बौद्धांचे त्रिरत्न: उगम: नक्की कसा, कोठे?
वल्ली यांच्या शैलगृहावरील चित्रमय लेखामुळे या लेखास प्रेरणा मिळाली आहे. संशोधन पूर्णपणे जालीय माहितीवर आधारित आणि अर्धवट आहे, म्हणून जास्त लिहीण्यापेक्षा चित्रे देऊन काही विचार मांडण्याचा प्रयत्न करते आहे. फक्त एक टीपः माझ्या मते असे लिहीलेले असेल तेथे माझ्या "सध्याच्या" मते असे आहे असे धरून वाचावे (माझे पूर्वीचे मत थोडे वेगळे होते, हे आलेच). उपलब्ध माहिती प्रचंड आहे आणि वाचन त्रोटक आहे. घाईत लेख टाकल्याने त्यात बर्याच उणिवा आहेत. तेव्हा हे मत खरेच मान्य करण्यासारखे आहे का यावरून चर्चा व्हावी.
--------------------
नाशिकच्या लेण्यांचे मुखदर्शन हे पिंपळाकार आहे कारण बुद्धाला ज्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले त्याची खूण म्हणून असे दर्शन असावे असा समज प्रचलित आहे. मला असे वाटत नाही. कधीकधी असे वाटते की आपल्या देशात चिन्हांमागे/प्रथांमागे अर्थ ओढून ताणून लावले जातात. गणपतीचे पोट का विशाल, वाहन का लहानसे (म्हणजे उंदीर) यावरून लिहीलेले आपण सहसा पाहतोच. मुलांना सांगायला हे उत्तम आहे, पण मोठेही अशा कथांना जशाच्या तशा स्विकारतात तेव्हा त्यातील मूळ प्रेरणा कुठेतरी हरवून जातात असे वाटते.
माझ्या मते (वल्ली यांच्या लेखाखाली दिलेल्या प्रतिसादात दिल्याप्रमाणे) हे मुखदर्शन हे यवनी शवपेटिकांवरून (तेही तुर्कस्तान किंवा तत्सम दूरवरच्या प्रदेशातील शवपेटिकांवरून) घेतले आहे. आपल्याकडे यवन म्हणजे ग्रीक असा समज आहे. आयोनिया हा ग्रिकांचा प्रांत असला तरी त्या त्यांच्या वसाहती असाव्यात. या प्रदेशावर तत्कालिन पर्शियन लोकांचेही राज्य होते. हे कदाचित ग्रिकांचे थोडी सरमिसळ झालेले वंशज असले तरी निव्वळ ग्रीक नसावेत. निव्वळ इराणीही नसावेत. इराणी कलाकुसर जशी ग्रीस आणि इराणमधील अथेन्स किंवा पर्सीपोलिस येथे दिसते तशी या लेण्यांमधली कला नाही असे वाटते. उदा. पर्सीपोलिस येथे इराणी अपादानामध्ये दिसून येणारी सरळ, नियमित रेषा येथे दिसत नाही. दगडादगडातला फरक म्हटला तरी लेण्यांमधील शिल्पकला ही नक्की भारतीय वळणाची आहे/असावी. पण मुखदर्शनाचा आकार मात्र इतर कोठूनतरी उचललेला आहे. ग्रिकांकडील चित्रांची पद्धत उचलली (विशेषतः गांधार वळणात) तरी कलाकुसर मात्र तशी नाही.
म्हणून असे वाटते की मुखदर्शनाची ही पद्धत बाहेरून आली/उचलली गेली असावी, कदाचित पूर्वजांच्या प्रदेशाच्या काही स्मृती राहिल्या असतील त्या या चित्रणातून दिसत असतील. कधीकधी पूर्वजांच्या स्मृती वेगळेच रूप घेत असतील असे वाटते.
जालावर शोधाशोध करताना सापडलेली काही छायाचित्रे किंवा त्यांचे दुवे येथे देत आहे. चिन्हांना काळानुरुप कदाचित वेगळे अर्थ कसे प्राप्त होत गेले असतील याचा या छायाचित्रांच्या अभ्यासाने आपण थोडा अंदाज लावू शकतो असे वाटते. उदाहरणार्थ, या वल्ली यांच्या लेखातील क्र. ३ चे चित्र पहा. यावर एक मध्यभागी आता 'स्प्रे' मुळे झाकलेले एक चित्र दिसेल. ह्याला अनेक पुस्तकांमध्ये त्रिरत्न म्हटलेले आहे. बौद्ध धर्मात "बुद्ध, धर्म आणि संघ" अशी तीन रत्ने (त्रिरत्ने) सांगितली आहेत.
हेच चिन्ह सांचीच्या तोरणावर दिसते.
हेच चिन्ह खालील शिल्पावर दिसून येते. (विकीपीडियावरून साभार)
आता प्रश्न असा आहे की हेच "बुद्धाचे त्रिरत्न" असे कोणी ठरवले असेल? माझ्या मते यात काहीच रत्नांसारखे दिसत नाही. हा कसला तरी वेगळा आकार असेल का? बैलाचा आकार? कानासकट?
http://www.timelineauctions.com/lot/bulls-head-mount/4655/
हे चित्र पाहिले तर कानांच्या आकारासकट वरील चिन्हात आणि बैलाच्या चिन्हात बरेच साम्य आहे असे वाटते. पण सर अलेक्झांडर कनिंगहॅमने ह्याला त्रिरत्न म्हटले आहे हे खरे. मात्र जे. एफ. फ्लीट यांचे लेखन वेगळे मत मांडते- रॉयल एशियाटिक सोसायटीचा दुवा
"मिलिंदपन्हा" साठी प्रसिद्ध असलेल्या मिलिंद राजाच्या नाण्यावर बैल दाखवलेला आहे. मिलिंदाचा काळ विकीप्रमाणे (ख्रिस्तपूर्व १५५-१६५ वर्षे).
याआधी झालेल्या अलेक्झांडराचा सेनापती (आणि चंद्रगुप्त मौर्याचा समकालीन असलेल्या)सेल्युकसचे नाणे - यावरही सेल्युकसच्या स्वतःच्या डोक्यावर शिंगे दाखवली आहेत.
त्रिरत्न हे चिन्ह नंदीपाद अशा नावानेही ओळखले जाते. पण या चिन्हात बैलाचे पाय दिसत नाहीत. बैलाचे शीर/मस्तक मात्र दिसते.
अशोकाचे दुर्मिळ नाणे
http://www.coincommunity.com/forum/topic.asp?ARCHIVE=true&TOPIC_ID=34275
आणि त्यावरील तीन पायांचे चिन्ह हे मित्रपट (mithrapata) नावाच्या लिशियाच्या राजाच्या चिन्हात दिसून येते. (या राजाविषयी विकीपीडियावर माहिती मिळाली नाही, पण नाणी बरीच आहेत). हा राजा पर्शियन वंशाचा होता. (संदर्भ : http://books.google.com/books?id=Fvz9jnaKuPIC&dq=mithrapata+persian&source=gbs_navlinks_s)
कोसंबी यांच्या पुस्तकातील अशोकाच्या (२) चिन्हांमध्ये हे तीन पायांचे चिन्ह आहे.
अशोकाचा सिंह जसा प्रसिद्ध आहे तसाच मित्रपटाचाही सिंह आहेच.
http://www.wildwinds.com/coins/greece/lycia/dynasts/mithrapata/ARsixth.jpg
http://www.coinarchives.com/345ce62469f616d82eb63bf5e6062d25/img/sincona/001/thumb00042.jpg
मात्र हे तीन पायांचे चिन्ह तसे अशोकासाठी नवीन असावे, त्रिरत्नांसारखे चिन्ह मात्र आधीपासून प्रचलित असावे. अशोकाच्या आधीचा राजा बिंदुसार (Amitrochates) याचे हे नाणे पाहिल्यास असे वाटते की यातही त्रिरत्नांच्या मूलभूत आकाराचे (म्हणजे देवनागरीत चार (४) हा आकडा आपण जसा लिहीतो तसे) चिन्ह दिसते आहे. सेल्युकस आणि चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार हे समकालीन होते.
दा. ध. कोसंबी यांच्या इंडियन पुस्तकामधील हे चित्र (पान ११०). नंदांच्या घराण्यात बैल हे एक महत्त्वाचे चिन्ह होते असे दिसते.
http://books.google.com/books?id=favxZII9WtwC&lpg=PA67&ots=IpyO3Ebx_W&dq=sisunaga%20coin&pg=PA110#v=snippet&q=asoka%20coin&f=false
एक गंमत आहे की अशोकाने बौद्ध धर्मास प्रतिष्ठा दिली, पण त्रिरत्न चिन्ह अशोकस्तंभावर नाही. बैल मात्र इतर सिंह, हत्ती या प्राण्यांबरोबर आहे. याचा अर्थ अशोकाच्या काळी त्रिरत्न चिन्ह बौद्ध धर्माचे प्रतिक नसावे. ते असलेच तर इतर कसले तरी (वायव्येतील राजांचे/ नंदांनी वापरलेले) प्रतिक असावे. म्हणून माझ्या मते हे त्रिरत्नाचे चिन्ह आधी राजाचे चिन्ह म्हणून आले असावे. अशोकाने मित्रपटाचे तीन पायांचे चिन्ह का स्विकारले? कदाचित मित्रपटाच्या चिन्हामुळे मित्रपटाच्या अधिपत्याखालील प्रदेशात आर्थिक व्यवहार करणे सोपे जात असावे. तसेच वरील त्रिरत्नांप्रमाणे असलेले चिन्हही अशोकाआधीपासून वापरले जात होते असे मला वाटते. त्यालाच नंतर तत्कालिन कारागिरांनी सुबक रूप देऊन त्रिरत्न केले असे तर नसावे?
या सर्वावरून असे वाटते की मुळात हे त्रिरत्न एखाद्या राजाचे चिन्ह असावे. त्याला नंतर त्रिरत्न म्हटले गेले असावे. नंतर आलेल्या ग्रीक वंशाच्या राजांनी सेल्युकसकडून आलेले किंवा बिंदुसाराचे मागे पडलेले चिन्ह उचलले असावे, आणि त्याचा सतत वापर करत गेल्याने त्याला त्रिरत्नांचे आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले असावे असे वाटते. नासिकच्या या लेण्यासाठी या चिन्हाचा झालेला वापर एवढेच दर्शवतो की याकाळापर्यंत बौद्धांशी हे चिन्ह जोडले गेले होते.
कुशाणांचे (का कुषाणांचे?) शिक्के या पद्धतीच्या चिन्हांचे अस्तित्व दर्शवतात. पण कुशाण राजे अशोकाच्या खूप नंतरचे म्हणजे १ ल्या शतकातले असे समजते. हेही वायव्येकडचे. तेव्हा हे चिन्ह या भागात स्मृती म्हणून राहिले असले तर आश्चर्य वाटायला नको.
http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/5/53/KushanTamgas.gif

प्रतिक्रिया
वृष
+१
अगदी बरोबर
पोच.
विचारप्रवाह पटण्यासारखा आहे
साम्य
हम्म
त्रिशूळ आणि त्रिरत्न
धन्यवाद
शंकर ही रूद्राहून अधिक
मात्र शंकर ही रूद्राहून अधिक
कालनिश्चिती
वज्र
अगदी बरोबर
आपल्याकडे जे उपलब्ध साहित्य
धन्यवाद
अभ्यासपूर्ण लेख
धन्यवाद.
त्या दरवाजावरच्या कमानीवरही
धन्यवाद