४. कोवळे झुंबर

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
9 Nov 2011 - 1:02 pm

काल चंद्र ओलावलेला
अंगणी येवुन शहारला
रागावलेल्या मिट्ट शब्दांना
चंदेरी कुशीत घे म्हणाला

मनी दाटली मग नाजुक सरसर
जरी दूराव्याचे बंध खडतर
सरता म्हंटले तरी सरेना
क्षणांचे हे मोहक अंतर

बोललो मग चंद्रास हळुवार
मिठीत माझ्या स्वप्न अलवार
नकोच काही करुस चिंता
विनतो आहे प्रेमाचे तोरण

स्मित करुन मग चंद्र बोलतो
तुझ्याच साठी आलो इथवर
अन वाटेवरती स्वप्नतारकांचे
लावले बघ कोवळे झुंबर

--------- शब्दमेघ (८ नोव्हेंबर २०११, प्रितगंध... एक दरवळणारी साथ)

कविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

9 Nov 2011 - 1:06 pm | सुहास झेले

स्मित करुन मग चंद्र बोलतो
तुझ्याच साठी आलो इथवर
अन वाटेवरती स्वप्नतारकांचे
लावले बघ कोवळे झुंबर

वाह वाह ... सुंदर !!

३. स्पर्शगंध : http://www.misalpav.com/node/19398
२. स्वप्नमेघातील चांदणं : http://www.misalpav.com/node/18888
१. पहिल्या भेटीचा सुगंध : http://www.misalpav.com/node/18628

प्रचेतस's picture

9 Nov 2011 - 1:19 pm | प्रचेतस

विरहाचा हा समय असह्य होई, मज कोण त्राता,
चिंता करू नकोस तू, दिवस जवळी आले आता.

किसन शिंदे's picture

9 Nov 2011 - 1:28 pm | किसन शिंदे

हाहाहा...

एक नंबर रे वल्ल्या.

५० फक्त's picture

9 Nov 2011 - 6:45 pm | ५० फक्त

वल्ली, तुमचे पण दिवस संपत आले आहेत, उगा कुणी बोलत नाही म्हणुन गमजा करु नका इथं, आम्हाला माहितंय सुट्टी कशाला काढलीय ते.

प्रचेतस's picture

9 Nov 2011 - 10:21 pm | प्रचेतस

केवळ फिरण्यासाठी हो मालक. :) :) :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

9 Nov 2011 - 2:36 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मालक काय लिहीलय.. व्वाह!!

बोललो मग चंद्रास हळुवार
मिठीत माझ्या स्वप्न अलवार
नकोच काही करुस चिंता
विनतो आहे प्रेमाचे तोरण

क्या बात!! फिदा!!

अवांतरः ते विनतो टायपो झाला वाटतं, विणतो असे म्हणायचे असेल तुला.

विदेश's picture

9 Nov 2011 - 3:36 pm | विदेश

चन्द्र सुद्धा छान बोलला कवितेत !

चित्रा's picture

9 Nov 2011 - 7:09 pm | चित्रा

मला कविता फारशी कळली नाही. :(
दुराव्याचे बंध (दुराव्याचेही बंध असतात ही कल्पना आवडली) चंद्राशी का प्रेमिकेशी?

गणेशा's picture

9 Nov 2011 - 9:05 pm | गणेशा

काल चंद्र ओलावलेला
अंगणी येवुन शहारला
रागावलेल्या मिट्ट शब्दांना
चंदेरी कुशीत घे म्हणाला

मनी दाटली मग नाजुक सरसर
जरी दूराव्याचे बंध खडतर
सरता म्हंटले तरी सरेना
क्षणांचे हे मोहक अंतर

प्रियकर प्रेयशीवरती रागावला असल्याने, चंद्र अंगणात येउन बोलतो आहे त्या प्रियकराशी.
तो बोलताना प्रियकराला ही जाणवते की त्याला ही आता करमत नाहीये तिच्याशिवाय ..
ती दूर असल्याने त्याला ही वाईट वाटते..
हे क्षण त्याला आता संपावेत असे वाटते आहे.
(दूराव्याचे बंध असतात.. कारण ह्या दुराव्यातील तळमळ हवीहवीशी असते ..)

चित्रा's picture

10 Nov 2011 - 7:45 am | चित्रा

धन्यवाद!

आणि कवितेला असलेली एक नवीनच मिती कळली त्यामुळे कविता आवडलीच :)

सर्वांचे मनापासुन आभार ...

पैसा's picture

9 Nov 2011 - 10:27 pm | पैसा

छान शब्दकळा. पुढच्या महिन्यात आणखी सुंदर कविता वाचायला मिळतील या प्रतीक्षेत...

प्रकाश१११'s picture

9 Nov 2011 - 11:27 pm | प्रकाश१११

वा...!!
मनी दाटली मग नाजुक सरसर
जरी दूराव्याचे बंध खडतर
सरता म्हंटले तरी सरेना
क्षणांचे हे मोहक अंतर

सुंदर.अप्रतिम ..!!

लीलाधर's picture

10 Nov 2011 - 8:17 am | लीलाधर

चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला......... फारच छान येउद्यात अजून...............

नगरीनिरंजन's picture

10 Nov 2011 - 8:23 am | नगरीनिरंजन

छान कविता आणि छान शब्द!
अजून येऊ दे.

यश पालकर's picture

10 Nov 2011 - 1:55 pm | यश पालकर

अप्रतिम......

मनी दाटली मग नाजुक सरसर
जरी दूराव्याचे बंध खडतर
सरता म्हंटले तरी सरेना
क्षणांचे हे मोहक अंतर

यशवंत

जागु's picture

10 Nov 2011 - 2:17 pm | जागु

सुंदर.

फिझा's picture

14 Nov 2011 - 4:31 pm | फिझा

जमलय !!! छान आहे कविता !!

जयवी's picture

14 Nov 2011 - 7:37 pm | जयवी

क्या बात है.....!! एकदम रोमँटिक !!