बौद्धांचे त्रिरत्न: उगम: नक्की कसा, कोठे?

चित्रा's picture
चित्रा in काथ्याकूट
14 Nov 2011 - 11:54 am
गाभा: 

वल्ली यांच्या शैलगृहावरील चित्रमय लेखामुळे या लेखास प्रेरणा मिळाली आहे. संशोधन पूर्णपणे जालीय माहितीवर आधारित आणि अर्धवट आहे, म्हणून जास्त लिहीण्यापेक्षा चित्रे देऊन काही विचार मांडण्याचा प्रयत्न करते आहे. फक्त एक टीपः माझ्या मते असे लिहीलेले असेल तेथे माझ्या "सध्याच्या" मते असे आहे असे धरून वाचावे (माझे पूर्वीचे मत थोडे वेगळे होते, हे आलेच). उपलब्ध माहिती प्रचंड आहे आणि वाचन त्रोटक आहे. घाईत लेख टाकल्याने त्यात बर्‍याच उणिवा आहेत. तेव्हा हे मत खरेच मान्य करण्यासारखे आहे का यावरून चर्चा व्हावी.
--------------------
नाशिकच्या लेण्यांचे मुखदर्शन हे पिंपळाकार आहे कारण बुद्धाला ज्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले त्याची खूण म्हणून असे दर्शन असावे असा समज प्रचलित आहे. मला असे वाटत नाही. कधीकधी असे वाटते की आपल्या देशात चिन्हांमागे/प्रथांमागे अर्थ ओढून ताणून लावले जातात. गणपतीचे पोट का विशाल, वाहन का लहानसे (म्हणजे उंदीर) यावरून लिहीलेले आपण सहसा पाहतोच. मुलांना सांगायला हे उत्तम आहे, पण मोठेही अशा कथांना जशाच्या तशा स्विकारतात तेव्हा त्यातील मूळ प्रेरणा कुठेतरी हरवून जातात असे वाटते.

माझ्या मते (वल्ली यांच्या लेखाखाली दिलेल्या प्रतिसादात दिल्याप्रमाणे) हे मुखदर्शन हे यवनी शवपेटिकांवरून (तेही तुर्कस्तान किंवा तत्सम दूरवरच्या प्रदेशातील शवपेटिकांवरून) घेतले आहे. आपल्याकडे यवन म्हणजे ग्रीक असा समज आहे. आयोनिया हा ग्रिकांचा प्रांत असला तरी त्या त्यांच्या वसाहती असाव्यात. या प्रदेशावर तत्कालिन पर्शियन लोकांचेही राज्य होते. हे कदाचित ग्रिकांचे थोडी सरमिसळ झालेले वंशज असले तरी निव्वळ ग्रीक नसावेत. निव्वळ इराणीही नसावेत. इराणी कलाकुसर जशी ग्रीस आणि इराणमधील अथेन्स किंवा पर्सीपोलिस येथे दिसते तशी या लेण्यांमधली कला नाही असे वाटते. उदा. पर्सीपोलिस येथे इराणी अपादानामध्ये दिसून येणारी सरळ, नियमित रेषा येथे दिसत नाही. दगडादगडातला फरक म्हटला तरी लेण्यांमधील शिल्पकला ही नक्की भारतीय वळणाची आहे/असावी. पण मुखदर्शनाचा आकार मात्र इतर कोठूनतरी उचललेला आहे. ग्रिकांकडील चित्रांची पद्धत उचलली (विशेषतः गांधार वळणात) तरी कलाकुसर मात्र तशी नाही.

म्हणून असे वाटते की मुखदर्शनाची ही पद्धत बाहेरून आली/उचलली गेली असावी, कदाचित पूर्वजांच्या प्रदेशाच्या काही स्मृती राहिल्या असतील त्या या चित्रणातून दिसत असतील. कधीकधी पूर्वजांच्या स्मृती वेगळेच रूप घेत असतील असे वाटते.

जालावर शोधाशोध करताना सापडलेली काही छायाचित्रे किंवा त्यांचे दुवे येथे देत आहे. चिन्हांना काळानुरुप कदाचित वेगळे अर्थ कसे प्राप्त होत गेले असतील याचा या छायाचित्रांच्या अभ्यासाने आपण थोडा अंदाज लावू शकतो असे वाटते. उदाहरणार्थ, या वल्ली यांच्या लेखातील क्र. ३ चे चित्र पहा. यावर एक मध्यभागी आता 'स्प्रे' मुळे झाकलेले एक चित्र दिसेल. ह्याला अनेक पुस्तकांमध्ये त्रिरत्न म्हटलेले आहे. बौद्ध धर्मात "बुद्ध, धर्म आणि संघ" अशी तीन रत्ने (त्रिरत्ने) सांगितली आहेत.

हेच चिन्ह सांचीच्या तोरणावर दिसते.

हेच चिन्ह खालील शिल्पावर दिसून येते. (विकीपीडियावरून साभार)

triratna

आता प्रश्न असा आहे की हेच "बुद्धाचे त्रिरत्न" असे कोणी ठरवले असेल? माझ्या मते यात काहीच रत्नांसारखे दिसत नाही. हा कसला तरी वेगळा आकार असेल का? बैलाचा आकार? कानासकट?

http://www.timelineauctions.com/lot/bulls-head-mount/4655/

हे चित्र पाहिले तर कानांच्या आकारासकट वरील चिन्हात आणि बैलाच्या चिन्हात बरेच साम्य आहे असे वाटते. पण सर अलेक्झांडर कनिंगहॅमने ह्याला त्रिरत्न म्हटले आहे हे खरे. मात्र जे. एफ. फ्लीट यांचे लेखन वेगळे मत मांडते- रॉयल एशियाटिक सोसायटीचा दुवा

"मिलिंदपन्हा" साठी प्रसिद्ध असलेल्या मिलिंद राजाच्या नाण्यावर बैल दाखवलेला आहे. मिलिंदाचा काळ विकीप्रमाणे (ख्रिस्तपूर्व १५५-१६५ वर्षे).

याआधी झालेल्या अलेक्झांडराचा सेनापती (आणि चंद्रगुप्त मौर्याचा समकालीन असलेल्या)सेल्युकसचे नाणे - यावरही सेल्युकसच्या स्वतःच्या डोक्यावर शिंगे दाखवली आहेत.

त्रिरत्न हे चिन्ह नंदीपाद अशा नावानेही ओळखले जाते. पण या चिन्हात बैलाचे पाय दिसत नाहीत. बैलाचे शीर/मस्तक मात्र दिसते.

अशोकाचे दुर्मिळ नाणे
http://www.coincommunity.com/forum/topic.asp?ARCHIVE=true&TOPIC_ID=34275
आणि त्यावरील तीन पायांचे चिन्ह हे मित्रपट (mithrapata) नावाच्या लिशियाच्या राजाच्या चिन्हात दिसून येते. (या राजाविषयी विकीपीडियावर माहिती मिळाली नाही, पण नाणी बरीच आहेत). हा राजा पर्शियन वंशाचा होता. (संदर्भ : http://books.google.com/books?id=Fvz9jnaKuPIC&dq=mithrapata+persian&sour...)

कोसंबी यांच्या पुस्तकातील अशोकाच्या (२) चिन्हांमध्ये हे तीन पायांचे चिन्ह आहे.

अशोकाचा सिंह जसा प्रसिद्ध आहे तसाच मित्रपटाचाही सिंह आहेच.

http://www.wildwinds.com/coins/greece/lycia/dynasts/mithrapata/ARsixth.jpg

http://www.coinarchives.com/345ce62469f616d82eb63bf5e6062d25/img/sincona...

मात्र हे तीन पायांचे चिन्ह तसे अशोकासाठी नवीन असावे, त्रिरत्नांसारखे चिन्ह मात्र आधीपासून प्रचलित असावे. अशोकाच्या आधीचा राजा बिंदुसार (Amitrochates) याचे हे नाणे पाहिल्यास असे वाटते की यातही त्रिरत्नांच्या मूलभूत आकाराचे (म्हणजे देवनागरीत चार (४) हा आकडा आपण जसा लिहीतो तसे) चिन्ह दिसते आहे. सेल्युकस आणि चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार हे समकालीन होते.

दा. ध. कोसंबी यांच्या इंडियन पुस्तकामधील हे चित्र (पान ११०). नंदांच्या घराण्यात बैल हे एक महत्त्वाचे चिन्ह होते असे दिसते.
http://books.google.com/books?id=favxZII9WtwC&lpg=PA67&ots=IpyO3Ebx_W&dq...

एक गंमत आहे की अशोकाने बौद्ध धर्मास प्रतिष्ठा दिली, पण त्रिरत्न चिन्ह अशोकस्तंभावर नाही. बैल मात्र इतर सिंह, हत्ती या प्राण्यांबरोबर आहे. याचा अर्थ अशोकाच्या काळी त्रिरत्न चिन्ह बौद्ध धर्माचे प्रतिक नसावे. ते असलेच तर इतर कसले तरी (वायव्येतील राजांचे/ नंदांनी वापरलेले) प्रतिक असावे. म्हणून माझ्या मते हे त्रिरत्नाचे चिन्ह आधी राजाचे चिन्ह म्हणून आले असावे. अशोकाने मित्रपटाचे तीन पायांचे चिन्ह का स्विकारले? कदाचित मित्रपटाच्या चिन्हामुळे मित्रपटाच्या अधिपत्याखालील प्रदेशात आर्थिक व्यवहार करणे सोपे जात असावे. तसेच वरील त्रिरत्नांप्रमाणे असलेले चिन्हही अशोकाआधीपासून वापरले जात होते असे मला वाटते. त्यालाच नंतर तत्कालिन कारागिरांनी सुबक रूप देऊन त्रिरत्न केले असे तर नसावे?

या सर्वावरून असे वाटते की मुळात हे त्रिरत्न एखाद्या राजाचे चिन्ह असावे. त्याला नंतर त्रिरत्न म्हटले गेले असावे. नंतर आलेल्या ग्रीक वंशाच्या राजांनी सेल्युकसकडून आलेले किंवा बिंदुसाराचे मागे पडलेले चिन्ह उचलले असावे, आणि त्याचा सतत वापर करत गेल्याने त्याला त्रिरत्नांचे आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले असावे असे वाटते. नासिकच्या या लेण्यासाठी या चिन्हाचा झालेला वापर एवढेच दर्शवतो की याकाळापर्यंत बौद्धांशी हे चिन्ह जोडले गेले होते.

कुशाणांचे (का कुषाणांचे?) शिक्के या पद्धतीच्या चिन्हांचे अस्तित्व दर्शवतात. पण कुशाण राजे अशोकाच्या खूप नंतरचे म्हणजे १ ल्या शतकातले असे समजते. हेही वायव्येकडचे. तेव्हा हे चिन्ह या भागात स्मृती म्हणून राहिले असले तर आश्चर्य वाटायला नको.

http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/5/53/KushanTamgas.gif

sign

प्रतिक्रिया

पैसा's picture

14 Nov 2011 - 2:00 pm | पैसा

वृष म्हणजे बैल, पण 'समुहातील सर्वश्रेष्ठ' असाही एक या शब्दाचा अर्थ आहे. ते इंद्राचंही एक नाव आहे. त्याचप्रमाणे राजा आणि राणी याना 'महिष' आणि 'महिषी' अशीही संबोधने होती. शेतीप्रधान समाजाच्या काळात गायी बैल हीच संपत्ती होती. त्यामुळे बैल, किंवा रेडा यांची शिंगे किंवा तत्सम आकार ही फार पुरातन काळापासून राजचिन्हे म्हणून वापरात असावीत.

त्यातून त्रिरत्नांचा उगम झाला का हा खरंच कुतुहलाचा विषय आहे.

मदनबाण's picture

14 Nov 2011 - 2:04 pm | मदनबाण

त्यामुळे बैल, किंवा रेडा यांची शिंगे कोंवा तत्सम आकार ही फार पुरातन काळापासून राजचिन्हे म्हणून वापरात असावीत.
हडप्पा,मोहंजोदडो कालीन नाण्यावर देखील वृषभाचे चिन्ह पहायला मिळते.

चित्रा's picture

14 Nov 2011 - 7:06 pm | चित्रा

पैसा आणि मदनबाण यांना ही माहिती इथे दिल्याबद्दल अनेक आभार. बैलांचा इंद्राशी संबंध हा एक अगदी योग्य मुद्दा आहे. वायव्येकडे बैलाचे महत्त्व फार पूर्वीपासून होतेच.

@ पैसा: त्रिरत्न हे खरेच बैलांच्या मस्तकाच्या आकारातून उद्भवले आहे हा कुतुहलाचा विषय आहे हे खरे. म्हणूनच यावरून चर्चा व्हावी असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2011 - 7:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिन्हांचा मागोवा घेत त्रिरत्नाच्या उगमाचा शोध घेण्याची वाट आवडली. वाचतोय.

पिंपळाकृती कमान ही लिशीया शवपेटयां, पार्शिया कबरीशी साधर्म्य दाखवतात ही माहिती नुकतीच वाचून संपवली होती. आता ही नवीन माहिती. धन्स.

बाकी, पिंपळाकृती कमानीबद्दल कधी काही वाचनात आले तर नासिक लेणी भाग दोनला माहिती डकवेन.

-दिलीप बिरुटे

विचारप्रवाह पटण्यासारखा आहे. धन्यवाद.

पैसा's picture

14 Nov 2011 - 9:55 pm | पैसा

या त्रिरत्न चिन्हाचं त्रिशूळाशी साम्य दिसतंय. या दोन्ही गोष्टींचा काय संबंध असावा?

चित्रा's picture

15 Nov 2011 - 4:55 am | चित्रा

नंद, बैल, आणि नंदीवरून शंकर आठवला. शंकर--- त्रिशूळ ?
शंकर --> रुद्र. वेदांमध्ये रुद्राचा उल्लेख आहे, शंकराचा नाही असे वाटते. वेदांमध्ये त्रिशुळाचा उल्लेख आहे का पाहिले पाहिजे.
त्रिशूळ आणि त्रिरत्नांची वरची रचना सारखी आहे. खालचा दांडा आणि त्रिरत्नामधला गोलसर भाग याचा ताळमेळ लागत नाही.

मोहेंजोदारो येथे सापडलेल्या ह्या चित्राला शंकराचे आद्य रूप धरले तरी http://en.wikipedia.org/wiki/File:Shiva_Pashupati.jpg त्रिशूळ दिसत नाही. रुद्राचे हत्यार बाण होते असे विकीवर वाचले.

पैसा's picture

15 Nov 2011 - 7:22 pm | पैसा

त्रिरत्नाचा गोल भाग हा ८ आर्‍या असणारं धम्मचक्र आहे. त्रिशूळाला दांडी असते, आणि त्रिशूळ हे फार प्राचीन हत्यार असल्याचा उल्लेख आहे. ग्रीक पुराणात पॉसिडॉन आणि रोमनांचा नेपच्युन हे देव त्रिशूळ वापरून पाण्याचे झरे चालू करत असल्याचे उल्लेख आहेत. तसेच शिवशंकराने त्रिशूळाचा आघात करून गंगेला वाहती केली अशी आपल्या पुराणातली कथा आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Gundestrup_cauldron

http://oldgoths.blogspot.com/2009/05/pictorial-connections-betwen-nordic...

http://sirimunasiha.wordpress.com/2010/08/14/symbols-the-tree-in-enclosu...

http://symboldictionary.net/?p=1849

हे ४ दुवे पहा, त्रिरत्न किंवा त्रिशूलाशी साम्य असलेली चिन्हं सगळ्या जगभर वापरात होती. किंबहुना, इस्लामचा चांदतारा असलेलं मूळ चिन्ह आणि ख्रिश्चन क्रॉस (जो त्यापूर्वीहीप्वापरात होता) यांचंही या त्रिशूळाशी साम्य दाखवता येईल. या सर्वांच्या मुळाशी बैलाचं चिन्ह वापरणं सहजच असू शकेल.

चित्रा's picture

16 Nov 2011 - 5:28 am | चित्रा

दुवे पाहते आहे. नीट पाहून लिहीन.
त्रिशूळही जुना असणार यात शंका नाही. फक्त माझ्या मते हे त्रिरत्न चिन्ह प्राण्यांमुळे (बैलामुळे) प्रेरित झाले असावे. त्रिरत्न हे श्रीलंकेत बौद्ध धर्माच्या प्रसारासोबतच प्रचलित झाले असावे (वरील दुवा ४). हा काळ अशोकानंतरचा असावा.

मात्र शंकर ही रूद्राहून अधिक प्राचीन देवता नव्हे असे अभ्यासकांचे मत आहे असे वाटते.

प्रचेतस's picture

16 Nov 2011 - 2:02 pm | प्रचेतस

शंकर ही रूद्राहून अधिक प्राचीन देवता नव्हे

हे बरोबरच असावे. रूद्र ही वेदोक्त देवता होती. तिला शंकराचे स्वरूप मूर्तीपूजेनंतर प्राप्त झाले असावे. मूर्तीरूपात शंकर पण तसा आजही फारसा पूजिला जात नाही. त्याची उपासना ही लिंगस्वरूपातच होते. वेदकाळात शिवलिंग पूजा अस्तित्वात असावी, रामायण, महाभारतात त्याचे दाखले मिळतात.

मात्र शंकर ही रूद्राहून अधिक प्राचीन देवता नव्हे असे अभ्यासकांचे मत आहे असे वाटते.

माझ्या मते रुद्र आणि शंकर हे दोन नाहीत तर एकच आहेत...
ब्रम्ह देवाच्या मुखातुन शंकराने जन्म घेतला (ब्रम्हाने शंकाराकडे वचन मागितले होते की त्याने त्याचा पुत्र म्हणुन शंकाराने जन्म घ्यावा.) जन्म झाल्यावर शंकराच्या डोळ्यातुन पाणी वाहत होते...करुणेने रडणारा तो रुद्र असे नामकरण ब्रम्हाने त्यावेळी केले.
तसेच रुद्राच्या (शंकाराच्या) डोळ्यातुन जे पाणी खाली पडले त्यातुन रुद्राक्षाची झाडे निर्माण झाली.रुद्राचे अक्ष (डोळा) मधुन आलेले पाणी म्हणजे रुद्राक्ष !
रुद्राचे ११ अवतार सुद्धा आहेत...
ते असे :--- 1. Mahadeva, 2. Shiva , 3. Maha Rudra, 4. Shankara, 5. Neelalohita, 6. Eshana Rudra, 7. Vijaya Rudra, 8. Bheema Rudra, 9. Devadeva, 10. Bhavodbhava and 11. Adityatmaka Srirudra.
तसेच रुद्र या विषयी अजुन संदर्भ बृहदारण्यक उपनिषदात सापडतो...

katame rudrā iti |
daśeme puruṣe prāṇā ātmaikādaśaḥ |
te yadāsmāc charīrān martyād utkrāmanty atha rodayanti |
tad yad rodayanti tasmād rudrā iti || BrhUp_3,9.4 ||

यात प्राण हा दहावा आणि आत्मा हा अकरावा भाग आहे, जेव्हा आत्मा देहाला सोडुन जातो...तेव्हा ते (आप्तजन) रुदन करण्यास सुरुवात करतात म्हणुन रुद्र.

संदर्भ :--- बृहदारण्यक उपनिषद

शंकराचे अनेक दुतगण आहेत,त्यातले नंदी,भॄंगी तसेच वीरभद्र आहेत ! दक्षाच्या यज्ञात याच वीरभद्राने दक्षाचे शिर कापुन त्याची यज्ञात आहुती दिली होती.

चित्रा's picture

18 Nov 2011 - 7:18 pm | चित्रा

आपल्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्यात ऋग्वेद सर्वात जुना समजला जातो असे वाटते. उपनिषदे त्यानंतरची. रुद्र म्हणजेच शंकर हे नक्कीच - पण शंकर ही वैदिक देवता (वेदकालीन देवता) नव्हे, तर वेदकालीन रुद्राला नंतर मिळालेले स्वरूप आहे असे अभ्यासकांचे मत आहे. तरीही जनमानसात रामायण, महाभारत, विष्णू, ब्रह्मदेव, शंकर हे अतिप्राचीन असेच धरलेले असते. आपण मिळालेल्या शिलालेखांप्रमाणे यापैकी काही देवदेवतांचे प्राचीनत्व तपासू शकतो. उदा. गौतमी म्हणजे गौतमीपुत्र सातवाहनाची आई - तिच्या शिलालेखात तिचा मुलगा हा राम, भीम, अर्जुन यांच्याप्रमाणे शूर, तेजस्वी इत्यादी वर्णिलेला आहे. याचा अर्थ ह्या कथा गौतमीच्या काळी म्हणजे निदान दोन-एक हजार वर्षांपासून माहिती आहेत. महाभारताची आपल्याला माहिती असलेली संहिता मात्र यानंतरची आहे. त्यात आलेल्या गोष्टी, पुराणांतील गोष्टी या काळाप्रमाणे हळूहळू वाढत गेल्या आहेत. ऋग्वेदात विष्णूच्या वामनावतारासारखे वर्णन (तीन लोक पादाक्रांत करणे) हा पहिल्या मंडलात आला आहे, पण पहिले मंडल हे काळाप्रमाणे पहिले नसून नंतरचे आहे. पण जसा विष्णू आढळतो तसे ऋग्वेदात शंकर असे देवाचे नाव आढळत नाही (चू. भू. द्या. घ्या). परंतु कोणी ऋषी "ऋषभ वैराज किंवा शाक्कर" आढळतात. याचा अर्थ शंकर ही देवता ऋग्वेदकाळी नसेलच असे म्हणता येत नाही, पण तिचे महत्त्व वैदिकांमध्ये कमी असावे. कदाचित देवता स्थानिक असेल, आणि ती नंतर रुद्राशी संबंधित होऊन मुख्य प्रवाहात आली असेल.

@पैसा/वल्ली: त्रिरत्नाशी संबंधित टीप: ऋग्वेदात इंद्राचे वज्र तो ऋषभाच्या (बैलाच्या) शिंगांप्रमाणे धारदार ठेवत असे असा उल्लेख आढळतो. राजांच्या काळी ऋषभाच्या शिंगांना बर्‍यापैकी महत्त्व होते असे दिसते.

पैसा's picture

18 Nov 2011 - 8:37 pm | पैसा

vajra

दुहेरी वज्राचं हे चित्र. यालाही बौद्धधर्मात महत्त्वाचं स्थान आहे. (विकि वरून साभार)

काल आणखी एक गोष्ट वाचनात आली ती म्हणजे बौद्ध वा़ङ्मयात जरी पूर्वीपासून त्रिरत्नांचा उल्लेख असला तरी 'हे चिन्ह त्रिरत्नाचं आहे' असे उल्लेख साधारण १९ व्या शतकाच्या शेवटी लिखित स्वरूपात सापडतात. माझा या विषयावर फार अभ्यास नाही पण जे वाचलं ते समोर ठेवतेय, विचाराला एक दिशा म्हणून.

तर पूर्वी या चिन्हाचा उल्लेख नंदीपाद म्हणून केलेला सापडतो. परत नंदी आलाच! दुसरी एक गोष्ट मला आठवली ती म्हणजे आपण चैत्रांगणात जी गोपद्मं काढतो, ती या त्रिरत्न चिन्हासारखी दिसतात. परत गौ आली!

काही संशोधक हे त्रिरत्न किंवा नंदीपाद चिन्ह म्हणजे ऋष्य (म्हणजे काळ्या हरणाची) शृंग आहेत असं लिहिणारे सापडले.

एकूण शिंगांचा आणि त्रिरत्नाचा काही संबंध आहे हे निश्चित.

चित्रा's picture

20 Nov 2011 - 2:24 am | चित्रा

मला वाटते अलेक्झांडर कनिंगहॅमने याला प्रथम त्रिरत्न म्हटले आहे. कनिंगहॅमने याला त्रिरत्न म्हणतात असे म्हणताना कसलाही दाखला दिलेला नाही असे वाटते. श्रीलंकेमध्ये किंवा तिबेटमध्ये यालाच त्रिरत्न म्हणतात का हे पहावे लागेल, कारण कनिंगहॅमच्या काळात भारतात बौद्ध धर्माचे फारसे अनुयायी शिल्लक राहिले नव्हते.

आपल्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्यात ऋग्वेद सर्वात जुना समजला जातो असे वाटते.
ऋग्वेदातच रुद्राचा शंकर म्हणुन उल्लेख सापडतो...
Stomam vo adya rudraya shikvase
Kshaatadiraya namasa didistana...|
Yebhih Shivah svavam yevayabhihi
Divaha sishakti svayasha nikamabhihi..||

(ऋग्वेद 10-92-9)

बाकी अधिक वाचनीय माहिती इथे मिळेल :---
http://www.srichinmoylibrary.com/books/1065/1/5
http://ssubbanna.sulekha.com/blog/post/2009/03/the-rudras-eleven.htm

चित्रा's picture

20 Nov 2011 - 10:44 pm | चित्रा

सुलेखातील लेख अभ्यासपूर्ण आहे. त्यातच म्हटले आहे की -
1.8. In Rig Veda, as it is often said, the term Shiva occurs eighteen times. And, each time it is used as an adjective, an epithet standing for “an auspicious one” (mangalakara) in the sense of being “propitious" or "kind" (10.92.9).Shiva, in Rig Veda, is not the name of any god. It is a quality found in many gods.
Rudra, on the other hand, is not merely the proper name of a deity; but it also is one that refers to a collection of Rudras. Even among his collective forms, he has twin aspects: his terrible aspects as well as his benevolent aspects (dve tanu tasya devasya).

याचा अर्थ शिव, शंकर ही रुद्राची रूपे नाहीत असे म्हणायचे/सुचवायचे नाही.
मी केवळ यासाठी लिहीले आहे की पैसा यांच्या लेखनात पुराणातील शंकराने गंगा नदी आणण्याच्या त्रिशूळाच्या कथेचा उल्लेख आला आहे.
http://www.misalpav.com/node/19737#comment-352532

ऋग्वेद हा त्याकाळाकडे पाहाण्याचा केवळ एक झरोका आहे हे मान्य, ऋग्वेदात जसे वर्णन केले आहे त्यापेक्षा वेगळे काही समाजांचे जीवन चाललेले असणार हेही मान्य. पण पुराणे ही ऋग्वेदाच्या बरीच नंतरची आहेत. शंकर हे तेव्हा प्रचलित नाव असले तर ते ऋग्वेदातील ऋषींना माहिती नव्हते. ऋग्वेदातील रुद्राचे हत्यार हे बाण होते. तसेच त्रिशुळाचा उल्लेख ऋग्वेदात नाही असे वाटते. तसेच शंकराची (शिव) वरील गोष्ट कितीही सत्य धरली तरी ऋग्वेदात शिव/ शंकर हे देवतेचे नाव म्हणून येत नाही हे नक्की. ऋग्वेदातील एका ऋषीच्या नावात त्यासमान काहीतरी आहे हे मी वर लिहीलेलेच आहे. म्हणून शंकर ही ऋग्वेदातली देवता नव्हे, शिव हे प्रवृत्तीचे नाव आहे (मंगलकारक), देवतेचे नव्हे हेही आपण म्हणू शकतो.

शिवाला रुद्र हे नाव कसे पडले ही चांगली कथा आहे, पण ती रुद्राच्या रूदनावरून (रडण्यावरून) तयार केली आहे असे दिसते. पण रडण्यासाठी संस्कृतातील शब्दांमध्ये रुदन हा शब्द फार दिसला नाही. ओरडण्यासारखा अर्थ असावा का? पण हा माझा अजिबातच प्रांत नाही. कोणी इतरांनी प्रकाश टाकला तर बरे होईल.

रुद्रा rudrA f. hundred heat-making suns' rays
रुद्रा rudrA f. species of creeping plant
रुद्र rudra adj. terrific
रुद्र rudra adj. horrible
रुद्र rudra adj. howling
रुद्र rudra adj. crying
रुद्र rudra adj. dreadful
रुद्र rudra adj. terrible
रुद्र rudra adj. roaring
रुद्र rudra m. rudra and rudrANI
रुद्र rudra m. rudras or sons of rudra
रुद्र rudra m. abbreviated name for the texts or hymns addressed to rudra
रुद्र rudra m. Roarer or Howler
रुद्र rudra m. eleventh

प्रचेतस's picture

16 Nov 2011 - 1:52 pm | प्रचेतस

दिलेले दुवे रोचक आहेत.
लिशियन / पर्शियन कबरींशी चैत्यगृहातील वातायन रचना ही कमालीचे साम्य दर्शवते. यवनांबरोबर ही स्थापत्यकलाही तेथून आलेली असेल. बेडसे लेण्यांतील स्तंभ रचना, भाजे चैत्यगृहातील गुळगुळीत झिलईसारखी स्तूप रचना ही मौर्यकलेशी नाते सांगते तर पांडवलेणीतील स्फिन्क्स, ग्रिफिन रचना या ग्रीक कलेशी नाते सांगतात.
चैत्यगृहातील पिंपळपानाकृती कमानीच्या रचनेची संकल्पना बाहेरून आलेली सुद्धा असू शकते पण इथे मात्र ते गयेतील अश्वस्थवृक्षाचे प्रतिक म्हणूनच ते वापरले जाते. (संदर्भः सातवाहनकालीन महाराष्ट्रः रा. श्री. मोरवंचीकर) पिंपळाच्या पानाला जसा पुढे आलेला टोकदार भाग असतो तशीच रचना महाराष्ट्रातील चैत्यगृहांमध्ये केलेली आढळून येते. अजून काही दुवा मिळाल्यास अवश्य देईन.

त्रिरत्नासंबंधी माझ्याकडे असलेल्या इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम एलोरा अँड वेस्टर्न इंडिया या पीडीएफ मधले काही दुवे डकवत आहे. पूर्ण फाईल कुणाला हवी असल्यास विरोप पत्ता व्यनी करावा.

चित्रा's picture

17 Nov 2011 - 8:05 pm | चित्रा

चैत्यगृहातील पिंपळपानाकृती कमानीच्या रचनेची संकल्पना बाहेरून आलेली सुद्धा असू शकते पण इथे मात्र ते गयेतील अश्वस्थवृक्षाचे प्रतिक म्हणूनच ते वापरले जाते. (संदर्भः सातवाहनकालीन महाराष्ट्रः रा. श्री. मोरवंचीकर)

टोक असलेले पिंपळपान मान्य आहे. येथील दुसरा फोटो पहावा. http://www.misalpav.com/node/19608
दोन कमानी आहेत, एका कमानीला टोक आहे, दुसरीला नाही. दुसरी आहे ती मुख्य दारावर म्हणून आहे. मी या दुसर्‍या कमानीबद्दल बोलते आहे. ती नक्कीच पिंपळपान नाही. वरची असू शकते. माझ्या मते पहिल्या कमानीसाठी मोरवंचीकरांचे मत ग्राह्य धरायला हरकत नाही, विशेषतः बौद्ध समाजामध्ये जर हे मत अधिकृत आणि ग्राह्य धरले जात असले तर ते स्विकारायला काहीच विरोध नाही. परंतु लेखाचा एक मुद्दा हा आहे की आपण कधीकधी पूर्वीच्या चिन्हांना नवीन, आपल्याला लोकांना समजावून द्यायला योग्य वाटतील असे अर्थ देत असतो. चिन्हे जशी देशात तयार होतात (उदा. मौर्यांच्या नाण्यांवरचा मोर) तशी बाहेरूनही आलेली असू शकतात. अनेकदा यातून तत्कालिन समाजांचे राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक संबंध स्पष्ट होत असतात. या प्रकारच्या अभ्यासातून या राजांना मिळालेला पाठिंबा किंवा विरोध यांच्यावरही प्रकाश पडू शकतो असे वाटते.

एक अवांतरः हा स्तूप नक्की कोणासाठी बांधला आहे याचे उत्तर मिळते का? भिख्खूच्या अस्थींवर हे उत्तर ठीक आहे, पण ज्या पद्धतीचा सन्मान या चैत्यगृहांना आहे त्यावरून ज्यांच्यासाठी हा मोठा स्तूप आहे, ते कोणी साधे भिख्खू नसावेत, कदाचित मोठ्या कुळातले, उच्चपदस्थ भिख्खू असावेत असे वाटते.

त्या दरवाजावरच्या कमानीवरही कदाचित पिंपळासारखे टोक असू शकेल. जशी त्याची सध्याची अवस्था दिसून येत आहे त्यावरून ते भग्न झालेले असावे असे दिसत आहे. अर्थात चिन्हाची मूळ संकल्पना बाहेरूनही आलेलीही असू शकते.
या लेण्यांवरून तर तत्कालीन बौद्ध धर्माला राजाश्रय असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. सातवाहन, परकीय क्षत्रप, पुन्हा सातवाहन व परत क्षत्रप अशी स्थित्यंतरे या लेण्यांनी पाहिली पण एकानेही दुसर्‍याचे धर्मस्थळ उध्वस्त केले नाही. सातवाहन वैदिक धर्माचे, मूळात सहिष्णू पण कुठलाही धर्म नसलेले क्षत्रपही इथे लेण्यांना दान देताना दिसतात. (कदाचित धर्म मसल्यामुळे ते इतर धर्मांना सहजपणे आपलेसे करत असावेत.) नासिक लेण्यांतील क्षत्रपांचे शिलालेख त्या दृष्टीने महत्वाचे आहेत.

अवांतराबद्दलः स्तूप हे मुख्यतः भिक्खूंच्या अस्थींवरच बांधले जात पण हे ग्राह्य ठरते जमिनीवरील बांधीव स्तूपांबाबत. सह्याद्रीच्या गिरीकुहरांतील शैलगृहांबद्दल हे अशक्य वाटते कारण ते पूर्णपणे कोरीव आहेत अर्थात अस्थींवर ते बांधणे अशक्य. ते बांधले असावेत ते बौद्ध भिक्खूंच्या स्मरणार्थ आणि ध्यानधारणेसाठी. अर्थात कुणासाठी हे स्तूप बांधले गेले असावेत याचा शिलालेखात पुरावा मिळत नाही. पण शिलालेखांमध्ये हे चैत्यगृह धर्म संघासाठी दिले असे उल्लेख मात्र मिळतात.
भाजे लेण्यांमध्ये चैत्यगृहातील मुख्य स्तूपाबरोबरच एका विहारात अनेक लहान लहान स्तूप कोरलेले आहेत ते बहुधा प्रमुख धर्मगुरुंच्या स्मरणार्थ बांधले गेले असावेत.

चित्रा's picture

18 Nov 2011 - 2:50 am | चित्रा

कुणासाठी हे स्तूप बांधले गेले असावेत याचा शिलालेखात पुरावा मिळत नाही.

धन्यवाद.

तुम्ही आता या सगळ्या भटकंतीवरून एखादे पुस्तकच लिहा असे म्हणेन.