मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझा फराळ - ४ चवडे !!

स्पंदना · · पाककृती
'अरगट' वर ही पाककृती, कमला बाई ओगलेंची असल्याची चर्चा वाचली अन मनात आल कोठून शिकली हीं बाई हा पदार्थ करायला? म्हणजे एकूणच दिवाळी म्हणून आपण जे पदार्थ करतो ते आपण कोठून शिकतो? बरेचसे परंपरागत म्हणजे आईला आज्जीन, आज्जीला तिच्या सासून, सासूला तिच्या शेजारणीन, असं करत करत हे पदार्थ आपल्या पर्यंत येतात. अर्थात या प्रवासात जस जसे समाजात बदल होत गेले, सुविधा येत गेल्या, तस तसे करण्याच्या पद्धतीत, त्यात घालायच्या वस्तून मध्ये फरक येत गेला. म्हणजे माझ्या आज्जीच्या काळी गुळाचे पदार्थ असायचे. तेंव्हा साखर नाही मिळायची. आता मी जर उठून 'खडुगळी' करते म्हणून चकल्या केल्या तर तुम्ही म्हणणार 'ए या चकल्या ना?' मी कधी केल्या नाहीत पण चांगल्या असाव्यात !' आता, म्हणतात महाराष्ट्राच्या एका भागात चकलीला 'खडुगळी' !. तर तसेच, जसे कमला बाई ओगलेंना 'चंपाकळी ' माहित होती तशी माझ्या घरच्यांना 'अरगट' माहिती आहेत . त्या साठी आम्हाला पुस्तक नाही शोधावी लागत. तर आज 'चवडे '. बराचसा करंजीचाच भाऊ पण थोडा वेगळा. बऱ्याच जणांना माहित असलेला पण मला वाटतंय की मी तो वेब वर कुठे तरी सेव्ह करून ठेवावा. जेंव्हा कधी कोणा परदेशी राहणाऱ्याला ' माझी आई बनवायची पण कसे ते नाही माहित ग !' असं वाटेल तेंव्हा मिळण्यासाठी!!! सामग्री:- १ वाटी रवा १ वाटी मैदा मोहना साठी २ टेबल स्पून तूप. थोडस अगदी चिमुटभर मीठ. साठा: २ चमचे तूप ३ चमचे मैदा. एकत्र मिसळून ठेवा. सारण- १ वाटी वरचा ब्राऊन लेअर काढून टाकलेलं अन सफेद झालेलं खोबर किसून. ३ लवंगा १/२ टी स्पून तूप अन १ १/४ वाटी पिठी साखर. ७-८ वेलदोडे. छोटासा जायफळाचा तुकडा. चिमुटभर मीठ. कढईत अर्धा चमचा तूप गरम करून त्यावर लवंगा तडकवा. या लवंगा बाजूला काढून घेऊन मिक्सरवर वेलदोडे, जायफळ थोडी साखर अन या लवंगा बारीक करून घ्या. गरम झालेल्या तुपावर खोबर साधारण गुलाबी रंगाच होई पर्यंत हळुवार हाताने भाजून घ्या. खोबऱ्याच्या किसाचा लांबटपणा मोडू देऊ नका. आता आच बंद करून त्यामध्ये पिठीसाखर मीठ अन वेलदोडे लवंग अन जायफळाची पूड मिसळा. परत एकदा छान हलक्या हाताने सगळं एकत्र करून डब्यात भरून ठेवा. कृती- रव्याला तूप चांगल गरम करून मोहन घालावे. From Drop Box" alt="" /> आता त्यात मैदा अन मीठ घालून थोड्याश्या गरम पाण्यात मळून बाजूला ठेवून दया. एक अर्ध्या तासाने या पिठाला खलबत्त्यात कुटून घ्या. आता याची थोडी जाडसर पोळी लाटून त्या पोळीला वरील साठा लावा अन गुंडाळून लांब वळे बनवा. From Drop Box" alt="" /> छोट्या छोट्या लाट्या कापून घ्या. From Drop Box" alt="" /> हे लाटी वरच्या भागाकडून जराशी दाबून अगदी हलक्या हाताने पाट लाटा. साधारण दहा पाती झाल्या, की त्या अर्ध्या फोल्ड करून चीरण्यान त्यांच्या कडा कापून घ्या. From Drop Box" alt="" /> एक खोलगट तवा घेऊन त्यात साधारण ५ ६ चमचे तूप घाला. तूप गरम झालं की हीं लाटलेली पात साधारण तळून घ्या. उलटी कडून पण असेच तळून घ्या. आता हीं गरम पात थोड तूप झटकून प्लेट मध्ये ठेवा अन तीवर अर्ध्या बाजूला सारण पसरवा. अर्धे दुमडून परत पाव भागावर सारण पसरा. अन हा हीं भाग दुमडा. वरून सजावटी साठी बदाम पाकात घालून चिकटवा. " alt="" /> झाले चवडे तयार. From Drop Box" alt="" />

वाचन 7416 प्रतिक्रिया 0