महालक्ष्मी च्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी

अजातशत्रु's picture
अजातशत्रु in काथ्याकूट
15 Apr 2011 - 8:57 pm
गाभा: 

मानवमुक्तीचा लढा अधिक गतिमान करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापुरातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात स्त्रीमुक्तीच्या लढय़ाचे पहिले पाऊल पडले.

वस्तुत: याचे रनशिन्ग म.न,से. आमदार श्री.राम कदम यानी फुन्कले होते,
पण इथेही भा.ज .पा. ने राजकरण करत भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करून देवीच्या पहिल्या गाभाऱ्यात प्रवेश केला
कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते.
मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी हि गेली अनेक वर्षे चालु आहे,
अपवाद फक्त राज घराण्यातिल/ आणि Celebrity स्त्रिया

मुळात मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी का?
याचे समाधानकारक उत्तर तेथिल ब्राम्हण पुजारि का देउ शकत नाहित....

तथापि अलीकडच्या काळात हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि आज बुधवारी तर महिलांनी आंदोलन करीत सत्याग्रहाने एक नवे पाऊल पुढे टाकले.

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

15 Apr 2011 - 9:25 pm | राजेश घासकडवी

देवाच्या मंदिरात प्रवेशाबाबत कोणताही भेदभाव करणं हे देवाला लाजिरवाणंच आहे. त्यात देवीच्या दर्शनाला स्त्रियांना मागे ठेवणं हे आणखीनच विचित्र. ही प्रथा मोडून पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत याचा आनंद आहे. अशा चांगल्या गोष्टी करण्यात जर राजकारण्यांमध्ये चढाओढ झाली तर उत्तमच. मग ते राजकारण न रहाता लोककारण होईल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Apr 2011 - 11:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

देवीच्या मंदीराच्या गाभार्‍यात स्त्रियांनाच प्रवेश बंद ही बाब मला मजेशीर वाटली.

तिथे, गाभार्‍यासारख्या पवित्र ठिकाणी देवी तरी का चालते असा प्रश्न उभा रहातो. देवीची इतर मर्त्य स्त्रियांशी नकळत तुलना करण्याचं घोर पातक माझ्या हातून घडतं आहे याची जाणीव मनात ठेवावी लागते. एकदा देवत्व बहाल केलं की मग स्त्री आहे का पुरूष याचा विचार करावा का न करावा? म्हणजे पुरूषांच्या राज्यात, जिथे स्त्रियांसाठी ३३%, ५०% असं आरक्षण ठेवावं लागतं, बालकांच्या तुलनेत बालिकांच्या घटत्या प्रमाणाची चिंता करावी लागते, तिथे देवत्व बहाल केलेल्या "व्यक्ती"चं लिंग तपासावं का? देवत्वामुळे ही सवलत मिळाली तर मग भक्ताच्या बाबतीत हाच न्याय लावावा का? अर्थात पुन्हा एकदा देवाची मर्त्य माणसांशी तुलना करण्याचं पातक घडत आहे. जिथे गुन्हेगार असला तरीही पुरूष आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला प्रवेश आहे तिथे कितीही पापभीरू असली तरी स्त्री आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला प्रवेश मिळणं कितपत न्याय्य आहे? देवावर विश्वास ठेवणार्‍यांना, गाभार्‍याची पवित्रता मानणार्‍यांना याचा विचार करावासा वाटत नाही का? महागड्या, श्रीमंती रेस्तराँ, क्लब्जमधे, इंग्रजांच्या काळात "भारतीय आणि कुत्र्यांना प्रवेश नाही" अशा पाट्या दिसायच्या, आजच्या काळात ड्रेसकोड असतो याची आठवण झाल्याशिवाय रहावत नाही. निदान या ठिकाणी मंदीर, गाभारा अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे पावित्र्य, शुचिता असे बोजड शब्द वापरून "अध्यात्मिक" उच्चपणाचा बेगडी अभिमान नसतो.

अर्थात हे असं काही बोललं तर आपण विचारवंत आणि हिंदूद्वेष्टे ठरण्याची भीती असते. पण सामान्यतः सगळीकडे असतो तशा सुजाण/अजाणांचं मिश्रण असणार्‍या, समाजात झुंडशाही, दडपशाही, बहुमत इत्यादींना 'घाबरून' आपण आपले विचार मांडायचेच नाहीत का? का "आपल्याला काय फरक पडतो" असा बुरखा पांघरायचा? का उगाच चारचौघं म्हणतात तसंच आपणही म्हणायचं?

गणपा's picture

16 Apr 2011 - 12:27 am | गणपा

अदितीशी सहमत.
देवीच्या देवळात बायकांनाच बंदी ही जाचक अट राहीलीच कशी इतकी वर्षे याचं आश्चर्य वाटतय.

पंगा's picture

16 Apr 2011 - 3:14 am | पंगा

देवीच्या मंदीराच्या गाभार्‍यात स्त्रियांनाच प्रवेश बंद ही बाब मला मजेशीर वाटली.

+१.

दुसरा असाच प्रकार म्हणजे मंदिरात बायकांच्या आणि पुरुषांच्या वेगळ्या रांगा / वेगळ्या बसायच्या जागा. (स्वामिनारायण मंदिरात हा प्रकार पाहिलेला आहे.) बरे, हे सेपरेशन इतके, की एकत्र आलेल्या कुटुंबातील स्त्रीने वेगळे बसायचे आणि पुरुषाने वेगळे बसायचे इतकेच नव्हे, तर लहान मुलाने आईबरोबर किंवा लहान मुलीने बापाबरोबर बसायचे नाही, बसल्यास त्याबद्दलही नम्र विनंती-कम-आक्षेपवजा सूचना दिली गेलेली अनुभवलेली आहे. (एकटा/टी पालक विरुद्धलिंगी अर्भकास घेऊन आल्यास काय करत असतील, तेच जाणोत.) बरे, 'याचे कारण काय' असे मंदिरास भेट देणार्‍या कोण्या अभारतवंशीयाने एकदा विचारले, तर तिला चक्क 'तुमच्या सुविधेकरिता' असे उत्तर दिले गेलेले ऐकलेले आहे.

हा प्रकार काही कळलेला नाही.

विंजिनेर's picture

16 Apr 2011 - 6:19 am | विंजिनेर

दुसरा असाच प्रकार म्हणजे मंदिरात बायकांच्या आणि पुरुषांच्या वेगळ्या रांगा / वेगळ्या बसायच्या जागा.

या नियमाचा गाभार्‍यातील देवाशी संबंध नसतो तर ही सोय(!) रांग आणि गर्दीच्या ठिकाणी स्त्रियांना होणारे किळसवाणे स्पर्श टाळण्यासाठी असतो :) त्यामुळे वेगळ्या रांगा योग्यच आहेत.

पंगा's picture

17 Apr 2011 - 1:03 am | पंगा

एखादा लहान मुलगा आपल्या स्वतःच्या आईला किंवा एखादी लहान मुलगी आपल्या स्वतःच्या बापाला किळसवाणा स्पर्श करू शकते? तेही 'आपल्या संस्कृती'त?

गर्दीच्या ठिकाणी स्त्रियांना होणारे किळसवाणे स्पर्श टाकण्यासाठी वेगळ्या रांगांचे प्रयोजन अर्थातच समजू शकतो. मात्र देवळाच्या मुख्य खोलीत गाभारा वगळता जी सभागृहासारखी वापरता येण्याजोगी जागा असते, जिथे सणासुदीच्या दिवशी जमलेले दर्शनेच्छू बसू शकतात, क्वचित धार्मिक कार्यक्रम किंवा भजने किंवा तत्सम काही होऊ शकते, अशा ठिकाणी पुरुषांकरिता आणि स्त्रियांकरिता बसण्याकरिता वेगवेगळ्या जागा असता (हेही समजू शकलो नाही तरी एक वेळ दुर्लक्ष करू शकतो), तेथे एखादा लहान मुलगा (घटनासमयी वय वर्षे अंदाजे तीन ते चार) आपल्या आईबरोबर स्त्रियांच्या जागेत बसला असता त्याबद्दलही 'नम्र सूचना' मिळण्याचा स्वानुभव आहे.

अर्थात, हा असा अनुभव सार्वत्रिक नाही हेही नमूद करतो. कदाचित हे विशिष्ट मंदिर ज्या समाजाचे किंवा पंथाचे आहे (स्वामिनारायण मंदिर) त्यातील रूढी याला कारणीभूत असू शकतील. आणि त्या समाजाच्या किंवा पंथाच्या रूढी काय असाव्यात हे मी ठरवू शकत नाही - त्या समाजाचा किंवा पंथाचा घटक असल्याखेरीज तो अधिकार मला आहे असे वाटत नाही. त्या मंदिरात गेलेच पाहिजे असे माझ्यावर कोणते बंधनही नाही, आणि माझी इच्छा नसल्यास तेथे जाणे मी टाळूही शकतो. (मंदिराशी संलग्न असलेल्या दुकानात चांगल्या प्रतीच्या मिठाया आणि फरसाण विकत मिळते, आणि निदान या कारणासाठी तरी अधूनमधून तेथे जावेसे वाटते.)

मात्र, इतक्या टोकाचा भेदभाव (जेणेकरून एखादे बालक आपल्या विरुद्धलिंगी पालकाबरोबर विरुद्धलिंगी लोकांकरिता आयोजित केलेल्या जागेत बसू शकत नाही) का केला जात असावा, याबद्दल कुतूहल वाटते, आणि ते काही केल्या मरत नाही.

दुसरी एक गोष्ट मला कळलेली नाही. वर उल्लेख केलेले मंदिर हे अमेरिकेत आहे. गर्दीतले स्त्रियांना होणारे घाणेरडे स्पर्श टाळण्यासाठी महिलांच्या वेगळ्या रांगांचे प्रयोजन जरी मान्य केले, तरी मग अमेरिकेत इतक्या वेगवेगळ्या धर्मांची वेगवेगळी धर्मस्थळे आहेत, तेथे अशा वेगळ्या रांगा करण्याची गरज भासताना का दिसत नाही? गर्दीत महिलांना किळसवाणे स्पर्श ही भारतीय उपखंडातून आलेल्या - आणि त्यातही विशेष करून हिंदू - पुरुषांची खासियत आहे काय? हेही काही केल्या मनाला पटत नाही.

पुष्करिणी's picture

17 Apr 2011 - 1:48 am | पुष्करिणी

इथल्या स्वामीनारायण मंदीरात अस नेहमीच बघीतलं आहे, एकदोनवेळेस तिथल्या लोकांकडून चारचौघांसमोर संस्कृती आणि धर्म यावर लेक्चर्सचा प्रसादही मिळाला आहे. मला हे मंदीर अतिशय आवडतं पण असे उपदेश ऐकायला नको वाटतं. गांधीनगरचं स्वामीनारायण मंदीर त्यामानानं बरच पुढारलेलं आहे.

अजून एक मंदीर मी अलीकडेच पाहिलं, राधा-कृष्णाचं. मंदीरात प्रवेश केल्यावर २ वेगवेगळे हॉल..आत अगदी सगळं सेम टू सेम देवाच्या मूर्तीसुद्धा दोन्हीकडे वेगळ्या. मी इकडे बायकांच्या हॉलमधे कॄष्णाची मूर्ती कशी चालते असं विचारणार होते पण बरोबर असणार्‍या इतरांनी गप्प केलं !

आमच्या इथल्या स्वामिनारायण मंदिरातही स्त्री आणि पुरुषांना वेगळाल्या जागा आहेत. दोन दरवाजे वगैरे. आरती झाल्यावर सगळ्या महिला साधा नमस्कार करतात तर पुरुष मंडळी अनेकवेळा साष्टांग नमस्कार करतात.
हे असावे की नसावे यापेक्षा सोय अशी होते की गुढग्याचे त्रास असलेल्या ज्येष्ठ महिला, गरोदर महिला इ. ना खुर्च्या पुरत नसल्या तर त्या खाली बसतात व थोड्यावेळाने पाय परसता येतात. पाठीचे त्रास असणार्‍यांसाठी वेगळी आसने आहेत. आजूबाजूला कोणी पुरुष असतील तर त्यांना संकोच वाटेल हे नक्की. मंदीरात हे आरक्षण असू नये. त्यासाठी वेगळ्याल्या जागा असल्या तरी एकत्र बसणार्‍या कुटुंबासाठीही सोय असावी. अर्थात मी काही मंदीरात नेहमी जात नाही. एवढ्यात तीनवेळा जायचा योग आला म्हणून हे पाहण्यात आले.
देवळात येणारे लोक घाणेरडे स्पर्श करायला कश्याला लाजतील (जे तसलेच आहेत त्यांच्याबद्दल म्हणतीये मी). तिथल्या चपला चोरी करणारेही आहेत तसे पाकिटमारही आहेतच की!

शाहरुख's picture

15 Apr 2011 - 9:44 pm | शाहरुख

मुख्य गाभार्‍यातील तेज महिलांना सहन न होऊन त्यांना ओटीपोटीचे त्रास होऊ शकतात असे टीव्हीवरील कुठल्यातरी चर्चेत सनातन प्रभातचा एक माणूस सांगत होता :)

कदाचित राजघराण्यातील आणि सेलिब्रिटी बायका पावरबाज असाव्यात.

बाकी विषय एन्कॅश करायची राजकारणी पक्षांची धडपड पाहून मौज वाटली.

नगरीनिरंजन's picture

15 Apr 2011 - 9:52 pm | नगरीनिरंजन

म्हंजे? झाल्या का बाया मुक्त?

आत्मशून्य's picture

15 Apr 2011 - 10:13 pm | आत्मशून्य

जर काहीही कारण नसताना महालक्ष्मीच्या मंदीरात स्त्रीयांना प्रवेश मीळत नव्हता हे सत्य असेल तर या पेक्षा मोठा जोक फक्त मीपा वरतीच घडेल.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

15 Apr 2011 - 10:47 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

काहिहि असेल तरि धार्मिक बाबतीत उगाच अकारण हस्तक्षेप करण्यात काहिहि तथ्य नाही.
उगाच नको तिथे पुरोगामी पणाचं अवसान कशाला आणायचं?

राजेश घासकडवी's picture

15 Apr 2011 - 11:23 pm | राजेश घासकडवी

काहिहि असेल तरि धार्मिक बाबतीत उगाच अकारण हस्तक्षेप करण्यात काहिहि तथ्य नाही.

खरं तर धर्मच मानवी समानतेच्या बाबतीत उगाच अकारण हस्तक्षेप करत असतो. तो नको तिथे घातलेला हात बाजूला ढकलून देणं हेच चालू आहे. फुले, कर्वे, आंबेडकर यांनी ते केलं. आजच्या काळात पुढचं पाऊल न टाकता स्वस्थ राहिलो तर त्यांचे कष्ट वाया नाही का जाणार?

उगाच नको तिथे पुरोगामी पणाचं अवसान कशाला आणायचं?

निरर्थक प्रथा पाळून उगाच धार्मिकपणाचं अवसान आणण्यात तरी काय तथ्य आहे?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Apr 2011 - 11:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुळात अनेक धार्मिक प्रथांमधेच तथ्य आहे का नाही याची शहानिशा करायची वेळ पुन्हा एकदा* आली आहे काय?

* उदा: आद्य शंकराचार्यांनी ब्राह्मणांना शाकाहारी 'बनवलं', ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधलं तत्वज्ञान मराठीत, सामान्यांच्या भाषेत आणलं, इ.

राजेश घासकडवी's picture

16 Apr 2011 - 1:52 am | राजेश घासकडवी

प्रथाच का, मुळात धर्मामध्येच (कुठच्याही) काय तथ्य आहे? जगात इतकी दुःखं धर्मामुळे आलेली आहेत. मी तर म्हणतो धर्मांमधले सणवार, उत्सव वगैरे ठेवावे आणि बाकी सगळं सोडून द्यावं. कोणी स्वतःला हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम म्हणवू नये... आख्खं जग सुखी होईल.

सहमत. धर्म ही संकल्पना एक मूर्ख तर धार्मिक हे शतमूर्ख.

ह्या प्रतिसादात असभ्य काहीही नाही, धार्मिक संपादकांनी लगेच संधीचा फायदा ऊठवू नये!

पंगा's picture

16 Apr 2011 - 2:58 am | पंगा

कोणी स्वतःला हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम म्हणवू नये... आख्खं जग सुखी होईल.

:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Apr 2011 - 8:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सविस्तर प्रतिसादासाठी रूमाल टाकत आहे.

इंटरनेटस्नेही's picture

16 Apr 2011 - 10:14 am | इंटरनेटस्नेही

:)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Apr 2011 - 12:24 pm | परिकथेतील राजकुमार

बुच मारल्या गेले आहे.

बाकी

मुळात मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी का?
याचे समाधानकारक उत्तर तेथिल ब्राम्हण पुजारि का देउ शकत नाहित....

देवीच्या पुजार्‍यांमध्ये फक्त ब्राम्हणच आहेत? नक्कीच नाहीत :) मग ह्या वरच्या भिकारचोट वाक्याची सदर लेखनात काय गरज होती? विषय काय आहे आणि नक्की चर्चा कशावर घडवुन आणायची इच्छा आहे ?

योगप्रभू's picture

16 Apr 2011 - 2:08 pm | योगप्रभू

जाणीवपूर्वक केलेला 'ब्राह्मण पुजारी' हा उल्लेख खटकला.
चर्चा करताना मिपाकर मित्र-मैत्रिणींचे प्रतिसाद भरकटत गेल्याचे जाणवले.

दूरचित्रवाणीवरील चर्चा मीही लक्षपूर्वक ऐकली. त्यात सहभागी झालेल्या पुजार्‍यांचे म्हणणे कुणीही नीटपणे ऐकून घेत नव्हते. स्त्रिया अपवित्र किंवा पुरुषांपेक्षा दुय्यम दर्जाच्या म्हणून त्यांना गाभार्‍यात प्रवेश देणारच नाही, अशी हट्टी भूमिका पुजार्‍यांनी घेतलेली नव्हती. ते एवढेच म्हणत होते, की अशी प्रथा अत्यंत जुनी आहे आणि आम्ही तिचे केवळ पालन करत आहोत. प्रथा बदलायची असेल तर देवस्थान समितीचे विश्वस्त, शंकराचार्यांसारखे संत-महंत, पुजार्‍यांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींनी एकाच व्यासपीठावर यावे आणि सामूहिक निर्णय घ्यावा, आम्ही त्याचे पालन करु. दुसरे म्हणजे याच विषयावरील याचिका न्यायालयात गेली दहा वर्षे प्रलंबित आहे. तिचा न्यायानुसार होणारा निर्णय आम्ही मान्य करु किंवा देवस्थान समिती ज्यांच्या अधिकारात येते त्या सरकारने तसा स्पष्ट आदेश द्यावा म्हणजे त्याची अंमलबजावणी करता येईल. पुजारी हे अंबाबाईचे सेवक (श्रीपूजक) असल्याने ते स्वतःच्या मनाने निर्णय घेऊ शकत नाहीत.

आता सरकार आदेश काढत नाही, न्यायालय निर्णय देत नाही, धर्मपंडित पुढे येत नाहीत तर मग चेंडू पुजार्‍यांच्या हद्दीत ढकलून सगळे खापर ब्राह्मणांवर फोडण्याचे काय कारण आहे? हे म्हणजे आपल्याला सार्वजनिक बागेत जाहीर कार्यक्रम करायचा आहे तर महापालिका आणि पोलिस खात्याची रीतसर परवानगी घेण्याऐवजी बागेच्या दारावरील रक्षकाला दमदाट्या करुन त्याच्या नावाने बोंब मारण्यासारखे आहे.

बरं घडलेल्या घटनांकडे आपण कसे बघितले पाहिजे. महिलांना गाभार्‍यात प्रवेश देण्याबद्दल जनतेच्या भावना तीव्र आहेत, हे लक्षात आल्यावर देवस्थान समिती, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची तातडीने बैठक होऊन प्रवेश खुला झाला. 'ब्राह्मण पुजार्‍यांनी' लगेच नव्या नियमाप्रमाणे अंमलबजावणी केली. याचे अभिनंदन आपण करणार आहोत, की नाही?

मी या ब्राह्मण पुजार्‍यांचे अभिनंदन एका वेगळ्या अर्थाने करतो. मंदिर प्रवेशाबाबत झालेल्या आंदोलनांचा इतिहास तपासला तर असे दिसून येते, की त्यावेळी ब्राह्मण समाजातही जी धार्मिक कट्टरता होती, तिचा आता मागमूसही राहिलेला नाही. पूर्वीच्या काळात काय काय प्रकार झाले आहेत त्याची माहिती घ्या. पंढरपुरात विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश खुला करावा म्हणून साने गुरुजींनी प्राण पणाला लावले होते. तिथे लोकशाही निर्णय घेतला गेल्यावर पंढरपुरातील सनातनी ब्राह्मणांचे पित्त खवळले. 'विठोबा बाटला' म्हणून अनेकजणांनी देवळात जाणे सोडले. याहीपेक्षा वाईट म्हणजे मंत्रशास्त्रात पारंगत काही विद्वानांनी मूर्तीतील दैवत्व काढून घेतले व ते पाण्यात उतरवून एका घरी 'घागर विठोबा'ची स्थापना केली. पुढे अनेक वर्षांनी या ब्राह्मणांना केलेल्याचा पश्चाताप झाला. नाशिकच्या काळाराम मंदिराच्या पुजार्‍यांनीही डॉ. आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहात अशीच हटवादी भूमिका घेतली होती, ती आयुष्यभर बदलली नाही. या पुजार्‍याच्या नातवाने (सध्याचे महंत) दोन वर्षांपूर्वी आजोबांच्या दुराग्रहाबद्दल माफी मागितली.

या तुलनेत कोल्हापूरचे आंदोलन झाल्यावर कुणाही पुजार्‍याने झारीतील शुक्राचार्याची भूमिका घेतली नाही. रीतसर सरकारी निर्णय होताच पुढच्याच दिवसापासून सर्व महिलांना सकाळच्या अभिषेकासाठी गाभार्‍यात प्रवेश खुला केला आहे. ही सकारात्मक आणि बदललेल्या मनोवृत्तीचे द्योतक नाही का? असे प्रश्न चर्चेला येतात तेव्हा आपण त्यातील चांगली बाजू बघण्यापेक्षा पुन्हापुन्हा पुरुषांनी स्त्रियांवर केलेला अन्याय, ब्राह्मण समाज कसा दोषी आहे, हेच मुद्दे का चघळत बसतो?

(अवांतर आणि विनोदी : रामकृष्ण मिशनच्या मंदिरांपैकी सारदामातांच्या मंदिरात फक्त स्त्रियांना पुढे प्रवेश देतात. तिथे पुरुषांनी मागे उभे राहायचे असते. याबद्दल पुरुष कुरकूर करत नाहीत. आम्ही गेलो असताना मला नम्रतेने मागे उभे राहायला सांगण्यात आले. मी पत्नीला चिमटा काढण्याच्या हेतूने म्हटले, 'बरंय बुवा. मजा आहे तुम्हा बायकांची. बघा सारदामातांना आपल्या मुलींचे जास्त कौतुक.' त्यावर शेजारच्या एका माणसाकडे निर्देश करत माझी पत्नी कानात कुजबुजली, 'ते बघ. या माणसाने देवळात येण्याआधी फूटपाथवर गुटखा थुंकला आणि त्याच तोंडाने मंदिरात आलाय. उग्र वासानेच मळमळतंय. असल्या लेकरांपेक्षा आईला प्रामाणिक लेकी कधीही चांगल्या.' :)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Apr 2011 - 2:27 pm | परिकथेतील राजकुमार

अतिशय संयमित व अभ्यासु प्रतिसाद.

धन्यवाद.

खरेतर वरती मी देखील थोडी असभ्य भाषा वापरणारच नव्हतो, मात्र मिपावर सध्या वारंवार जे द्वेष करणारे आणी भडक प्रतिसाद येत आहेत ते बघता राहावले नाही.

मूकवाचक's picture

18 Apr 2011 - 5:44 pm | मूकवाचक

अतिशय संयमित व अभ्यासु प्रतिसाद.

रेवती's picture

16 Apr 2011 - 7:41 pm | रेवती

प्रतिसाद आवडला.

सखी's picture

16 Apr 2011 - 9:09 pm | सखी

प्रतिसाद आवडला, अतिशय संयमित.

अप्पा जोगळेकर's picture

17 Apr 2011 - 3:16 pm | अप्पा जोगळेकर

एक नंबर प्रतिसाद आहे. सर्व ब्राम्हण पुजारी आणि प्रथा बदलण्यासाठी ज्यानी हातभार लावला त्या सर्वांचेच अभिनंदन.
पुरोगामी म्हणवणार्‍या अनेकांचे वरती जे प्रतिसाद वाचले त्यापेक्षा कित्येक पट चांगला प्रतिसाद आहे.

मृत्युन्जय's picture

18 Apr 2011 - 2:02 pm | मृत्युन्जय

अतिशय उत्कॄष्ट, अभ्यासू आणि उत्कट प्रतिसाद. अभिनंदन.

अप्पा जोगळेकर's picture

17 Apr 2011 - 3:08 pm | अप्पा जोगळेकर

कोणी स्वतःला हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम म्हणवू नये... आख्खं जग सुखी होईल.
अजबच प्रकार म्हणायाचा. स्त्री-पुरुष समानता यावी म्हणून पुरुषांनी स्वतःला पुरुष म्हणवून घेउ नये असंही उद्या कोणी म्हणेल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Apr 2011 - 3:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जिथे आवश्यकता नाही तिथे पुरूषांनी स्वतःला पुरूष म्हणवून घेण्याची (आणि स्त्रियांनी स्त्रिया म्हणवून घेण्याची) गरज नाही; उदा: एखाद्या देशाचे दुसर्‍या देशातले राजदूत. राजदूताचं काम आहे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं, सदर व्यक्ती स्त्री आहे वा पुरूष याने काही फरक पडू नये.

(धर्म असण्यानसण्याबद्दल वेळ मिळेल तसं लिहीण्याची इच्छा आहे. पण हा त्यासाठी टाकलेला रूमाल नव्हे!)

अप्पा जोगळेकर's picture

17 Apr 2011 - 3:46 pm | अप्पा जोगळेकर

उदा: एखाद्या देशाचे दुसर्‍या देशातले राजदूत. राजदूताचं काम आहे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं, सदर व्यक्ती स्त्री आहे वा पुरूष याने काही फरक पडू नये.
ठीक आहे. तर मग जिथे अनावश्यक आहे तिथे स्वतःला मी हिंदू धर्माचा आहे इत्यादीउल्लेख टाळावेत इतपत अपेक्षा ठेवणे रास्त आहे. त्याहीपुढे जाऊन धर्मच नष्ट करावेत किंवा कोणी स्वतःला हिंदू,ख्रिश्चन्,मुसलमान म्हणवून घेउ नये हा आततायीपणा नाही का ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Apr 2011 - 4:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

... कोणी स्वतःला हिंदू,ख्रिश्चन्,मुसलमान म्हणवून घेउ नये हा आततायीपणा नाही का ?

एका शब्दात उत्तर... नाही.
किंचित स्पष्टीकरणः हा आततायीपणा नाही असं मला वाटतं कारण स्त्री आणि पुरूष हा भेद नैसर्गिक आहे; धर्माधारित भेद अनैसर्गिक आहे.

अप्पा जोगळेकर's picture

18 Apr 2011 - 7:47 pm | अप्पा जोगळेकर

कारण स्त्री आणि पुरूष हा भेद नैसर्गिक आहे; धर्माधारित भेद अनैसर्गिक आहे.
ठीकाय. भारतीय-अभारतीय, महाराष्ट्रीय-अमहाराष्ट्रीय हे कन्सेप्ट्ससुद्धा मानवनिर्मित आहेत.
कदाचित तुमच्या हिशोबाने कोणी स्वतःला भारतीय्,महाराष्ट्रीय म्हणवून घेणे हासुद्धा अपराधच ठरेल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Apr 2011 - 9:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भारतीय-अभारतीय, महाराष्ट्रीय-अमहाराष्ट्रीय हे कन्सेप्ट्ससुद्धा मानवनिर्मित आहेत.

अर्थातच, या संकल्पना मानवनिर्मित आहेत.

कदाचित तुमच्या हिशोबाने कोणी स्वतःला भारतीय्,महाराष्ट्रीय म्हणवून घेणे हासुद्धा अपराधच ठरेल.

संदर्भ पाहून हे ठरवता येतं. पासपोर्ट पाहून किंवा एखादी व्यक्ती कोणती भाषा बोलते हे पाहून तिचं श्रेष्ठत्व-कनिष्ठत्व ठरवणं हे मला पटत नाही. पण विविध भाषा बोलणार्‍या किंवा वेगवेगळ्या देशांतल्या व्यक्तींशी बोलून मला बरंच काही नवं शिकता येतं, तेव्हा मला अभारतीय आणि/किंवा अमराठी मित्रमंडळ असण्याचा आनंद होतो.
भेदभाव करायचाच असेल तर तो कसाही करता येतो. अगदी मराठी लोकांमधेही पुणे-मुंबई भांडणं होऊ शकतात, मुंबई विरूद्ध ठाणे होऊ शकतात, ठाणे पूर्व विरूद्ध ठाणे पश्चिम, काय वाट्टेल ते! पण त्यातून काय मिळतं, काय चांगलं घडतं?

अमक्या देशाचे नागरीक असणं किंवा एक कोणतीतरी मातृभाषा असणं यात मला काही अभिमानाची गोष्ट वाटत नाही, ना शरमेची बाब वाटते. जसं व्यक्ती स्त्री किंवा पुरूष असते तसाच हा ही एक भाग.

अप्पा जोगळेकर's picture

19 Apr 2011 - 7:29 pm | अप्पा जोगळेकर

पासपोर्ट पाहून किंवा एखादी व्यक्ती कोणती भाषा बोलते हे पाहून तिचं श्रेष्ठत्व-कनिष्ठत्व ठरवणं हे मला पटत नाही.
तर मग ते चांगलंच आहे. हाच न्याय धार्मिक बाबतीत अनुसरणेसुद्धा शक्य आहे. आणि अनेक माणसे तशा व्यवस्थित पद्धतीने वागतदेखील असतात.

अमक्या देशाचे नागरीक असणं किंवा एक कोणतीतरी मातृभाषा असणं यात मला काही अभिमानाची गोष्ट वाटत नाही, ना शरमेची बाब वाटते.

ठीकाय चालू द्या तर मग.
भारताने विश्वचषक जिंकला, अभिनव बिंद्राने सुवर्णपदक मिळवले, भारताने एखादी अंतराळ मोहीम यशस्वी केली तर एक भारतीय म्हणून अभिमान वाटणे किंवा २-जी स्पेक्ट्रम सारखे घोटाळे बाहेर आल्यावर एक भारतीय म्हणून लाज वाटणे अशा भावनांचा अनुभव तुम्हाला नसेल कदाचित.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Apr 2011 - 11:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन वगैरे लेबलं अनावश्यक आहेत, भाषा २० मैलांवर बदलते तेव्हा संपूर्ण जगाची/देशाची भाषा एकसारखी असणं शक्य नाही.

भारताने विश्वचषक जिंकला, अभिनव बिंद्राने सुवर्णपदक मिळवले, भारताने एखादी अंतराळ मोहीम यशस्वी केली तर एक भारतीय म्हणून अभिमान वाटणे किंवा २-जी स्पेक्ट्रम सारखे घोटाळे बाहेर आल्यावर एक भारतीय म्हणून लाज वाटणे अशा भावनांचा अनुभव तुम्हाला नसेल कदाचित.

माझ्या व्यक्तीशः काय भावना आहेत त्याचा इथे काहीही संबंध नाही.
मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला समजलेलं नाही आणि ते समजावून देण्याइतका माझ्याकडे आत्ता वेळ नाही. कधी ना कधी जमेलच मला ते! विचार समजले तरी पटावेच असाही काही आग्रह नाही.

चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव, नील आर्मस्ट्राँग, याचं एक वाक्य मला आवडतं, "That's one small step for [a] man, one giant leap for mankind." त्याला तेव्हा आपण अमेरिकन आहोत, इंग्लिश भाषा बोलतो वगैरे वगैरे नाही आठवलं.

राजेश घासकडवी's picture

17 Apr 2011 - 8:48 pm | राजेश घासकडवी

'कोणी स्वतःला हिंदू,ख्रिश्चन्,मुसलमान म्हणवून घेउ नये' हे मी धर्मच नसावेत या अर्थाने म्हटलं होतं. धर्म ठेवावे, पण लपवावे या अर्थाने नाही. प्रश्न उल्लेखाचा नाही.

धर्मयुद्ध, धार्मिक दंगली, ज्यूंचं हत्याकांड, फाळणीच्या वेळी झालेली अपरिमित मनुष्यहानी... या सगळ्या गोष्टी धर्माधिष्ठित भेदभाव नसते तर कशा झाल्या असत्या?

अप्पा जोगळेकर's picture

18 Apr 2011 - 8:00 pm | अप्पा जोगळेकर

या सगळ्या गोष्टी धर्माधिष्ठित भेदभाव नसते तर कशा झाल्या असत्या?
धर्म ही एक मानवनिर्मित संज्ञा आहे आणि जवळपास सगळ्याच धर्मश्रद्धा हे मनाचे खेळ आहेत. त्यामुळे जर धर्मांचे अस्तित्व नसते तर दुसरी एखाद्या क्ष संज्ञा अस्तित्वात आली नसतीच हे कशावरुन. कुणास ठाउक, त्या क्ष संज्ञेचे धर्माधिष्ठित भेदभावांहूनही भयंकर परिणाम कदाचित घडले असते.
त्यामुळे जर धर्मच नसते तर अशा कल्पनाविलासाला काही अर्थ आहे काय ?
जे अनिष्ट धार्मिक प्रकार आहेत तेवढेच काय ते थांबवण्याचा प्रयत्न करणे हा व्यवहारी शहाणपणा आहे असे मानण्यास प्रत्यवाय नसावा.

राजेश घासकडवी's picture

18 Apr 2011 - 9:15 pm | राजेश घासकडवी

जर धर्मांचे अस्तित्व नसते तर दुसरी एखाद्या क्ष संज्ञा अस्तित्वात आली नसतीच हे कशावरुन. कुणास ठाउक, त्या क्ष संज्ञेचे धर्माधिष्ठित भेदभावांहूनही भयंकर परिणाम कदाचित घडले असते.

याला मी आत्याबाईची भलीमोठी दाढी म्हणेन :) हा तुमचा क्ष काय असेल, काही अंदाज? तुम्ही 'चांगलं व्हावं' या इच्छेला कल्पनाविलास म्हणताहात, उद्या तुम्ही ज्ञानेश्वरांनासुद्धा 'अंधार रहाणारच. हा गेला तर दुसरा येणार नाही कशावरून? तेव्हा दुरितांचे तिमिर जावो या कल्पनाविलासाला काय अर्थ आहे?' असं म्हणाल.

धर्मातल्या चांगल्या गोष्टी ठेवा (सणवार, उत्सव) हे मी आधीच म्हटलं होतं. पण त्यापलिकडे विश्वउत्पत्तीचं तत्त्वज्ञान, विचित्र कर्मकांडं, भेदभाव पाळण्याच्या पद्धती वगैरे सगळी अडगळ आहे. तसल्या अनिष्ट गोष्टी काढून टाकाव्यात असं तुम्हीसुद्धा म्हणता. मग नक्की या दोनमधलं काय आहे जे शिल्लक ठेवावं?

अप्पा जोगळेकर's picture

19 Apr 2011 - 7:51 pm | अप्पा जोगळेकर

याला मी आत्याबाईची भलीमोठी दाढी म्हणेन
तुम्ही एक चुकीचा हायपोथिसिस मांडलात. म्हणून तो खोडून काढण्यासाठी एका बरोबर हायपोथिसिसचाच आधार घ्यावा लागला. त्यामुळे या दाढी-मिशांचे पातक माझ्या माथी कशाला मारता?

अंधार रहाणारच. हा गेला तर दुसरा येणार नाही कशावरून
धर्म म्हणजे अंधार असे मी मानत नाही. त्यामुळे असा प्रश्न माझ्या डोक्यात येण्याची शक्यताच नाही.

पंगा's picture

20 Apr 2011 - 12:16 am | पंगा

धर्मयुद्ध, धार्मिक दंगली, ज्यूंचं हत्याकांड, फाळणीच्या वेळी झालेली अपरिमित मनुष्यहानी... या सगळ्या गोष्टी धर्माधिष्ठित भेदभाव नसते तर कशा झाल्या असत्या?

अधोरेखित बाब ही धर्माधिष्ठित भेदभावांमुळे घडली की वांशिक द्वेषामुळे (किंवा, यात धर्माधिष्ठित भेदभावांचा भाग असलाच, तर तो कितीश्या प्रमाणात) याबद्दल साशंक आहे.

बाकी चालू द्या.

(अवांतर: वेगवेगळे वंश असल्यामुळे वांशिक द्वेष निर्माण होतात. सबब, वंश त्याज्य आहेत, हे आर्ग्युमेंट कसे वाटते?

हा प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळे अप्रोच घेऊन यापूर्वी प्रयत्न झालेले आहेत. जसे, 'वेगवेगळे वंश असणे हे निश्चितपणे वाईट नाही, पण ते एकत्र आले की गडबडी सुरू होतात. सबब, वेगवेगळ्या वर्णांना वेगवेगळेच राहू द्या, आणि वेगवेगळे राहून आपला विकास साधू द्या' हा एक अप्रोच. या प्रेमाइसवर पूर्वी दक्षिण आफ्रिकेत आणि काही अंशी दक्षिण र्‍होडेशियात महान प्रयोग झाले. दुर्दैवाने पुढे त्यांचा पाठपुरावा होऊ शकला नाही.

'मुळात वेगवेगळे वंश असणे हीच समस्या आहे' हा अप्रोच घेऊन समस्येचे निर्मूलन करण्याकरिता १९४०च्या दशकाच्या आसपास जर्मनीत काही निर्णायक पावले उचलण्याचे प्रयत्न झाले. दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय विरोधामुळे (आणि काही अंशी अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे) त्या प्रयत्नांना यश आले नाही.)

अप्पा जोगळेकर's picture

19 Apr 2011 - 7:43 pm | अप्पा जोगळेकर

जगात इतकी दुःखं धर्मामुळे आलेली आहेत.
धर्मामुळे बरीचशी सुखं आणि आनंदसुद्धा जगामध्ये आलेला आहे. याचा पुरावा म्हणजे तुमचंच हे वाक्य.
मी तर म्हणतो धर्मांमधले सणवार, उत्सव वगैरे ठेवावे आणि बाकी सगळं सोडून द्याव

अप्पा जोगळेकर's picture

17 Apr 2011 - 3:03 pm | अप्पा जोगळेकर

काहिहि असेल तरि धार्मिक बाबतीत उगाच अकारण हस्तक्षेप करण्यात काहिहि तथ्य नाही.
आमच्या नात्यात एक अत्यंत आगाउ पुरोहित आहे. आम्ही पालीला त्याच्या घरी गेलो होतो. तेंव्हा त्यांच्या घरी मोलकरणीचे काम करण्यासाठी येणार्या बाईला त्याने सगळी माणसे बसली असताना उघडपणे दरडावून विचारले होते,''काय ग आज कितवा दिवस आहे ?"
तेंव्हा ती बाई घाबरत घाबरत म्हणाली,"तिसरा."
"ठीकाय. जा अमुक अमुक खोलीतून. इकडे तिकडे शिवलीस तर याद राख."

तो प्रकार बघून मला किळस आली. अशा प्रकारच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करु नये असे ज्यांचे मत असेल त्यांना काय बोलणार ?

इंटरनेटस्नेही's picture

17 Apr 2011 - 4:01 pm | इंटरनेटस्नेही

सदर पुरोहित केवळ आगवु नसुन हलकट देखील आहे, असे निरीक्षण नोंदवतो.

अप्पा जोगळेकर's picture

19 Apr 2011 - 7:56 pm | अप्पा जोगळेकर

सदर पुरोहित केवळ आगवु नसुन हलकट देखील आहे, असे निरीक्षण नोंदवतो.
अगदी अगदी. आणि दुसर्‍याच एका कारणामुळे त्याला घरी आलेला असताना दारातूनच हाडतुड करत हाकलून देण्याचा आसुरी आनंदसुद्धा मी अनुभवलेला आहे.

स्मिता.'s picture

19 Apr 2011 - 10:48 pm | स्मिता.

त्या पुरोहिताला हलकट म्हणण्यात काहिही वावगे नाही.

इंटरनेटस्नेहींच्या या प्रतिक्रियेला नकारत्मक मत मिळालेलं पाहून आश्चर्य वाटलं!

एका स्त्री च्या मंदीरात स्त्रीयांनाच बंदी ? कमालंच्चे .. मला हे आत्ता कळलं ..

दोन पावलं पुढे जाऊन मी तर म्हणेन .. कार्तिक स्वामी च्या मंदिरातही स्त्रीयांना प्रवेश द्या ;)

- टार्तिक स्वामी
सुंदर स्त्रियांचे आमच्या मठात स्वागत आहे.

>>दोन पावलं पुढे जाऊन मी तर म्हणेन .. कार्तिक स्वामी च्या मंदिरातही स्त्रीयांना प्रवेश द्या.
टारुभौशी अगदी सहमत. हे पाऊल राजकीय पक्ष कधी उचलतायत हे तो कार्तिक स्वामीच जाणे.
असो, महिलांना सरसकट प्रवेश नव्हता महालक्ष्मी मंदिरात हे मात्र खरं, त्यामुळे झालं हे योग्यच !!

अवांतर: महालक्ष्मीच्या देवळात नवविवाहित जोडपी (सपत्नीक) गाभार्‍यात गेल्याचे एक दोनदा पाहिलं आहे, गेल्याच वर्षीच्या भेटीत एका दोन महिन्याच्या मुलीला देवीच्या पायावर ठेवून सुखरुप तिच्या आईकडे सुपूर्द केल्याचंही पाह्यलंय.

सांजसखी's picture

15 Apr 2011 - 11:42 pm | सांजसखी

मी लहान असताना ऐकले होते कि एका पुजार्‍याकडे एक २ महिन्याची मुलगी देवीच्या पायावर ठेवायला दिली होती. तिथे स्त्रीयांना आत प्रवेश नसतो हे कदाचित त्या बालिकेच्या मातेला माहित नसावे. पुजारी बालिकेला देविच्या पायाशी बाळाचे डोके लावत असताना त्याच्या लक्षात आले कि हि मुलगी आहे त्या क्षणी त्याने हात झटकले आणि ते बाळ खाली पडले.... पुढे काय झाले असावे याची आपणच कल्पना करावी.
स्त्रीयांना प्रवेश नाही हे कबूल.. पण असा अमानुषपणा ??
जगदंब !! जगदंब !!!!

प्रियाली's picture

15 Apr 2011 - 11:48 pm | प्रियाली

लावत असताना त्याच्या लक्षात आले कि हि मुलगी आहे त्या क्षणी त्याने हात झटकले आणि ते बाळ खाली पडले.... पुढे काय झाले असावे याची आपणच कल्पना करावी.

पुढे काय झाले? मुलीच्या आईने मुलीला सावरायला स्वतः गाभार्‍यात धाव घेतली? पुजार्‍याला खडसावले की आपली चूक झाली हे लक्षात आल्याने खजील होऊन मागे फिरले?

सांजसखी's picture

15 Apr 2011 - 11:53 pm | सांजसखी

२ महिन्याचा कोवळा जीव तो.... बाप्पाघरी गेला :(
ऐकीवात आहे कि कोर्ट कचेर्‍या झाल्या पण शेवट नाही माहीती...असो.

प्रियाली's picture

15 Apr 2011 - 11:55 pm | प्रियाली

असे नाही मनात आले माझ्या. खाली पडले असे म्हटल्यावर लक्षात यायला हवे होते पण तसे वाटले नाही. असो.

बायकांना त्यांच्या मर्जीनुसार कुठेही जाण्यास प्रत्यवाय नसावा. बार असो किंवा मंदिर!

हुप्प्या's picture

16 Apr 2011 - 1:17 am | हुप्प्या

मदिना आणि मक्का ह्या संपूर्ण शहरांत, मशिदीत, गाभार्‍यात वगैरे नाही गैर मुस्लिमांना प्रवेश नाही. निदान गेली १०० वर्‍षे तरी ही परंपरा चालू आहे. सौदी सरकारचे हे अधिकृत, सरकारी धोरण आहे. खात्री नाही पण हा नियम तोडणार्‍याला मृत्युदंड होऊ शकतो.
ह्या भेदभावाबद्दलही असाच निषेध व्यक्त होईल का?
हा बोर्ड बघा
http://3.bp.blogspot.com/_b1Z4ZCpAGag/SUgpBQqPjSI/AAAAAAAAAPI/rgLMYmyhGp...

आपल्या परंपरांवर टीका करायचा सर्वांना अधिकार आहेच. पण उर्वरित जगात अशा प्रकारचे काही होते आहे का हे ही माहित असावे म्हणून हा प्रपंच. आणि शिवाय हा माझा आवडता विषय!

राजेश घासकडवी's picture

16 Apr 2011 - 1:56 am | राजेश घासकडवी

असला भेदभाव वाईटच. दयाळू, सर्वशक्तिमान ईश्वराच्या नावाने केला तर तो आणखीनच वाईट. मग तो कुठच्याही का धर्मात होईना. व्यवहारात निव्वळ अंगी असलेल्या कौशल्यासाठीच व त्या गरजेपोटीच भेदभाव असावा. (म्हणजे डॉक्टरकडे जायचं असेल तर गवंड्याकडे न गेल्याने भेदभाव होत नाही अशा अर्थाने)

मुळात आपल्या परंपरा, त्यांच्या परंपरा असे ग्लोबल भेद करून धर्मच 'आपण व ते' अशी फूट पाडतात.

आपल्या परंपरांवर टीका करायचा सर्वांना अधिकार आहेच.

आपल्या परंपरा?? जिथे आपल्याच आया बहिणींनी प्रवेश नाही त्या प्रथेला आपली प्रथा कसे म्हणवते बरे? मंदिर व्यवस्थापनाची एक मूर्ख अट इतकेच.

(मक्का मदिनाच काय पण मंदिरातही फारशी जायची वेळ येत नाही. मक्का मदिनावाले तर सहस्त्र मूर्ख आहेत, एका उल्केसाठी एव्हढं. असो. पण त्याविषयी इथे शंखानाद करून काही फरक पडणार आहे का? ते योग्य ठिकाणी करूच. इथे सदर अटींमुळे इथल्या आणी संबंधित व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर गदा आलेली असल्याने इथे मत व्यक्त करणे जास्त सयुक्तिक.)

पंगा's picture

16 Apr 2011 - 3:24 am | पंगा

आपल्या परंपरांवर टीका करायचा सर्वांना अधिकार आहेच. पण उर्वरित जगात अशा प्रकारचे काही होते आहे का हे ही माहित असावे म्हणून हा प्रपंच. आणि शिवाय हा माझा आवडता विषय!

त्याचे असे आहे, माझ्या उर्वरित आयुष्यात मी मक्केला किंवा मदिनेला सोडा, पण सौदी अरेबियालासुद्धा जाण्याची शक्यता नगण्य आहे. त्यामुळे तिथे काय चालते याच्याशी मला फारसे घेणेदेणे नाही. ज्याला जायचे आहे त्याने बघून घ्यावे.

उलटपक्षी, उर्वरित आयुष्यात मी मंदिरात एकदा नव्हे तर अनेकदा जाण्याची शक्यता त्या मानाने खूपच अधिक आहे. त्यामुळे, प्रत्यक्ष संबंध येत असल्याने जास्त खटकते. (तितकाच त्रास होऊ लागला, तर जाणार नाही. पण तूर्तास कधीमधी जावेसे वाटूही शकते.)

हुप्प्या's picture

21 Apr 2011 - 7:53 am | हुप्प्या

काळ्यांविरुद्धचा भेदभाव हा भारतीय लोकांनाही निषेध करण्याजोगा वाटला होता. अगदी अधिकृत पातळीवर.
भारतात काळ्या गोर्‍याचा भेदभाव नाही. तरी त्यांना तसे वाटले.
एखाद्या उच्चवर्णियाने असे म्हटले की मी उच्चवर्णीय आहे. मी ह्या जन्मात हरिजन बनणार नाही तस्मात हरिजनांविरुद्ध होत असलेल्या भेदभावाविषयी मला काही देणे घेणे नाही. तर त्याला नाक मुरडले जाईल.
पण इथे मात्र हात झटकून मोकळे होण्याची वृत्ती जास्त आढळते हे का?
मुस्लिमांच्या रोषाला घाबरून का पुरोगामीत्वाच्या साच्यात हे बसत नाही म्हणून?
हेही निषेधनीय आणि तेही निषेधनीयच असे म्हणायला माझ्या मते हरकत नसावी.
देवाधर्माविषयी काडीचीही आत्मीयता नसताना वादासाठी तशी ती असण्याचा आभास निर्माण करायची आवश्यकता नाही.
व्यक्तीशः मी ना मक्केला जाणार आहे ना कोल्हापूरच्या देवळात. मला अतोनात गर्दी असलेल्या देवळात जाण्यात काडीचाही रस नाही. पण मला दोन्ही जागी असणारे भेदभाव खटकतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Apr 2011 - 9:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्हाला खरोखरच मक्केला जाण्याची इच्छा असेल तर इस्लाम स्वीकारून तिथे जाण्याचा पर्याय तुलनेने सहजरित्या उपलब्ध आहे. पण महालक्ष्मीच्या गाभार्‍यात जाण्यासाठी एखाद्या मुलीने लिंगबदलाचं ऑपरेशन करून घ्यावं काय?

मक्केची आणि महालक्ष्मीच्या गाभार्‍याची तुलना मला रास्त वाटत नाही. तरीही निषेध व्यक्त व्हावा अशी इच्छा असेल तर त्यावरही स्वतंत्र चर्चा होऊ शकते.

धर्म बदलता येतो, नवनवीन भाषा शिकता येतात, नागरिकतत्व बदलता येतं, पण वंश आणि जात (स्त्री-पुरूष या अर्थानेही) कसे बदलणार? भेदभाव 'करणं' मूळातूनच नष्ट होणंच समाजासाठी उत्तम नाही का?

हुप्प्या's picture

16 Apr 2011 - 8:36 pm | हुप्प्या

मुस्लिम धर्म स्वीकारणे हे इतके सरळ नाही. कायदेशीररित्या तो एक वन वे स्ट्रीट आहे. एकदा मुस्लिम बनलेला मनुष्य पुन्हा धर्म बदलता झाला तर त्याला मृत्युदंड आहे.

जर आपल्याला मक्केत प्रवेश मिळवाण्याकरता इस्लाम स्वीकारणे हा सोपा मार्ग वाटतो तर मग खोट्या मिशा लावून, तात्पुरते वेषांतर करून पुरुष असल्याचा आभास करुन कोल्हापूरच्या देवळात जाणेही अशकय नाही. देवावरील भक्तीपोटी इतके वेषांतर म्हणजे काहीच नाही नाही का? देवळात येणार्‍यांची "कसून" तपासणी करुन तो पुरुष आहे ह्याची खातरजमा केली जात नाही.

मुसलमानांनी केलेला भेदभाव तितकासा बोचत नाही पण हिंदूंचा मात्र असह्य होतो असे मानणे हे पुरोगामीत्वाचे निदर्शक आहे का?

आणि हो, ही बंदी आता उठवलेली आहे. अशाच प्रकारे मक्का मदिनेतील बिगरमुस्लिमांची प्रवेशबन्दी उठेल असे आपणास वाटते का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Apr 2011 - 9:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुस्लिम धर्म स्वीकारणे हे इतके सरळ नाही.

लिंगबदल करण्यापेक्षा सोपं असावं. ("असावं" अशासाठी लिहीलं की दोन्ही गोष्टींचा मला काडीमात्र अनुभव नाही.)

कायदेशीररित्या तो एक वन वे स्ट्रीट आहे.

त्याचा या चर्चेशी काय संबंध?

... पुरुष असल्याचा आभास करुन कोल्हापूरच्या देवळात जाणेही अशकय नाही

ही फसवणूक आहे आणि त्याला माझा विरोध आहे. अवांतर माहिती अशी की सर रिचर्ड बर्टन नामक एक हरहुन्नरी पण बिगरइस्लामिक मनुष्य मक्केत जाऊन आला आहे.

देवावरच्या भक्तीचा इथे काहीही संबंध नाही. इथे मानवाकडून होणार्‍या भेदभावावर चर्चा सुरू आहे.

मुसलमानांनी केलेला भेदभाव तितकासा बोचत नाही पण हिंदूंचा मात्र असह्य होतो असे मानणे हे पुरोगामीत्वाचे निदर्शक आहे का?

दुसर्‍याने केलं तर चालतं, मी केलं काय बिघडतं; अशा प्रकारचं विनोदी आणि तर्कहीन प्रत्युत्तर दुर्लक्षित करण्यात येत आहे. (ad populum?)

आणि हो, ही बंदी आता उठवलेली आहे. अशाच प्रकारे मक्का मदिनेतील बिगरमुस्लिमांची प्रवेशबन्दी उठेल असे आपणास वाटते का?

बंदी उठवली हे उत्तम झालं. त्यासाठी थोडा का होईना आटापिटा करावा लागला हे क्लेषकारक असलं तरीही सध्या विसरण्यास हरकत नाही.
इतरांच्या देशात काय चालतं याची पर्वा मी का करावी? इराकमधे लोकशाही असावी म्हणून अमेरिकेचे सैनिक तिथे लढत आहेत त्यासारखंच झालं हे!

मुळात धर्मच रद्दबादल केले की हा प्रश्न येणार नाही. (वर प्रतिसाद लिहीणार होते, पण काही बूचप्रेमी सदस्यांमुळे दुसर्‍या ठिकाणी रूमाल टाकावा लागणार आहे.)

पंगा's picture

17 Apr 2011 - 12:34 am | पंगा

इराकमधे लोकशाही असावी म्हणून अमेरिकेचे सैनिक तिथे लढत आहेत त्यासारखंच झालं हे!

अधोरेखिताशी किंचित असहमत आहे.

बाकी चालू द्या. (उर्वरिताशी बहुतांशी सहमत.)

मुळात धर्मच रद्दबादल केले की हा प्रश्न येणार नाही.

अगोदर इतरत्र म्हटल्याप्रमाणे, हम्म्म्म्.... :)

शक्यतांनी अतिशय गरोदर असे विधान आहे हे. ;)

अप्पा जोगळेकर's picture

17 Apr 2011 - 3:20 pm | अप्पा जोगळेकर

मुळात धर्मच रद्दबादल केले की हा प्रश्न येणार नाही.
कॄपया धर्म रद्दबातल करणे याचा अर्थ स्पष्ट करावा.

हुप्प्या's picture

21 Apr 2011 - 7:47 am | हुप्प्या

>>इतरांच्या देशात काय चालतं याची पर्वा मी का करावी?
धार्मिक स्थळी होणारा भेदभाव असा विषय आहे. मी नास्तिक आहे मला देवळात जायची गरज नाही. मग मला महालक्ष्मीच्या देवळातील प्रवेशबंदी का जाचावी? असे पुरोगामी म्हणू शकले असते पण नाही. तसेच मक्केच्या बाबतीत का नाही? मला मक्केला जाण्यात काडीचाही रस नाही परंतु हा भेदभाव चुकीचाच आहे असे म्हणायला नक्की काय अडचण आहे?

मला मक्का मदीनेला जायचे नसले तरी एकीकडे इतर धर्माचे गोडवे गाणे. येशू, आब्राहम, डेव्हिड, मोझेस अशा लोकांना आदरणीय मानायचे ढोंग करायचे. आणि दुसरीकडे त्या धर्माच्या अनुयायांना बंदी घालायची हा दुटप्पीपणा हा देवीच्या देवळात स्त्रियांना बंदी घालण्याच्याच तोडीचा आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Apr 2011 - 9:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी नास्तिक आहे मला देवळात जायची गरज नाही. मग मला महालक्ष्मीच्या देवळातील प्रवेशबंदी का जाचावी? असे पुरोगामी म्हणू शकले असते पण नाही.

ज्या लोकांचा देवावर विश्वास आहे, त्यांना देवळात जायचं असतं, फक्त स्त्रिया आहेत म्हणून तिथे जाता येत नाही ही गोष्ट काही पुरोगामी लोकांना अन्याय्य वाटते. त्यात पुरोगामी लोकांच्या स्वतःच्या देव-धर्मविषयक विचारांचा काय संबंध?

सौदीची गोष्टच वेगळी आहे, सौदी ही राजेशाही आहे, संपूर्ण देश ही राजाचीच खासगी मालमत्ता आहे. आणि खासगी मालमत्तेत कोणी काय करावं याबद्दल इतरांनी बोलणं हा थोडा ग्रे-एरिया वाटतो.

मी टीव्हीवर पाहिलेल्या चर्चेत सनातनचा माणूस याच मुद्द्यामागे लपायचा प्रयत्न करत होता..त्यावर कदम साहेब म्हणाले की जर मुस्लिम भगिनी आमच्यावर अन्याय होतोय म्हणत आल्या तर आम्ही मशिदवाल्यांनाही निवेदन देऊ.

बॉल इज इन मुस्लिम भगिनी'ज कोर्ट !

हुप्प्या's picture

16 Apr 2011 - 8:39 pm | हुप्प्या

हाच न्याय लावायचा तर महर्षी कर्व्यांच्या कार्याविषयी काय म्हणाल? त्यांनी विधवांच्या उद्धाराकरता खूप कार्य केले. पण त्यांच्याकडे विधवा स्त्रिया "आमच्यावर अन्याय होतो आहे. काहीतरी करा" असे म्हणत आल्या होत्या का? कर्व्यांना त्यांची स्थिती दिसली आणि त्यावर काहीतरी करावे असे वाटले आणि त्यांनी त्यांचे कार्य केले.
अन्याय झालेला गट/समाज तक्रार घेऊन यायची वाट बघितलीच पाहिजे असा काही नियम नाही.

राजेश घासकडवी's picture

17 Apr 2011 - 6:17 am | राजेश घासकडवी

हिंदू धर्मात चालू असलेल्या सुधारणांचं कौतुक करणाऱ्या धाग्यावर इतर धर्मांत त्या सुधारणा आहेत की नाहीत याचा संबंधच काय? आपल्या घरातला कचरा काढायला लावल्यावर एखाद्या पोराने 'मग, त्या शेजारच्या बंडूच्या घरात कचरा आहे त्याचं काय?' अशी पिरपीर करण्यासारखं आहे. अरे, आपलं घर स्वच्छ झालं आहे त्याचा आनंद माना. का एके काळी ते घाण होतं हे कबूल करायची लाज वाटते?

खरंच, सगळेच धर्म नष्ट झाले तर मूर्ख परंपरांना काही आधार रहाणार नाही. मग राज्यघटनेने जी समानता बहाल केली आहे ती खऱ्या अर्थाने सर्वांना मिळू शकेल.

अप्पा जोगळेकर's picture

17 Apr 2011 - 3:30 pm | अप्पा जोगळेकर

आपल्या घरातला कचरा काढायला लावल्यावर एखाद्या पोराने 'मग, त्या शेजारच्या बंडूच्या घरात कचरा आहे त्याचं काय?' अशी पिरपीर करण्यासारखं आहे.
यात पिर्पिर काय ? बंडू चु* आहे आणि मी नीटनेटका आहे असे ठसठशीतपणे म्हटले तर राग येण्याचं काय कारण आहे.

अरे, आपलं घर स्वच्छ झालं आहे त्याचा आनंद माना. का एके काळी ते घाण होतं हे कबूल करायची लाज वाटते?
काही जण घर आज स्वच्छ झालं आहे. जरुर असेल तर अधिक स्वच्छ करु असं म्हणतात.
काही जण ते पूर्वी कसं घाणेरडं होतं याबाबत गळे काढत बसतात. तुम्ही दुसर्‍या कॅटेगरीतले आहात असे वाटते.

खरंच, सगळेच धर्म नष्ट झाले तर मूर्ख परंपरांना काही आधार रहाणार नाही.
तसं झालं तर कोणताच धर्म न मानणारा असा एक नविन धर्म जन्माला येईल आणि त्या धर्मातदेखील नविन अनिष्ट प्रथा निर्माण होतीलच.

मूर्तिपूजेला कडाडून विरोध असणार्‍या गौतम बुद्धाचे असंख्य पुतळे आज जगभरात अनेक ठिकाणी भक्तिभावाने पूजले जात आहेत यावरुनच काय ते समजून चाला. शिवाय कोणताच धर्म न मानणार्‍या डॉ. आंबेडकरांचे नवबौद्ध अनुयायी किती पुरोगामी आहेत हे आपण पाहतोच.

चंद्रू's picture

16 Apr 2011 - 2:22 am | चंद्रू

खरं तर देवीच्या देवळात पुरूषांनाच प्रवेशबंदी केली पायजे. दक्षीना बुडेल पण पन देवीच्या गाभार्‍यात असले घाण लोक बरोबर नाही वाटत. काय काय लपडी चालतात या देशात. आपला देश लय भारी.

शिल्पा ब's picture

16 Apr 2011 - 4:08 am | शिल्पा ब

अशी काही बंदी वगैरे आहे हेच मला माहित नव्हतं. मी एकदाच गेलेय कोल्हापुरात, खास चपला घेण्यासाठी अन महालक्ष्मीच मंदिर बघण्यासाठी. मंदिरात खूप मोठी रंग होती अन कुणालाच आत जाऊ देत नव्हते. बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत होते म्हणून मंडपातून मूर्ती दिसल्यावर बाहेरच्या दुकानात पेढे घेऊन घरी यायला निघालो.

अशी बंदी म्हणजे मूर्खपणाच आहे. एका बातमीत वाचलंय कि इंदिराबाई, सिंधीयाबाई वगैरेना सुद्धा प्रवेश नाकारला होता. धार्मिक भावना कशाला दुखवा म्हणून त्या काही बोलल्या नाहीत.
सनातनचा खुलासा हास्यास्पद. जाई कोल्हापुरीचा प्रतिसाद फारसा विचार न करता दिलेला वाटला आणि असाच विचार इतक्या काळ लोक (स्त्रिया) करत असतील त्यामुळेच हि बंदी वगैरे चालू राहिली.
अर्थात या मोर्चेवाल्या बायासुद्धा गाभाऱ्यात गेल्या नाहीत असे एका बातमीत वाचले. खरं खोटं मोर्चेवाल्या, तो पुजारी अन ती देवीच जाणे.

बाकी चर्चा नेहमीप्रमाणेच.

नंदू's picture

16 Apr 2011 - 9:23 am | नंदू

महालक्ष्मीमंदीर हा काही अपवाद नाही. माझा ऊडुपीच्या कृष्णमंदीरातला अनुभव काही वेगळा नाही.

आम्ही (बायको आणी मुलगी बरोबर होती)दर्शनघेऊन बाहेर आल्यावर ही म्हणाली की प्रसाद घेउनच जाऊ म्हणून आम्ही प्रसादाच्या रांगेत उभे राहीलो. तेंव्हा एक कळकट माणूस आला आणी मला तुझं गोत्र काय, जानवं दाखव वगैरे प्रश्न विचारु लागला. का तर म्हणे ही पहिली रांग फक्त ब्राम्हणांसाठी असते. त्यांची जेवणं झाल्यावर मग बाकीच्यांना! आम्ही तडक पाठ फिरवून परत हॉटेलवर गेलो.

सांगायचा मुद्दा असा की अजुनही लिंगभेद / जातिभेद आहेच आणी नजिकच्या काळात देखील तो दूर होईल असं वाटंत नाही. वरीलपैकी काही प्रतिसादांवरून तरी असंच वाटतं.

शिल्पा ब's picture

16 Apr 2011 - 9:46 am | शिल्पा ब

<<पहिली रांग फक्त ब्राम्हणांसाठी असते. त्यांची जेवणं झाल्यावर मग बाकीच्यांना!
हे अतीच होतंय...देवाच्या दारात जाणार्‍यांना अडवणारे हे कोण? पुजा वगैरेसाठी लोकं ठीक आहेत पण कोणी आत जायचं हे ठरवायचा अधिकार फक्त ज्यांना आत जायची इच्छा आहे किंवा नाही त्यांच्यापुरताच असावा.

इंटरनेटस्नेही's picture

16 Apr 2011 - 10:19 am | इंटरनेटस्नेही

सर्व मानवप्राण्यांना मग ते स्री असोत वा पुरुष, समान हक्क मिळालेच पाहिजेत. कोणताही धर्म या देशाच्या संविधानापेक्षा मोठा नाही, नसावा.

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Apr 2011 - 1:08 pm | llपुण्याचे पेशवेll

सर्व मानवप्राण्यांना मग ते स्री असोत वा पुरुष, समान हक्क मिळालेच पाहिजेत. कोणताही धर्म या देशाच्या संविधानापेक्षा मोठा नाही, नसावा

समानता ही समानतेने सार्वत्रिक असावीच.

स्त्री-पुरुष या भेदाहून अधिक गरीब-श्रीमंत हा भेद देवस्थानांवर प्रकर्षाने जाणवतो. याला कारण तेथील व्यवस्थापन आणि पुजारी यांचे अर्थकारण हेच असते.

बाकी राजकारणी राजकारण करतात, तथाकथित समाजसेवक सेवेचा आव आणतात, पुरोगामीपणाचा आव आणणारे चर्चा घडवतात.

देव गाभार्‍यात एकटाच राहतो आणि त्याचा खरा भक्त त्याचं शक्य असेल तेव्हा, मिळेल तसं दर्शन घेऊन मनात साठवतो आणि असेल तिथून भक्ति करत राहतो.

उत्तमा सहजावस्था। मध्यमा ध्यानधारणा। तृतीया प्रतिमापूजा। तीर्थयात्रा अधमाधम॥ आणि

मातीचा केला पशुपति। ..... अशी सुरुवात असणारा तुकाराम महाराजांचा अभंग ( पार्थिव मूर्तीची पूजा त्या त्या देवापर्यंत आणि माती मातीत मिसळून जाणे) लक्षात ठेवणे उत्तम.

बाकी चर्चा चालू द्या.

तिमा's picture

16 Apr 2011 - 11:42 am | तिमा

मला तर कुठल्याही देवळाच्या गाभार्‍यात वाकून आंत गेलं की अत्यंत घुसमटायला होतं, आणि कधी एकदा तिथून बाहेर पडतोय असं होतं. बहुतेक माझ्या डोक्यावर केसांच्या आत ६६६ लिहिलेला असणार!!!

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Apr 2011 - 1:05 pm | llपुण्याचे पेशवेll

वा वा छान गरीब श्रीमंत दरी, उच्चभ्रु नॉन उच्चभ्रु सर्व दर्‍या मिटल्या वाटतं. असो.
चालला आहे तो मूर्खपणा आहे. भारतीय जनता पक्षाला करावयाचीच असतील तर अनेक कामे आहेत. पुन्हा असो.

आनंदयात्री's picture

19 Apr 2011 - 1:37 am | आनंदयात्री

खिक्क !! मी पण स्क्रोल करण्यात खुप वेळ घालवला.

पक्का इडियट's picture

16 Apr 2011 - 1:09 pm | पक्का इडियट

एकंदर हा गंमतीशीर विषय आहे. :)

अनेकांच्या प्रतिक्रिया त्यांच्या त्यांच्या ख्यातीनुसारच.
त्यात विशेष काही नाही.

चालू द्या.

कुक's picture

16 Apr 2011 - 1:51 pm | कुक

मन्दिरात स्त्रिया ना बन्दी आहे हे मला माहीतच नवते
मारुतिचा मन्दिरात वैगरे ठिक आहे
पण देविच्या मन्दीरात स्त्रियाना बन्दी नवलच आहे

अजातशत्रु's picture

16 Apr 2011 - 6:15 pm | अजातशत्रु

<<<<<<<<देवीच्या पुजार्‍यांमध्ये फक्त ब्राम्हणच आहेत? नक्कीच नाहीत...प.रा.
मग स्पष्टि करण द्या...

आणि आमच्या "अज्ञानात" भर घाला
कारण माझ्या महिती प्रमाणे हिन्दुस्थानातिल कोणत्याहि मंदीरातील देव/ देवीच्या पुजार्‍यांमध्ये फक्त ब्राम्हणच आहेत.....
मि तरि अजुन बहुजन समाजातील ( मराठा,मागास वर्गीय,दलित) या पैकि कुणी (श्रीपूजक) असल्याचे ऐकीवात नाहि !

मग ह्या वरच्या भिकारचोट वाक्याची सदर लेखनात गरज होती !
आणि विषय हाच आहे आणि चर्चा यावरच घडवुन आणायची इच्छा आहे,

परिकथेतील राजकुमार's picture

16 Apr 2011 - 6:51 pm | परिकथेतील राजकुमार

आणि आमच्या "अज्ञानात" भर घाला
कारण माझ्या महिती प्रमाणे हिन्दुस्थानातिल कोणत्याहि मंदीरातील देव/ देवीच्या पुजार्‍यांमध्ये फक्त ब्राम्हणच आहेत.....
मि तरि अजुन बहुजन समाजातील ( मराठा,मागास वर्गीय,दलित) या पैकि कुणी (श्रीपूजक) असल्याचे ऐकीवात नाहि !

अभ्यास वाढवा येवढेच म्हणतो :)

आणि विषय हाच आहे आणि चर्चा यावरच घडवुन आणायची इच्छा आहे,

अहो मग देवीचा आडोसा कशाला घेता ? सरळ 'बामणांनी केलेले अन्याय' असा धागा काढा की.

पक्का इडियट's picture

16 Apr 2011 - 6:56 pm | पक्का इडियट

कुणी काही प्रश्न विचारले असता त्याला अभ्यास वाढवा असे सांगणे हे चर्चेतून पळ काढणे आहे हे मी नमुद करतो. अशाप्रकारे समोरच्याचा उत्साहभंग (पक्षी चर्चेतून त्याला बाहेर जाण्यास सांगण्यासारखे वर्तन करणे) करणे आपल्यासारख्या जून्या जाणत्यांना (पक्षी अनेक विधायक /विघातक चर्चांमधे सक्रिय सहभाग नोंदवलेल्या) शोभा देत नाही याची मी नोंद करत करत आहे.

>>>अहो मग देवीचा आडोसा कशाला घेता ?

देवीच्या पदराआड लपून का आरोळी देता असा वाक्यप्रचार जास्त योग्य आणि धाग्यातील विषयाला अनुकुल असता असे माझे प्रामाणिक मत आहे.

हा हा हा
पर्या तुझी फेबु वरची लिंक आठवली (क्रिकेट सामन्यांची )
अमळ हसू आले....

साले हे लोक कशाचाही संबंध कशाशीही जोडू शकतात

त्यामुळे वाद घालण्यात अर्थ नाही
चिल मादी अर्रर्र माडी

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Apr 2011 - 6:59 pm | llपुण्याचे पेशवेll

काळूबाईचे पुजारी कोण आहेत बरं?
गुरव , लिंगायत ब्राम्हण असतात का? बरं बरं.

अरेच्या तुझ्या अफुच्या गोळ्या संपल्या की काय रे. ;)

अजातशत्रु's picture

16 Apr 2011 - 6:52 pm | अजातशत्रु

span style="background: #CCCCCC;">स्त्री-पुरुष या भेदाहून अधिक गरीब-श्रीमंत हा भेद देवस्थानांवर प्रकर्षाने जाणवतो. याला कारण तेथील व्यवस्थापन आणि पुजारी यांचे अर्थकारण हेच असते..प्यारे१
अगदि सहमत
कारण मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी हि गेली अनेक वर्षे चालु आहे,
अपवाद फक्त राज घराण्यातिल/ आणि Celebrity स्त्रिया का हे इथे सांगायची गरज नाहि..

<<<,या विषयावरील याचिका न्यायालयात गेली दहा वर्षे प्रलंबित आहे
योगप्रभु आपल्या माहिती साठी ती याचिका अ.नि.स. ने.केली आहे ती स्त्रियांना मंदिरात प्रवेशाबाबत,,
मुळात मंदिरात प्रवेशाबाबत न्यायालयात जाणे म्हणजे हास्यास्पद आहे,
हि तेथील पुजार्‍यांनी घेतलेली हट्टी भूमिकाच नाहिका?

अजून कितीतरी देवळं अशी आहेत, की जिथे महिलांना प्रवेश मिळत नाही. काही देवळांत हरिजनांना प्रवेश मिळत नाही. अशा ठिकाणी "असं का?" म्हणून विचारलं असता, ही देवळं खाजगी ट्रस्टच्या मालकीची आहेत, आणि तिथे कोणाला प्रवेश द्यावा हे त्यांच्या अखत्यारीत आहे, असं उत्तर मिळालं.

चर्चमध्ये हिंदूना सगळ्या भागांमधे प्रवेश नसतो. मुस्लिमांच्या मशिदीत महिलांना प्रवेश नसतो. (महिलांसाठी वेगळ्या मशिदी असतात असं समजलं.) दक्षिण भारतात अनेक देवळांमधे फक्त ठराविक प्रकारचे कपडे असतील, तरच देवळात प्रवेश मिळतो.

सगळीकडेच माणूस म्हणून सगळ्यांना सारखी वागणूक मिळावी, नाही का? यासाठी जबरदस्ती, किंवा फक्त कायदे करून प्रश्न सुटणार नाही. समाज जागृती जेव्हा कधी होईल, तेव्हाच सगळ्या ठिकाणी सर्वांना समान वागणूक मिळेल. महालक्ष्मीच्या देवळातल्या पुजार्‍यांनी सुद्धा आडमुठी भूमिका घेतलेली नाही हे लक्षात घेतलं पाहिजे.

पुष्करिणी's picture

16 Apr 2011 - 10:15 pm | पुष्करिणी

मंदीरात सगळ्यांना परवानगी आहे, गाभार्‍यात (सर्वसामान्य)स्रीयांना प्रवेश करायची परवानगी नाही.
म्हण्जे सरसकट स्रीयांना परंपरेनुसारही बंदी नसावी असं वाटतं.
गाभार्‍याला लागूनच एक हॉल आहे ( सर्वात पुढे ), त्या हॉलमधे पूजा आणि आरतीच्या वेळीस फक्त बायकांना प्रवेश असतो, यावेळी पुरूषांना तेथून बाहेर काढतात. आता हे फक्त सोयीसाठी करतात की अजुन काही कारण आहे ते माहित नाही.

तत्वतः देवदर्शनासाठी कोणालाही मज्जाव असू नये असं माझं मत आहे, पण व्यक्तीशः कोणताही निर्णय मंजूर केला गेला तरी काहीच फरक पडणार नाही.

नुकतच सरकारनं ही बंदी हटवण्याचं विधेयक मंजूर केलं ..याचनंतर अगदी रात्री उशीरा पाणावाटपासंबंधातले अधिकार मंत्रिमंडळानं स्वतःकडे घेतले, यानुसार शेतीसाठीचं राखीव पाणी उद्योगांना ( व्यापारी, लवासा, आदर्श इ.इ. ) पुरवता येइल..माझ्यामते अंबाबाईच्या देवळाच्या गाभार्‍यात स्रीयांना प्रवेश आणि पाणीवाटपाचे निर्णय करणारा अधिकार या २ विधेयकांचं टाइमिंग अत्यंत पद्धतशीरपणे प्लॅन करण्यात आलय. पाणीवाटपासंबंधातल विधेयक दूरगामी परिणामांच्या दृष्टीनं जास्त महत्वाचं आहे .

अवांतर : पुजारी हे ब्राह्मणच असतात हा गैरसमज आहे.

यशोधरा's picture

17 Apr 2011 - 12:42 am | यशोधरा

तुझ्या प्रतिसादातल्या शेवटच्या पॅराशी सहमत पुष्की. :)

आळश्यांचा राजा's picture

17 Apr 2011 - 8:52 am | आळश्यांचा राजा

म.न,से. आमदार श्री.राम कदम आणि भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांची भारतरत्न साठी शिफारस; गेलाबाजार "थोरांची ओळख" मध्ये दोन धडे वाढवण्याची शिफारस एकाही सदस्याने केलेली नाही यावरून त्यांचा अवांतर चर्चेकडेच कल असल्याचे दिसून येते.

असो. सध्या "गप्प बसायचे ठरवले आहे" ची फॅशन आहे म्हणे! ;-)

सुधीर१३७'s picture

17 Apr 2011 - 2:23 pm | सुधीर१३७

सर्वोत्तम प्रतिसाद.......................... :wink:

.......याबद्दल आपणांस "मिपारत्न" पुरस्कार देण्यात यावा , अशी सं. मं. ला जाहीर विनंती.

नीता केळकर यांची भारतरत्न साठी शिफारस
हा हा हा कै पण!

सर्व मित्राना नम्र विन.न्ती की देवीला एकदा मनात आठवुन आपले म्हणणे सा.न्गावे, ज्यामुळे प्रतिसाद निर्मळ राहील व आमच्या सारख्या सामान्य लोका.ना त्रास व्हायचा नाही.

सविता००१'s picture

18 Apr 2011 - 9:48 am | सविता००१

@ अजात शत्रु : तुळजापूर येथील पुजारी (कदम), त्यान्ना भय्येही म्हणतात.
हे ब्राम्हण आहेत का?

ऋषिकेश's picture

18 Apr 2011 - 8:59 pm | ऋषिकेश

कोणत्याही पुरातन मंदिरात स्त्रियांनाच नाही तर काही मोजके मेंटेनन्स करणार्‍या पुजार्‍यांना (आणि प्रसंगी वास्तुतज्ञांना) सोडून कोणालाही प्रवेश करण्यास बंदी असली पाहिजे.
या सुंदर शिल्पांची होणारी झीज थांबवणे गरजेचे आहे.

(अर्थात जर पुरुषांना प्रवेश असेल तिथे स्त्रियांना मज्जाव का? ते समजले नाही)

अजातशत्रु's picture

18 Apr 2011 - 10:12 pm | अजातशत्रु

<काळूबाईचे पुजारी कोण आहेत बरं?
गुरव , लिंगायत ब्राम्हण असतात का? बरं बरं.

<@सविता : तुळजापूर येथील पुजारी (कदम), त्यान्ना भय्येही म्हणतात.
हे ब्राम्हण आहेत का?

मुळ प्रश्न
बहुजन समाजातील ( मराठा,मागास वर्गीय,दलित) या पैकि कुणी (श्रीपूजक) असल्याचे ऐकीवात नाहि
अनुत्तरीत

बरं गुरव -५, लिंगायत-५ "हे पुजारी" असले तरी जर तिथे एक ब्राम्हण पुजारी असल्यास मुख्य पुजेचा मान हा ब्राम्हणांस असतो ना..( म्हणजे का हि का असेना ब्राम्हण श्रेष्टच)

इथे एक नमुद करतो कि माझा आक्षेप हा ब्राम्हण जाती वर नसुन,ब्राम्हण्यांवर आहे.

मुळात जेव्हा धार्मिक प्रथा असो मंदीरातील पुजा,धार्मिक संस्कार जेव्हा चर्चेत येतात तेव्हा तिथे ब्राम्हणांचे नाव उल्लेख येणे साहजीक आहे.त्याचे कारण सर्वाना माहित असावे,
नसेल तर थोडक्यात सांगतो
भारतिय संस्क्रुतित मनुस्म्रुति नावाचा मौलिक ग्रंथ मनु नावाच्या ब्राम्हणाने लिहुन अखंड भारतवर्षा वर फार "उपकार" केले आहेत..
त्यातुनच आपल्या भारतवर्षाला वर्ण व्यवस्था/ जातव्यवस्था/ स्त्रियांवरिल जाचक अटी
त्यांना गुलामा प्रमाणे वागवणे या व अशा अनेक अनिष्ट प्रथा
आणी धार्मिक गोष्टींचा "मौल्यवान सांस्कृतिक" ठेवा मिळाला आहे...:)
अशा प्रथांचा त्यांनी कायमच अफूसारखा उपयोग करुन भोळ्या भाबड्या लोकांना विषमते च्या गुलामगिरीत ठेविले आहे,
बिचारे अज्ञानी लोक हे
<<<<< काहिहि असेल तरि धार्मिक बाबतीत उगाच अकारण हस्तक्षेप करण्यात काहिहि तथ्य नाही.
उगाच नको तिथे पुरोगामी पणाचं अवसान कशाला आणायचं?

असं म्हणून त्यास ते आपलं धर्म कार्यच आहे,
हिंदु धर्मात सांगीतलं आहे मग कशाला त्याचि चिकित्सा करायची?
असं मानुन त्यास बळी पडतात,( मला त्यांचि किव येते)
एक लक्षात असुदे जेव्हा इथल्या मुळनिवासि बहुजनांवर/स्त्रियांवर अन्न्याय/ अत्त्याचार होत होते त्या काळी धर्मचिकित्सा करायला परवानगी न्हवती
(आणखी एक महत्त्वाचे मनुस्म्रुति नावाचा मौलिक ग्रंथ कुणी बहुजनाने लिहिलेला नसुन मनु नावाच्या ब्राम्हणाने लिहिलेला आहे)
हा खुलासा यासाठी कि काहि लोकांना 'ब्राह्मण पुजारी' हा उल्लेख खटकला आहे.
काहि लोकांनी त्यांचे लगोलग वकिल पत्र घेउन इतर देवळात 'ब्राह्मण पुजारी' कसे नाहित हे पटवून देण्याचा प्रयत्न केला........
अहो पण हि व्यवस्था निर्माण केलि कुणी?
यावर आपण कधी विचार करणार आहोत कि नाहि?
आज हि २१ व्या शतकात
#तुझं गोत्र काय, जानवं दाखव वगैरे प्रश्न विचारणं
#पहिली रांग फक्त ब्राम्हणांसाठी असते. त्यांची जेवणं झाल्यावर मग बाकीच्यांना!
# आणि कहर म्हणजे २ महिन्याचा कोवळा जीव...जर असल्या निच प्रथेमुळे देवा घरी गेला असेल तर त्या कोवळा जीवा चे गुन्हेगार कोन?
आपली धर्म संस्क्रुति?
तिचि (अंध) श्रधाळु आई?
कि "तो" खुनी पुजारि?
त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होउन फाशी मिळावी हि माफक अपेक्षा.... पण
यात हि ते महाशय निर्दोष सुटले असतिल,
किंवा तिच्या पालकांना सांगण्यात आले असेल च कि तुमचं मुल हे प्रत्यक्ष देवि च्या चरणि म्रूत्यु पावल्या मुळे तिला साक्षात प्रत्यक्ष देविने तिच्या कडे बोलावले असेल किंवा ति डायरेक्ट स्वर्गात जाईल वगैरे,,
बाकि उल्लेख खटकलेल्या पैकि कुणी यावर प्रतिसाद दिला नाहि..( आश्चर्यच नाहि का?)
उगाच वाटलं......कि कुणाला वाटतय म्हणुन यासाठि त्यांचं अभिनंदन करावं..:?

<<<स्त्रिया अपवित्र किंवा पुरुषांपेक्षा दुय्यम दर्जाच्या म्हणून त्यांना गाभार्‍यात प्रवेश देणारच नाही, अशी हट्टी भूमिका पुजार्‍यांनी घेतलेली नव्हती. ते एवढेच म्हणत होते, की अशी प्रथा अत्यंत जुनी आहे आणि आम्ही तिचे केवळ पालन करत आहोत...
दूरचित्रवाणीवरील चर्चा मीही लक्षपूर्वक ऐकली..@ योगप्रभु

योगप्रभु साहेब दूरचित्रवाणीवरील चर्चा तुम्हिही लक्षपूर्वक ऐकली तर तुम्हि इथे चुकिचि माहिती देत आहात श्री.राम कदम/ नीता केळकर यांनी पत्रकारांशी खालिल प्रमुख कारणे जी त्यांना मंदिर प्रशासना कडुन देण्यात आली आणी सर्व प्रमुख वर्तमान पत्रात छापुन हि आली आहे ती अशी

१ठराविक काळात स्त्रियांनी जाने योग्य नसते `
#आता ठरावीक काळ म्हणजे काय?
मासिक धर्म . ते अपिवित्र कसे? हे प्रजानानात महत्वाची भूमिका निभावते. तुमचे वंश वाढतात
न पिद्यान पिड्या. ते एखाद्या स्त्रीच्या शरीरात नसेन तर तिला वांझ तुमीच ठरवताना ? मग ते अपवित्र कस?
२.प्रथा अत्यंत जुनी आहे आणि आम्ही तिचे केवळ पालन करत आहोत...
# मनुसमृतिप्रमाणे स्त्री कुठल्याही वर्णात जन्माला आली तरी ती शुद्रच असते, ह्या खूळ चाट समजुतिमुळे तिला प्रवेश निशिध होता. मग ते राज घराण्यातिल/ आणि Celebrity स्त्रिया यांना प्रवेश बंदि का केली नाही?
का हा कायदा फक्त गरिब/सामान्य स्त्रियां साठि आहे?

३ देविच्या अंगावरिल दागिन्यांच्या भितीने
# म्हणजे त्यांच्यावर अविश्वास दाखवून त्यांना indirectly त्यांना चोर ठरविण्या सारखे न्हवे काय??

४.मुख्य गाभार्‍यातील तेज महिलांना सहन न होऊन त्यांना ओटीपोटीचे त्रास होतो
# अशी एक हि केस नाहि...हास्यास्पद विधान

$गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची तातडीने बैठक होऊन स्त्रियांना प्रवेश खुला आहे असे सांग ण्या त आले 'ब्राह्मण पुजार्‍यांनी' लगेच नव्या नियमाप्रमाणे अंमलबजावणी केली.
#खोटं आहे........हा निर्णय येताच अंबाबाईचे सेवक (श्रीपूजक) पुजारि हे आत्म दहन करणार होते:)

त्यामुळे शेकडो वर्षच्या खुळ्या समजुती आणि पद्दतीला विरोध केल्याबद्दल.
मि इथे म.न,से. आमदार श्री.राम कदम सौ नीता केळकर ह्यांचे जाहिर अभिनंदन करतो,
देवाच पवित्र म्हणजे नक्की काय हो? ते कसा मोजतात त्याच युनिट काय आहे?
गुप्तरोग झालेला पुजारी चालतो, वेश्यगमन करणारा पुजारी सुधा चालतो (पंढरपुर केस) पण निसर्गाने जीला वंशवृद्दीच वरदान दिल आहे ती चालत नाही, आता तरी आपण मनुसमृतीच्या कालातून बाहेर पडायला हवं.
मुली नुसत्या शिकून अमेरिकेत जात असतील पण अनिष्ट प्रथांपुढे गुडघे टेकत असतील तर काय उपयोग,बर्‍याच जणी आज अमेरिकेत जाऊन येतात पण पाळि च्या वेळी कोपर्‍यात बसून रहातात ते सुधा संस्कार ह्या गोंडस नावाखाली हा खरच अन्याय आहे, जर राजाराम मोहंराय नसते तर ह्याच संस्कार नावाखाली आज देखील सती जा असा म्हणणारे महाभाग सापडले असते.
सावित्रीबाई फुले ह्यानी फक्त घरखर्च चालावा पैसे जामवेत म्हणून मुलीनी शिका असा म्हट्लं नव्हत.
महिलांना प्रवेश बंदी हि हजारो वर्षांची परंपरा असून ती मोडू नये असे काहींचे म्हणणे आहे . पूर्वी देवीला स्पर्श करण्याचा अधिकार हि फक्त ब्राह्मण समाजातल्या पुरुषांना होता .
१९२० साली तर मराठा समाजाला हि प्रवेश बंदी होती ती शाहु महाराजां मुळे खुलि झाली.

आता हा नियम बदलला असून सर्व जातीच्या पुरुषांना सोवळे नेसून देवीला स्पर्श करता येतो..

मनुसमृती काय आहे? व ति काय सांगते
त्यातिल काहि मजेशिर ( ब्राम्हणाला आरक्षण )असणारे नियम
मनुस्मृति - अध्याय पहिला
या जगामध्ये जेवढे म्हणून धन आहे ते जणु सर्व ब्राह्मणाचेच आहे. कारण, श्रेष्ठता व कुलीनता या दोन गुणांमुळे त्या सर्वास ब्राह्मण योग्य आहे. ॥१००॥

ब्राह्मण जे काही दुसर्‍यांचेही खातो ते तो वस्तुतः आपलेच खातो. जे वस्त्र दुसर्‍याकडून घेऊन नेसतो ते तो आपलेच नेसतो व जे एकाकडून घेऊन दुसर्‍यास देतो तेही आपलेच देतो आणि असा प्रकार असल्यामुळे केवल ब्राह्मणाच्या करुणेमुळेच इतर जन भोजनादि करतात. ॥१॥

त्या ब्राह्मणांच्या व इतर क्षत्रियादिकांच्या कर्माचे ज्ञान व्हावे म्हणून बुद्धिमान स्वायंभुव मनु हे शास्त्र रचिता झाला. ॥२॥
सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरुषांस दूषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. यास्तव ज्ञानी पुरुष स्त्रियांविषयी कधी बेसावध रहात नाहीत॥१३॥
माता, बहीण, व कन्या यांच्या बरोबरही एकांतात बसू नये. कारण इंद्रिय समुदाय अति बलाढ्य असून तो विद्वानासही परवश करून सोडित असतो. ॥१५॥

शेवटि....
प्रतिसादां बद्दल सर्वांचे अभार..........!!!

मनु ब्राह्मण नसून क्षत्रिय होता.

अजातशत्रु
'प्रतिसाद वाचताना खूप काही लिहावे वाटले. माझे नाव घेऊन तुम्ही लिहिलेल्याचे खंडनही करता आले असते. पण अचानक माझी नजर तुमच्या एका वाक्यावर पडली आणि मी एकदम स्तब्ध झालो.
'माझा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे.'

माफ करा. आपला संवाद होऊ शकत नाही. कारण मी सर्व जातींना त्यांच्या गुणदोषासकट स्वीकारतो आणि एकूणच समाजाचा विचार करताना 'चांगले ते चांगले, वाईट ते वाईट' (सगळ्यांच जातींबाबत) अशी माझी भूमिका आहे. मला भविष्याकडे जाण्याची इच्छा आहे आणि तुमचा मार्ग भूतकाळाकडे जाण्याचा आहे.

असो. हा धागा काढून विचारप्रवृत्त केल्याबद्दल तुमचेही आभार.

प्रियाली's picture

19 Apr 2011 - 1:26 am | प्रियाली

मनु ब्राह्मण नसून क्षत्रिय होता.

इथे नेमक्या कोणत्या मनुविषयी चर्चा सुरू आहे? मनु ब्राह्मणच होता असे वाटते. कुठल्याही प्रकारचे ग्रंथ रचून/लिहून इतरांना एज्युकेट करताना क्षत्रियांनी इतर जातींना शिकवण देण्याची प्रथा आपल्याकडे नव्हती असे वाटते. चू. भू. द्या. घ्या. त्यासाठी क्षात्रधर्माचा त्याग करून ब्रह्मविद्येचा अवलंब केला जात असे. (उदा. विश्वामित्र)

बाकी चालू द्या.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Apr 2011 - 1:59 pm | परिकथेतील राजकुमार

इथे नेमक्या कोणत्या मनुविषयी चर्चा सुरू आहे? मनु ब्राह्मणच होता असे वाटते. कुठल्याही प्रकारचे ग्रंथ रचून/लिहून इतरांना एज्युकेट करताना क्षत्रियांनी इतर जातींना शिकवण देण्याची प्रथा आपल्याकडे नव्हती असे वाटते. चू. भू. द्या. घ्या. त्यासाठी क्षात्रधर्माचा त्याग करून ब्रह्मविद्येचा अवलंब केला जात असे.

इथे बहुदा मनु उर्फ सत्यव्रताबद्दल चर्चा चालु आहे असे वाटते.

आणि जर त्याच्याबद्दल चर्चा चालु असेल तर प्रियालीतै जे म्हणते आहे ते चुक ठरते. कारण सत्यव्रत मनुपासून पुढे ज्यांचा जन्म झाला त्यांना 'मानव' म्हणले जाते व मानवांच्या जन्मानंतर पुढे त्यांच्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा जाती जन्माला आल्या आणि त्या त्या संदर्भात नियम बनत गेले. त्यामुळे प्रियालीतै म्हणते तो नियम अथवा रुढी इथे लागु होत नाही. मनु हा क्षत्रियच होता. महाभारतात देखील त्याचा उल्लेख आहे. ह्या मनुच्या पत्नीचे नाव श्रद्धा किंवा शक्ती असे काहीसे होते.

बादवे :- बुद्धाला बोधीवृक्षा खाली साक्षात्कार झाला आणि मला अजातशत्रुंच्या प्रतिक्रियेखाली ;)

बाकी वेळ मिळाल्यास त्यांनी मनुस्मृतीसह एकुणच अठरा स्मृतींवर विस्ताराने लिहावे व आमच्या ज्ञानात भर घालावी.

प्रियाली's picture

19 Apr 2011 - 3:09 pm | प्रियाली

आणि जर त्याच्याबद्दल चर्चा चालु असेल तर प्रियालीतै जे म्हणते आहे ते चुक ठरते. कारण सत्यव्रत मनुपासून पुढे ज्यांचा जन्म झाला त्यांना 'मानव' म्हणले जाते व मानवांच्या जन्मानंतर पुढे त्यांच्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा जाती जन्माला आल्या आणि त्या त्या संदर्भात नियम बनत गेले. त्यामुळे प्रियालीतै म्हणते तो नियम अथवा रुढी इथे लागु होत नाही. मनु हा क्षत्रियच होता.

प्रियालीताई चूक असू दे रे पण चूक आहे म्हणून वरच्या वाक्यांचे लॉजिक विचारू शकते का? मानवांची निर्मिती ज्या बापापासून झाली आणि मानवाच्या निर्मितीनंतर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा जाती जन्माला आल्या तर तो बाप क्षत्रिय कसा झाला? की लॉजिकच्या नावानेही माझी बोंब आहे? ;)

महाभारतात "मनुरब्रवित, मनो:राजधर्मा, मनो: शास्त्रम" असा उल्लेख आहे. मनु क्षत्रिय होता असा नाही.

बाकी वेळ मिळाल्यास त्यांनी मनुस्मृतीसह एकुणच अठरा स्मृतींवर विस्ताराने लिहावे व आमच्या ज्ञानात भर घालावी.

आम्ही काय भर घालणार. आमच्या चुका दुरुस्त आधी करायला हव्यात. असो. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

19 Apr 2011 - 3:35 pm | परिकथेतील राजकुमार

बाकीचे उत्तर सवडीने लिहितो ग.

फक्त गैरसमज दूर करतो आधी :-

आम्ही काय भर घालणार. आमच्या चुका दुरुस्त आधी करायला हव्यात. असो

हे तुला नाही काही. अजातशत्रुनांना विनंती आहे. अभ्यासु माणुस तू आहेस का ते ? असा कसा गैरसमज करुन घेतलास बरे? ;)

अभ्यासु माणुस तू आहेस का ते ?

श्री राजकुमार , तुम्हाला अभ्यासु बैमाणुस म्हणायचे आहे काय? :)

परिकथेतील राजकुमार's picture

19 Apr 2011 - 3:44 pm | परिकथेतील राजकुमार

धन्यवाद.
बैमाणुस शब्द आला असता तर अनावधानाने अजातशत्रुंचा अपमान झाला असता ;) म्हणुन माणुस ह्या शब्दावरुन निभावुन नेले.

मृत्युन्जय's picture

19 Apr 2011 - 2:41 pm | मृत्युन्जय

'माझा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे.'

माझा विरोध मुर्खांना नसुन मुर्खपणाला आहे.

अप्पा जोगळेकर's picture

19 Apr 2011 - 8:28 pm | अप्पा जोगळेकर

इथे एक नमुद करतो कि माझा आक्षेप हा ब्राम्हण जाती वर नसुन,ब्राम्हण्यांवर आहे.
शब्दांचे खेळ कशाला करता ? एखाद्या विशिष्ट जातीवर राग असेल तर निदान तसे उघडपणे सांगण्याची धमक दाखवा. तुम्ही सशाच्या काळजाचे नाही ना, तर मग उगा भेदरटपणा नको.

त्यातुनच आपल्या भारतवर्षाला वर्ण व्यवस्था/ जातव्यवस्था/ स्त्रियांवरिल जाचक अटी
त्यांना गुलामा प्रमाणे वागवणे या व अशा अनेक अनिष्ट प्रथा
आणी धार्मिक गोष्टींचा "मौल्यवान सांस्कृतिक" ठेवा मिळाला आहे...
अशा प्रथांचा त्यांनी कायमच अफूसारखा उपयोग करुन भोळ्या भाबड्या लोकांना विषमते च्या गुलामगिरीत ठेविले आहे,

ही माहिती अर्धवट, अपुरी आहे. कोणीतरी एक ग्रंथ लिहिला आणि हजारो वर्षे त्याचे परिणाम करोडो लोकांना भोगावे लागले इतकी ही गोष्ट साधी नाही. निवडणुकीत प्रचार करण्यासाठी ठीक आहे.
एका ब्राम्हण लेखकाने
हिंदू धर्म, वर्णव्यवस्था वगैरे वगैरे येथे वर्णव्यवस्थेचा अल्पसा परामर्श घेतला आहे. ते काही अंतिम सत्य नव्हे.
पण निदान ते तुमच्यासारखे कोणत्याही जातीवर डूख धरुन लिहिलेले नाही.

अहो पण हि व्यवस्था निर्माण केलि कुणी?
यावर आपण कधी विचार करणार आहोत कि नाहि?

कोणी निर्माण केली, कशी निर्माण झाली, कोणी कोणी फॉलो केली याचा जरुर विचार करा आणि थोडेसे वाचनही करा.
कोणत्यातरी जातीचे नियमितपणे प्रसिद्ध होणारे मासिक किंवा पाक्षिक संदर्भासाठी वाचू नका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Apr 2011 - 3:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान चर्चा. कोणत्याही मंदिरात अथवा सार्वजनिक ठिकाणी स्त्री-पुरुष असा भेदभाव करुन कोणालाही प्रवेश नाकारु नये.
बाकी, अशा भेदभाव करणार्‍या रुढी-परंपरा हळूहळू नष्ट होत आहेत ही चांगली गोष्ट.

-दिलीप बिरुटे

योगप्रभू's picture

19 Apr 2011 - 5:58 pm | योगप्रभू

डॉ. बिरुटे,
मला प्रतिसादातून जे काही सांगायचे होते, तो अर्थ तुम्ही उत्तम जाणलात, याबद्दल धन्यवाद.

खरे तर स्त्री समानतेचा हा लढा इथेच संपत नाही. नुसते महिलांना गाभार्‍यात दर्शन खुले करुन पुरेसे नाही. देवीच्या पुजारीवर्गात पौरोहित्य पारंगत महिलांना स्थान मिळेल त्यादिवशी खरा न्याय दिला, असे म्हणता येईल. सध्या मात्र सुधारणेच्या दिशेने जे पाऊल पुढे पडले आहे त्याचे स्वागत.

चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्मिती करणारा आदीपुरुष मनु क्षत्रिय असेल तर त्याने चातुर्वर्ण निर्माण केले
असे म्हणता येनार नाहि, कारण कुणितरि "क्षत्रिय" असण्यासाठी आधी ते चार वर्ण अस्तीत्वात हवे होते.
शिवाय स्वतः मनुस्मृतिच सांगते कि विराट पुरुषाने मनुची निर्मिति केलीय आणी त्यात मनुने मरीची, भ्रूगु इ. महर्षीची निर्मिति केली, आता भ्रूगु वगैरे महर्षी हे ब्राह्मण असताना त्यांचा पिता असलेला मनु हा "क्षत्रिय" कसा काय होऊ शकतो बुवा??:?:~

आणखी एक साधं लॉजिक जर तुम्हि म्हणता तसे डोळे झाकुन जर मानले कि तो "क्षत्रियच" होता तर इतका उत्क्रुष्ट आणि मौलीक ग्रंथ लिहीणारा क्षत्रिय मनु हा उगी बामणांना श्रेष्ट दर्जा आणी खास अधिकार हक्क (आरक्षण), आणि सवलतींचि खैरात का करेल?:?
त्याने ती फक्त क्षत्रियांनाच दिली असती नसति का?:)
आणी चर्चा हि मग क्षत्रियांवर करावि लागली नसती का:?

<<कुठल्याही प्रकारचे ग्रंथ रचून/लिहून इतरांना एज्युकेट करताना क्षत्रियांनी इतर जातींना शिकवण देण्याची प्रथा आपल्याकडे नव्हती

यावर दुमत कुणाचे असण्याचे कारण नाहि,

<<<महाभारतात "मनुरब्रवित, मनो:राजधर्मा, मनो: शास्त्रम" असा उल्लेख आहे.....
अपुरी माहिती.....
असा उल्लेख जरुर आहे पण....
तो मनु दुसरा आहे.... हि वंशावळ पहा
१- मरिचि.....
२- क्श्यप......= दाक्षयणी ( दक्ष प्रजापतीची एक कन्या)
३- अदित्य आणि विवस्वत
४- विवस्वता चा मुलगा मनु (१० पुत्र)......= यम
पुढेहि आहे. पण मारुतिचं शेपुट कशाला वाढवा महाभारतातला मनु मिळाला एवढं पुरे आहे ना..:)

असो
भारतीय संस्क्रुतीचा गवगवा करणारे असंख्य वेळा तारतम्यहीण वागतात.
संस्क्रुतीचा अभिमान असणे वेगळे आणि पुरातन काळातील असली-नसली महत्ता शोधत आजच्या व्यंगांवर मुद्दाम पांघरुण घालने वेगळे.भारतीय संस्क्रुतीत काहीच महनीय नाही हे म्हणनेही चुक आहे... पण जातीय डंखाने आणि पुरेपुर दांभिकतेने आपला समाज भरला असल्याने ख-या इतिहासाचे अन्वेषण न करताच, सत्याचा आधार न घेताच फुकाच्या बेटक्या फुगवण्यास सज्ज असतो आणि हेच भारतीय समाजाचे दुर्दैव आहे.
इतिहासाची चिकित्सा या कोणत्याही घटकाला मान्य नसते. उदा. तुकाराम हा कसल्याही स्थीतित सदेह वैकुठाला जावु शकत नाही हे जर वैज्ञानिक सत्य असेल तर मग नेमके तुकारामाचे काय झाले यावर चर्चा सहसा घडत नाही...घडली तरी ती पुन्हा जातीय अंगावरच जावुन ठेपते. म्हनजे सत्यशोधन बाजुलाच रहाते. पण याहीपेक्षा अहंकारी भावना पसरवणारे लेखन संशोधनाच्या नावाखाली केले जाते ते तर आपल्या मानसिकतेचे दिवाळे निघाले असल्याचे लक्षण आहे.
भारताला इतिहास लेखन परंपरा असल्याने सावरकरांनी त्यांच्या "सहा सोणेरी पाने" या ग्रंथात एकामागुन एक बेधडक अति-साहसी विधाने केली आहेत.
मुळात त्यांचे सर्वच नायक ब्राह्मण आहेत. इतिहासाचे अत्यंत पक्षपाती विवेचन त्यात आहे. ते ठीक आहे...मुळात सवरकर हे इतिहासतज्ञ नव्हतेच म्हणुन ते क्षम्यही मानता येईल...पण तोच इतिहास आहे असे समजनारे सावरकर भक्तांचे काय़?

<<<माफ करा. आपला संवाद होऊ शकत नाही. कारण मी सर्व जातींना त्यांच्या गुणदोषासकट स्वीकारतो आणि एकूणच समाजाचा विचार करताना 'चांगले ते चांगले, वाईट ते वाईट' (सगळ्यांच जातींबाबत) अशी माझी भूमिका आहे. मला भविष्याकडे जाण्याची इच्छा आहे आणि तुमचा मार्ग भूतकाळाकडे जाण्याचा आहे.

योगप्रभु साहेब आपला संवाद इथे होऊ शकतो कि..
आणि त्याच बरोबर इतरांचा हि....
प्रतिक्रिया सकारात्मक असो कि नकारात्मक कोणताहि आतातायी पणा न करता त्यावर समंजसपणे चर्चा घडवुन हि नविन गोष्टि कळतात त्या नव्याने शिकता येतात..
आणि मुळात खरं असेल तेच लोकांसमोर येतं आणि यावं हिच प्रामाणीक ईच्छा आहे..

बाकी आपण सर्व जातींना त्यांच्या गुणदोषासकट स्वीकारतो (त्या शिवाय पर्याय नाहि) आणि एकूणच समाजाचा विचार करताना 'चांगले ते चांगले, वाईट ते वाईट' (सगळ्यांच जातींबाबत) अशी आपली भूमिका आहे. त्याबद्दल मि ही सहमत आहे
<<मला भविष्याकडे जाण्याची इच्छा आहे आणि तुमचा मार्ग भूतकाळाकडे जाण्याचा आहे.
भूतकाळ विसरलात तर भविष्यकाळ कसा घडवणार??

आपण भूतकाळात केलेल्या चुकां मधुनच शिकत असतो
असो........
कारण
इतिहास विसरणारे इतिहास घडवु शकत नाहि या मताचा मि आहे:)

आनंदयात्री's picture

21 Apr 2011 - 12:36 am | आनंदयात्री

>>इतिहासाचे अत्यंत पक्षपाती विवेचन त्यात आहे. ते ठीक आहे...मुळात सवरकर हे इतिहासतज्ञ नव्हतेच म्हणुन ते क्षम्यही मानता येईल.

सावरकरांना क्षमा करताय तुम्ही !! बरं बरं .. चालुद्या ..
बाकी इतिहासतज्ञ कोण मग ? आ. ह. साळुंखे का ?

परिकथेतील राजकुमार's picture

21 Apr 2011 - 1:37 pm | परिकथेतील राजकुमार

अजातशत्रू म्हणजे संजय सोनावणी आहेत का? ;)

नाही ते जर ते नसतील तर वरील प्रतिसादातील संपूर्ण लेखन हे सोनावणींच्या ब्लॉगवरुन जसेच्या तसे उचलुन आणले आहे.

संपादक दखल घेतील काय ?

अप्पा जोगळेकर's picture

24 Apr 2011 - 4:31 pm | अप्पा जोगळेकर

शिवाय स्वतः मनुस्मृतिच सांगते कि विराट पुरुषाने मनुची निर्मिति केलीय आणी त्यात मनुने मरीची, भ्रूगु इ. महर्षीची निर्मिति केली. आता भ्रूगु वगैरे महर्षी हे ब्राह्मण असताना त्यांचा पिता असलेला मनु हा "क्षत्रिय" कसा काय होऊ शकतो बुवा??:
निर्मिती केली असे म्हणायचे आहे की जन्म दिला असे म्हणायचे आहे ते स्पष्टपणे लिहावे. निर्मिती करणारा माणूस जीवशास्त्रीय पिता असण्याचे कारण नाही. जसे - पुराणामध्ये काहीजण अग्नीय ज्वालेमधून , काही जण यज्ञातून, काही जण घामाच्या थेंबातून वगैरे निर्माण होत असतात. सबब क्षत्रिय माणुस ब्राम्हणाची निर्मिती करु शकेल.

आणखी एक साधं लॉजिक जर तुम्हि म्हणता तसे डोळे झाकुन जर मानले कि तो "क्षत्रियच" होता तर इतका उत्क्रुष्ट आणि मौलीक ग्रंथ लिहीणारा क्षत्रिय मनु हा उगी बामणांना श्रेष्ट दर्जा आणी खास अधिकार हक्क (आरक्षण), आणि सवलतींचि खैरात का करेल?:?
काही लोक परधार्जिणे असतात.

भारताला इतिहास लेखन परंपरा असल्याने सावरकरांनी त्यांच्या "सहा सोणेरी पाने" या ग्रंथात एकामागुन एक बेधडक अति-साहसी विधाने केली आहेत.
मुळात त्यांचे सर्वच नायक ब्राह्मण आहेत. इतिहासाचे अत्यंत पक्षपाती विवेचन त्यात आहे. ते ठीक आहे...मुळात सवरकर हे इतिहासतज्ञ नव्हतेच म्हणुन ते क्षम्यही मानता येईल...पण तोच इतिहास आहे असे समजनारे सावरकर भक्तांचे काय़?

चालू द्या.

अजातशत्रु's picture

20 Apr 2011 - 10:22 pm | अजातशत्रु

अशि चर्चा याआधिहि इथे झालि आहे
http://www.misalpav.com/node/12039

तुर्तास रजा............

"इतिहास विसरणारे इतिहास घडवु शकत नाहि "

योगप्रभू's picture

21 Apr 2011 - 5:36 pm | योगप्रभू

महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात स्त्रियांना प्रवेशबंदी, या विषयावर धागा उघडला असताना तेवढ्यापुरता मर्यादित न ठेवता आता मनुस्मृती, सावरकर, सहा सोनेरी पाने व ब्राह्मण नायक, तुकाराम वगैरे उपाख्याने सुरु झालेली दिसताहेत. याचाच अर्थ ज्ञानेश्वर, रामदास, दादोजी, पेशवे ही मंडळी नाटकात एंट्री घेण्यासाठी विंगेत नक्कीच उभी असणार.

कल्याण आहे, इतकेच म्हणतो.

अजातशत्रुंनी सगळे मुद्दे एकाच धाग्यात कोंबण्यापेक्षा विषयानुरुप स्वतंत्र धागे काढावेत, असे नम्र निवेदन.

"भारतीय संस्क्रुतीचा गवगवा करणारे असंख्य वेळा तारतम्यहीण वागतात.
संस्क्रुतीचा अभिमान असणे वेगळे आणि पुरातन काळातील असली-नसली महत्ता शोधत आजच्या व्यंगांवर मुद्दाम पांघरुण घालने वेगळे.भारतीय संस्क्रुतीत काहीच महनीय नाही हे म्हणनेही चुक आहे... पण जातीय डंखाने आणि पुरेपुर दांभिकतेने आपला समाज भरला असल्याने ख-या इतिहासाचे अन्वेषण न करताच, सत्याचा आधार न घेताच फुकाच्या बेटक्या फुगवण्यास सज्ज असतो आणि हेच भारतीय समाजाचे दुर्दैव आहे.
इतिहासाची चिकित्सा या कोणत्याही घटकाला मान्य नसते. उदा. तुकाराम हा कसल्याही स्थीतित सदेह वैकुठाला जावु शकत नाही हे जर वैज्ञानिक सत्य असेल तर मग नेमके तुकारामाचे काय झाले यावर चर्चा सहसा घडत नाही...घडली तरी ती पुन्हा जातीय अंगावरच जावुन ठेपते. म्हनजे सत्यशोधन बाजुलाच रहाते. पण याहीपेक्षा अहंकारी भावना पसरवणारे लेखन संशोधनाच्या नावाखाली केले जाते ते तर आपल्या मानसिकतेचे दिवाळे निघाले असल्याचे लक्षण आहे.
भारताला इतिहास लेखन परंपरा असल्याने सावरकरांनी त्यांच्या "सहा सोणेरी पाने" या ग्रंथात एकामागुन एक बेधडक अति-साहसी विधाने केली आहेत.
मुळात त्यांचे सर्वच नायक ब्राह्मण आहेत. इतिहासाचे अत्यंत पक्षपाती विवेचन त्यात आहे. ते ठीक आहे...मुळात सवरकर हे इतिहासतज्ञ नव्हतेच म्हणुन ते क्षम्यही मानता येईल...पण तोच इतिहास आहे असे समजनारे सावरकर भक्तांचे काय़?"

फक्त हे २ उतारे मला इथे महत्वाचे वाटले त्यामुळे ते घेन्यात आले आहेत त्याची इथे "गरज वाटली होती"
संजय सोनावणी यांचा उल्लेख जागे अभावी व अनावधानाने राहीला गेला आहे...

आणि ते मि नम्रपणे मान्य करत आहे.(निदान)

पण म्हणुन मनु हा "क्षत्रिय" होऊ शकत नाही:)

तसं नसेल तर तसे खंडण करावे...
गैरसमज तरी दुर होइल आमचा आणि आपल्या इथल्या मित्रांचा हि !
उगा वडाची साल (बोधी वृक्षाला) उप्स पिंपळा ला:-)

imp= मुद्दे खोडता येत नसले कि काहि लोक उगाच मग मुळ मुद्द्याला बगल देउन मग असे प्रतिसाद देतात..=)

<<बाकी इतिहासतज्ञ कोण मग ? आ. ह. साळुंखे का ?

काय बोलणार इतकच म्हणतो लोकमान्य टिळक/बाबासाहेब पुरंदरे/ राजवाडे
हेच काय ते इतिहासतज्ञ इतीहास मान्य आहेत.

बाकि संपादक काय ती दखल घेतील
लेखन ठेवावे कि ठेउ नये हा सर्वस्वी त्यांचाच अधिकार आहे.
संपादकांनि निर्णय घ्यावा हि नम्र विनंती....

अप्पा जोगळेकर's picture

24 Apr 2011 - 4:18 pm | अप्पा जोगळेकर

फक्त हे २ उतारे मला इथे महत्वाचे वाटले त्यामुळे ते घेन्यात आले आहेत त्याची इथे "गरज वाटली होती"
संजय सोनावणी यांचा उल्लेख जागे अभावी व अनावधानाने राहीला गेला आहे...
आणि ते मि नम्रपणे मान्य करत आहे.(निदान)

याचा अर्थ आधी तुम्ही चोरी केली आणि ती पकडली गेल्यावर मूळ लेखकाचे नाव येथे दिले असे मानण्यास हरकत नाही.

अजातशत्रु's picture

21 Apr 2011 - 7:43 pm | अजातशत्रु

<<<इथे एक नमुद करतो कि माझा आक्षेप हा ब्राम्हण जाती वर नसुन,ब्राम्हण्यांवर आहे.
शब्दांचे खेळ कशाला करता ?

अहो शब्दांचे खेळ कशाला काहिंना "तो" शब्द खटकला म्हणुन तसं स्पष्टिकरण द्यावं लागलं
काहिंना टिका सहन होत नसेलतर त्यावर काय बोलायचं

<<एखाद्या विशिष्ट जातीवर राग असेल तर निदान तसे उघडपणे सांगण्याची धमक दाखवा.
तुम्ही सशाच्या काळजाचे नाही ना, तर मग उगा भेदरटपणा नको.

क्रुपया योगप्रभुंना दिलेला प्रतिसाद वाचावा....

(आणि कुणाला जर विचार आवडलेच नाहित तर लगेच कुणी गोळि घालनार नाहि......
जशी गांधिजींना कुणा" माथेफिरु" ने घातली)
इथे ब्राम्हण हा उल्लेख जाणीव पुर्वक टाळला आहे उगा प.रा. ना राग यायचा ;-)

भेदरटपणा असता तर असा धागाच काढला नसता याची नोंद घ्यावी..
आता जर फ्रंट वर एखादि विशिष्ट जातच असेल तर त्यांना टिका जास्त सहन करावि लागणार ना...

त्या मुळेच कि काय लोकांना दंगलि/ मोर्चे/ आणी विरोधा साठि भडकवणारे लोक हे कधिच फ्रंट वर नसतात पोलिसांच्या गोळ्या/लाठ्या खातात ते फक्त सामान्य लोक..
उदा. ताजीच आहेत पण विषयांतर नको...

<<<ही माहिती अर्धवट, अपुरी आहे. कोणीतरी एक ग्रंथ लिहिला आणि हजारो वर्षे त्याचे परिणाम करोडो लोकांना भोगावे लागले इतकी ही गोष्ट साधी नाही. निवडणुकीत प्रचार करण्यासाठी ठीक आहे.

निवडणुकीचं नंतर पाहु खात्रि आहे तिथेहि विरोधि पक्षात तुम्हि असालच

बरं ही माहिती अर्धवट, अपुरी आहे.(मान्य...कारण जागे अभावि सगळंच इथे देता येत नाहि)

कोणीतरी एक ग्रंथ लिहिला आणि हजारो वर्षे त्याचे परिणाम करोडो लोकांना भोगावे लागले इतकी ही गोष्ट साधी नाहीच आहे कारण तत्कालीन परिस्थिती आणी तेव्हाची सामाजीक परिस्थिती/ सामाजीक स्थित्यंतरे इ.मध्ये खुप मोठा फरक होता/आहे कारण आर्य आल्या नंतर हजारो वर्षे त्याचे परिणाम इथल्या करोडो लोकांना भोगावे लागले. कारण तीच इथली जगण्याची पद्धती म्हणुन इथं रुढ झाली
(किंवा लादल्या गेली)

<<<कोणी निर्माण केली, कशी निर्माण झाली, कोणी कोणी फॉलो केली याचा जरुर विचार करा आणि थोडेसे वाचनही करा.

मलाच उलट प्रश्न विचारण्या पेक्षा आपण जर मि ज्या गोष्टिंवर आक्षेप नोंदवले आणि जे मुद्दे उपस्थित केले त्याचे "तुमच्यापरिने" खंडण केले असते तर ते अधिक संयुक्तिक वाटले असते.

कोणत्यातरी जातीचे नियमितपणे प्रसिद्ध होणारे मासिक किंवा पाक्षिक संदर्भासाठी वाचू नका.
हि गोष्ट तुम्हालाहि लागु होते.....

<<<याचाच अर्थ ज्ञानेश्वर, रामदास, दादोजी, पेशवे ही मंडळी नाटकात एंट्री घेण्यासाठी विंगेत नक्कीच उभी असणार.
भिती रास्त आहे.....

फक्त एवढच म्हणेन कि मुळ मुद्द्याला बगल देउन इकडचे तिकडचे/ मग हे कोण आहेत?
म हा असा का? असे प्रतिसाद देण्या पेक्षा मुळमुद्दे खोडुन काढा कि राव..
अथवा मान्य करा कि भारतिय संस्क्रुतित मनुस्म्रुति नावाचा मौलिक ग्रंथ मनु ने लिहुन अखंड भारतवर्षा वर फार "उपकार" केले आहेत..
त्यातुनच आपल्या भारतवर्षाला वर्ण व्यवस्था/ जातव्यवस्था/ स्त्रियांवरिल जाचक अटी
त्यांना गुलामा प्रमाणे वागवणे या व अशा अनेक अनिष्ट प्रथा
भारतीय संस्क्रुतीत जातीय डंखाने आणि पुरेपुर दांभिकतेने आपला समाज भरला असल्याने हे ख-या इतिहासाचे आणि भारतीय समाजाचे दुर्दैव आहे.

मि उपस्थित केलेले मुद्दे खोटे असुन त्याचा मनुस्म्रुती शी दुरान्वये संबंध नाहि असं तरी म्हणुन दाखवावे:)

अशा प्रथांचा उपयोग कायम अफूसारखाकरुन भोळ्या भाबड्या लोकांना अजुनही विषमते च्या गुलामगिरीत ठेवण्या पेक्षा इतिहासाची चिकित्सा करु द्या आणि मुळात खरं असेल तेच लोकांसमोर येउ द्या आणी मुख्य म्हणजे ते आपल्या विवेक बुद्धिला आणि मनाला पटावं यावं हिच प्रामाणीक ईच्छा आहे..

अप्पा जोगळेकर's picture

24 Apr 2011 - 4:37 pm | अप्पा जोगळेकर

मलाच उलट प्रश्न विचारण्या पेक्षा आपण जर मि ज्या गोष्टिंवर आक्षेप नोंदवले आणि जे मुद्दे उपस्थित केले त्याचे "तुमच्यापरिने" खंडण केले असते तर ते अधिक संयुक्तिक वाटले असते.
खंडन करायच्याच विचारात होतो पण तेवढ्यात तुम्ही लेखनचौर्य करत आहात हे सिद्ध करणारा परा यांचा प्रतिसाद आणि तुमचा कबुलीजबाब वाचला.
कॉपी-पेस्ट केलेल्या आक्षेपांचे खंडन मी करत नसतो.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Apr 2011 - 6:25 pm | परिकथेतील राजकुमार

इथे ब्राम्हण हा उल्लेख जाणीव पुर्वक टाळला आहे उगा प.रा. ना राग यायचा

ज्या मनुष्याकडे स्वत:चे विचार नाहित, ज्याला चार शब्दांचे मत मांडायला देखील दुसर्‍याने लिहिलेले शब्द चोरी करुन आणावे लागतात अशा मनुष्याच्या बोलण्याच्या काय राग मानायचा ? :)

असो...

तुम्ही मोठे आणि प्रगल्भ झालात की तुमची दखल घ्यायचा विचार करु. तुर्तास तुम्हाला आणि तुमच्या चौर्यकर्माला फाट्यावर देखील मारायची इच्छा नाही.

@कॉपी-पेस्ट केलेल्या आक्षेपांचे खंडन मी करत नसतो.#अप्पा जोगळेकर
अहो मालक मी कॉपी-पेस्ट काय केलंय?आणी माझे आक्षेप काय आहेत हेच जर तुम्हाला समजत नसेल
(समजलं असेलही पण गोची झाली हो,अस काहीस आहे का??) तर काय म्हणायचं?
मुळात माझे आक्षेप तुम्हाला खोडता आले नाहीत तेव्हा तुम्ही पळवाटाच शोधनार....

असो वर सांगितल्या प्रमाणे फक्त २ उतारे इथे महत्वाचे वाटले म्हणुन ते उदा.दाखल घ्यावे लागले
(ते सोडुन बाकी सगळे माझे आक्षेप /मुद्दे आहेत) तसे आपण इतर पुस्तक किंवा वर्तमानपत्रां मधून वानगी दाखल घेतच असतो कि..मग ती पण चोरीच का?
आणी तशीही लिंक दिलेली आहेच तर जरा तिथे जाण्याची तसदी घेतली असतीत तर फार बरे झाले असते,
तो संपुर्ण लेख मी जसाच्या तसा इथे आणलेला नाही आहे(हे सिद्ध आहे) त्यातले फक्त २ उतारेच इथे आहेत,
आणी मुळ लेखकाचे नावही मी जाहीर केलेय ते माझ्या नावावर न खपवता..
त्या मुळे ही चोरी होउ शकत नाही

उगा उसना आविर्भाव आणून = कॉपी-पेस्ट केलेल्या आक्षेपांचे खंडन मी करत नसतो
असे म्हणने म्हणजे चर्चेला बगल देण्यासारखं आहे. त्यापेक्षा मि उपस्थित केलेले मुद्दे खोटे असुन त्याचा मनुस्म्रुती शी दुरान्वये संबंध नाहि असं सिद्ध करुन दाखवा,

@तुम्ही मोठे आणि प्रगल्भ झालात की तुमची दखल घ्यायचा विचार करु. तुर्तास तुम्हाला आणि तुमच्या चौर्यकर्माला फाट्यावर देखील मारायची इच्छा नाही.# प.रा.

यावर काय बोलणार....

इथे(म्हणजे फक्त मि. पा. वर)तुम्हीच एक थोर मोठे आणि प्रगल्भ विचारवंत दिसत आहात (निरीक्षण)
त्यामूळे अशा थोर माणसाच्या शेपटीवर आमच्या सारख्या पामराचा चुकून पाय पडला..
हे निमीत्त मात्र, नाहीतर आपल्या प्रतिक्रीये वरुन आपण फारच सज्जन दिसत आहात..

अवांतर: कामामुळे आणी संस्थलाच्या टेक्निकल प्रोब्लेम (२ वेळा लिहिला होता पण प्रकाशित होउ शकला नाहि) त्यामूळे हा प्रतिसाद इतक्या उशारा देत आहे,

अतिअवांतर : माझे सगळे आक्षेप /मुद्दे यांचं जर कुणी (पुरावासिद्ध) खंडण केलं तर मि इथे जाहिर माफी मागेन,

एक राहिलं संपादक/ संपादक मंडळ यांनी "ते" (कॉपी-पेस्ट)लिखाण उडविले नाहि त्याबद्दल त्यांचे जाहिर आभार ( ज्यांनी आक्षेप घेतला होता त्यांनी पण याची दखल घ्या.आक्षेप टिकला नाही)
आणी पुढच्यावेळी मि ही खबरदारी घेइन ( उल्लेख करायची)..

तुर्तास रजा........

अप्पा जोगळेकर's picture

9 May 2011 - 10:14 pm | अप्पा जोगळेकर

उगा उसना आविर्भाव आणून = कॉपी-पेस्ट केलेल्या आक्षेपांचे खंडन मी करत नसतो
असे म्हणने म्हणजे चर्चेला बगल देण्यासारखं आहे.

जे पुराव्याने सिद्ध झालं आहे ते सूर्यप्रकाशासारखं स्वच्छच आहे. याउप्पर तुम्ही स्वत:च्या मनाची हवी तशी समजूत घालून घेऊ शकता. चर्चेला बगल दिली, चर्चेतून पळ काढला, सूंबाल्या केला काय हवं ते म्हणून स्वतःच्या मनाचे समाधान करुन घ्यायची मोकळीक तुम्हाला आहेच.

आणी पुढच्यावेळी मि ही खबरदारी घेइन ( उल्लेख करायची)..
शुभेच्छा.