मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तिखट आप्पे

सानिकास्वप्निल · · पाककृती
साहित्यः तयार इडलीचे पीठ (कसे करायचे त्याची कृती: २ वाटया उकडे तांदूळ, १ वाटी उडदाची डाळ वेगवेगळे १०-१२ तास भिजवणे. मग दोन्ही वेगवेगळे वाटून एकत्र करून उबदार ठिकाणी पीठ फुगण्यासाठी / आंबवण्यासाठी १०-१२ तास ठेवावे.) साधारण दोन मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा १ टीस्पून बारीक चिरलेले आले १-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त) मीठ चवीनुसार फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग व बारीक चिरलेला कढीपत्ता (तुम्ही कढीपत्ता अख्खा ही वापरु शकता) Image removed. पाकृ: तयार इडली पीठात चिरलेला कांदा, आले, हिरवी मिरची व मीठ घालावे. Image removed. एका बुट्टीत तेल तापवून मोहरी, हिंग व कढीपत्त्याची फोडणी करावी व ती पीठावर ओतून मिश्रण नीट एकजीव करावे. Image removed. आप्पेपात्र मध्यम गॅसवर ठेवून त्यात थोडेच तेल घालावे. तेल तापले की त्यात चमच्याने मिश्रण घालावे. Image removed. झाकून २ मिनिटे शिजू द्यावे. एका बाजूने शिजले / फुगले की उलटवून दुसर्‍या बाजूने शिजू द्यावे. Image removed. तयार आप्पे ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे. Image removed.

वाचन 15183 प्रतिक्रिया 0