जीवनाची गाडी!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
23 Dec 2010 - 1:24 pm

जीवनाच्या गाडीत प्रबळ इच्छाशक्तीचे इंधन टाका.
या इंधनाची टाकी कधीही रिकामी होवू देवू नका.

सकारात्मक विचारसरणीचे हॅण्डल तुम्हाला जीवनात योग्य मार्गावर नेण्यास मदत करेल.

समस्यांच्या अंधारात आशेचा हेडलाईट नेहेमी चालू ठेवा.

उदंड उत्साहाची दोन्ही चाके अखंड फिरु द्या.

शरीराचे व मनाचे मशीन नीट टिकण्यासाठी योग्य आहार, व्यायाम हे सर्व्हिसिंग आणि मनोरंजनाचे, सुविचारांचे ऑईलींग नियमीत द्या.

नकारात्मक विचार आणि वाईट सवयी यांचा धूर हवेत विरून जावू द्या.

वाईट कृत्य आणि मोह असणार्‍या रस्त्याकडे जाण्याची इच्छा झाल्यास संयमाचा ब्रेक लावा.

जीवनात अचानक येणारी बदलांची वळणे घाई न करता हळू पार करा.

संकटांचे स्पीड ब्रेकर समोर आल्यास आधीच वेग हळू करा, संयमाने संकटाचा सामना करा. त्या संकटाचा वेगाने आणि अविचाराने सामना केल्यास आदळून आपटण्याची शक्यता असते.

आपले अंतर्मन वेळोवेळी जे हिरवे-पिवळे-लाल सिग्नल देवून आपल्याला सावध करते, ते नेहेमी पाळा.

अशी ही जीवनाची गाडी जीवनाच्या शेवटापर्यंत निर्धोकपणे धावू द्या...

- निमिष न. सोनार, पुणे

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

नन्दादीप's picture

23 Dec 2010 - 1:47 pm | नन्दादीप

अ ग ग ग ग......काय भन्नाट लिहिलय राव..

लघु श॑का : आपले काय मोटर दुरुस्ती केन्द्र आहे की काय ????

टारझन's picture

23 Dec 2010 - 1:53 pm | टारझन

लघु श॑का : आपले काय मोटर दुरुस्ती केन्द्र आहे की काय ????

शक्यता नाकारता येत नाहि.

- नन्दिल

नन्दादीप's picture

23 Dec 2010 - 2:22 pm | नन्दादीप

>>- नन्दिल

"बै" विसरलात वाटत...(- नन्दिबैल)...
असू दे..असू दे...होतात कधी कधी चुका थोरा मोठ्या॑कडून..

अवलिया's picture

23 Dec 2010 - 2:24 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

नन्दादीप's picture

23 Dec 2010 - 2:29 pm | नन्दादीप

हेच म्हणतो.."शक्यता नाकारता येत नाहि."
कीड लागली वाटते तुमच्या कळफलकास....काहीही टन्का, "शक्यता नाकारता येत नाहि." असेच दिसते.

कसे........

अवलिया's picture

23 Dec 2010 - 2:30 pm | अवलिया

कीड लागली वाटते तुमच्या कळफलकास..

शक्यता नाकारता येत नाहि.

आत्मशून्य's picture

23 Dec 2010 - 4:28 pm | आत्मशून्य

.

अवलिया's picture

23 Dec 2010 - 1:54 pm | अवलिया

>>>देवाक काळजी...!!!

शक्यता नाकारता येत नाहि.

विविध प्रकारच्या लघुत्तम, महत्तम शंका आणि शक्यता उपस्थित केल्याबद्द्ल उपस्थितांचे आभार!!!
:-)
मी नुकतीच एक नवी दुचाकी घेतली (मोटो स्कूटर - होंडा डिओ) त्यावरून मला हे सुचले आहे....
तथापि, मी मोटार दुरुस्त करत नाही.
;-)

गणेशा's picture

23 Dec 2010 - 2:23 pm | गणेशा

आवडले .. मस्त लिहिले आहे

Pearl's picture

23 Dec 2010 - 2:55 pm | Pearl

आवडली जीवनगाडी :-)

'हा' लेख १ जानेवारीचा नववर्षसंकल्प/नववर्षशुभेच्छासंदेश म्हणून घ्यायला काही हरकत नाही. (New year resolution.)

पक्या's picture

23 Dec 2010 - 3:08 pm | पक्या

छान आहे जीवनाची गाडी

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2010 - 4:36 pm | परिकथेतील राजकुमार

छान.

अवांतर :- माफ करा पण मी आधी चुकुन 'जवानीची गाडी' असे वाचले

इंटरनेटस्नेही's picture

23 Dec 2010 - 9:49 pm | इंटरनेटस्नेही

चान चान.. पण ही गाडी चांगली राहण्यासाठी पुजा देखील करावी लागते म्हणतात!
-
(पुजा सांगणारा गुरुजी) इंटेश पुजाकरवी.

स्पा's picture

24 Dec 2010 - 8:15 am | स्पा

हॅ हॅ हॅ

हि गाडी बाहेरच्या वातावरण पासून सुरक्षित राहावी म्हणून' छानसे "प्लास्टिक कवर" सुद्धा घालणे आवश्यक असते
याने गाडी तर स्वच्छ राहतेच, शिवाय, नको त्या जन्तुंपासून सुद्धा बचाव होतो

- (इंच इंचाने मागे सरकणारे)अधीर गोरे

इंटरनेटस्नेही's picture

24 Dec 2010 - 10:54 am | इंटरनेटस्नेही

हि गाडी बाहेरच्या वातावरण पासून सुरक्षित राहावी म्हणून' छानसे "प्लास्टिक कवर" सुद्धा घालणे आवश्यक असते
याने गाडी तर स्वच्छ राहतेच, शिवाय, नको त्या जन्तुंपासून सुद्धा बचाव होतो

अधिक माहिती. हे कव्हर घालण्यासाठी आवश्यक पात्रता नसल्यास. जपान वरुन आयात केलेले तेल गाडीला लावतात म्हणे!

अवलिया's picture

24 Dec 2010 - 11:08 am | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

हि गाडी बाहेरच्या वातावरण पासून सुरक्षित राहावी म्हणून' छानसे "प्लास्टिक कवर" सुद्धा घालणे आवश्यक असते

श्री स्पा जी , तुम्हाला लब्बरी म्हणावयाचे आहे काय ?

- (मायावती प्रेमी) सपा

शक्यता नाकारता येत नाहि.

- चाविल

स्पा's picture

24 Dec 2010 - 11:13 am | स्पा

श्री स्पा जी , तुम्हाला लब्बरी म्हणावयाचे आहे काय ?

शक्यता नाकारता येत नाही....

- दोघेझन

स्पा's picture

24 Dec 2010 - 11:06 am | स्पा

अधिक माहिती. हे कव्हर घालण्यासाठी आवश्यक पात्रता नसल्यास. जपान वरुन आयात केलेले तेल गाडीला लावतात म्हणे!

हॅ हॅ हॅ