मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गावरानमेवा २) कणकं

जागु · · पाककृती
कणकं ही कंदमुळ बटाट्यासारखी दिसतात. मोठी कणकं लांबट असतात. ह्यांच्या सालाला थोडे केस असतात पण करांद्यांएवढे नसतात. कणक ह्या कंदमुळाचा वेल असतो. वेल चांगला बहरला की कणकाच्या मुळ मुळाला अजुन ६-७ कणक लागतात (अर्थात जमीनीवर अवलंबुन आहे ह्यांचे प्रमाण) कणकांसाठी चांगली भुसभुशित जमिन लागते. ही कणक उपवासालाही खातात. काहीजण ह्यावर साजुक तुप लावुन खातात. भाजलेली कणक जास्त रुचकर लागतात. लागणारे साहित्य: कणकं मिठ पाणी पाककृती: कणक स्वच्छ धुवुन भांड्यात पाणी ठेउन मिठ टाकुन शिजवा. जास्त मऊ करायची नाहीत. थंड झाली की साल काढून कणकांचा फराळ करायचा.

वाचने 12371 वाचनखूण प्रतिक्रिया 29

In reply to by स्वाती२

चेतन Mon, 10/18/2010 - 11:45
मलाही भाजलेलीच आवडतात. अजुन एक रताळ्यासारखे पण थोडेसे जास्त केसाळ कंदमूळ असते घरकंद म्हणुन तुम्हाला माहित का? अवांतरः कणक की कनक?

In reply to by चेतन

जागु Mon, 10/18/2010 - 12:10
चेतन, घरकंद नक्की कसे असतात ? एकतर मी पाहीले नसतील किंवा आमच्याकडे त्याला दुसर नाव असेल. आम्ही कणकंच म्हणतो.

हे सगळे रानमेवे लिहितेस त्याबद्दल धन्यवादच ग जागुतै. मात्र पुढच्यावेळी हे पुण्यात कुठे मिळतात ते पण लिही ;) नाहीतर नुसता वाचुन उपयोग काय ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

मी लहानपणी काय उपयोग असं म्हणायचं असे तर " मग काssss उ पेगsssss" असं म्हणायचे! ;) .. नविन शब्द...FYI !

In reply to by परिकथेतील राजकुमार

जागु Sat, 10/16/2010 - 15:24
राजकुमारजी आहो त्यासाठी मी फोटो टाकलेत ना. फोटो घ्यायचा हातात आणि शोधायचे बाजारात आपण ह्यांना पाहीलत का विचारत. मी सांगण्यासाठी मला पुण्याला येऊन पुण्याची माहीती करुन घ्यावी लागेल आधी. बाकी पुण्याला २-३ वेळा आलेले आहे. मला आवडल पुणं.

सुनील Fri, 10/15/2010 - 18:35
लहानपणी आई उपासाला करी तेव्हा फारशी आवडत नव्हती. पण आता खावीशी वाटताहेत!

नरेश_ Fri, 10/15/2010 - 19:26
व्वा ! आताशा आमच्याकडेही बाजारात यायला लागलीयत. छान लागतात हे वे सां न ल.

दिपाली पाटिल Sat, 10/16/2010 - 00:19
हे मस्तच लागतं... जळगावकडे याला पेंड्या म्हणतात, आम्ही या उकडून ठेवतो आणि दुसर्‍या दिवशी खातो... यांची चव कधी फिक्कट कधी गुळचट लागते...

In reply to by दिपाली पाटिल

मराठमोळा Sat, 10/16/2010 - 04:04
>>जळगावकडे याला पेंड्या म्हणतात हे माहित नव्हतं, आणि खाल्लेलं पण नाही. नवे नवे प्रकार माहित करुन दिल्याबद्दल जागुतैचे आभार!! :)

In reply to by मराठमोळा

दिपाली पाटिल Sat, 10/16/2010 - 09:32
अर्रे मराठमोळ्या, तु पुण्याला होतास ना... बामणोदकडेच होतात ह्या पेंड्या, नुसत्याच उकडून खातात, भाजी नाहीये. तुझ्या आईला माहीत असावं बहुतेक