माझा फराळ - ४ चवडे !!

स्पंदना's picture
स्पंदना in पाककृती
2 Nov 2010 - 5:48 pm

'अरगट' वर ही पाककृती, कमला बाई ओगलेंची असल्याची चर्चा वाचली अन मनात आल कोठून शिकली हीं बाई हा पदार्थ करायला? म्हणजे एकूणच दिवाळी म्हणून आपण जे पदार्थ करतो ते आपण कोठून शिकतो? बरेचसे परंपरागत म्हणजे आईला आज्जीन, आज्जीला तिच्या सासून, सासूला तिच्या शेजारणीन, असं करत करत हे पदार्थ आपल्या पर्यंत येतात. अर्थात या प्रवासात जस जसे समाजात बदल होत गेले, सुविधा येत गेल्या, तस तसे करण्याच्या पद्धतीत, त्यात घालायच्या वस्तून मध्ये फरक येत गेला.
म्हणजे माझ्या आज्जीच्या काळी गुळाचे पदार्थ असायचे. तेंव्हा साखर नाही मिळायची. आता मी जर उठून 'खडुगळी' करते म्हणून चकल्या केल्या तर तुम्ही म्हणणार 'ए या चकल्या ना?' मी कधी केल्या नाहीत पण चांगल्या असाव्यात !' आता, म्हणतात महाराष्ट्राच्या एका भागात चकलीला 'खडुगळी' !. तर तसेच, जसे कमला बाई ओगलेंना 'चंपाकळी ' माहित होती तशी माझ्या घरच्यांना 'अरगट' माहिती आहेत . त्या साठी आम्हाला पुस्तक नाही शोधावी लागत.

तर आज 'चवडे '. बराचसा करंजीचाच भाऊ पण थोडा वेगळा. बऱ्याच जणांना माहित असलेला पण मला वाटतंय की मी तो वेब वर कुठे तरी सेव्ह करून ठेवावा. जेंव्हा कधी कोणा परदेशी राहणाऱ्याला ' माझी आई बनवायची पण कसे ते नाही माहित ग !' असं वाटेल तेंव्हा मिळण्यासाठी!!!

सामग्री:-
१ वाटी रवा
१ वाटी मैदा
मोहना साठी २ टेबल स्पून तूप.
थोडस अगदी चिमुटभर मीठ.

साठा: २ चमचे तूप
३ चमचे मैदा.
एकत्र मिसळून ठेवा.

सारण-
१ वाटी वरचा ब्राऊन लेअर काढून टाकलेलं अन सफेद झालेलं खोबर किसून.
३ लवंगा
१/२ टी स्पून तूप
अन १ १/४ वाटी पिठी साखर.
७-८ वेलदोडे.
छोटासा जायफळाचा तुकडा.
चिमुटभर मीठ.

कढईत अर्धा चमचा तूप गरम करून त्यावर लवंगा तडकवा. या लवंगा बाजूला काढून घेऊन मिक्सरवर वेलदोडे, जायफळ थोडी साखर अन या लवंगा बारीक करून घ्या.
गरम झालेल्या तुपावर खोबर साधारण गुलाबी रंगाच होई पर्यंत हळुवार हाताने भाजून घ्या. खोबऱ्याच्या किसाचा लांबटपणा मोडू देऊ नका. आता आच बंद करून त्यामध्ये पिठीसाखर मीठ अन वेलदोडे लवंग अन जायफळाची पूड मिसळा. परत एकदा छान हलक्या हाताने सगळं एकत्र करून डब्यात भरून ठेवा.

कृती-
रव्याला तूप चांगल गरम करून मोहन घालावे.
From Drop Box" alt="" />
आता त्यात मैदा अन मीठ घालून थोड्याश्या गरम पाण्यात मळून बाजूला ठेवून दया.
एक अर्ध्या तासाने या पिठाला खलबत्त्यात कुटून घ्या.
आता याची थोडी जाडसर पोळी लाटून त्या पोळीला वरील साठा लावा अन गुंडाळून लांब वळे बनवा.
From Drop Box" alt="" />
छोट्या छोट्या लाट्या कापून घ्या.
From Drop Box" alt="" />
हे लाटी वरच्या भागाकडून जराशी दाबून अगदी हलक्या हाताने पाट लाटा. साधारण दहा पाती झाल्या, की त्या अर्ध्या फोल्ड करून चीरण्यान त्यांच्या कडा कापून घ्या.
From Drop Box" alt="" />
एक खोलगट तवा घेऊन त्यात साधारण ५ ६ चमचे तूप घाला. तूप गरम झालं की हीं लाटलेली पात साधारण तळून घ्या. उलटी कडून पण असेच तळून घ्या.
आता हीं गरम पात थोड तूप झटकून प्लेट मध्ये ठेवा अन तीवर अर्ध्या बाजूला सारण पसरवा. अर्धे दुमडून परत पाव भागावर सारण पसरा. अन हा हीं भाग दुमडा.
वरून सजावटी साठी बदाम पाकात घालून चिकटवा.
" alt="" />

झाले चवडे तयार. From Drop Box" alt="" />

प्रतिक्रिया

स्वाती२'s picture

2 Nov 2010 - 6:11 pm | स्वाती२

इतके दिवस या पदार्थाबद्दल फक्त ऐकले होते. तुमच्या सचित्र पाककृतीमुळे बघायलाही मिळाला.

अब् क's picture

2 Nov 2010 - 6:12 pm | अब् क

खुपच मस्त!!! छानच!!!आमच्याकडे याला मखमलि पुरि म्हनतात!!!

ओह, किती दिवसांनी चवडे पाहिले :)
आमच्याकडे माझी आजी मस्त करत असे चवडे. :)

सुनील's picture

2 Nov 2010 - 7:13 pm | सुनील

अरे व्वा! वेगळी पाकृ. हीदेखिल करून पहायला हवी!

रेवती's picture

2 Nov 2010 - 8:04 pm | रेवती

अच्छा, असे असतात तर चवडे!
नुसतं ऐकलं होतं पदार्थाबद्दल. छान वेगळा पदार्थ वाटतोय.

निवेदिता-ताई's picture

2 Nov 2010 - 8:47 pm | निवेदिता-ताई

मस्त.........मस्त...

पक्या's picture

2 Nov 2010 - 11:40 pm | पक्या

दिवाळीच्या टिपीकल पदार्थांपेक्षा काहीतरी वेगळया आणि पारंपारिक रेसिपी मिळत आहे ..छान वाटले.
चवडे खायला तर छानच लागत असणार करून पहायला हवेत आता. धन्यवाद

एक प्रश्न : हे किती दिवस टिकतात? की लगेच त्याच दिवशी किंवा फारतर दुसर्‍या दिवशी संपवावे लागतात का?

काहीतरी वेगळंच आहे हे..! छान आहे जे आहे ते.

स्वाती दिनेश's picture

3 Nov 2010 - 12:32 pm | स्वाती दिनेश

नवीन पदार्थ समजला, छान दिसतो आहे हा करंजीचा भाऊ. सारण कसे भरायचे ते व्हिडीओ मध्ये दाखवल्यामुळे खूप छान समजले आहे. करुन पाहिन..:)
स्वाती

रोचीन's picture

3 Nov 2010 - 2:13 pm | रोचीन

तुमचा काहितरी गैरसमज झालेला दिसतो आहे.
तुम्ही केलेली पाकक्रुती अरगट नसून चंपाकळी आहे/ती तुमची रेसिपी नाहीच वगैरे दर्शवण्याचा हेतु अजिबात नव्हता. कमला बाईंचं पुस्तक मी लहान पणी वाचलं होतं. तुमचे फोटो बघून मला ते आठवलं कारण त्यातही त्याचं रेखाचित्र काढून दाखवलं आहे. तुम्ही तुमच्या आजीकडून शिकला असालही, पण तुम्हाला हे तर माहीत नव्हतं ना की याला चम्पाकळी ही म्हणतात. जे आपल्याला माहित नाही ते दुसर्‍याने सांगितल तर त्याचा राग येणाची जरुरी नाही. सगळेच पदार्थ आपण कोणानकोणाकडून शिकतच असतो. आपल्या मनाने व सोयीने त्यात व्हेरिएशनही करतच असतो. तुमचं चुक व माझंच बरोबर हा माझ्या प्रतिक्रियेचा हेतु नव्हता. तुम्हाला जर असे वाटले असेल तर सॉरी!!!
बाकि पुस्तकातून शिकण्यात काही कामीपणा आहे असे मला तरी वाटत नाहि. आई/मावशी/आजी यांचा आधार परिस्थितीवर अवलंबून असतो. तो असला तरीहि स्वयंपाकाला लागणारा उत्साह, वेळ सर्वांकडे असतोच असं नाही. शिवाय आजकाल आय्.टि. बायकांच्या नवर्यांना या पुस्तकांचाच आधार आहे बापडा!! ;) आणि आता पुस्तकांची जागा जालांवरील पाककृती विभागांनी घेतली आहे. नाही का????
त्यामुळेच तर वरील पाककृती मला कळली. आता मी ती नक्की करुन बघेन आणि कळवेन तुम्हाला!!!

प्राजक्ता पवार's picture

3 Nov 2010 - 4:46 pm | प्राजक्ता पवार

नविन पाकृ कळली :)

सुबक ठेंगणी's picture

6 Nov 2010 - 12:12 pm | सुबक ठेंगणी

आमच्या शेजारच्या आज्जी असंच कायसंसं करत होत्या आणि त्याला "पुडाच्या करंज्या" म्हणतातसं म्हणाल्या. पुडाच्या करंज्या वेगळ्या की ह्याच?
ह्याला "चवडे" का म्हणत असावेत? पायाच्या चवड्यांसारखे दिसतात म्हणून???

विनायक प्रभू's picture

6 Nov 2010 - 12:19 pm | विनायक प्रभू

मस्त् पाकृ.
सहसा गोडाची नावड.
चवडे अपवाद.