साहित्यः
ट्राउट फिश - १
तांदुळाचे पीठ - १/२ वाटी
आले-लसुण पेस्ट - १ चमचा
हिंग - १ चमचा
तिखट - २ चमचा
गरम मसाला - १ चमचा
हळद - १ चमचा
लिंबु - १
तेल तळण्यासाठी
मिठ चवीनुसार
कांदा, टोमॅटो, गाजर सजावटीसाठी
कृती:
१. ट्राउट मासा मधे कापुन, सर्व घाण काढुन स्वच्छ धुवुन घ्यावा. त्याला पाठिवर व पोटावर सुरीने काप मारावेत.
२. माश्याला १/२ लिंबु, मिठ व हिंग सर्व बाजुनी लावुन घ्यावा.
३. वाटी मधे आले लसुण पेस्ट, तिखट, गरम मसाला, १/२ लिंबु, हळद व मिठ मिक्स करुन मसाला तयार करावा.
४. हा मसाला माश्याला निट चोळुन घ्यावा व १० मिनिटे फ्रिजमधे ठेवुन द्यावा.
५. एका ताटली मधे तांदुळाचे पीठ घ्यावे. त्यात तिखट व मिठ टाकुन एकत्र करावे.
६. मासा फ्रिज मधुन बाहेर काढावा. हा मासा तांदुळाच्या पीठात घोळावा.
७. पॅन मधे तेल गरम करावे. त्यात हा मासा सोडुन shallow fry करावा.
८. ३ मिनिटांनी मासा पलटुन दुसर्या बाजुने fry करावा.
९. मासा दोन्ही बाजुनी fry झाल्यावर प्लेट मधे काढुन salad सोबत गरम गरम serve करावा.
प्रतिक्रिया
25 Apr 2011 - 7:38 pm | रेवती
फोटू छान दिसतोय.
पाकृही सोपी वाटतिये.
अवांतर: बरेच दिवसांनी आमची आठवण आल्याबद्दल धन्यवाद!
25 Apr 2011 - 7:40 pm | Mrunalini
हेलो रेवती,
आभारी आहे. अग महिनाभर भारतात गेले होते. त्यामुळे पाकृ टाकायला जमलेच नाही. आता परत सुरु.
;)
25 Apr 2011 - 7:59 pm | सानिकास्वप्निल
ये हुई ना बात, आता कसं खर्या अर्थाने मि.पा वर तुझे वेलकम :)
मी तुला आधीच सांगितलं ना मस्तच :)
25 Apr 2011 - 8:02 pm | Mrunalini
:)...
हो आता परत सुरवात.
25 Apr 2011 - 8:10 pm | टारझन
पाकृ अंमळ चेंगट दिसते .. :) तोंड आणि शेपुट सुद्धा वाया घालवलेलं नाही :)
आम्ही तोंड आणि शेपुट कापुन आणि अंडे घालुन ही पाकृ केली तर चालेल काय ? :)
- लिंबोर्गिनी
26 Apr 2011 - 1:06 am | Mrunalini
हो.. तुम्ही तोंड आणि शेपुट कापुन ही पाकृ करु शकता, पण अंडे टाकुन ते कसे होइल हे माहित नाही. :)
26 Apr 2011 - 1:31 am | पंगा
कोणाचे?
26 Apr 2011 - 1:34 am | पंगा
दोआकाटा.
25 Apr 2011 - 8:16 pm | सानिकास्वप्निल
ह्या टार्याला सगळ्या पा़कृमध्ये अंडे घालायचे असते
;)
25 Apr 2011 - 8:23 pm | गणपा
चविष्ट फोटो. :)
25 Apr 2011 - 11:46 pm | रामदास
छानच आहे.सजावट चांगली आहे. पण त्या तळलेल्या माशावर स्वतःचे नाव टाकणे अंमळ मजेदार वाटले. श्रेय प्राप्तीचा हा प्रकार पाहून अतीपूर्वेच्या एका लेखकांची आठवण येउन डोळे डबडबले.
26 Apr 2011 - 1:57 am | सुनील
गोड्या पाण्यातील माशांची फारशी आवड नाही (काही अपवाद वगळता) त्यामुळे आजवर ट्राऊट चाखलेला नाही. पण प्रयत्न करायला हरकत नाही असे फोटो बघून तरी वाटते आहे!
26 Apr 2011 - 3:37 am | Mrunalini
नक्की प्रयत्न करुन बघ.. खुप छान लागतो trout fish...
26 Apr 2011 - 3:38 am | Mrunalini
नक्की प्रयत्न करुन बघ.. खुप छान लागतो trout fish...
26 Apr 2011 - 2:08 am | अंतु बर्वा
फोटु खल्लास...!!!!
26 Apr 2011 - 3:59 am | Nile
फोटू छान आला आहे. पण एकादा माशाचा डोळा खाल्यानंतर (आधी कळलंच नाही) कसेसेच झालेले.. त्यामुळे मी ते सोडून इतर भाग घेईन. ;-)
26 Apr 2011 - 8:11 pm | प्राजु
छान!! करेन कि नाही माहिती नाही!
26 Apr 2011 - 9:21 pm | स्वाती२
मस्त!