वरील फोटो 'डॉन' वृत्तपत्रातील असून तो 'AFP'ने 'डॉन'ला पुरवला आहे.
पाकिस्तानी तालीबान आणि इतर दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती असणारे व त्यांच्या कुकर्मात सक्रीय असलेले लोक पोलीस व सैन्यासारख्या सुरक्षादलात आहेत हाच या जवळिकीचा अर्थ आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संध्याकाळी घरी जायला गाडीत बसलो कीं सेलफोनवर मी 'डॉन' हे कराचीहून प्रकाशित होणारे वृत्तपत्र वाचतो. काल "पाकिस्तानी सरकारच्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या पंजाब प्रांतातील शस्त्रागारांतून तीस लाख शस्त्रास्त्रे नाहींशी झाली आहेत" ही धक्कादायक बातमी वाचायला मिळाली आणि वाटले कीं आता आपल्या पोलिसांनी किंवा सैनिकांनी दहशतवादी पाकिस्तानी शस्त्रे वापरत आहेत असे सिद्ध केले तरी पाकिस्तान कानावर हात ठेवणार!
आजकाल पाकिस्तानच्या कुठल्याच बातमीबद्दल आश्चर्य वाटेनासे झाले आहे. पण ज्या घटनेमुळे आपल्यावर थेट आपत्ती कोसळू शकते अशी एकादी बातमी वाचली कीं खूप काळजी वाटू लागते!
नाहींशा झालेल्या शस्त्रांत सुमारे ३५०० ग्रेनेड्स आहेत तर ४५०० 'कॅलिश्निकोव्ह' स्वयंचलित बंदूकाही (AK-47) आहेत.
अशा बातम्या वाचल्यावर "पाकिस्तानी सैन्य आता एकसंध राहिले नसावे" या पहिल्यापासूनच आपल्या मनात असलेल्या शंकेची ’चुकचुकणारी पाल’ आणखीच जोरात चुकचुकू लागते. कायम पाकिस्तानी सरकार (मुलकी अथवा लष्करी) एका बाजूला, सैन्य दुसर्या बाजूला, त्यांची ISI ही गुप्तहेरसंघटना तिसर्या बाजूला आणि शेवटी सैन्याशी व ISI शी खास जवळीक असलेले अतिरेकी/दहशतवादी चौथ्या बाजूला असा "चौरंगी सामना" नेहमीच चालू असतो! भ्रष्टाचार आणि धर्मांधता या दोन बाबी सगळीकडे ठळकपणे दिसतात! याची अनेक उदाहरणे Nuclear Deception या लेखमालेत आलेली आहेत.
यातली कांहीं शस्त्रें पोलिसांनी वैयक्तिक दहशतवाद्यांकडून व दहशतवादी टोळक्यांकडून जप्त केल्यावर शस्त्रागारांत जमा न केलेली शस्त्रेही आहेत, पण त्याही पुढे म्हणजे बाँब निष्क्रीय करणार्या अधिकृत तुकड्यांनी (bomb disposal squad) अधिकृतपणे जिल्हापातळीवरील व प्रांताच्या पातळीवरील शस्त्रागारात अधिकृतरीत्या जमा केलेली तीस लाखांहून जास्त व वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रेही आहेत. याचा अर्थ एक तर पैशाच्या मोबदल्यात अशी शस्त्रे या शस्त्रागारांवरील सुरक्षा कर्मचारी ती विकत तरी आहेत किंवा दहशतवाद्यांबाबत सहानुभूती असलेले लोक सैन्यात, ISI मध्ये आहेत व ते अशी शस्त्रे धर्मांधतेपायी या दहशतवाद्यांना फुकट प्रदान तरी करत आहेत!
अलीकडेच मुशर्रफसाहेबांनी "पाकिस्तानी सैन्याने अतिरेक्यांना काश्मीरमध्ये लढण्यासाठी प्रशिक्षण दिले होते" अशी स्पष्ट कबूली एका जर्मन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दिली आहेच! त्याचाच भाग म्हणूनही हे शस्त्रास्त्रांचे वाटप झाले असेल! पाकिस्तानात कांहींही होऊ शकते!
इमानदार अधिकार्यांनी सचोटीने सर्व हिशेब बरोबर ठेवले होते हीच कांहींशी जमेची बाजू. पण इतके चोख हिशेब ठेवले जात असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रे चोरीला जावी ही गोष्ट कुठल्याही सरकारला काळजीत टाकेल.
भारतापुरते बोलायचे म्हणजे या चोरीला गेलेल्या शस्त्रांपैकी बरीचशी शस्त्रे आपल्यावरच चालविली जातील व ती पकडून जर आपण ती पाकिस्तानी असल्याचे जगाच्या निदर्शनाला आणून दिले तर पाकिस्तान सरकार "ती चोरीला गेलेल्या शस्त्रांपैकी असावीत" असे सांगून आपल्या कानावर हात ठेवील! म्हणजे सगळाच आनंदी आनंद आहे!
संपूर्ण वृत्त वाचायचे असेल तर पहा http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/the-newspa... हा दुवा!
प्रतिक्रिया
19 Oct 2010 - 3:32 pm | अवलिया
भारतातुन मधे काही शस्त्रं गायब झाली होती ती कुठे गेली? उद्या पाकिस्तानात काही झाले तर पाकिस्तान सुद्धा हे भारताचे कारस्थान आहे असे म्हणु शकते म्हणजेच -
पाकिस्तानपुरते बोलायचे म्हणजे या गायब शस्त्रांपैकी बरीचशी शस्त्रे पाकिस्तानवरच चालविली जातील व ती पकडून जर त्यांनी ती भारतीय असल्याचे जगाच्या निदर्शनाला आणून दिले तर भारत सरकार "ती गायब शस्त्रांपैकी असावीत" असे सांगून आपल्या कानावर हात ठेवील! म्हणजे सगळाच आनंदी आनंद आहे!
19 Oct 2010 - 3:53 pm | गांधीवादी
काही शस्त्र नाही,
तब्बल १६४ स्फोटक भरलेले trucks गायब झालेले आहेत.
कधी कधी असे वाटते कि हा देश सोडून दुसरीकडे दूर कुठेतरी जाऊन राहावे. काय कोण जबाबदार असणार आहे लोकांच्या जीवाला इथे ? सरकार काय भरपूर निषेद खलिते घेऊन बसलेली आहे.
19 Oct 2010 - 4:30 pm | स्पा
अहो आम्ही भारतात साधा नवीन flat घेऊ शकत नाही.....
देश काय सोडून जाणार???? कप्पाळ :)
((((( I .T . मध्ये Career करायला हवा होतं , आत्ता USA मधून मस्त मजा बघत बसलो असतो..... ))))))))))
19 Oct 2010 - 4:29 pm | रन्गराव
नाव बदला ते आधी. आता जीवंत असते तर तुमचा कान पकडून सांगितल असतं त्यानी -" अहिंसा परमो धर्मः! मुंबई मध्ये एक २६/११ झाल म्हणून चिडायच नाही. सीमा उघडी करायची. येवू द्यात त्यांना आणि कुठ पाहिजे तिथ रक्तपात करू देत. एक ना एक दिवस पश्चाताप होवून सुधरतील ते! " ;)
>>कधी कधी असे वाटते कि हा देश सोडून दुसरीकडे दूर कुठेतरी जाऊन राहावे. काय कोण जबाबदार असणार आहे लोकांच्या जीवाला इथे ? सरकार काय भरपूर निषेद खलिते घेऊन बसलेली आहे.
आपणच जबाबदार, आपण शिकलेले लोक मतदान करत नाही. जबाबदारी घेत नाही. वर मिपा सारख्या व्यासपीठावर बोंब मारून स्कोर करण्यात एक नंबर. कुठ तरी एक चांगला वाक्या वाचल होत- "Democracy makes sure that you never get leaders better than you deserve!"
19 Oct 2010 - 3:35 pm | रानी १३
आता काय ...........?? :( :(
19 Oct 2010 - 3:41 pm | सुधीर काळे
दुर्दैवाने भारतातून शस्त्रे चोरीला गेल्याचे माझ्या वाचनात आलेले नाहीं. कदाचित २४ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरच्या दरम्यान असल्यास शक्य आहे कारण मी प्रवासात होतो.
दुवा दिल्यास ही बातमीही वाचायला आवडेल.
19 Oct 2010 - 3:55 pm | गांधीवादी
http://timesofindia.indiatimes.com/city/jaipur/Licence-of-90-explosives-...
http://timesofindia.indiatimes.com/city/jaipur/103-more-trucks-with-expl...
19 Oct 2010 - 4:00 pm | सुधीर काळे
धन्यवाद!
मी रोजच टाइम्स वाचतो. तरी ही बातमी कशी वाचली नाहीं याचे मात्र आश्चर्य वाटते. या काळात मी खरे तर जकार्तालाच होतो.
19 Oct 2010 - 4:03 pm | अवलिया
चष्म्याला "पाकिस्तान" असा फिल्टर असेल तो काढुन बघा एकदा ;)
19 Oct 2010 - 4:09 pm | सुधीर काळे
तुमच्याकडून असेच कांहीं तरी वाचायला मिळेल याची खात्री होतीच. ती खरी ठरली हे पाहून आनंद झाला.
19 Oct 2010 - 4:11 pm | अवलिया
आपल्याला आनंद झाला हे वाचुन डोळे पाणावले.
19 Oct 2010 - 4:33 pm | सुधीर काळे
कदाचित ही शस्त्रेही पाकिस्तानातच जायची!
हे सर्व ट्रक राजस्थानमधून पूर्वेला मध्यप्रदेशात जायच्याऐवजी पश्चिमेला पाकिस्तानलाही गेले असतील.
19 Oct 2010 - 3:43 pm | सहज
पाकिस्तानी शस्त्रागारांतून नाहींशी झालेली तीस लाख शस्त्रें आपल्यावर रोखली जाणार?!
स्वात व्हॅली, वायव्य सरहद्द, पाकीस्तानात इतरत्र, इराक, मुख्य म्हणजे अफगणिस्तान, थोडी येमेन, थोडी सोमालिया वगैरे वगैरे मधे अशी बर्यापैकी वाटणी झाली की मग थोडीशी कश्मीरकडे.
म्हणजेच उत्तर आहे - नाही, तीस लाख शस्त्रें आपल्यावर रोखली जाणार नाहीत.
19 Oct 2010 - 3:46 pm | सुधीर काळे
खरंच कीं! पाकिस्तानला गिर्हाइके कमी नाहींत!!
What a relief!
19 Oct 2010 - 4:03 pm | ऋषिकेश
अवांतरः
१. मी चीनी वस्तुंवर बहिष्कार घातला तर माझी भारतीय म्हणून देशभक्ती कशी दिसून येते?
२. चीनी वस्तु म्हणजे काय? चिन मधे असेंबल झालेल्या वस्तु? ज्याचा कच्चा माल चीन मधे बनतो त्या वस्तु ? की ज्याचे वितरक चीनी आहेत त्या वस्तु? की ज्याचे विक्रेते चीनी आहेत त्या वस्तु? आणि जर याचे उत्तर "ह्या सगळ्या वस्तु चीनी आहेत" असेल तर हल्लीच्या ग्लोबल व्हीलेजमधून विकत घेण्यासारखे काय उरेल?
19 Oct 2010 - 4:10 pm | अवलिया
अवांतरावर अवांतर प्रतिसाद लिहिल्याबद्दल ऋ याचा निषेध
19 Oct 2010 - 4:13 pm | ऋषिकेश
तुमच्याकडून असेच कांहीं तरी वाचायला मिळेल याची खात्री होतीच. ती खरी ठरली हे पाहून आनंद झाला.
:)
19 Oct 2010 - 4:16 pm | अवलिया
....डोळे पाणावले.
19 Oct 2010 - 4:20 pm | ऋषिकेश
भारतीय रुमाल आहे का?
19 Oct 2010 - 4:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नसेल तर काय करावे?
19 Oct 2010 - 4:58 pm | परिकथेतील राजकुमार
नसेल तर 'अश्रुंची झाली फुले' किंवा 'आंसू बने अंगारे' ह्यातले एक काहितरी होईपर्यंत वाट पहावी.
19 Oct 2010 - 5:02 pm | मृत्युन्जय
चीनी रुमाल वापरुन डो़ळ्यात पाणी आणणार्या चीनचा निषेध करावा
19 Oct 2010 - 5:12 pm | नगरीनिरंजन
पत्र लिहून निशेध करावा.
19 Oct 2010 - 5:36 pm | ऋषिकेश
नसेल तर अश्रु ढाळण्यास मनाई आहे..
19 Oct 2010 - 4:12 pm | सुधीर काळे
प्रत्येकाने आपले-आपले ठरवावे. आग्रहही मुळीच नाहीं, फक्त एक सूचना (suggestion) आहे.
मी Made in China पुरता हा नियम पाळतो.
19 Oct 2010 - 11:07 pm | मिसळभोक्ता
काका, आपण सेलफोने वर डॉन वाचता. तो सेलफोन कुठे बनला आहे ? उघडून पाहिला का ?
19 Oct 2010 - 11:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
श्श ... काहीही काय प्रश्न विचारता हो तुम्ही मिभोकाका?
(मेड इन चायना संगणकावरून मिपा वापरणारी)
19 Oct 2010 - 4:12 pm | सुधीर काळे
प्रत्येकाने आपले-आपले ठरवावे. आग्रहही मुळीच नाहीं, फक्त एक सूचना (suggestion) आहे.
मी Made in China पुरता हा नियम पाळतो.
19 Oct 2010 - 5:44 pm | नितिन थत्ते
असेच म्हणतो.
.
.
.
.
नोकियाचा चीनमध्ये बनलेला मोबाईल चिनी समजायचा की फिन्निश?
बजाजने चीनमधून आणून आपली म्हणून विकलेली इस्त्री चिनी समजायची की भारतीय?
19 Oct 2010 - 4:02 pm | सुहास..
स्वात व्हॅली, वायव्य सरहद्द, पाकीस्तानात इतरत्र, इराक, मुख्य म्हणजे अफगणिस्तान, थोडी येमेन, थोडी सोमालिया वगैरे वगैरे मधे अशी बर्यापैकी वाटणी झाली की मग थोडीशी कश्मीरकडे. >>>
पुर्व पॅलेस्टाईन ?
19 Oct 2010 - 4:13 pm | विकास
फक्त नाहीशी झालेलीच का? तसे असले तर कमीच म्हणायला हवीत....
19 Oct 2010 - 4:17 pm | नगरीनिरंजन
इंचा इंचाने दोनशे तर तीस लाखाने किती?
19 Oct 2010 - 4:21 pm | परिकथेतील राजकुमार
एक अतिशय तळमळीने लिहिल्या गेलेल्या विषयावर काही प्रस्थापित सदस्यांनी नेहमीप्रमाणे केलेली हुल्लडबाजी पाहून आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली.
19 Oct 2010 - 5:00 pm | नितिन थत्ते
मिपाकर म्हणून की दुर्लक्षित मिपाकर म्हणून?
19 Oct 2010 - 5:03 pm | परिकथेतील राजकुमार
रहिम थत्ते चाचा, तुम्ही देखील टिंगल उडवायला लागलात :(
19 Oct 2010 - 5:09 pm | नितिन थत्ते
मी काळे काकांच्या धाग्यावर सिरिअस व्हायचे नाही असे ठरवले आहे. :)
19 Oct 2010 - 5:13 pm | परिकथेतील राजकुमार
वेळीच काळाची (शब्द निट वाचावा) पावले ओळखुन सावध व्हा थत्ते चाचा !!
19 Oct 2010 - 5:29 pm | नितिन थत्ते
ती ओळखूनच सिरिअस व्हायचे नाही असे ठरवले आहे.
19 Oct 2010 - 5:31 pm | सुहास..
मी काळे काकांच्या धाग्यावर सिरिअस व्हायचे नाही असे ठरवले आहे >>>
फक्त काळे काका ? का ? का ? असा अन्याय का बरं करावा प्रस्थापितांनी ?
(गांधीवादी,ईन्दरचाचा व Pain च्या प्रतिक्षेत)
सुहास..
19 Oct 2010 - 5:34 pm | नितिन थत्ते
:O
कोण कोणाला प्रस्थापित म्हणतंय....
19 Oct 2010 - 5:09 pm | गणपा
अ रे रे रे काय चालवलयत लेको. धाग्याचा पार काश्मिर करायला घेतलाय.
काळेकाकांनी दिलेलेई बातमी जरी चिंताजनक असली तरी आपल्या बुडाखाली काय आणि किती जळतय ही खरी काळजीत टाकणारी बाब आहे.
तब्बल १६४ स्फोटक भरलेले ट्रक गायब झाले त्याचा मिडियाने बाजार मांडला होता. आता सगेळे सोईस्कर रित्या विसरले आहेत.
19 Oct 2010 - 5:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हरकत नाही ना, इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत! मग धागा टवाळमुक्त होईल!
19 Oct 2010 - 5:14 pm | गणपा
तुमच्याकडून असेच कांहीं तरी वाचायला मिळेल याची खात्री होतीच. ती खरी ठरली हे पाहून आनंद झाला.
:)
19 Oct 2010 - 5:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
....डोळे पाणावले.
(अवांतर: शंका खर्या ठरतात, खात्र्या नव्हे!)
19 Oct 2010 - 5:40 pm | ऋषिकेश
हे बघ.. प्रस्थापित आहेस म्हणून उगाच वाद घालु नकोस. तिथे पर्या शरमेने (लाजून?) चूर होईल.
आणि आधीच इंचा इंचाने माघार घेणार्या काश्मिर मधे ३० लाख शस्त्रास्त्रे पोचत आहे आणि तु खात्री खरी ठरते का शंका करत बसली आहेस...छे छे छे! इतक्या अभ्यासात्मक धाग्याचे काश्मिर झाले आहे हेच खरे!!
19 Oct 2010 - 5:43 pm | सुहास..
प्रिय ऋषीकेश
तुमच्याकडून असेच कांहीं तरी वाचायला मिळेल याची खात्री होतीच. ती खरी ठरली हे पाहून आनंद झाला.
19 Oct 2010 - 5:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तू रूमाल द्यायचे सोडून काश्मीरच्या कुशंका का काढतोयस? (अनुप्रास पहा, अनुप्रास!!)
19 Oct 2010 - 5:48 pm | ऋषिकेश
माझ्याकडे चिनी कंपनीने आफ्रिकेतील कारखान्यात बनविलेले भारतात विकलेले रुमाल आहेत.. ते इथे चालणार नाहित बहुदा!
19 Oct 2010 - 5:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला चालतील, आण इकडे! कच्चा माल तर आपल्या विदर्भातूनच गेला असेल नै?
(फुकट ते पौष्टीक)
19 Oct 2010 - 5:53 pm | ऋषिकेश
छे.. कच्चा माल धारावीतील चिंधी बाजारातून गेला असावा असे "शांताराम" ह्या गोर्या लेखकाच्या पुस्तकवरून वाटते.. :P
चाल्तील का मग हे रुमाल?
19 Oct 2010 - 6:44 pm | सुनील
(अनुप्रास पहा, अनुप्रास!!)
हा कसला अनुप्रास?
काळे काकांनी कळवळून काढलेल्या काथ्याकुटाचा काश्मिर केलात की कारट्यांनो!
ह्याला म्हणतात अनुप्रास!!
19 Oct 2010 - 6:45 pm | अवलिया
सॉरी शक्तिमान. सुरवात माझ्या प्रतिसादाने झाली म्हणुन मी माफी मागतो.
19 Oct 2010 - 5:56 pm | गणपा
अ रे रे रे कंपुबाजांनी मिळुन एका ज्येष्ठ्य सभासदाच्या धाग्यावर केलेला अतिरेकी हल्ला पाहुन एक मिपाकर म्हणवौन घेताना मला लाज वाटत आहे.
त्यांच प्रायश्चित्त म्हणुन आम्ही मौन व्रत घेत आहोत. :(
19 Oct 2010 - 6:01 pm | ऋषिकेश
गणपा यु टु?
लाजणार्या गणपाने आपले लाजतानाचे फोटो टाकावे.. तेवढीच करमणूक :)
19 Oct 2010 - 6:08 pm | गणपा
असले जाहिररीत्या खाजगीतले फोटु मागु नये.
जरी पुणेरी नसलो तरी खास पुणे ३० स्टाईलने अपमान केला जाईल.
(17:56 वाजता चालु केलेल मौनव्रत संपलेल आहे याची नोंद घेण्यात यावी)
19 Oct 2010 - 6:00 pm | सुहास..
कंपुबाजांनी मिळुन एका ज्येष्ठ्य सभासदाच्या धाग्यावर केलेला अतिरेकी हल्ला पाहुन एक मिपाकर म्हणवौन घेताना मला लाज वाटत आहे. >>.
वाक्य चुकले आहे !!
योग्य वाक्य हवे असल्यास व्यनी करावा !!
19 Oct 2010 - 6:37 pm | मनि२७
ह्या धाग्यावर असेच कांहीं तरी वाचायला मिळेल याची खात्री होतीच. ती खरी ठरली हे पाहून आनंद झाला. :-)
आता कोणाकोणाचे डोळे पाणावले ???
;-)
19 Oct 2010 - 6:39 pm | अवलिया
अरेरे काळेंचा सामंतकाका न होवो...
19 Oct 2010 - 6:45 pm | सुहास..
अरेरे काळेंचा सामंतकाका न होवो... >>
कोण सामंत काका ?
धन्यवाद
19 Oct 2010 - 6:46 pm | मदनबाण
पाकड्यांकडुन काय अपेक्षा ठेवायच्या ? अमेरिका शस्त्रात्रांचा दानधर्म करायला बसली आहे आणि पाकडे दरवेळी झोळीत कमीच दान आले असे दानी अमेरिकेला सांगतात... भोळी बिचारी अमेरिका ( याच अमेरिकेनेच तालिबान्यांना प्रशिक्षण देले होते ना ? ;) आधीचे मुजाहिदीन तेच आत्ताचे तालिबान बनुन उलटले आहेत एव्हढचं... ;) ) मग परत नवीन शस्त्रात्रांचा तोहफा पाकड्यांना वेळोवेळी देत राहते.त्यात अशी छोटी मोठी चोरी झाली तर काय बिघडले ? ;) नविन शस्त्रे मागण्याची संधी उपलब्ध झाली नाही का ? मागा भिक अमेरिकेकडुन !!! ते आहेच लाड पुरवायला तयार...
जरा हे देखील वाचा :--- http://news.yahoo.com/s/afp/20101006/wl_afp/pakistanunrestnato
जाता जाता :--- अमेरिकेने वॉर अगेन्स्ट टेररिझमची घोषणा केली आणि त्यांचा या मोहिमेत सगळ्यात महत्वाचा साथीदार कोण ? तर पाकडे !!! याच्या सारखा मोठा विनोद अमेरिकेने जगाला या आधी सांगितला नसावा !!! असे मला वाटते. ;)
जो देश दहशदवाद्यांच्या फॉक्टर्या लावतो, पोसतो,सशस्त्र करतो तोच वॉर अगेन्स्ट टेररिझम मधे अमेरिकेला साथ देतो म्हणे !!! ;)
वा काय गुणी पार्टनर अमेरिकेने निवडला आहे नाही ? ;)
असो... हे असेच चालणार. हिंदुस्थानचे रक्त पिणारे हे पाकरुपी गोचीड अमेरिका पोसतो आहे, हे मी नेहमीच लक्षात ठेवतो...
19 Oct 2010 - 6:55 pm | Nile
मी तर म्हणतो ह्याचा सामना करायला समस्त मराठी संस्थळावरील भारतीय आयटीतल्या लोकांना सिमेवर धाडावे, त्यांच्या नेतृत्व-कला-गुणांवर आमचा पुर्ण विश्वास आहे. (जाता जाता दोनचार आध्यात्मिक धागे लिहणार्यांनाही घेउन जावे, अधुन मधुन बरे असते प्रार्थनेला) ;-)
चला देशाचा प्रश्न सुटला, आता कशी शांत झोप लागेल.
19 Oct 2010 - 8:49 pm | तिमा
दसर्याला साहेबांनी डरकाळी फोडली आहे. त्यामुळे सारे जग जरी भारताच्या विरुध्द गेले तरी काळजी नसावी. ते मर्द, ते वाघ, ते ज्वालामुखी, ते गरम डोक्याचेच, आपलं रक्षण करतील.
19 Oct 2010 - 11:38 pm | तर्री
Nero Fiddled while Rome burned.
अशी एक म्हण आहे , त्याची आठवण झाली .
(नीरो कोण? लगे रहो.....)
19 Oct 2010 - 11:52 pm | सुनील
निरो पहिल्या शतकातील तर फिडलचा शोध दहाव्या शतकातील. तेव्हा रोम जळत असताना निरो फिडल वाजवणे शक्य नाही (मात्र शिट्या वाजवीत असणे शक्य आहे!)
20 Oct 2010 - 12:51 am | अर्धवटराव
भारतात १७६० ट्रक शस्त्रास्त्रे चोरी जाऊ देत ना... त्यामुळे या ३० लाख पाकिस्तानी शस्त्रांच्या बातमीचे गांभीर्य कमी होत नाहि. ३० लाख हा आकडा हिमनगाचे टोक असणार...
(शस्त्रधारी) अर्धवटराव
20 Oct 2010 - 8:00 am | गांधीवादी
मुंबईनंतर होते 'टार्गेट दिल्ली'
हेडली म्हणतो. त्यापैकी एनडीसीभोवतालची सुरक्षा व्यवस्था अगदीच कुचकामी होती तर पंतप्रधान निवासाभोवतीचे सुरक्षा कवच भेदणे कठीण होते,
हे सांगायला हेडली कशाला पाहिजे ?
(इथे हेडली एक विसरला, 'माझे नाव य्याव त्याव' ह्या चित्रपट गृहात सुद्धा एकदम कडेकोट सुरक्षा असते हे त्याने नमूद केले नाही.)
कोणी मुंबईकर असतील तर त्यांनी कृपया 'श्री छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकावरील' सध्याच्या सुरक्षेबद्दल सांगावे. (इतर स्थानकांवरील सांगितले तरी चालेल.) मी आज स्वतः पुण्याच्या रेल्वे स्थानकावर एक चक्कर मारून येतो.