अंगठा नुसता दाखवू नका , पाहायला पण शिका .(SCIENCE OF THUMB READING) "शिवंजय": डॉक्टर प्रा.संजय होनकलसे, drsanjayhonkalse@gmail .com / http://drsanjayhonkalse.tripod.com

dr sanjay honkalse's picture
dr sanjay honkalse in जनातलं, मनातलं
11 Oct 2010 - 2:08 pm

अंगठा नुसता दाखवू नका , पाहायला पण शिका .(SCIENCE OF THUMB READING)
"शिवंजय": डॉक्टर प्रा.संजय होनकलसे, drsanjayhonkalse@gmail .com / http://drsanjayhonkalse.tripod.com

सामान्यतः अंगठा नुसता दाखवण्यासाठी (thumps up / thumps down ) उपयोगात आणतात असा समज आहे. पण अंगठा विविध दृष्टीने अभ्यासाचं व व्यवहाराचं साधन आहे हे विचारांती लक्षात येते. उदा. हस्ताक्षरशास्त्र, अकयुप्रेषर , धनुर्वेद , ठसे शास्त्रं(Finger Print -Sc .) मानसशास्त्र, ज्योतीर्वेदशास्त्र व अध्यात्मशास्त्र,इ.मध्ये अंगठ्याचा अत्यंत महत्वपूर्ण उपयोग व योगदान असते. अंगठा नुसत्या अपल्या भावविश्वाचाच नाही पण विश्वभावाचा व परमात्य स्वरूपाचा द्योतक आहे. मृत्युशास्त्रानुसार मृत व पूर्वजांच्या सद्गती व मुक्तीसाठी श्राध्द तर्पण करतांना अंगठ्याचाच अविर्भ्याज्य उपयोग करतात. अशा रीतीने अंगठ्याची पोहोच ठेंगा दाखवण्यापासून परब्रम्ह समजावून घेण्यापर्यंत आहे. म्हणून अंगठा नुसता दाखवू नखा , पाहायला शिका नववर्षाच्या संकल्प (RESOLUTION ) म्हणून.

'दुश्मन हैं जमाना ठेन्गेसे" अस म्हणत कुठ्लाश्या सिनेमात महमूद अंगठा दाखवून दुनियेच्या दुश्मनीची फिकीर करत नाही अस धाखावतो. अंगठा म्हंटल तर वाकुल्या दाखवण्यासाठी अथवा बेस्ट लक देण्यासाठीच फक्त उपयोग होतो असा साधारणपणे समज होतो. पण तसा नाहीये. अंगठ्याच अपल्या जीवनात, भावविश्वात व भविष्य विश्वात अनन्यसाधारण महत्व आहे.

मनुष्यमात्राचे चरित्र व मनोवैज्ञान प्रकट करण्यास अंगठ्याचा उपयोग होतो. अंगठा बोटांचा राजा आहे. जस कात्रीची दोन्ही पां ती हल्ल्याशिवाय कापण्याचे कार्य होउ शकत नाही .तस अंगठ्याशिवाय कोणतीही वस्तू पकडणे कठीण आहे, जेवणाचा घास अंगठ्याशिवाय हात येवूच शकत नाही. लिहिण्यासाठी तर्जनी नसेल तर चालेल, पण अंगठ्याशिवाय लिहीन अत्यंत कठीण होवून बसेल.अंगठ्याचा थेट संबंद मेंदूशी येतो हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेले आहे. लिहिताना तर्जनी जी गुरुचे बोट- सरस्वतीचे प्रतिनिधित्व करणारे बोट मानतात व ते विचार प्रवाहाला प्रवाहित करते तर अंगठा दबावाने त्याच्या संचालनाचे कार्य करतो. थोडक्यात आजच्या सुशिक्षित, सामाजिक,शैक्षणिक परिभाषेत अंगठा MANAGER =व्यवस्थापक आहे.लिहिण्याच्या व्व्यवस्थापनाचे कार्य अंगठा दबाव व कम्पानाद्वारे करतो. मेंदूचे सूक्ष्म तरलभाव विचारांचा थेट संबंध अंगठ्याशी आहे व त्यामुळे मेंदूच्या विचारांचे, भावांचे स्पष्ट पडसाद अंगठ्याद्वारेच प्रचलित व प्रसारित होतात. यामुळेच हस्ताक्षर शास्त्रा ज्यास ग्र्याफोलोजी (GRAPHOLOGY ) म्हणतात ते शास्त्र उदयास आले.
अंगठ्याचे व्यवहारातील महत्व लक्षात घेवूनच द्रोणाचार्यांनी एक्लाव्याकडे अंगठ्याची गुरुदक्षिणा मागितली.धनुर्वेदात अंगठ्यला अनन्य साधारण महत्व आहे.

गुन्हा अन्वेषण व गुप्तहेर खात्याच्या दृष्टीने पण अंगठा महावताचा. मी स्वतः एकेकाळी गुन्हा अन्वेषण विभागात (C .I .D .) फिंगर प्रिंट- अन्वेषकाचे काम करीत होतो तेव्हा प्रशिक्षणाच्या (Training Period) काळात आम्हाला सांगण्यात आले कि अंगठ्यावरून गुन्हा शोधण्यासाठी पहिला (F.P.B).फिंगर प्रिंट ब्युरो रिचर्ड हेनरी याने कोलकाता येते १८९७ ला स्थापन केला. या पद्धतीत अंगठ्याचे ठसे घेऊन गुन्हा , गुन्हे गाराचा शोध घेतला जातो. कारण सूक्ष्म निरीक्षण व अभ्यास यातून हे सिद्ध झाले आहे कि, अंगठ्यावरील चीन्ह व रेषा कधीच बदलत नाहीत व त्या दोन माणसांच्या अंगठ्याच्या रेषांमध्ये साम्य नसते.इतकेच काय नर एकाच माणसाच्या दोन्ही अंगठ्यात भेद असतो तर जुळ्यांचे ठसे पण वेगळेच असतात. फिंगर प्रिंट सायन्स /ठसे शास्त्र खरे तरं एक वेगळे व सूक्ष्म शास्त्र आहे. दुर्दैवाने भारतात हे फक्त गुन्हे अन्वेशानासाठी साठीच वापरले जाते.इतरत्र ते व्यापार, वित्त, उद्योग व टुरिझम या व्यवसायात सरास वापरले जाते व त्यासाठी ठसेतज्ञ ( Finger Print Expert) सतर्क असतात.

अंगठा हे प्रकृतीदत्त व नैसर्गिक इच्छाशक्ती प्रकट करणारे महत्वाचे अंग आहे. समस्त व्यापार जीवनाचीच न्हवे तरं जीवन व्यापाराची इच्छाशक्ती हा आधार आहे म्हणून तरं thumps upचा अंगठा यशाची इच्छा तरं thumps down अपयश दर्शक मानले जाते. उभा केला अथवा धरला असता ताठ अंगठा solid determination तरं अंगठ्याची लवचिकता सांभाळून घेण्याची, सावरण्याची, सामंजस्याची परिस्थितीनुरूप बदलण्याची इच्छाशक्ती असलेली व्यक्ती दर्शवते. जर एखादी रोगट वा आजारी व्यक्तीचा अंगठा पहिला तरं तो लेचापेचा दिसेल. अशा व्यक्तीचा अंगठा उभा केल्यास निपचित पडत असेल तरं त्या व्यक्तीचा अन्त्यसमय जवळ आला आहे असे समजावे.छोटा अंगठा अविकसित व्यक्तिमत्व दाखवतो.

नुसते मनोवैज्ञान व चारित्र्यच नाही तरं रोगनिदान रोग उपचारासाठी पण अंगठा उपयुक्त ठरतो. दबाव तंत्रावर आधारित असलेले वैकल्पिक चिकित्सा व उपचार शास्त्र अक्युप्रेषर चीकितसा म्हणूनसुद्धा उपयोगात आहे. त्याची एक पोट शाखा सुजोक (सु-जोक) अकुप्रेषर म्हणून अस्तित्वात आहे. त्या शाखेचा महत्वाचा सिद्धांत ज्यावर चीकिस्त उपचार पद्धती विसंबून आहे तो म्हणजे 'थंब इज हेड '(thumb is head ) या पद्धतीत अंगठा हा डोक्यासामान मानून तळहाताची बाकीच्या शरीरात प्रातिनिधिक विभागणी केली आहे व शरीरातील विशिष्ट व्याधींसाठी अंगठ्यापासून बोटांपर्यंत तळहाताचे संपर्क बिंदू दाबून उपचार केला जातो. उदा. डोकेदुकीसाठी अंगठ्यावरील पेराचे टोक दाबले असता रिलीफ मिळतो. अशा या अंगठ्यास भविष्यशास्त्र (ज्योतीर्वेद) व वेद- उपनिषदात पण महत्व दिले गेले आहे. ज्योतीर्वेद हा उपवेद व कठो उपनिषद व श्वेताश्वर उपनिषद यांमध्ये अंगठ्याचा व त्याच्या महत्वाचा उलेख आढळतो.

सामुद्रिक शास्त्रात अंगठ्याचा भविष्य कथनाच्या दृष्टीने विचार करता अनेकविध बाजूने अंगठ्याचा विचार करणे महत्वाचे आहे. हाताचा आणि पर्यायाने अंगठ्याचा रंग, स्पर्श, उंची, जाडी, पेरे, त्यावरील चीन्हे व रेषा इतद्यादी विविध अंगाने विचार केला जातो. निव्वळ अंगठ्याच्या मुल्यामापानावरून संपूर्ण हाताची व पर्यायाने मनुष्याचा वाक्तीमात्वाची कल्पना येते. म्हणूनच प्राचीन हिंदू, चीन व इजिप्त मध्ये अंगठ्यास हाताचे मूलाधार मानले जाते.

सर्वसाधारणपणे अंगठा हा तीन अस्थी खंड चा मिळून बनलेला असतो. त्याचा आधारखंड अंगठ्याच्या पायथ्याशी हाताच्या आत असतो व त्यास शुक्र उंच वटा असेही म्हणतात. यालाच वासानाखंड म्हणतात. कारण तो व्यक्तीची वासना प्रवृत्ती दर्शवतो. या खंडात एक मोठी मासाची पिशवी असते जी संपूर्ण हाताला रक्तपुरवठा करते व त्याच्या पुष्टते वरून वरून रक्त संस्थानाच्या शक्तीची कल्पना येते. या खांडस तिसरे पेर असेही संबोधतात. पुष्टता, व्यक्तीची रसिकता, सौन्द्र्यवृती, आकर्षकता कलासक्त वृत्ती, स्वभाव माधुर्य व लाघ्विपणा दर्शवत तर शुक्राची अनुपस्थिती सौंदर्य व काम यांपासून मनुष्यास दूर ठेवते. अशी माणसे अंतरंगी, अरसिक व प्रत्येक गोष्टीचा उलटाच अर्थ काढणारे व आपलेच खरे म्हणणारे असतात.

यानंतरचा पहिला खंड त्याला दुसरे परेही म्हणतात. हा हाताच्या बाहेर आलेला खंड असून तो व्यक्तीच्या तर्क शक्तीचा द्योतक असतो. हे पर पहिल्या पेरापेक्षा लहानमोठे असू शकते. त्यावरून तर्क व विचार शक्तीचा समतोल असमतोल कळतो.
हे पेर सुविकसित, मोठे असता व्यक्ती प्रतिभावंत त्याची कल्पनाशक्ती चांगली असून बौधीकता व विश्लेषणात्मक गुण निश्चित असतात, शुक्र उंच वटा चांगला असून हा खंड वा पेर विकसित असता व्यक्ती चांगला लेखक, कवी, कथाकार, कलाकार असू शकतो. त्याहूनही हा भाग डमरू च्या आकारासारखा असेल तर अशा व्यक्तीत तीव्र व निर्णयात्मक विवेक प्रतिभा असते. हे पर अविकसित असता अथवा लहान असता तर्कहिंनता (INCONSISTENCY) व प्रतीभाहीनता असते. असे लोक हलक्या कानाचे अथवा OPINIONATED असतात.

तिसरा खंड म्हणजे अंगठ्याचे नखा आच्छादित पाहिले पेर मानवीय कार्य व्यापाराचा आधार व दिशा ठरवणारे हे पेर.हा भाग आत्मविश्वास, स्वाभिमान, अभिमान दर्शवतो. हा भाग लांब असलेली व्यक्ती येनकेनप्रकारेण मोठेपणा मिळवण्याची व मिरवण्याची धडपड करते.

माझ्या ओळखीचे एक गृहष्ट आपले फोटो मोठ्या व्यक्तींबरोबर काढून घेऊन त्याचा अल्बम करण्यात अथवा ते घरात टांगून ठेवण्यात मोठेपणा मानतात. अंगठ्याचा हा भाग वर्गाकर असता व्यक्ती न्याय प्रिय , न्याय प्रविष्ट असते. अशी व्यक्ती आपला अधिकार व सत्ता याचा उपयोग कोणावर अन्याय होणार नाही यावर खर्च करेल. हा भाग अधिकच अथवा प् प्रमाणा बाहेर लांब असता अशुभ लक्षण समजावे. अशी व्यक्ती उतेजक प्रवूती व प्रकृतीची असून असे अंगठे प्रायः खुनी, दरोडेखोर, लुटारू, निर्दयी मातापिता, पती-पत्नी यांचे आढळून येतात.

या पेरांचा समतोल, असमतोल याचा विचार करून स्वभाव ठरवता येतो. उदा. इच्छा पेर व तर्क पेर प्रमाणबद्ध असता म्हणजे समान असता इच्छा व तर्क यांचा समतोल माणसाच्या वागण्यात दिसून येईल. इच्छा असंबद्ध नसेल.,जे इच्छा पेर तर्क पेरा पेक्षा मोठे असता दिसून येईल .यावोलात तर्क पेर जर जास्त लांब असेल तरं मनुष्य तर्कट ,चीकीत्साप्र्धन असतो, त्याच्या कडे भावनेची कमतरता असते.भावेनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्व देणारी हि व्यक्ती असते . इच्छा पेर मोठे असता विचार शक्ती कमी असते तर्क पेर मोठे असता आकलनशक्ती चांगली असते.
तसेच इच्छा -तर्क पेर समान असून ,शुक्र उंच वटा इच्छा तेरकत गुंफून सत्यात उतरवण्याची क्षमता व कुवत असते व त्याबाबत प्रयत्नशील असतात .अशा व्यक्ती संतुष्ट व समाधानकारक आयुष्य जगतात .
हो पण अंगठ्याच्या पेरा बरोबरच अंगठ्याचा रंग ,स्पर्श लक्षात घेउनच अनुमान काढणे महत्वाचे आहे. गुलाबी रंग व मुलायम स्पर्श त्या त्या गुणांची सौम्यता ,मृदुता दर्शवतो . या व्यक्ती हळुवार असून त्यांच्या व्यक्तिमत्वाला मायेची झालर असते. या उलट राकट व स्पर्श व काळपट रंग असता समजावे.लालसरपणा ताकत,क्वचित कोपिष्ट व्यक्तिमत्व पण सु आरोग्य दर्शवते .अर्थात रंग हा शरीराच्या रंगाच्या तुलनेत ठरवावा ,म्हणजे शरीराच्या त्वचेच्या रंगापेक्षा हाताचा पर्यायाने अंगठ्याचा रंग गुलाबी असू शकतो.
याच बरोबर अंगठ्याची उंची व त्याचा विचार अत्यंत उपयुक्त ठरू शकतो .उंची म्हणजे अंगठ्याची उंची पेरांची नाही. अंगठा अपेक्षेपेक्षा लहान असता व्यक्तीचे मन कामापेक्षा वर एक बाहेर एक असा व्यवहार असतो .निरुत्साही, निराशावादी व्यक्तिमत्व असते. या उलट उंच अंगठा आशावाद , उत्साह,समाधान,व महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व असते.
अंगठ्याचे निरीक्षण व परीक्षण करतांना त्याची ठेवणही महत्वाची. अंगठा हाताच्याकडे वरच्या बाजूला, खालच्या बाजूला अथक मधोमध असतो. तळव्याकडे बसलेला अंगठा समजूतदारपणा, नैतिक सामर्थ्य याची उणीव निर्माण करतो. विवाहाजीवनात अपयश दर्शवतो. याउलट मनगटा कडील बाजूला असलेला अंगठा (तर्जानिपासून दूर) सहानुभूती, औदार्य व प्रेम अशी शुभलक्षण दाखवतो. मनाचा मोठेपणा, विवाहास व विवाह सौख्यास रोषक असतो. मधोमध असलेला अंगठा फार वरच्या अथवा खालच्या बाजूला नसतो. हा समतोल व्यक्तिमत्व दाखवतो. सामान्य बाबतीतही तर्क दर्शवतो व योग्यवेळी भावनेच दर्शन घडवतो. मनाचा समतोल, सामंजस्य व वायाहर दर्शवतो.

आजकालच्या अविश्वास पू र्ण व संशयग्रस्त वातावरणात माणस ओळखणं, त्यांची विश्वसाहार्ता माहित होणे नुसत्या दिसण्या अथवा वागण्यावरून ताडता येत नाही. अशा वेळी फसणे व फसवले जाने शक्य असते. अथवा प्रवासात, नोकरीवर, नोकरीच्या इंटरव्यू वेळी माणूस ओळखणे कठीण होते. अशा वेळी जर अंगठा समुद्रीकाचे जुजबी ज्ञान फारच उपुक्ता ठरू शकते. अंगठ्याचा रंग, रूप, आकार, ठेवण , चिन्ह इ. वरून अनोळख्या व्यक्तीची मानसिकता, विस्वसहार्ता ताडणे अनुभवांती सहज शक्य आहे. हे प्रस्तुत लेखकाचे अनुभवाचे बोल आहेत.

अंगठ्याची जाडी पण विचारात घेणे आवश्यक आहे . उदा. मजबूत उठावदार अंगठा व्यवहार चातुर्य व निश्चयी स्वभाव दाखवतो. असा अंगठा आकर्षक व डौलदार असतो. प्रतिकारशक्ती चांगली असते. आत्मविश्वास दांडगा असतो. याउलट पसरट अंगठा नेहमी कच खाणारा, कमकुवत व्यक्तिमत्व दर्शवतो. प्रमाणबद्ध अंगठा, चौरस अथवा निमुळते टोक असलेला अंगठा व नख मउ व चमकता असता व्यक्ती धूर्त असते व कलासक्त असते. हि माणस दुसऱ्यावर टीका करीत नाहीत व उपद्रव देत नाहीत,पण प्रभाव टाकतात.

गदे च्या आकाराच्या गोलाकार अंगठा पहिले पेर जाड व रुंद असता हट्टीपणा, आखडू पणा, आक्रस्ताळी व्यक्तिमत्व दर्शवतो. इतर लक्षण पण वाईट असता खुनशीपणा दाखवतो. सुपासारखा अंगठा अशक्तपणा पण उदिष्टाने चिवट व्यक्तिमत्व दाखवितो.

अंगठ्यावरील चिन्हे जस यव वर्तुळ, त्रिकोण, जाळी, शंख, चक्र पण स्वभाव दर्शवणारी त्वाची. चक्र महत्त्वाकांक्षा, कुशाग्रतेच प्रतीक आहे. शंख ग्रहाचा प्रभाव (येथे शुक्राचा) कमी करतो. चक्र चिन्ह सौख्यकारक असते. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या मध्यावर यव असता जन्म शुक्ल पक्षात व सहसा दिवसा असतो. तोच डाव्या हाताच्या मध्यावर असता कृष्ण पक्षातील व रात्रीचा जन्म असतो.

त्रिकोण चिन्ह असता शास्त्रीय विषयात गोडी, वर्तुळ असता यश तर जाली अशुभ व अपयश धाखावते. म्हणून ज्यांना आपली जन्मतारीख माहित नाही अश्यांची पत्रिका अंगठा, हात अथवा चेहरा पाहून बनवणारे असतात. अथवा त्याला गहन अभ्यास, अनुभव व गुरुकृपा लागते. अशी फारच थोडी माणस आहेत.

पण आपल्यासारखा सामान्य जणांना नुसती वरील काही तत्व व्यहारात अत्यंत उपुक्त ठरतील. ठाणून अंगठा फक्त दाखवू नका. पाहायला शिका . जीवात्मा जसं सातवा, राज, तम या तीन गुणात विभागला आहे तसेच पाहिले पेर सत्व व त्यानुसार राज व तम गुणांत अंगठ्याची विभागणी आहे. आध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या पाहिले पेर ब्रह्म, दुसरे पेर विष्णू तरं तिसरे महेशाचे द्योतक आहे. अंगठा शिव लिंग sआहे. म्हणून स्वरूप मानला आहे. तरं वेद उपवेद व उपनिषद यात अंगठ्याचे भूखंडात अनेक प्रकारचे जड चेतन उपमान, उपमेय व सपक असूनही उपनिषदांत महापुरुष, परब्रम्ह, परमात्मा याचं स्वरूप अधिक स्पस्त करण्यासाठी केवळ अंगठा याचाच आधार घेतात हे आश्चर्य आहे. म्हणूनच परमात्म्याचे स्वरूप, गुण, विश्लेषणात व अंगठा यामध्ये साध्य सामंजस्य व एकरूपता असायलाच हवी. म्हणूनच जिज्ञासू शिष्याला जीवालाया संबधी उद बोधन करताना आचार्य आत्म्याच्या स्वरूपाच स्पष्टीकरण देताना म्हणतात :

अंगुष्ठ मात्रः पुरुषो मध्य अत्मिती तिष्ठति
ईशानो भूतभव्यस्य न तेता विजुगुप्सते:
कठ उपनिषद :१:२:१३
अंगुष्ठ मात्र रावितुल्य रूप, संकाल्पाहंकर समान्वितो यः
बध्द गुणे नात्म गुणे चैव आराममात्रो हयपरोरापी दृष्ट //
श्वेताश्वेत्रोप्निषद श्वेताश्वारउपनिषद ५:८

--
dr.sanjay honkalse.

सामुद्रिकलेख

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

11 Oct 2010 - 2:17 pm | परिकथेतील राजकुमार

एके काळची पार्ल्याची शान !!!

परिकथेतील राजकुमार's picture

11 Oct 2010 - 2:34 pm | परिकथेतील राजकुमार

अरे गणपा

तुझी प्रतिक्रीया वाचायला धाग उघडला तर आधी तो फोटुच उघडला नाही. 'एके काळची पार्ल्याची शान !!!' आणि खाली एकदम जागा सोडून '-माझी खादाडी.'

अरे ती साईट जिथे तो फटू आहे ती खुप स्लो आहे. धिर धर थोडा.
आता तु पाचर पण मारलीस, नाही तर दुसरा फटु टाकला असता तिथे ;)

असो हे पाहा.

अवलिया's picture

11 Oct 2010 - 2:45 pm | अवलिया

मस्त ! थम्स अप !! जुने दिवस आठवले यार !

कॉलेज कॅण्टिन मधे कमीत कमी वेळात कोण बाटली रिकामी करतो !! साला लै मजा यायची !
गेले ते दिन गेले... थम्सअप चे नंतर पार गुळचट पाणी झाले..

परिकथेतील राजकुमार's picture

11 Oct 2010 - 2:47 pm | परिकथेतील राजकुमार

गेले ते दिन गेले... थम्सअप चे नंतर पार गुळचट पाणी झाले..

सहमत. साला काय झिणझिण्या यायच्या पैल्याच घोटाला. आता त्यात दारु टाकावी तेंव्हा कुठे थोडीफार चव लागते.

कोकमधे दारु टाकुन दारुची चव जाते राव... सोडा बरा नाही तर पाणीच.. (कधीकधी कच्ची बरी वाटते)

गणपा's picture

11 Oct 2010 - 2:56 pm | गणपा

नानाशी सहमत :)

स्पा's picture

11 Oct 2010 - 2:59 pm | स्पा

अरे रे ...............................

लेख कसला ...............

आणि प्रतिक्रिया काय?

काय वाटत असेल लेखकाला .................
:(

रे स्पा कदाचित डॉक नेच पहिली सुपारी दिली असेल पर्‍याला ;)

स्पा's picture

11 Oct 2010 - 2:45 pm | स्पा

मला पण फोटू टाकायचा आहे.......

कसा टाकू?

स्पा's picture

11 Oct 2010 - 3:05 pm | स्पा

सुहास..'s picture

11 Oct 2010 - 3:25 pm | सुहास..

लेख वाचुन एकलव्याल्या भविष्याची चिंता/भय नव्हती असे वाटले.

अकयुप्रेषर ???

हे कुठल नवीन प्रेषर ? काही लोकांना नवाबी शौक असतात कोण जाणे ?

पाषाणभेद's picture

11 Oct 2010 - 7:05 pm | पाषाणभेद

लेखातील काही वैज्ञानीक तत्व असणार्‍या भागाशी सहमत पण काही भाग नाडीग्रंथ, डोक्यातील कोंडा अन राशीनक्षत्र, भविष्यकथन, वास्तूशात्र, फेंगशूयी आदींशी जवळीक साधणारा वाटतो त्यांच्याशी असहमत.

अवांतरः सदस्यत्व: आठ आठवडे
तुम्ही लेखाच्या सुरूवातीला नेहमी तुमचे डीटेल्स देतात. जाहिरात तर नाही ना ही? चांगले वाटत नाही ते.

प्रिय संजय सर,
तुमचे लेख हे खुपच informative असतात .अंगठा या विषयावर इतके लिहू शकतो हे मला प्रथमच समजले. बालपणी friend शी टुकटुक करण्यासाठी वापरत असे . या लेखा ने मला विचार करायाला लावले. श्राद्ध तर्पण करण्यासाठी , medically त्याचा कसा उपयोग आहे , accupressue मध्ये डोकेदुखी बरी व्हावी म्हणून पेराचे टोक दाबले असता relief मिळतो , इतर रोगाचे निदान होते , ज्योतिषशास्त्रच्या दृष्टीकोनातून भरपुर विचार केला आहे. पेराचा समतोल, असमोतल , रंग, स्पर्श याचा अभ्यास केला आहे आम्हाला information , knowledge लाभले.जन्मपत्रिका करता येते ? फारच आश्चर्य वाट्ले. वेद, उपवेद यांचा सुद्धा reference आहे .यावरून सरांचा अध्यात्मावर सुद्धा अभ्यास आहे . विषयाचा गहन विचार केला आहे त्यामुळे इतका उत्कृष्ट लेख वाचायला मिळाला. खूप खूप आवडला. सरांना माझा salute

अंगठा छाप माणसे यांचा पण भाव आता वधारला पाहिजे जर अंगुठा महत्वाचा आहे तर तो अडाणी कसा ? जोकेस apart . त्या माणसाला सही करता येत नाही त्याच्या प्रिंट्स च अभ्यास करता येतो म्हणून इतर बोटा ऐवजी अंगुठा वापरात असावे. छोट्या बाळाच्या मुठी किती गोड दिसतात . अंगठा नसेल तर मुठ पूर्ण होणार नाही. मुठीत त्याचे भविष्य असते असे म्हटले जाते. झाकली मुठ सव्वा लाखाची. तिचा नवरा नुठीत आहे ... हि सुद्धा म्हण आहे. मी आता कोणाला अंगठा दाखवणार नाही , मौल्यवान दागिनाच आहे . ठेंगा दाखवण्यासाठी उपयोग न करता तू successful आहेस या साठी जास्त उपयोग व्हावा असे वाटते.

Poorva Kulkarni

परिकथेतील राजकुमार's picture

13 Oct 2010 - 3:00 pm | परिकथेतील राजकुमार

आवरा !!

हसुन हसुन मेलो च्यायला.

ह्या डॉ. ना बोट दाखवतो... आय मी थंब दाखवतो. __|

हा हा हा...
आजवरचा मिपावरचा बेष्ट प्रतिसाद म्हणुन डॉकना नामांकन देण्यात येत आहे.

श्री श्री "शिवंजय": डॉक्टर प्रा.संजय होनकलसे,

पाश्चात्य संस्कृतीत मधल्या बोटाला असामान्य महत्त्व आहे, मधल्या बोटांनी अनेक व्यवहार होतात असे वाचल्याचे आठवते. तरी मधल्याबोटाच्या असामान्य वापराबद्दल मार्गदर्शन करावे अशी विनंती करतो.