गावरानमेवा २) कणकं

जागु's picture
जागु in पाककृती
15 Oct 2010 - 3:35 pm

कणकं ही कंदमुळ बटाट्यासारखी दिसतात. मोठी कणकं लांबट असतात. ह्यांच्या सालाला थोडे केस असतात पण करांद्यांएवढे नसतात. कणक ह्या कंदमुळाचा वेल असतो. वेल चांगला बहरला की कणकाच्या मुळ मुळाला अजुन ६-७ कणक लागतात (अर्थात जमीनीवर अवलंबुन आहे ह्यांचे प्रमाण) कणकांसाठी चांगली भुसभुशित जमिन लागते. ही कणक उपवासालाही खातात. काहीजण ह्यावर साजुक तुप लावुन खातात. भाजलेली कणक जास्त रुचकर लागतात.

लागणारे साहित्य:
कणकं
मिठ
पाणी

पाककृती:
कणक स्वच्छ धुवुन भांड्यात पाणी ठेउन मिठ टाकुन शिजवा. जास्त मऊ करायची नाहीत. थंड झाली की साल काढून कणकांचा फराळ करायचा.

प्रतिक्रिया

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

15 Oct 2010 - 3:53 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

तशीच दिसते आहे..
अरवी म्हणजे अळुकुडी....
ती आहे का ही?

सुहास..'s picture

15 Oct 2010 - 3:56 pm | सुहास..

भाजलेली कणक जास्त रुचकर लागतात. >>>

एक नंबर लागतात ग !!

स्वाती२'s picture

16 Oct 2010 - 1:24 am | स्वाती२

+१
मला भाजलेलीच आवडतात.

मलाही भाजलेलीच आवडतात.

अजुन एक रताळ्यासारखे पण थोडेसे जास्त केसाळ कंदमूळ असते घरकंद म्हणुन तुम्हाला माहित का?

अवांतरः कणक की कनक?

चेतन, घरकंद नक्की कसे असतात ? एकतर मी पाहीले नसतील किंवा आमच्याकडे त्याला दुसर नाव असेल.
आम्ही कणकंच म्हणतो.

जाई नाही ग ही अळकुडी नाही अळकुडी काळपट असते आणि जास्त लांबट किंवा कधी कधी गोलाकारही असते. अळकुडीचा फोटो टाकेन नंतर.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Oct 2010 - 4:34 pm | परिकथेतील राजकुमार

हे सगळे रानमेवे लिहितेस त्याबद्दल धन्यवादच ग जागुतै. मात्र पुढच्यावेळी हे पुण्यात कुठे मिळतात ते पण लिही ;) नाहीतर नुसता वाचुन उपयोग काय ?

वेताळ's picture

15 Oct 2010 - 6:18 pm | वेताळ

त्यापेक्षा जागुतै कडे एकादी ट्रिप काढुया. नव नवे पदार्थ खायला मिळतील.

नक्की पिकनिक काढा. कधी येताय ते कळवा.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

15 Oct 2010 - 8:07 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

मी लहानपणी काय उपयोग असं म्हणायचं असे तर " मग काssss उ पेगsssss" असं म्हणायचे! ;)
.. नविन शब्द...FYI !

परिकथेतील राजकुमार's picture

16 Oct 2010 - 12:59 pm | परिकथेतील राजकुमार

'पेग' हा शब्द आणि उच्चार काळजाला भिडला.

ज्योति प्रकाश's picture

15 Oct 2010 - 8:59 pm | ज्योति प्रकाश

कणक याला कोकणात कणगी पण म्हणतात बहुतेक ती कोकणात मिळतात.

राजकुमारजी आहो त्यासाठी मी फोटो टाकलेत ना. फोटो घ्यायचा हातात आणि शोधायचे बाजारात आपण ह्यांना पाहीलत का विचारत.
मी सांगण्यासाठी मला पुण्याला येऊन पुण्याची माहीती करुन घ्यावी लागेल आधी. बाकी पुण्याला २-३ वेळा आलेले आहे. मला आवडल पुणं.

होना..
मी तर कधी एकलेले पण नाही ग बाई..

व्वा!!
माझ्या पाकशास्त्राच्या ज्ञानात आणखी एक भर पडली. :)

सुनील's picture

15 Oct 2010 - 6:35 pm | सुनील

लहानपणी आई उपासाला करी तेव्हा फारशी आवडत नव्हती. पण आता खावीशी वाटताहेत!

नरेश_'s picture

15 Oct 2010 - 7:26 pm | नरेश_

व्वा ! आताशा आमच्याकडेही बाजारात यायला लागलीयत.
छान लागतात हे वे सां न ल.

रेवती's picture

15 Oct 2010 - 8:54 pm | रेवती

वेगळा प्रकार आहे.
थंड झाल्यावर ही कणकं कश्याबरोबर खायची?

गणपा's picture

15 Oct 2010 - 9:12 pm | गणपा

हा कंदाहार आहे. :)

ह्म्म्म, याला आमच्या इथल्या जंगलात पाहिल्या सारखे वाटते...

पिंगू's picture

15 Oct 2010 - 10:17 pm | पिंगू

मी कणके खाऊन कितीतरी वर्षे उलटून गेली... आता शोध घेतलाच पाहिजे...

- पिंगू

दिपाली पाटिल's picture

16 Oct 2010 - 12:19 am | दिपाली पाटिल

हे मस्तच लागतं... जळगावकडे याला पेंड्या म्हणतात, आम्ही या उकडून ठेवतो आणि दुसर्‍या दिवशी खातो... यांची चव कधी फिक्कट कधी गुळचट लागते...

मराठमोळा's picture

16 Oct 2010 - 4:04 am | मराठमोळा

>>जळगावकडे याला पेंड्या म्हणतात
हे माहित नव्हतं, आणि खाल्लेलं पण नाही.

नवे नवे प्रकार माहित करुन दिल्याबद्दल जागुतैचे आभार!! :)

दिपाली पाटिल's picture

16 Oct 2010 - 9:32 am | दिपाली पाटिल

अर्रे मराठमोळ्या, तु पुण्याला होतास ना... बामणोदकडेच होतात ह्या पेंड्या, नुसत्याच उकडून खातात, भाजी नाहीये. तुझ्या आईला माहीत असावं बहुतेक

मिसळभोक्ता's picture

16 Oct 2010 - 3:51 am | मिसळभोक्ता

ही भाजी विदर्भातही मिळते. पण आता (वयोमानपरत्वे) नाव आठवत नाही.

प्रियाली's picture

16 Oct 2010 - 4:07 am | प्रियाली

मी लहानपणी खाल्ली होती. वसईला.

स्पंदना's picture

16 Oct 2010 - 7:13 am | स्पंदना

एकदम नविन !!

रानमेव्याच्या माहितगार जागुताईंना धन्यवाद.

पिंगू's picture

16 Oct 2010 - 10:12 am | पिंगू

आजच सकाळी मावशीने कणके आणि कारींदे पाठवून दिलेत... दिवस भारी आहे आजचा...\

- पिंगू

शिल्पा ब's picture

16 Oct 2010 - 11:56 am | शिल्पा ब

आज पहिल्यांदा पहिली हि भाजी/ फळ ...नाव सुद्धा माहीती नव्हते..