ट्राउट फिश फ्राय (Trout fish fry)
साहित्यः
ट्राउट फिश - १
तांदुळाचे पीठ - १/२ वाटी
आले-लसुण पेस्ट - १ चमचा
हिंग - १ चमचा
तिखट - २ चमचा
गरम मसाला - १ चमचा
हळद - १ चमचा
लिंबु - १
तेल तळण्यासाठी
मिठ चवीनुसार
कांदा, टोमॅटो, गाजर सजावटीसाठी
कृती:
१. ट्राउट मासा मधे कापुन, सर्व घाण काढुन स्वच्छ धुवुन घ्यावा. त्याला पाठिवर व पोटावर सुरीने काप मारावेत.
२. माश्याला १/२ लिंबु, मिठ व हिंग सर्व बाजुनी लावुन घ्यावा.
३. वाटी मधे आले लसुण पेस्ट, तिखट, गरम मसाला, १/२ लिंबु, हळद व मिठ मिक्स करुन मसाला तयार करावा.
४. हा मसाला माश्याला निट चोळुन घ्यावा व १० मिनिटे फ्रिजमधे ठेवुन द्यावा.
५. एका ताटली मधे तांदुळाचे पीठ घ्यावे. त्यात तिखट व मिठ टाकुन एकत्र करावे.
६. मासा फ्रिज मधुन बाहेर काढावा. हा मासा तांदुळाच्या पीठात घोळावा.
७. पॅन मधे तेल गरम करावे. त्यात हा मासा सोडुन shallow fry करावा.
८. ३ मिनिटांनी मासा पलटुन दुसर्या बाजुने fry करावा.
९. मासा दोन्ही बाजुनी fry झाल्यावर प्लेट मधे काढुन salad सोबत गरम गरम serve करावा.


वाचने
8566
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
फोटू छान दिसतोय. पाकृही सोपी
In reply to फोटू छान दिसतोय. पाकृही सोपी by रेवती
हेलो रेवती, आभारी आहे. अग
अहा!!
In reply to अहा!! by सानिकास्वप्निल
... हो आता परत सुरवात.
|| श्री लाळेश्वर प्रसन्न ||
In reply to || श्री लाळेश्वर प्रसन्न || by टारझन
हो.. तुम्ही तोंड आणि शेपुट
In reply to हो.. तुम्ही तोंड आणि शेपुट by Mrunalini
शंका
In reply to हो.. तुम्ही तोंड आणि शेपुट by Mrunalini
प्रकाटाआ
ह्या टार्याला सगळ्यात
चविष्ट फोटो.
पाकृ
प्रयत्न
In reply to प्रयत्न by सुनील
नक्की प्रयत्न करुन बघ.. खुप
In reply to प्रयत्न by सुनील
नक्की प्रयत्न करुन बघ.. खुप
फोटु खल्लास...!!!!
फोटू छान आला आहे. पण एकादा
छान!! करेन कि नाही माहिती
मस्त!