साहित्यः
Frozen pastry sheets - १ पॅकेट
बटाटे - ३-४ उकडुन
मटार - १/२ कप
जिरे - १/२चमचा
हिरवी मिरची - १ बारीक चिरुन
हळद - १ चमचा
लाल तिखट - १ चमचा
गरम मसाला - १/२ चमचा
आमचुर पावडर - २ चमचे
धने - १ चमचा
बडिशेप - १/२ चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर - २ चमचे
अंडे - १
ओवा - १ चमचा
बटर - १ चमचा
मिठ चवीनुसार
कृती:
१. बटाटे उकडुन घेउन हाताने mash करावेत.
२. Pastry sheets ह्या frozen असल्यामुळे, समोसे करण्याच्या १/२ तास आधी फ्रिजबाहेर काढुन ठेवावेत.
३. कढई गरम करुन त्यात आधी आख्खे धने व बडिशेप भाजुन घ्यावी. ह्याची खरबरीत अशी पुड करुन घ्यावी.
४. कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जिरे व बरीक चिरलेली मिरची टाकुन परतावे. त्यात मटार टाकावेत.
५. मटार परतुन झाल्यावर त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, १/२ चमचा ओवा व धने बडिशेपची पुड टाकावी. त्यात mash केलेला बटाटा टाकुन निट mix करुन घ्यावे.
६. हे मिश्रण mix झाल्यावर त्यात आमचुर पावडर, चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मिठ टाकुन २ मिनिटे झाकुन ठेवावे. समोस्याचे सारण तयार झाले.
७. Pastry sheets ह्या आता normal temp ला आल्यावर त्याची पुरी पेक्षा थोडी मोठी पोळी लाटुन घ्यावी.
८. ह्या पोळीचे, मधे कापुन २ अर्धगोल करुन घ्यावेत.
९. त्यातील एका भागाचा कोन करुन घ्यावा. ह्या कोनच्या कडा चिकटण्यासाठी मी फेटलेले अंडे वापरले. पण तुम्ही त्या जागी पाणी किंवा दुध वापरु शकता.
१०. ह्या कोन मधे वरील सारण भरुन कडा अंड्याचा वापर करुन बंद कराव्यात.
११. अशाप्रकारे सगळे समोसे करुन घ्यावेत.
१२. Oven २०० temp ला preheat करुन घ्यावा.
१३. बेकिंग ट्रे ला बटर लावावे. त्यावर सगळे सामोसे ठेवावेत.
१४. ह्या समोस्यांना ब्रशने वरतुन फेटलेले अंडे लावावे. (अंडे वापरायचे नसल्यास दुध लावु शकता) वरतुन थोडा ओवा टाकावा.
१५. बेकिंग ट्रे Oven मधे ठेवावा. १० मिनिटात सामोसे वरतुन brown रंगाचे होतील. तेव्हा ट्रे बाहेर काढावा.
१६. गरम गरम सामोसे खायला तयार आहेत. ह्या बरोबर चिंच-खजुराची चटणी किंवा टोमॅटो सॉस मस्त लागतो.
प्रतिक्रिया
24 Aug 2011 - 2:56 am | सोत्रि
शेवटच्या फोटोमधे समोश्यावर तीळ आहेत की जिरे?
जिरे असल्यास तीळ असते तर आणखी मजा आली असती असे वाटते.
- (समोश्यामधे आलु असेपर्यंत जग़ण्याची इच्छा असलेला) सोकाजी
25 Aug 2011 - 5:53 pm | शाहिर
समोश्यामधे आलु असेपर्यंत जग़ण्याची इच्छा असे म्हनू नका ..आम्हा ला तुम्ही हवे आहात ( जोवर काक्टेल टाकत आहत तोवर )..
मि पा कर आलु विना सामोस्याची रेसिपी टाकतील
24 Aug 2011 - 2:57 am | Mrunalini
समोस्यावर ओवा टाकला आहे.
24 Aug 2011 - 3:11 am | सानिकास्वप्निल
समोसा मला खुप खुप आवडतो...मी फक्त सारणात लाल-तिखट व हळद नाही घालत...आले+लसुण+मिरची पेस्ट घालते :)
शेवटचा फोटो खुपच टेम्पटींग आहे...तोंपासू :)
24 Aug 2011 - 3:15 am | Mrunalini
धन्स गं.. :) समोसा मला पण खुप आवडतो.
24 Aug 2011 - 6:16 am | स्पंदना
सोप्प करुन सांगितलय. नुसत सारण तयार कराय्च अन रेडीमेड पेस्ट्री शीटस वापरायच्या ....डोकेबाज!
24 Aug 2011 - 7:44 am | रेवती
हा हा हा...
मृणालिनीने निदान त्रिकोणी आकार तरी दिलाय.
काहीजणी चौकोनी/आयत ठेवतात असे पाहिल्या गेले आहे.
शेवटचा फोटू छान आलाय.
(आधीचा फोटूही आवडल्या गेला असता पण नेलपॉलिश एकतर काढून टाकायला हवे होते किंवा नीट लावायला हवे होते.;) )
24 Aug 2011 - 9:05 am | पल्लवी
>> (आधीचा फोटूही आवडल्या गेला असता पण नेलपॉलिश एकतर काढून टाकायला हवे होते किंवा नीट लावायला हवे होते. ;) )
रेवती ताई/काकू/आजी ( as applicable :P ) , धन्य आहेस तू ! :D
मी हे लिहावं की नको ह्या विचारातच होते, तर तू ऑलरेडी बोलून मोकळी !
24 Aug 2011 - 9:10 pm | रेवती
अगं आमी शिनियर शिट्टीझन आहोत.
यशोदाआजीच्या नातीनं असंच काहीतरी रंगवलं होतं आणि त्यावर वेलबुट्टीही काढली होती.
म्हटलं काय गं हे? तर कायसं बोल्ली ती. नंतर सैपाकघरात जावून आयशीला सांगून आली तर सूनबाई म्हंटात कश्या,"म्हातारीला या वयात काय करैच्यात चवकश्या?"
24 Aug 2011 - 10:32 pm | दिपाली पाटिल
ती इथली फॅशन हो आज्जी... एका मुलीने तिच्या नखांवर कलिंगडाच्या फोडीची आणि भारताच्या झेंड्याची डिझाइन काढली होती. मला ते एकदम भारी वाटलं होतं...
25 Aug 2011 - 1:03 am | रेवती
काय तरी फ्याशनी ह्या!
आमच्यावेळी फारतर मेंदी असायची......बाकी काही नाही.
25 Aug 2011 - 2:46 pm | असुर
मृणालमावशी रॉक्स, पण सामोसे खायला बोलावला नाय हां तू मावशी... ए ना चॉलबे!!! इन्विटेसन पायजेल..
आणि अॅज युजुअल, रेवतीआजी रॉक्स!! :-)
आजी, सामोसे बनवणार आहेस का तू?? अशेल तल मी पन खानाल!!!
--असुर
25 Aug 2011 - 3:23 pm | Mrunalini
धन्स.. आणि इन्विटेसन तर काही गरज नाही.. तुम्ही कधीही येउ शकता. फक्त इथे यावे लागेल. ;)
25 Aug 2011 - 7:59 pm | रेवती
तशी तुला ल्हानपणापास्नं जरा खा खा जास्तच आहे....पण मला त्याचंही कवतिक आहे रे असुरा!
ये हो कधीही! सामोशे तर सामोशे, शिकीन हो तुझ्यासाठी.
25 Aug 2011 - 4:13 pm | पल्लवी
तू कशाला उगा त्रागा करुन घेतेस ह्या वयात. मस्त समोर आलेले समोसे कुस्करुन खायचे अन गप पडुन राहयचे.
पैजेतर तू पण लावून बघ नेलपेंट. म्हण्जे मग सून्-नात खुश आणि लगेहात आजोबापण खुश !
24 Aug 2011 - 9:37 am | प्यारे१
मला वाटलेलं समोश्याची पाककृती आहे आणि समोश्यावरच फोकस असायला हवा. :)
पण म्हणतात ना..... भरा. गा. जा. भरा. ( १ गुण प्रत्येकी)
24 Aug 2011 - 12:20 pm | पक्या
>>काहीजणी चौकोनी/आयत ठेवतात असे पाहिल्या गेले आहे.
ते म्हणजे पॅटिस. (असे पॅटिस पुण्यात ग्रीन बेकरी , हिंदुस्तान बेकरी वगैरे ठिकाणी नेहमीच खाल्ले आहेत. )
आणि हे वर केले आहेत ते ही पॅटिस सारखेच लागतील कारण पेस्ट्री शीट्स वापरले आहेत. आकार फक्त सामोशाचा दिला आहे. शिवाय कवर फ्लेकी झालेले दिसत आहे.
सामोसा म्हटले की मैद्याची पारी हवीच.
24 Aug 2011 - 7:38 pm | प्राजु
माझी कॉमेंट ढापलीस!
अगदी... ते पांढर्या रंगातील अक्षरांसकट. :)
24 Aug 2011 - 7:53 am | ५० फक्त
शेवटचा फोटो एकदम कातिल आहे, आणि माश्यासारखा दिसतय ते प्रेझेंटेशन, जाम भारी.
24 Aug 2011 - 9:03 am | पल्लवी
अंड्याच्या वापरामुळे चव छान येत असेल.
बघेन एकदा असं करुन.
24 Aug 2011 - 9:12 am | जाई.
baked समोसाने तों.पा.सु.
24 Aug 2011 - 9:57 am | गवि
बेक्ड ?
हं. कल्पना चांगली आहे.
चवीत किती घसरण होते तळलेल्यापेक्षा?
24 Aug 2011 - 10:20 am | इंटरनेटस्नेही
उत्तम पाकृ मृणालिनी ताई! टोण्डाला पाणी सुटले!
-
(एका बैठकीत किमान ५ समोसे हादडणारा) इंट्या.
25 Aug 2011 - 5:08 pm | अन्या दातार
आत्ता कळले तुला "बैठकी" का प्रिय असतात ते ;)
24 Aug 2011 - 10:25 am | उदय के'सागर
खल्लास!!!
खुपच टेम्पटींग!!!
24 Aug 2011 - 10:35 am | पिंगू
खल्लास...कालच समोसे हादडले. आता विचार करतोय की ऑफिसमधील ओव्हन ह्या कामासाठी कसा वापरता येईल... ;)
- (सर्व रिसोर्सेस कार्यक्षम पद्धतीने वापरणारा) पिंगू
24 Aug 2011 - 12:49 pm | परिकथेतील राजकुमार
तोबताबड सामोसा आणून खाल्या गेला आहे.
ख त्त र ना क फटू आणी पाकॄ आहे.
चला आता Frozen pastry sheets शोधणे आले.
बाकी फेटलेल्या अंड्याची पाकृ कोणी देऊ शकेल काय ?
24 Aug 2011 - 12:57 pm | इरसाल
सामोसे आवडले.
खासकरून जे लोक तेल कमी पिवू इच्छितात त्यांच्यासाठी मस्तच.
25 Aug 2011 - 2:17 pm | जासुश
पफ पेस्ट्री मला खुपच आवडते..[पण त्या बेक केल्या म्हणजे त्यात कॅलरीस नाहीत असे नाहीए. पेस्ट्री शीटस तर बटर मुळेच इतक्या फ्लफी होतात आणि प्रमाण पण थोडे थोडके नाही ४०० ग्रॅम्स मैद्या साठी १०० ग्रॅम बटर. त्यामुळे तेल नाही पण बटर जाणार पोटात.] वरील फोटू आणि पाककृती दोन्ही छान. टेस्को मधे बटर च्या शेजारीच ह्या फ्रोज़न पेस्ट्री शीट ठेवलेल्या असतात
24 Aug 2011 - 12:57 pm | इरसाल
सामोसे आवडले.
खासकरून जे लोक तेल कमी पिवू इच्छितात त्यांच्यासाठी मस्तच.
24 Aug 2011 - 1:26 pm | गणपा
समोसा असला तर मग तो अस्सल पंजाबी सारणाचा आणि मैद्याच्या, पारीतला तळलेलाच हवा.
पण तरी शेवटचा फोटो पाहुन त्यातला एक उचलण्याचा मोह अनावर झालाय.
24 Aug 2011 - 2:15 pm | Mrunalini
धन्यवाद.. सगळ्यांना.
हे तर खर आहे की, समोसा म्हटला कि तो मैद्याच्या पारीत केलेला आणि तळलेला हवा. पण, मी फक्त त्याला दुसरा काही option आहे का म्हणुन हा try केला. चव तर एकदम छान झाली होती, फक्त तो normal समोस्या सारखा कडक नाही होत. आज अजुन एक वेगळा प्रयोग करुन बघणार आहे. त्याने जर समोसे कडक झाले, तर मग ती पाकृ टाकेल.
24 Aug 2011 - 9:19 pm | निवेदिता-ताई
मस्त ग
24 Aug 2011 - 9:20 pm | रेवती
काय?
24 Aug 2011 - 9:22 pm | निवेदिता-ताई
Frozen pastry sheets - आमच्या इथे मिळणे अवघड आहे,
मग काय करावे????
24 Aug 2011 - 10:35 pm | दिपाली पाटिल
निवेदिता-ताई, संजय थुम्माची रेसिपी आहे की पेस्ट्री शीट्स ची...
25 Aug 2011 - 2:45 pm | daredevils99
ही पाकृ तळून कशी करता येईल?
25 Aug 2011 - 3:00 pm | मुलूखावेगळी
त्यात काय
वरीलपमाणे स्टेप ११ पर्यंत करा.
मग १२.गॅस सुरु करा,
१३.त्यावर कढई ठेवा.
१४.त्यात तेल ओता. (किती ते तुम्ही ठरवा)
१५.आता कढईत बोट घालुन बघा तेल तापलेय का बघा. (बोट लाल झाले कि तेल तापलेय असे समजावे )
१६.आता ते समोसे कढईत तळुन खा (गार्/गरम) :)
हाकानाका
25 Aug 2011 - 3:18 pm | Mrunalini
हा हा हा....
(आता कढईत बोट घालुन बघा तेल तापलेय का बघा. (बोट लाल झाले कि तेल तापलेय असे समजावे ))
:D
27 Aug 2011 - 9:06 am | ५० फक्त
''मग १२.गॅस सुरु करा,''
एका गॅसनं होणार नाही का ?, हल्ली गॅस फार महाग झालाय ओ, आणि दहा -वीस समोस्याला १२ गॅस कुठं पेटवणार ओ.
27 Aug 2011 - 9:12 am | daredevils99
तुम॑च्या मुलखात एका गॅसवर भागत असेल पण "वेगळ्या मुलखात" १२ गॅस लागतात.
25 Aug 2011 - 3:21 pm | Mrunalini
जर तळुन करायची असेल, तर मग नेहमी प्रमाणे समोस्याच्या पारीचे पिठ मळुन त्याचे समोसे बनवुन deep fry करा.
27 Aug 2011 - 10:10 am | दिपाली पाटिल
बापरे... पफ पेस्ट्री ती पण तळून... अख्ख्या आयुष्यभराचं कोलेस्टेरॉल एका दिवसातच वाढायचं...
16 Sep 2011 - 6:33 pm | अविनाशकुलकर्णी
Frozen pastry sheets - १ पॅकेट
पुण्यात Frozen pastry sheets - कुठे मिळतात हे कळेल का??/
9 Feb 2012 - 5:04 am | चित्रादेव
ह्यालाच जर इटालियन नाव दिले असते तर टीरपी वेगळा असता... ;) देशी मिश्रण परदेशी आवरण..
प्रतीक्रिया वेगळ्या असत्या.. तुम्ही केकता कपूरला भेटा ती सांगेल टीरपी कसा वाढवायचा.
बाकी फोटो ला. गा. आहे. :)