मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मासे २७) वडा

जागु · · पाककृती
लागणारे साहित्य: वडा हा मासा ओळखायला एकदम सोप्पा. जास्त करुन हा मासा खाडीच्या भागात मिळतो. पापलेट्-हलव्याचा आकार लाभलेला पण अंगावर काळे ठिपके असलेला मासा म्हणजे वडा. Image removed. नेहमीप्रमाणेच वड्याच्या तुकड्या करुन घ्या. कालवण आणि फ्राय दोन्ही करायचे असल्यास डोके, शेपुट हा भाग कालवणासाठी घ्यावा व मधल्या तुकड्या तळण्यासाठी वापराव्यात. बाकीचे नेहमीचेच साहित्य म्हणजे कालवणासाठी - ' हिंग, हळद, मसाला, आले, लसुण, मिरची कोथिंबीर, ओल खोबर वाटण चिंचेचा कोळ मिठ, ठेचलेल्या ५-६ लसुण पाकळ्या तेल. क्रमवार पाककृती: कालवणः भांड्यात तेल मस्त तापवा. त्यात सुर्रकन लसणाची घमघमीत फोडणी द्या. त्यावर पटापट हिंग, हळद मसाला टाका. लगेच वाटण, चिंचेचा कोळ व तुकड्या टाका, गरजेपुरते पाणी घाला, मिठ टाका. ५ ते ७ मिनिटे उकळवुन गॅस बंद करा झाले कालवण. Image removed. तळण्यासाठी हिंग, हळद, मसाला, मिठ, तेल कृती: तुकड्यांना मिठ, मसाला, हिंग, हळद लावुन थोडा वेळ मुरवा. Image removed. तवा गरम करुन तेल सोडून त्यावर तुकड्या मस्त खरपुस शॅलो फ्राय करा. वास येतोय का ? Image removed.

वाचन 5597 प्रतिक्रिया 0