जन्मदिनी डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन

तर्री's picture
तर्री in जनातलं, मनातलं
14 Apr 2011 - 7:09 am

१४ एप्रिल . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आम्बेडकरांच्या जन्मदिना निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन .
हिन्दु धर्मामधील जाती व्यवस्थेविरुध्द विद्रोह करणार्‍या तसेच भारतीय घटनेच्या शिल्पकारास कोटी कोटी प्रणाम .मराठी वर आत्यंतिक प्रेम करणार्‍या ह्या महामानवाच्या महाराष्ट्राची मात्र सर्व बाजुनी अधोगती होते आहे हा दैव-दुर्विलास.

राजकारणसद्भावना

प्रतिक्रिया

विकास's picture

14 Apr 2011 - 7:44 am | विकास

आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन!

प्राजु's picture

14 Apr 2011 - 8:09 am | प्राजु

बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन!!

सहज's picture

14 Apr 2011 - 8:31 am | सहज

नेहमीप्रमाणे आदरांजली व तीच ती दोन ओळीची भारतीय घटनेचे शिल्पकार व एक महड तळे सत्याग्रह अश्या दोन आठवण काढण्याबरोबर डॉ. आंबेडकर तसेच अन्य मोठ्या नेत्यांबद्दल जास्त ओळख नसलेली माहीती यावी अशी अपेक्षा.

आज एका ब्लॉगवर डॉ. आंबेडकरांबद्दल एक लेख वाचायला मिळाला. जरुर वाचा.

फोटो जालावरुन - बहुतेक Photographer: Margaret Bourke-White, लाईफ मासीकाकरता

फोटो जालावरुन व्हाया जयभीम.एचयु

>>नेहमीप्रमाणे आदरांजली व तीच ती दोन ओळीची भारतीय घटनेचे शिल्पकार व एक महड तळे सत्याग्रह अश्या दोन आठवण काढण्याबरोबर डॉ. आंबेडकर तसेच अन्य मोठ्या नेत्यांबद्दल जास्त ओळख नसलेली माहीती यावी अशी अपेक्षा

अगदी असेच म्हणतो..

बाबासाहेबांना आदरांजली.

बाबासाहेब आणि महाराष्ट्र यावरून आठवले. बर्‍याच दिवसांपूर्वी 'सातारकर' यांनी बाबासाहेब आणि भाषाधारीत राज्यनिर्मीती अशा काही आशयाची लेखमाला लिहील्याचे आठवते. दुवा देउ शकेल का कोणी

राजेश घासकडवी's picture

15 Apr 2011 - 1:38 pm | राजेश घासकडवी

ब्लॉगचा दुवा दिल्याबद्दल सहजरावांना धन्यवाद. मला आंबेडकर माहीत होते ते म्हणजे आपल्या इतिहासाच्या पुस्तकात शिकलो ते - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून, जातीभेदाच्या जिव्हारी जखमा सोसत हिमतीने शिकून मोठा झालेला दलितांचा नेता, व भारतीय घटनेचा शिल्पकार म्हणून. हेही दिपवून टाकण्यासाठी पुरेसं होतं. पण त्यांच्या शिक्षणाचा आवाका, अर्थशास्त्राचा अभ्यास, वीज, पाणी, आणि बॅंकिग क्षेत्रातलं कार्य वाचून आणखीनच दडपून जायला होतं.

आपण खूप वेळा भारतात वाईट काय आहे याची चर्चा करत असतो. पण या महामानवाने घटनेचा शिल्पकार बनणं यासारखी योग्य गोष्ट नाही. ती पदवी व ती व्यक्ती एकमेकांसाठीच बनल्या...

Freedom of mind is the real freedom. A person, whose mind is not free though he may not be in chains, is a slave, not a free man. One, whose mind is not free, though he may not be in prison, is a prisoner and not a free man. One whose mind is not free though alive, is no better than dead. Freedom of mind is the proof of one’s existence.

We must break the chains, once and forever. - Babasaheb Ambedkar

आज आपलं जग अधिक मुक्त आहे याला एक कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या प्रतिभेला, कार्याला आणि जीवनविषयक दृष्टीकोनाला सलाम.

महामानव आंबेडकरांच्या शिकवणीतील हेच तर सर्वात महत्वाचे तत्व आहे
Freedom of mind is the real freedom. अप्रतिम !!
शाळेत शिकविलेली रविंन्द्रनाथांची कविता परत एकदा आठविली ..

WHERE the mind is without fear and the head is held high
Where knowledge is free
Where the world has not been broken up into fragments
By narrow domestic walls

जेथे बुध्दी अन मन कोणाच्याही भिती ने भितीग्रस्त नसेल, (मग कोणी कितीही वाळीत का टाकू नये)
जेथे माथा उजळ अन मान ताठ असेल ..
जेथे ज्ञानाचे झरे मुक्त पणे वहातील ..
जेथे जग हे धर्मवादाच्या /जातियवादाच्या भिंती मुळे छोट्या छोट्या तुकड्या तुकड्यात विखुरलेले नसेल ..
(असाच मतितार्थ आहे )

निकित's picture

14 Apr 2011 - 8:44 am | निकित

आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन.
ते फक्त घटनेचेच शिल्पकार नव्हते तर आधुनिक भारताच्या आर्थिक जडणघडणीतही त्यांचा महत्वाचा वाटा होता.
डॉ. नरेंद्र जाधवांनी बाबासाहेबांच्या कार्याची थोडक्यात पण सुंदर ओळख इथे करून दिली आहे.

डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन.

नितिन थत्ते's picture

14 Apr 2011 - 9:32 am | नितिन थत्ते

अभिवादन.

सर्वसाक्षी's picture

14 Apr 2011 - 9:44 am | सर्वसाक्षी

आपल्या ध्येयासाठी आपले आयुष्य वाहुन घेतलेल्या डॉ. बाबासाहेबांना सादर अभिवादन

प्यारे१'s picture

14 Apr 2011 - 10:13 am | प्यारे१

जय भीम.....!!!

भडकमकर मास्तर's picture

14 Apr 2011 - 11:04 am | भडकमकर मास्तर

अभिवादन... अधिक माहिती वाचायला आवडेल... सहजरावांशी सहमत

ajay wankhede's picture

14 Apr 2011 - 11:22 am | ajay wankhede

भारत रत्न डॉ.बाबासाहेब भिमराव आम्बेडकर यान्च्या १२० व्या जयन्ति निमित्त हार्दिक अभिवादन
"उद्धरलि कोटि कुळे
भिमा तुझ्या जन्मामुळे"
जयभिम.......

आदिजोशी's picture

14 Apr 2011 - 11:43 am | आदिजोशी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आम्बेडकरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन.

sagarparadkar's picture

14 Apr 2011 - 11:50 am | sagarparadkar

आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन!

__/\__

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Apr 2011 - 12:24 pm | बिपिन कार्यकर्ते

युगपुरूषास अभिवादन!

सहजकाकांशी सहमत!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2011 - 12:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महामानवास विनम्र अभिवादन....!
बाकी, सहज यांच्याशी सहमत.

-दिलीप बिरुटे

पुष्करिणी's picture

14 Apr 2011 - 12:46 pm | पुष्करिणी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आम्बेडकरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन.

भारतिय रिझर्व बैंकेची पूर्ण जडणघडण हि देखिल बाबासाहेब आंबेडकरांचीच देणगी आहे .

Reserve Bank of India (RBI) came into picture according to the guidelines laid down by Dr Ambedkar? RBI was conceptualized as per the guidelines, working style and outlook presented by Dr Ambedkar in front of the Hilton Young Commission.
The legislative assembly passed this under the name of RBI act 1934

त्यांचे THE PROBLEM OF THE RUPEE: ITS ORIGIN AND ITS SOLUTION हे पुस्तक वाचनिय आहे . ते तुम्ही HISTORY OF INDIAN CURRENCY & BANKING : http://www.ambedkar.org/ambcd/28A.%20Problem%20of%20Rupee_Preface.htm येथे वाचू शकता

प्राजक्ता पवार's picture

14 Apr 2011 - 2:32 pm | प्राजक्ता पवार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन.

गणेशा's picture

14 Apr 2011 - 5:19 pm | गणेशा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आम्बेडकरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन.

धमाल मुलगा's picture

14 Apr 2011 - 6:25 pm | धमाल मुलगा

म्होठा माणूस.. लय म्होठा माणूस. आपण काय बोलणार त्यांच्याबद्दल.

सयाजीराव गायकवाडांच्या शिष्यवृत्तीमुळे कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी गेलेल्या आंबेडकरांनी त्या शिष्यवृत्तीचे चीज केले. १९१३ ते १६ अशी ३ वर्षे ते तिथे शिकले. अर्थशास्त्र (२९ कोर्सेस) हा मुख्य विषय घेऊन एमए करताना त्यांचे इतर विषय होते समाजशास्त्र (६ कोर्सेस), इतिहास (११ कोर्सेस), तत्त्वज्ञान (५ कोर्सेस), मानववंशशास्त्र (४ कोर्सेस), राज्यशास्त्र (१ कोर्स), प्राथमिक जर्मन आणि फ्रेंच भाषा (प्रत्येकी १ कोर्स) (विषयांची निवड, आवाका आणि केवळ ३ वर्षांच्या पूर्ततेचा कालावधी विस्मयचकित करुन टाकणारा!)
त्यांच्या आश्चर्यकारक कामाचे अभिनंदन त्यांचे प्रोफेसर्स आणि सहाध्यायींनी खास खाना देऊन केले.
'एन्शंट इंडियन कॉमर्स' हा त्यांच्या प्रबंधाचा दुवा.
'भारतातील जातीव्यवस्थेबद्दल त्यांनी अमेरिकेत मानववंशशास्त्रज्ञांच्या परिषदेत एक प्रबंधदेखील वाचला - कास्ट्स इन इंडिया : देअर मेकॅनिजम, गेनेसिस अँड डेवलपमेंट'.
लगोलग १९१६ मध्ये ते 'ग्रे'ज इन' ह्या लंडनस्थित संस्थेतून बॅरिस्टर आणि 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' मधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवते झाले!
पुण्याचे 'इंटरनॅशनल बुक स्टॉल' हे त्यांचे लाडके दुकान होते. प्रत्येक भेटीत ते तिथून असंख्य पुस्तके घेऊन जात आणि इंटरनॅशनल दीक्षित त्यांचे यथोचित स्वागतही करीत!
'राजगृह' ह्या त्यांच्या दादरयेथील निवासस्थानी त्यांनी स्वत:चे खाजगी ग्रंथालय स्थापित केले होते. त्यासंबंधीचा दुवा -
http://www.youtube.com/watch?v=kFUD_9amtBY&feature=player_detailpage

अशा ह्या प्रकांड पंडिताची किती खरी ओळख आज आहे आणि केवळ जातीचे राजकारण किती आहे हा मनात सलत राहणारा प्रश्न आहे!

-(नतमस्तक्)रंगा

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Apr 2011 - 9:01 pm | निनाद मुक्काम प...

तत्कालीन नेत्यांमध्ये माझ्या मते सर्वात जास्त विद्याभूषित व द्रष्टा नेता व त्यातही महाराष्टामधील म्हणून मला नेहमीच त्यांच्याविषयी आत्मीयता वाटते .
त्यांना माझे वंदन
माझ्या आजोबांचे दैवत रधो कर्वे ह्यांची केस त्यांनी लढली असा उल्लेख ध्यास पर्व मध्ये आहे .त्यात कर्व्यांच्या कार्याचे महत्व जाणणारा हा थोर नेता खरोकारच द्रष्टा होता .
त्यांचे अनुयायी बिग बॉस मध्ये जातीवरून प्रवेश नाकारला म्हणून शिमगा घालतात .तेव्हा त्या बिचार्या राखीला का दोष द्यायचा ?
तिची तर अनाठायी आदळा आपट करणे हे उपजीविकेचे साधन आहे

चित्रा's picture

15 Apr 2011 - 6:18 am | चित्रा

आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन.

पक्का इडियट's picture

15 Apr 2011 - 11:56 am | पक्का इडियट

अभिवादन !!!