(थंड झाले खाकरे गं)
लेखनविषय:
काव्यरस
बरेच दिवस खुणावणारी वाचनखूण आज काढता येईल. हुश्श.
थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर
विसर तो स्वयपाक सारा, गटकूनिया साफ कर
वेड लागे मम खिशाला विकतचेही खायला
वेड लावे याद मजला, या समोसा खायला
यायचे ते का न मजला, अरण्यरूदन बास कर
थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर
भाजण्याही भाकर्या मम दादला आला पुढे
फोडण्या या चढविता का ओगराळी खडखडे?
ना कुणी तुझ भरवण्याला तू अपेक्षा लाख कर
थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर
काय जळले, का करपले, शोधिता इथल्या खुणा
मी नि माझीच पाककॄती बाकी कुणी काही म्हणा
वाट लावू पूर्णब्रह्मी "खाद्यरसिका तूच मर!"
थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर
दोष कोणा काय देऊ अन्नपूर्णे, सांग ना
'पाकी' जे कौशल्य नाही हा कसा ठरला गुन्हा
चाड ना मेहेनतीची, हेच आता मान्य कर
थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर
खाउनी मग तामसी होईल थोडी बोंबही
खर्चुनी नोटा जरा घेईन त्यावर दारूही
वेदना संवेदनांची आज काशी केली तर
थंड झाले खाकरे गं अन्नपूर्णे माफ कर
(हे पूर्ण करण्यात मदत करणार्या काही मित्रमैत्रीणींचा ऋणनिर्देश करणे अनावश्यक आहे.)
वाचने
8353
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
खीक
_/\_
रॅप सदरात हा काव्यप्रकार चांगला बसू शकतो
हेहेहेह्हे!
In reply to हेहेहेह्हे! by प्रियाली
असंच म्हणतो...
In reply to असंच म्हणतो... by राजेश घासकडवी
येणार येणार, कोणीतरी टाकेल,
In reply to असंच म्हणतो... by राजेश घासकडवी
हलकट्टपणेच घेतले
जमले नाही
In reply to जमले नाही by पंगा
आक्षेप मान्य आहे.
आत्तापर्यंत सर्वात आवडलेली
व्वा
शंका: खाकरे हा प्रकार थंडच
छाण...........
विडंबन
प्रकाटाआ
__/\__
अदिती, घासुगुर्जी, प्रियाली :
छान !
ह्हा ह्हा ह्हा....कडक...सिक्सर
अहा
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by परिकथेतील राजकुमार
दुरूस्ती
In reply to दुरूस्ती by रमताराम
चालू द्यात.
In reply to चालू द्यात. by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी?
In reply to ह्म्म्म by परिकथेतील राजकुमार
हे घे, एवढंच झालं मला!
खंगरी!!
अनेक प्रतिभावंतांच्या एकत्रित
In reply to अनेक प्रतिभावंतांच्या एकत्रित by चतुरंग
खाकरले
In reply to खाकरले by प्रियाली
खाक खाक!!
(No subject)
स्वतः केलेला
आपण वर्षातून एकदा का होईना