मासे २७) वडा

जागु's picture
जागु in पाककृती
5 Jun 2011 - 9:03 pm

लागणारे साहित्य:
वडा हा मासा ओळखायला एकदम सोप्पा. जास्त करुन हा मासा खाडीच्या भागात मिळतो. पापलेट्-हलव्याचा आकार लाभलेला पण अंगावर काळे ठिपके असलेला मासा म्हणजे वडा.

नेहमीप्रमाणेच वड्याच्या तुकड्या करुन घ्या. कालवण आणि फ्राय दोन्ही करायचे असल्यास डोके, शेपुट हा भाग कालवणासाठी घ्यावा व मधल्या तुकड्या तळण्यासाठी वापराव्यात.

बाकीचे नेहमीचेच साहित्य म्हणजे कालवणासाठी - '
हिंग, हळद, मसाला,
आले, लसुण, मिरची कोथिंबीर, ओल खोबर वाटण
चिंचेचा कोळ
मिठ,
ठेचलेल्या ५-६ लसुण पाकळ्या
तेल.

क्रमवार पाककृती:
कालवणः
भांड्यात तेल मस्त तापवा. त्यात सुर्रकन लसणाची घमघमीत फोडणी द्या. त्यावर पटापट हिंग, हळद मसाला टाका. लगेच वाटण, चिंचेचा कोळ व तुकड्या टाका, गरजेपुरते पाणी घाला, मिठ टाका. ५ ते ७ मिनिटे उकळवुन गॅस बंद करा झाले कालवण.

तळण्यासाठी
हिंग, हळद, मसाला, मिठ, तेल

कृती:

तुकड्यांना मिठ, मसाला, हिंग, हळद लावुन थोडा वेळ मुरवा.

तवा गरम करुन तेल सोडून त्यावर तुकड्या मस्त खरपुस शॅलो फ्राय करा. वास येतोय का ?

प्रतिक्रिया

गवि's picture

6 Jun 2011 - 10:42 am | गवि

वा.

हा ठिपकेदार मासा बघितल्यासारखा वाटतो. नाव आत्ताच कळले. वा. टेस्ट केला पाहिजे.

रस्सा आणि तुकडी दोन्हीचे तुकडे झक्कास दिसताहेत.

काटे कितपत?

स्वानंद's picture

6 Jun 2011 - 11:46 am | स्वानंद

कसा किलो असेल साधारणता हा वडा

गवि's picture

6 Jun 2011 - 11:51 am | गवि

हेच विचारणार होतो. पण मागच्यावेळी "माशांचे भाव" यावर चर्चा बरीच केली होती.

तस्मात यावेळी कोणीतरी इतर विचारेल याची वाट पहात होतो.

;)

स्वस्त असेल आणि तरीही पापलेटासारखा लागत असेल तर सोने पे सुहागा.

गगनविहारी ह्यात मधला काटाच असतो.

स्वानंद आमच्याइथे जोडी मिळते. हा खाडीतला मासा आहे त्यामुळे त्याला पापलेट एवढी किंमत नाही मोजावी लागत साधारन १०० रु.पर्यंत असते जोडी.

पापलेटपेक्षा वेगळा असतो चविला पण चविष्ट असतो.

अलख निरंजन's picture

7 Jun 2011 - 6:08 am | अलख निरंजन

अहो असले मासे काचेच्या पेटीत ठेवुन नुसते पाहायचे असतात हो.