शाळेतले दीवस - माझा अभिनय

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
22 Oct 2010 - 1:51 am

माझ्या शालेय जीवनातल्या अनुभवांवरुन एखादा (छोट्या मुलांचा) चित्रपट निघेल असे ते अनुभव! प्रेमभंगापासुन प्रेमलिलया,फायटींगपासुन रडारड व कॉमेडीपासुन ट्राजेडीपर्यंत सर्वच आहे त्यात.आता ते दीवस आठवले की दोन शिव्या हासडल्याशिवाय मन शांत बसत नाही.असो.
'गेले ते दीवस राहील्या त्या आठवणी' असे स्वःता बाबुभाय बोलुन गेलेत.

सुरु....................

मी तेव्हा सहावी सातवीत असेन.प्रत्येक परीक्षेत अव्वल,शाळेत ज्यांच्या नावावर तक्रारींची नोंद व्हायची त्यातही अव्वल.म्हणुन एकासाठी 'बाळ' तर दुस-यासाठी 'कार्टा' अशा भुमिकेत मी रोज आतबाहेर करत असे.

शाळेची 'गॅद्रींग' सुरु झाली,gathering ह्या ईंग्लीश शब्दाची स्पेलींग कदाचित फक्त मलाच माहीती होती,आमच्या मित्रवर्गाची ईंग्लीशमधे बोंबाबोंब! मित्रांना ईंग्लीशच्या पेपराला उत्तर स्पेलींगसकट सांगाव लागायच तेव्हा मला माझ्या मित्रांच्या भविष्याबाबत खात्री वाटायची.
तर सहामाही परीक्षेत माझ्या शिरपेचात अजुन एका पिसाची वाढ झाली होती.आता गॅद्रींगचे भुत सर्वांवर चढले होते.आम्ही आपले चार हात लांब.आमच्याच वर्गातल्या मुलांचे नाटक बसवणार आहेत हे कळले म्हणुन मौलीक पाठींबा द्यायला आमची टोळकी पुढे सरसावली.

तो नाटकाच्या व गॅद्रींगच्या 'प्रॅक्टीस'चा पहीला दीवस्,मी आवर्जुन गेलो.प्रेक्षक म्हणुन काय झाल, प्रोत्साहन देउ हा भोळ विचार!
आमच्या वर्गाचे नाटक होते "चल रे भोपळ्या टुणुक टुणुक" व आज प्रत्येकाला भुमिका दील्या जाणार होत्या.नाटकाचा विषय ओळखीचाच होता,म्हणुन त्याला अभिनयाने प्रभावी बनवण्याचा प्रयत्न होता.शिक्षक आले.
"सुशांssत,तु ह्यावेळी नाटकात काम करायचं हं!"
मी नाही म्हणालो,मित्रांनीही डोस देउन मी काम करावच असा आग्रह धरला.'मी फक्त आभ्यासातच हुशार नाही',हे दाखवायची संधी आली होती,म्हणुन मीही आगाउ स्वभावाला जागुन हो म्हणालो.माझ्या डोळ्यासमोर मी स्टेजवर अस करतोय तस करतोय्,प्रेक्षक खुप हसतायत अस काहीस यायला लागल हे नक्की आठवत.
शिक्षक भुमिका 'वाटु लागले'.सर्व घोळका करुन कोण काय बनणार हे उत्सुकतेने ऐकत होते.
"तु वाघ बन,

मला काय बनायला मिळणार म्हणुन मी कान टवकारले,
तु म्हातारी बन'
तु म्हातारीची मुलगी बन'

झाले सर्व पात्रे संपली.
"मग मी काय बनणार?" मी विचारले.
"तु झाड बनायच"

हत्त!! मी नाजुक झाडाला वाराला लागावा तसा जागेवरच हललो,सर्वजण ख्याख्या करत माझ्यावर हसले.माझ्या हीतचिंतकांची तोंडे कोमजलेल्या फुलासारखी झाली.
शिक्षकही मनमुराद हसले.पण ह्यांना दाद देईल तो मी कसला!!
"हो चालेल,काय करायच असत?"
शिक्षकांनी ह्या अभिनयाला जे काही करावे लागत ते सांगितल.फक्त मीच नाही माझ्याच टोळकीतले ईतर तिघे 'झाड बनणार होते'
विक्रमच्या घरामागे मोठी बाग होती,त्यात खुप झाडे होती.फांद्या हाताशी येतील ती आम्ही बघुन ठेवली.
"नंतर तोडु वेळ आहे गॅद्रींगला" म्हणत आम्ही शाळेकडे निघालो,प्रॅक्टीस करायची होती.

शाळेत एका वर्गात अभिनयाचे धडे शिकवले जात होते.झादाचा अभिनय एक शिक्षिका समजवायला आल्या.
"फांद्या लांब आणा,खाली बसुन त्या हातात पकडायच्या,पॅन्ट चॉकलेटी कलरची घालुन या,खोडाचा रंग दीसला पाहीजे"
आम्ही हो हो म्हणत मन लावुन ऐकत होतो.
"वारा सुटल्याचे म्युजिक लागले की फांद्या अजुन जोरात हलवायच्या"
मी स्वःताला स्टेजवर उभा असलेला पाहत होतो,फजीती होणार हे नक्की होत्,पण कमीत कमी कशी होईल हे पहायचे होते.
काही दीवस गेले आता गॅद्रीगला दोन दीवस बाकी होते,आम्हा चौघांना स्टेजवर कसे बसायचे,कुठे बसायचे व एकमेकांत कीती अंतर ठेवायचे ते सांगण्यात आल.आम्ही लक्ष देउन ऐकल,एकमेकांना समजावुन संगितल.आम्हाला कोणालाच हसयला येत नव्हत्,आम्ही नाटकातल्या आमच्या भुमीकेबाबत गंभीर झालो होतो.तो दीवस तीच चर्चा करण्यात गेला.
दुस-या दीवशी गॅद्रीगची 'रंगीत तालीम' होती व त्यानंतर गॅद्रीगचा खरा थरार सुरु होणार होता.आम्ही आमच्या भुमीकेला जास्तीत जास्त न्याय देण्यासाठी स्वःताला तयार करत होतो.

क्रमश:

बालकथाविचार

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

22 Oct 2010 - 3:11 am | इंटरनेटस्नेही

शानबा ड्युड.. सही लिहलं आहेस! खरोखर मस्त वाटलं... असचं लिहीत जा.. मात्र थोडं ग्रामर, म्हणजे विशेषत: विरामचिन्हांकडे लक्ष देत जा. मग तुझ्या आणि इतर प्रस्थापितांच्या लेखनात तसुभर देखील फरक जाणवणार नाही. इन फॅक्ट ते कांकणभर सरसच होईल.

रेवती's picture

22 Oct 2010 - 3:14 am | रेवती

वाचतिये.

प्राजु's picture

22 Oct 2010 - 7:38 am | प्राजु

वाचतेय..

स्वैर परी's picture

22 Oct 2010 - 12:14 pm | स्वैर परी

मस्त लिहिले आहेस .. वाचतेय !!! :)

सविता००१'s picture

22 Oct 2010 - 12:21 pm | सविता००१

वाचतेय

छान लिहित आहात ...

वाचत आहे

जोशी 'ले''s picture

22 Oct 2010 - 2:29 pm | जोशी 'ले'

मस्त
अजुन येउ दे..

सुहास..'s picture

22 Oct 2010 - 3:04 pm | सुहास..

मस्त सुरुवात रे सुशान्त !!

पैसा's picture

22 Oct 2010 - 4:12 pm | पैसा

बाडिस. पुढचं लवकर दे.

sneharani's picture

22 Oct 2010 - 3:22 pm | sneharani

वाचत आहे.

गणपा's picture

22 Oct 2010 - 4:40 pm | गणपा

शाळा आणि अभिनय म्हटला की मी शाळेत (न) केलेल्या एक मेव नाटकाची आठवण होते.

सहावीत असताना एका नाटकात मला न्यायाधीशाची मुख्य भुमिका मिळाली. (आम्ही काही ऑडीशन च्या भान्गडीत पडलो नव्हतो. शेवटच्या बाकावर बसुन भांडताना वकीली मुद्दे काढणे ही किर्ती कदाचीत बाईं पर्यंत पोहोचली असावी. या एका क्वालीफिकेशन मुळे असेल कदाचीत पण मला मुख्य न्यायाधिशाची भुमिका मिळाली.) नाटकात काम करण्यार्‍या मुलांना भलताच भाव असायचा. तोर्‍यात मिरवायेचे बेटे. त्यामुळे मला गुदगुदल्या होऊ लागल्या.
पाठांतर म्हटली की मला हुडहुडी भरते. त्यामुळे काही केल्या माझे संवाद पाठच होईनात. सारखं प्राँप्टींग चालु असायच. बाजुला उभ्या असलेल्या भालदाराचे माझ्या वाटणीचे सगळे संवाद एव्हाना पाठ झाले होते. शेवटी मी वैतागुन बाईंना म्हटल की मला संवाद लिहिलेले कागद द्या मी वाचुन संवाद म्हणेन. नाही तरी न्यायाधीश निकाल देताना कसल्याश्या कागद पत्रांत डोक खुपसुनच बोलत असतो. (मी माझ चित्रपटांतुन मिळवलेल ज्ञान पाजळल.) बाईंनी फक्त दिवे ओवाळायची अँक्टींग केली.
दुसर्‍या दिवशी सगळ्यांना भालदार न्यायधीच्या खुर्चीवर बसलेले आणि आम्ही हाळी देत आहोत अस चित्र दिसल. ह्या अपमानाच बदला म्हणुन आम्ही राजीनामा दिला. परत आयुश्यात नाटकासाठी कधी स्टेज चढलो नाही.

सविता's picture

22 Oct 2010 - 5:21 pm | सविता

चांगलं वाटतंय.... वाचतेय...

शानबा५१२'s picture

22 Oct 2010 - 9:46 pm | शानबा५१२

सर्वांचे खुप खुप आभार!

मी वाचुन संवाद म्हणेन. नाही तरी न्यायाधीश निकाल देताना कसल्याश्या कागद पत्रांत डोक खुपसुनच बोलत असतो.

खीखी खरय्,
आता शिक्षकांना समजत नाही त्याला काय करायच!

kalyani B's picture

22 Oct 2010 - 9:48 pm | kalyani B

मस्त

नगरीनिरंजन's picture

23 Oct 2010 - 9:59 am | नगरीनिरंजन

पुढे?