तिखट आप्पे

साहित्यः

तयार इडलीचे पीठ

(कसे करायचे त्याची कृती: २ वाटया उकडे तांदूळ, १ वाटी उडदाची डाळ वेगवेगळे १०-१२ तास भिजवणे. मग दोन्ही वेगवेगळे वाटून एकत्र करून उबदार ठिकाणी पीठ फुगण्यासाठी / आंबवण्यासाठी १०-१२ तास ठेवावे.)
साधारण दोन मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून बारीक चिरलेले आले
१-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त)
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग व बारीक चिरलेला कढीपत्ता (तुम्ही कढीपत्ता अख्खा ही वापरु शकता)

.

पाकृ:

तयार इडली पीठात चिरलेला कांदा, आले, हिरवी मिरची व मीठ घालावे.

.

एका बुट्टीत तेल तापवून मोहरी, हिंग व कढीपत्त्याची फोडणी करावी व ती पीठावर ओतून मिश्रण नीट एकजीव करावे.

.

आप्पेपात्र मध्यम गॅसवर ठेवून त्यात थोडेच तेल घालावे. तेल तापले की त्यात चमच्याने मिश्रण घालावे.

.

झाकून २ मिनिटे शिजू द्यावे. एका बाजूने शिजले / फुगले की उलटवून दुसर्‍या बाजूने शिजू द्यावे.

.

तयार आप्पे ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.

.

प्रतिक्रिया

मस्तचं

मस्त ग :)
हे आप्पे साम्बराबरोबर पण झक्कास लागत्तात ग :)

पाकृ नेहमी प्रमाणेच जबराट!

हेच सगळे साहित्य वापरुन गुंतपंगलु नावाचा एक प्रकार करतात.
यातला आणि त्यातला फरक म्हणजे ते तळले जाते हे वाफवले जाते.
:)

मस्त :)

पाकृ आणि फोटो दोन्ही मस्त!

असेच म्हणते. फोटो झकास आला आहे.

जे बात.
लई भारी. आवडली पाकृ.मस्तच

काहि लोकांचे अप्पे एकदम स्पोंजी बनतात त्यावर काहि टिप?

हा सोडियम बायकार्बोनेटचा परिणाम तर नसावा?

सानिका तैंचे तिखटामिठाचे आप्पे मस्त आणि स्पाँजीही झालेले दिसतायत हे मात्र नक्की....

आवड्या.

:-)

.

हे बरय राव्!;) इडलीचं पीठ थोडं बाजूला काढलं की झालं.
आप्पे सर्व्ह करण्याची अभिनव कल्पना आवडली.
आमची पाकृ येथे आहे.

>>इडलीचं पीठ थोडं बाजूला काढलं की झालं.
इडलीचं पीठ नक्की चालेल का?

नॉन स्टिक आप्पे पात्र मिळते का ?
मिळत असेल तर या वेळी भारत वारीत घेउन येईन म्हणतो.

वरील पा़कृ इडलीच्या पीठापासूनचं बनवली आहे
हो नॉन स्टिक आप्पेपात्र मिळतं आणी जागुतै म्हणते तसं कमी तेलात छान आप्पे होतात.
मी नॉन स्टिक आप्पेपात्रचं वापरले आहे :)

सानिकाशी सहमत.
नॉन्स्टीक आप्पेपात्र आलय बाजारात. माझ्याकडे आहे ते अ‍ॅल्युमिनियमचे आहे.
पुण्यातल्या घरी गुंडाळून ठेवलय ते अगदी जुने लोखंडी आहे. त्यात आप्पे बरेच मोठे होतात आणि चव जी काही मस्त लागते की ज्याचं नाव ते! तुम्ही भारतवारीत नॉनस्टीक पात्र (झाकणासकट) घेऊन या. वजन फार नसते. लोखंडी प्रकार खूपच जड आहे. त्याची ष्टोरी (न विचारताच सांगतिये.) अशी की आत्या इतके चविष्ट आप्पे करायची की मी नेहमी खूप कौतुक करायचे आणि ती आपली "काही नाही गं तुलाही जमतील." म्हणत असे. मला काही तसे जमले नाहीत. मग तिच्या आप्पेपात्रातच जादू आहे असे म्हटल्याने तिने ते लगेच स्वच्छ करून घरी पाठवून दिले. नंतर ती गेलीच! मग त्यात आप्पे करण्याचा मूडही गेला पण अजून जपून ठेवले आहे. छे! नको त्या आठवणी!
मजेदार आठवण ही की माझ्या मावसबहिणीच्या सासर्‍यांना आप्पा म्हणतात आणि तिने लग्न झाल्यावर आप्पे केले होते. एक आप्पा हातात धरून हा काय आहे असे विचारताच ती गप्प बसली होती.;)

वा वा मस्तच सानिका.

कुंदन नॉनस्टीक आप्पेपात्र मिळते. माझ्याकडे आहे. तेच वापरलेले चांगले कारण तेल खुपच कमी लागते त्याला.

फोटो पण अतिशय सुंदर...

आता मात्र आप्पेपात्र घ्यायलाच लागेल..

- (पार्टटाईम स्वंयपाकी) पिंगू

फोटो पाहून समाधान झालेले नाही

मत्सच गं.... मी पण असेच करते. फक्त इथे आप्पेपात्र मिळत नाही.

मीसुद्धा आप्पेपात्र भारतातूनच आणलं आहे :)
धन्स :)

नेहमीप्रमाणे एक नंबर पाककृती आणी प्रेसेंटेशन सुध्दा..!

मला खूप आवडतात आप्पे...

पाककृती नेहमीसारखीच मस्त !! :)

पीठाला फोडणी देण्याची कल्पना खूपच छान आहे ,प्रेझेंटेशनही खूपच छान झाल आहे नेहमिप्रमाणेच !!

असेच म्हणते, पीठाला फोडणी देण्याची कल्पना खूपच छान आहे !

माझा आवडता पदार्थ. योगायोग म्हणजे आज सकाळीच पीठ भिजवून रुबवायला ठेवले आहे :)

"पीठ भिजवून रुबवायला ठेवले आहे "

:O :-O :shock:

पीठ भिजवल्यावर रूबवतात कसे????

चिंतुकाका, त्यांना असं म्हणायचय की रूबवून उबवायला ठेवले आहे.

(हलके घेणे) पण एव्हाना आप्पे झाले असतील की!

मस्त च लई भारी प्रकार आहे हा , सानिकातै फक्त एक शंका आहे ' कडीपत्ता चिरता येतो का इतर पान भाज्यासारखा, कारण त्याला चिरता ने येणं हे त्याचं वैशिष्ट आहे असं मी ऐकुन आहे.

मस्त झाले आहे आप्पे :)

एकदम उचलुन खावेसे वाटत आहेत.. बाकी नुसत्या डाळीच्या मिश्रणांचे करा वा डोसा पिठाचे नाहितर नुसते मुगडाळ चे किंवा गोड गुळाचे चवीली अप्रतिम :)
नेहमीचा रीतीप्रमाणे तोंपासु, मस्त वगैरे वगैरे :)

सगळ्यांना धन्यवाद :)

धन्यवाद दिले नसते तरी चालले असते.
आप्पे स्विकारतो आम्ही!;)

वा मस्त ! शेवटचा फोटू फार भारीय :)

एक वेगळा प्रकार.

आमच्या घरी असे मसला आप्पे बनवताना पिठात उडीद डाळी बरोबरच भिजवलेली चण्याची डाळ + तुरीची डाळ + मेथीची दाणे ही वाटून घालतात.
ह्या दोन पिवळ्या डाळीन्मुळे रन्गही सोनेरी येतोशिवाय प्रथिनान्चे प्रमाण ही वाढते. मेथीचे दाणे एक खमन्ग स्वाद तर देतातच शिवाय डायेटरी फायबर्स ही वाढ्तात. वाढत्या वयाच्या मुलान्साठी अत्यन्त उपयुक्त.

मसाल्याची एकसमान चव / वास लागावा म्हणून हिरवी मिरची ; आले ; लसूण आणी जिरे ह्यन्ची पेस्ट ( गन्धा सारखी वाटून ) घालतात. कान्दा / कोथिम्बीर मात्र बारीक चिरूनच घालतात.

नारळाच्या चवाची हिरवी मिरची आले लसूण घातलेली , वरून चरचरीत फोडणी दिलेली चटणी ही बाय डीफोल्ट.
कोलेस्त्रोल / क्यालरीज चा विचार करून अशी चटणी ( ईच्छा असूनही ) भरपूर खाता येत नसेल तर अश्यानी नारळाचा चव निम्मा करून त्या ऐवजी तेवढीच फुटाण्याची दाळे घालून ही चटणी करावी. चव अजून छान .चटणी अजून हेल्दी ! !

अशी वाटून केलेली हिरवी चटणी नसली तरी नुसती मद्रासी पूड चटणी भुरभुरवून आणी त्यावर कच्चे तेल / लोणकढे पातळ तूप घालूनही हे / असे आप्पे मस्त लागतात.

ता.क. - फोटू मधली स्कलर्'स / स्क्यूअर्स ना आप्पे ओवून सादर करायची कल्पना एकदम मस्त ! !

मस्त फोटु..