मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Baked समोसा

Mrunalini · · पाककृती
साहित्यः Frozen pastry sheets - १ पॅकेट बटाटे - ३-४ उकडुन मटार - १/२ कप जिरे - १/२चमचा हिरवी मिरची - १ बारीक चिरुन हळद - १ चमचा लाल तिखट - १ चमचा गरम मसाला - १/२ चमचा आमचुर पावडर - २ चमचे धने - १ चमचा बडिशेप - १/२ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर - २ चमचे अंडे - १ ओवा - १ चमचा बटर - १ चमचा मिठ चवीनुसार कृती: १. बटाटे उकडुन घेउन हाताने mash करावेत. २. Pastry sheets ह्या frozen असल्यामुळे, समोसे करण्याच्या १/२ तास आधी फ्रिजबाहेर काढुन ठेवावेत. ३. कढई गरम करुन त्यात आधी आख्खे धने व बडिशेप भाजुन घ्यावी. ह्याची खरबरीत अशी पुड करुन घ्यावी. ४. कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जिरे व बरीक चिरलेली मिरची टाकुन परतावे. त्यात मटार टाकावेत. ५. मटार परतुन झाल्यावर त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, १/२ चमचा ओवा व धने बडिशेपची पुड टाकावी. त्यात mash केलेला बटाटा टाकुन निट mix करुन घ्यावे. ६. हे मिश्रण mix झाल्यावर त्यात आमचुर पावडर, चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मिठ टाकुन २ मिनिटे झाकुन ठेवावे. समोस्याचे सारण तयार झाले. ७. Pastry sheets ह्या आता normal temp ला आल्यावर त्याची पुरी पेक्षा थोडी मोठी पोळी लाटुन घ्यावी. ८. ह्या पोळीचे, मधे कापुन २ अर्धगोल करुन घ्यावेत. ९. त्यातील एका भागाचा कोन करुन घ्यावा. ह्या कोनच्या कडा चिकटण्यासाठी मी फेटलेले अंडे वापरले. पण तुम्ही त्या जागी पाणी किंवा दुध वापरु शकता. Image removed. १०. ह्या कोन मधे वरील सारण भरुन कडा अंड्याचा वापर करुन बंद कराव्यात. ११. अशाप्रकारे सगळे समोसे करुन घ्यावेत. Image removed. १२. Oven २०० temp ला preheat करुन घ्यावा. १३. बेकिंग ट्रे ला बटर लावावे. त्यावर सगळे सामोसे ठेवावेत. १४. ह्या समोस्यांना ब्रशने वरतुन फेटलेले अंडे लावावे. (अंडे वापरायचे नसल्यास दुध लावु शकता) वरतुन थोडा ओवा टाकावा. १५. बेकिंग ट्रे Oven मधे ठेवावा. १० मिनिटात सामोसे वरतुन brown रंगाचे होतील. तेव्हा ट्रे बाहेर काढावा. १६. गरम गरम सामोसे खायला तयार आहेत. ह्या बरोबर चिंच-खजुराची चटणी किंवा टोमॅटो सॉस मस्त लागतो. Image removed.

वाचन 11911 प्रतिक्रिया 45