सचिनला कराचीच्या 'गॉन'चा मानाचा मुजरा!

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
21 Dec 2010 - 9:49 pm

सचिनला कराचीच्या 'गॉन'चा मानाचा मुजरा!
कराचीहून प्रसिद्ध होणार्‍या 'गॉन' या वृत्तपत्राचा मी नियमित वाचक आहे 'मिपा'वर बर्‍याच लोकांना माहीत आहे. आज या पाकिस्तानी वृत्तपत्राने अतीशय सुंदर भाषेत सचिनला मानाचा मुजरा केला आहे! वाचा खाली दिलेल्या दुव्यावर!

http://www.dawn.com/2010/12/21/tendulkar-s-feat.html
Tendulkar’s feat
December 21, 2010
ताजमहालाला वीट लावण्याचा प्रयत्न न करता मी एवढेच लिहितो कीं हे वृत्तपत्र म्हणते कीं सचिनचा पराक्रम केवळ क्रीडाक्षेत्रापुरता मानणे चुकीचे ठरेल तर तो शास्त्र, कला, साहित्य या सर्व क्षेत्रातील विक्रमाच्या तोडीचा आहे. अतीशय स्पर्धात्मक अशा आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात २० वर्षे खेळू शकणे हाच एक विक्रम ठरेल. सचिनच्या स्वभावाचे (temperament) आणि स्वतःच्या खेळाला परिस्थितीनुरूप बदलण्याच्या कौशल्याचे कौतुक करून या वृत्तपत्राने त्याच्या धैर्याचे, क्रिकेटच्या वेडाचे (passion) आणि मनोनिग्रही स्वभावाचेही कौतुक केले आहे.
'डॉन' म्हणते कीं अर्धी कारकीर्द झाली असतानाच त्याची तूलना सर्वश्रेष्ठ फलंदाज डॉन ब्रॅडमनबरोबर होऊ लागली होती. (सर डॉन स्वतःच त्याचा उल्लेख कौतुकाने bonzer असा करीत-मी.)
डॉन म्हणते कीं सचिनला फलंदाजी करताना पहाणे एक अहोभाग्यच होते! "आज या विक्रमवीराचा हा उत्तुंग पराक्रम समारंभपूर्वक साजरा करूया" असे म्हणत हा लेख डॉनने संपविला आहे. दिलेला दुवा उघडून मूळ इंग्रजीतील लेख जरूर वाचा.

क्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

कराचीहून प्रसिद्ध होणार्‍या 'गॉन' या वृत्तपत्राचा मी नियमित वाचक आहे

खुलाश्याबद्दल धन्यवाद. बरं मग ?

बाकी , कोणते डॉण वृत्तपत्र ? आम्ही ओळखत नाही. आणि ओळख करुन घ्यायची इच्छा ही नाही. सचिन ची दखल सरसकट वॄत्तपत्रे घेतात . शेकडो वृत्तपत्रांनी दखल घेतल्याबद्दल आता शेकडो लेख पाडावेत काय ? डॉन ने सचिन ला मुजरा केला म्हणुन काय मोठी ब्रेकिंग न्युज झाली आहे की त्याची आम्ही दखल घ्यावी ?

असल्या फडतुस धाग्यांचा खरडफळा करणे उत्तम .

अवांतर : खरडफळा बंद पडलाय काय ?

श्री. टारझन,

आपल्याला मोरल पोलिसाच्या वेषात बघुन गम्मत वाटली. ;)

टारझन's picture

21 Dec 2010 - 10:33 pm | टारझन

शेखरराव , आपल्याला काल ढंडाळ्या लागल्या होत्या त्या थांबल्या का ? तेंव्हा आम्ही मोराल वैद्याच्या वेषात आपली मदतंच केली होती .. आम्हाला असे वेगवेगळे वेष धारण करावे लागतात , जगकल्याणासाठी ;)

शेखर's picture

21 Dec 2010 - 11:23 pm | शेखर

वैद्याचा वेष? तुमच्या हातात तर खराटा होता ..... =))

सुधीर काळे's picture

21 Dec 2010 - 10:19 pm | सुधीर काळे

ऑस्ट्रेलियात प्रसिद्ध होणार्‍या 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड'च्या वाचकांनी सचिनला डॉन ब्रॅडमनपेक्षा श्रेष्ठ ठरविले!
http://tinyurl.com/2bta4lq

डॉन ने काय म्हंटले त्यापेक्षा वसीम अक्रम ने सचिन बद्दल जे गौरवोद्गार काढले ते महत्वाचे आहेत
http://www.rediff.com/cricket/slide-show/slide-show-1-india-sa-tour-2010...
डॉन ने त्याचे कौतूक केले यात नवल नाही. जगभरातील सगळी वृत्तपत्रे त्याचा गौरव करीत आहेत.
पण डॉन ने कौतूक केले हा विषय चर्चेचा आहे का?

सुधीर काळे's picture

22 Dec 2010 - 7:59 am | सुधीर काळे

विजुभाऊ,
सचिनचे सगळेच कौतुक करतात. 'डॉन'नेही केले यात 'तसे' कांहीं विशेष नाहीं. पण डॉन काय किंवा वसीम काय नाहीं म्हटले तरी पाकिस्तानचे. यातले सचिनचे अजातशत्रुत्व मला भावले. त्याशिवाय मला 'डॉन'ची इंग्रजी भाषाही भावली! तुम्हीही वाचाल अशी आशा आहे.
ये तो अपनी-अपनी पसंद है!
वसीम अक्रमचा सचिनबद्दलचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. खरोखर मनापासून आणि अतीशय सुंदर शब्दात लिहिले आहे वासिमने.

शुचि's picture

21 Dec 2010 - 10:26 pm | शुचि

>> अतीशय स्पर्धात्मक अशा आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात २० वर्षे खेळू शकणे हाच एक विक्रम ठरेल. >>
खरं आहे!!!
डाऊन टू अर्थ आणि कोणत्याही वादाच्या भोवर्‍यात न पडता कारकीर्द उत्तम रीत्या सांभाळून विक्रम गाजविणार्‍या सचिनचं कौतुक आहेच.

सुधीर काळे's picture

22 Dec 2010 - 8:05 am | सुधीर काळे

असज्जनः सज्जनसंगि संगात् करोति दुःसाध्यमपीह साध्यम् ।
पुष्याश्रयात् शम्भुशिरोधिरूठा पिपीलिका चुम्बति चन्द्रबिम्बम् ॥
वा, वा, शचिताई! सुरेख श्लोक! सचिन तर भारतीय संघातील सगळ्या खेळाडूंचा अनभिषिक्त coach आहेच. बघू किती गुण उतरतात या खेळाडूंत.....
पण मला सगळ्यात आवडला तो श्रीसंतने ठोकलेला 'त्रिवार' सॅल्यूट! खरडफळ्यावर मी दिलेल्या दुव्यावर पहाता येईल.