मासे २७) वडा
लागणारे साहित्य:
वडा हा मासा ओळखायला एकदम सोप्पा. जास्त करुन हा मासा खाडीच्या भागात मिळतो. पापलेट्-हलव्याचा आकार लाभलेला पण अंगावर काळे ठिपके असलेला मासा म्हणजे वडा.
नेहमीप्रमाणेच वड्याच्या तुकड्या करुन घ्या. कालवण आणि फ्राय दोन्ही करायचे असल्यास डोके, शेपुट हा भाग कालवणासाठी घ्यावा व मधल्या तुकड्या तळण्यासाठी वापराव्यात.
बाकीचे नेहमीचेच साहित्य म्हणजे कालवणासाठी - '
हिंग, हळद, मसाला,
आले, लसुण, मिरची कोथिंबीर, ओल खोबर वाटण
चिंचेचा कोळ
मिठ,
ठेचलेल्या ५-६ लसुण पाकळ्या
तेल.
क्रमवार पाककृती:
कालवणः
भांड्यात तेल मस्त तापवा. त्यात सुर्रकन लसणाची घमघमीत फोडणी द्या. त्यावर पटापट हिंग, हळद मसाला टाका. लगेच वाटण, चिंचेचा कोळ व तुकड्या टाका, गरजेपुरते पाणी घाला, मिठ टाका. ५ ते ७ मिनिटे उकळवुन गॅस बंद करा झाले कालवण.
तळण्यासाठी
हिंग, हळद, मसाला, मिठ, तेल
कृती:
तुकड्यांना मिठ, मसाला, हिंग, हळद लावुन थोडा वेळ मुरवा.
तवा गरम करुन तेल सोडून त्यावर तुकड्या मस्त खरपुस शॅलो फ्राय करा. वास येतोय का ?

वाचन
5597
प्रतिक्रिया
5