पुस्तकविश्व दिवाळी अंक २०१०

आनंदयात्री's picture
आनंदयात्री in जनातलं, मनातलं
3 Nov 2010 - 2:22 am

नमस्कार,

आज धनत्रयोदशी, अश्विन कृष्ण १२ शके १९३२. आजच्या या शुभदिनी 'पुस्तकविश्व'चा पहिलावहिला दिवाळी अंक आपल्या हाती देताना मला अत्यंत आनंद होत आहे. हा अंक ऑनलाईन तसेच पीडीएफ स्वरुपात एकाच वेळी प्रसिद्ध होत आहे.

अनुभव, पुस्तकपरिचय, लेखकांचे परिचय, मुलाखत आणि कवितासंग्रहाचे परिचय असे विविधरंगी लेखन आपणास या अंकात वाचायला मिळेल. पुस्तकविश्वचा अंक म्हणजे पुस्तक/लेखकांबद्दल असे जरी असले तरी लेखांच्या विषयात वैविध्य राखायचा प्रयत्न केला आहे.

या दिवाळी अंकाचे खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांची दिलखुलास मुलाखत. 'भिन्न' आणि 'ब्र' या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांबद्दल त्यां भरभरुन त्या भरभरुन बोलत आहेत, या पुस्तकांसाठी काम करतांना त्यांना आलेले अनुभव सांगत आहेत तसेच त्यांच्या इतर प्रकल्पांची माहिती देत आहेत. छापील पुस्तकांची पुढची पिढी म्हणजे डिव्हीडीवरचे पुस्तके येउ घातलीत, त्यांच्याबद्दल मत-प्रदर्शन करत आहेत.

'पुस्तकविश्व'ची सुरुवात होऊन अजून उणेपुरे वर्षही झाले नाही. या एवढ्याश्या कालखंडात त्याने छान बाळसे धरले आहे. तुम्हां सर्व पुस्तकवेड्या रसिक वाचकांमुळेच हा पल्ला आपण गाठला आहे, ही जाणीव मनी ठेवून मी आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा अंक आपणास आवडेल अशी आशा करतो.

पुस्तकविश्व दिवाळी अंक २०१०

ऑनलाईन वाचा.
डाउनलोड करा.

-
आनंदयात्री

(पुस्तकविश्व डॉट कॉम साठी)

संस्कृतीवावरप्रकटन

प्रतिक्रिया

शुचि's picture

3 Nov 2010 - 2:48 am | शुचि

अंकाची मांडणी साधी पण आकर्षक असून, वाचायला भरपूर आणि उत्तम लेख आहेत असं वरवर चाळलं असता दिसून आलं. कविता महाजन माझ्या आवडत्या कवयित्रींपैकी एक. पहीली त्यांची मुलाखात वाचणार.

प्रभो's picture

3 Nov 2010 - 3:51 am | प्रभो

मस्त.....सर्व टीम चे अभिनंदन.....नीट वाचून सविस्तर प्रतिक्रिया देईनच..

मेघवेडा's picture

3 Nov 2010 - 2:22 pm | मेघवेडा

मस्त.....संपूर्ण टीम चे अभिनंदन.. अंक अप्रतिम झाला आहे.

निशदे's picture

3 Nov 2010 - 4:42 am | निशदे

अभिनंदन!!!! मिपावरील मान्यवर लेखक दिसत आहेत अंकामध्ये. अंक उत्तमच असणार.

शेखर's picture

3 Nov 2010 - 5:36 am | शेखर

मांडणी एकदम मस्त आहे ... पुर्ण वाचला नाही अजुन. सविस्तर प्रतिक्रिया सवडीने

सहज's picture

3 Nov 2010 - 6:30 am | सहज

उतरवून घेतला आहे. वाचत आहे.

धन्यवाद.

मुक्तसुनीत's picture

3 Nov 2010 - 7:10 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. 'पुस्तकविश्व'शी संबंधित समस्त जनांचे हार्दिक अभिनंदन. अंक सावकाश वाचतो. प्रतिक्रिया देतो.

आजानुकर्ण's picture

3 Nov 2010 - 9:02 am | आजानुकर्ण

पुस्तक या जिव्हाळ्याच्या विषयावर आधारित दिवाळी अंकाची कल्पना फारच उत्तम. अंकाची पीडीएफ उतरवून घेतली आहे. वरवर चाळून पाहिली. अतिशय उत्तम सजावट. (वेळ मिळेल तेव्हा) वाचायलाच हवी. तूर्तास सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.

मदनबाण's picture

3 Nov 2010 - 9:04 am | मदनबाण

अभिनंदन... :)

इन्द्र्राज पवार's picture

3 Nov 2010 - 9:28 am | इन्द्र्राज पवार

सकाळीसकाळी "पुस्तकविश्व" च्या पहिल्यावहिल्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाने स्वागत केल्यामुळे मन प्रसन्न झाले. आत्ता फक्त संपादकीयच वाचले असून सविस्तर प्रतिक्रिया अर्थातच अंक वाचल्यानंतर देणारच आहे. पण अंक पाहिल्यावर आनंदाची जी एक लहेर मनी उमटली ती तुम्हाला कळवावीशी वाटली.

'पुस्तकविश्व' च्या या दिवाळी अंकासाठी विशेष योगदान दिलेले संपादक मंडळ आणि त्यांचे सहकारी मित्र यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन !

आपणा सर्वांना एका "वाचनप्रेमी" सदस्याकडून दिवाळीच्या मंगल शुभकामना !

इन्द्रा

दिपक's picture

3 Nov 2010 - 9:42 am | दिपक

वरचेवर चाळला. अंक उत्तम सजावट आणि आकर्षक मांडणीमुळे सुटसुटीत झाला आहे.
वाचतो आहे.

अंक वरवर चाळला, उत्तम पुस्तकांच्या परिचयांबरोबरच असलेली विविधता आवडली. आवर्जुन वाचावा असा अंक. अंकाशी निगडीत सर्वांचे अभिनंदन!

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2010 - 10:52 am | बिपिन कार्यकर्ते

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले!!!

अंकाशी, ईच्छा असूनही निगडीत होता आले नाही याबद्दल खूपच खेद वाटतो आहे. असो.

यशोधरा's picture

3 Nov 2010 - 11:25 am | यशोधरा

सुरेख अंक. अभिनंदन! :)

स्वाती दिनेश's picture

3 Nov 2010 - 11:40 am | स्वाती दिनेश

अंक वरवर पाहिला, सुरेख दिसतो आहे.. सवडीने ,शांतपणे वाचते(एकीकडे चिवड्याची वाटी, चकलीची बशी घेऊन.. दिवाळीअंक असाच वाचतात :) )
अंकासाठी मेहनत घेणार्‍या सर्व टीमचे अभिनंदन!
स्वाती

विसोबा खेचर's picture

3 Nov 2010 - 11:41 am | विसोबा खेचर

अंक सुरेखच आहे. सर्व संबंधितांचे मन:पूर्वक अभिनंदन..

अवांतर परंतु महत्वाचे -

पुस्तकविश्व संबंधित दुवे मिपावर नेहमी पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने दिवाळी अंकाच्या 'संपादकीय' मध्ये मिपाबद्दल दोन ओळींचे ऋण व्यक्त केले असते तर अधिक बरे वाटले असते..

असो..!

एका सुरेख अंकाबद्दल पुनश्च एकवार सर्व संबंधितांचे अभिनंदन..

तात्या.

मिसळभोक्ता's picture

4 Nov 2010 - 2:50 am | मिसळभोक्ता

मिपा आणि पुस्तकविश्व यांची दोघांचेही व्यवस्थापन आणि मालकी एकाच चमूकडे आहे. उगाच स्वतःचे ऋण कशाला व्यक्त करायचे ?

मिसळभोक्ता's picture

4 Nov 2010 - 2:50 am | मिसळभोक्ता

मिपा आणि पुस्तकविश्व यांची दोघांचेही व्यवस्थापन आणि मालकी एकाच चमूकडे आहे. उगाच स्वतःचे ऋण कशाला व्यक्त करायचे ?

रामदास's picture

3 Nov 2010 - 1:04 pm | रामदास

एकसे बढकर एक लेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2010 - 1:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकविकास टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.....!
अंक उत्तम झाला आहे. वाचून प्रतिक्रिया कळवतो.

-दिलीप बिरुटे

विकास's picture

3 Nov 2010 - 9:02 pm | विकास

लोकविकास टिमचे मनःपूर्वक अभिनंदन!

सुंदर दिपावली विशेषांक!
विशेष वेगळे वाचन उपलब्ध करुन दिल्याबद्दल 'पुस्तकविश्व'चे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

या अंकासंबंधी/लेखांसंबंधी काही चर्चा/मतप्रदर्शन करावयाचे असल्यास ते मिपावर करणे शक्य आहे का याबद्दल जाणकारांनी खुलासा करावा.

--असुर

स्वाती२'s picture

3 Nov 2010 - 3:50 pm | स्वाती२

अभिनंदन आणि धन्यवाद!

क्रेमर's picture

3 Nov 2010 - 7:48 pm | क्रेमर

अंक वरवर चाळण्यास गेलो तर दोन-तीन लेखच वाचून आलो. अंक उत्तम झाला आहे. सर्व संबंधितांचे अभिनंदन.

खूप सुंदर आहे अंक. स्तुत्य उपक्रम आहे हा!
अजून पुर्ण वाचला नाही. पण वरवर चाळता ह्या अंकामागे घेतले गेलेले कष्ट दिसून येतात. सर्व संबंधितांचे खूप अभिनंदन. मस्त कलंदरने कविता महाजनांची मुलाखत उपलब्ध करुन दिल्याबद्दल तिचे विषेश आभार आणि अभिनंदन!

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!

आळश्यांचा राजा's picture

3 Nov 2010 - 11:10 pm | आळश्यांचा राजा

सुरेख अंक. थीम मस्त आहे. लेख ही सुंदर. वाचतोय. टीमचे, आणि सहभागी लेखक-लेखिकांचे अभिनंदन!

पुष्करिणी's picture

3 Nov 2010 - 11:58 pm | पुष्करिणी

सुंदर अंक!
सर्व संबधितांचे अभिनंदन

ऋषिकेश's picture

4 Nov 2010 - 1:00 pm | ऋषिकेश

अंक फर्स्टक्लास आहे!.. वाचतोय!
सगळ्यांचे अभिनंदन!!

विकास's picture

5 Nov 2010 - 8:25 am | विकास

आजच्या (दिवाळी स्पेशल) ई-सकाळ मधे ई-दिवाळी अंकांबद्दल लिहून आलेले आहे त्यात पहीलेच नाव पुस्तकविश्व आणि कोणीतरी नंदन होडावडेकर नामक व्यक्तीचे नाव आले आहे. ;) ते बघून नक्कीच आनंद झाला. तेंव्हा पुस्तकविश्व, पुस्तकविश्व टीम आणि नंदनचे परत एकदा अभिनंदन! :-)

नंदन's picture

5 Nov 2010 - 9:26 am | नंदन

धन्यवाद, विकास :)

असं उत्तर देण्याची पद्धत आहे म्हणून नव्हे, तर मनापासून सांगतो - या अंकाची संकल्पना, त्यासाठी निवेदन पाठवणे, एकंदरीत कामाची आखणी आणि पाठपुरावा करणे, संपादकीय लिहिणे ही सारी खरी संपादकीय कामं आनंदयात्री अर्थात प्रसादची. मी फक्त मुद्रितशोधन (राखीव कुरण ;)) करण्याचं काम मुख्यतः केलं. त्याबद्दल संपादक म्हणून नाव जोडणं हे म्हणजे दहा-पंधरा धावा काढलेल्या खेळाडूला विशेष पारितोषिक देण्यासारखं. (गेल्या वर्षी संपादक नसताना संपादक म्हणून मिळालेल्या प्रेमळ अहेराची आठवण येऊन पुन्हा अंमळ... असो.) आनंदयात्रीसोबत इनोबा, निखिल देशपांडे आणि मस्त कलन्दर हे पानांमागचे मुख्य कलाकार.

चित्रा's picture

5 Nov 2010 - 9:28 am | चित्रा

सर्व टीमचे.

फार छान काढला आहे अंक.

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Nov 2010 - 9:49 am | बिपिन कार्यकर्ते

खरं आहे नंदन. आंद्याने ही कल्पना मांडली आणि तडीस नेली. त्याला बाकीच्यांनी उत्तम साथ दिली. मुखपृष्ठच इतके देखणे आहे, बाकीचा अंकही सुरेखच. व्हिज्युअली अपिलिंग!!! त्यातच मन सुखावते. लेखन अजून वाचतो आहे. पण उत्तम दर्जा साधलाय या बाबत एवढ्यातच संशय फिटला आहे.

फारएन्ड's picture

5 Nov 2010 - 10:13 pm | फारएन्ड

काही लेख वाचले आहेत आत्तापर्यंत. खूप छान आहे अंक. अभिनंदन!

सहज's picture

6 Nov 2010 - 8:14 am | सहज

वरवर जे अंक चाळले (उपक्रम, रेषेवरची, पुस्तकविश्व) त्यात पुस्तकविश्व पहील्या फेरीत प्रभावीत करणारा होताच. आता वाचल्यावर आवडला.

सांगावेसे वाटले म्हणुन व पुनर्वाचनाय हे दोन्ही लेख, ए बेंड इन द गेंजेसची ओळख सहीच...

इ-पुस्तकाची मांडणी, रंग, मुखपृष्ठ सगळेच दर्जेदार!