्विभावात-''अरे चाटा मारा...!, एकही मारा...!? असे उद्गार काढले... उपस्थित लोकं हसली आणी अण्णा निघुन गेले.नंतर मिडिया अण्णांपर्यंत पोहोचली व विचारले की असे आपण का बोललात? तेंव्हा अण्णा सुरवातीला मी या घटनेचा निषेधच केलाय,मी अहिंसावादी आहे,असं बोलले.पण मिडियानी त्यांना उपरोक्त वाक्यांची अठवण करुन दिल्यावर अण्णांनी ''थप्पड मारली की अणखी काही केले?'' असे मी विचारले. अशी सारवासारव केली. पवारांपासुन सर्व पक्षांचे नेते लोकांना व आपल्या कार्यकर्त्यांना ''शांत'' रहाण्याचे आवाहन केले आहे.पण अनेक ठिकाणी बंद जाळपोळ तोडफोड ह्या घटना सुरु झाल्या आहेत... माझा प्रश्न असा की आपण ह्ल्ली ह्या असल्या होणाय्रा वाढत्या घटनांचा अन्वयार्थ लोकशाहीच्या संदर्भात कसा आणी काय लावायचा? या घटना स्वागतार्ह/ निषेधार्ह /चिंताजनक मानायच्या आणी गप्प बसायचे...की कोलमडु पहात असलेल्या किंवा अजुनही नीट न स्थिरावलेल्या भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी पुन्हा एकवार अभ्यास करुन नवे उपाय शोधायचे...कारण क्रांत्या हिंसेनी घडोत वा अहिंसेनी...त्यांच्या पाठचे हेतु न्याय्य असोत वा अन्याय्य... नंतर मिळालेलं स्वातंत्र्य चांगल्या पद्धतीनी अव्याहतपणे टिकवण हेच तर अवघड असतं ना...?अन्याय दुर करणाय्रांनाही न्यायाची कल्पना असतेच अस नाही...त्यामुळे अश्या घटनांच नक्की फलीत काय?...

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

24 Nov 2011 - 5:08 pm | चिरोटा

बर्‍याच दिवसांनी चांगली बातमी वाचली. त्या तरुणाने सुखराम ह्यांनाही थप्पड मारली होती.

माझा प्रश्न असा की आपण ह्ल्ली ह्या असल्या होणाय्रा वाढत्या घटनांचा अन्वयार्थ लोकशाहीच्या संदर्भात कसा आणी काय लावायचा?

संशोधन संस्थेवर हल्ला, तोंडाला काळे फासणे,कार्यालयात जावून धुडगुस घालणे,जातीचे राजकारण करून पुतळे हलवणे ह्या घटनांचा पवार/त्यांचा पक्ष लोकशाहीत कसा अर्थ लावतो? तसाच लावायचा अर्थ.!

मदनबाण's picture

24 Nov 2011 - 5:18 pm | मदनबाण

संशोधन संस्थेवर हल्ला, तोंडाला काळे फासणे,कार्यालयात जावून धुडगुस घालणे,जातीचे राजकारण करून पुतळे हलवणे ह्या घटनांचा पवार/त्यांचा पक्ष लोकशाहीत कसा अर्थ लावतो? तसाच लावायचा अर्थ.!

चिरोट्या तुझ्याशी सहमत हाय रे... :)

त्यावर आश्चर्य व्यक्त केल्याच्या आर्विभावात-''अरे चाटा मारा...!, एकही मारा...!? असे उद्गार काढले... उपस्थित लोकं हसली
हे वाचुन मी पण गदागदा हासतोय ! ;)

विशेष :--- संपादकांना विशेष लक्ष द्यावा लावणारा धागा ! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

24 Nov 2011 - 7:58 pm | अत्रुप्त आत्मा

विशेष :--- संपादकांना विशेष लक्ष द्यावा लावणारा धागा ! >>> मदन-बाणा थांब की जरा... :-)

कशाला देतोस धनुष्य फुका संपादकांच्या खांद्यावर।
आंम्ही शोधतो ती मुळे सापडव्,नी मग लक्ष दे फांद्यांवर॥ ;-)

मृगनयनी's picture

4 Dec 2011 - 1:24 pm | मृगनयनी

संशोधन संस्थेवर हल्ला, तोंडाला काळे फासणे,कार्यालयात जावून धुडगुस घालणे,जातीचे राजकारण करून पुतळे हलवणे ह्या घटनांचा पवार/त्यांचा पक्ष लोकशाहीत कसा अर्थ लावतो? तसाच लावायचा अर्थ.!

=)) =)) =)) =)) =)) या सगळ्यामुळेच शरद पवाराना थोबाडीत मारल्याच्या घटनेचे समर्थन करावेसे वाटते... कारण "पेरावे तसे उगवते".. अर्थात शरद पवार'ऐवजी तिथे "अजित पवार" असते... तर नक्कीच फटाके फोडले असते..... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

परवा शरद पवारान्ना माननीय शिवसैनिक "मनोहर जोशी साहेबां"च्या वाढदिवस सोहळ्याला उपस्थित पाहून ...( तेही माननीय शिवचरित्रकार- ज्येष्ठ इतिहासकार श्री. बाबासाहेब पुरन्दरे यान्च्याबरोबर एकाच्च स्टेजवर ;) :) ) अम्मळ मौज वाटली..... ;) ;) ;)

बाकी अण्णांची खरी प्रतिक्रिया खूपच बोलकी होती.... ;) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
आवडली.... :)
_________________

"प्रकरण" कोणतेही असो...पण भ्रष्टाचाराच्या सोप्या मार्गाने आपला फायदा करून त्यातून सहीसलामतपणे शरद पवार आजपर्यन्त सुटत आलेले आहेत... "सत्य" समोर दिसत असतानाही पुराव्याअभावी कुणीही त्यान्चे काहीही बिघडवू शकलेले नाही... अगदी शरद पवारान्चे दाऊद इब्राहिम'बरोबर असलेले सम्बन्ध देखील सर्वज्ञात आहेत...

काल कुठल्याश्या समारम्भात शरद पवारान्च्या डोक्यावर सीलिन्ग फॅन पडता पडता राहिला... एक फूट पलिकडे पडल्याने पवार साहेब वाचले..... बहुधा आत्माहत्या केलेल्या शेतकर्यान्चे शिव्याशाप त्यान्ना तितकेसे लागलेले नसावेत.....

असो.... पण निसर्गाचे हे "दैवी" इशारे वेळीच ओळखून पवार काका-पुतण्यानी देशद्रोही कारस्थानान्ना वेळीच आवर घालावा...

:)

दादा कोंडके's picture

24 Nov 2011 - 5:32 pm | दादा कोंडके

चांगली बातमी.:)
अशा घटणा घडणारच. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच जागं व्हावं!

युयुत्सु's picture

24 Nov 2011 - 6:01 pm | युयुत्सु

+१०००००००००००००००

अत्रुप्त आत्मा's picture

24 Nov 2011 - 7:36 pm | अत्रुप्त आत्मा

@-पवार/त्यांचा पक्ष लोकशाहीत कसा अर्थ लावतो? तसाच लावायचा अर्थ.!... >>>चिरोटा साहेब मारणारा माणुस महागाइची कारणं आणी निव्वळ भाषणबाजी करत असल्याची कारणं सांगत होता हो...आपण लावलेला अन्वयार्थ विसंगत आहे.

जोशी 'ले''s picture

24 Nov 2011 - 5:13 pm | जोशी 'ले'

काय पण 'राष्ट्रवादि' कार्यकर्ते आहेत, आता त्या हरविंदर ला फाशी च्या शिक्षेची मागनी करा म्हणाव..हाय काय नाय काय

शिंगाड्या's picture

24 Nov 2011 - 5:19 pm | शिंगाड्या

पवारांचे नाव आले कि ह्ट्कुन एक ऐतिहासीक चरीत्र आठवते..- मिर्झा राजे जयसींग..
स्वकीय आणी स्वधर्माची धुळ्धाण करणारी व्यक्ती....

अत्रुप्त आत्मा's picture

24 Nov 2011 - 8:03 pm | अत्रुप्त आत्मा

अतीशय योग्य दाखला दिलास रे... अगदी यथायोग्य

शिल्पा ब's picture

25 Nov 2011 - 12:08 am | शिल्पा ब

है शाब्बास!!! अगदी योग्य दाखला दिलात.

मोहनराव's picture

24 Nov 2011 - 5:20 pm | मोहनराव

चांगलेच झाले एका अर्थी!!

अवांतर- एक विनोद जालावरुन साभार-
सोनिया - राहुल ,दिग्विजय ,सिब्बू ,लुंगी कुठे निघालात एकदम एव्हढ्या घाईघाईने
.
.
.
.
... .
.
सगळे एका सुरात - हेल्मेट आणायला ....!!!!

सुहास झेले's picture

24 Nov 2011 - 5:24 pm | सुहास झेले

आता शरद पवार म्हणत असेल.. "Why this Kolaveri Kolaveri Kolaveri Da" ;)

चिंतामणी's picture

27 Nov 2011 - 9:21 am | चिंतामणी

हे बघा.

(त्या दिवशी कोणीतरी अपलोड केले आहे हे)

सोत्रि's picture

24 Nov 2011 - 5:29 pm | सोत्रि

- (हेल्मेट घालून बसलेला) सोकाजी

मस्त कलंदर's picture

24 Nov 2011 - 5:44 pm | मस्त कलंदर

अजितदादा एका पत्रकार परिषदेत सांगत होते की, साहेबांना 'जसा जाता जाता एखाद्याला लागतो तसा' धक्का लागला असं साहेबांनी त्यांना सांगितलं आहे. ;;-)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Nov 2011 - 5:47 pm | विश्वनाथ मेहेंदळे

TOI वर या बातमीला एव्हाना १८०० कमेंट आल्या आहेत. :-)

अत्रुप्त आत्मा's picture

24 Nov 2011 - 8:10 pm | अत्रुप्त आत्मा

TOI वर या बातमीला एव्हाना १८०० कमेंट आल्या आहेत.>>>हा धागा कॉमेंट्री साठी काढला नाहीये... ;-)

दत्ता काळे's picture

24 Nov 2011 - 5:54 pm | दत्ता काळे

चिरोटा शी १००% सहमत.

तिमा's picture

24 Nov 2011 - 6:47 pm | तिमा

प्रतिक्रिया पाहून आश्चर्य वाटले. शरद पवारांविषयी तुमचे मत काही असू दे. अशा तर्‍हेने हल्ला करणे हे चुकीचे आहे आणि त्याचा निषेधच केला पाहिजे. अण्णांची प्रतिक्रिया मीही टी.व्ही. वर पाहिली. ती त्यांना अजिबात शोभणारी नाही.
अशा वागणुकीला प्रोत्साहन देऊन आपण अराजकालाच आमंत्रण देत आहोत.

प्रभाकर पेठकर's picture

24 Nov 2011 - 7:06 pm | प्रभाकर पेठकर

शरद पवारांनी अण्णांना बराच त्रास दिला आहे. त्यांच्यातले वैर उघड आहे.
त्यामुळे अण्णांचा उद्वेग बाहेर पडला असेल.

दादा कोंडके's picture

24 Nov 2011 - 7:35 pm | दादा कोंडके

प्रतिक्रिया पाहून आश्चर्य वाटले

लोकांमध्ये प्रचंड असंतोष भरलाय. तो असा बाहेर पडणारच.

अशा तर्‍हेने हल्ला करणे हे चुकीचे आहे आणि त्याचा निषेधच केला पाहिजे

हम्म.
वेनसडे मधल्या "स्ट्युपिड कॉमन मॅन"चं, "आज मे तरीके के बारेमे नही नतीजे के बारेमे सोच रहा हुं", "लोगों मे गुस्सा बहोत है, उन्हे आजमाना बंद किजिये", वगैरे आठवलं.

अशा वागणुकीला प्रोत्साहन देऊन आपण अराजकालाच आमंत्रण देत आहोत

एक झापड म्हणजे अराजक? मग मावळ गोळीबार, शेतकर्‍यांच्या आत्महत्या काय आहेत? एक राष्टीय नेता आणि गरीब शेतकरी म्हणून एव्हडी पार्श्यालिटी? :)

सुधांशुनूलकर's picture

24 Nov 2011 - 9:07 pm | सुधांशुनूलकर

१०१% सहमत

सुहास झेले's picture

25 Nov 2011 - 6:25 am | सुहास झेले

ह्येच म्हणतो....

हा युवक माथेफिरू आहे हे प्रुव्ह झालेले आहेच.
१) अण्णांनी मैन सोडू नये तेच योग्य आहे. नडले होते का बोलायचे? -''काय ? एकच मारली?''
२) आता घ्या ! एकापाठोपाठ शहरे बंद होत आहेत. आता कुणाचा पुतळा हटवणार?
३) रशीद साहेबाना यात बिजेपी चा हात आहे अशी शंका आहेच 'परिवारा'' वर आता कडक नजर ठेवावी लागेल.

सुहास..'s picture

24 Nov 2011 - 6:58 pm | सुहास..

एक सामान्य माणुस म्हणुन अण्णांची उस्फुर्तपणे येणारी प्रतिक्रिया आवडली .

माझी प्रतिक्रिया : " हाण्ण तुझ्या ****** "

मोहनराव's picture

24 Nov 2011 - 7:46 pm | मोहनराव

जालावरुन साभार!!

सुमो's picture

24 Nov 2011 - 8:17 pm | सुमो

आता घड्याळ सोडून 'हाता' कडे परतावे का?.....

jaypal's picture

24 Nov 2011 - 8:12 pm | jaypal

आम आदमी का हात एन.सी.पी. के साथ ;-)

slp

मन१'s picture

24 Nov 2011 - 10:42 pm | मन१

:)

वैकुंठ's picture

24 Nov 2011 - 8:16 pm | वैकुंठ

माझ्या मते ही तर फक्त एक तीव्र प्रतिक्रिया आहे वाढत्या महागाईची.

सरकारच्या महागाईच्या निर्ल्लज्य आकड्यांना दिलेले common man चे अगतिक उत्तर.

आता फक्त एक करा.... निवडून देताना विचार करा!

झापडा मारण्यासाठी नेतेच हवे असणारा मनोरूग्ण पहिल्यांदाच पाहिला.
पण शरद पवारांच्या वयाकडे पाहता त्यांना झापड खावी लागली याचा खूप खेद वाटतो.

अण्णांची प्रतिक्रिया वाचुन भस्सकन हसू आले..!

कशाचा अर्थ काय वगैरे चर्चा करण्यात मजा नाही. एवढी ढळढळीत झापड पाहूनही कुणाला चर्चा करायच्याच असतील तर करा बुवा.. आम्ही त्यापण वाचूच.

मन१'s picture

24 Nov 2011 - 10:45 pm | मन१

च्यायला...
आज काही लिहावं म्हणेपर्यंत तुम्ही सगळच आधी लिहून मोकळेही झालत.
पण हो, प्रतिसादातला टोन, वगैरे वगैरे अगदि जुळलं. अण्णांची प्रतिक्रिया ऐकून(तीही त्यांनी त्यांच्या ष्टायलीत्,उच्चारात कशी म्हटली असेल ह्याचा विआचार करुन हापिसात चहा सांडून बसलोय.)

मराठी_माणूस's picture

24 Nov 2011 - 8:35 pm | मराठी_माणूस

अण्णांच्या प्रतिक्रियेवर टिका होतेय , पण ति प्रत्येक सामान्य माणसाची उस्फुर्त प्रतिक्रिया आहे. मध्ये इथेच एक योग्य प्रितिक्रिया वाचलि होति ति म्हणजे अशा गुन्हेगारांची लवकरात लवकर तिहार मधे रवानगी व्हावी नाहीतर अशा अर्धवट घटनानि उगीच प्रसिध्दि आणि अनाठाई मोठेपणा मिळण्याची शक्यता वाढते. (उदा:कार्यकरत्यांनी संयम पाळावा, मि त्याला माफ केले आहे वगैरे)

नगरीनिरंजन's picture

24 Nov 2011 - 8:59 pm | नगरीनिरंजन

या थप्पड मारण्याच्या घटनेचा जितका निषेध करू तितका कमीच आहे.
लोकांमध्ये जी आनंदाची लहर उमटली आहे ती पाहून तर उद्वेग वाटतो. जणू काही फक्त राजकारणीच अकार्यक्षम, भ्रष्टाचारी वगैरे आहेत.
बाकी ज्याची त्याची समज अक्कल वगैरे.
चालू द्या.

lakhu risbud's picture

25 Nov 2011 - 9:45 am | lakhu risbud

शाब्दिक विरोध,आरोप एका बाजूला आणि हा लाजीरवाणा प्रकार दुसऱ्या बाजूला.परिस्थिती कशीही असली तरी या असल्या हल्ल्याचे समर्थन होत नाही.
या घटनेमुळे आता अशा अनेक माथेफिरूंना खुमखुमी येऊन या प्रकारे हल्ल्यांचे प्रमाण वाढेल.(COPY CAT !)

अवांतर : पवार साहेबांच्या राजकारणाचा एकंदर इतिहास पाहता, तो हरमिंदर दिल्ली/पंजाब जिथला कुठला रहिवासी असेल त्या ठिकाणच्या "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा " येणाऱ्या १-२ वर्षात अध्यक्ष झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नये

दादा कोंडके's picture

25 Nov 2011 - 3:44 pm | दादा कोंडके

ह्या बातमी वरून हरविंदरला न्यायालयाच्या आवारातच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलिये!

नगरीनिरंजन's picture

28 Nov 2011 - 9:16 am | नगरीनिरंजन

दोन्हीही हल्ल्यांचा किंबहुना कोणत्याही हल्ल्याचा निषेधच.
एका हल्ल्याची बाजू घेणार्‍याचा दुसर्‍या हल्ल्याचा निषेध करण्याचा अधिकार आपोआप नष्ट होतो.

मालोजीराव's picture

28 Nov 2011 - 2:30 pm | मालोजीराव

साहेबांचं राजकारण बघता कदाचित अजून १-२ वर्षांनी हरविंदर नावाच्या माणसाचं अस्तित्व दिल्लीतून नाहीसं होईल आणि सरकारी रेकॉर्ड्स वरून पण ;)

-मालोजीराव

दादा कोंडके's picture

28 Nov 2011 - 2:59 pm | दादा कोंडके

आणि भर न्यायालयाच्या आवारातच मारहाण करणार्‍या त्या कार्यकर्त्यांवर कोणती कारवाई करणार? हे निष्ठावंत आणि तो माथेफिरू?

मदनबाण's picture

28 Nov 2011 - 3:10 pm | मदनबाण

हे निष्ठावंत आणि तो माथेफिरू?
हॅहॅहॅ... नाही नाही... हे गांधीवादी आणि तो नथुराम भक्त !

आत्ताच सकाळ वर जावून ती बातमी पहिली.बातमीखालील सगळ्या प्रतिक्रिया विकत घेवून छापल्या सारख्या वाटत आहेत.एक प्रतिक्रिया पवारांच्या विरोधात नाहीये.हेच जेव्हा लुंगीवर झाले होते तेव्हा सगळे लुंगीला दोष देत होते.(चप्पल फेक )
असो आता पवार टीवी वर म्हणत आहेत "कोई एक इन्सान ने पीछेसे मुझपर हमला किया मैने एक स्टेप आगे बढाया तो उनका हाथ यहासे ऐसे निकाल गया !(म्हणजे गालाला स्पर्श न होता) छान.

थांबा थांबा .....आजतक वर जितेंद्र आव्हाड मिठाला जागत आहे
(दिग्विजयची फाटली आहे)

७० वर्षांच्या माणसाला थप्पड खाताना पाहणं खूप अस्वस्थ करणारं आहे हे खरंच.
पण तरीही हे बघून बहुतेक लोकांना आनंद झालेला दिसतोय.
हे माननीय श्री शरच्चंद्ररावजी पवार साहेबांनी स्वत। कमावलं आहे...

छोटा डॉन's picture

24 Nov 2011 - 9:27 pm | छोटा डॉन

झालेली घटना पटली आणि आवडली नाही.
महागाई आणि तत्सम गोष्टींबद्दल सरकार, संस्था आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींवर राग आहे, जनता वैतागली आहे वगैरे सगळे मान्य आहे आणि पटतेही आहे.
पण त्याचा निषेध करण्याचा हा मार्ग नव्हे असे वाटते.
एका संपुर्ण संस्थेच्या कारभाराबद्दल किंवा त्याच्या अपयशाबद्दल एखाद्या व्यक्तीवर असा हात उचलणे पटले नाही. पवारांना त्यांची चूक दाखवुन द्यायची असेल तर आता निवडणुका आहेतच, त्यावेळी त्याची चुणुक मतदानातुन दाखवता आली असती.
ह्यातुन 'अराजक' आले आहे की काय असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही परंतु जे काही घडते आहे ते नक्कीच योग्य नाही.

अवांतर १ : पवारांचे वय पाहता ह्या घटनेचे जास्तच वाईट वाटले.

अवांतर २ : ह्या घटनेवर आण्णा हजारेंचे 'खरी' प्रतिक्रिया पाहुन तर अजुनच वाईट वाटले. 'गोरे इंग्रज जाऊन काळे इंग्रज आले' असे म्हणणार्‍या एका गांधीवाद्याची अशा 'हिंसक' प्रकरणावरची 'एकच मारली का?' अशी कुत्सित प्रतिक्रिया देखजनक आहे.

- छोटा डॉन

मराठी_माणूस's picture

24 Nov 2011 - 9:33 pm | मराठी_माणूस

अवांतर २ : ह्या घटनेवर आण्णा हजारेंचे 'खरी' प्रतिक्रिया पाहुन तर अजुनच वाईट वाटले.

'खरी' , ह्या शब्दातच सगळे आले.

छोटा डॉन's picture

24 Nov 2011 - 9:42 pm | छोटा डॉन

'खरी' ह्या शब्दातच सगळे येत नाही, तो शब्द कुठे येतो त्यात बरेच काही येते.
'खरी' याचा माझ्या वाक्यातील अर्थ 'आण्णा हजारे यांच्या मनात असलेली प्रतिक्रिया' असा आहे, ती बाकीच्यांना किती खरी अथवा किती खोटी वाटते ह्याच्याबद्दल मला बोलायचे नाही.
मात्र आण्णा पटकन त्यांना जे बोलायचे आहे ते बोलुन बसले आणि नंतर मग सारवासारव चालु केली/आहे. नंतर मग जे आण्णांचे मारहाणीला समर्थन नाही हे सिद्ध करण्यासाठी जे 'शब्दांचे खेळ' चालु आहेत ते पाहुनच आम्ही पहिल्या प्रतिक्रियेला 'खरी' असे संबोधतो, असो.

-छोटा डॉन

मराठी_माणूस's picture

25 Nov 2011 - 3:10 pm | मराठी_माणूस

'एकच मारली का?'

एक थप्पड आणि शेकडो शेत्कर्‍यांच्या आत्महत्या आणि त्यांची उध्वस्त कुटूंबे हे समिकरण अण्णांना पटले नसेल

मदनबाण's picture

25 Nov 2011 - 3:25 pm | मदनबाण

प्रकटाआ

श्रीरंग's picture

24 Nov 2011 - 9:27 pm | श्रीरंग

बाय द वे, एखाद्या शहराचा महापौरच शहर बंद चे आवाहन करतो, तेही आपल्या पक्षाच्या मालकानी थप्पड खाल्ली म्हणून!!
हद्द आहे लाळघोटेपणाची. मोहनसिंघ राजपाल अत्यंत टुक्कार महापौर आहे.

गणपा's picture

24 Nov 2011 - 9:34 pm | गणपा

उलट मी तर म्हणतो की उत्तम संधी आहे पुणेकरांना.
असंतोष आहे ना पवार गटाबद्दल? तर मग हाणुन पाडा त्यांचा बंद.

हा मार्ग जास्त संयुक्तिक नाही का?

श्रीरंग's picture

24 Nov 2011 - 10:32 pm | श्रीरंग

बंद हाणून पाडलाच पाहिजे.
पण आपण कोणत्या पदावर आहोत हे विसरून फक्त पवारांची चमचेगिरी करणारा ट दर्जाचा माणूस आज आमचा महापौर आहे याची लाज वाटते.

आनंदी गोपाळ's picture

24 Nov 2011 - 10:58 pm | आनंदी गोपाळ

तुमच्यात दम नाही काही करायचा. इथे टंकणार फक्त. जा पाहू उद्या कामावर किंवा उघडा आपले दुकान?

श्रीरंग's picture

24 Nov 2011 - 11:07 pm | श्रीरंग

निश्चित जाणार!!

अप्रतिम's picture

24 Nov 2011 - 9:33 pm | अप्रतिम

जाहीर सत्कार करायला पाहिजे हरविन्दरचा.

ही पहा अण्णांची* बालीश, पण खदखदून हसवणारी प्रतिक्रिया.

JAGOMOHANPYARE's picture

24 Nov 2011 - 10:12 pm | JAGOMOHANPYARE

आण्णा गांधीवादी आहेत.. गांधीवाद्यानी एका गालावर मारलं की दुसरा गाल पुढे करायचा असतो.. म्हणून त्यानी एकच गाल का असे विचारले असणार.

विकास's picture

24 Nov 2011 - 10:53 pm | विकास

हास्यास्पद आहे खरे! पण मला वाटते हे हिंदी बोलता येत नसल्याचा परीणाम आहे. त्यांनी नंतर केलेला खुलासा या संदर्भात सारवासारव वाटत नाही.

हास्यास्पद आहे खरे! पण मला वाटते हे हिंदी बोलता येत नसल्याचा परीणाम आहे.

नाही, नाही.. हा हिंदी न येण्याचा प्रकार नाही... ही सारवासारव अण्णांनी पश्चातबुद्धीनं केली आहे; कारण फक्त तेवढीच प्रतिक्रिया देऊन, लोकांचं हसू वसूल करुन अण्णा कॅमेर्‍यासमोरुन उठून आत निघून गेले.
दुसरी प्रतिक्रिया नंतरची.

बाकी अण्णाचं हिंदी किती पक्कं आहे याचा दाखला इथे दिलेल्या दुसर्‍या व्हिडिओमध्येच मिळतो.
ते म्हणतात 'मै समझ सकता हूं.. आज भ्रष्टाचार से लोक बाज आ गये है..'

http://ibnlokmat.tv/showvideo.php?id=205622

वसईचे किल्लेदार's picture

24 Nov 2011 - 10:11 pm | वसईचे किल्लेदार

आमच्या साहेबांशी पंगा घेतला ना? आता बघा त्या हरविंदरसींगाचे काय होते ते ... हम्म !

महागाईने सामान्य माणसाचा प्रक्षोभ झाला तर त्याला मानसिक रुग्ण ठरवायला पण तुम्ही लोकं कमी नाही करत.
तरिही वयस्कर व्यक्तीवर हाथ उगारणे अयोग्य पण आता सामान्य माणसाच्या पेशन्स हा स्टेक वर आहे

वसईचे किल्लेदार's picture

24 Nov 2011 - 10:31 pm | वसईचे किल्लेदार

अगदी अगदी
जे झाले त्याच्या परीणामांचे काय ... ह्याचा परीणाम काय होईल (कुणावर होईल) एव्ह्ढाच काय तो प्रश्न!

शाहिर's picture

24 Nov 2011 - 10:31 pm | शाहिर

मावळ मधे शेतकर्यांवर गोळीबार करताना यांना अहिंसा आठवली नाही..

आणि तेव्हा रास्ता रोको करणर्या वर कारवाइ केलि आता चुप चाप बसले...

हा उद्रेक अहे. ... भाषण देणे सोपे असते परंतु व्यवस्थे विरुद्ध लढने अवघड...कारण सत्ता नितीमता पाळत नहिये..

लोकांचे कसे असते ना,
लवासा , मावळ झाले कि यांचा निषेध आणी यांना हाणले कि त्यांचा निषेध...

प्रतेक जण संयमी विवेकी नसतो..

आणि असला तरी् "डोंबिवली फास्ट" होतो हो कधी तरी

विकास's picture

24 Nov 2011 - 10:52 pm | विकास

या घटनेचे वेगवेगळे अन्वयार्थ निघू शकतील. वर यशवंत एकनाथांनी म्हणल्याप्रमाणे खेद वाटला. मात्र असा खेद आणण्यासारखी परीस्थिती आणण्याचे पितृत्व हे पवार आणि तत्सम राजकारण्यांकडे आहे असेच वाटते. आज भारतात "मध्यम वर्ग आणि वर" अशा जनतेचे सुदैवाने चांगले चालले असले तरी बाकी परिस्थिती भिषण आहे असे वाटते. (अमेरीकेत पण असेच आहे). जर याकडे सामायीक दॄष्टीने पाहीले नाही तर भडका कधीही उडू शकेल...आणि त्यात केवळ राजकारणीच पोळणार नाहीत. मराठीत म्हण आहे: "सुक्या बरोबर ओलेही जळते..."

या संदर्भात आयबीएन वरील चित्रफीत बराच इतिहास सांगते. कदाचीत एखादी थप्पड-चप्पल ही राजकीय नेतृत्वाच्या बायोडेटाचा भाग झाला तरी आश्चर्य वाटणार नाही.

महागाई आणि तत्सम गोष्टींबद्दल सरकार, संस्था आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींवर राग आहे, जनता वैतागली आहे वगैरे सगळे मान्य आहे आणि पटतेही आहे, परन्तु हे थप्पड प्रकरण म्हणजे नाटक जास्त वाटते.ज्याने ती मारली,त्याने असा पराक्रम अगोदरपण केला आहे. म्हणजे तो सरावलेला राजकिय कार्यकर्ता असावा. जेव्हापासुन जार्ज बुश याना बुट फेकुन मारला,तेव्हापासुन सवग लोकप्रियतेची जणु लाट्च आली आहे. ह्या घटनेवर आण्णा हजारेंची प्रतिक्रिया पाहुन त्यानच्या प्रतीमेशी विसन्ग्त असे वाटत आहे. त्यानची लोकप्रियता जशी अचानक वर गेली तशी कमीही होवु शकते.
खर मुद्दा वाढती महागाइचा , वाढती लोकसन्ख्या, कमी होणारे शेती क्षेत्र ( शहरीकरण), वाढते प्रदुषण( वाढ्ती कार्/बाइक इ.वाहणे) मा़झ्या मते आहेत. त्याला जबाबदार आतापर्यतची सरकारे व आपण सुद्धा आहोत. पुर्वी चन्गळपणा कमी होता. तो आता वाढलाय.२०-२५ आगामी वर्षात जेव्हा कोळसा,पेट्रोल, गॅस इ कमी होतील्,तेव्हा वाढती ट्चाइ, महागाई कोणाला जबाबदार धराल ? आणी ती कोण रोखु शकेल. लक्षात घ्या, आगामी काळात धनधान्याच्या किमती ह्या कमी होणार नाहीत ( वाढती लोकसन्ख्या, कमी होणारे शेती क्षेत्र ), आणी याचे नियोजन कोणी करावे.
१०००० ते २००० वर्षापुर्वी पर्यत जगाची लोकसन्ख्या हि प्रमाणात होती. त्याला दुष्काळ, रोगराइ,लढाया ही ( काही प्रमाणात निसर्ग निर्मीत ) कारणे होती. आता मानवाच्या प्रगती मुळे ही कारणे कमी झाली, परन्तु जेव्हा याचा विस्फोट होइल तेव्हा निसर्गाची थप्पड कोणा एकाला पडणार काय?

टॉपिक काढणारा आणि इतर

एकच मत नोंदवतो

टी वी च्या चॅनेलमुळे बरीच माहिती कानावर आदळते

पण त्या माहितीच्या रद्दीला ज्ञान समजू नये

आपण कोणत्या विषयावर विचार करायचा, कोणत्या विषयावर गप्पा मारायच्या
दुपारच्या टायमाला डबा खाताना कोणत्या विषयाची चर्चा करायची हेही टीवीच ठरवतो

आपलं डोकं टीव्हीकडे देऊ नका, टीव्हीचे व्यसन सोडा

अत्रुप्त आत्मा's picture

25 Nov 2011 - 11:50 pm | अत्रुप्त आत्मा

आपलं डोकं टीव्हीकडे देऊ नका, टीव्हीचे व्यसन सोडा.... >>> अनाहुत सल्ल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे... माहीतीच्या रद्दीतुन नेमका प्रश्न काय विचारलाय हेच आपणास कळ्लेले नाही....त्यामुळे अता आणखी स्पष्टीकरण काय देणार...तुमच्यापुढे आमचा णाविलाज

शाहिर's picture

26 Nov 2011 - 12:03 am | शाहिर

फ्री सल्ल्यांचा प्रमाण वाढल आहे अजकाल

काही पत्रकारांना अशा वेळी काय बोलावे खरच सुचत नाही.

मनातलं बोलता येत नाही मग गोलमाल गोलमाल बोलत बसतात.

इतर वेळी पोटासाठी जिसका खंबा उसकी लाल याप्रकारे पाल्हाळीक व न पटणारी बाजू घेउन बोलत बसतात

विवेक वाटवे's picture

24 Nov 2011 - 11:39 pm | विवेक वाटवे

जे झाल ते चान्ग्ल झाल.
आवडल.

आता हे अस पुन्हा पुन्हा घड्नार. घडायलाच हव.

शिल्पा ब's picture

25 Nov 2011 - 12:21 am | शिल्पा ब

एक गंमत वाटते...निवडणुका आल्यावर अशा थपडा खाण्याच्या लायकीच्या लोकांनाच का निवडुन देतात?

कोदरकर's picture

25 Nov 2011 - 4:56 am | कोदरकर

हे सगळे खोटे आहे... बर्‍याच जनांना मनापासुन करावी वाटणारी गोष्ट हरविंदर पाजी ने करुन टाकली आहे नी मिडियाने दाखवुन टाकली आहे...
रात्री झोपताना पवारांना एकदा जरी विचार करावा वाट्ला की असे का घडले तरी हरविंदर चे आणि सर्व सामान्याचे भले होऊ शकेल...

साखर ३३ रु झालीय.....

श्रीरंग's picture

25 Nov 2011 - 10:39 am | श्रीरंग

"मग खाऊ नका साखर. मधुमेह वगैरे वाढवणारी साखर तुम्हाला हवीच आहे कशाला?"
अशा आशयाचे पत्रके वगैरे वाटण्याची मुजोरी नडली पवारांना.

अशोक पतिल's picture

25 Nov 2011 - 6:31 am | अशोक पतिल

ज्या हरविंदर पाजी चे इतके विशेष वाटते, तो तर छान सुखवस्तु ,अपडुटेड इसम दिसतोय. रन्जला गान्जलेला तर बिलकुल दिसत नाही. बाकी यशवन्त सिन्हा व अण्णाची प्रतिक्रीया बघुन हे व्यवस्थित प्लान केलेले वाट्तेय. ( ह्या घटनेचा व संशोधन संस्थेवर हल्ला, तोंडाला काळे फासणे,कार्यालयात जावून धुडगुस घालणे,जातीचे राजकारण करून पुतळे हलवणे ह्या घटनांचा पवार/त्यांचा पक्ष लोकशाहीत कसा अर्थ लावतो? तसाच लावायचा अर्थ.! लावलेला अर्थ हेच सान्गतो ) बाकि शरद पवार हे पुर्वी पॅलवान होते असे एकुन आहे. हरविंदर ने चुलेन्ज देवुन मारली असती व पवारानी खाल्ली असती तर ते विशेष झाले असते.

ज्या हरविंदर पाजी चे इतके विशेष वाटते, तो तर छान सुखवस्तु ,अपडुटेड इसम दिसतोय. रन्जला गान्जलेला तर बिलकुल दिसत नाही.

अशोक पतिल साहेब जगभरात कोठेही जा "भिकारी शीख" किंवा "भिकारी सरदार " तुम्हाला कोठेही आढळणार नाही.
किंबहुना तो धर्मच आपल्या लोकांची काळजी घेतो कि कोणी भिकारी असूच नये.असो.

बाकि शरद पवार हे पुर्वी पॅलवान होते असे एकुन आहे. हरविंदर ने चुलेन्ज देवुन मारली असती व पवारानी खाल्ली असती तर ते विशेष झाले असते.

भ्रष्टाचार वगैरे करण्यासाठीही पूर्वी काही असावे लागते काय ?

अजातशत्रु's picture

25 Nov 2011 - 8:41 am | अजातशत्रु

संहिष्णुता हरवत चाललेल्या मनांचा तीव्र निषेध,

लोकशाहि राष्ट्रात चिंतनीय घटना : (

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Nov 2011 - 9:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वैफल्यग्रस्त आणि मानसिकद्रष्ट्या विकलांग असलेल्या हरविंदरसिंगची कृती मूर्खपणाचीआहे, यात काही वाद नाही. घटनेमागील अन्वयार्थ काय असेल ते भविष्यात समजेलही. पण मौनी आणि आमचे आदरणीय श्री अण्णा हजारेंचा बालीशपणा आणि विचार मांडण्याची पद्धत हरविंदरसिंगाच्या मानसिक अवस्थेपेक्षा पुढची पायरी वाटली. [कोणाच्या भावना-बिवना दुखावल्या असतील तर खरड करावी]

आदरणीय श्री अण्णांच्या मागे सर्व देश उभा राहील्यामुळे आदरणीय श्री अण्णांना आपण काहीही बोललो तरी चालतं असं त्यांना वाटायला लागलं आहे.

च्यायला, दुपारी राळेगणच्या श्री अण्णांच्या कार्यालयात फोन करुन श्री अण्णांना आवरा किंवा मौन बाळगायला सांगा असे म्हणतोच.

-दिलीप बिरुटे
[स्पष्ट]

आदरणीय श्री अण्णांच्या मागे सर्व देश उभा राहील्यामुळे आदरणीय श्री अण्णांना आपण काहीही बोललो तरी चालतं असं त्यांना वाटायला लागलं आहे.
मला नाही असं वाटत... देशात अनेक नेत्यांनी काहीच्या काही विधाने केली आहेत आणि नंतर त्या विधानां बाबत यु टर्न मारलेला आहे...
शरदचंद्र पवार यांना थप्पड मारल्याचे कॄत्य समर्थनीय जरी नसले तरी देशातल्या नागरिकांच्या मनात असंतोष खदखदतो आहे हे नाकारता येणे शक्य नाही.
सगळे राजकारणी सारखेच नसले तरी भ्रष्ट राजकारण्यांची संख्या थोडकी नाही ! कॉमन वेल्थ खेळांमधे झालेल्या भ्रष्टाचारामुळे आणि खेळाच्या आधीच एक पुल कोसळल्यामुळे जगभर आपल्या देशाची प्रतिमा मलिन झाली ! हे भ्रष्ट राजकारण्यांमुळेच झाले ना ?
देशाला धड सुरक्षा देउ शकत नसलेल्या राजकारण्यांना मात्र झेडप्लस सुरक्षा हवी असते ! आता तशी पवार साहेबांना सुद्धा पुरवली जाईल ! पण सामान्य जनतेचे काय? त्यांच्या आयुष्याला काही किंमतच नाही का ? कसाब सारखे अतिरेकी इथे येत राहतात आणि आपण शहीदांचे पुतळे उभारत राहतो ! अजुन किती आणि कोणाचे पुतळे उभारायचे आहेत ?
या देशात धड रस्ते नाहीत्,पाण्याची बोंब आणि विजेचे भारनियमन ही गोष्ट इथल्या जनतेच्या आयुष्याचा अविभाज्य भाग नाही का ? ही आपल्या देशातील राजकारण्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी केलेली प्रगती म्हणायची काय ?
सगळीकडे या लोकांचे वाढदिवसाचे पोस्टरर्स/बॅनर्स,फलक लागतात्,हल्ली तर टिव्हीवर सुद्धा यांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छांच्या जाहिराती दिसतात ! असा काय जगावेगळा पराक्रम या सुपुत्रांनी हिंदुस्थानात जन्म घेउन केला आहे ?

जाता जाता :--- हरविंदरसिंग जर मनोरुग्ण असेल तर इतक्या लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या(ज्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.) ते सर्व मनोरुग्ण होते काय ? त्यांना आत्महत्येस प्रवॄत्त करण्यासाठी जी परिस्थीती कारणीभुत झाली त्याला नेते मंडळी कारणीभुत नाहीत ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Nov 2011 - 9:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>देशातल्या नागरिकांच्या मनात असंतोष खदखदतो......
असंतोष व्यक्त करण्याचे सनदशीर मार्ग असतात. महागाई, भ्रष्टाचार, वगैरे प्रश्नांनी प्रत्येक माणसाच्या मनात असंतोष आहे, हे मान्य. सर्वसामान्य माणसाच्या मनात असंतोष आहे म्हणून उठसुठ कोणा नेत्याचे थोबाडात मारणार काय ?

>>>> शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या(ज्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.) ते सर्व मनोरुग्ण होते काय ?
स्वतंत्र काथ्याकुटाचा विषय आहे. शेतक-यांच्या आत्महत्त्या हा वेगळा विषय आणि त्याची वेगवेगळी अशी कारणं आहेत.

-दिलीप बिरुटे

असंतोष व्यक्त करण्याचे सनदशीर मार्ग असतात. महागाई, भ्रष्टाचार, वगैरे प्रश्नांनी प्रत्येक माणसाच्या मनात असंतोष आहे, हे मान्य. सर्वसामान्य माणसाच्या मनात असंतोष आहे म्हणून उठसुठ कोणा नेत्याचे थोबाडात मारणार काय ?
नक्कीच नाही ! आणि समर्थनीय सुद्धा नाही ! पण मग राजकारण्यांनी सुद्धा सनदशीर मार्गाने वागायला हवे ना ?
लवासा बांधकाम सनदशीर मार्गाने झाले आहे काय ? तेव्हा कुठे जाते लोकशाही आणि लोकशाहीची तत्वे ?
ज्या सोनिया गांधीला विदेशी म्हणुन हिणवले आणि वेगळा पक्ष काढला तेच आता त्यांच्याशी सुत जमवुन बसलेत ना ? ही यांच्या पक्षाची तत्त्वे ?

शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या(ज्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.) ते सर्व मनोरुग्ण होते काय ?
स्वतंत्र काथ्याकुटाचा विषय आहे. शेतक-यांच्या आत्महत्त्या हा वेगळा विषय आणि त्याची वेगवेगळी अशी कारणं आहेत.

ठीक आहे,पण श्री.शरद पवार केंद्रीय कॄषीमंत्री आहेत ना ? कापुस,उस,कांदा यासाठी आंदोलने करायची का वेळ येते मग ? सोडवा की प्रश्न शेतकर्‍यांचे त्यासाठीच तर ते पद भुषवित आहेत ना ? की लवासा/क्रिकेट शिवाय यांच्याकडे इतर गोष्टी पहायला वेळ नाही ?

सोत्रि's picture

25 Nov 2011 - 11:41 am | सोत्रि

खरेतरं ह्या विषयावर मौन पाळायचे ठरवले होते, पण बाणा, तु मुद्देच असे मांडलेस की सहमत होण्याशिवाय पर्याय नाही.

श्री.शरद पवार केंद्रीय कॄषीमंत्री आहेत ना ?
मग राजकारण्यांनी सुद्धा सनदशीर मार्गाने वागायला हवे ना ?

ह्या तच सर्व आले. सव्वा लक्ष वेळा सहमत.

- ( असंतोषी ) सोकाजी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Nov 2011 - 9:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्री अण्णांच्या कृतीला आमच्या पाठींबा असतो, श्री अण्णांच्या कृतीकडे आम्ही सर्वसामान्य मोठ्या अपेक्षेने पाहात आहोत. अशावेळी श्री अण्णांनी विधानं करतांना काळजी घ्यायला हवी, आमच्या भावना श्री अण्णांना कळवा अशा आणि काही भावना आपण बॉ व्यक्त केल्या.

अध्यक्ष, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास मु.पो. राळेगणसिद्धीच्या कार्यालयात फोन केल्यावर वरील विषयावर बोलतांना संबंधित माणूस गांगरला, हे मात्र नक्की.

असो, आत्ता कुठं मला बरं वाटलं.

-दिलीप बिरुटे

श्री अण्णांच्या कृतीला आमच्या पाठींबा असतो, श्री अण्णांच्या कृतीकडे आम्ही सर्वसामान्य मोठ्या अपेक्षेने पाहात आहोत. अशावेळी श्री अण्णांनी विधानं करतांना काळजी घ्यायला हवी, आमच्या भावना श्री अण्णांना कळवा अशा आणि काही भावना आपण बॉ व्यक्त केल्या.

ह्या सर्व अण्णा समर्थकांच्या भावना आहेत्,त्यात मी सुद्धा येतो.पण ते काही इश्वरी अवतार नाहीत ! चूक त्यांच्या कडुन सुद्धा होउ शकते आणि त्यांनी त्यांच्या चुकीच्या विधानाचे समर्थन केलेले नाही हे त्यांच्या दुसर्‍या वक्तव्या वरुन स्पष्ट होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Nov 2011 - 9:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकदा बोलून गेल्यावर काय बोलतोय हे लक्षात आल्यावर झालेली चुक सुधारणेची गरज होतीच. आणि आता सर्व देश त्यांना जेव्हा ओळखायला लागला आहे, तेव्हा अशी चूक किंवा असा बालीशपणा त्यांच्या प्रतिमेला आणि वयाला आत्ता शोभणारा नाही. इतकाच माझा मुद्दा आहे.

-दिलीप बिरुटे

कुंदन's picture

25 Nov 2011 - 11:42 am | कुंदन

बडे बडे शहरोंमे ऐसी छोटी छोटी घटनाएं होती रहती है !

असे आर आर म्हणले तेंव्हा नाही हो फोन केला तुम्ही ? ही पार्शलिटी बरी नव्हे.
असो , मला द्या नंबर , मी करतो तिकडे फोन.

शिल्पा ब's picture

25 Nov 2011 - 11:43 am | शिल्पा ब

सहमत. पण कदाचित आर. आर. कडुन वेगळी अपेक्षाच नसेल.
बाकी प्रा.डॉ. यांचे विचार वाचुन वाईट वाटलं अन त्यावरचं बाणाचं उत्तर पटलं.

असे आर आर म्हणले तेंव्हा नाही हो फोन केला तुम्ही ? ही पार्शलिटी बरी नव्हे.असो , मला द्या नंबर , मी करतो तिकडे फोन.

लंबर दिला असता पण तुम्ही काय बोलाल त्यांना ते मला माहिती नाही. काही भानगडी झाल्या तर मी जाईन जेलात. आणि तुमचा मला पत्ता माहिती नाही. मला तर जामिनही मिळणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला लंबर देणार नाही. :)

शिल्पा ब म्हणतात 'प्रा.डॉ. यांचे विचार वाचुन वाईट वाटलं' माझ्या कोणत्या विचाराचं वाईट वाटलं जरा लिहा बरं. म्हणजे पुढे संवाद चालू ठेवता येईल.

-दिलीप बिरुटे

मराठी_माणूस's picture

25 Nov 2011 - 10:59 am | मराठी_माणूस

........कृती मूर्खपणाचीआहे,

ह्या मूर्खपणाच्या कृतीचे कित्येक बुध्दीमान्/श्रमजीवी वर्गातुन समर्थन करण्यात आले आहे. त्यातील बर्‍याच लोकांचा प्रतिसाद अण्णांसारखा होता.

मदनबाण's picture

25 Nov 2011 - 11:09 am | मदनबाण

ह्या मूर्खपणाच्या कृतीचे कित्येक बुध्दीमान्/श्रमजीवी वर्गातुन समर्थन करण्यात आले आहे. त्यातील बर्‍याच लोकांचा प्रतिसाद अण्णांसारखा होता.
यथा राजा तथा प्रजा ही म्हण आठवली...

मन१'s picture

25 Nov 2011 - 11:37 am | मन१

मागे म न से आमदार वांजळेंनी विधानसभेमध्ये थेट अबू आझमींच्या कानाखाली भडकावल्यावर गुदगुल्या होणारे कित्येक जण आता मात्र लोकशाही मूल्य वगैरे बोलताना पाहून मौज वाटली.

आनंदी गोपाळ's picture

25 Nov 2011 - 2:46 pm | आनंदी गोपाळ

अगदी सहमत @ मनोबा.

अविनाशकुलकर्णी's picture

25 Nov 2011 - 11:40 am | अविनाशकुलकर्णी

खुप मोठी राजकिय खेळी कॉंग्रेसने केलीय का???

१] पवारांवर हल्ला केला आणि हल्लेखोराकडुन महागाईचे कारण दिले गेले. पवारांची पत आपोआप घसरली.
२]दिवसभर मिडियावर ह्याची चर्चा केली गेली. आणि ह्या व्यक्तीने सुखरामवर (जे
भ्रष्ट आहेत हे सिद्ध झालंय) हल्ला केल्याचे वारंवार दाखविले गेले. पवार
भ्रष्ट असल्याचे आपोआप सुचित झाले.
३] महागाईचा आणि पवारांच्या मंत्रालयाचा संबंध नाही हे कुठेही दाखवले नाही.
४] टिम अण्णाच्या लोकांना चर्चेला आणुन ह्या सगळ्या गोष्टीला भ्रष्टाचारविरोधी आंदोलन कसे कारणीभुत आहे ह्यावर चर्चा केल्या गेल्या.

लोकांच लक्ष आता पवारांवर आणि हिंसक आंदोलनांवर जाईल ह्याची काळजी घेतली जातेय.

सोत्रि's picture

25 Nov 2011 - 3:27 pm | सोत्रि

ह्या सर्व प्रतिसादांच्या गदारोळातला सर्वांत लॉजिकल प्रतिसाद. १०१% सहमत.

हे सर्व राजकारण असते. आपण उगीच भावनाप्रधान होउन चूक की बरोबर असे करत आपापसात भिडतो.

- (राजकीय खेळ अभ्यासणारा) सोकाजी

ईन्टरफेल's picture

25 Nov 2011 - 9:10 pm | ईन्टरफेल

+१०००००००००००००

पिलीयन रायडर's picture

25 Nov 2011 - 11:47 am | पिलीयन रायडर

अण्णा "चुकुन" खरं बोलुन गेले.. नंतर उगाच सारवा सारव केली..
सगळेच मनातुन खुश आहेत.. फक्त इमेज साठी "ह्याचा निषेध केला पहिजे" टाइप बोलत आहेत..
बोला की खरं...
आणि ह्या अशा कृत्याने काय होणार आहे का साध्य वगैरे वगैरे... अरे ह्या देशात काही साध्य व्हाव म्हणुन नीट प्लान करुन काही होतं का???
राजकारणी लोक मनला येइल तसं वागु लागले तर जनता पण मनाला येइल तसं वागणार ना...
आज राव उलट जास्त काम करा.. संध्याकाळी पार्टि करा... उत्सव वाटला पाहिजे...

परिकथेतील राजकुमार's picture

25 Nov 2011 - 12:00 pm | परिकथेतील राजकुमार

मिपा आज चालू कसे काय आहे ?
लगेच बंद करा ! नाहीतर ......

शरद पवार झिंदाबाद.

गणपा's picture

25 Nov 2011 - 12:33 pm | गणपा

तुझं 'सौंदर्य फुफाटा निरिक्षण केंद्र' उघडं आहे का रे आज? ;)

परिकथेतील राजकुमार's picture

25 Nov 2011 - 12:45 pm | परिकथेतील राजकुमार

ते काये, इकडे आम्ही केरोसीन, दगडं, जुनी टायर्सचा साठा वैग्रे केला आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या श्रमपरिहाराची देखील व्यवस्था इथेच आहे. म्हणून आमचे केंद्र उघडे आहे.
उगाच आता त्यावरून राजकारण करू नका.

नावातकायआहे's picture

25 Nov 2011 - 10:39 pm | नावातकायआहे

>>तुझं 'सौंदर्य फुफाटा निरिक्षण केंद्र' उघडं आहे का रे आज?

_ _/\__

चिरोटा's picture

25 Nov 2011 - 1:17 pm | चिरोटा

'तोबा तोबा' म्हणत हल्ल्याचा निषेध अनेक मर्‍हाटी नेत्यांनी केलाय.
हल्ले करून प्रश्‍न सुटत नाहीत - मनोहर जोशी(मग आपण्/आपले कार्यकर्ते ईतकी वर्षे अहिंसेची खिल्ली का उडवत होते?)

हा हल्ला निषेधार्हच आहे. महाराष्ट्रात त्यांची संतापजनक प्रतिक्रिया उमटणे सहाजिक आहे. हल्लेखोराला महागाईविरोधातच राग व्यक्त करायचा होता तर मनमोहन सिंग यांच्यापासून सुरुवात करायची होती -राज ठाकरे(अबु आझमींला कानफटात मारली तर आनंद आणि पवारांना मारली तर दु:ख?)

शरद पवारांवरील हल्ल्याचा मी निषेध करतो. अपराध्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.
- अनंत गीते( १९९२ च्या दंगलीत भाग घेणार्‍यांनाही शिक्षा झाली पाहिजे ना?)

शरद पवारांवरील हल्ला घृणास्पद आहे’- बाळासाहेब ठाकरे( हल्ला घ्रुणास्पद आहे की नाही ह्यासाठी बाळासाहेब कुठले यंत्र वापरतात?)

www.saamana.com

ही नेते मंडळी देशाचे प्रश्न सोडवताना कधी एकत्र येताना दिसतात काय ?
फक्त त्यांची पगारवाढ करुन हवी असेल आणि असे काही अघटित घडले की लगेच हे लोक एकी दाखवायला पुढे सरसावताना मात्र दिसतात ! ;)

दादा कोंडके's picture

25 Nov 2011 - 1:43 pm | दादा कोंडके

आणि दुसरं काही नाही सापडलं म्हणून मग "हे मराठी माणूस सहन करणार नाही" वगैरे भावनिक भडकाउ विधानं करायची. मराठी आणि अमराठीवाद कुठुन आला यात? सकाळ मधेतर कहर झालाय. ७०वर्षाचा जेष्ठ नेता, प्रचंड लोकसंग्रह, १८-१८ तास काम करण्याची शक्ती, विमानातून देखिल जाताना खालच्या गावात कुठला कार्यकर्ता रहातो, त्याच्या घरी कोण-कोण असतं हे लक्षात ठेवण्याएव्ह्डी स्मरणशक्ती वगैरे. हे असले निकष आहेत चांगल्या नेत्याचे?

अविनाशकुलकर्णी's picture

25 Nov 2011 - 1:23 pm | अविनाशकुलकर्णी

राळेगण मधे राष्त्र वादी चे आत्म क्लेश आंदोलन..
अण्णांनी टी व्ही समोर खडा सवाल केला.

मारहाणीचा निशेध...
पण..एक थप्पड मा्रली तर इतका गदारोळ...
शेक-या वर गोळ्या चालवल्या तेंव्हा का गप्प होता?

हिंसा निंदनीय

चिगो's picture

25 Nov 2011 - 2:08 pm | चिगो

उद्वेग बाहेर काढायला नेत्याला थप्पड हाणा... आणि अधिकार्‍यांना जाळा / काळं फासा. लै जालीम मार्ग आहे राव..
शरद पवारांबद्दल मला अजिबात ममत्व नाही, पण हा हल्ला मुर्खपणाचा होता, हे वाटतं..
"हल्ल्यामागच्या भावना लक्षात घ्या.." कायपण च्यायला सॉलिड वाक्य आहे, नाही ?? हेच लोक मग केजरीवाल, प्रशांतभुषण ह्यांच्या हल्लेखोरांच्या भावना का लक्षात घेत नाही, ब्वॉ ?
बाकी कालच्या विधानावरुन आणि त्याआधी "दारु पिणार्‍यांना खांबाला बांधून झोडलं पाहीजे" ह्यासारख्या तालिबानी गांधीवादावरुन अण्णांचे मातीचे पाय दिसलेत..

बाकी, हल्ल्याचा आणि बंद करणार्‍या, जाळपोळ करणार्‍यांचाही निषेध !!

अवांतर : ज्योक असेल, पण आम्हीही आता ऑफीसात हेल्मेटघालून बसावं म्हणतोय. उगाच आपल्या निर्णयाने (चूक का बरोबर, कोणाला पडलीय) कुणाच्या भावना दुखावल्या, उद्रेक झाला तर भारी पडेल..

छोटा डॉन's picture

25 Nov 2011 - 2:18 pm | छोटा डॉन

अवांतर : ज्योक असेल, पण आम्हीही आता ऑफीसात हेल्मेटघालून बसावं म्हणतोय. उगाच आपल्या निर्णयाने (चूक का बरोबर, कोणाला पडलीय) कुणाच्या भावना दुखावल्या, उद्रेक झाला तर भारी पडेल..

+१, परफेक्ट !
मी वर हेच लिहले आहे.

निर्णय घेणारे सरकार ही एक संस्था आहे, ते सरकार चावलणारा एक गट आहे, कुठल्या एका व्यक्तीला वैयक्तिकरित्या दोषी धरुन 'अशी' शिक्षा देणे योग्य नाही.
जसे काल महागाईच्या प्रश्नांवरुन पवारांवर हात उचलला तरी तो पायंडा नको पडायला.
अन्यथा छोट्या छोट्या प्रश्नांवर लोक असेच सोपे सोल्युशन हुडकतील.

आज सकाळी पाणी नाही आले, धुवा त्या अधिकार्‍याला. आज काल तर मॅच बघाताना लाईट गेली, फोडा विजमंडळाचे कार्यालय. बसेसना खुप गर्दी असते, बस अपुर्‍या आहेत, हाणा परिवहन मंत्र्याला/अधिकार्‍याला .... हे असे सर्व उपाय चूक आहेत आणि अजिबात पटणारे नाहीत.
राग आहे हे मान्य, पण अशा बाबतीत तो व्यक्त करण्याची ही पद्धत नव्हे हे पुन्हा आवर्जुन सांगतो.

- छोटा डॉन

बाकी कालच्या विधानावरुन आणि त्याआधी "दारु पिणार्‍यांना खांबाला बांधून झोडलं पाहीजे" ह्यासारख्या तालिबानी गांधीवादावरुन अण्णांचे मातीचे पाय दिसलेत
मला वाटतं अण्णांनी दारु सोडा सांगुन सुद्धा त्याच्या व्यसानात अडकलेल्यांना स्वहस्ताने झोडले आहे.काल का परवाच एक वॄत्तवाहिनीवर अण्णांनी ज्या परिवारातल्या माणसाची दारु सोडवली होती त्याची मुलाखत दाखवली गेली होती,अण्णांमुळेच माझी दारु सुटली आणि आमच्यासाठी ते देवा समान आहेत असा तो व्यक्ती म्हणाला !
दारु सारख्या कुटंब उधवस्त करणार्‍या व्यसनास सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना तालिबानी म्हणणे हास्यास्पद आहे !
तालिबानी लोकांनी समाज उपयोगी कार्य केली नसुत ते समाज घातक कॄत करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत,आणि अण्णा समाजसेवी आहेत हे राळेगणसिद्धी पासुन ते देशातल्या सर्व सुजाण नागरिकांना माहित आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 Nov 2011 - 1:40 am | विश्वनाथ मेहेंदळे

>>बाकी कालच्या विधानावरुन आणि त्याआधी "दारु पिणार्‍यांना खांबाला बांधून झोडलं पाहीजे" ह्यासारख्या तालिबानी गांधीवादावरुन अण्णांचे मातीचे पाय दिसलेत..

चिगो, तुम्ही ते विधान नीट वाचलेले दिसत नाही. पहिली गोष्ट म्हणजे दारू पिणारे आणि दारुडे यात फरक आहे. आणि कष्टकरी समाजातील कर्ता पुरुष जेव्हा दारुडा होतो तेव्हा त्या कुटुंबाची कशी वाट लागते ते मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तो प्रकार सोत्री किंवा नाटक्याशेट च्या कॉकटेल इतका रम्य नसतो. बेवडे लोक बघितले आहेत ना तुम्ही? रोज टल्ली होणारे, दारूपाई नोकरी गेलेले, घरी बसून बायकोच्या पैशावर दारू पिऊन वर तिलाच मारहाण करणारे. घरी मुलांना खायला पैसे नसताना रोज दारू पिऊन गटारात पडणारे. सकाळी दहा किंवा बारा वाजता पण रस्त्यातून अडखळत चालणारे ? पाहिले आहेत ना ? अशा लोकांना दोन मुस्कटात भडकवल्याने कुणाचे पाय मातीचे ठरत असतील तर मला मातीचेच पाय असणारा माणूस आवडेल.

दुसरे म्हणजे मला वाटते की ते राळेगणसिद्धीत झालेल्या दारूबंदीच्या आंदोलनाबद्दल बोलत होते. तिथे त्यांनी काय उपाय केले यावर. त्यांनी सगळीकडे असे करावे असे म्हटल्याचे ऐकिवात नाही. तूनळीवरील एका बातमीप्रमाणे अण्णांनी एक पुस्तक लिहिले असून त्यात ३०-४० वर्षांपूर्वी घडलेली घटना सांगितली आहे. ती एक घटना उचलून त्याचे राजकारण कॉंग्रेस करत आहे हे कळायला मला वाटत नाही फार कष्ट पडतील.

चिगो's picture

29 Nov 2011 - 10:56 am | चिगो

बाप रे.. एकदम सेंटी करुन टाकलं ब्वॉ तुम्ही.. इतकं की एक्साइज आक्टान्वये (साभार : पुलं) शिक्षा करतांनाही भरुन येतंय अगदी..

>> बेवडे लोक बघितले आहेत ना तुम्ही? रोज टल्ली होणारे, दारूपाई नोकरी गेलेले, घरी बसून बायकोच्या पैशावर दारू पिऊन वर तिलाच मारहाण करणारे. घरी मुलांना खायला पैसे नसताना रोज दारू पिऊन गटारात पडणारे. सकाळी दहा किंवा बारा वाजता पण रस्त्यातून अडखळत चालणारे ? पाहिले आहेत ना ? अशा लोकांना दोन मुस्कटात भडकवल्याने कुणाचे पाय मातीचे ठरत असतील तर मला मातीचेच पाय असणारा माणूस आवडेल

अगदी अगदी... बघितलेयत की. पण मुस्काटात भडकावल्याने अशी किती लोकं सुधारतात ? मी आपणांस विनंती करतो, कृपया आंध्रप्रदेशात स्त्रियांनी एकजुट होऊन केलेल्या अँटी-अरॅक (देशी दारु) विरुद्ध दिलेल्या लढ्याची माहीती घ्या, म्हणजे खर्‍या प्रकारे गांधीवादी प्रयत्नांनी सरकारला व प्रशासनाला नमवता येते हे कळेल.. कुठेही आपल्या गांधीवादाचा उदो-उदो न करता ह्या स्त्रियांनी प्रौढ शिक्षण, जनजागृती, पिकेटींग आणि मन-परीवर्तनाद्वारे एका गावातच नव्हे, तर जवळजवळ पुर्ण राज्यात दारुबंदी करायला भाग पाडलं होतं सरकारला..

बादवे, अणांचं राळेगाव मधलं कार्य मला मान्य आहे. पण महाराष्ट्रात असेच चमत्कार करणारे आणखीही लोक आहेत. वारणानगर परीसर.. हिवरे बाजारचे पोपटराव पवार (हिवरेबाजार वर प्रेझेंटेशन आसामात नगॉंवमध्ये डिसी ऑफीसमध्ये आदर्श ग्रामच्या सभेत दाखवली होती आम्हाला..) , आणीही काही.. हां, आता त्यांना मायलेज घेता आलं नसेल ही गोष्ट वेगळी..

अ‍ॅज युजवल, कुणाच्याही धोतराला हात घालायचा उद्देश नाही.. भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व..

कॉलिंग इन्द्रराज पवार

शित्रेउमेश's picture

25 Nov 2011 - 8:22 pm | शित्रेउमेश

मी काल पासुन आण्णांच्या कमेंट वर खुप हसलोय...

अशोक पतिल's picture

25 Nov 2011 - 9:38 pm | अशोक पतिल

अन्ना हजारेचे खरे रुप आता उघड झाले आहे. मी ही त्याना आधुनिक गान्धी समझलो होतो. परन्तु त्या गान्धीची व या गान्धीची तुलनाच नाही.त्या गान्धीने चुकुनही कोणाविषयी कुजकट शब्द वापरले नव्हते. खरेतर ज्या अन्ना ना एक महाराष्ट्र सोड्ला तर कोणी ओळखत नव्हते ते एकाएकी सर्व देशात कसे प्रसिध्द झाले त्याचे खरे कारण कळले. त्यानी आता भ्रष्टाचारविरोधी आंदोलन वगेरे बोलने सोडुन सरळ सरळ आपल्या ( बोलवीत्या धन्याचे ) कुन्कू लावुन सरळ राजकारण करावे. भारतीय लोकशाहित तसा तो प्रत्येकाचा हक्क आहेच.

आशु जोग's picture

25 Nov 2011 - 11:05 pm | आशु जोग

पवार यांना झापड मारल्याने पाटील यांना दु:ख झाले

अण्णा जाऊदे हो विषय पवारांचा आहे

अर्धवटराव's picture

27 Nov 2011 - 11:33 am | अर्धवटराव

मला मनापासुन वाटतं कि अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला राजकीय स्टंट ठरविण्याचा (मुर्ख) प्रयत्न करणार्‍यांचं एखाद्या भ्रष्टाचाराने प्रचंड नुकसान व्हावं... अगदी पर्सनल नुकसान... आतड्या पिळवटुन काढणारं ...आणि मग त्यांची प्रतिक्रिया घ्यावी

अर्धवटराव

तस नाही हो, भ्रष्टाचाराने प्रचंड नुकसान ह्या देशाचे , जनतेचे,आपल्या सर्वाचे होतेय. परन्तू याला फक्त एकाच पार्टीला किवा नेत्यालाच का जबाबदार धरताय ? ह्या धाग्यावर बहुतेक सर्व प्रतिक्रीया एक पुर्वग्रहदुषीत द्रुष्टिकोन दाखवतात.
(मुर्ख) प्रयत्न करणार्‍यांचं
प्रयत्न मुर्ख नाही.तो तुम्हाला तसा वाट्तो . बाकि बहुतेक सर्व प्रतिक्रीया विषयी मीपण हेच लिहु शकेल.

अर्धवटराव's picture

28 Nov 2011 - 9:04 am | अर्धवटराव

>>प्रयत्न मुर्ख नाही.तो तुम्हाला तसा वाट्तो .
तसंही असेल कदाचीत. शरद पवारांचा आवाका, त्यांची राजकारणी समज या बद्दल कुणाचेच दुमत नसावे. राजकारणात कोणिच पूर्ण काळं वा पांढरं नाहि हे ही सत्य... पण विषय जेंव्हा अण्णांच्या आंदोलनाचा येतो तेंव्हा त्याला अण्णांच्या मुद्द्यावरुनच आव्हान द्यावं ना... अण्णांना राजकारणात उतरण्याचं आव्हान देणं म्हणजे पोटदुखीला खोकल्याचं औषध. घोड्याला पळण्याच्या शर्यतीत हरवावे, पोहायच्या नाहि.

अर्धवटराव

यकु's picture

25 Nov 2011 - 9:46 pm | यकु

सचिनचं शतक होवो न होवो.
श्रीयुत हरविंदर कृपेने निघालेल्या या धाग्याचे शतक झाले असे जाहीर करतो!!!!

आशु जोग's picture

26 Nov 2011 - 10:26 pm | आशु जोग

यापेक्षा हे अधिक आवडले

http://www.misalpav.com/node/19882

समंजस's picture

27 Nov 2011 - 1:22 am | समंजस

थप्पड मारहाणीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी पक्षाने, पक्ष कार्यकर्त्यांनी आणि पक्ष नेत्यांनी नंतर जो धुमाकूळ घातला ( रस्ता बंद, दुकाने बंद, दगडफेक, हरविंदरला मारहाण करण्याचा प्रयत्न, अण्णांचा पुतळा जाळणे, अण्णांवर हल्ला करण्याचा प्रयत्न ई. ई. ) त्या वरून हे दिसून आलं आहे की, राष्ट्रवादी पक्षाचे पाय सुद्धा मातीचेच आहेत. तसेच जो बुरखा (आम्ही फुले, आंबेडकर, शाहू महाराजांच्या विचारांचे पुरस्कर्ते आहोत आणि दुसरे पक्ष हे झुंडशाही, झोडशाही, दडपशाही, हुकूमशाही वगैरे विचारांचे आहेत) आतापर्यंत त्यांनी वापरला तो गळून पडला हे सुद्धा या प्रकरणातून बाहेर आलेलं एक चांगलं फलितच.

अवांतर: शरद पवार साहेबांनी आतापर्यंत राजकारणात राहून बरंच काही मिळवलयं, आता त्यांनीच स्वतःच वाढतं वय बघून, तब्येती कडे बघून राजकारणातून बाहेर पडावं आणि एका आजोबाचं, अनुभवी, वयस्कर व्यक्ती असं मानाचं आयुष्य जगावं.

यकु's picture

27 Nov 2011 - 3:04 am | यकु

वासना दुष्पूर है ||

अशोक पतिल's picture

27 Nov 2011 - 6:32 am | अशोक पतिल

( रस्ता बंद, दुकाने बंद, दगडफेक, हरविंदरला मारहाण करण्याचा प्रयत्न, अण्णांचा पुतळा जाळणे, अण्णांवर हल्ला करण्याचा प्रयत्न ई. ई. ) त्या वरून हे दिसून आलं आहे की, राष्ट्रवादी पक्षाचे पाय सुद्धा मातीचेच आहेत. तसेच जो बुरखा (आम्ही फुले, आंबेडकर, शाहू महाराजांच्या विचारांचे पुरस्कर्ते आहोत आणि दुसरे पक्ष हे झुंडशाही, झोडशाही, दडपशाही, हुकूमशाही वगैरे विचारांचे आहेत)

मातीचे पाय नसलेला दूसरा कोणी पक्ष आहे ?

समंजस's picture

28 Nov 2011 - 12:45 pm | समंजस

<< मातीचे पाय नसलेला दूसरा कोणी पक्ष आहे ?>>

दुसरा कोणताच नाही. हे माझे मत.
(परंतू काही पक्ष हा आव आणतात. आपणच तेव्हढे सोज्ज्वळ, सहिष्णूतावादी, उदारमतवादी वै. वै)

चिंतामणी's picture

27 Nov 2011 - 9:51 am | चिंतामणी

बाकी सगळे ठिक. पण सांगा लोकशाही मुजोर झाली की नेते? :( :-( :sad:

अर्धवटराव's picture

27 Nov 2011 - 11:35 am | अर्धवटराव

(हि हरविंदरची केस नाहि पण...)
पोटात अन्न नाहि... इतकं वैफल्य कि जीव द्यायची ईच्छा होते... सगळ्यात वाईट म्हणजे आपल्या मुलाबाळांच्या भविष्यातही हाच अंधार दिसतोय... या परिस्थीतीत सदनशीर मार्गाने लढायला जे काळीज लागते ते ३ गोळ्या खाऊन "हे राम" म्हणत केंव्हाच बंद पडलय... बाकी काय बोलणार...
हि थप्पड "निषेध व्यक्त" करण्याचा विषय होऊन बसली फक्त... आपल्या सामाजीक संस्थेचं एक मोठं अपयश अजुन काय...

(गांधीवादी) अर्धवटराव

भीमाईचा पिपळ्या.'s picture

27 Nov 2011 - 11:57 am | भीमाईचा पिपळ्या.

अरे काय चाल्लय काय?
एका माथेफिरुने केलेल्या एका भ्याड हल्ल्याच्या येथील लोकांच्या अपरिपक्व प्र पाहून खेद वाटला. एक मिपाकर म्हणून शरमही वाटली.

साहेबांसारख्या एका विनम्र आणि सौहार्दशील, ज्ञानवृध्द व्यक्तिवर केलेल्या ह्या भ्याड हल्ल्याचा आम्ही णिषेढ नोंदवतो.
वयाच्या सव्विसाव्या वर्षी आमदार आणि छत्तिसाव्या वर्षी मुख्यमंत्री झालेल्या ह्या शेतकर्याच्या पोरावर राळ उडवण्याची एकही संधी काही विवक्षित लोक सोडत नाहीत.
आज उभ्या भारतवर्षात गावातल्या सोसायटीपासून थेट सर्वोच्च संसदेपर्यंत ज्ञान असलेला एकमेव नेता म्हणजे आदरणीर साहेबांचे नाव घ्यावे लागेल.

बाकी एसीत बसून गप्पा ठोकणार्या सो कॉल्ड धर्मबुडव्यांना आमच्या शुभेच्छा!

कुंदन's picture

27 Nov 2011 - 10:13 pm | कुंदन

फार जोरात बसली का हो ?
नाहि त्याबद्दल कोणीच काही बोलले नाही , तुम्हाला आतली बातमी माहित असेल कदाचित.

मैत्र's picture

28 Nov 2011 - 2:17 pm | मैत्र

http://www.misalpav.com/node/19898#comment-355813

याला काही उत्तरे द्याल का? पतिल साहेब आणी पिपळ्याराव..

हुप्प्या's picture

28 Nov 2011 - 7:14 am | हुप्प्या

सत्तरीला पोचलेल्या नेत्याला भ्रष्टाचार करायला, आपली पिलावळ पुढे करायला, जातीय राजकारण करायला कुठलीही लाज वाटत नाही तर त्याला एक भडकावून दिली तर काय बिघडले?
कायद्याचा धाक नाही, नैतिक चाड नाही, (भक्कम पैसे ओतल्यामुळे) निवडणूकीत हरण्याची शक्यता नाही. ह्या मुजोरांना धडा शिकवणार तरी कसा?

वाहे गुरुच्या कृपेने मारणारा सरदार होता. बामन असता तर १९४८ ची पुनरावृत्ती झाली असती.

बाकी ह्या निमित्ताने ठाकरेसाहेबांचे साहेबप्रेम ओसंडून वाहू लागले आहे. सामन्यातील अग्रलेखात इतके लाडे लाडे लिहिले आहे की किळस यावी. एकंदरीत कितीही वेगवेगळे मुखवटे घातले तरी सगळे मिळून वाटून खाऊ वालेच लोक आहेत हे उघड होते आहे.
लागलीच महाराणी सुप्रियासाहेब सुळे बाळासायबांच्या भेटीला पतीसमवेत मग फोटो सेशन वगैरे वगैरे. अगदीच अती होते आहे.
ह्याही घराण्यात असा "प्रसाद" वाटला पाहिजे.

असले विरोधक असतील तर लवासा वगैरे प्रकरणे उघडकीस येणे शक्य नाही.

कुंदन's picture

28 Nov 2011 - 9:42 am | कुंदन

>>बाकी ह्या निमित्ताने ठाकरेसाहेबांचे साहेबप्रेम ओसंडून वाहू लागले आहे. सामन्यातील अग्रलेखात इतके लाडे लाडे लिहिले आहे की किळस यावी.

सहमत.

सामन्यातील अग्रलेखात इतके लाडे लाडे लिहिले आहे की किळस यावी.
याच बाळासाहेबांनी ठाकरी शैलीत शरद पवारांचे मैद्याचे पोतं असे टोपणनाव ठेवले आहे... तसेच
छगन भुजबळांचा लखोबा तर नारायण राणे यांचा नारोबा उर्फ कोंबडी चोर ! ;)

सध्या मैद्याचा काय भाव चालु आहे हे पहायला हवे बरं ! ;)

भीमाईचा पिपळ्या.'s picture

28 Nov 2011 - 12:04 pm | भीमाईचा पिपळ्या.

ह्या मुजोरांना धडा शिकवणार तरी कसा?

=)) =))
इतिहासाने उगवलेला सूड. बाकी काय? :D

अनामिका's picture

28 Nov 2011 - 1:31 pm | अनामिका

http://saamana.com/2011/November/28/AGRALEKH.HTM
सामनामधिल संजय राऊत यांनी प्रसवलेला सगळ्यात भंपक लेख......राष्ट्रवादीची भविष्यात राष्ट्रिय लोकशाही आघाडीच्या अंगणात उडी मारण्याबाबतचे तथाकथित विचारमंथन सुरु झाल्याचे हे सुतोवाच असावे का?
हरमिंदरसिंह याने पवारांच्या श्रीमुखात भडकवण्याला भ्याड हल्ला म्हणणे मुर्खपणाचा कळस आहे ....याला जाळ म्हणतात असे सविस्तर नमूद केलय ....
http://www.harkatnay.com/2011/11/blog-post_24.html

मदनबाण's picture

28 Nov 2011 - 1:35 pm | मदनबाण

राजकारण्यांचे हे खेळ आता सर्व सामान्य जनतेला माहित झालेले आहेत !
आज एकमेकांना बोल लावायचे आणि दुसर्‍या दिवशी स्नेह भोजनाला एकत्र जमायचे... ;)