कभी यह सिनेमा ना देखना..

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
8 Aug 2009 - 12:41 pm

बॉलिवूडी सिनेमांचा जर्मन रतिब इथल्या टेलिव्हिजनवर, सीडींमधून चालूच आहे अर्थात आता त्याची नवलाई संपली असली तरी कधी तरी एखादा सिनेमा पाहण्याची लहर येते. तसाच परवा त्या जोहरांच्या करणचा 'कभी अलविदा ना कहना..' लागला होता . नेहमीचेच खेळगडी , खानांचा शाहरुख, मुखर्जींची राणी , पिता बच्चनबरोबर पुत्र बच्चन (फ्री), वाडिया की झिंटांची प्रिती इ. इ... सिनेमाचे नाव केकता सारखेच करणही क ने सुरु करतो बहुदा आणि 'म्याच'नेच सिनेमा ओपन करायचा असतो असा त्याचा (गैर)समजही असावा बहुतेक.. तर यावेळी फूटबॉल म्याचने सिनेमा सुरु होतो.म्याच संपल्यावर त्या जोडीचा फोनावर संवाद तर दुसरीकडे दुसर्‍या जोडीचे लगीन होणार असते. ह्या लग्नाला आलेल्या आईला पहिल्याला घरी घेऊन यायचे म्हणून तो तिथे जातो आणि आई सोडून नवरीशी गप्पा मारत बसतो. लग्नाच्या धावपळीत नवरी आपल्याच घराच्या बागेतल्या बाकड्यावर शांत बसून दु:खी भाव घेऊन बसून राहिलेली.. 'सच्ची मोहब्बतच्या विचारात',, सिनेमाभर राणीबाई हेच भाव घेऊन वावरल्या आहेत आणि शाहरुख करणच्या कोणत्याही सिनेमात फक्त शाहरुख असतो.. त्या सिनेमातले पात्र कुठे होतो?

तर एकीकडे राणी आणि अभिषेकचे लगीन आणि दुसरीकडे शाहरुखला अपघात.. त्यात त्याच्या पायाला इजा आणि फूटबॉल करियर पाण्यात.. आता काय करायचं? सोप्पं आहे.. "४ साल बाद" अशी पाटी आणायची पडद्यावर आणि कोच व्हायचं ना फूटबॉलचा! ट्रेन करायला स्वतःचाच मुलगा आणि त्याची शाळा आहेच की.. प्रितीताई फॅशन मॅगेझिनच्या वरिष्ठ पदावर काम करत असल्याने त्यांच्याकडे मुलासाठी आणि नवर्‍यासाठी वेळ कमीकमीच असतो ना, मग मुलांच्या फूटबॉलम्याचने अजून एक रिळ भरायचे. बरं ह्या ताई काम करतात म्हणजे फक्त एका खुर्चीवर बसून रामपालांच्या अर्जुनशी "सर, मेरी शादी ,मेरा बच्चा , मेरे करियरके बिच नही लाउंगी.." असं म्हणतात मग लग्गेच दुसर्‍या क्षणी त्यांना खूप फायदा, त्यांचं मॅगेझीन जगातलं दुसर्‍या नंबराचं मासिक आणि पार्टी ऐवजी त्याला पहिल्या नंबरावर आणायचा प्रयत्न करा.. असा प्रितीताईंचा सज्जड दम.. बॉस रामपाल बाबळट्ट चेहरा करुन उभा! ( म्हणजे तसंही त्याला वेगळा अभिनय करायची काही गरज नाही) बॉसिण तर ह्याच ताई वाटतात..

आणि अमिताभ तर काय? साठी बुध्दी नाठी झाल्यासारखा सिनेमात वागतो, स्वत:च्या (खर्‍या आणि सिनेमातही झालेल्या) मुलासमोर ओल्या पार्ट्या,नाच गाणी आणि सेक्सी बायांबरोबर लघळ सीन्सचे फूटेज एवढ्याच रोलसाठी हा माणूस का वाया घालवला की तो स्वतःहून दोस्तीखातर वाया गेला ,हेच कळेनासं झालं सिनेमा पाहताना.. ह्या सिनेमात राणीबाई व्हॅक्यूमक्लिनर घेऊन सारखे घर साफ करतात, पतीदेव आले की दु:खीकष्टी चेहरा करुन प्रॉब्लेम डिस्कस करु म्हणतात.. प्रॉब्लेम काय आहे? ते समजतच नाही.. बरं, लग्नाला ४,५ वर्षं होऊन राणीताई मूल देऊ शकलेल्या नसतात पण हा त्यांचा डिस्कशनचा प्रॉब्लेम आहे असं कुठे सिनेमाभर वाटतच नाही. अमेरिका, इंग्लंड सारख्या देशात, मोठमोठ्या महालात राहणार्‍या ह्यांना एकदाही ह्या समस्येसाठी डॉक्टराकडे गेलेले दाखवले नाहीये.. असो.

परत एकदा पडद्यावर पाटी " ३ साल बाद.." आणि एका फडतूस योगायोगात राणी आणि शाहरुखची भेट.. फक्त पडद्यावर पाट्या येत राहतात.. ४ साल बाद, ३ साल बाद पण ह्यांची वयं मात्र तेवढीच दिसतात! म्हणजे काय? करत असतील डाएटिंग, व्यायाम आणि मेकअप.. तुम्ही नाही करत स्वतःला मेंटेन्ड.. ते करतात, जळता कशाला? असा स्वतःशी संवाद केला तरी मुलांचे काय? मुलाची उंची एवढेच नव्हे तर वयही तेवढेच ,आधीचेच वाटते... त्यात काहीच बदल/वाढ होऊ नये? मेंटेन्ड ठेवायचा किती हा सोस करणचा..

ह्म्म.. तर हे दोघं भेटतात आणि भेटतच राहतात आणि एकमेकांचे 'बेस्ट फ्रेंड' होतात! ह्या हिंदी सिनेमांमध्ये " वो मेरा बेस्ट फ्रेंड है! हम सिर्फ दोस्त है, और कुछ नाही.." ही वाक्य आली नाहीत तर फाउल धरतात काय न कळे!! आपापल्या असफल लग्नांच्या कहाण्या शेअर करता करता एकमेकांच्या प्रेमात पडतात मग आपापल्या नवराबायकोपासून चोरुन भेटतात.बरं ह्यांचे नवराबायकोही एकमेकांना (चोरुन न भेटता )नुसतेच भेटून आपली लग्नं कशी असफल आहेत, आपण कसा घटस्फोट घ्यायला हवा याची चर्चा करतात आणि त्याचवेळी आपल्या प्रेयसीसाठी आणलेली फुलं आणि प्रियकराने दिलेला गुलाब आपापल्या नवराबायकोला दिला जाऊन त्यांना प्रेमाचा खोटा संदेश दिला जातो आणि घटस्फोट क्यानसल...

पण ह्याची आई आणि तिचा सासरा जे एकमेकांचे सिर्फ दोस्त असतात,एकदा एका सबवे स्टेशनबाहेर ते दोघं ह्या दोघांना एकमेकांनी पकडलेल्या अवस्थेत पकडतात आणि .. मग सासर्‍याला एकदम हुकुमी हार्ट अ‍ॅटेक! आपल्या 'नवर्‍यापासून दूर अपने प्यारके पास जा' .. असा आपल्या बहु कम बेटीला संदेश देऊन सासरा पंचत्त्वात विलिन. दोघांच्याही नवराबायकोला आपापल्या जोडीदारांचे रंग उधळणं माहितच नसतं.. उपरती होऊन राणी आणि शाहरुख आपलं प्रेम संपवून आपापल्या जोडीदारांबरोबर पक्षी अभिषेक आणि प्रिती बरोबर उरलेलं आयुष्य सुखात काढण्याचं ठरवून एकमेकांचा निरोप घेतात आणि 'झूट की बुनियाद'पर शादी रहायला नको म्हणून आपापल्या जोडीदाराला ज्या प्रेमप्रकरणाची माहितीही नसते ते सांगून आगीत तेल ओततात. दोघेही घराबाहेर काढले जातात आणि त्यांना मात्र वाटत राहतं ते आपापल्या संसारात सुखात आहेत.

परत एकदा '३साल बाद'.. मुलासकट सार्‍या पात्रांची वय परत एकदा फ्रीज झालेली आणि अमिताभ हारवाल्या फोटोत जाऊन बसलेला.. राणीला भेटायला अभिषेक येतो आणि सांगतो मी लग्न करतोय ,तू ह्या लग्नात करवली हो बाई.. माझं ह्या दुनियेत तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? ही बया आपली चमचम साडी नेसून करादिवा घेऊन त्याच्या लग्नात मिरवायला तयार.. पण चेहर्‍यावर मात्र तेच ते सिनमाभरचे दु:खीकष्टी भाव! मुलीच्या बाजूकडून प्रितीबाई आणि त्यांचा बॉस कम होणारा नवरा लग्नाला येतात आणि माजी नवर्‍याच्या लग्नात करवली राणी पाहून माजी सवत प्रिती तिला स्टेशनात जाऊन शाहरुखला थांबवण्याचा सल्ला देते कारण तो 'नौकरीके वास्ते शहर छोडके दूर' जाणार असतो. मग राणी सुसाट पळत स्टेशनात.. गाडी सुटताना शाहरुखकडे ती विध्द नजरेनी पाहते. गाडीचे दरवाजे बंद असल्याने नाइलाजाने तो तिला हात देण्यासाठी दारात उभा राहू शकत नाही आणि चेन खेचतो ,दोघांची भेट होते आणि ते दोघं एकत्र येतात..

दोन लग्न मोडून तीन संसार वसवताना ह्या ३,४ तासांच्या सिनेमात त्या शाहरुख, प्रितीच्या १०/१२ वर्षाच्या कोवळ्या, संवेदनाक्षम वयातल्या मुलाचा कुठे विचारच नाही.. फक्त 'सच्चा प्यार'म्हणे ! बाकी सब झूट?? सगळाच "आणंदीआणंद"!!! तर तात्पर्य काय? आपले ४ तास वाया घालवून 'कभी यह सिनेमा ना देखना'...

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

नंदन's picture

8 Aug 2009 - 12:46 pm | नंदन

प्रितीताईंचा सज्जड दम.. बॉस रामपाल बाबळट्ट चेहरा करुन उभा! ( म्हणजे तसंही त्याला वेगळा अभिनय करायची काही गरज नाही) बॉसिण तर ह्याच ताई वाटतात..

आणि अमिताभ तर काय? साठी बुध्दी नाठी झाल्यासारखा सिनेमात वागतो,

=)), धमाल लेख स्वातीताई. मजा आली वाचताना. डॉन्याच्या 'सिंग इज किंग'च्या परीक्षणाची आठवण झाली :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Aug 2009 - 3:02 pm | बिपिन कार्यकर्ते

धमाल आली. करण जोहरने वाचला पाहिजे... नक्की जीव देईल. ;)

बिपिन कार्यकर्ते

दत्ता काळे's picture

8 Aug 2009 - 12:58 pm | दत्ता काळे

नेहमीचेच खेळगडी , खानांचा शाहरुख, मुखर्जींची राणी , पिता बच्चनबरोबर पुत्र बच्चन (फ्री), वाडिया की झिंटांची प्रिती इ. इ. =))

वो मेरा बेस्ट फ्रेंड है! हम सिर्फ दोस्त है, और कुछ नाही.." ही वाक्य आली नाहीत तर फाउल धरतात काय न कळे!! =))

गाडी सुटताना शाहरुखकडे ती विध्द नजरेनी पाहते.
- ह्या आठवड्यात 'विध्द' हा शब्द दुसर्‍यांदा वाचला आणि परत शरदिनीताईंची 'डंकर्कवाली' कविता आठवली #o

दशानन's picture

8 Aug 2009 - 1:08 pm | दशानन

=))
=))
=))

प्रत्येक वाक्याला टाळ्या व शिट्ट्या ;)

***
मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)

टारझन's picture

8 Aug 2009 - 1:11 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
मेलो ......

तुम्हाला सांगितलंच कोणी रुकरुक खाण, बच्चन आणि करन जौहरचे पिक्चर्स पहायला ? एवढे एकसे एक बोरकर आणि उच्च बावळट स्टारकास्ट असली की अजुन अपेक्षा ती काय ?
जेवढ्या शिव्या देउ तेवढ्या कमी आहेत ह्या पब्लिक ला !!

मोहोब्बते नावाचा अतिअतिबावळट पिक्चर पण होता ह्यांचा .. फक्त त्या बायला करण्याच्या जागी खुसट बुढ्ढा उदय चोपडा आहे .. पण एकंदरीत तेवढाच बावळट पिक्चर ... बच्चन आणि शारुख बाबाची सर्वांत बावळट कोणा साठी चाललेली शर्यर !!
जियो स्वाती ताई !!

निखिल देशपांडे's picture

8 Aug 2009 - 1:36 pm | निखिल देशपांडे

जबर्या परिक्षण स्वाती तै..
प्रत्येक वाक्याला हसत होतो.
आज पहिल्यांदा पिक्चरचा शेवट कळाला
निखिल
================================

शाल्मली's picture

8 Aug 2009 - 1:44 pm | शाल्मली

हाहाहा.. धम्माल लेख!

शाहरुख करणच्या कोणत्याही सिनेमात फक्त शाहरुख असतो.. त्या सिनेमातले पात्र कुठे होतो?

परफेक्ट!! आमच्या घरी त्याला कॉपी-पेस्ट खान म्हणतात.

तू हा चित्रपट पूर्ण बघू शकलीस.. तुझ्या सहनशक्तीची कमाल आहे!!
तुझे हार्दिक अभिनंदन!! :)

--शाल्मली.

सहज's picture

8 Aug 2009 - 4:33 pm | सहज

तू हा चित्रपट पूर्ण बघू शकलीस.. तुझ्या सहनशक्तीची कमाल आहे!!
तुझे हार्दिक अभिनंदन!!

हे असले सिनेमे पूर्ण नेटाने बघणे म्हणजे (ते विमुक्तला कर्नाळाचा सुळका सर करताना लागते तसल्याच काहीश्या__) प्रचंड चिकाटीची गरज असते.
_/\_

समंजस's picture

8 Aug 2009 - 2:47 pm | समंजस

छान झाले! परिक्षण वाचून कळले काय काय होतं :)
आतापर्यंत सिनेमा नव्हता पाहिला! शंभर एक वेळा टिव्हि वर येउन सुदधा!
काय करणार? पेशंसच नव्हता :)

----

विंजिनेर's picture

8 Aug 2009 - 4:22 pm | विंजिनेर

हा हा हा ... करन जोहरच्या बकवासेस्ट सिनेमा दिग्दर्शनाचा अजून एक बळी...
मी ही गाफिल क्षणी होकार देऊन बसलो होतो आणि माझी सुद्धा हीच अवस्था झाली होती... (अर्थात नंतर ते दु:ख मी मोल्टन चॉकॉलेट केक वसूल करून कसंबसं शमवलं होतं)

यशोधरा's picture

8 Aug 2009 - 4:32 pm | यशोधरा

हसून हसून मेले! =))

नीधप's picture

8 Aug 2009 - 5:06 pm | नीधप

आपली सहनशक्ती अफाट आहे.. आख्खा सिनेमा बघायचा आणि वर लिहायचंही.. लिहिताना आठवायला तर लागणारच ना...
दंडवत तुम्हाला!! :)

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विकास's picture

8 Aug 2009 - 5:57 pm | विकास

स्वाती, हा हिंदी चित्रपट तू पाहीलास आणि तो ही जर्मन भाषेत आणि मराठीत परीक्षण!

पेशन्स, पेशन्स, म्हणजे अजून ते काय! =D>

Nile's picture

9 Aug 2009 - 12:21 pm | Nile

अगदी हेच! महान आहात! मी तर खरं या सिनेमाचं परिक्षण सुद्धा वाचलं नसतं पण तुम्ही लिहिलंत म्हणुन! :)

भन्नाट!

स्वाती२'s picture

8 Aug 2009 - 6:10 pm | स्वाती२

धमाल परीक्षण.

अनामिक's picture

8 Aug 2009 - 6:37 pm | अनामिक

मी हा सिनेमा अजून पाहिलाच नाही... आणि आता कधीच पाहणार नाही!
लै भारी लिवलंय!

-अनामिक

प्राजु's picture

8 Aug 2009 - 8:16 pm | प्राजु

मी हा सिनेमा फ्लाईट मध्ये पाहिला होता.
त्यातलं "मेरे मन ये बता दे तू, किस ओर चला है तू.." हे गाणं फार सुंदर आहे.. हा एकमेव काय असेल तो प्लस पॉईंट आहे यात.

बाकी सिनेमा म्हणजे, राणी.. शाहरूख , प्रिती आणि अभिषेक.. आणि करण जोहर यांना वेळ जात नव्हता म्हणून वाट्टेल ते डायलॉग बोला पण सिनेमा करा अशी अट घालून सिनेमा पूर्ण केला असावा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

9 Aug 2009 - 10:15 am | टारझन

त्यातलं "मेरे मन ये बता दे तू, किस ओर चला है तू.." हे गाणं फार सुंदर आहे.

तुम्हाला म्हाईत नसेल तर सांगतो पाजुतै ... ह्या गाण्याला देवकाकांनी चाल लावलीये !

(श्री.देव ह्यांचा मित्र)टारझन

मदनबाण's picture

8 Aug 2009 - 8:34 pm | मदनबाण

तर तात्पर्य काय? आपले ४ तास वाया घालवून 'कभी यह सिनेमा ना देखना'...:D
अफलातुन लिहले आहेस तु ताई!!! वाह उस्ताद व्व्वा.... :)

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

अनिल हटेला's picture

8 Aug 2009 - 10:09 pm | अनिल हटेला

कसं काय सुचतं हो इतकं धम्माल लिहायला...:-)

एक-एक वाक्य वाचत होतो आणी हसत होतो....

तोड नाही ह्या लिखाणाला.....जीयो..............:-)

(मी तवा)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

मृदुला's picture

9 Aug 2009 - 5:45 am | मृदुला

असा चित्रपट खरोखर आहे म्हणजे कमाल आहे. लेख वाचून मजा आली.

विसोबा खेचर's picture

9 Aug 2009 - 10:16 am | विसोबा खेचर

स्वाती, लै भारी परिक्षण! :)

तात्या.

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

श्रीयुत संतोष जोशी's picture

9 Aug 2009 - 1:49 pm | श्रीयुत संतोष जोशी

पिक्चर न बघितल्याचं ही सार्थक झाल्यागत वाटतय आज.
धन्यवाद स्वाती ताई.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

क्रान्ति's picture

9 Aug 2009 - 3:47 pm | क्रान्ति

जबरदस्त परीक्षण! हसून हसून बेजार! =)) =)) =)) =)) =)) =))
बरं झालं पाहिला नाही इतका भयंकर विनोदी चित्रपट!

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी

बेसनलाडू's picture

9 Aug 2009 - 5:38 pm | बेसनलाडू

हा पिक्चर एका शाहरूख फ़्यान मैत्रिणीच्या बालहट्टामुळे झेलावा लागला नि त्यापलीकडे याची एकही (वाईट) आठवण सांगावीशी वाटेल या लायकीची नाही (म्हणजे पिक्चर 'इतका' वाईट आहे!)
परीक्षण मात्र जबर्‍याच! ह ह पु वा
(चित्रपटप्रेमी)बेसनलाडू

ऋषिकेश's picture

9 Aug 2009 - 6:59 pm | ऋषिकेश

ज ह ब ह र्‍या
=)) =)) =))

एकेक वाक्याला फुटलो.. लै भारी!

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ६ वाजून ६८ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "....कुछ पाया नही तुने.. कुछ् ढूंड रहा तु...."

सूहास's picture

10 Aug 2009 - 4:38 pm | सूहास (not verified)

=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))

सू हा स...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2009 - 5:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कमाल आहेस स्वातीताई, हा पिच्चर आख्खा पाहिलास! मी पौंडात तिकिट काढलेलं असूनही पिच्चर अर्धा टाकून पळून आले होते. परीक्षण मात्र तुफान आहे. अशा तुफान विनोदी परिक्षणांसाठी तरी या जोहर, चोप्रा लोकांची पिच्चरं बनवावीत असं माझं मत आहे.
हहपुवा झाली परीक्षण वाचून!

अदिती

विकास's picture

11 Aug 2009 - 5:54 pm | विकास

मी पौंडात तिकिट काढलेलं असूनही पिच्चर अर्धा टाकून पळून आले होते.

अरे वा! स्वतःचे पौंड कमी करण्याची ही चांगली उपाय योजना आहे! ;)

(स्वगतः तसे खरच झाले तर किती मस्त... वजन वाढले? कंक बघा, काही पौंड लगेच घटतील...अजून घटवायचे असतील तर मधेच टाकून पळून जा, अजून घटतील...)

स्वाती दिनेश's picture

11 Aug 2009 - 11:46 am | स्वाती दिनेश

सर्वांना मनापासून धन्यवाद,
हा सिनेमा बघतानाच मी का पहातेय? असे वाटत होते पण मग, बघू तरी काय करतोय हा जोहरांचा करण? अशा विचाराने शेवटपर्यंत पाहत राहिले, शेवटी (स्वत:च्याच)कपाळाहात मारुन घेतला आणि
इतरांना ह्या त्रासापासून वाचवण्याच्या 'उदात्त' हेतूने परीक्षण लिहिले,:)
स्वाती

विशाल कुलकर्णी's picture

11 Aug 2009 - 11:51 am | विशाल कुलकर्णी

स्वाती, तु धन्य आहेस, तुझ्या पेशन्सला लाखो सलाम !

सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!

मनीषा's picture

11 Aug 2009 - 2:26 pm | मनीषा

तुम्ही आधीच परिक्षण लिहिले असते तर ....
परिक्षण छानच लिहिले आहे .

फारएन्ड's picture

12 Aug 2009 - 2:17 am | फारएन्ड

भन्नाट लिहीलंय, मजा आली वाचायला :)

अम्रुताविश्वेश's picture

25 Mar 2010 - 7:13 pm | अम्रुताविश्वेश

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>

< शिट्टी>
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

चित्रगुप्त's picture

25 Mar 2010 - 7:50 pm | चित्रगुप्त

असले चित्रपट.....
म्हणजे खाणांचा रुखरुख, जोहरांचा कर्ण.....वगैरे वाले कधीच बघत नाही, पण इतकी झकास परिक्षणं वाचायला मिळावीत, म्हणून तरी या मंडळींनी असले चित्रपट बनवत रहावे.....

काही छान चित्रपटांवर, उदाहरणार्थ " तीन मूर्ख " वगैरेंवरही येउ द्यात तुमचे रसग्रहण....

शुचि's picture

25 Mar 2010 - 9:49 pm | शुचि

मस्त इनोदी परीक्षण
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

शुचि's picture

25 Mar 2010 - 9:53 pm | शुचि

प्र का टा आ (३ वेळा लिहील गेलय शिंचं)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।