बिल्ला आणि नाग..!!

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
12 Nov 2010 - 5:11 pm

.............................

आत्ताचे जवळ जवळ सगळे सिनेमे खूप सेन्सिबल असतात..मजा नाही येत..

कुठे गेले ते माझे लाडके सिनेमे..??

ज्यामधले नायक आणि खलनायक खूप नियम आणि पथ्यं पाळतात..

१) हीरो किंवा हिरोईन... टेप,सी.डी. किंवा लपून काढलेले फोटो असा जो काही कलियुगातील सर्व दुष्टतेविरुद्ध पुरावा असेल तो क्रूरकर्मा खलनायकांच्या मधोमध उभे राहून उंच करून दाखवतात आणि "ललकारतात" की "तेरे दिन भर गए है राका!! (किंवा प्रलयनाथ.. किंवा ठकराल..!!)..मैंने तेरी सारी बातें इस टेप में रिकॉर्ड कर ली है.. अब इस सबूत के जरिये में तुझे फांसी के तख्ते तक पहुन्चाके रहूँगा..में अभी ये टेप पुलीस के हवाले करने जा रहा हूँ..!!"

२) राखी टाईप कोणीतरी आई मरता मरता आपल्या भावी "मेन हीरो" मुलाला एकदम लास्ट्च्या क्षणी एक माहिती सांगते.. ज्या लोकांनी तिला मारले आणि एकूण त्यांचं खानदान "तबाह" करण्यासाठी जे जे वाईट करता येईल ते केलं..(उदा. वडिलांचा खून..बहिणीवर बलात्कार..अर्थातच बहिणीची consequent आत्महत्या..आईला विष चारणे..वगैरे) त्या लोकांची नावं आहेत बिल्ला आणि नाग..

ढँग... !!!

आता बस बोंबलत शोधत कोण बिल्ला आणि नाग आहेत त्यांना..आडनाव आणि साधारण पत्ता तरी सांगितला असतां आयशीनं तर ..??

म्हणजे बुवा कुर्ला वेस्ट, कोपरखैरणे, रबाळे... असा निदान एरिया तरी सांगायचा..

पण नाही.. शोध मेल्या..

३) नुकताच बलात्कार झालेली तरुणी (हिरोइन नव्हे बरं का.. हीरोची बहीण..) .. हिला क्रूरकर्मा शक्ति कपूर ने जिवंत सोडलं आहे आणि तो बिचारा कर्तव्य करून निघून चालला आहे.... पण तिथल्यातिथे ती त्याला ऐकवतेय की में तेरा ये काला चेहरा समाज के सामने लाकर रहूंगी.. किंवा तेरी शराफत का पर्दाफाश करूंगी..!!"

मग तो परत फिरतो..

मरते बिचारी...!! नाहीतरी निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखकाच्या मनातून तिला मारायचंच असतं काहीतरी करून..

४) लहान मुलगा.. "मास्टर बंटी" छाप..अत्यंत इनोसंट.. पण अत्यंत अडचणीचे आणि मुद्द्याचे प्रश्न विचारतो..

उदा..मम्मी मम्मी.. क्या येही मेरे पापा है?

किंवा.. मम्मी मम्मी ... पापा हमारे साथ क्यूँ नही रहते ..??

किंवा.. पापा पापा.. क्या हम आंटी को मेरी मम्मी बना सकते हैं ?? (हा फायद्याचा प्रश्न आहे बापाच्या दृष्टीने..)

५) खलनायक हा अत्यंत कष्टपूर्वक जास्तीत जास्त वाईट गोष्टी एकाच वेळी करत असतो.

मुळात तो दारू पीत आणि दोन उन्हाळी कपडे घातलेल्या बायकांकडून मालिश करून घेत आणि शक्य झाल्यास कैबरे बघत बसलेला असतो..

मग त्याचे भयंकर साथीदार येतात..मीटिंग होते..

मीटींगची सुरुवात एखाद्या गद्दाराला गोळी घालून होते..

मग एकूण मिनिट्स ऑफ़ मीटिंग वरून आपल्याला कळतं की त्यांचा सरहद्पार कडून ड्रग्स, हत्यारं आणि जाली नोटा आणण्याचा व्यवसाय असतो..

नुसते चार पैसे कमावायाचे असा क्षुद्र उद्देश न ठेवता सामाजिक बांधिलकीतून हे ड्रग्स तरुण पिढीला स्वस्तात उपलब्ध करून देणं..मग तरूण पिढी तबाह झाल्यावर आणि "जाली" नोटांमुळे देश "खोखला" झाल्यावर "हथियारां" च्या वापरानं त्याच्यावर "राज" करणं अशा महत्वाकांक्षी योजना ते राबवत असतात..

आन्त्रप्रिनरशिप म्हणतात ती हीच ना..?

खलपुरुषांची एक अत्यंत मोहक सवय म्हणजे आपली सर्व कुटील कारस्थानं दारु पीत पीत आपापसात डिस्कस करणं..वाह..

पुत्र : पापा आपकी रोनेकी एक्टिंग को तो दाद देनी पड़ेगी..
पिता : हाँ बेटा..यह सब मैंने ही किया..मैंनेही चमेली को राजा के पास भेजा.. मैनेही राजा के दूध में नशे की दवाई मिलाई..और वो फोटोग्राफ्स भी मैंने ही छुपकर ली थी..
पुत्र : वा पापा.. दो प्रेमियों के बीच शक और नफ़रत का जहर भरने का आप का आयडिया कमाल का है..
पिता : अब किरण राजा के मुँह पे थूकेगी भी नही..वो तुझे मिल जायेगी..और उसके साथ उसके बाप का पैसा भी.. इसे कहते है एक तीर में दो पंछी..उसके बाप के साथ मेरा पुराना हिसाब भी चुकता हो जायेगा..मैंने जब किरन की माँ का खून किया था तब उसीने मेरे खिलाफ गवाही दी थी..

झालं.. दारामागून लपून ऐकणाय्रा व्यक्तीच्या हातून ग्लास खाली पडलाच पाहिजे..

आणि कोणी टेपरेकोर्डर घेऊन आलंच असेल तर पुरावा ही "दर्ज" झाला..

हाच खलपुरूष लास्ट्च्या मारामारीआधी कित्ती जमवाजमव करतो..

मुळात हीरोला अंगावर ओरखडाही पङता काच खळ्ळकन फोडून आत एंट्री मिळावी म्हणून खर्च करून एक काच बसवून घेतो हलकीशी ठिसूळशी..

मग तो हिरोच्या आईला, (जिवंत असल्यास) बहिणीला,हीरोनं लग्न केलं असल्यास त्याच्या बायकोला आणि नसल्यास प्रेयसीला शिवाय (झालं असल्यास) मुलालाही असतील तिथून गोळा करून आणतो.. हिरोला बाप कधीही नसतो.. त्यामुळे तेव्हढं एक काम कमी होतं..

मग हां खलपुरूष बिल्ला सगळ्यांना खांबाना बांधतो.. योग्य वेळेला पेश करण्यासाठी..!!

जुन्या मिल मधे असंख्य ड्रम्स गडगडवून प्रचंड चोपाचोपी झाल्यावर जेव्हा हीरोच्या हातात बंदूक येते.. तेव्हा "बाजी" उलटवण्यासाठी ही अरेंजमेंट आधीच करून ठेवलेली असते.. प्लानिंग अहेड इज द इसेन्स..

"ज़रा एक नजर अपने पीछे डालो..और चुपचाप हथियार फेंक दो.."

पलटली ना बाजी??

मग कर्तबगार व्हिलन हीरोला ही त्याच लायनीत बांधून त्याच्या आयटेमला (हीरोईनला) आयटेम सॉंग वर सर्वांसमोर नाचवतो सुद्धा..

शेवटी कुत्रा, कबूतर, हत्ती किंवा जोनी लिव्हर वगैरे येऊन सगळ्यांची सुटका करेपर्यंत नाच चालू राहतो..
...........

चित्रपट

प्रतिक्रिया

आयला! नुसतं धर की आपट...धर की आपट! अरे आवरा!! ते बॉलीवुडवाले सामुहिक आत्महत्या करतील की हे वाचून. ;)

>>शेवटी कुत्रा, कबूतर, हत्ती किंवा जोनी लिव्हर वगैरे येऊन सगळ्यांची सुटका करेपर्यंत नाच चालू राहतो..
:D
_/\_
मालक,
पाय....पाय कुठायत तुमचे? कापून कुरियर करा..देव्हार्‍यात ठेवेन म्हणतो. :D

श्रावण मोडक's picture

12 Nov 2010 - 5:34 pm | श्रावण मोडक

"बारामती"चेच तुम्ही. लोकांचे पाय कापण्यातच माहीर... ;)

धमाल मुलगा's picture

12 Nov 2010 - 5:38 pm | धमाल मुलगा

अहो आदर्शवाद आहे आमच्यापुढे.

श्रावण मोडक's picture

12 Nov 2010 - 7:15 pm | श्रावण मोडक

बरा आहेस ना? आजकाल आदर्शवाद, समाधी, अध्यात्म वगैरे काय चाललंय?

धमाल मुलगा's picture

12 Nov 2010 - 7:21 pm | धमाल मुलगा

मी आदर्श'वाद म्हणतोय.

बाकी ,धीस वर्ल्ड इज युसलेस.आय वॉन्ट टू गेट अप अ‍ॅन्ड गो..अ‍ॅन्ड गेट लॉस्ट फ्रॉम धीस हॅल्युसिनेशन ऑफ वर्ल्ड!

श्रावण मोडक's picture

12 Nov 2010 - 7:23 pm | श्रावण मोडक

हाण्ण तिच्या... तो आमच्या सरळ नजरेचा दोष. अवतरण नसल्याने आम्ही आपला सरळ अर्थ घेतला. पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की तू बारामतीचाच. जे बोलतोय असं दिसतं ते तसं नसतंच. ;)

धमाल मुलगा's picture

12 Nov 2010 - 7:34 pm | धमाल मुलगा

साऽऽरं काही सापेक्ष आहे. अगदी ह्या गगनविहारींनी लिहिलेल्या चित्रपटसृष्टीप्रमाणेच. असणंही सापेक्ष, नसणंही सापेक्ष...

आंडवन सोलरा...धमालन् मुडीकेला!

श्रावण मोडक's picture

12 Nov 2010 - 7:37 pm | श्रावण मोडक

सापेक्ष, सापेक्ष... वेशासंपन्न धमालमहाराज!!! ;)
वेशा - वेळच्यावेळी शहाणपणा.

मृत्युन्जय's picture

12 Nov 2010 - 11:31 pm | मृत्युन्जय

धमालराव पेटलेत या धाग्यावर. गावकरी उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद जाम ओसंडुन वाहतो आहे.

आत्मशून्य's picture

12 Nov 2010 - 10:02 pm | आत्मशून्य

आदर्शवादामूळे खूर्ची धोक्यात येते....

रन्गराव's picture

12 Nov 2010 - 5:59 pm | रन्गराव

चार चौघात अस बारामतीकरांबद्दल बोलतात तर उद्या तुमचं पाय कापलेलं कार्टून छापलं जाईल सकाळ मध्ये ;)

मग ते घरी कशे जानाऽऽऽऽ र !!

रन्गराव's picture

12 Nov 2010 - 6:04 pm | रन्गराव

जयपूर फुट लावून. स्वस्त आणि टिकावू :)

स्पंदना's picture

12 Nov 2010 - 7:45 pm | स्पंदना

अहो ते गगनविहारी आहेत! आपण त्यांना ' गेले उडत' अस म्हणु शकतो.

रन्गराव's picture

12 Nov 2010 - 7:48 pm | रन्गराव

आयला, ध्यानातच नाय आल की!

नगरीनिरंजन's picture

12 Nov 2010 - 6:38 pm | नगरीनिरंजन

+१. असेच म्हणतो. लई म्हन्जे लई भारी.

चिरोटा's picture

12 Nov 2010 - 5:30 pm | चिरोटा

मस्त करमणूक.हिरो पारई/कुर्‍हाड खलपुरुषाच्या डोक्यात घालायचा अवकाश, कानूनवाले पोलिस येतातच.

गवि's picture

12 Nov 2010 - 5:36 pm | गवि

पोलीस येण्यापूर्वी सर्व "स्टेकहोल्डर्स"आणि फॅमिलीज तिथे ऑलरेडी जमा झालेल्या असतात. (पोरेसोरे आणि
म्हाता-यांपर्यंत)

तिथे म्हणजे "लास्टचे फायटिंगचे" जे ठिकाण (गोदाम, मुकेश मिल वगैरे असते) तिथे..

गवि's picture

12 Nov 2010 - 5:31 pm | गवि

नाही रे..आता बॉलीवूड नाही तसे "पिच्चर" काढत..

सेन्सिबल, लॉजिकल वगैरे असतात्..रिआलिस्टिकही ..

मजा नाही.

शत्रुघ्न, मिथुन, पद्मिनी कोल्हापुरे, राखी (आई रुपातली), कादरखान, अमजद खान, जितेंद्र, धर्मेंद्र , अमरीश पुरी, सदाशिव अमरापूरकर, वगैरे वगैरे महारथी गेले आता कामातून..

ना त्या "खलपुरुषांच्या छळछावणीवजा डेन राहिल्या, ना तो घाग-यातल्या हिरॉईनचा नाच..

धमाल मुलगा's picture

12 Nov 2010 - 5:40 pm | धमाल मुलगा

"गेले ते दिवस! अरेऽऽ आमच्याकाळीऽ.." असं हळहळण्यापलीकडं आपण काय करु शकतो? ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Nov 2010 - 5:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हलकट आहे हे बेणं!

अहो हलकट म्हणण्यासारखं काय लिहिलंय मी इथे?

:-(

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Nov 2010 - 6:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही हो, तुम्ही नाही! अंमळ फिल्मी इश्टाईल गैरसमज झालाय!! :-)

ते मी धम्याला हलकट म्हटलं ... नाही मी त्यालाही हलकट नाही म्हटलं! (बारामतीचा आहे तो, त्याला कोण शिव्या देणार?) मीच हलकट आहे!!

गवि's picture

12 Nov 2010 - 6:16 pm | गवि

galat fehmi...hmmm.
:-)

धमाल मुलगा's picture

12 Nov 2010 - 6:42 pm | धमाल मुलगा

ते मी धम्याला हलकट म्हटलं ... नाही मी त्यालाही हलकट नाही म्हटलं! (बारामतीचा आहे तो, त्याला कोण शिव्या देणार?) मीच हलकट आहे!!


अगं गऽऽप! काय हसवून मारायचा विचार आहे का?

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Nov 2010 - 5:45 pm | बिपिन कार्यकर्ते

दंडवत! :)

ते आमचे फारएन्ड तुमचे लहानपणी कुंभ के मेले मे बिछडलेले भाई का हो? ते पण हिंदी शिण्मावाल्यांची अशीच लक्तरं काढतात.

ते बिछडे भाई आहेत का ते लॉकेट पाहून ठरवावं लागेल..:-)

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Nov 2010 - 5:51 pm | बिपिन कार्यकर्ते

एकदम दणका उत्तर मालक.... आजपासून तुम्ही आमच्या बाब्या लिस्ट मधे. ;)

छोटा डॉन's picture

12 Nov 2010 - 5:57 pm | छोटा डॉन

>>... आजपासून तुम्ही आमच्या बाब्या लिस्ट मधे
असु द्यात, असु द्यात.

बरं का बिपीनदा, ते लॉकेट का काय असतं ते दिसण्यासाठी त्यांना आधी लै मारामारी खेळावी लागते, त्या मारामारीत शर्ट फाटतो* व मग लॉकेट दिसते.
अशी एक लंबी प्रोसिजर आहे, तुम्ही जरा त्यांना त्यांच्या लायनीप्रमानं जाऊ द्या बरं.

* मारामारीत शर्ट फाटतो : अपवाद - दबंग
ह्या शिनेमामध्ये ज्या स्टायलीत सलमानचा शर्ट फाटला आधी कधी फाटला नाही आणि नंतरही फाटणार नाही. शिवाय मारामारी संपल्यावर तोच शर्ट सुममध्ये पुन्हा त्याच्या अंगावर जाऊन बसतो.

- छोटा डॉन

गवि's picture

12 Nov 2010 - 6:03 pm | गवि

जनरली स्पीकिंग, सलमानच्या बाबतीत शर्ट असल्यास पुढची चर्चा संभवते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Nov 2010 - 6:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

असं काही नाही ... म्हणजे सलमान मारामारीपुरता कमरेला शर्ट गुंडाळूनही येऊ शकतो ना?

धमाल मुलगा's picture

12 Nov 2010 - 5:59 pm | धमाल मुलगा

लाकेट किंवा दंडावरचं/पाठीवरचं पिंपळपान वगैरे... :D

किंवा त्यापेक्षा अर्धीच स्वाक्षरी लिहून ठेवा..

कुठल्यातरी प्रतिसादात ते कंप्लीट करतीलच.

तो तारिक नाही का त्याच्या प्रत्येक गाण्याच्या प्रोग्रॅमच्या शेवटी त्यांच फॅमिली साँग म्हणत असायचा? मग एका प्रोग्रॅम ला विजय अरोरा आणि धर्मेंद्र भेटतातच कि नाही त्याला?

लेख अप्रतीमच !! तसे पिक्चर आता बनत नाहीत हेच खरं
-(लोहा, जलजला, इन्सानियत के दुश्मन्,,प्रेमी) एक

गवि's picture

13 Nov 2010 - 6:41 am | गवि

kasam paida karne waale ki
Meri jung
Karma
Marte dum tak
Intequam
Ghayal
Dostana

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Nov 2010 - 5:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फारएण्डला एकदम कांपिटीसन का? ;-)

छोटा डॉन's picture

12 Nov 2010 - 5:50 pm | छोटा डॉन

ते कायपन असुदेत, पन द्येवा आमच्या रजनीचे शिनेमे पाहिलेत का कधी ?
असली एक चुक सापडायची नाही त्यात.
हे बॉलीवुडचे पिक्चर पहिल्यापासुनच असले कल्पनेच्या बाबतीत भिकारीच.

लेख मात्र एकदम तगडा आहे बॉस :)

- छोटा डॉन

गवि's picture

12 Nov 2010 - 5:59 pm | गवि

तामिळनाडु मधे एक दीड वर्षं राहण्याचं भाग्य लाभलंय मला. तिथे तुडवले जाण्याइतपत गर्दीत शिरुन रजनीचे शिनेमे (तामिळ) पाहिलेत.

प्रत्येक सीनला पाठीवर दोन्ही बाजूच्या तामिळ मित्रांची जोरदार थाप आणि मागोमाग अर्थ समजावून सांगणारी कॉमेंटरी अशा थाटात.

भन्नाट मनुष्य आहे हा रजनी.

"आंडवन सोलरा, अरुणाचलम सेइरा.." (बहुधा असा अर्थ की "देव बोलला, आणि अरुणाचलम (पक्षी रजनी) ने केलं..")

(चू.भू.द्या.घ्या..)

असा सांड डायलॉग होता एका अशा सिनेमात.

धमाल मुलगा's picture

12 Nov 2010 - 6:02 pm | धमाल मुलगा

आमचा एक तमिळ मित्र हाच्च डायलॉग अरुणाचलम् च्या जागी स्वत:चं नाव (वेलुमुरुगन) टाकून सारखं ऐकवत असतो :(

त्यातल्या आंड्वन च्या वेळी झुप्प करुन आकाशाकडे हाताचा पंजा फिरवणं आणि अर्णाचलम शब्दाच्या वेळी स्वत:कडे झपाक करुन पंजा वळवणं..लाजवाब..zip zap zoom..

अर्रे देवा !! देवासाठी तिकडे इतकं विचित्र संबोधन लावतात ??

धमाल मुलगा's picture

12 Nov 2010 - 7:14 pm | धमाल मुलगा

मला आता हापिसातून हाकलून देतील इतका खुळ्यागत हसतोय मी.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Nov 2010 - 7:25 pm | llपुण्याचे पेशवेll

ऐला आम्ही तर रजनीचे शिनेमे बघितले तेव्हा तो "आंडवन सोलरा, अरुणाचलम मुडीकेला" असं म्हणायचा.
याचंच तेलगू व्हर्जन "आ देवाडु सासिस्ताडू, अरुणाचलम पाटिस्ताडु " असं एका तामिळ मित्राकडून ऐकलं होतं. वर "सगळे तेलगू सिनेमे तामिळ सिनेमे ढापून बनलेले असतात" हे ही.

धमाल मुलगा's picture

12 Nov 2010 - 6:00 pm | धमाल मुलगा

हे आलं का द्रविड मुनेत्र कळघमचं मुखपत्र?

छोटा डॉन's picture

12 Nov 2010 - 6:08 pm | छोटा डॉन

>>हे आलं का द्रविड मुनेत्र कळघमचं मुखपत्र?
तुमच्यासारख्या अज्ञ किटाणुच्या असल्या फडतुस कमेंट्स आम्ही मनावर घेणार नाही.
पुढच्यावेळी येताना रजनीच्या सिनेम्यांची एक सुपर डीव्हीडी घेऊन येतो, पिक्चर कशाशी खातात हे तुम्हाला नक्कीच समजेल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Nov 2010 - 6:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रजनी म्हणजे प्रिया तेंडूलकरचे शिनुमे का?

छोटा डॉन's picture

12 Nov 2010 - 6:17 pm | छोटा डॉन

तुमच्या प्रश्नावरुन तुमचे रजनी, सिनेमे आणि रिलेटेड जे काही असेल त्याबद्दलचे घोर अज्ञान एकदम थोर आहे असे वाटत आहे.
अत्यंत क्रिटीकल कंडीशनला आहात तुम्ही.

ताबडतोब सिनेमे पहाणे बंद करा, इनफॅक्ट त्यावरचे लेख वाचणेही टाळा.

- छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Nov 2010 - 6:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

छे, छे, असं कसं चालेल? 'हे राम' हा कमल हासनचा सिनेमा आहे हे मला माहित आहे.

तुमची ही "साऊदी" दादागिरी चालणार नाही इथे, चॉलबे नॉय, चॉलबे नॉय!

अवलिया's picture

12 Nov 2010 - 6:03 pm | अवलिया

जबरा !

गांधीवादी's picture

12 Nov 2010 - 6:55 pm | गांधीवादी

एकाच वेळेस दहा जुने सिनेमे पाहतो आहे असे वाटले.

हसून हसून पोट दुखणार आहे.
एकदा श्रीनाथ चित्रपटगृहात(मंडई, पुणे) मिथुनदाचा सिनेमा पाहिल्यावर (मारामारी पाहताना) जसे हसून हसून खुर्चीवरून खाली पडलो होतो त्याची आठवण झाली.

गणेशा's picture

12 Nov 2010 - 6:57 pm | गणेशा

मस्त एक्दम

स्पंदना's picture

12 Nov 2010 - 7:49 pm | स्पंदना

ओ गगन्दा! ऑ काय विचार आहे का न्हाई? मगाशी विमानातुन पडुन झाल, आता खुर्चीतुन्...काय काय माणसान बसाव तर कुठ? आन मगाशी पोटात गोळा उठला आता पोटावरचा हात निघना?

एकदम छान, मजेशीर लेखन आहे.
हे असले प्रकार आणि सिनेमात झालेल्या चुका शोधून काढायची खोड आम्हा भावंडाना जडली होती.
सिनेमा पाहताना लक्ष फक्त चुकांकडे! ;) शेवटी ती सवय आमच्या पालकांना प्रयत्नपूर्वक मोडून काढावी लागली.
आताही आम्ही चुकाच काढतो पण मनातल्यामनात.;) सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे हिरो आणि हिरवीन गाणी म्हणतात. सगळ्यांचे आवाज सुरेल, गाणी तिथल्यातिथे सुचणे वगैरे. आनंदात असले.....म्हणा गाणं, दु:खात असले......म्हणा गाणं. माझी आई बरीच वर्ष गाणं शिकायला जायची तरी गाताना चुका होत असत (असे ती म्हणत असे).
कोणत्यातरी पौराणिक मालिकेत युद्ध चालू असताना माझ्या भावाने मला एका सैनिकाचा स्पोर्ट शू चुकून थोडासा फ्रेममध्ये आलेला दाखवला होता. एका सिनेमात सगळे गुंड मेलेले आहेत असा संवाद चालू असताना कोपर्‍यात पडलेल्या मनुष्याने केलेली किंचित हालचाल आम्ही पकडली होती.;)

स्पंदना's picture

12 Nov 2010 - 8:12 pm | स्पंदना

>>>सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे हिरो आणि हिरवीन गाणी म्हणतात. >>> या वाक्या वरुन आठवल. परवा ना दिवाळीची खरेदी करायला जायच होत, पण माझी लायब्ररीची पुस्तक पण परत करायची होती. मग मी महाराष्ट्र मंडळाच्या लायब्ररीत अन अक्षय लिटल इंडियात. मी परत येउन मग खरेदी अस ठरल. तिथे त्या ऑफिस टाइप चक्कीवाल्यान याला जरा तंगवल त्यामुळे हा होता उखडलेला. त्यान तिरमिरीत मला फोन लावला. मी नेमकी माझ्या ग्रुप मधल्या एका मुला बरोबर गाणी म्हणत बसलेले! वर आणी नाक वर करुन याला सांगितल मी याच्या बरोबर गाणी म्हणतेय. तोकडुन पतिराज' झाड देउ का पाठवुन ?' 'मी इकड पिठ दळतो अन तु त्याच्या बरोबर गाणी म्हण!' अग आइ ग काय सांगु तुला एव्हढे हसलो.

धमाल मुलगा's picture

12 Nov 2010 - 8:23 pm | धमाल मुलगा

>>तोकडुन पतिराज' झाड देउ का पाठवुन ?' 'मी इकड पिठ दळतो अन तु त्याच्या बरोबर गाणी म्हण!'
=)) =))

हिट्ट आहे हा किस्सा!

हा हा हा!
मस्त! खरा वैताग आला होता म्हणायचा!;)

स्वाती दिनेश's picture

12 Nov 2010 - 8:58 pm | स्वाती दिनेश

भन्नाट लेख!
फारएंडचे परिक्षण आणि हा लेख वाचताना आम्ही केलेल्या हिंदी सिनेमाची चिरफाड आठवली
स्वाती

प्रीत-मोहर's picture

12 Nov 2010 - 9:06 pm | प्रीत-मोहर

गवि शोल्लेट एक्दम......

अर्धवटराव's picture

12 Nov 2010 - 10:14 pm | अर्धवटराव

आकाशी उडणारे मालक, आपण सगळ्यांचा न्याय केलात.. पण खलनायक मंडळींच्या पाळीव प्राण्यांबद्दल एक चकार शब्दही न काढुन मात्र घोर अन्याय केलात. हे व्हीलन मंडळी काहि साधी कुत्रे वगैरे पाळत नाहित (नाहितर धर्मेंद्रच्या "कुत्ते ए ए ए ए ए" डॉयलॉगवर तो एक्झॅक्ट्ली कोणाला रागावतोय यावरुन व्हीलन आणि त्याच्या कुत्र्यामध्येच जुंपायची...) तर व्हीलन मंडळींकडे असतो वाघ (मेनका गांधीच्या नाकावर टिच्चुन). अगदी ढाण्या वाघ बरका. या वाघाला धर्मेंद्र (किंव्हा तत्सम बलवान मंडळी) सरळ अंगावर घेतो. (जीतेंद्र अश्या भानगडीत पडत नाहि. आणि शत्रुघ्न सिंन्हाच्या वाटेला वाघच जात नाहि). आता दोघांची कुस्ती रंगतेय. वाघाला सुद्धा "धोबीपछाड टाईप" डाव चांगलेच अवगत असल्यामुळे तो नखं, दात वगैरे वापरत नाहि... सरळ दंड थोपटतो. अश्यातच ५ मिनिट जातात आणि मग वाघाचे लक्ष्य धर्मेंद्रच्या "शेरावाली" लॉकेट कडे जाते, अच्यानक मंदीरातील घंटानाद सुरु होतो.. कुठुन तरी आआआ..आआआ..आआ चे भक्तीमय सूर कानी पडतात. वाघ धर्मेंद्रला नमस्कार करतो ("इथे भेटले.. तिथे नका भेटु" अश्या आशयाने) आणि व्हीलन मंडळीवर उलटतो. आता मात्र तो आपले पारंपारीक शस्त्र वापरतो आणि नखं, सुळे वापरुन व्हीलनचा खात्मा करतो.

वाघोबा पासुन ओबामा पर्यंत सर्वच गांधीबाबांची अहिंसेची वाट (अर्धवट) धरतात (लावतात) ति अशी.

(के सी बोकाडीया फॅन) अर्धवटराव.

भारी...अर्धवटराव...भारी..!

चिगो's picture

13 Nov 2010 - 11:34 pm | चिगो

पिक्चर मधे अमिताभची आई (निरुपा रॉय) वाघाला नमस्कार करते तर वाघ उलटून तिला नमस्कार करतो (ती "मर्द"ची आई म्हणून..)
"अ अ अँ" मधे तिघांचही रक्त अँटी-ग्रॅव्हिटी डायरेक्ट एका पिशवीत येतं (तिला ३ नळ्या "इन" साठी) आणि नंतर डायरेक्ट निरुपा रॉयला.. बॅक्ग्राऊंडला "खून का रिश्ता" टाईप्सचं काहीतरी ढॅणढॅणतं...
"अजूबा" नावाचा एक अति खतरनाक हास्यपट आहे, तोही बघाच..

आणि, कहर म्हणजे कमल हसनचा "दशावतार".. फाटत्ले मारायची इच्छा होते साल्याला..

अवांतर : च्या मायला, आम्हां भावांच्या अंगावर अशा शेम-शेम खुणा असत्यालं का? शोधायला लागंल..

गवि, खतरा लेख.. येकदम आवडेश.. डोस्कं बाजुला ठेवून पिक्चर बघायचे दिस आठवले.

:D :-D :lol:

खलनायकापुढे नाचायला हिरविनीला "मजबूर" केलं जातं तेव्हा ती सुद्धा सार्वजनिक गणेशउत्सवात नाचायला सांगितल्याच्या उत्साहाने कपडे बिपडे घालून लग्गेच तयार होते!

नगरीनिरंजन's picture

12 Nov 2010 - 10:44 pm | नगरीनिरंजन

>> खलनायकापुढे नाचायला हिरविनीला "मजबूर" केलं जातं तेव्हा ती सुद्धा सार्वजनिक गणेशउत्सवात नाचायला सांगितल्याच्या उत्साहाने कपडे बिपडे >>घालून लग्गेच तयार होते!
बर्‍याच वेळा कपडे काढूनही लग्गेच तयार होते बरं.

अहो ती हिरवीन तयार होइल हो पण गाण्याला, नाचाला योग्य कपडे तयार असतात तेही मापाचे......इथे आपली मापं देउन शिवून घेतले तरी हज्जार चुका असतात.

गवि's picture

12 Nov 2010 - 11:01 pm | गवि

:-)

अविनाशकुलकर्णी's picture

12 Nov 2010 - 11:02 pm | अविनाशकुलकर्णी

ह.ह.पु.वा झाली बुवा..... मस्त..लिहिले आहे भाऊ..

मृत्युन्जय's picture

12 Nov 2010 - 11:24 pm | मृत्युन्जय

अग्गाऐइग. वाट लावलीय पार. हे हिंदी चित्रपटसृष्टीचे जाहीर वस्त्रहरण आहे.

अशीच एक गोष्ट हिंदी चित्रपटांबद्दल मला अजुनही अनाकलनीय आहे ती म्हणजे शक्ती कपूर, (स्व.) अमरीश पूरी, गुलशन ग्रोवर आदी महापुरुष चित्रपटात हिरोइनी किंवा हिरोची बहीण यांच्या इज्जतीबरोबर समथिंग अनमेन्शनेबल करत असताना ती हाथ जोडुन म्हणते "मे तुम्हारे आगे हाथ जोडती हू. भगवान के लिये मुझे छोड दो" आता भगवान के लिये वळू सोडलेले मला माहिती होते. पण हिला भगवान के लिये कशाला सोडायचे? आणि भगवान के लिये सोडायचे म्हणजे काय?

हिरॉईनशी क्वचित..हिरोच्या बहिणीशी नेहमी.
आणि ती अनमेन्शनेबल गोष्ट हिरॉईनच्या बाबतीत एक अयशस्वी प्रयत्नच ठरतो.(डोक्यात फ़्लॉवरपॉट घालून हिरॉईन जाते पळून. हिरो)च्या बहिणीबाबत मात्र त्याचा कार्यभाग यशस्वी होतो.मग तिची आत्महत्या.बलात्कार झालेल्या स्त्रीला जिवंत राह्ण्याचा हक्क हिंदी सिनेमात नाही. हिरोला "इंतकाम"साठी कारण पुरवायला बहीण.

शिल्पा ब's picture

12 Nov 2010 - 11:29 pm | शिल्पा ब

ही ही ही...मस्त..
मला एकदम मिथुन चा एक पिच्चर आठवला ...त्यात तो वेळ नसतो म्हणून डॉक्टरला भूल न देता आपले दुष्टांनी कापलेले पोट शिवू देतो आणि मग लगेच जीपड्यात बसून त्यांच्याशी लढायला तयार..

पैसा's picture

12 Nov 2010 - 11:54 pm | पैसा

इ.इ. मंडळींचे सगळे पिच्चर एकदम बघितल्याचं समाधान मिळालं! आता असे पिच्चर कुणी का नाही बनवत?

फारएन्ड's picture

13 Nov 2010 - 12:08 am | फारएन्ड

मग एकूण मिनिट्स ऑफ़ मीटिंग वरून >> हे सर्वात आवडले :)

धमाल लिहीले आहे. अजून असली ऑब्झर्वेशने येउ द्यात.

(बाकी एकदा ते लॉकेट चे चेक करूच)

रन्गराव's picture

13 Nov 2010 - 12:35 am | रन्गराव

>>बाकी एकदा ते लॉकेट चे चेक करूच

तुमचा नंबर नंतर. ते आधी नाना ननि तिथ निशाण घेवून उभारलेत. त्यांच लॉकेट चेक करायची वेळ आहे ही. करण-अर्जून चांगला रंगला आहे. त्यात तुम्ही मध्ये धरम-वीर कार्यक्रम ठेवू नका. एकावेळी एक कुस्ती नीट बघू यात. वाईस फुटाण तोंडात टाकून त्या कुस्तीची निकाल लागू पर्यंत मजा बघा दोघबी. मग तुमाला बी आखाड्यात सोडणार हायच आमी!

काय पण जमाना होता तो .. क्लास शिनुमाचा . . काय पन नट / नट्या . . काय ते फायटींग .. काय तो डॅन्स. . क्वलीटी होती त्या जमाण्यात .. नायतर आजकाल स्वदेस, तारे जमीन पर , ३ इडीयट असले फालतु पिक्चर काडतात राव.
नो फायटिंग ??

आमचा आवडता पिक्चुर : पाप को जलाकर राख कर दुंगा

खरं आहे. असे चित्रपट आता बनणे नाही.;)
काय ती नावं, काय ते कपडे. आजकालचे हिरो, हिरवीनी उगीच घाम गाळून फिगरा टिकवताना दिसतात.
अमिताभचे नाव विजय एवढेच मी ऐकले आहे. अंधळ्या नाहीतर आजारी माँ कितीतरी असायच्या. आजकालच्या मॉडर्न माँमध्ये काही अर्थ नाही राहिला.

राजेश घासकडवी's picture

13 Nov 2010 - 7:17 am | राजेश घासकडवी

दुसरा पंच्याण्णव टक्के भाग आवडला. हिरोहिरविनींनी गाणी म्हणून झाल्यावर व्हिलनच्या डेनमध्ये घुसून सगळ्यांनी यडपटपणाचे उद्योग करणे अशा सिनेमांच्या आठवणींशी बहुतेकांना एकरूप होता येतं.

पण आधीचं पाच टक्क्याचं 'कुठे गेले ते माझे लाडके सिनेमे..??' हे तत्वचिंतन ओढून ताणून आणल्यासारखं वाटलं. आपण आपल्या सिने-संस्कृतीतून भंपकपणा हरवतोय असं म्हणणं ठीक आहे, पण त्याची जागा घ्यायला दुसरं काहीच नाही असं म्हणणं बरोबर वाटत नाही. ते खरं असतं तर एव्हाना दबंगपणा वगैरे गोष्टी संपून गेल्या असत्या कारण प्रत्येक पिढीतले गगनविहारी, फारएन्ड हेच म्हणत आलेले आहेत.

कदाचित काही वर्षांपूर्वी व्हिलनांनी मसाज करून घेत, दारू पीत जगावर ताबा मिळवण्याच्या गमजा करायला सुरूवात केली असेल तेव्हासुद्धा त्यांच्या वेळच्या गगनविहारी, फारएन्ड नी 'आमच्या काळी व्हिलन सूटबूट घालून प्राणप्रमाणे मंगेतर असायचे व कायम मंगेतर रहायचे, ते आता आपण हरवत चाललो आहोत' अशी बोंब मारली असेल.

(हे माझ्याच एका प्रतिसादाचं विडंबन आहे, तेव्हा मीच स्वतःला ते व्यक्तिगत घेऊ नये, विचारांचं विडंबन आहे असं सांगतो)

गांधीवादी's picture

13 Nov 2010 - 7:52 am | गांधीवादी

प्रतिसादाचा पहिला पंच्याण्णव टक्के भाग आवडला. पटला असेहि म्हणता येईल.

>>(हे माझ्याच एका प्रतिसादाचं विडंबन आहे, तेव्हा मीच स्वतःला ते व्यक्तिगत घेऊ नये, विचारांचं विडंबन आहे असं सांगतो)
शेवटचा ५ टक्के भागासाठी शब्द, आणि स्मायली दोन्हीही नाहीत.

शिल्पा ब's picture

13 Nov 2010 - 8:01 am | शिल्पा ब

तुम्ही ही टक्केवारी कशी ठरवलीत?

गांधीवादी's picture

13 Nov 2010 - 8:12 pm | गांधीवादी

तुमचा प्रश्न १०० टक्के समजला नाही, १० टक्के जरी समजला असता तरी मी उत्तर देण्याचा ९९ टक्के विचार केला असता.

अहो..तुम्ही फारच सीरियसली घेताय.तत्वचिंतन वगैरे कसलं आलंय हो यात? पिव्वर भंकस आहे ही. आणि त्या त्या पिढीतले गगनविहारी,फ़ारएंड..? अरे बापरे.मी काही समीक्षक वगैरे नाही हो.
तुमचं शेवटचं वाक्य (विडंबन related) डोक्यावरुन गेलंय.सॉरी.
मी यापूर्वी मिपा अगदी कमी वाचलंय आणि त्यामुळे पूर्वी इथे घडलेल्या गोष्टींचा कसलाच संदर्भ माझ्या पोस्ट्मधे नाही.
Thanks a lot for comment..

मृत्युन्जय's picture

13 Nov 2010 - 9:56 am | मृत्युन्जय

जाउ देत तुम्ही मनावर नका घेऊ. गुर्जींनी सध्या सगळ्या नॉस्टॅल्जिक गोष्टींविरुद्ध आघाडी उघडली आहे. त्यातले विडंबन कुठले आणि सत्य कुठले ते बर्‍याच लोकांना कळत नाही. (मला तरी कुठे कळाले आहे). पण मला तरी वाटते हा वार तुमच्यावर नव्हता. हो ना गुर्जी?

राजेश घासकडवी's picture

13 Nov 2010 - 9:46 pm | राजेश घासकडवी

नॉस्टॅल्जिक गोष्टींविषयी आघाडी वगैरे नाही. (माझा जुनं घर वरचा प्रतिसाद वाचा) जुनं ते सोनं हे चूक म्हणत नाही. पण सगळ सोनं जाऊन आता फक्त दगड उरले आहेत हे मला सरसकट पटत नाही इतकंच. बाकी या लेखात त्याच्या बरोब्बर विरुद्ध 'जुना यडपटपणा आता नाही राहिला' असं मांडलेलं असल्यामुळे मी 'नाही बरं का, यडपटपणा अजून जिवंत आहे' असं म्हणण्यासाठी विडंबन वापरलं, इतकंच. गविंनी तो प्रतिसाद मनावर घेऊ नये. लेख छानच झाला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Nov 2010 - 10:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

गुर्जी काय लिहीतात हे गुर्जींनातरी समजतं का असा प्रश्न पडला आहे. ;-)

मी-सौरभ's picture

14 Nov 2010 - 3:17 pm | मी-सौरभ

गुर्जी तुमाला आमचा __/\__

अंतु बर्वा's picture

16 Nov 2010 - 3:32 am | अंतु बर्वा

कांती शाहचा गुंडा पाहीला की नाही तुम्ही?
संपुर्ण चित्रपटात लोकं एअरपोर्ट वर एखाद्या मॉल मधे फिरावं इतक्या सहजपणे फिरतात... आजही मित्रांच्या कोंडाळ्यात बसुन सुरापान करताना हा चित्रपट लावला जातो आणी हसून हसून मुरकुंडी वळते... कुठेशी वाचलं होत की गुंडा हा जालावर सर्वात जास्त चर्चिला जाणारा चित्रपट आहे... :-)

हा एक नमुना....

http://www.youtube.com/watch?v=czt_Eroo_bs

चतुरंग's picture

16 Nov 2010 - 5:49 am | चतुरंग

फुल्टू खेचाखेची बर्र का गगनविहारी! ;)

रंगविहारी

स्वप्नज's picture

28 Dec 2014 - 3:54 pm | स्वप्नज

चिरफाड, लक्तरे इ.इ.
धागा वर काढत आहे.

विजुभाऊ's picture

28 Dec 2014 - 10:13 pm | विजुभाऊ

धन्यवाद स्वप्नज......
लै भारी खंग्री लेख वर आणलात

कपिलमुनी's picture

27 Jul 2018 - 2:25 pm | कपिलमुनी

हे रत्न सुटले होते , आज सपडले :)

श्वेता२४'s picture

30 Jul 2018 - 2:15 pm | श्वेता२४

असले टिपिकल सिनेमे लहानपणी दूरदर्शनवर शनीवारी रात्री लागायचे. ते आठवून हसू आले. त्याहीपेक्षा तुम्ही जे लिहीलेत ना गवि तसले टिपिकल प्रसंग आठवून खूप हसू आले. खूप छान लिहीलय. हे रत्न दाखवल्याबद्दल कपिलमुनी तुमचेही आभार. लेख जुना दिसतोय पण तुमच्या अभिप्रायामुळे धागा वर आला.