सशांचे वर्ष

प्रदीप's picture
प्रदीप in जनातलं, मनातलं
5 Feb 2011 - 8:12 am

ह्या महिन्याच्या तीन तारखेपासून चिनी नववर्ष सुरू झाले. हे वर्ष सशाचे आहे.

ससा भित्रा असतो, सावध असतो. त्यामुळे इतर बलवान जनावरांप्रमाणे तो मार्गक्रमणा करीत नाही. थोडे पुढे जाणे, मागे वळून पहाणे, असे त्याचे चालते. ह्याचा हवाला देऊन चिनी भविष्यवेत्ते म्हणतात की ह्या वर्षी जगातील स्टॉक मार्केट्स, प्रॉपर्टी मार्केट्स इ. 'रोलर-कोस्टर' वर राहतील. हे असे होईल किंवा नाही, हे पुढे दिसेलच.

मिपापुरते सांगायचे झाल्यास ह्यावर्षी ज्यांना स्वतःच्या एका आय. डी. ने लिखाण करण्यास, चर्चेत भाग घेण्यास, प्रतिसाद देण्यास भीति वाटते, असे सशासारखे काळीज असलेले काही सभासद, आता बिळातून बाहेर येऊन मुक्त संचार करू लागतील!

या, सशांनो या!

विनोदजीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

सहज's picture

5 Feb 2011 - 8:29 am | सहज

किमान आभाळ कोसळले आहे असा दंगा नक्की होणार तर!! :-)

या निमित्ताने चीनसारख्या देशांमधे पण भविष्य वगैरे सांगितले जाते याची माहिती मिळाली.

हे वर्ष सशाचे असेल तर मागचे वर्ष कोणाचे होते? एकंदर असे किती प्रकार आहेत ? त्या त्या वर्षांचे साधारण भविष्य काय असते? गेल्या काही वर्षांमधे याचा कितपत पडताळा आला यावर एखादा मस्त लेख लिहा अशी मी विनंती करतो.

मिपावरचे सशासारखे काळीज असलेल्यांना प्रदिप यांचे आवाहन किती उद्युक्त करते हे येणारा काळच ठरवेल ! :)

बाकी, एक ओळी धाग्यावरुन सहाओळी धाग्यावर आल्याबद्दल प्रदिप यांचे अभिनंदन ;)

नंदन's picture

5 Feb 2011 - 8:42 am | नंदन

Gung Hay Fat Choy! - (नववर्षाच्या) हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.
अर्थात वर प्रदीप ह्यांनी म्हटल्याप्रमाणे ह्या वर्षात Gung-ho अ‍ॅटिट्यूडपेक्षा बहुतेक सावध दृष्टिकोन दिसावा.

मिपापुरते सांगायचे झाल्यास ह्यावर्षी ज्यांना स्वतःच्या एका आय. डी. ने लिखाण करण्यास, चर्चेत भाग घेण्यास, प्रतिसाद देण्यास भीति वाटते, असे सशासारखे काळीज असलेले काही सभासद, आता बिळातून बाहेर येऊन मुक्त संचार करू लागतील!

या, सशांनो या!

--- यावरून रन रॅबिट रन मधल्या काही ओळी आठवल्या :)

Run rabbit - run rabbit - Run! Run! Run!
Run rabbit - run rabbit - Run! Run! Run!
Bang! Bang! Bang! Bang!
Goes the farmer's gun.
Run, rabbit, run, rabbit, run.
Run rabbit - run rabbit - Run! Run! Run!
Don't give the farmer his fun! Fun! Fun!
He'll get by
Without his rabbit pie
So run rabbit - run rabbit - Run! Run! Run!

नंदनशेट कविता मस्त हो :)
बाकी सहजरावांशी सहमत.

शुचि's picture

5 Feb 2011 - 8:50 am | शुचि

हे सशाचं म्हणजे २०१२ ड्रॅगनचं. :)
का माहीत नाही पण - आपल्या राशींमध्ये देखील लागोपाठच्या राशींमध्ये कमालीचा विरोधाभास दिसून येतो. तसाच चायनीज राशींतही असावा.

नरेशकुमार's picture

5 Feb 2011 - 8:54 am | नरेशकुमार

अरे व्वा !
मला ससा खुप आवडतो.
चला तर हे वर्ष माझ्या आवडत्या सशुल्याच्या नावाने.

आमच्या इथे टर्कीश हाटेलात छानशी रॅबीट डिश मिळते, आज खाउन नववर्ष साजरं करावं म्हणतो. सशांना शुभेच्छा. ;-)

कवितानागेश's picture

6 Feb 2011 - 12:49 pm | कवितानागेश

पुढच्या वर्षी 'ड्रॅगन डिश' खायला मिळावी यासाठी अत्तापासूनच शुभेच्छा! ;)

कच्ची कैरी's picture

5 Feb 2011 - 10:43 am | कच्ची कैरी

सशा रे सशा दिसतोस कसा? ,ससा हा ससा आणि कापूस जसा ...,कोणास ठऊक कसा पण शाळेत गेला ससा ...
यासारखे सशाचे गाणे म्हणुन हा दिवस साजरा करेल. खसखस आणि बत्तीशी हहाअहा

पिवळा डांबिस's picture

6 Feb 2011 - 1:01 pm | पिवळा डांबिस

हे वर्ष सशाचे आहे.
म्हणजे या वर्षी चिक्कार पोरं जन्माला येणार तर!!!
सशांचा तो देखील एक विशेष आहे ना?:)

नवविवाहित मिपाकरांना शुभेच्छा!!!
;)

रेवती's picture

6 Feb 2011 - 10:12 pm | रेवती

नाही नाही. तसं नाही.
२००३ साली जे कुठल्या प्राण्याचं वर्ष होतं ते म्हणे फारच चांगलं.
मुलं निर्भीड आणि हुषार होतात (मोठी झाल्यावर);).
माझ्या नवर्‍याच्या हापिसात एकूण एक चायनिजांना पहिली, दुसरी मुलं झाली होती.
गम्मत म्हणजे सगळ्या मुलीच होत्या. आपल्या मुली बावळट नसणार म्हणून आनंद झाला होता बरेच जणांना.
सश्याच्या कळजाची मुलं शक्यतो कोणाला नको असणार.:)

मी कधी चीन ला गेलो नाहि पण एक मित्र २००३ साली चीन मधील जिवन बघायला गेला होता. फक्त मिपा करांसाठि म्हणुन त्याला फोन करुन विचारले व हि माहिती मिळाली:
१) चीन मधील लोकं निवांत असतात
२) चीन मधे तशी गरीबी नाहि
३) श्रीमंत लोकं गाड्यां मधुन फिरत असतात.
४) लोकसंख्या बरीच असली तरी मुलं तशी कमी आहेत आणि लहान आहेत !
५) ससा हा त्यांचा आवडता प्राणि आहे.

पंगा's picture

7 Feb 2011 - 12:44 am | पंगा

सशांचा तो देखील एक विशेष आहे ना?

चूक! सशांचे अंकगणित चांगले असते हे त्यांचे वैशिष्ट्य आहे, असे ऐकलेले आहे. गुणाकार तर फार पटापट करतात म्हणे!

म्हणजे या वर्षी जन्माला येणारी मुले ही गणितात चांगली असतील असे धरायला हरकत नाही.

गोगोल's picture

8 Feb 2011 - 5:44 am | गोगोल

फिबोनाकी सिरीज चा शोध पण कुठल्यातरी सशा नेच लावला.

रमताराम's picture

6 Feb 2011 - 11:25 pm | रमताराम

यावरून आमचा हा अनुभव आठवला.

टारझन's picture

7 Feb 2011 - 10:41 am | टारझन

हा हा हा ... प्रदिप यांनी हळुवार चिमटे काढलेत .. :) आता स्वःता ला वडिल वडिल सॉरी .. बाप बाप समजणारे सशे घावतील .. आम्हाला सश्याचं मटण खुप आवडते . आमच्या कंपनीच्या आवारात गार्डण मधे एका कंपाउंड मधे खुपसे ससे ठेवले आहेत. कंपाउंड पाशी गेलं की काही तरी खायला मिळेल या आशे ने ते पळत येतात. :) येत्या विकांताचा मेनु फिक्स करण्यासाठी मी एक बॅग घेऊन जाणार आहे. ससा जवळ आला की डयरेक्ट बॅग मधे :)
कसे ?

( ससा प्रेमी ) टारझन