चवींचा "जिव्हा" ळा...... माझ्या मनातला!

जाई अस्सल कोल्हापुरी's picture
जाई अस्सल कोल्हापुरी in जनातलं, मनातलं
12 Oct 2010 - 2:13 am

सकाळी सकाळी लेकीला मस्त भुक लागली होती. कूकर नुकताच झाला होता. पटकन तिला तूप मेतकूट भात कालवून द्यावा असं वाटलं. म्हणून कूकर उघडला..आहाहा...मस्त आंबेमोहोर चा जिवघेणा गंध नाकात शिरला. (उपासाच्या वेळी असले वास जरा जास्तच जिवघेणे वाटतात) तिच्या नेहमीच्या प्लेट मध्ये काढला.त्यावर भरपूर साजुन तुप ओतले.साधारण ४-५ चमचे.मग तो आं.मो.चा गंध अधिकच गहिरा झाला .....त्यात साजुक कणीदार तूप अस मस्त शिरत होतं....आणि त्या तुपाचा रवाळपणा पहिल्या वाफेच्या भाताच्या ताज्या ताज्या गरम पणामुळे असा प्रेमानं विरघळत होता.......आहाहा.... चवीपुरतं मीठ घातलं आणि मेतकूटाची बरणी(आईने दिलेली) काढली. ती उघडल्या उघडल्या पुढल्या मानासिक छळाची कल्पना केली.....कारण असं सुंदर्...तो typical पिवळा रंग....perfect भाजलेलं (आईच्या भाषेत "खमंगपणा वर" भाजलेलं) मेतकूट्..आपला रंग आणि गंध दाखवत होतं.माझ्या आईची resipes सांगायची एक वेगळीच vocabulary आहे...म्हणजे कसं माहितिये का?..मी तिला विचारल ना आई मेतकूट सांग ना कसं करू....तुझ्यासारखं जमायला हवय गं....मग आई सुरू... साधारण सगळं वाटी वाटी घे....आणि असं 'खमंगपणावर" भाज्....आता वास्तविक खमंगपणावर या term ला तसा शाब्दिक अर्थ काहिहि नाहिये....पण ते तिला कळतं आणि सवयीने मलाही! उअक्डीच्या मोदकाची रेसिपी सांगताना तर तिचा एक शब्द मला जाम हसवतो.... पाण्याला "मुंगेरी आधण" आलं ना की त्यात पिठी घाल्....आता मुंगेरी आधण म्हणजे काय? तर पाणी न उकळता पातेल्याच्या तळाशी बारीक बारीक बुड्बुडे जमायला लागले ना की आलं तिचं ते मुंगेरी आधण्...उकळी फुटण्या आगोदरची stage! फार गमतीदार असतात तिचे शब्द्!..असो!
...तर मग मी ते चमचे -२ चमचे मेतकूट भातात घातलं आणि छान कालवून दिला.सोबत गोड लिंबाचं लोणचं ही घातलं. तो मस्त चवीचा भात आणि लिंबाच गोड लोणचं.... तिनेही असा पहिला घास तोंडात घातला आणि मग लोणच्याची चुटूक बोटानी जिभेवर लावली (हे असं खायचं हा माझा download) ...आणि मग तृप्त पणे डोळे मिटून जे ... हंsssssss केलं ना ...आहाssss मीच तृप्त झाले.
काय होत येवढं त्यात? साधा तूप भात मेतकूट; पण कित्ती खमंग्...सात्विक्..असं साधच पण पोटावर प्रेम करणारं खाणं! मग मन अशाच काही चवींच्या आठ्वणीत गेलं.. तूप्,मेतकूट भात... असाच पहिल्या वाफेचा वरण ,भात तूप मीठ लिंबू! अक्षरशः सूख! अजुन काही....
१) भरपूर पावसात भिजुन ....खुप भुक पोटात घेउन घरी पोचल्या पोचल्या कपदे बदलून येइपर्यंत ......आईने केळीच्या पानावर वाढलेली गरम गरम मुगाची खिचडी+भरपूर तूप + कैरीचे लोणचे + खमंग पापड...

२) ऑड वेळी लागलेली भूक + शिल्लक राहिलेल्या भाताचा भरपूर लसूण घालून ..परतून परतून केलेला फोडणीचा भात..
त्या वेळी त्या साध्या फोदणीच्या भाताची जी taste लागते ना....आहाहाह!

३) तव्या वरची गरम गरम ..भरपूर पदर सुटलेली पोळी आणि ताज्या दुधाचा ultimate चहा....

४) अशीच उशीरा घर दाखवलेली रात्र्.....आणि ३ शिट्ट्यात झालेला गरम गरम भात आणि झण्झणीत पिठलं....

५)नवर्‍यांची लाडकी बायको माहेरी गेली असताना स्वतः भुकेच्या वेळी बनवलेली कां.ब.र. भाजी म्हणजे कांदा बटाटा रस भाजी आणि कोपर्‍यावरच्या बेकरीतुन आणलेला ताजा ब्रेड.

६) लहानपणी,...शाळेतल्या डब्यातली भेंडीची भाजी आणि पोळी......आणि मित्राच्या /मैत्रिणीच्याच डब्यातली आवडणारी लाल भडक बटाट्याची काचर्‍याची भाजी...अजुन अनेकांना आठवत असेल ना! आणि घरी आल्यावर आईकडे ती भाजी कर ना ग आई असा केलेला लाडिक हट्ट्.......आणि आईने तीच भाजी करून डब्यात दिली की " नाहि गं पण अम्याच्या डब्यात अस्ते तशी नाही लागली " असे बोलुन केलेला हलकटपणा! :)

७) तूप गूळ पोळीचा लाडू ( शिळ्या पोळ्यांचा)..

८) आजीने कालवून दिलेला साय भात ( oh साय...... my another favorite)
९) ....पातेल्यातली साय तर मला अजुन बोलावते.....ये गं जाई...मी बघ कशी पोहते आहे....! आणि मग ती दाट साय वाटीत काढुन घ्यायची ...त्यावर अशी साखर पेरायची ..चमचा घ्याय्चा आणि ...'' wallah"

10) तिखट तिखट आमटी भात्..... हा आमटी भात तर..... आई गं...कधीही विचारा...खायला तयार असायचे मी!

...या अशा आणि इतर अजुन अनेक .. न संपणार्‍या चवी...जिभेवर आणि पोटावर प्रेम करणार्‍या साध्या साध्या पण मनात कायम रेंगाळणार्‍या जिव्हा स्मृती...तुमच्याशी share कराव्या वाटल्या....
..काय मग्?..उद्या खाणार ना तुप्,मेतकूट भात?.....

मुक्तकप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

अनामिक's picture

12 Oct 2010 - 2:30 am | अनामिक

जिभेवर आणि पोटावर प्रेम करणार्‍या साध्या साध्या पण मनात कायम रेंगाळणार्‍या जिव्हा स्मृती...तुमच्याशी share कराव्या वाटल्या....

आणि त्या आधी लिहिलंय

नवर्‍यांची लाडकी बायको ....

कोणाच्या नवर्‍याची? आणि लाडकी बायको म्हणजे एक आवडती, एक नावडती असा प्रकार तर नाही ना? (ह.घ्या)

बाकी काही चवी जीभेवर रेंगाळत राहतात खर्‍या. लहानपणी डब्यात नेलेली किंवा घरीच खाल्लेली तूप-साखर्-पोळी काही केल्या रिप्लेस करता येत नाही.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

12 Oct 2010 - 2:48 am | जाई अस्सल कोल्हापुरी

नवर्‍यांची लाडकी बायको ....

कोणाच्या नवर्‍याची? आणि लाडकी बायको म्हणजे एक आवडती, एक नावडती असा प्रकार तर नाही ना? (ह.घ्या)
>>हे आपापल्या सोयीनुसार घ्यावं... बहुसंख्य मिपाकर तसेच घेतात :)
>> कोणाचा नवरा,कोणाची आवडती बायको...ंआवडती बायको..आवड्ता नवरा.. नावडता नवरा (असु शकत नाही का?...बायकोच आवडती आणी नावडती का?......(मग मी काय सोडते की काय) ) जे ज्यांना परवडतं तसं घ्यावं..

लेख आवडला. तों. च. (चळचळून) पा सु.
साधा दही भात आणि गोड लिंबाचं लोणचं किती मस्त लागतं ते आठवलं.
साय साखरेची वाटी
खरवस
गरम गरम तूप-मीठ-वरण-भात
उपासाचं थालीपीठ
सगळं आठवलं. आज काही खरं नाही.

अगं आता बास त्या आठवणी!
त्रास होतो म्हणतीये तरी आपलं चालूच! आँ?

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

12 Oct 2010 - 11:11 am | जाई अस्सल कोल्हापुरी

दहीभात त अक्षरशः एक केमेस्ट्री आहे......... दहिभात आणि कैरीचे लोणचे....
दहिभात आणि लसणीची चटणी....
दहिभात + कोणतीही उसळ / भाजी /आमटी / पिठलं/ रस्सा.........

ए, गप्प बैस ना माझे बाई!:)
हे असं काहीतरी लिहून मोकळं व्हायचं आणि दुसर्‍याला त्रास!;)
कितीही नको वाटत होतं तरी आज दुपारी १० मिनिटं वेळ होता म्हणून तेल लावलय मी डोक्याला.......तुझ्या वेगळ्या रेशिप्यांचा परिणाम, दुसरं काय? संध्याकाळी टोमॅटो चिरताना त्याचा रस चेहेर्‍याला लावावा काय? असा प्रश्न मनात आला....त्याला प्रयासानं बाजूला सारलं.;) सगळे प्रयोग एकाच दिवशी नकोत!

गणपा's picture

12 Oct 2010 - 1:33 pm | गणपा

ए, गप्प बैस ना माझे बाई!Smile
हे असं काहीतरी लिहून मोकळं व्हायचं आणि दुसर्‍याला त्रास!

रेवती ताईशी सहमत.

आता कृपा करा आणि त्या मेतकुटाची रेशिपी द्या रे कुणी तरी. आजवर नुसतच ऐकत आलोय.. :(

विलासराव's picture

12 Oct 2010 - 8:23 pm | विलासराव

आता कृपा करा आणि त्या मेतकुटाची रेशिपी द्या रे कुणी तरी. आजवर नुसतच ऐकत आलोय..

काय भानगड आहे ही मेतकुट म्हणजे????
कोणी सांगेल का?

गणपा's picture

12 Oct 2010 - 8:27 pm | गणपा

हे पाहा हो विलासराव.
चकली तैंचा ब्लॉग जिंदाबाद :)

विलासराव's picture

12 Oct 2010 - 8:51 pm | विलासराव

हो गणपाशेठ!!!!!
कधी खाल्लेलं आठवत नाही.
आता खावच लागेल.

मनीषा's picture

12 Oct 2010 - 8:07 am | मनीषा

चवींचा 'जिव्हा'ळा आवडला ...

लेखाइतकेच लेखाचे शिर्षकही सुंदर - म्हणजे अगदी "खमंगपणावर" लिहिलेले.

स्पा's picture

12 Oct 2010 - 11:34 am | स्पा

आम्ही काही वेळेला " दडपे पोहे" करतो.....

पातळ पोहे + तिखट +थोडी साखर + लिंबू +कांदा + टोमाटो+ चाट मसाला

बास्स...(अजून कोणाला काही वाटलं तर add करा )

सगळं एकत्र करून ताव मारायचा

निवेदिता-ताई's picture

12 Oct 2010 - 11:47 am | निवेदिता-ताई

जाई........अग मा़झेच बालपण उभे केलेस माझ्यासमोर............खरोखरच आईने आग्रहाने वाढलेला
गरम गरम गुरगुट्टा भात-त्यावर भरपुर तुप, मेतकूट.....अहाहा.मस्तच,
आणी एक विशेष आठवण आईची......दुधावरची घट्ट साय ...आणी सायीचे पातेले फक्त माझ्यासाठीच
असायचे..मला आवडते म्हणून..नंतर माहेरी जाईन तेव्हा पण फक्त माझाच तो हक्क, बाजूलाच काढून
ठेवायची माझी आई...
आणी तु म्हण्तेस ते पोळीचा लाडू,आणी असे असंख्य पदार्थ आईच्या हातचे, त्याला जगात तोड नाही.
डोळ्यात पाणी आले बघ माझ्या............कारण हे सर्व करणारी माझी आईच आता नाहीय...
आणी अपार माया करणारे माझे बाबा (दादा) पण नाहीयत आता.
पण हा चवींचा 'जिव्हा'ळा आपण आपल्या मुलांना तर देत आहोतच न ,,यातच खुप आनंद...हो, ना , जाई.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

12 Oct 2010 - 1:03 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

...तु कुठं राहतेस सांग पुण्यात असशिल तर माझा contact no. व्यनि. मध्ये टाकते आहे...कधिहि ये.... पोळीचा लाडु..आणि साय खायला!..
...आया असतातच हे सगळ करायला!
माझी आई अजुनही माहेरी जाणार असेल तर जास्तिचे दुध तापवून ठेवते... त्या २ वाट्या सायीसाठी...
नाहीतर मोट्ठा कुंडा असतोच सायीच्या दह्याचा!
असो...

शाहरुख's picture

12 Oct 2010 - 8:55 pm | शाहरुख

ताई, मला पण बोलव की गं घरी !

(तुझा कोल्हापूरचा भाऊ) शाहरुख

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

12 Oct 2010 - 8:56 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

कोल्हापुरी लोकांच्या घरी जायला बोलवावं लागतं का हो?
....कधीबी या दुबईत!

होय, बोलवावं लागतं.
प्राजु कोल्हापूरकरणीच्या घरी तिनं बोलावल्याशिवाय आम्ही जात नाही.;)
एकदा ठरलेली तारीख तिने बदलली.
बदललेल्या तारखेला आम्ही नेटाने गेलोच.;)

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Oct 2010 - 12:14 pm | llपुण्याचे पेशवेll

वरण आणि भात. वरणाच्या निम्म्याने तूप, एक लिंबाची फोड. वरण जरा घट्टंसं पाहीजे. कैरीच्या लोणच्यातले वरचे थोडे तेल. असा आरोग्य घातक आहार मला फार आवडतो. मग तो भात खाता खाता भले मेलो तरी बेहत्तर.

अरे दुष्टं माणसा कुठे फेडशील ही पापं??

>>मग तो भात खाता खाता भले मेलो तरी बेहत्तर

+१

मेघवेडा's picture

12 Oct 2010 - 5:53 pm | मेघवेडा

एकदम सहमत.

मस्त लेख!

नंदन's picture

13 Oct 2010 - 1:22 pm | नंदन

वरणाच्या निम्म्याने तूप, एक लिंबाची फोड. वरण जरा घट्टंसं पाहीजे.

सहमत! सोबत पोह्याचा पापड आणि न मुरलेलं कैरीचं लोणचं, नाहीतर कारळ्याची चटणी.

विसोबा खेचर's picture

12 Oct 2010 - 12:51 pm | विसोबा खेचर

चवदार लेख..

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Oct 2010 - 12:58 pm | बिपिन कार्यकर्ते

.

(ही प्रतिक्रिया त्या इतक्या सगळ्या टिंबांना नसून, लेख वाचून शब्दातीत अवस्थेत गेल्याने आहे. :) )

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

12 Oct 2010 - 1:16 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

हिहहाह्...आणि लेखातले ...... आम्ही स्वतः शब्दातीत अवस्थेत गेल्यामुळे आले आहेत...
मी लिहिते ते तसंच लिहिते सगळं.....शब्दातीत अवस्थेत...! :)
....... (आजकाल कळफलका वरील ... बटन मी मिपा lon in केल्या केल्या आपोआप हलायला लागते ;) )

मस्त लेख !
सगळ्या चवी अजून रेंगाळतातः)

श्रावण मोडक's picture

12 Oct 2010 - 1:29 pm | श्रावण मोडक

हिच्या पाठीत धपाटे घाला रे कोणी तरी.
एकदा पकडून ठेवा हिला, दहा-पंधरा मिपाकर जमवून सगळ्यांची 'जिव्हा'ळ्यानं सरबराई करण्याची शिक्षा द्या हिला.
नाही तर, हिंमत असेल तर संपादकांनी हा धागा उडवून लावावा.
च्यायला पाच मिनिटांसाठी यावं तर हा छळ! :)
*&^%$#@!!@#$%^&*(
पुढं काही बोलता येत नाहीये.

लिखाण आवडल आणि तुमच्या आईचे शब्दही.

मला आवडणार म्हणजे
आईच्या हातचे कांदेपोहे,
आईच्या हातचा कालवणाचा रस्सा.
साखर साय मी पण खायचे लहानपणी
वडीलांनी तव्यावर तळतातळता बशीत आणून दिलेले बोंबिल
फोडणीचा भात अजुनही आवडतो. वेळ मिळाल्यावर करतेच. पण आजीच्या हातचा फोडणीचा भात आणि तिच्या हातची ताकाची कढी आणि तिनेच बनवलेले लोणचे एकदम जबराट. ती लोणच बनवायची त्यात मिठाचे छोटे छोटे खडे लागायचे. ते लोणच खुपच चविष्ट लागायच.
कांदाभजी

अवलिया's picture

12 Oct 2010 - 2:54 pm | अवलिया

!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&*%^#!&%#&*%^#!*^(


ही हिब्रू तली अस्खलित शिविगाळ translate करा रे कोणीतरी....!
:)
कोणी तरी अवलियांची हिब्रू शिविगाळ translate करा रे!
( << इथे नाव टाका >> ने स्किम मध्ये शिविगाळ editing किंवा translation चं "प्या केज" नाही टाकलं का?)

इंटरनेटस्नेही's picture

12 Oct 2010 - 3:24 pm | इंटरनेटस्नेही

मस्तच लेख आहे.. अगदी चित्रदर्शी वर्णन. :)

अवलिया मला सगळी @ घालुन रांगोळी दिसत आहे.

नगरीनिरंजन's picture

12 Oct 2010 - 6:52 pm | नगरीनिरंजन

छ्या, हे काही खरं नाही. भात करावा लागला शेवटी. हे असलं लिहून दुसर्‍यांच्या घरचा मेन्यू परस्पर ठरवणं चांगलंय का?

प्राजु's picture

12 Oct 2010 - 7:34 pm | प्राजु

लेख अतिशय चविष्ट आणि जिव्हा'ळ्याचा झालेला आहे.
आवडला.

स्वाती२'s picture

12 Oct 2010 - 7:43 pm | स्वाती२

त्रास होईल लेख वाचून हे माहित होते पण शेवटी राहवले नाहीच.

मला भात जास्त आवडत नाही पण मेतकुट भात आणी गरम गरम 'वरण भात तुप लिंबु' आवडते....

मस्त लेख.... :)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

12 Oct 2010 - 8:23 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

मग!... मस्त खा तुप मेतकूट भात. असं पोटात राम कृष्ण हरी झालं की माझी आठवण काढा म्हणजे झालं.
जुन्या काही अगदी सात्विक आणि विसरलेल्या चवींना उजाळा द्यायचा प्रयत्न होता....
enjoy ...!
:)

धमाल मुलगा's picture

12 Oct 2010 - 8:25 pm | धमाल मुलगा

मी हा धागा उघडलाच नव्हता.

मी ह्यातलं वर्णन वाचलंच नाही...

मला भूक लागल्यासारखं झालंच नाही.......

मला कोणत्याच आठवणी आल्याच नाहीत.........

जाईडे.....गप की! का असलं काहीतरी लिहून जळवतेस. एक तर इथं किती महिने झाले नुसत्या खिचडीवर आयुष्य काढतोय आणि हिची आपली वेगळीच घाई...

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

12 Oct 2010 - 8:48 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

हिहहहहहाआ (हे सौथ इण्डीयण स्ठैल राक्षसी हास्य होते...एन्ना र्रास्कला types)
माईण्डीट्ट आय से!

.....धम्या...याला म्हणतात शब्दांनी कोथळा काढणे!
.. जाशील ?...जाशील पुन्हा गरिबाच्या ( ;) ) वाटेला?... करशील अर्थाचा अनर्थ???

धमाल मुलगा's picture

12 Oct 2010 - 9:07 pm | धमाल मुलगा

आय माय स्वारी.

नाय! स्वारी नाय आज!
मी तर "यापुढे आपन जाई अस्सल कोल्हापुरी यांचे धागे वाचनार नाय" अशी शपथ घेन्यापर्यंत आलो होतो.

एक तर माझ्याकडे मेतकुट नाहीये. आईने पॅक करुन ठेवलं होतं, नि मी घाईघाईत ते इकडे घेऊन यायचं विसरलोय. त्यामुळे एकतर घरुन खुप शिव्या खाल्ल्या होत्या, प्लस माझी विशेष चिडचिड झाली होती, आणि आज हा लेख!
जाईतै, अहो कुठे फेडाल हे पाप? तरी बरं फटू नाय टाकला, मी तर फटूची प्रिंटऔट खिशात ठेवून आत्महत्या केली असती!

माला मेतकुट पायजे. भ्याआआआआ!!!

--असुर

पैसा's picture

12 Oct 2010 - 8:54 pm | पैसा

rice

जाई आणखी कोणाला जळवायचय?

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

12 Oct 2010 - 9:20 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

....मस्त मस्त!
.... अगं जळवायचं वगैरे मज्जा part तर आहेच....
थोड्या आठ्वणी ना उजाळा द्यायचा प्रयत्न होता गं...
आणि खरच पोट्ट्यांना सात्विक खाण्याचा विसर पडलेला आहे ....त्याचीही आठ्वण होईल...!

चतुरंग's picture

12 Oct 2010 - 10:33 pm | चतुरंग

मस्त चवींनी आठवणींचा फेर धरला मनात आणि जिभेवर!
चांगली हिरव्या मिरच्या आणि भरपूर दाणे घालून केलेली खमंग फोपो (फोडणीची पोळी) हा माझा वीकप्वाईंट! त्याकरता मी आईला पोळ्या उरवायला सांगायचा. त्यात सुद्धा खाताना दोन हप्ते, पहिला गरमागरम पोळीचा लिंबू पिळून आणि दुसरा घट्ट कवडीदार दह्याबरोबर! आहाहा! स्वर्गसुख.
थंडगार दहीभात सोबत लिंबाचे लोणचे ही तर ओळख झाली पण त्याची पुढची आवृत्ती म्हणजे घोंगुरा पिक्कल (अंबाडीचे लोणचे)! हे त्रिकूट पोटात लिंपून न झोपणे हा त्या पदार्थांचा अपमान आहे! :)
माझी मावशी खमंग खायला घालण्यात तरबेज! एकतर ती सगळेच्या सगळे मसाले म्हणजे अगदी काळ्या मसाल्यापासून ते कांद्याच्या पेश्शल मसाल्यापर्यंत सगळे घरी बनवणार त्यामुळे त्याची लज्जत काही औरच. शिवाय आम्ही सगळी आत्ते, मामे, मावस भावंड तिच्याकडे जमलो की जेवायला घालायची तिची पद्धत अशी; कृष्णाकाठच्या हिरव्या वांग्यांची चमचमीत भरली वांगी केलेली, सोबत गरमागरम पोळीचा चतकोर चतकोर प्रत्येकाला वाढत राहायची. एक संपेतो पुढचा आलेला असायचा. बरं तिची पोळीही भक्कम असायची त्यामुळे तो चतकोर भरपूर असायचा. "अरे घे रे अजून एक चतकोर, एवढा काही जास्त नाही!" असं म्हणत ती वाढत जायची आणि आम्ही हादडत रहायचो. एकदा तर माझ्या एका मावसभावाने एवढा आडवा हात मारला की पाटावरुन उठताना त्याच्या पायजम्याची नाडी चक्क तुटली! ;)
मुगाची खमंग खिचडी त्यावर लोणकढे तूप, सोबत पोह्याचा पापड आणि वाटी तोंडाला लावूनच प्यायची अशी लाल मिरची आणि आलं लावलेली गरमागरम कढी हा पावसाळ्यातला बेत ठरलेला.
गरमागरम पोळी आणि केळ्याचे काप घातलेला तितकाच उनून सुधारस हा सुद्धा माझा अतीव आवडता मेन्यू आहे.
गरमगरम तूपभात आणि कैरीच्या लोणच्याचा तिखटजाळ खार हासुद्धा मला भावणारा प्रकार पण हल्ली तिखट सोसणे कमी झाले आहे! :(
गरमगरम बाजरीची भाकरी, ताजे लोणी आणि लसणाची खमंग चटणी हा आदल्या दिवशीचा मेन्यू दुसर्‍या दिवशी बाजरीच्या शिळ्या भाकरीचा कुस्करा आणि दूध अशा अफलातून भैरवीनेच संपवयचा असतो!
असो. आठवणींच्या लडींना उलगडायला वेळ तो कितीसा!

(हरवलेला)रंगा

स्वप्निल..'s picture

13 Oct 2010 - 2:15 am | स्वप्निल..

>>चांगली हिरव्या मिरच्या आणि भरपूर दाणे घालून केलेली खमंग फोपो (फोडणीची पोळी) हा माझा वीकप्वाईंट! त्याकरता मी आईला पोळ्या उरवायला सांगायचा. त्यात सुद्धा खाताना दोन हप्ते, पहिला गरमागरम पोळीचा लिंबू पिळून आणि दुसरा घट्ट कवडीदार दह्याबरोबर! आहाहा! स्वर्गसुख.

खपलो :) माझापण वीकप्वाईंट!

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

13 Oct 2010 - 11:52 am | जाई अस्सल कोल्हापुरी

>>>कृष्णाकाठच्या हिरव्या वांग्यांची चमचमीत भरली वांगी केलेली, सोबत गरमागरम पोळीचा चतकोर चतकोर प्रत्येकाला वाढत राहायची. एक संपेतो पुढचा आलेला असायचा. बरं तिची पोळीही भक्कम असायची त्यामुळे तो चतकोर भरपूर असायचा. "अरे घे रे अजून एक चतकोर, एवढा काही जास्त नाही!"<<<

म्हणुनच म्हण आहे....माय मरो मावशी जगो! :)
मस्त निखार्‍यावर भाजलीली वांगी आणि शेतातच केलेलं भरीत आणि टम्म भाकरीताई........ मेले तरी बेहत्तर!....!

कृष्णाकाठच्या हिरव्या वांग्यांची चमचमीत भरली वांगी रात्री मुद्दाम उरवायची आणि दुसर्‍या दिवशी साय भात + मसाला वांगं..... जीव काढतीये आठ्वण !

धमाल मुलगा's picture

14 Oct 2010 - 6:10 pm | धमाल मुलगा

>>वांग्यांची चमचमीत भरली वांगी रात्री मुद्दाम उरवायची आणि दुसर्‍या दिवशी साय भात + मसाला वांगं.....


जाई, आता मी तुझा खून करेन हां! गप्प बस...एकदम गप्प!

श्रावण मोडक's picture

14 Oct 2010 - 6:27 pm | श्रावण मोडक

ही अशी गप्प बसणार नाही धम्या, तू लाडावून ठेवली आहेस तिला!

धमाल मुलगा's picture

14 Oct 2010 - 6:34 pm | धमाल मुलगा

समस्त मिपाकर बंधु आणि भगिनीहों,
जाई अस्सल कोल्हापुरी ह्यांनी मांडलेल्या ह्या छळाबद्दल त्यांना शिक्षा म्हणुन आपण सगळे (ज्यांना ज्यांना येणं शक्य आहे ते सगळे....उगाच माझ्याकडं तिकीटाचे पैशे मागू नका.) जाईकडे जेवायला जाऊया आणि तीनं हा असा व्हर्चुअल बेत तिला खरोखरीचा करायला लाऊन पोटभर हादडूया. :)

जाई, कधी येऊ ते सांग.

श्रावण मोडक's picture

14 Oct 2010 - 9:37 pm | श्रावण मोडक

हित्नं दुबै की खुटं ती अस्तीया थितं जायाचं आनी ते बी तिला शिक्षा कराया? येडा हायस का तू? म्हायेरची लोकं आली म्हून खूस व्हईल की ती. त्यापेष्का, ती हितं येतीया तवा गाठू. कोल्लापूरला जाऊ वाटल्यास. पैलं हिच्या हातचं हादडू, मागनं हैतच की आपल्याला लक्षीमपुरीतल्या खाणावळी...

धमाल मुलगा's picture

14 Oct 2010 - 10:12 pm | धमाल मुलगा

जाई सध्या पुण्यात आलीये. :D आता बोला.

श्रावण मोडक's picture

14 Oct 2010 - 10:26 pm | श्रावण मोडक

आता काय बोलायचं? मुहूर्त वगैरे काढत बसू नका. ठरवा आणि सांगा. :)
तुझा जाय-यायचा खर्च माझ्याकडे लागला. ;)

विजुभाऊ's picture

13 Oct 2010 - 11:29 am | विजुभाऊ

आहाहाहाहा.........
बै का छळ लावलाहेस?
हम्म........ गेला तासभर मी नुस्ता भाताचे वेगवेगळे प्रकार आठवत बस्लोय. काम ठप्प....

sneharani's picture

13 Oct 2010 - 11:53 am | sneharani

मस्त लेख!!
मेतकुट ...मस्तच!

स्वाती दिनेश's picture

13 Oct 2010 - 1:00 pm | स्वाती दिनेश

जिभेवर आणि पोटावर प्रेम करणार्‍या साध्या साध्या पण मनात कायम रेंगाळणार्‍या जिव्हा स्मृती...तुमच्याशी share कराव्या वाटल्या....
जिव्हाळ्याचा लेख ग जाई, खूप आवडला.
स्वाती

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Oct 2010 - 1:06 pm | llपुण्याचे पेशवेll

आयला या धाग्यावर वरणफळं(चाकोल्यांची) आठवण नाही झाली का कोणाला? भरपूर तूप घालून खाल्लेल्या चाकोल्या अशाच दीर्घकाळ स्मरणात राहतात.
तसेच कच्चे ते व गोडा मसाला एकत्र करून त्यात थोडंसं मीठ घालून सदर मिश्रण शिळ्या भाकरीबरोबर खायचे. केवळ अप्रतिम.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

13 Oct 2010 - 1:36 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

...वरण फळं कशी बर बाजुला राहिली!
देशी version ओफ फ्रेश पास्ता! :)

...लुस्लूशीत वरणफळं....आंबटगोड्..भरपूय कोथिंबीर पेरलेली आणि ...आणि लोणंकढं तूप!
...जगी सर्व सूखी असा कोण आहे हे मला कोणीतरी विचरावं त्या दिवशी!
..........मी ....मी ....,मी!

समीरसूर's picture

14 Oct 2010 - 3:14 pm | समीरसूर

सुंदर लेख जाई!!!

आणि तितकेच सुंदर प्रतिसाद.

जळगावची तापीच्या काठावरची मोठी हिरवी वांगी शेतात भाजली जातायत, एक-एक वांगं अर्धा-एक किलो वजनाचं! वांग्यांच्या भाजण्याचा दरवळ पसरलायं, शेजारी कुणीतरी गरम-गरम पुर्‍या तळतयं, एक जण ताजे, रसरशीत टोमॅटो, हिरव्या (आणि तिखट) मिरच्या चिरून कोशिंबीरीची तयारी करतोय, कुणीतरी कांदे, मुळा चिरून ठेवतयं....दिवाळीच्या आगे-मागे असलेले थंड दिवस....शेतावर विहीरीशेजारी चाललेला जिभेचे चोचले पुरवण्याचा थाट....मग कुणीतरी हाळी देतं.

"चला, जेवण तयार आहे"

नंतर समोर ठेवलेले केळीचे पान अस्सल खान्देशी वांग्यांचे, मिरच्यांच्या आणि कोथिंबिरीच्या हिरव्या रंगाची आणि सुटलेल्या तेलाची ऐट मिरवत चकाकणारे खान्देशी भरीत, गरम पुर्‍या, कोशिंबिर आणि कापलेले कांदे-मुळे या जीभेचा ताबा घेणार्‍या पदार्थांनी सजते. भरताचा पहिला घास चित्त प्रफुल्लित आणि वृत्ती राक्षसी करून जातो. अर्ध्या-पाऊण तासाने पोट धीर सोडू लागते पण मन अजूनही धाडस करण्यास उद्युक्त करते. या तुंबळ युद्धात ५-७ पुर्‍यांचा आणि दोन डाव भरताचा अजून फडशा पडतो. मग हळू-हळू डोळे जड होतात; शरीर सैलावते; डेरेदार झाडाखालची सावली खुणावते; पान-सुपारी चघळत डुलत-डुलत चालतांना दिवस सत्कारणी लागल्याचे समाधान मिळते. ....

अशीच मजा लालभडक शेवेच्या भाजीची आणि गरम भाकरीची. कपाळावर (आता टकलावर म्हणायला पाहिजे) घर्मबिंदू ठिबकसिंचन करत असतात पण जबराट तिखट खान्देशी शेवेची भाजी जिभेचा ताबा सोडत नाही.

कळण्याची भाकरी आणि तिखट झणझणीत हिरव्या मिरच्यांचा ठेचा असो की तापीच्या खोर्‍यातली फौजदारी डाळ असो...आडदांड खाणे आणि पचवणे हीच या पदार्थांच्या चवीची पावती.

विठठलाच्या मंदीरातला भंडारा असो की कुणाच्या घरी पोरं जन्मल्याचे जेवण, गंगाफळाची भाजी, बट्ट्या आणि साधे वरण हा बेत जे. डब्ल्यू. मॅरियटच्या तमाम मेन्युंच्या कानफटात सणसणीत चमाट हाणतो. गंगाफळ म्हणजे लाल भोपळा. आणि ही भाजी खावी तर खान्देशातल्या शेतकर्‍याच्या घरात नाही तर कधी खाऊच नये.

अशीच मजा बिबडी, खिशीच्या पापडांची, डाळगंडोरीची आणि मसाला वांग्यांची. डाळगंडोरी म्हणजे खर्‍याखुर्‍या तिखट हिरव्या मिरच्यांचे वरण. यालाच मिरच्यांची भाजी देखील म्हणतात. शेतात पार्ट्या करतांना हे पदार्थ हमखास असतात. पुण्याकडच्या हिरव्या मिरच्यांपेक्षा गाजरे बरी असे म्हणावेसे वाटते. नुसत्या कचाकचा खाल्ल्या तरी तिखटपणा जाणवत नाही तोंडात. मी जेवतांना ८-१० खाऊन जातो पण मेंदू उघडत नाही.

--समीर

तुमच्या प्रतिसादाला अत्युच्च म्हणणार तेवढ्यात शेवटी पुण्याला नावं ठेवलीत म्हणून नापास!
अमेरिकेतल्या मिरच्यांना काय म्हणाल मग?
कांदेपोह्यात पोह्यांपेक्षा मिरच्याच जास्त दिसतात आणि तिखटपणाचे नाव नाही.

समीरसूर's picture

14 Oct 2010 - 4:23 pm | समीरसूर

रेवतीजी,

मी पुण्याला नावे नाही ठेवली; फक्त इथल्या मिरच्यांच्या ठसक्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

आणि पुण्यात नावाजण्यासारखे बरेच काही आहेच की. चितळेंची आंबा बर्फी आणि बाकरवडी खान्देशात कुठे मिळणार?

पुण्यातला वडा-पाव आणि मिसळ, वडा सँपल यांची ही लज्जत न्यारीच.

आता पास करा ना, प्लीज! :-)

शेवटी आम्ही पण तसे पुणेकरच. आमचं माहेर खान्देशचं....

बाकी समोसा हा एक फार पापी पदार्थ आहे. खूप आवडतो पण मोह टाळावा लागतो. काय म्हणता?

वोक्के! वोक्के!
आता तुमी फास!;)

वादच नाही खांदेशातील भरीत पार्टी म्हणजे एक नंबर.......
फुलटू झंझणीत..........

अजुन एक पदार्थ आठवला तो म्हणजे शेव भाजी...............
मस्त वर तेलाचा थर आणि ज्वालामुखी सारखी तिखट्ट भाजी ......व्वा.........
ती खाल्ल्या नंतर माझ्या नाका कानातुन अक्षरक्षः धूर निघाला होता.........

मी असाच शिड्ला आहे...

का रे भोssss सम्या... (भोssss ही शीवी नसुन खान्देशात भाऊ म्हणायची पद्ध्त )
तु बी खान्देशी काssss???
तडी गेलता का रे??

स्वछंदी-पाखरु's picture

14 Oct 2010 - 6:19 pm | स्वछंदी-पाखरु

कुठे???? कुठे ????? कुठे फेडशील हे पाप ??????

माझ्या कडक उपवासामधे अशा गोष्टी माझ्या मनात आणल्यास??????

स्व पा
कडक उपवासाने अशक्त झालेला.......

बेसनलाडू's picture

15 Oct 2010 - 5:09 am | बेसनलाडू

लेखातील मेतकूट भातासह १,२,४ हे जीवघेणे पदार्थ माझे सगळ्यात लाडके!
लेख एकदम फर्मास, चवदार!!! केवळ वाचूनच लगेचच भूक चाळवणारा - भूक नसतानाही!
(खवय्या)बेसनलाडू