सिमरन...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
3 Nov 2010 - 10:21 pm

दोनचार दिवसांपूर्वीच हा लेख टाकण्याविषयी आणि तिचा फोटू टाकण्याविषयी सिमरनची पूर्ण परवनगी घेतली आहे. सबब, वाचकांनी कृपया या विषयावर चर्चा न केल्यास ते सूज्ञपणाचे ठरेल!

या पूर्वी -

लेबल - 'तात्या अभ्यंकराच्या आयुष्यातील स्रिया' -

रौशनी
नीलम
शबनम
शाहीन
सिमरन...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुंबैतल्या जुहू विभागातला एक महागडा बार. मालक - अरिवंदस्वामी शेट्टी. माझा अशील.

बारचे स्वरूप - फ्री सर्विस..

बर्‍यापैकी अंधारलेला बार.. गिर्‍हाईक बारमध्ये शिरतं.. आत शिरताच इतका अंधार की आलेल्या गिर्‍हाईकाला कुणी वेटर बॅटरी दाखवून तिच्या प्रकाशात एका टेबलापाशी बसवतो. स्टुवर्ड त्याची ऑर्डर घेतो. बारचे रेट तिप्पट-चौपट. बाहेर २० रुपायांना मिळणार्‍या कोल्ड्रिंकची किंमत इथे चक्क २५० रुपये..!

गिर्‍हाईक त्याला पाहिजे असलेल्या मद्याची ऑडर देतो. थोड्याच वेळात दिलेली ऑर्डर घेऊन एक तरुणी त्या टेबलापाशी येते व अंधारातच त्या गिर्‍हाईकाच्या शेजारी त्याला खेटून बसते. त्याला दारू सर्व्ह करते. मग दारू पिता पिता ते गिर्‍हाईक जवळ खेटून बसलेल्या त्या तरुणीशी अगदी हवे ते चाळे करते. त्याकरता सुरवातीलाच तिला पाचशे-हजार रुपायांची टीप दिली जाते. काही तरुणींच्या बाबतीत ही किमान टीप रु २००० देखील असते. मग त्या अंधारात चुम्माचाटी तसेच अन्य अनेक चाळे करून अजून ५००-१००० रुपायांची त्या तरुणीला वरटीप देऊन ते गिर्‍हाईक बारच्या बाहेर पडते..! हा अगदी रोजचा दिनक्रम. सॉरी, संध्याक्रम..!

"तात्यासाब, जरा बैठो आरामसे.. क्वार्टर-वार्टर मारो. बादमे धंदेकी बात करेंगे..!" - इति अरविंदस्वामी.

'आपल्याला काय, चला बसू. चकटफू दारू मिळते आहे!' - माझं स्वगत.

मला एका अंधारलेल्या टेबलपाशी आणलं जातं.. फुकट असल्यामुळे माझी डायरेक्ट ब्लॅकलेबलची ऑर्डर..!

थोड्याच वेळात एक मुलगी एका ट्रेमध्ये दारू, सोडा, तळलेले काजू, बिसलेरी अशी ऑर्डर घेऊन माझ्या टेबलापाशी येते व अंधारात माझ्या बाजूला अगदी मला खेटून बसते. ती माझा गिल्लास भरते..

"सेठ, ५०० रुपिया दो.."

"५०० रुपये? कसले? माझ्याकडे असे पैसे नाहीत. तुम मत बैठो यहा!"

"बोहोनी करो ना..!"

'आपल्याला साला शेठने येथे बसवला. पण या मुलीची तर ही रोजीरोटी आहे!' असा विचार करून मी खिशातनं पन्नास रुपायाची एक नोट काढली.

"ये लो. मेरी इतनीही हैसियत है.."

सिमरन मनमोकळी हसली. माझ्यासारख्या गिर्‍हाईकाची फक्त ५० रुपायांचीच लायकी पाहून थोडी कुत्सितही हसली..(तिचं नाव सिमरन आहे हे मला नंतर कळलं..)

वास्तविक ती तेथून उठून जाऊ शकत होती. परंतु तिला काय वाटलं कोण जाणे, तिने ते पन्नास रुपये घेतले व मला अजूनच खेटली. दोन पेग पोटात गेले. सोबत खेटून बसलेली सिमरन. तरूण वय. नको ते विचार मनात येऊ लागले. सिमरनच्या शरीरावर इथे-तिथे हात जाऊ पाहात होता..!

पण जमलं मला! केरसुणीनं समुद्राची लाट अडवणं जमलं मला..! (या वाक्याचं ऋण - आचार्य - नाटक- तुझे आहे तुजपाशी)

मी अगदी प्रयत्नपूर्वक कोणतीही चाळे न करता तिच्याशी 'तुम कहासे हो?', 'यहा कैसे आ गयी?' या स्वरुपात तिच्याशी गप्पा सुरू केल्या. तिला विश्वसात घेतलं..!

सिमरनही अखेर एक स्त्रीच! तिच्यातली बारटेन्डर दूर गेली व स्त्री जागी झाली. थोड्याच वेळात मी तिला बोलती केली, किंबहुना ती बोलती झाली..!

"मी मूळची इंदूरची. पैसे कमावण्याकरता मुंबैला आले. माझा बाप माझ्या सख्ख्या मावशीच्या नवर्‍याचं बरंच देणं लागतो. माझा मावसा म्हणजे साक्षात कर्दनकाळ. एक नंबरचा गुंड. त्यानेच धाकधपडशा दाखवून मला मुंबैला आणलं. धंद्याला लावलं आणि आता माझ्या पैशांवर चैन करतो आहे. सुरवातीला मी एकदोनदा कडवा विरोधही केला तेव्हा त्याने माझ्या बापावर खुनी हल्ला केला. ठार मारलं नाही पण वेळ आल्यास मारुही शकतो हे मला दाखवून दिलं..!"

गप्पांच्या ओघात सिमरन हे सगळं ओकली भडाभडा..!

थोड्या वेळानं मी तिथून निघालो. सिमरनचा नंबर घेतला. सिमरन आवडली होती मला..!

पुढे काहीच दिवसात दोन ऑक्टोबर होता. मोहनरावांची जयंती. ड्रायडे होता. मी दुपारच्या सुमारास सिमरनला फोन केला.

"गेटवेपे मिलोगी? खाना खाएंगे..!"

संध्याकाळी साडेसहा सातच्या सुमारास आम्ही गेटवेला भेटलो. मनमोकळं बोललो.. गप्पा मारल्या..भेळपुरी खाल्ली..साखरपुडा झाल्यासारखे गेटवेच्या बांधावर बसून समुद्राकडे पाहात एकमेकांना खेटून बसलो..!

"हा इसम तसा बरा आहे!." हे सिमरनचं स्वगत असावं..

एकंदरीत सिमरन मला चक्क पटली होती हे नक्की..!

"इंदौरमे कंप्युटर सिखा था. थोडा बहुत काम जानती हू.. अंग्रेजीमे बोलने और छोटामोटा लेटर टाईप करनेमे कुछ प्रॉब्लेम नही..!" सिमरनकडनं गप्पांच्या ओघात ही माहीती कळली. पोरगी खरंच चुणचुणीत होती, हुशार होती..!

बापू सोनावणेला सांगून मुंबै क्राईम ब्रॅन्चच्या डीसीपी अर्जुनराव शितोळेंशी ओळख काढली. सिमरनची सारी कहाणी त्यांच्या कानी घातली. सारी सूत्र भराभर फिरली व एका भलत्याच केसमधे अडकवून सिमरनच्या मावश्याला ८-१० वर्षांकरता गजाआड पाठवला..!

'अबक' या मोबाईल कंपनीत माझा मित्र अशोक सातपुते 'जनरल म्यॅनेजर - वेस्टर्न झोन' या पदावर कार्यरत आहे. त्याचं अंधेरीला हापिस आहे. 'ऑफिस एक्झिक्युटीव्ह' या पदावार तेथे सिमरनला चिकटवली. शंकर दयानंद हलवाई हा जौनपूर-भदोईचा भैय्या माझा मित्र कम अशील. चेंबूरचा जागादलाल..त्याला सांगून त्याच्या ओळखीनं महिना हजार-दीड हजार भाड्यावर सिमरनला एक सिंगलरूम घेऊन दिली..

आता सिमरन सुखात आहे. कष्ट करते. एका ओळखीच्या सी ए च्या मदतीने तिला टॅक्स रिटर्नचेही जुजबी काम शिकवले. त्यातही तिला बर्‍यापैकी चार पैशे भेटतात..

"तात्यासाब, आपको ट्रीट देनी है. खाना खिलाना है..!"

सायनच्या पेनिन्सुला या पॉश हाटेलात सिमरनं मला दारू पाजली, भरपेट जेऊखाऊ घातलं..त्या क्षणीचाच हा फोटू..

आयुष्यात काय मिळवलं, काय गमावलं हे मला माहीत नाही.. परंतु सिमरनच्या बाबतीत मात्र मी समाधानी आहे, कृतकृत्य आहे..!

-- तात्या अभ्यंकर.

वाङ्मयअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

3 Nov 2010 - 10:34 pm | स्पंदना

नक्की काय लिहाव कळत नाही.
नुसता नमस्कार स्विकारा __/\__!!

जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपले
तोची 'तात्या' ओळखावा देव तेथेची जाणावा...

तात्या तुम्हाला साक्षात दंडवत..

स्वानन्द's picture

4 Nov 2010 - 1:18 pm | स्वानन्द

असेच म्हणतो.

श्रावण मोडक's picture

3 Nov 2010 - 10:56 pm | श्रावण मोडक

बुंदसे गई वो हौदसे आती नही!
अशाच एका दिवाळीत म्हणे 'रोशनी' पडणार होती. ती राहिली बाजूला, हे नको ते धंदे सुरू झालेले दिसतात आता.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2010 - 11:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हौदाभर क्वांटीटीमधूनही वैविध्य नावाची क्वालिटी दिसत नाहीये!

विंदांची 'तेच ते तेच ते' कविता आठवली.
(स्मरणशील)बेसनलाडू

थोड्याबहुत फरकाने सगळ्या कहाण्या इकडून तिकडून 'त्याच त्या त्याच त्या' नि किस्सेही 'तेच ते तेच ते'
(तोच तो)बेसनलाडू

व्यक्तिशः काही घेणेदेणे नसताना सिम्रनला सन्मार्गाने चरितार्थ चालवण्यासाठी मदत करणे हे मात्र वेगळेच आणि स्पृहणीय.
(मदतशील)बेसनलाडू

शिल्पा ब's picture

4 Nov 2010 - 12:07 am | शिल्पा ब

<<<व्यक्तिशः काही घेणेदेणे नसताना सिम्रनला सन्मार्गाने चरितार्थ चालवण्यासाठी मदत करणे हे मात्र वेगळेच आणि स्पृहणीय.

१००% सहमत.

बाकी लेख ठीक...
या व्यवसायात वैविध्य म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे लोकांना ते कळले नाही..

प्रियाली's picture

3 Nov 2010 - 10:58 pm | प्रियाली

डोळे पाणावले. ;)

मोहनरावांची जयंती असे वाचून.

बाकी, सिमरनची गोष्ट ठीक ठीक.

बापू सोनावणेला सांगून मुंबै क्राईम ब्रॅन्चच्या डीसीपी अर्जुनराव शितोळेंशी ओळख काढली. सिमरनची सारी कहाणी त्यांच्या कानी घातली. सारी सूत्र भराभर फिरली व एका भलत्याच केसमधे अडकवून सिमरनच्या मावश्याला ८-१० वर्षांकरता गजाआड पाठवला

सिम्रनचा फोटो बघण्यापेक्षा वरील वाक्यांवर अधिक प्रकाश आवडला असता.

बायदवे, रोशनी पूर्ण करा.

पिंगू's picture

4 Nov 2010 - 1:02 am | पिंगू

तात्या,

काही गोष्टी वेगळ्या असतात आणि तुम्ही त्या वेगळ्या तर्हेने करता.. छान वाटलं वाचून..

- पिंगू

इंटरनेटस्नेही's picture

4 Nov 2010 - 2:08 am | इंटरनेटस्नेही

तात्या लेख आवडला.. तिला चांगल्या मर्गाला लावलेत, चांगले केलेत.. देव तुम्हांला त्याचे चांगले रिर्टन्स देईल.
कोणत्याही स्त्रीवर आपल्या पोटासाठी अशी वेळ येणे हे फारच वाईट आहे..

मिसळभोक्ता's picture

4 Nov 2010 - 2:52 am | मिसळभोक्ता

तिला चांगल्या मर्गाला लावलेत, चांगले केलेत.. देव तुम्हांला त्याचे चांगले रिर्टन्स देईल.

हॅ हॅ हॅ ! महिन्याला तीन टक्के ?

मिसळभोक्ता's picture

4 Nov 2010 - 2:52 am | मिसळभोक्ता

तिला चांगल्या मर्गाला लावलेत, चांगले केलेत.. देव तुम्हांला त्याचे चांगले रिर्टन्स देईल.

हॅ हॅ हॅ ! महिन्याला तीन टक्के ?

कुंदन's picture

5 Nov 2010 - 2:09 am | कुंदन

कधी मिळणारेत ?

चांगले केलेत जे केले ते.
लेख नेहमीप्रमाणेच!!

ज्ञानेश...'s picture

4 Nov 2010 - 9:21 am | ज्ञानेश...

लेख आवडला.

सिम्रनला सन्मार्गाने चरितार्थ चालवण्यासाठी मदत करणे हे मात्र वेगळेच आणि स्पृहणीय.
+१.

अवांतर- सिम्रनची चेहरेपट्टी तात्याशी मिळतीजुळती आहे. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Nov 2010 - 10:22 am | बिपिन कार्यकर्ते

स्पृहणीय - सौ. बेसनलाडू. (सौ म्हणजे सौजन्य हो)

बाकी ठीकच. रौशनीचे काय?

पियुशा's picture

4 Nov 2010 - 10:48 am | पियुशा

छान काम केले आप् न

इन्द्र्राज पवार's picture

4 Nov 2010 - 10:53 am | इन्द्र्राज पवार

वक्तृत्व, वादविवाद, लेख, चर्चा आदी विविध "सुरक्षित" माध्यमाद्वारे 'समाजाशी देणेघेणे', 'सामाजिक जाणीव', 'बांधिलकी' अशा विषयांवर बाह्या सरसावून फाडफाड फड जिंकणार्‍या गप्पादासांपेक्षा प्रत्यक्ष फिल्ड वर्क करून आपल्या मतीने, क्षमतेने त्या कारणासाठी आदर्श कार्य करणार्‍या श्री.विसोबा खेचर ऊर्फ सर्वांच्या तात्यांना नम्र अभिवादन....(इतपतच मी करू शकतो....पण मनोमनी अशीही प्रार्थना करीत राहीन की, असे धार्ष्ट्य कधीतरी दाखविण्याचा प्रसंग कुणावर आला तर तो निभावून नेण्याइतपत निर्णयक्षमता त्याच्या अंगी येवो !)

"सिमरन" ची यंदाची दिवाळी खर्‍या अर्थाने लखलखीत उजळून निघेल यात शंका नाही.

इन्द्रा

(थोडेसे अवांतर >> आंबेमोहोर तांदळात नकळत खडा यावा असा तो 'मोहन' चा उल्लेख वाटला. पण असो, शेवटी तांदळाचा सुवास महत्वाचा !)

पिवळा डांबिस's picture

4 Nov 2010 - 11:22 am | पिवळा डांबिस

विषयांवर बाह्या सरसावून फाडफाड फड जिंकणार्‍या गप्पादासांपेक्षा प्रत्यक्ष वर्क करून आपल्या मतीने, क्षमतेने त्या कारणासाठी काम करणार्‍या श्री.विसोबा खेचर ऊर्फ तात्यांना नम्र अभिवादन...
१००% सहमत!
तात्या, तू फोटो वगैरे दिल्यामुळे ही कथा काल्पनिक नसावी असं वाटतं...
तुझ्या प्रत्येक कथेबरोबरच जर एका एका मुलीला जर सन्मानाचं आयुष्य जगायला मिळत असेल...
तसं असेल तर तुझ्या प्रत्येक "त्याच त्या" कथेमुळे पुन्हापुन्हा बोअर व्हायला मला जास्त आवडेल.....
-पिडां

पिंडाकाकांशी सहमत. एका मुलीची जिंदगी सुधारली हे मह्त्वाचे, बाकीचे ओघाने आलेले. ग्रेट.

सहमत आहे. तीच ती कथा असली तरी व्यक्ती वेगळी असते.

तात्या ! ग्रेट !!

सूर्य's picture

4 Nov 2010 - 2:21 pm | सूर्य

एका मुलीची जिंदगी सुधारली हे मह्त्वाचे हेच म्हणतो...
बाकी लेख आवडला.

- सूर्य.

वाहीदा's picture

4 Nov 2010 - 1:56 pm | वाहीदा

विषयांवर बाह्या सरसावून फाडफाड फड जिंकणार्‍या गप्पादासांपेक्षा प्रत्यक्ष वर्क करून आपल्या मतीने, क्षमतेने त्या कारणासाठी काम करणार्‍या श्री.विसोबा खेचर ऊर्फ तात्यांना नम्र अभिवादन...
सहमत !!

जियो तात्या.
एखाद्याचे आयुष्य मार्गी लावणे काही सोपी गोष्ट नाहीये.
लेख मला अजिबात बोअर झाला नाही. उलट इतर लेखांपेक्षा वेगळा वाटला कारण ह्यातील तरूणी तिला नको असलेल्या कामातून बाहेर पडून सुखात आहे.
कंपूबाजांपैकी पहिली प्रतिक्रिया जशी येते त्याच वळणाच्या पुढील काही प्रतिक्रिया येत रहातात हे मिपावर नवीन नाही.

तात्या,
तुमचे लिहिलेले जितके व्यक्तीचित्रण वाचले अन त्यातिल प्रतिसाद वाचून फक्त एकच गाणे आठविले
कुछ और जमाना कहेता हैं,
कुछ और है, जिद मेरे दिल की ...
मैं बात जमाने की मानू..या बात सुनूं अपने दिल की..

तूम बिल्कूल बात अपने दिलकी सुन ने वालोंमेंसे हो ..
जो बस्ती हैं इन्सानों की
इन्सा मगर ढूंढे ना मिला,
पत्थर के बुतोंसे क्या किजीए ,
फरियाद भला टूंटे दिल की ??

या पत्थर दुनियेत तिला योग्य मार्गावर नेणारा तुमच्या सारखा माणूस भेटला हे सिमरन चे भाग्य अन तुम्हाला सलाम !! :-)
पण राहून राहून मला एक प्रश्न पडतो तुम्हाला सर्व असेच का भेटतात ??
खानदानी नजाकत तुम्हें क्यूं नहीं मिलती तात्या ??

त्या बार च्या दुनियेतून बाहेर पडा एकदाचे.

आमच्या घरात एक धुणे भांडे घासणारी करणारी बाई कामाला होती, तिला तिच्या नवर्‍याने जास्त पैशाच्या आमिषाने बार मध्ये नाचायला सांगीतले होते अन त्यासाठी तो तिला रोज बेदम मारहाण ही करत असे.

तिच्या घरी रोज भांडणे असायची, रोज तिचा नवरा तिला मारायचा पण ती बाई इतकी मनाने खंबिर होती की तिने कंटाळून शेवटी नवरा सोडला पण बार मध्ये नाचायला कधीच गेली नाही (दुसरे लग्नही नाही केले) . आता तर तिने तिच्या मुलीचे ही लग्न करुन दिले, त्या बाईच्या डोक्यावरील पदर ढळलेला मी कधीच पाहीला नाही.
कमी पैसे मिळतील तरी चालतील पण स्वतःची इज्जत - आब्रू न विकणार्‍या घरंदाज , गरिब मुली ही आहेत या जगात !

असो, तुम्हाला चांगले अशील लाभो हि शुभ दिपावली सोबत शुभ शुभेच्छा ! :-)

पर्नल नेने मराठे's picture

4 Nov 2010 - 2:33 pm | पर्नल नेने मराठे

त्या बार च्या दुनियेतून बाहेर पडा एकदाचे.

हेच म्हणेन बोल्ण्याचा (म्हणण्याचा) अधिकार नसला तरी !!!

त्या बार च्या दुनियेतून बाहेर पडा एकदाचे
आयला !
मग तात्या काय करणार?
हादग्याची / मंगळागौरीची गाणी लिहिणार की सत्यनारायणाच्या कथा/पुजा सांगत हिंडणार?

लेख नेहमी प्रमाणेच सुंदर हे.वे.सा. न.

स्वानन्द's picture

4 Nov 2010 - 7:03 pm | स्वानन्द

तुमचं म्हणणं तितकंसं पटलं नाही. किंबहुना तुम्ही दिलेले उत्तर संदर्भहीन वाटतंय.

>>पण राहून राहून मला एक प्रश्न पडतो तुम्हाला सर्व असेच का भेटतात ?
आता ते जर बार मध्ये कामाला होते आणि त्यांचे अशील जर त्या धंद्यातले असतील तर त्यांचा तिथल्या स्त्रियांशीच संबध ( म्हणजे संवाद या अर्थाने ) येणार ना... शिवाय कुणाशी कधी आणी कशी गाठ पडेल हे आपल्या हातात असते का?

आणि तुम्ही दिलेल्या उदाहरणातील स्त्री स्वतःचं मन तेही परपुरूषासमोर मोकळे करेल याची शक्यता फार कमी असं नाही वाटत का?

>>पण स्वतःची इज्जत - आब्रू न विकणार्‍या घरंदाज , गरिब मुली ही आहेत या जगात !
सिमरन या व्यक्तीबद्दल लेख लिहील्याने तुमच्या या वाक्य चुकीचे ठरवले गेले आहे असे वाटत नाही. असो.

वेताळ's picture

4 Nov 2010 - 5:57 pm | वेताळ

कथा ,सिमरन व तुम्ही केलेले चांगले कार्य सगळेच आवडले.

स्वाती२'s picture

4 Nov 2010 - 8:24 pm | स्वाती२

तात्या, लेख आवडला. त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे तुमच्यामुळे एका मुलीचे आयुष्य मार्गी लागले. नुसती कोरडी सहानुभुती दाखवणारे खूप असतात पण प्रत्यक्ष मदत करणारे फार कमी!

आंसमा शख्स's picture

5 Nov 2010 - 8:51 am | आंसमा शख्स

नुसती कोरडी सहानुभुती दाखवणारे खूप असतात पण प्रत्यक्ष मदत करणारे फार कमी!

असेच म्हणतो. तुम्ही जे केले त्यामुळे तुम्ही संत आहात.
(संत म्हंटल्याने जे लोकांना त्रास होत असेल त्याने त्यातले ३ परसेंट संतपणा कमी धरावा!)

ईन्टरफेल's picture

4 Nov 2010 - 8:56 pm | ईन्टरफेल

एका मुलीची जिंदगी सुधारली
तिला चांगल्या मर्गाला लावलेत!
देव तुमच भल करो
,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तात्या चा फॅन

चिगो's picture

4 Nov 2010 - 11:13 pm | चिगो

मी तुमचा फॅन आहे, हे तर आधीच मान्य केले आहे. ("अभिजात" वाले काही का म्हणे ना !) बाकी तुमचं विविधरंगी, विविधढंगी लिखाण वाचलं की संदीप खरेंच्या ह्या ओळी आठवतात...
"मी मनस्वीतेला शाप मानिले नाही, अन उपभोगाला पाप मानिले नाही
ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही, मी नभ असले अद्याप पाहीले नाही.."
लगे रहो !!

विसोबा खेचर's picture

5 Nov 2010 - 11:55 am | विसोबा खेचर

सर्व प्रशंसकांचे, टीकाकारांचे मनापासून आभार..

वाचनमात्रांचेही औपचारिक आभार मानतो..

काही जणांना विषयाची पुनरावृत्ती वाटणे साहजिक आहे. परंतु कामधंद्याच्या निमित्ताने मी ज्या क्षेत्रात वावरलो, तेथे जे अनुभव घेतले, जी माणसं पाहिली त्यावरच मला अधिकाधिक लिहायला जमते.

असो,

सर्वांचे पुन्हा एकदा आभार व दिवाळीच्या शुभेच्छा..

तात्या.