मा़झी Love Story ........

utkarsh shah's picture
utkarsh shah in जनातलं, मनातलं
8 Oct 2010 - 2:43 pm

सुरूवात कुठून करावी आणि कशी करावी हा स्वाभाविक प्रश्न पडलाच आहे, तरीपण नोकरी(की चाकरी जे हवे ते म्हणा!!!)ला लागल्यानंतरपासुन सुरू करतो.
तर मला बर्‍याच कटु प्रयत्नानंतर हवी तशी नोकरी मिळाली.इथे पुण्यात आल्यावर एकच प्रश्न कायम पडायचा की मीच काय पाप केलंय की मला एकही मैत्रिण नसावी. काय उपयोग अश्या आयुष्याचा जिथे एक मैत्रिण नसावी. मग अर्थातच मी आपला चॅटिंग मधे रममाण रहायला लागलो.अशीच २ - ३ मैत्रिणी मिळाल्याही पण अशी एक पण नाही.
अचानक एकदा एक जुना कॉलेजचा मित्र चक्क online दिसला. मग काय दिल्या खंडिभर शिव्या....(प्रेमानेच हं)
आणि एकदम तो म्हणाला तो मी नव्हेच!!!!!!!!
म्हणल गप रे xxx, तुला मी कॉलेजपासुन ओळखतो, मलाच शेंडी लावू नकोस. तर अचानक मेघगर्जनेप्रमाणे chat window मधे अक्षरे उमटली. "मी त्याची मैत्रिण आहे!!!! तो इथे नसतो, त्याच्या mails चेक करतेय."
मी clean bold..... Ice Cold
काय बोलावे ते सुचेना. आता मी काही मुळचा पुणेकर नाही, त्यामुळे माझे घाबरणे स्वाभाविकच होते.
तरीपण उसन्या अवसानाने म्हणले "Sorry ! मला वाटले माझा मित्रच आहे. त्यामुळे आनंदाच्या भरात जरा बेभान होउन उद्धार केला!!" तर पलिकडून उत्तर आले "हरकत नाही. मी पण तेच करते."
तेव्हा मग नंतर माझी चौकशी झाली. मग तिने माझा नंबर मागितला. म्हणाली मी miss call देते. त्या कॉलची मी २ तास वाट पाहिली. पण माझे अधुरे स्वप्न काही पुर्ण होण्याच्या मार्गावर दिसत नव्हते.
आणि अचानक ४ दिवसानी एक कॉल आला. एक मुलगी (होय चक्क एक मुलगी) बोलली, "उत्कर्ष??? "

मी एव्हाना मागचा संदर्भ विसरलोदेखिल होतो. दबकत म्हणालो

"हो ... मीच बोलतोय. आपण कोण?"
"मी xxx , आपण परवा बोललोत ना!!!!"
"अच्छा !!! मला वाटले, तु विसरली पण असशील."
मग इकडच्या ति़कडच्या गप्पा झाल्या.त्यात तिचा एक भाऊ (दुरचा) माझ्याच कंपनीत होता.
मग त्याची ओळख निघाली.मग असच calling जवळ जवळ ३ महिने चालू होते.हळु हळु मला पण एक छानशी मैत्रिण मिळत होती. एकमेकांचे problems ऐकणे , त्यावर सल्ले (फुकट!!) देणे हे चालू होतेच.

मग एक दिवस तिने विचारले,
"तु राहतोस कुठे???"वेळ रात्रीची ८.३०.
"मी कोथरुड ला. सांगितले होते ना तुला. माझ्या मामाचा flat आहे. "
"आता जमेल का भेटायला? मी माझ्या मामाकडे आहे. XYZ Colonyत"
" अग पण मला नाही माहित कुठे आहे. मी नाही अजुन पुण्यात एवढा फिरलेलो!!!"
"अरे कोथरुड मधेच आहे."
"जवळपासची मोठी खूण सांग ना"
"अंअअ इथे ना IDBI ची बँक आहे बघ. आणि हॉटेल पण आहे."
"बास एवढच अग अजुन सांग ना"
"तुला दुर्गा कॅफे माहित आहे?"
"नाहि ग........"
"जाउ दे मग!"

मग मी विचार केला. काढुयात शोधुन्.आणि म्हणले येतो मी. घरी सांगितले आलो मित्राला भेटुन.गावाकडुन आलाय...
मग रिक्षावाल्यांची मदत घेत पोहोचलो एकदचा XYZ Colonyत!!!
.
.
.
.
.
.

तर एकदाचा मी XYZ Colonyt पोहोचलोच.मनात प्रचंड धाकधुक. ती कशी असेल? जेवढी छान बोलते , जितका गोड आवाज , तितकीच गोड असेल का? मला पाहुन काय विचार करेल? नाक मुरडेल की अजुन मैत्री घट्ट होईल!!
तर तिथे पोहोचलो आणि फोन केला तिला.
"कुठे आहेस? मी आलोय इकडे Colonyत."
"एक काम कर, सरळ सरळ ये. एक park आहे, तिथे बाजुला मी येते. पण तुला मी ओळखणार कसं?"
"Cream T-shirt आणि Blue Jeans. मी Bike वर आहे. Red - Black कलरची. आणि तु ?"
"मी violet टॉप घातलाय, blue jeans. आणि Activa वर येतेय."

आणि आमची गाडी हवेतच जणू उडत निघाली.Park पाशी जाऊन थांबलो. तिकडून एक scooty आली (त्या वेळी मला सगळ्या non-gear गाड्या Scooty च वाटायच्या). आली आणि गेली पण. मी त्या Scooty चालकाकडे पाहत होतो.आणि तिने जो मुलींचा Typical Look असतो तो देवुन गेली.

'जणू काय कधी मुलगी पाहिलीच नाही अस बघतोय XXXXX, @#$$, ^&%&$'

बहुतेक तिच्या मनातल्या गोष्टी ऐकू आल्या जणू. मनकवडा झालो असेन कदाचित त्यावेळी.
थोड्या प्रतिक्षेनंतर मी बर्‍याच कुत्सित नजरा झेलुन झाल्यावर आणि माझी भरपुर स्तुती (मनातल्या मनात) झाल्यावर आली ती.
Violet Top, Blue Jeans , नाकावर चष्मा, आणि हातात मोबाईल घेउन थांबली. दोघांनी एकमेकांना पाहिले.खात्री करुन घेतली की तिच ही जिच्यासोबत मी ३ महिने बोलतोय.
"उत्कर्ष???"

त्यावेळी पोटात खड्डे पडलेले. (पुण्यातल्या सगळ्या खड्ड्यांची गोळाबेरीज करून जेवढे खड्डे होतील तेवढे सगळे एकदम)
हात कापत होते. अंगावर शहारे.रात्रीच्या वेळी दरदरून घाम सुटलेला.
मी फक्त मान हलविली.बोलण्यासाठी शब्दांची जुळवा़जूळव करत होतो.
"XXXX"??
"किती वेळ यायला? T-shirt छान आहे!!"
हम्म. याचा अर्थ फक्त T-Shirtच छान आहे वाटतं! नक्की पुणेकरच आहे.
"अग पत्ता शोधायला वेळ लागला.नशिब पुण्यातले रिक्शावाले अजुनही मदत करतात."
मग असच ५-१० मिनटे गेली.आणि मग निरोप घेतला.
मला मनात प्रचंड उकळ्या फ़ुटत होत्या.स्वर्ग दोन बोटे उरला होता.त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या आयुष्यातली पहिली मैत्रिण आणि ती ही इतकी सुंदर , छान. आता बहुतेक जणांना मी ठार वेडा वाटेन.पण एखादा वाळवंटातला प्रवासी अचानक काश्मीर मध्ये आला, तर तो शुभ्र नितळ बर्फ़ बघुन तो जसा वेडा होइल तेच बहुतेक माझ्या बाबतीत होत होते.
मग त्यानंतर आमच्या भेटी होत होत्या. तिथेच एका छानश्या पार्क मध्ये. फ़ार फ़ार तर अर्ध्या तासाची भेट, पण मनाला अतीव समाधान देणारे सोनेरी क्षण. बाकी आमचे फोनवर अवांतर गप्पा चालू असायच्याच.
मग एकदा तिने विचारले पिक्चरला येणार का?
आणि अर्थात नाही म्हणायला मी काही इतकाही वेडा नव्ह्तो पण ती एकटी येईल माझ्यासोबत याची खात्री नव्हती म्हणून विचारले अजुन कोण येणार आहेत का??
हो माझे १-२ मित्र येतील. आपण सगळे मिळून मजा करुयात. मला काही कळेना. मग मी सांगितले की मी नाही येत, मी बोअर होइन.आणि विषय तिथेच संपवला.
मग बुधवारी तिने फोनवर सांगितले की "शुक्रवारी अवतार बघुयात?"
मी जाउन Advance Booking करुन आलो. मग शुक्रवार उजाडेपर्यंत माझ्या जिवात जीव नव्हता.
आणि त्या दिवशी मी आमच्या नेहमीच्या भेटण्याच्या ठिकाणी आलो.
मग तिने एक Suggest केले की आम्ही कोणाच्या तरी एकाच्या गाडीवर जावे.बहुतेक सर्व देवांनी फ़क्त माझ्यावरच त्यांचे संपुर्ण लक्ष केंद्रित केले होते असे वाटले.त्या दिवशी मी दिसणार्‍या प्रत्येक देवाला मनातून साष्टांग नमस्कार घालत होतो.
पिक्चर ज्या Multiplex मध्ये होता तिथे दुसर्‍या मजल्यावर जावे लागणार होते.त्यासाठी तिथे सरकत्या जिन्यांची सोय होती. पण मला प्रचंड भिती वाटत होती. मी तिला सांगितले की मला भिती वाटतेय. मग तिने माझा हात हातात घेतला.

त्या क्षणी हुरळून जाणे म्हणजे काय याची प्रचीती आली. मी डोळे घट्ट मिटून घेतले होते. कदाचित तेव्हा माझ्या मनात तेव्हा नावालाही भिती नव्हती पण तिने हात सोडू नये म्हणून नाईलाजाने का होईना पण मला घाबरण्याचे सोंग करावे लागले. पण खर तर माझ्याकडून ते आपोआप घडले.

चित्रपट पाहताना देखील अधुन मधुन ते विचित्र प्राणी पाहून ती घाबरायची, आणि मला जोरात चिमटे काढायची. तिने ते मुद्दाम केले असे नव्हे पण नकळत का होईना पण मला मात्र मजा येत होती.
मग त्या दिवशी रात्री झोप नाहीच आली. येणार पण कशी ना? मग नेटवर बसलो, तर ती ही online. मग मारल्या भरपुर इकडच्या तिकडच्या गप्पा.
मग त्या नंतर तिचा वाढदिवस येणार होता.तिने विचारले मागच्या वेळी तु treat दिलीस आता यावेळी माझ्याकडुन. 3 Idiots आहे City Prideला. मी करू का मग booking. वेळ असेल ना तुला? मी नाही म्हणायचे एक ही कारण नव्ह्तेच. लगेच होकार दिला. 3 Idiots पाहताना सर्वात मज्जा तेव्हा आली जेव्हा चतुर भाषण करत होता. त्याचे बोलणे ऐकून मी बुचकळ्यात. ती मात्र मजेत हसत होती. मग मी ही निर्लजपणे त्याचा आस्वाद घेतला.त्यादिवशी मला जाणवले की कदाचित मला तिचे हसणे आवडायला लागलेय. ती जरा छानच दिसतेय. तिचा सहवास हवाहवासा वाटू लागलाय.थोडक्यात मला तिच्याविषयी आकर्षण वाटतेय.म्हणजे नक्की प्रेमच हे नाही ठरवू शकलो.
रात्री मी तिला तिच्या मामीकडे सोडले.माझ्या घरी गेलो.मग नेहमीप्रमाणे थोडे chatting. पण त्यावेळी तिने एक गोष्ट सांगितली की तिचा आत्याचा मुलगा आणि ती एकमेकांना पसंत करतात. पण काही अश्या गोष्टी झाल्या की त्याचे आणि तिचे संबंध नुकतेच तुटलेत.आणि त्यातच माझ्यासोबतचा वेळ तिने फ़ार Enjoy केला.
थोडक्यात कदाचित ती ही मला Green सिग्नल देत होती.
आणि असच मग 28 डिसेंबर ला संध्याकाळी मी तिच्यासोबत Chat चालू होते.जवळ जवळ २ ते ३ तास चालू होते. मग मी ठरवले जे मनात आहे ते सांगुन टाकावेच एकदा. कारण मला फ़ारच Guilty फ़ील होत होते. ती बिचारी आधीच दुखी आहे त्यात मी नको ते विचार करत होतो.हे पुढे वाढण्यापेक्षा सांगुन रिकामा होईन.
"ऐक ना. मला एका मुलीवर खरच प्रेम बसलय."
"हो का? खरच? कोण आहे ती सांग. मी लावून देईन Setting तुझी."
"नको, ती चिडली तर मारेल तिच्या Flotter ने"
"नको रे घाबरू.मी आहे ना. समजावेल तिला.जर हो म्हणाली तर तुला सांगेल. मग तर झाले??"

"अग पण ती का हो म्हणेल? तिच्या जागी तु असतीस तर ?"

.
.
थोडा वेळ शांतता..........
"हे बघ मी हो म्हणले असते. कारण तुझ्याकडे job आहे.शिकलेला आहेस. समजुन घेतोस इतरांना.शिवाय तुझा स्वभाव छान आहे."
"अग पण एवढच पुरेस नाहिये ग.
"अरे हो. रंग रुप वगैरे सगळेच बघतात असे काही नसते."
"मग मी करू का तुला Prapose??"

"क्काय़्य!!!???????????"

ती दचकली. मी लगेच विषय बदलला.
"अग म्हणजे तुझ्यासोबत Practice करू का? माझी तिच्यासमोर हिम्मत नाही होणार!"
"थांब आलेच ह मी. आज्जी ला गोळ्या देउन येते."
आणि इकडे मनात वादळे उठली.काही चुक तर नाही ना मी केली. तिला वाईट वाटले असेल तर? राग आला असेल?काय विचार करत असेल माझ्याबद्दल?
शेवटी मी पण तसाच निघालो ना!

"हं बोल काय म्हणत होतास?"
"काही नाही गं. Thanks for treat. मस्त पिक्चर होता."
"बर ठिक आहे. आज झोप येत नाहिये वाटते? तिची आठवण येतेय का?"
"नाही ग. कोणीही नाहिये तस."
"मग Serious होतास का?"
"कशाबद्दल?"
माझी छाती धडधडत होती.
"About propose"
"हो. मला वाटले तसे.Sorry. Please नाही म्हण."
"कशाला नाही?"
"मी Propose करेन त्याला! कारण मला परत आयुष्यभर पश्चाताप नाही करायचा की मी विचारायची हिम्मत नाही करु शकलो..."
"ठीक आहे. कर तर Propose. मग नाही म्हणेन ना"

"XXX, मला तु खुप आवडतेस. माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्यासोबत लग्न करशील?"
"मला पण तु आवडतोस, मग......................??????"

मी तिन ताड उडालो.माझा माझ्या कानांवर विश्वास बसला नाही.
"खरच का? मी Seriously विचारतोय. चेष्टा नाही करत."
"मी पण खरच सांगतेय.... Yes I Like you. And मी तयार आहे लग्नाला."
"माझा विश्वास बसत नाहीये."
"माझापण. आता झोप. खुप उशीर झालाय."
सकाळी झोपेतुन उठलो. कालचे स्वप्न आठवले. पण नक्की स्वप्नच का?
म्हणून तिला फोन केला.
"Hello! अग काल रात्री आपण Chatting केले का? काही झाले का?"\
"पागल!!!! तु मला Propose केलस!! विसरलास पण."
आणि मग माझी खात्री पटली.
त्यानंतर आम्ही दुसर्याच दिवशी रात्री ११.३० वाजता फ़िरुन आलो. कोथरूड पासुन डेक्कन, पाषाण , चांदणी चौक.
मग तिला त्याच पार्क पाशी सोडले. आणि बोलत होतो तेव्ढ्यात पोलिसमामा.
"एवढ्या रात्री काय करताय इथे?"
"काही नाही हिला सोडायला आलोय. तु जा ग घरी."
मग ती Bye करून गेली. पोलिसमामा म्हणाले आता तुम्ही पण निघा.

तर अशी हि माझी Love Story. ही इथेच थांबलेली नाही. पुढे ही बर्याच घडामोडी झाल्यात.
त्याबद्दल नंतर जमले तर नक्की लिहीन. पण तिच्यासोबत लग्न झाले.आणि अजुन एकदा करतोय.
November मध्ये लग्न आहे.दुसर्यांदा.पण तिच्यासोबतच.विधीवत.
पहिले कायदेशीर केले होते.आता पाहतोय वाट लग्नाची. आणि तिची......................................................

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Oct 2010 - 2:55 pm | बिपिन कार्यकर्ते

अनुभव छान. आणि योग्य तिथे थांबलात, सांगताना हो, त्यासाठी धन्यवाद. :)

ऑल द बेस्ट!!!

मनि२७'s picture

8 Oct 2010 - 2:58 pm | मनि२७

हम्म...
मस्त आहे... आवडली तुझी love story !!!!
वाचतांना ओळखीची वाटली..

परिकथेतील राजकुमार's picture

8 Oct 2010 - 3:08 pm | परिकथेतील राजकुमार

ओ साहेब, एकच लेख कितीवेळा आमच्या डोक्यात हाणणार आहात ? ;)

http://www.misalpav.com/node/14621

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Oct 2010 - 3:12 pm | बिपिन कार्यकर्ते

गप रे!!! या वेळी सगळं आटोपून टाकलाय. मागच्या वेळेला क्रमशः होतं.

परिकथेतील राजकुमार's picture

8 Oct 2010 - 3:54 pm | परिकथेतील राजकुमार

अहो अग एकदाच जाळुन मोकळे व्हायचे ना. शिंची लाकडावर लाकडे...लाकडावर लाकडे...

>>>>>अहो अग एकदाच जाळुन मोकळे व्हायचे ना. शिंची लाकडावर लाकडे...लाकडावर लाकडे...>>>>>>>>>>

हे हे हे हे हे

अहो .... वाट लावलीत त्या love storychi ........

पार भुस्काट पाडलात................;)

उत्कर्ष भाई .. छान आहे तुमची कहानी ..

लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा !

जमले तर बोलवा लग्नाला

धन्यवाद बिपिन आणि मनि, गणेशा.

अहो अग एकदाच जाळुन मोकळे व्हायचे ना. शिंची लाकडावर लाकडे...लाकडावर लाकडे...

प.रां.चे तर यासाठी कोटी कोटी धन्यवाद. किती प्रेमाने माझ्या प्रेम कथेबद्दल अभिप्राय लिहिला आहे.
मंडळ आपले आभारी आहे.....

मोगली's picture

9 Oct 2010 - 5:23 pm | मोगली

खुप छान आहे...प्रेम कथा :)