संस्कृत भाषा
In reply to जरुर!! खरच आपण रोजच म्हणतो ही by स्पंदना
In reply to संस्कृत बातम्या अजूनही by llपुण्याचे पेशवेll
In reply to संस्कृत बातम्या अजूनही by llपुण्याचे पेशवेll
In reply to संस्कृत बातम्या अजूनही by llपुण्याचे पेशवेll
In reply to इयम आकाशवाण्या: by गोगोल
In reply to जरुर!! खरच आपण रोजच म्हणतो ही by स्पंदना
In reply to प्रामाणिक भावनांशी सहमत परंतु by अवलिया
In reply to प्रामाणिक भावनांशी सहमत परंतु by अवलिया
In reply to सुरस सुबोधा विश्वमनोज्ञा by अमोल केळकर
In reply to सुरस सुबोधा विश्वमनोज्ञा by अमोल केळकर
In reply to मी कै नै लिहिणार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मी कै नै लिहिणार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी काय तसं लिहिणार नाही. कारण मला संस्कृत भाषा अवगत नाही.म्हणुन तर देवभाषा म्हणतात तीला प्रा.डॉ. ;)
In reply to मी काय तसं लिहिणार नाही. कारण by परिकथेतील राजकुमार
In reply to मी कै नै लिहिणार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे शनी, 06/11/2010 - 10:19 आम्ही अगदी पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करतो. सकाळीच उठण्यापासून [उटणे वगैरेसहीत] ते लक्ष्मीपूजनापर्यंत. फक्त सायंकाळी लक्ष्मीपूजनाला गुरुजी नसतात. आम्हीच श्री सुक्तमचे वाचन करतो. नंतर कुटूंबासह फॆन्सी फटाके उडवतो.आता पारंपारिक पद्धतीने श्रीसुक्तम संध्याकाळी मराठीत म्हटले असेल काय असा प्रश्न पडला :) >>>शुद्ध मराठीत देतो घेतो. शुद्ध मराठी म्हणजे कोणती भाषा नक्की? आपलाच नाना (हाणतंय आता विद्यावाचस्पती मला ;) )
In reply to >>>मी काय तसं लिहिणार नाही. by अवलिया
In reply to च्यायला या नानाच्या.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शुद्ध भाषा म्हणजे एका व्यक्तीने दुस-या व्यक्तीशी संवाद करतांना (साधतांना) असा संवाद करणे जो एकमेकांना कळला पाहिजे. मनातील भावभावना आणि सर्व भाषिक व्यवहार करतांना 'संदेशन' व्यवहारात अर्थ समजून घेतांना कोणताही अडथळा न येता शब्दांच्या माध्यमातून जी प्रक्रिया पूर्ण केली जाते त्यास शुद्ध भाषा असे म्हणावे. - प्रा.डॉ.हे भाषेबद्दल झाले. त्याला शुद्ध असे विशेषण न लावताही व्याख्या होते. भाषा म्हणजे एका व्यक्तीने दुस-या व्यक्तीशी संवाद करतांना (साधतांना) असा संवाद करणे जो एकमेकांना कळला पाहिजे. मनातील भावभावना आणि सर्व भाषिक व्यवहार करतांना 'संदेशन' व्यवहारात अर्थ समजून घेतांना कोणताही अडथळा न येता शब्दांच्या माध्यमातून जी प्रक्रिया पूर्ण केली जाते त्यास भाषा असे म्हणावे ही खरी व्याख्या. उगाच शुद्ध शब्दाच्या कुबड्या का? आणखी तुम्ही शुद्ध मराठी भाषा असे विधान केले. म्हणजे परत त्यातही घोळच नाही का? आपलाच नाना
In reply to अभिमान वेगळा.. by गवि
In reply to अभिमान वेगळा.. by गवि
In reply to संस्कृत भाषा शिकण्यास by वेताळ
In reply to संस्कृत भाषा शिकण्यास by वेताळ
In reply to संस्कृत भाषा शिकण्यास by वेताळ
कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते.ती मृत भाषा आहेच. लॅटिनही मृत भाषा आहे.पण अशा जुन्या भाषांचा अभ्यास करणारे अनेक जण आहेत जगभरात.येथे हल्लीच भरलेल्या संस्कृत मेळाव्यात अनेक संस्कृत पुस्तके खपली.काही वक्ते(एस्. पी. बालसुब्रमण्यम) तर संस्कृतमध्येच बोलले.
In reply to प्रा.डॉ. आणि गवि यांचे विचार by नगरीनिरंजन
In reply to प्रा.डॉ. आणि गवि यांचे विचार by नगरीनिरंजन
In reply to +१ Agree with Mahesh. भले by शरभ
In reply to +१ Agree with Mahesh. भले by शरभ
In reply to खरे दुखणे...! by इन्द्र्राज पवार
In reply to पण by सहज
In reply to पण by सहज
In reply to जींकलेस मीत्रा.. by महेश काळे
In reply to जींकलेस मीत्रा.. by महेश काळे
In reply to :-) by सहज
In reply to पण by सहज
In reply to लई भारी by प्रचेतस
In reply to पण by सहज
In reply to आज इतके तरूण संस्कृत लेखन by शरदिनी
In reply to काय हरकत आहे असा नोंदवायला? by पिलीयन रायडर
In reply to आधीच मृत + उगाच भीती by नितिन थत्ते
In reply to आधीच मृत + उगाच भीती by नितिन थत्ते
In reply to ठीक आहे. हे मान्य की भाषा by पिलीयन रायडर
In reply to आधीच मृत + उगाच भीती by नितिन थत्ते
संस्कृत मरतेय हे विधान धाडसाचे आहे. वापरात असलेली भाषा मरत असेल तर दु:ख करणे योग्य आहे. जी वापरात नाही ती भाषा मरत आहे म्हणजे काय हे समजले नाही.काही तुरळक (आणि बहुधा बहुतांशी जाणूनबुजून घडवून आणलेले) अपवाद वगळता संस्कृत ही कोणाचीही मातृभाषा नाही आणि व्यवहारभाषा किंवा रोजवापरातली भाषाही नाही, कधी वापरली गेली तरी तिच्यात आता कालानुरूप नैसर्गिक बदल होत जात नाहीत म्हणजेच ती प्रवाही नाही किंवा अश्मीभूत आहे (असे वाटते; चूभूद्याघ्या.), कोठल्यातरी काळात ठरवून दिल्या गेलेल्या (कदाचित तत्कालीन चालू पण आता पुरातन झालेल्या) 'फॉर्म'ला अनुसरून ती आज (वापरली गेलीच तर) वापरली जाते, अशा काही निकषांच्या आधारावर ती मृत भाषा आहे असा दावा असल्यास त्यात निदान मला तरी फारसे काही वावगे दिसत नाही. ('मृत' याचा अर्थ 'नामशेष' असा होत नसावा असे वाटते.) अर्थात याचा अर्थ तिच्या संवर्धनाचे प्रयत्न होऊ नयेत, किंवा कोणी ती शिकू नये, किंवा तीत संभाषणकौशल्य अवगत करण्याचा प्रयत्न करू नये असा मुळीच होऊ नये. राष्ट्राच्या सर्वच वारशांप्रमाणे संस्कृतचे संवर्धन हे इष्ट आहे, आणि (स्वतःची मातृभाषा नसलेल्या कोणत्याही भाषेप्रमाणे) हौशीने कोणी संस्कृत शिकल्यास आणि विशेषतः तीत संभाषण करता येण्याइतकी प्रगती केल्यास ते स्तुत्यच आहे. आणि त्यातूनही पुढे जर अशा संस्कृतात संभाषणप्रभुत्व असलेल्या हौशी मंडळींची वीण वाढत गेली, तर संस्कृत पुन्हा प्रवाही बनणेही अगदीच अशक्य नाही. (हिब्रू या मृतभाषेचे इस्राएलमध्ये अशाच प्रकारे प्रयत्नपूर्वक आणि यशस्वी पुनरुज्जीवन होऊन ती आता केवळ राष्ट्रभाषाच नव्हे, तर पुढील पिढीतील बहुतांची मातृभाषाही झाली आहे, आणि व्यवहारभाषा तर आहेच आहे, असे ऐकलेले आहे. तेव्हा हे अगदीच अशक्य नसावे. अर्थात इस्राएलने केले म्हणून हे संस्कृताच्या बाबतीच घडलेच पाहिजे किंवा घडवून आणलेच पाहिजे असे म्हणण्याचा कोणताही उद्देश नाही; केवळ ही अशक्यकोटीतली गोष्ट नाही एवढेच म्हणायचे आहे. अर्थात हिब्रूचे पुनरुज्जीवन म्हणजे यिडिशसारख्या युरोपीय ज्यूंच्या पारंपरिक, जिवंत आणि समृद्ध भाषेचे मरण ठरले या तोट्याकडेही त्याचबरोबर दुर्लक्ष करून चालणार नाही.) हे सर्व जर स्वेच्छेने घडू शकले, तर त्यात काही गैर नाही. (तेवढे संवर्धन सोडून. राष्ट्रीय पातळीवर ते होणे गरजेचे आहेच. जनांमधील प्रसार हाच भाग काय तो स्वेच्छेचा भाग आहे.) आणि लोकांच्या हौशीतून या भाषेचा प्रसार होऊन पुन्हा तिच्यात प्रवाहित्व येऊ शकले, तर ते स्तुत्यच ठरेल. पण हे सर्व होण्यासाठी आपण नेमके काय, कशाकरिता आणि कसे करीत आहोत याचे प्रत्येक संबंधिताने भान ठेवणे गरजेचे आहे. अनेकदा संस्कृतचे तथाकथित प्रचारकच जनतेतील संस्कृतविषयी अनास्थेला (आणि कधीकधी उघड द्वेषालाही) कारणीभूत ठरतात असे दिसून येते. संस्कृतच्या संवर्धनासाठी प्रचारकांची नव्हे तर चांगल्या शिक्षकांची आवश्यकता आहे असे वाटते. संस्कृत शिकणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य मुळीच नाही, आणि संस्कृतचा प्रचार करणे हे तर नाहीच नाही. दिसतील त्या दहा जणांना पकडून कंटाळा येईस्तोवर 'संस्कृत का शिकली पाहिजे' हे (काहीबाही कारणांसहित) ऐकवून 'संस्कृतचे महत्त्व पटवून देणे' (थोडक्यातः पकवणे) याइतके मूर्खपणाचे दुसरे काही नसावे. हे तर लोकांवर संस्कृत लादणे झाले. ते उपयोगाचेही नाही आणि योग्य तर नाहीच नाही. मात्र ज्याला कोणाला संस्कृत शिकण्याची मनापासून इच्छा असेल, त्याला ती शिकण्याची सुविधा आणि ती उत्तम प्रकारे आणि जीव लावून शिकवू शकणाराच नव्हे, तर तिच्याबद्दल गोडीही निर्माण करू शकणारा शिक्षक उपलब्ध होऊ शकल्यास ते लाखमोलाचे ठरेल. येथे आयडियॉलॉजी नाही तर भाषेविषयी तळमळ कामाची आहे. दुसरे म्हणजे, 'संस्कृत शिकणे' किंवा 'संस्कृत अवगत असणे' म्हणजे काय, हेही ती शिकण्यास उत्सुक असणारास स्पष्ट असणे गरजेचे आहे. चारदोन संस्कृत सुभाषिते (अगदी अर्थासहसुद्धा!) मुखोद्गत असणे आणि ती पंक्तीत म्हणून दाखवता येणे म्हणजे संस्कृत अवगत असणे नव्हे. किंवा संस्कृत व्याकरणाचे नियम, धातूंचे गण आणि धातुरुपावली, विभक्तिप्रत्यय ('राम', 'देव', 'वन' किंवा 'माला' - 'खानेवाली या पहननेवाली' हा मुद्दा येथे गौण आहे - चालवता येणे वगैरे) हे पाठ असणे म्हणजेही संस्कृत अवगत असणे नव्हे. व्याकरण हे भाषा कशी आहे याचा अभ्यास करण्याकरिता ('भाषेचे वर्णन करण्याकरिता') उत्तम साधन असले, तरी व्याकरण म्हणजे भाषा नव्हे. 'भाषा अवगत आहे' हे अगदी प्राथमिक पातळीवरसुद्धा म्हणता यायला त्या भाषेतला अगदी सोपा का होईना, पण असाच एखादा उतारा कानावर पडल्यास त्याचा अर्थ विशेष प्रयत्नांशिवाय समजणे आणि प्रसंगी अगदी जुजबी का होईना, पण वेळ निभावण्याइतकी चारदोन वाक्ये अंतःस्फूर्तीने बोलता येणे एवढे तरी किमान आवश्यक आहे, असे निदान मला तरी वाटते. ती चारदोन वाक्ये शक्य तितकी अचूकपणे म्हणता येण्यासाठी नवशिक्यास अर्थातच व्याकरणाची मदत होऊ शकते, पण ते व्याकरणाचे नियम न आठवतासुद्धा अंतःस्फूर्तीने आणि आत्मविश्वासाने आतून येणारे शब्द हे आपोआप त्या नियमांच्या लायनीस लागणे, हे खरे भाषा येणे! या निकषाने मला नाही वाटत आपल्यापैकी खूप जणांना संस्कृत येत असेल म्हणून. अगदी तीन वर्षे शाळेत शिकलो असलो तरीही. निदान मला तरी नाही येत. अशा परिस्थितीत, संस्कृत येत नसताना 'संस्कृत येते' असे म्हणण्यात काहीच हशील नाही. एक तर ती स्वतःचीच फसवणूक आहे, आणि त्यातून संस्कृत 'वाचणे' (हे जे काही असेल ते) हेही शक्य नाही. असे करण्याला 'निव्वळ एक मूर्ख गिमिकबाजी' यापलीकडे काहीही अर्थ नाही.
In reply to सहजराव तुमच्या पत्रात थोडी by मी ऋचा
In reply to सहजराव तुमच्या पत्रात थोडी by मी ऋचा
In reply to संस्क्रुत मधे अरे वाअ !!! हे by मुलूखावेगळी
In reply to संस्क्रुत मधे अरे वाअ !!! हे by मुलूखावेगळी
In reply to सहजराव तुमच्या पत्रात थोडी by मी ऋचा
In reply to सहजराव तुमच्या पत्रात थोडी by मी ऋचा
In reply to ॠचा by चिंतामणी
In reply to संस्कृत अजून जिवंत आहे! by पैसा
In reply to आठवण by नितिन थत्ते
In reply to संस्कृत by आजानुकर्ण
In reply to ऐका हो ऐका !!! by पिलीयन रायडर
In reply to मला या 'गीर्वाणवाणी'चा (देवांच्या भाषेचा) अभिमान आहे by सुधीर काळे
In reply to हिंदी -संस्कृत - मराठीतले आवाहन by गुंडोपंत
In reply to ये हुई ना बात! by सहज
In reply to ये हुई ना बात! by सहज
संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.सध्या एक-दोन आठवडे घाईत आहे, पुढील उत्तराचे मराठी भाषांतर दिले नाही. येथील कित्येक सदस्यांना संस्कृत भाषा अवगत आहे, त्यांनी मराठीत भाषांतर करून येथेच द्यावे, ही विनंती. म्हणजे येथील थोड्या सदस्यांना अरबी-फारसी वगैरे अवगत असून संस्कृत अवगत नाही, त्यांना मराठीत वाचायला सोयीचे जाईल. (नाहीतरी यात मराठी शब्दांची भरणा आहे. संस्कृत-स्वभाषकाने लिहिलेली ही वाक्ये नव्हेत, मराठीभाषकाने "सम्प्रतिवार्ता: श्रूयन्ताम्" धर्तीवर लिहिलेले परिच्छेद आहेत. मराठीभाषक नसेल, भारतातल्या दुसर्या कुठल्या मातृभाषेचा संस्कृत जाणकार असेल, त्याला समजायला जडच जाईल.) - - - न मर्यादितुम् इच्छामि कस्यचिदपि वाक्स्वातंत्र्यम् । तथापि । जनगणनाप्रसङ्गे उत्तराणि सत्यानि एव ददातु, तानि रम्याणि भवेयु: न वा भवेयु: | अवगच्छामि यावदहं "[प्रथमभाषाभिन्ने] के भाषे अन्यतरे सुतरां ज्ञाते?" इति पृच्छन्ति । ये के ते भाषे, ते एव लिखितव्ये, इति प्रार्थना मे भवतश् चरणयो: । भारतशासनं करोति जनगणनां, तस्या अभिप्रायः सत्यपरिस्थितिज्ञानम् - ध्येयानि न । यानि ध्येयानि शिरोधार्याणि, न तु वर्तमानानि, तानि लिखितव्यानि ध्येयकल्प-आलेखेषु, गन्तव्यमार्गदर्शक-आलेखेषु । संस्कृतभाषाया: पठनपाठने भूयेयाताम् इत्येव धारणा मे । तथापि ज्ञातुम् इच्छामि "_अधुना_ सा भाषा सुतरां कतिपयानि जनानि जानन्ति?" इति । यथा : कुटुम्बेषु बालका: सुनियंत्रिता: सुदृढाश् च इति मम दृढा कामना । तथापि प्रार्थये - "सर्वम् व्यवस्थितं कुशलं कुटुम्बे" इति न लिखितव्यं ईप्सिततमम् । लिखितव्यं सत्यं यथा कथं वा भवेद् भवतः कुटुम्बम् _अधुना_ । ईमेल-पत्राणि पठामि कानि कानि दिने दिने - तत्र रुदन्ति केऽपि - न कुर्यात् चेत् तत्र संस्कृतभाषाया: उपसंख्यानम्, "मृता संस्कृतभाषा" इति घोषणां कुर्येयु: । अस्ति भो: कोऽपि भारतस्य शासने "मृतभाषाघोषणाविभागः" नामा? सविनयो, धनञ्जयः । - - -
In reply to उत्तर by धनंजय
जरुर!! खरच आपण रोजच म्हणतो ही