किशन बिहारी नुर...१

अश्फाक's picture
अश्फाक in जे न देखे रवी...
25 Dec 2010 - 9:50 pm

सब मिपाकर्स को सलाम ,
आज पर्यन्त जितके ही शायर पाहिले जे जन्माने मुस्लिम नसून ही उत्तम शायरी करतात त्यात सर्वोत्तम म्हणजे

किशन बिहारी नुर

बहुतेक लोकांसाठी नाव नविन असेल , पन शेर वाचल्यानंतर अपेक्षापुर्ती नक्किच होइल .

तेज़ हो जाता है खुशबू का सफर शाम के बाद !
शहर में फूल भी खिलते हैं, मगर शाम के बाद!!
( आजकाल शहरांच्या व्यस्त जिवनात सुखाचे फुरसतिचे क्षण शोधायचे तर शाम के बाद च )

उससे दरयाफ्त न करना कभी दिन के हालात! ( दरयाफ्त = कळवने )
सुबह का भूला जो लौट आया हो घर शाम के बाद!!
( या शेर मधे शायर ने जगायचे एक सुत्र छान समजवल्व आहे , जर आपल्यातला कोनी मित्र नातेवाईक वाट चुकला ( व्यसन ) वगैरे आणि तो पुन्हा चुक दुरुस्त करुन आपल्यात सामिल होत पहात असेल तर त्याला भुतकाळाची चुकांची उजळनी < तु असे केल्याने आम्ही असा त्रास भोगला वगैरे > न करुन देता सहजच सामिल करुन घ्यावे कारण सुबह का भुला अगर शाम घर आ जाये तो उसे भुला नही कहते )

दिन तेरे हिज़र में कट जाता है जैसे-तैसे! ( हिज़र = जुदाइ )
मुझसे रहती है खफा मेरी नज़र शाम के बाद!! ( स्वतशीच नाराज )

कद से बढ जाए जो साया तो बुरा लगता है ! ( सावली ( म्हणजे सावली सारखे असनारे ) आपल्या उंची पेक्षा वाढु नये )
अपना सूरज वो उठा लेता है हर शाम के बाद!!

तुम न कर पाओगे अंदाज़ा तबाही का मेरी!
तुमने देखा ही नहीं कोई खंडर शाम के बाद!!
( खंडर = पडका वाडा / अवषेश )

मेरे बारे में कोई कुछ भी कहे सब मंजूर,!
मुझको रहती ही नहीं अपनी खबर शाम के बाद!
! ( वा वा वा )

ये ही मिलने का समय भी है बिछडने का भी!
मुझको लगता है बहुत अपने से डर शाम के बाद!!

( संध्याकाळ होतांनाच मि स्वत ला भेटतो आणि स्वतशीच वेगळा सुध्दा होतो , म्हणुन या वेळेला मी फार घाबरतो.)

तीरगी हो तो वजूद उसका चमकता है बहुत,! ( तीरगी = अंधार )
ढूँढ तो लूँगा उसे "नूर" मगर शाम के बाद.........
( अंधारात त्याचे व्यक्तैमत्व चकाकते जणु स्वयंप्रकाशीत आहे )

वन्स अगेन मिपाकर बोअर होणार नसतील तर सिरिज काढतो म्हणतो......

हे ठिकाण

प्रतिक्रिया

शुचि's picture

25 Dec 2010 - 10:13 pm | शुचि

वा सुरेखच!

पंगा's picture

25 Dec 2010 - 10:24 pm | पंगा

आज पर्यन्त जितके ही शायर पाहिले जे जन्माने मुस्लिम नसून ही उत्तम शायरी करतात

अधोरेखित भाग समजला नाही. या दोन गोष्टींचा नेमका परस्परसंबंध काय?

जन्माने मुस्लिम नसलेल्या एखाद्या व्यक्तीने उत्तम शायरी करण्यात नेमके विशेष काय आहे? (कोणत्याही व्यक्तीने उत्तम शायरी करणे हे विशेष मानण्यासारखे असले तरीही.)

बाकी शेरोशायरीत काही गम्य नसल्याने उर्वरित लेखाबद्दल पास.

'पण जे मुस्लिम नाहीत अन तरिही उर्दू भाषेत पारंगत आहेत असे शायर' हे अश्फाक यांना म्हणायचे आहे.

पण माझे बरेचसे उत्तर भारतिय मित्र मैत्रिणी जे हिंदू आहेत त्या पैकी काहींचे प्राथमिक शिक्षण उर्दू भाषेत झाले आहे. अन साधारण पणे मुस्लिम लोकांची मातृभाषा ही ठोबळ पणे अथवा ठसठशीतपणे उर्दूच असते

पंगा साहेब तुम्ही खरेच खोडसाळपणा करत आहात असे दिसते त्यामुळे तुम्हाला उत्तर द्यावे की न द्यावे या संभ्रमात असून ही प्रतिसाद देत आहे

उर्दू जुबान की नजाकत, नुद्रत, अदब, रवानी, शाही अदब और गुफ्तगु करने का अंदाज मुसलमानोंमें दिखाई देता है क्युं की यह जुबान उनकी मादरी-जुबान है, मुसलमान उर्दू अल्फाजोंको और लफ्जोंको आसानी से समझते है
कुछ समझे जनाब ?? या आपको बेवजेह बहेसबाजी और उलझने में मजा आता है ?? :-?

पंगा's picture

26 Dec 2010 - 3:52 am | पंगा

'पण जे मुस्लिम नाहीत अन तरिही उर्दू भाषेत पारंगत आहेत असे शायर' हे अश्फाक यांना म्हणायचे आहे.

ते चांगले कळले. आणि यातील 'मुस्लिम नाहीत अन तरीही' या भागाबद्दल तीव्र आक्षेप आहे. 'मुस्लिम नसूनही' यात काही विशेष आहे असे वाटत नाही. 'उर्दूवर (किंवा कोणत्याही भाषेवर) प्रभुत्व असणे' ही विशेष गोष्ट असली तरी.

पण माझे बरेचसे उत्तर भारतिय मित्र मैत्रिणी जे हिंदू आहेत त्या पैकी काहींचे प्राथमिक शिक्षण उर्दू भाषेत झाले आहे.

नेमका मुद्दा!

अन साधारण पणे मुस्लिम लोकांची मातृभाषा ही ठोबळ पणे अथवा ठसठशीतपणे उर्दूच असते.

अनेक मुसलमानांची मातृभाषा उर्दू असू शकते हे मान्य आहे, परंतु तरीही हे विधान सरसकटपणे लागू असण्याबद्दल साशंक आहे. पण जरी तूर्तास ते मानले, तरी त्याने काहीही सिद्ध होते असे वाटत नाही.

उर्दू जुबान की नजाकत, नुद्रत, अदब, रवानी, शाही अदब और गुफ्तगु करने का अंदाज मुसलमानोंमें दिखाई देता है क्युं की यह जुबान उनकी मादरी-जुबान है, मुसलमान उर्दू अल्फाजोंको और लफ्जोंको आसानी से समझते है... कुछ समझे जनाब ??

उर्दूचे उपरोल्लेखित नजाकतादि गुण समजण्यासाठी मुसलमान असण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. हे गुण समजू शकणारे आणि वाखाणणारे अनेक बिगर-मुस्लिम असावेत (मग भले ते स्वतः शायरी करत असोत वा नसोत). पैकी काही साहित्यिकही असावेत. उर्दू साहित्यात किंवा काव्यात गती नसल्यामुळे फारशी नावे फेकू शकणार नाही, परंतु खुशवंत सिंह किंवा पाकिस्तानचे सर्वात पहिले राष्ट्रगीत खुद्द कायदेआझमांच्या विनंतीवरून रचणारे (त्याकाळी) लाहोरस्थित उर्दू कवी जगन्नाथ आझाद हे मुस्लिम होते असे वाटत नाही.

यात खोच अशी आहे, की साधारणतः उत्तरप्रदेशापासून (किंवा कदाचित काही अंशी बिहारपासूनसुद्धा - नक्की खात्री नाही) ते पश्चिम पंजाबपर्यंतच्या पट्ट्यात उर्दू भाषा बर्‍याच अंशी प्रचलित आहे, एवढेच नव्हे, तर या पट्ट्यात दीर्घकाळपर्यंत उर्दू साहित्याची आणि काव्याची परंपरा होती, तिला प्रतिष्ठा होती, आणि कदाचित काही अंशी अजूनही आहे. या भागातून अनेक चांगलेचांगले उर्दू साहित्यिक आणि कवी झाले, त्यात अनेक मुस्लिम होते तसेच बिगरमुस्लिमसुद्धा होते. (अधिक माहितीअभावी नावे फेकू शकणार नाही; क्षमस्व.) आणि विशेषकरून स्वांतंत्र्यपूर्व काळात ज्या इलाख्यात राज्यकारभाराकरिता नेटिवांची सामान्य संपर्कभाषा ही उर्दू (किंवा उर्दूशी अतिशय जवळीक साधणारी आणि लिपीसाधर्म्यही असणारी हिंदुस्थानी) होती आणि रहिवाशांत मुस्लिम आणि बिगरमुस्लिम दोन्ही मोठ्या प्रमाणात होते, त्या काळात यात आश्चर्यजनक असे काही नव्हते. (पंजाबात - विशेषतः पंजाबच्या आज पाकिस्तानात असलेल्या भागात - अनेक चांगले उर्दू साहित्यिक झाले आणि त्यांत अनेक हिंदू व शीखही होते असेही ऐकलेले आहे. पुन्हा, माहितीअभावी अधिक तपशील पुरवू शकणार नाही.)

यात प्रश्न धर्माचा नाही, मातृभाषेचाही नाही, तर भाषेतील रसाचा आणि भाषेशी परिचयाचा आहे. ज्यांना असा परिचय होता किंवा परिचयाची संधी होती, जे त्या वातावरणात वाढले आणि ज्यांना त्या भाषेत आणि शायरीत रसही होता, ते चांगले शायर बनले. यात त्यांच्या मुस्लिम असण्यानसण्याचा काहीही संबंध नाही.

उलटपक्षी, अनेक मुसलमानांचा उर्दूच्या कोणत्या ना कोणत्या रूपाशी मातृभाषा म्हणून किंवा अन्य स्वरूपात संबंध असेलही, पण त्यामुळे उर्दूच्या उपरोल्लेखित नजाकतादि गुणांशी त्यांचा सरसकटपणे बाय डिफॉल्ट संबंध असतो किंवा ते ते सरसकटपणे अधिक चांगल्या रीतीने समजू शकतात, हे जरा धाडसी विधान आहे. भेंडीबाजारच्या सामान्य मुसलमानांत किंवा हैदराबादच्या सामान्य दख्खनी मुसलमानांत नेमके कशा प्रकारचे उर्दू बोलले जाते, याचीही थोडीफार कल्पना आहे. पण तो वेगळा विषय आहे. असो.

तसेही, 'मुसलमानांची भाषा उर्दू आहे' किंवा 'उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे' हे दोन्ही गैरसमज आहेत. (आणि निदान काही अंशी तरी हे गैरसमज राजकीय कारणांकरिता सोयिस्करपणे वापरले आणि पसरवले गेल्याचा इतिहास आहे.) एक म्हणजे भाषांमध्ये 'हिंदू भाषा', 'मुस्लिम भाषा', 'तमक्या धर्माची/जातीची भाषा' असे काहीही नसते. मग भलेही ती भाषा बोलणारांपैकी बहुसंख्य लोक एका विशिष्ट धर्माचे अथवा जातीचे असोत. दुसरे म्हणजे, भारतीय उपखंडातील मुसलमानांची भाषा उर्दू आहे हेही सरसकटपणे खरे नाही. (ती तशी आहे हा बॅ. जीनांचा कळीचा मुद्दा होता, आणि त्यानुसार 'उर्दू आणि फक्त उर्दू हीच पाकिस्तानची राष्ट्रभाषा राहील, आणि हे न मानणारे राष्ट्राचे शत्रू आहेत' अशी ठाम भूमिका त्यांनी घेतल्याबद्दल वाचलेले आहे. परिणाम काय झाले ते आपण पाहतोच. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर थोड्याच अवधीत पूर्व पाकिस्तानात याला कडकडीत विरोध करणारी आंदोलने सुरू झाली. किंबहुना पूर्व पाकिस्तानातील असंतोषाच्या प्रमुख कारणांपैकी 'उर्दू भाषा लादणे' हे एक होते. असो.) तमिळनाडूतील किंवा केरळमधील बहुसंख्य मुसलमानांची भाषा ही तमिळ किंवा मलयाळम असावी, आणि उर्दूचा गंध त्यांपैकी (असलाच तर) फार थोड्यांना (आणि तोही मोडक्यातोडक्या स्वरूपात) असावा.

सरतेशेवटी, 'अमूकतमूक हा बिगरमुस्लिम असूनही उत्तम उर्दू शायर आहे' या वाक्यात जी 'बिगरमुस्लिमांकडून सामान्यतः उर्दूवर प्रभुत्वाची अपेक्षा नसते' छापाची अर्थच्छटा आहे, ती खटकणारी आहे. (ती तथ्यास धरून नाही, ही बाब वेगळीच.) उर्दूवर किंवा उर्दूवरील प्रभुत्वावर कोणत्याही समाजाची मक्तेदारी नाही. इतर कोणत्याही भाषेवर किंवा तिच्यावरील प्रभुत्वावर किंवा प्रभुत्वाच्या अभावावर कोणाची मक्तेदारी नाही, त्याचप्रमाणे. ('उर्दूच्या नजकतीची मुसलमानांना नैसर्गिक जाण असते' हे 'संस्कृतच्या गोडव्याची ब्राह्मणांना नैसर्गिक जाण असते' किंवा 'ब्राह्मणांचे उच्चार निसर्गतःच शुद्ध असतात (पक्षी: इतरांचे नसतात)' याइतकेच - आणि अशी विधाने केली गेलेली ऐकलेली आहेत आणि असे गैरसमज प्रचलित असल्याबद्दल कल्पनाही आहे - बिनबुडाचे वाक्य आहे. आणि म्हणूनच 'अमूकतमूक बिगरमुस्लिम असूनही उत्तम उर्दू शायर आहे', हे आक्षेपार्ह वाटते. थोडक्यात, 'तेथे पाहिजे जातीचे' छापाचे विधान.)

समांतर उदाहरण द्यायचे झाल्यास, डॉ. यू. म. पठाण हे मराठी संतवाङ्मयाचे अभ्यासक आहेत, आणि या क्षेत्रातला त्यांचा अधिकार निर्विवाद आहे. त्यांचा या विषयातील व्यासंग आणि अभ्यास वाखाणण्याजोगा आहे. परंतु उद्या जर कोणी 'ते मुसलमान असूनही त्यांचा मराठी संतवाङ्मयाचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे' असे विधान केले, तर ते केवळ अन्याय्यच नव्हे, तर त्यांच्यासाठी अपमानास्पद ठरेल असे मला वाटते. त्यांचा व्यासंग किंवा त्यांचा अभ्यास हा व्यासंग किंवा अभ्यास म्हणून वाखाणण्याजोगा आहे. त्यात त्यांच्या मुसलमान असण्याचा काही संबंध येत नाही, आणि त्यांचे व्यक्तिगत आयुष्यात मुसलमान असणे हा त्या व्यासंगात कोणत्याही प्रकारे 'हँडिकॅप' मानता येऊ नये (तसा 'हँडिकॅप' मानणे हे डॉ. पठाणांकरिताच नव्हे, तर समस्त मुसलमान समाजाकरिता अपमानास्पद आहे.), की जेणेकरून त्यावर मात करून हा व्यासंग केल्याने तो विशेष कौतुकास्पद ठरावा. तसेच आहे हे.

पंगा साहेब तुम्ही खरेच खोडसाळपणा करत आहात असे दिसते

उलट मी मूळ प्रतिसादातील जे वाक्य अधोरेखित केले, त्यात काहीसा अन्याय्य आणि अपमानकारक सूर मला जाणवला. तो जाणूनबुजून तसा नसावा, कदाचित अज्ञानापोटी किंवा पूर्वग्रहापोटी किंवा निव्वळ विचारपद्धतीच्या सवयीपोटी असावा (जे समर्थनीय नसले तरी असे होणे हे नैसर्गिक आणि मानवी आहे) असे वाटले, म्हणूनच सौम्य शब्दांत शंका व्यक्त केली.

असो.

तुमच्यासारख्या पट्टीच्या वादघालू व्यक्तीला हे पटावे अपेक्षा ही नाही
मी साधारण पणे मुस्लिम लोकांची मातृभाषा ही उर्दूच असते असे लिहिले आहे.
उर्दू भाषेचा इतिहास वाचावा
त्यासाठी तुम्हाला मीर तकी मीर अन अमिर खुसरो (१२५३-१३२५) यांच्या शेरो शायरीचे वाचन करावे लागेल अन उर्दूचा इतिहास समजून घ्यावा लागेल.
रेख्ता म्हणजे काय हे हि तुम्हास माहीत नसेलच

उगाच खोडसाळपणाकरुन धार्मिक संबंधाला अधोरेखित करणारे तुम्ही फक्त वाद घालू इच्छिता हे उघड आहे. तुम्ही हा मुद्दा आता भाषेवरुन धर्मावर नेऊ इच्छिता.
अन मला तुमच्या सारख्या उगाच वाद घालणार्‍या व्यक्ति बरोबर संवाद घालायला नाही आवडणार

It seems you are someone who just wish to win an argument by hook or by crook
That’s a real crooked attitude Mr.

People who has such attitude I am sorry I will not provide the Truth and any reality Bites whatever I know.

Go and do your own research in global terms (about Urdu) and not on a regional or religion terms before getting into mud slangging business

तुम्हे सिर्फ अपना परचम लहेराना हैं.

धन्यवाद ! हा माझा तुम्हास शेवटचा प्रतिसाद :-)

पंगा's picture

26 Dec 2010 - 7:42 pm | पंगा

तुम्ही हा मुद्दा आता भाषेवरुन धर्मावर नेऊ इच्छिता.

माफ करा, पण "जे जन्माने मुस्लिम नसून ही उत्तम शायरी करतात" या वाक्यात (सलामीनंतरच्या पहिल्याच वाक्यात!) धर्म मी आणला नाही.

उलट याचा धर्माशी काहीएक संबंध असू नये हेच तर माझे म्हणणे आहे!

बाकी चालू द्या!

आजानुकर्ण's picture

26 Dec 2010 - 8:01 pm | आजानुकर्ण

पंगा यांच्याशी सहमत आहे

- दंगा

उगीच वादासाठी म्हणून घातलेला वाद. :(

>>थोडक्यात, 'तेथे पाहिजे जातीचे' छापाचे विधान.
मुळात 'तेथे पाहीजे जातीचे' हे वाक्यच ब्राह्मण, मराठा या अर्थाने वापरलेले नाही हे तुम्हाला माहीत नाही का? इथे जात हे 'कस' ह्या अर्थाने वापरलेले आहे. असो.

>>ते मुसलमान असूनही त्यांचा मराठी संतवाङ्मयाचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे' असे विधान केले, तर ते केवळ अन्याय्यच नव्हे, तर त्यांच्यासाठी अपमानास्पद ठरेल असे मला वाटते.

ते कसं काय बरं? उलट हे वाक्य कौतुकास्पदच नव्हे का? समजा...एखाद्या बंगाली गृहस्थाने बंगाली साहित्याबद्दल अभ्यास करणे हे साहजिक वाटेल. पण तोच गृहस्थ जर मराठी साहित्याचा, जे त्याला संपूर्ण्पणे नवीन आहे, ते समजावून घेतो त्याचे बारीक सारीक कंगोरे देखील अभ्यासतो असे जर मला कोणी सांगितले, तर मी म्हणणारच ना... की पहा, बंगाली असून्सुद्धा मराठी साहित्याचा अभ्यास करून त्यावर उत्तम लिखाण केले आहे यांनी! आता ही प्रतीक्रिया तुम्हाला कौतुकाची न वाटता त्यात भाषिकता आणि प्रांतिकता दिसायला लागली तर तो तुमचाच दोष म्हणायला हवा.

असो.

बाकी कवितेच्या धाग्यावर पण काथ्या कुटायलाच आला होता असे एकंदरीत दिसते! आणि हा निव्वळ खोडसाळपणाच आहे या वाहिदा यांच्या मताशी पूर्णतः सहमत. :(

चिंतामणी's picture

26 Dec 2010 - 7:50 pm | चिंतामणी

तमिळनाडूतील किंवा केरळमधील बहुसंख्य मुसलमानांची भाषा ही तमिळ किंवा मलयाळम असावी, आणि उर्दूचा गंध त्यांपैकी (असलाच तर) फार थोड्यांना (आणि तोही मोडक्यातोडक्या स्वरूपात) असावा.

सहमत. अजून एक गोष्ट. रहाणीमानसुध्दा वेगळे नसते. कुठल्याही गोष्टींवरून फरक दाखवणे अवघड नव्हे अशक्य असते.

आजानुकर्ण's picture

26 Dec 2010 - 8:00 pm | आजानुकर्ण

त्यात त्यांच्या मुसलमान असण्याचा काही संबंध येत नाही, आणि त्यांचे व्यक्तिगत आयुष्यात मुसलमान असणे हा त्या व्यासंगात कोणत्याही प्रकारे 'हँडिकॅप' मानता येऊ नये (तसा 'हँडिकॅप' मानणे हे डॉ. पठाणांकरिताच नव्हे, तर समस्त मुसलमान समाजाकरिता अपमानास्पद आहे.), की जेणेकरून त्यावर मात करून हा व्यासंग केल्याने तो विशेष कौतुकास्पद ठरावा.

मला वाटते एखाद्या मुसलमान व्यक्तीचे मुसलमान असणे हे हिंदू संतसाहित्याच्या अभ्यासासाठी हँडिकॅप मानता येऊ नये हे खरे असले तरी एकंदरित मुसलमान समाजात हिंदू संतसाहित्य अभ्यासाची परंपरा नसल्याने प्रवाहाविरूद्ध पोहण्याचे क्रेडिट देऊन ते कौतुकास्पद मानणे शक्य असावे.

हाच मुद्दा हिंदूंच्या उर्दू अभ्यासासाठी लावता येईल असे वाटते. (उर्दू भाषा आणि मुसलमान यांचे हिंदू-संतसाहित्य असे ठसठशीत नाते नसले तरीही. उदा दक्षिण भारतात आंध्र प्रदेश वगळता इतर मुसलमानांती त्यात्या राज्याची भाषा हीच मातृभाषा असते. तोच प्रकार गुजरातबाबतही आहे. महाराष्ट्रातील मुसलमानांची मातृभाषा उर्दू असण्याबाबत शंका आहे.)

पंगा's picture

26 Dec 2010 - 8:21 pm | पंगा

एकंदरित मुसलमान समाजात हिंदू संतसाहित्य अभ्यासाची परंपरा नसल्याने प्रवाहाविरूद्ध पोहण्याचे क्रेडिट देऊन ते कौतुकास्पद मानणे शक्य असावे.

'प्रवाहाविरुद्ध पोहण्या'बद्दल किंचित साशंक आहे. 'प्रवाहावेगळ्या दिशेने पोहण्या'चे क्रेडिट देता येईल, परंतु त्या क्रेडिटास किती महत्त्व द्यावे याबद्दलही साशंक आहे.

हाच मुद्दा हिंदूंच्या उर्दू अभ्यासासाठी लावता येईल असे वाटते. (उर्दू भाषा आणि मुसलमान यांचे हिंदू-संतसाहित्य असे ठसठशीत नाते नसले तरीही. उदा दक्षिण भारतात आंध्र प्रदेश वगळता इतर मुसलमानांती त्यात्या राज्याची भाषा हीच मातृभाषा असते. तोच प्रकार गुजरातबाबतही आहे. महाराष्ट्रातील मुसलमानांची मातृभाषा उर्दू असण्याबाबत शंका आहे.)

बराचसा सहमत. पण इथेदेखील एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की यांपैकी बहुतांश (उर्दूचे बिगरमुस्लिम अभ्यासक किंवा कवी) हे उर्दूची परंपरा आणि उर्दूला प्रतिष्ठा असलेल्या प्रदेशातील असावेत. (शिवाय या प्रदेशांत बिगरमुस्लिमांनी उर्दू शिकणे हे 'प्रवाहाविरुद्ध' किंवा 'प्रवाहावेगळे'ही नसावे.) त्यामुळे ते (प्रवाहावेगळ्या दिशेने पोहण्याचे) क्रेडिट देता येईल असे वाटत नाही. हो, आता उद्या एखाद्या (कोणत्याही धर्माच्या) तमिळभाषकाने उत्तम उर्दू शेरोशायरी केल्यास ते कौतुकास्पद ठरल्यास कदाचित ते समजण्यासारखे आहे. किंवा गुरुदत्तसारख्या कोंकणीभाषक व्यक्तीने तसे केल्यास कदाचित ते कौतुकास्पद ठरू शकेल, कल्पना नाही. (म्हणजे गुरुदत्तची उर्दूची ब्याकग्राउंड नेमकी काय होती याबद्दल निश्चित कल्पना नाही.) पण यात त्या व्यक्तीच्या धर्माचा काहीही संबंध असणार नाही, असे वाटते.

आजानुकर्ण's picture

26 Dec 2010 - 8:27 pm | आजानुकर्ण

मुद्दा पटण्यासारखा आहे. माझ्या उदाहरणातही मी गैरोत्तर भारतीय मुसलमानांना उर्दूचा कितपत गंध असावा याबाबत शंका व्यक्त केली होती.

माझ्या उदाहरणातही मी गैरोत्तर भारतीय मुसलमानांना उर्दूचा कितपत गंध असावा याबाबत शंका व्यक्त केली होती.

हो ना हल्ली सगळ्याच महाराष्ट्रीयन बंधू-भगिनिंना अस्खलित मराठी कुठे बोलता येते ??
http://www.misalpav.com/node/15978
बाकी पंगाचा सूर 'कशाला कोणाला क्रेडिट द्यायचे' असा आहे (that sounds more political) अन पंगाच्या दंग्याचा जोर कमी पडून नये म्हणून दंगा वाढवायला तुम्ही आलात म्हणजे कोणी अश्फाक यांनी दिलेल्या मूळ शेरो शायरी वरुन ल़क्ष हटवून भलत्याच वादात पडावे.

One talks like a Politician , another is an Anti Social Element
exceptional achievement , Great Combination ! Kudos !!
You guys have great future in Politics
keep playing and make a mess out of it
Why allow people to enjoy simple Shero Shayri ?? that's your moto behind your comments.

आजानुकर्ण's picture

27 Dec 2010 - 11:28 am | आजानुकर्ण

वाहीदाताई,

माझ्या उदाहरणात मी गैरोत्तर भारतीय मुसलमानांना उर्दूचा कितपत गंध असावा याबाबत शंका व्यक्त केली होती. केरळातील मुस्लिमबांधव मल्याळी मातृभाषक असतात, कर्नाटकातील कानडीभाषक तर गुजरातेतील गुजरातीभाषक. त्यांचे उर्दूचे ज्ञान अल्प असते असे माझे निरीक्षण आहे. यात त्यांना कमी लेखण्याचा किंवा वाद घालण्याचा हेतू नसून उर्दूचा प्रभाव व ज्ञान हे धर्मापेक्षा आजूबाजूच्या भाषेवर व वातावरणावर अवलंबून असते असे वाटते.

किंबहुना बांग्लादेशाच्या निर्मितीचा इतिहास जर आपण काळजीपूर्वक पाहिलात तर पूर्व व पश्चिम पाकिस्तानातील लोकसंख्या एकाच धर्माची असूनही पूर्वेकडील मुसलमानांना असलेले उर्दूचे अल्प ज्ञान व बंगाली भाषेचे ममत्त्व यामुळे धर्माचे बंधन देश एकत्र ठेवायला कमी पडले असे वाटते. थोडक्यात उर्दू भाषा व मुस्लिम धर्म यांचा जोडलेला संबंध पटला नाही.

'पण जे मुस्लिम नाहीत अन तरिही उर्दू भाषेत पारंगत आहेत असे शायर' हे अश्फाक यांना म्हणायचे आहे.

या वाक्याचे थोडे विच्छेदन करुन विश्लेषण केले तर खालील 2 निष्कर्ष निघतात

प्रत्येक मुस्लिम हा उर्दू भाषेत पारंगत असतो - चूक
प्रत्येक उर्दूपारंगत व्यक्ती ही मुस्लिम असते - चूक

Grand !
So are we here to understand Simple Shero-Shayri ?? or to understand Is Urdu a Language of Majority Muslims and if not the resons behind it ?

Are we here to understand the reasons and scenario in creation of Nation ?
Why there is a strong Hatred of HINDI / URDU in south ??

or to enjoy Urdu Language ??

तुम्ही जो निष्कर्ष काढला आहे तोच मुळात चुकिचा आहे
"प्रत्येक मुस्लिम हा उर्दू भाषेत पारंगत असतो
प्रत्येक उर्दूपारंगत व्यक्ती ही मुस्लिम असते " (Sounds Funny to me)

Have I said "Every Muslim" speaks good Urdu ???
If you felt this it is your own perception

मी लिहीले आहे साधारण पणे मुस्लिम लोकांची मातृभाषा ही उर्दूच असते.
Have I Ever said people who speak good Urdu has to be Muslim and that's Mandatory ???

Do Not make definition as per your own perception and your own wims and fancy. Donot Quote People either


My simple question "why are guy trying your best Dampening the spirit of This thread ??"

If you know Urdu as a Language and Urdu's Cultural Achievement in Global Terms
I would love to read it

I asked what is 'Rekhta' and there was no answer

So Good bye from my side to someone who loves to Dampen the spirit of This thread

स्वानन्द's picture

26 Dec 2010 - 1:22 pm | स्वानन्द

अश्फाक भाऊ... मस्तच!! मालिका काढाच याची.

गणेशा's picture

28 Dec 2010 - 3:29 pm | गणेशा

कद से बढ जाए जो साया तो बुरा लगता है !
अपना सूरज वो उठा लेता है हर शाम के बाद!!

संपुर्ण गझलच उत्तम आहे .. हा शेर तर खुप आवडला ..

अवांतर :
वरती जो वाद झाला आहे, तो चांगल्या गझलेवर काळा डाग वाटत आहे ...
आपण काय वाचायचे आणि कुठल्या वाक्याचा काय अर्थ घ्यायचा हे आपल्या म्हणन्यावर आहेच,
परंंतु आपण काय बोलत आहोत आणि तेच बरोबर कसे हे पटवण्यासाठी इतरांसमोर तो मुद्दा न चघळता आपापसात व्यनी वर बोलावे हि एक साधी इच्छा.