पाठीवरले बिर्‍हाड

चित्रा's picture
चित्रा in जनातलं, मनातलं
18 Sep 2011 - 10:00 pm

प्रेरणा: http://www.misalpav.com/node/19173
येथून पुढे नगरीजनांचे काय झाले ते पुढच्या काही काव्यसदृश पंक्तींमध्ये. मागील शैलीशी काही संबंध नाही.
___

येथोनि पुढे काय झाले | नगरजनांसी आले कंटाळे | जावोनि दुसर्‍या देशी | तंबू ठोकती ||
ऐका त्या देशीची कथा | तेथ राजा असे परदेशा || राजा नसता देशी || प्रधान अमात्यच राज्य करिती|
तेथले प्रजाजन थोर| बुद्धिमंत, कुशल आणि वाक्पटू चपळ| विचार सहसा करती| एकसारखे|
म्हणोनि नगरीचा | कारभार सुलभ | म्हणूनि अभिमान | करीत प्रधान|

अशा नगरीस| गेले नगरजन |शोधित एक स्थान | विश्वासाचे |
नगरजनांना | सांगितले कोणी| राजाच्या दरबारी चतुर प्रधान | त्यांसी विचारोन पाहा कसे|
ठरवोनि नगरजन | गेले दरबारी| तेथला थाटमाट | पाहून डोळे दिपती|
म्हणोनि दरबारी| बोलण्यासी योग्य| नगरजनांनी असा | नेमिला पंडित|
पंडिताने केला विचार| तो काही | नमस्कार करोनी | बोलू पडे|
विश्वासाला जातो | जेथ तडा एक| परत सांधणे | अवघड|
म्हणून देश सोडून | शोधतो आम्ही जन| असे एक स्थान | जेथ असा घात शक्य नाही||
तुमच्या या नगरी | आलो कीर्ती ऐकूनी | येथली रीतभात | समजावुनि द्या||
तसे हेही सांगा| या तरी नगरीचे | कायदे असती का | सर्वांना समान|

प्रधानांसी हे प्रश्न | नव्हते अपेक्षित| म्हणोनि प्रधान | गडबडे|
चतुर प्रधान| घालुनि पायताणे| म्हणे पंडितांसी | पुसुनि येतो
वेळ गेला तरी| परतला नाही| म्हणून नगरीजन कंटाळले|
म्हणाले हलवू |आपला हा डेरा| विश्वासाचा ठेवा | मिळे कोठे|
नगरानगरांच्या | वेगळाल्या रीती| बिर्‍हाड बरे| पाठीवरती|

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

18 Sep 2011 - 10:10 pm | पैसा

पृथ्वी गोल आहे. सगळेच विंचवाच्या पाठीवर बसून निघाले, तर तेच दुसर्‍या देशातही भेटतील ना परत!!!!

प्रियाली's picture

18 Sep 2011 - 10:21 pm | प्रियाली

समान कायद्यांची थोरी| डंका वाजवी राजा, अमात्य जनता सारी|
लोकाभिमुख देशाचा गोडवा| अंगाशी आला महानुभावा||
मग बोट दाखवूनी दुसर्‍यांकडे| म्हणे अमात्य| तेथेही दु:खीच सारे|
तोंड दाबूनी मार खाऊ बुक्क्यांचा| परी गड्या अपुलाची गाव बरे||

स्वतःच्या चुका दुसर्‍यांकडे बोट दाखवण्यामुळे कमी होत नसल्याने; पोथ्या वाचण्याची आणि लिहिण्याचा काहीही अनुभव नसल्याने वरील टुकार ओळींबद्दल माफी मागते.

सेट- सबसेट, पेरेंट-चाइल्ड, एकत्र कुटुंबाचे न्यूट्रल कुटुंब वगैरे होतच असते आणि होतच राहील. :)

चित्रा's picture

18 Sep 2011 - 10:49 pm | चित्रा

हा एक विरंगुळा आहे - दुसर्‍याला जाणीवपूर्वक दु:ख देण्याचा हेतू नाही.

सतत बदलत गेलेले शीघ्र कवित्व बघून उत्तर कशाला द्यावे समजले नाही.

चुका माणसांच्या होतात आणि त्यातून शिकायचे असते असे मध्ये कोठेतरी एक प्रतिसाद वाचून समजले होते.

प्रियाली's picture

18 Sep 2011 - 10:59 pm | प्रियाली

चुका माणसांच्या होतात आणि त्यातून शिकायचे असते असे मध्ये कोठेतरी एक प्रतिसाद वाचून समजले होते.

झालेली चूक कबूल केली तर चूक आहे असे समजते. जर चूक कबूलच केली नाही आणि चूक झाली असे मानलेच नाही तर चुका माणसांच्या होतात आणि त्यातून शिकायचे असते म्हणण्याला अर्थ राहत नाही. त्यातून चुकांवर पांघरुणे घालणारे थोडे नाहीत.
तसेच, माणसाला माणूस न समजता देवपण देऊ केले की प्रश्नच सुटतो. आणखी एक, चूक एखादेवेळी होती. वारंवार होतो तो अपराध.

सतत बदलत गेलेले शीघ्र कवित्व बघून उत्तर कशाला द्यावे समजले नाही.

जेथे शीर्षक बदलायची मुभा आहे तेथे शीघ्र कवित्वाचा प्रतिसाद बदलणे आलेच. :) दुखावण्याचा हेतू नव्हता म्हणूनच वरील ओळी बदलल्या. त्यातील अर्थ समजून पायाखालची जमीन सरकवायचा हेतू नाही.

चित्रा's picture

18 Sep 2011 - 11:45 pm | चित्रा

हे भलतेच सुरू झाले.
>माणसाला माणूस न समजता देवपण देऊ केले की प्रश्नच सुटतो.
हे कोणी केले असे म्हणायचे आहे?

>त्यातील अर्थ समजून पायाखालची जमीन सरकवायचा हेतू नाही.
ही जमीन एवढ्यातेवढ्याने डचमळण्याइतकी भुसभुशीत नाही.

>चूक एखादेवेळी होती. वारंवार होतो तो अपराध.
+१.
>त्यातून चुकांवर पांघरुणे घालणारे थोडे नाहीत.
नक्कीच. पण जे आपल्याबरोबर नाहीत ते आपल्याविरुद्ध आहेत, पांघरुणे घालत आहेत किंवा विचारांनी/आचारांनी गुलाम आहेत असाच समज करून घेतला/दिला जात आहे असे वाटते. यातून वेगळेच पर्याय निवडणारे लोकही मी पाहते आहे. पर्यायांमधला एक वरती मांडला आहे (पाठीवर बिर्‍हाड करण्याचा).

> जेथे शीर्षक बदलायची मुभा आहे तेथे शीघ्र कवित्वाचा प्रतिसाद बदलणे आलेच.
वरील लेखनावरून गैरसमज होईल म्हणून शीर्षक विंचवावरचे बिर्‍हाड असे दिले गेले होते. विंचवाचे बिर्‍हाड असा शब्दप्रयोग आहे. बिर्‍हाड पाठीवर असते म्हणून दुरुस्त केले. वरील प्रतिसादातले शीर्षक बदलण्याआधीच शीघ्र कवित्व बदलले एवढेच नव्हे बाकीचे बरेच लिहीलेलेही बदलले.

प्रियाली's picture

18 Sep 2011 - 11:50 pm | प्रियाली

हे भलतेच सुरू झाले.

सुरू करणार्‍या आपण आहात. आम्ही री खेचतो आहोत.

हे कोणी केले असे म्हणायचे आहे?

हे असे सहसा होते असे म्हणायचे आहे. कदाचित तुम्हीही करत असाल किंवा नसालही. कोणी केले हा मुद्दा माझ्यामते गौण आहे.

पण जे आपल्याबरोबर नाहीत ते आपल्याविरुद्ध आहेत, पांघरुणे घालत आहेत किंवा विचारांनी/आचारांनी गुलाम आहेत असाच समज करून घेतला/दिला जात आहे असे वाटते.

अजिबात नाही. म्हणूनच वर "तोंड दाबून बुक्क्यांचा मार" असे स्पष्ट म्हटले आहे पण जेव्हा प्रकार दाबून टाकण्यावर किंवा वर लिहिल्याप्रमाणे मुद्दा भलतीकडे वळवण्यावर भर दिला जातो. अन्यायाविषयी मौन राखले जाते तेव्हा समज करून घेणार्‍यांचा दोष मानता येत नाही.

ही जमीन एवढ्यातेवढ्याने डचमळण्याइतकी भुसभुशीत नाही.

नक्कीच. भुसभुशीत नसावी हीच इच्छा पण ही वल्गना ठरू नये ही सद्भावना.

वरील प्रतिसादातले शीर्षक बदलण्याआधीच शीघ्र कवित्व बदलले एवढेच नव्हे बाकीचे बरेच लिहीलेलेही बदलले.

शेवटच्या दोन ओळी ज्या नीट जमत नव्हत्या किंवा त्यातून जे सांगायचे ते मांडण्याची ही जागा नव्हे असे वाटल्याने तेवढ्याच ओळी बदलल्या आहेत. बाकीचे बरेच वगैरे तेथे काही नव्हते. त्या दोन बदलेल्या ओळी सोडून जे तेथे होते ते अद्यापही तेथेच आहे. बाकी, ओळी बदलल्या म्हणून स्वसंपादनाचे अधिकार काढून घेण्याचे विचार आहेत का? ;)

आपण केला की विरंगुळा, दुसर्‍यांनी केले की "गैरसमज पसरवणे" छान छान! म्हणूनच चालू द्या म्हटले.

चित्रा's picture

19 Sep 2011 - 5:23 am | चित्रा

>कदाचित तुम्हीही करत असाल किंवा नसालही.
ह्यासारख्या वाक्यांची जरुरी नाही असे मला वाटते. ह्याने काय सिद्ध होते?

> प्रकार दाबून टाकण्यावर किंवा वर लिहिल्याप्रमाणे मुद्दा भलतीकडे वळवण्यावर भर दिला जातो.
यात तुमचा मुख्य आरोप आहे की मी मुद्दा भलतीकडे वळवला. अजिबात नाही. मुख्य मुद्दा असा आहे की पर्याय फारसे वेगळे नाहीत हे मला वाटते. मुळात या पर्यायांचा विचार का करावा लागतो? कारण जे व्हायला हवे आहे ते होताना दिसत नाही म्हणून. नगरजन परत शहराला नाही आले, ते विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर घेऊन फिरले असे मी सुचवले आहे. मला जे म्हणायचे होते ते म्हणायचेच नव्हते असा टोपीपालट मी करत नाही अशी माझी कल्पना आहे.

>भुसभुशीत नसावी हीच इच्छा पण ही वल्गना ठरू नये ही सद्भावना.
धन्यवाद. पण मला वाटते आपण दोन वेगळ्या जमिनींबद्दल बोलत आहोत. तेव्हा इथेच थांबते.

>बाकी, ओळी बदलल्या म्हणून स्वसंपादनाचे अधिकार काढून घेण्याचे विचार आहेत का? Wink
हाहा. तसे माझे अधिकार नाहीत हे तुम्हाला चांगले माहिती आहे. शिवाय याबद्दल तुमचे माझे विचार काय होते हेही तुम्हाला आठवत असेल असे धरते. हा कॅच सोडून देते.

> आपण केला की विरंगुळा, दुसर्‍यांनी केले की "गैरसमज पसरवणे" छान छान! म्हणूनच चालू द्या म्हटले.
आजवर ज्यांना समज करून घ्यायचे आहेत ते कितीही म्हटले तरी करून घेणार हे दुर्दैवाने प्रत्येक वेळी सिद्ध होत आले आहे, तेव्हा त्यांचे गैरसमज/समज दूर करणे माझ्या जन्मात शक्य नाही आणि मी त्याचा प्रयत्न करायचे सोडले आहे.

प्रियाली's picture

19 Sep 2011 - 5:43 am | प्रियाली

नगरजन परत शहराला नाही आले, ते विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर घेऊन फिरले असे मी सुचवले आहे.

हे सुचवण्यासाठी दुसर्‍या राज्यातील प्रधान, तिथले परदेशी राजे, तिथले विचारी सदस्य वगैरेंना मध्ये न आणता लिहिता आले असते पण तो मोह न टाळता येणे म्हणजेच तेथे सर्व आलबेल नाही हे दाखवण्यात खर्ची घातलेल्या ओळी मुद्दा भरकटवण्याच्या कामी आल्या असे मला वाटते. आपली चूक दुसर्‍याची चूक दाखवून झाकता येत नाही.

तसे माझे अधिकार नाहीत हे तुम्हाला चांगले माहिती आहे. शिवाय याबद्दल तुमचे माझे विचार काय होते हेही तुम्हाला आठवत असेल असे धरते. हा कॅच सोडून देते.

विकिंग साइन तुम्हीही पाहिली होतीत असे समजते. :)

जे झाले, जे होते ते स्पष्ट शब्दांत न मांडता येणे, त्यासाठी आडूनपाडून शब्दांचा आसरा लागणे, ज्याला जेथे ऐकवायचे तेथे मौन बाळगणे आणि तिसर्‍यांनाच (येथे परदेशी राजे आणि त्यांचे प्रधान) खेचून आणणे वगैरे प्रकारांनी या तिरप्या प्रतिसादांशिवाय दुसरे काहीच साधत नाही.

असो. आता थांबते.

चित्रा's picture

19 Sep 2011 - 6:55 am | चित्रा

>आपली चूक दुसर्‍याची चूक दाखवून झाकता येत नाही.

आपली चूक आणि दुसर्‍याची चूक असा भेद मी करत नाही. मला सगळेच देश सारखे.

>जे होते ते स्पष्ट शब्दांत न मांडता येणे, त्यासाठी आडूनपाडून शब्दांचा आसरा लागणे, ज्याला जेथे ऐकवायचे तेथे मौन बाळगणे आणि तिसर्‍यांनाच (येथे परदेशी राजे आणि त्यांचे प्रधान) खेचून आणणे वगैरे प्रकारांनी या तिरप्या प्रतिसादांशिवाय दुसरे काहीच साधत नाही.

मला ज्यांना बोलायचे आहे त्यांना बोलून झाले आहे. याखेरीज इतर कोणास काही उत्तर देणे मी लागत नाही.

श्रावण मोडक's picture

18 Sep 2011 - 11:07 pm | श्रावण मोडक

"स्वतःच्या चुका दुसर्‍यांकडे बोट दाखवण्यामुळे कमी होत नसल्याने" या विधानाशी सहमत आहे. :)
आपल्या चुका आपणच सुधाराव्यात. दुसऱ्याच्या डोंगराएवढ्या चुका दाखवल्याने आपल्या टेकडीएवढ्या चुकादेखील दुरुस्त किंवा क्षम्य होत नसतातच. प्रियालीने अगदी बरोबर लिहिले आहे. ;)
चित्राने अंगुलीनिर्देश केला तेव्हा तिच्याकडेच तिची तीन बोटं होती. त्यापैकी एक बोट या प्रतिसादाने कव्हर केले. आता उर्वरित दोन बोटं कुणी तरी करावीत. म्हणजे मग हिशेब पूर्ण होईल. एका बाजूला अंगुली सिद्ध असेल, दुसऱ्या बाजूला करंगळी, अनामिका आणि मधले बोटही सिद्ध असेल. अंगठा कोण आहे ते शोधूया नंतर. ;)
शेपूट तुटलेल्या माकडांचा मेळावा शेवटी हा. प्रत्येक जण दुसऱ्याला म्हणतो तुझं बूड उघडं. :)

चित्रा's picture

19 Sep 2011 - 6:02 pm | चित्रा

>दुसऱ्याच्या डोंगराएवढ्या चुका दाखवल्याने आपल्या टेकडीएवढ्या चुकादेखील दुरुस्त किंवा क्षम्य होत नसतातच.

टेकडी आणि डोंगर दोन्ही झाले तरी चुका आहेत हे मान्य केल्यास पुढे जाता येते. चूक झालीच नाही असे म्हणणे म्हणजे ती दुरुस्त करण्याचा मार्ग संपवणे.

>शेपूट तुटलेल्या माकडांचा मेळावा शेवटी हा. प्रत्येक जण दुसऱ्याला म्हणतो तुझं बूड उघडं.
+१. अगदी. पण दुसरे आणि आपण असे सतत वर्गीकरण करणार्‍यांपैकी मी नाही असे मला वाटते :-)
आता यालाही मी दुसर्‍याचे बूड उघडे म्हणते असे म्हणायचे असल्यास जरूर म्हणावे. :-)

प्रियाली's picture

19 Sep 2011 - 6:12 pm | प्रियाली

स्वतःची चूक झाली असे ना डोंगर म्हणत आहे, ना टेकडी म्हणत आहे ना तुम्ही म्हणत आहात. आपली चूक झाली हे मान्य करण्याचा जो स्वभाव लागतो तो नसेलच तर वादविवादाचा प्रश्न येतोच कुठे?

फक्त तो डोंगर आणि मी टेकडी असे स्वतःचे समाधान करून घेतले की पुरेसे असते.

चित्रा's picture

19 Sep 2011 - 7:29 pm | चित्रा

इथे तुम्ही माझ्या कुठच्या चुकेबद्दल बोलत आहात?
१. हा धागा काढणे. २. तो तुम्हाला इन-ऑपॉर्चुन क्षणी काढणे. ३. वेगळे मत मांडणे ४. प्रश्नाची सखोलता समजून न घेता काढणे ५. ज्यांना बोलायचे आहे त्यांना न बोलणे? ६. ज्यांना बोलायचे आहे त्यांना तुमच्यासमोर न बोलणे. ७. तुम्हाला प्रश्न करणे

नक्की कोणती चूक?

प्रियाली's picture

19 Sep 2011 - 7:39 pm | प्रियाली

या धाग्यात अनावश्यक रित्या इतरांना गोवणे ही बाब मला अनावश्यक आणि चुकीची वाटते. हे मी आधीही प्रतिसादातून सांगितले आहे तरीही ही बाकीची कलमे मांडणे अनावश्यक आहे.

बाकीच्या चुका आहेत की नाही हे तुमचे तुम्ही ठरवायचे. आम्ही हे करतो पण इतरांच्या डोळ्याआड असे म्हटले की समोरचा बोलू शकत नाही आणि ती चूक आहे असेही म्हणू शकत नाही. असो.

चित्रा's picture

19 Sep 2011 - 7:50 pm | चित्रा

मला वाटते अनावश्यक रित्या आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार तुमचा नाही. पण होय, गुंतवले आहे.
तुमच्या मते ती चूक असली तर केली आहे. क्षमस्व.

प्रियाली's picture

19 Sep 2011 - 7:56 pm | प्रियाली

मला वाटते अनावश्यक रित्या आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार तुमचा नाही

का बरे? या संकेतस्थळावर एखादी गोष्ट अनावश्यक वाटली तर ते सांगण्याचा अधिकार सदस्यांना नाही असे धोरण आहे का? मला वाटते, एखाद्याला एखादी गोष्ट अनावश्यक वाटू शकते. ती का वाटली हे वरील अनेक प्रतिसादांतून मी सांगितले आहे. तुम्हाला तिच गोष्ट आवश्यक वाटू शकते. ही मतभिन्नता झाली त्यात अधिकार असणे-नसणे या गोष्टी काढणे हे बडगा दाखवण्याजोगे आहे.

होय, गुंतवले आहे.
तुमच्या मते ती चूक असली तर केली आहे. क्षमस्व.

हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद.

चित्रा's picture

19 Sep 2011 - 8:07 pm | चित्रा

>हे बडगा दाखवण्याजोगे आहे.

असे वाटत असल्यास दुसरी क्षमा मागते. माझ्याकडून तुमच्याशी या चर्चेला पूर्णविराम.

श्रावण मोडक's picture

19 Sep 2011 - 7:00 pm | श्रावण मोडक

तुमच्या दुरूस्तीवर माझी सुधारणा -

टेकडी आणि डोंगर दोन्ही झाले तरी चुका आहेत हे मान्य केल्यास पुढे जाता येते. चूक झालीच नाही असे म्हणणे म्हणजे ती दुरुस्त करण्याचा मार्ग संपवणे.

चूक झालीच नाही, असे कोणी म्हटले तरी त्याला अर्थ नाही. कारण या चुका दिसतातच. आता चुकांनाच कुणी भूषण मानून मिरवणार असेल तर आपण काय बोलणार? बरोबर? :)

+१. अगदी. पण दुसरे आणि आपण असे सतत वर्गीकरण करणार्‍यांपैकी मी नाही असे मला वाटते Smile

मी वैयक्तिक लिहिले आहे की काय? नाही. तसं वाटत असेल तर तो लेखनाचा दोष. क्षमस्व. पण व्यक्ती म्हणून मी स्वतःला या एकत्रित स्वरूपापासून बाजूला काढू शकत नाही. तुम्ही स्वतःला वेगळ्या ठेवू शकता. पण ते मी मान्य करणार नाही. कारण, आपण सारे मिळूनच हे जे स्वरूप आहे ते घडते असे मी समजतो. :)

आता यालाही मी दुसर्‍याचे बूड उघडे म्हणते असे म्हणायचे असल्यास जरूर म्हणावे.

मी वर दिलेल्या उत्तराच्या चौकटीत हे कसे बसवायचे ते पहा. कारण तुमचा हा न्याय तुम्हाला लागू झाला तर तो मलाही लागू होतोच. :)

चित्रा's picture

19 Sep 2011 - 7:05 pm | चित्रा

>आता चुकांनाच कुणी भूषण मानून मिरवणार असेल तर आपण काय बोलणार? बरोबर? Smile

बरोबर.

>मी वैयक्तिक लिहिले आहे की काय?
नाही. मला तुमचे लिहीणे वैयक्तिक वाटलेले नाही. क्षमेची गरज नव्हती.

नंदन's picture

18 Sep 2011 - 10:26 pm | नंदन

म्हणून देश सोडून | शोधतो आम्ही जन| असे एक स्थान | जेथ असा घात शक्य नाही||

चार-साडेचार वर्षांपूर्वीचे दिवस आठवले :). शेवटी चक्रनेमिक्रमेण हेच खरे.

म्हणाले हलवू |आपला हा डेरा| विश्वासाचा ठेवा | मिळे कोठे|
नगरानगरांच्या | वेगळाल्या रीती| बिर्‍हाड बरे| विंचवावरती|

सहमत. 'मुसाफिर जायेगा कहाँ' हे धोरणच उत्कृष्ट 'गाईड' :)

गडबडीत लिहील्याने भलतेच चुकले शीर्षक आणि शेवटची ओळ दुरुस्त केले आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Sep 2011 - 5:01 pm | बिपिन कार्यकर्ते

खरंय!

बाकी चक्रनेमिक्रमेण हेच खरे, नंदन म्हणतो तसे... आणि तसे असेल तर, (शिवाय फलाटडबादृष्टांत आहेच, ऑलरेडी प्रूव्हन मेनी टाइम्स ओव्हर) मग दु:ख कशाचे? :)

राजेश घासकडवी's picture

19 Sep 2011 - 8:06 pm | राजेश घासकडवी

मूळ कवितेतल्या सत्यनारायणी कथनशैलीला न्याय देण्यात चित्रा यशस्वी नाही झाल्या असंच म्हणावं लागतं. ओघ व योग्य ठिकाणी यमक साधणं हे मूळ कवितेत अधिक चांगलं साधलेलं आहे.

कथेच्या तात्पर्यातला 'आहे हे असंच चालायचं, त्यात सुधारणा होणं शक्य नाही...' असा फेटालिझम मला व्यक्तिशः आवडला नाही. घरोघरी मातीच्याच चुली म्हणणाऱ्यांना गॅसच्या शेगड्यांची कल्पना करता येत नाही का असं वाटून जातं. असो.

अवांतर: वर चाललेला वादविवाद थोडा हाताबाहेर चाललेला आहे असं वाटत नाही का? सुटीवरच्या-माजी का होईना, पण संपादकांनी थोडं भान ठेवावं असं वाटतं.

प्रियाली's picture

19 Sep 2011 - 8:14 pm | प्रियाली

सुटीवरच्या-माजी का होईना, पण संपादकांनी थोडं भान ठेवावं असं वाटतं.

चर्चा नको तिथे वैयक्तिक घसरली आहे, संपादन होण्याजोगे किंवा मिपाच्या धोरणांत न बसण्याजोगे मुद्दे आहेत असे तुम्हाला वाटते का? असल्यास कृपया दाखवून द्यावे. नसल्यास भान कसले ठेवायचे ते सांगावे.

घरोघरी मातीच्याच चुली म्हणणाऱ्यांना गॅसच्या शेगड्यांची कल्पना करता येत नाही का असं वाटून जातं.

याचं उत्तर मी काल खरडीत दिलेले आहे. चुली असोत किंवा गॅसची शेगडी - भडका उडायचा असल्यास तो उडेलच असे कवयित्रीला सांगायचे असावे. तसे असल्यास मी मथितार्थाशी सहमत आहे. अर्थातच, ते सांगण्यासाठी ज्या उदाहरणांचा वापर त्यांनी केला त्याच्याशी मी असहमत आहे.

राजेश घासकडवी's picture

19 Sep 2011 - 9:01 pm | राजेश घासकडवी

मिपाच्या धोरणात काय बसतं याविषयाची चर्चा करायची नाही असं पूर्वीच ठरवलेलं आहे, तेव्हा पास.

भान ठेवणं हा शब्दप्रयोग 'ही चर्चा हाताबाहेर तर जात नाहीना, याचं भान ठेवावं' एवढ्याच अर्थाने होता. संपादक हा उल्लेख केला एवढ्यासाठीच की संस्थळावरील वागणुकीबाबत सामान्य सदस्य संपादकांकडे काही शिकून घेण्याच्या दृष्टीकोनातून, रोल मॉडेल म्हणून पहातात. अधिकाराबरोबर काही जबाबदाऱ्याही येतात, त्यामुळे अपेक्षा वाढतात हे सांगायचं होतं इतकंच.

प्रियाली's picture

19 Sep 2011 - 9:07 pm | प्रियाली

वर जी चर्चा सुरू आहे ती पूर्णतः काव्यातील मजकूराशी संबंधित आहे. जी रुपके वापरली ती अनावश्यक होती, पटणारी नव्हती, असे वापर केले जाऊ नये अशी इच्छा बाळगणे इ. कोणत्याही स्वरूपात अवांतर नाही. त्यामुळे चर्चा हाताबाहेर जाण्याचा संभव नाही.

त्या काव्याचा विषय आणि रोख यावरच सर्व प्रतिसाद आहेत.

अधिकाराबरोबर काही जबाबदाऱ्याही येतात, त्यामुळे अपेक्षा वाढतात हे सांगायचं होतं इतकंच.

नक्कीच पण मग हे नसलेल्या संपादकपदाच्या अतिरिक्त जबाबदार्‍यांचं लोढणं किती काळ बाळगावं असं तुमचं म्हणणं आहे? की संपादकपद सोडलं असेल तरीही माजी संपादक असा बागुलबुवा दाखवून तुम्ही प्रतिसाद देत राहणार?

राहीली गोष्ट जबाबदारीची तर जबाबदारी सर्वांचीच असते. त्यात सदस्य आणि संपादक वेगळे काढता येत नाहीत.

>>अवांतर: वर चाललेला वादविवाद थोडा हाताबाहेर चाललेला आहे असं वाटत नाही का? सुटीवरच्या-माजी का होईना, पण संपादकांनी थोडं भान ठेवावं असं वाटतं.

ह्या अवांतराशी साफ असहमती व्यक्त करतो.
सर्व सदस्यांप्रमाणेच संपादकांनी लेखन करण्याचे अधिकार आहेत, त्यांनाही एखाद्या विषयावर वाद घालण्याचा अधिकार आहे.
संपादक असलेल्या सदस्याने त्याच्या वैयक्तिक आयडीमधुन लिहलेली वाक्ये (काही नैमित्तीक अपवाद वगळता) हे संपादक मंडळाची भुमिका किंवा संपादनाची तत्वे होऊ शकत नाहीत.
उदा : एखाद्या संपादकाचा संघाच्या भुमिकेला पाठिंबा आहे व तो संपादक सदस्य त्याच्या प्रतिसादातुन तसे व्यक्त करत असेल तर 'संपादकांनी राजकीय भुमिका मांडताना भान ठेवावे' अशा अर्थाचे वाक्य त्याच्यावर अन्याय होणार नाही का ?
एखाद्या संपादकाचे 'क्रिकेट हा भिकारडा खेळ आहे' असे वैयक्तिक मत असेल तर ते तुम्ही काय संपादक मंडळाची भुमिका म्हणुन समजुन घेणार काय ?

असो.
तरीही हा विषय सर्वांनी इथेच थांबवावा अशी मी नम्र विनंती करतो.
ह्या निमित्ताने उगाच संपादकांची तत्वे आणि तत्सम प्रकारांचा अनावश्यक पंचनामा होऊ नये अशी ह्यामागची प्रामाणीक भावना आहे.

बाकी चालू द्यात.

अवांतर : संपादकांचे सर्वसाधारण लेखन / प्रतिसादही सर्व सामान्य सदस्यांप्रमाणेच संपादित होऊ शकतात ह्याची आपल्याला कल्पना असेलच. म्हणुन मी संपादकांनी त्यांच्या सदस्य आयडीतुन लिहलेल्या प्रत्येक अक्षराचा संपादक पदाशी संबंध लाऊ नका अशी विनंती करतो.

- छोटा डॉन

राजेश घासकडवी's picture

19 Sep 2011 - 9:55 pm | राजेश घासकडवी

माझा रोख विशिष्ट भूमिकांकडे नसून संस्थळावर वावरण्याच्या पद्धतीवर होता. त्या बाबतीत आदर्श वागणूक कशी असावी याचे रोल मॉडेल संपादक असावेत एवढंच माझं मत आहे. हे सांगताना मी जर कमीअधिक काही बोलून गेलो असेन, कोणाचे गैरसमज झाले असतील, कोणी दुखावलं गेलं असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

प्रियाली: तुम्हाला माजी संपादक म्हणून जबाबदारीचं लोढणं नाही हे विसरल्याबद्दल मी दिलगीर आहे. संपादकांनी माझ्या प्रतिसादातला माजी चा उल्लेख काढून टाकावा ही विनंती.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2011 - 10:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

संपादकांची तत्वे आणि तत्सम प्रकारांबद्दल चर्चा कोणती आणि अनावश्यक पंचनामा कोणता हे कसं ठरवलं जातं?

जबाबदार (ज्यांच्याकडून उच्च अपेक्षा आहेत) आणि बेजबाबदार असं वर्गीकरण केल्यास चालेल काय?

  • या वर्गीकरणामुळे संपादक जबाबदार आहेतच अशी अनावश्यक अपेक्षा व्यक्त होत नाही.
  • शिवाय संपादन आणि संपादक मंडळाबद्दल टिप्पणी करण्याची गरज पडत नाही.
  • संपादकमंडळाबाहेरही जबाबदार सदस्य आहेत त्यांचीही बूज राखली जाते.
  • राजीनामा दिलेल्या संपादकांनाही 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' अशी तक्रार करण्यास जागा रहात नाही.

पंगा मोड ऑफः
चित्राताई, पोथीसारखी रचना जमलेली नाही. एकूण निष्कर्ष थोडा पटला, थोडा नाही. शेवटची ओळ विशेष आवडली.

राजेश घासकडवी's picture

19 Sep 2011 - 10:35 pm | राजेश घासकडवी

जबाबदार (ज्यांच्याकडून उच्च अपेक्षा आहेत) आणि बेजबाबदार असं वर्गीकरण केल्यास चालेल काय?

ही सूचना मला खूप आवडली. जबाबदारी ही मानण्यावर असते. तेव्हा सर्वच संपादकांवर ते लोढणं का टाका?

मी संपादक मंडळाला विनंती करतो की माझ्या वरील प्रतिसादांतील संपादक हे उल्लेख काढून टाकून त्या जागी 'जबाबदार, जुन्या आणि जाणत्या आयडी' असा उल्लेख घालावा.

प्रियाली's picture

19 Sep 2011 - 10:41 pm | प्रियाली

मी संपादक मंडळाला विनंती करतो की माझ्या वरील प्रतिसादांतील संपादक हे उल्लेख काढून टाकून त्या जागी 'जबाबदार, जुन्या आणि जाणत्या आयडी' असा उल्लेख घालावा.

घासकडवी तुम्हाला जुने आणि जाणते कोण आहेत हे माहित आहे हे कळल्याने आनंद वाटला. तुम्ही आशु जोग यांच्या नवीन कोण या प्रश्नाचे उत्तर द्यावे म्हणजे तुमच्यावरीने वरील प्रतिसाद संपादित करण्याची विनंती मीही संपादकांना करेन. ;)

क्रेमर's picture

19 Sep 2011 - 10:42 pm | क्रेमर

इतरांच्या उच्च अपेक्षांचं ओझं ज्यांच्याकडून इतरांना अपेक्षा आहेत, त्यांच्यावर टाकणे हा अपेक्षा असणार्‍यांचा बेजबाबदारपणाच नव्हे काय?

मी संपादक मंडळाला विनंती करतो की माझ्या वरील प्रतिसादांतील संपादक हे उल्लेख काढून टाकून त्या जागी 'जबाबदार, जुन्या आणि जाणत्या आयडी' असा उल्लेख घालावा.

घासकडवींचा प्रतिसाद पूर्णच बाद करावा अशी मी संपादकमंडळाला विनंती करतो.

Nile's picture

19 Sep 2011 - 10:45 pm | Nile

मुळात पोथ्यांना क्वेश्चन करणेच संस्कृतीचे उल्लंघन नाही काय? सगळे क्वेश्चनिंग प्रतिसादच बाद करावेत अशी मी संमंला विनंती करतो!

(पळा...)

क्रेमर's picture

19 Sep 2011 - 10:49 pm | क्रेमर

पोथ्यांना क्वेश्चन केल्यानेच संस्कृती उत्क्रांत होत असल्याने त्यास उल्लंघन समजू नये. परंतु पोथ्यांतील मजकूराच्या शैलीचा वापर करून खोटी रूढीप्रियता दर्शवणे हे कसलेतरी उल्लंघन आहे.

क्रेमर's picture

19 Sep 2011 - 9:22 pm | क्रेमर

आजकाल सर्वच उघड आणि पारदर्शकपणे चालत असल्याने मिपावर मजा येत आहे.

दरबार उघडपणेच भरावेत. गुप्त खलित्यांची भानगडच नको.

नगरानगरांच्या | वेगळाल्या रीती| चपला बर्‍या| पायांमधी| ;-)

चित्रा's picture

20 Sep 2011 - 12:12 am | चित्रा

पोथी जमली नाही या अतिशय योग्य मताबद्दल आभारी आहे. अशा मार्गदर्शनानेच सुधारणा होतात. म्हणून अजून एकदा धन्यवाद. पुढच्या वेळी अधिक काळजी घेईन.

पण खरे सांगायचे तर अशी किंवा कशीही पोथी लिहीण्याची वेळ येऊ नये असे वाटते.

>वर चाललेला वादविवाद थोडा हाताबाहेर चाललेला आहे असं वाटत नाही का?

हो, वाटते. आणि वाद हाताबाहेर जाण्याची जी काही जबाबदारी असेल तीही स्विकारते.