संकल्प सिद्धी
मिळेल जीवनात खात्रीने जय.
पहिलं पक्क असावं अंतिम ध्येय.
स्वप्नरंजनातच न व्हावं चकित.
कागदावर ध्येयाच होऊ दे लिखित.
नवी कल्पना नित्य लिखितात भरु दे.
अंतिम ध्येयाला परिपूर्णत्व येऊ दे.
सार्याय कल्पनांची आता योजना बनु दे.
प्राथमिकता महत्ते अनुक्रम ठरू दे.
नुसत्या ध्येयाला ना आरंभ ना शेवट.
पूर्णत्वाची समय सीमा असावी चिवट.
आता ना कशाची वाट पहावी.
तत्काळ कार्याला सुरुवात करावी.
एक ही दिन ना व्यर्थ असावा.
अंतिम ध्येय प्राप्तीतच अर्थ दिसावा.
लिखित ध्येयाच महत्व सर्वास कळावं.
मनाजोग यश सर्वास मिळावं.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ०४/०४/२०११
http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/
प्रतिक्रीया अपेक्षित
प्रतिक्रिया
10 Apr 2011 - 9:49 pm | निनाव
सुंदर. प्रेरित करणारी रचना.
11 Apr 2011 - 11:55 am | मिसळलेला काव्यप्रेमी
नुसत्या ध्येयाला ना आरंभ ना शेवट.
पूर्णत्वाची समय सीमा असावी चिवट
हे आवडले....