सिमेपलीकडची हाक

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
18 Sep 2010 - 8:10 am

बाल्टीमोरला नवीन घरात शिफ़्ट केले, तेव्हा मी जरा नाराजच होते. तिथे ह्युस्टन मधे चारी बाजुंनी ऐसपैस आवार, बगीचा, स्वत:चा स्मिमींग पूल ही ऐश. इथे अपार्टमेन्ट कॉप्लेक्स मधल्या एकावर एक रचलेल्या डब्ब्यांमधला एक डब्बा आपल्या वाट्याला आलेला. पण काय करणार! संकेतची नोकरी जिथे घेऊन जाईल, तिथे जाणे भागच होते. तरी दोन गोष्टी मनासारख्या होत्या. ह्युस्टनपेक्षा इथे जवळपासच्या भागात ओळखीपाळखी करून घेणे सोपे झाले. कारण आमच्या अपार्टमेन्ट कॉम्ल्पेक्समधेच बरेच इंडीयन होते. तिकडे होतो तेव्हा मला माझ्या अनुभवाला साजेसा जॉब काही मिळाला नाही. संकेत ऑफ़ीसमधे गेल्यावर येवढे मोठे घर जणू खायला उठायचे. पण इथे मात्र माझ्या आवडीचा जॉब मिळण्याचे बरेच चान्सेस आहे अस वाटत होतं.

एकदा आवारात फ़िरत असतांना सलवार कमीज घातलेली, जवळपास माझ्याच वयाची एक बाई दिसली. तिचा नवरा देखील तिच्याबरोबर होता. मला ओळखी वाढवायच्या असल्याने मी तिच्याकडे पाहून स्मित केले. पण तिच्याशी काही बोलणे काढण्या आधीच ती घाईघाईने निघून गेली. त्यानंतर कधी कुठे दिसली नाही. पण मनात एक प्रश्नचिन्ह कायम राहिले. रविवारी संकेत कॉम्प्लेक्स मधल्या स्विमींग पूलवर जायचा. मला पोहण्याचा येवढा उत्साह नव्हता. मी त्याच्या बरोबर जाऊन आरामखुर्चीत बसून एखादे मॅगेझीन चाळत बसायची. एकदा तिथे तो एका नविनच माणसाशी गप्पा मारतांना दिसला. दोघे बराच वेळ बोलत उभे होते. साधारण संकेतच्याच वयाचा तरुण होता. व्यवस्थित दाढी राखलेली होती. एकूणच अदावरून मुस्लीम वाटत होता. संकेतने माझ्याजवळ येऊन त्याची ओळख देखील करून दिली. कोणी शबीर अहम्मद म्हणून होता. आधी दुबाईला होते म्हणे. आमच्या समोरच्याच ब्लॉक मधे रहायला आले होते. ती परवा दिसलेली बाई बहुदा ह्याचीच बायको असावी. माझा स्वभावच आपण होऊन ओळखी करून घ्यायचा. एकदा मी तिच्याशी ओळख करून घेतलीच. शमा नाव होते तिचे. कॉम्प्लेक्स मधल्या स्टोअरमधे काहीतरी घेत होती. जरा अबोल आणि अंतर्मुख वाटली. मीच उत्साहाने तिला माझ्याविषयी सांगत राहिले. तिने फ़क्त दुबईहून ते लोक ईथे नुकतेच आले असे सांगितले. त्याआधी कुठे होता विचारले, तर म्हणे बरीच वर्षे दुबाईलाच होतो. “अभि चलना चाहिये. साब घर में है, देरी हो रही है” “आज शुट्टी कैसे” मी अडवलेच. “अजी वो घर सें ही काम करते है.” “अच्छाजी, फ़ुरसत से आइएगां हमारे घर कभी.” हम आपके सामने वाली बिल्डींग में ही रहते है” मी आमचा अपार्टमेंट नंबर दिला. ती मात्र तुम्ही पण या वगैरे फ़ॉर्मॅलिटी न करताच घाईघाईने गेलीही.

नंतर मी माझ्या नेहमीच्या रूटीनमधे बीझी झाले. नोकरीसाठी अर्ज करणेही सुरू होते. काही ओळखी झाल्या होत्या. एक दिवस संकेतने सांगितले, अग त्या समोरच्या बिल्डींगमधल्या शबीरने आज रात्री डीनर साठी बोलावले आहे. अजून विशेष ओळख देखील झाली नाही, एकदम डीनरचे आमंत्रण? मला आश्चर्यच वाटले. “पुर्वा, अग हे पाकिस्थानी लोक तसे फ़ार अगत्यशील असतात. त्यांच्यासाठी राजकारण वेगळी गोष्ट आहे आणि मेहमान नवाजी वेगळी. स्विमींग पूल वर आमच्या बरेचदा गप्पा होतात. खुप आग्रहाने बोलावले, म्हणून मी होकार दिला. मलाही उत्सुकता आहेच ह्या लोकांविषयी.”

संध्याकाळी त्यांच्या घरी गेलो. शबीरनेच दार उघडले. बहुदा माझा कुडता आणि पॅंट हा पेहराव पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक सुक्ष्म अठी उमटून गेली. पण लगेच अगदी दिलखुलासपणे स्वागत केले. घर निटनेटके वाटत होते. टिपीकल मुस्लीम ठसा उमटलेला होता. भिंतीवरच्या चित्रात हिरव्या गडद रंगाच्या पार्श्वभुमीवर कुठलीशी मशीद होती. कुराणशरीफ़चा स्टॅंड कोपऱ्यात गालीच्यावर मांडून ठेवला होता. शमा कुठे दिसली नाही, म्हणून विचारणा केली, तर “भाभिजी, आप अंदरही जाके मिलीयें ना उसे” म्हणून आत पाठवले. स्वयंपाक घर साफ़सुतरे. तिचे कुकींग जवळजवळ झालेच होते. तेवढ्यात तिच्याशी गप्पा मारता आल्या. तिच्या स्वत:च्या घरात तिच्या अबोलपणाला कंठ फ़ुटला. हे लोक मुळचे पाकिस्थानतल्या हैद्राबादचे. दुबाईला संधी मिळाली, पाच वर्षे तिथे राहिले. मुलबाळ अजूनही नव्हते. दुबाईतून असेच कोणाच्या ओळखीने अमेरिकेत आले. शबीर सध्या घरातूनच काम करतो आहे म्हणाली. व्हिसा बिसा कसा काय मिळवला कोण जाणे. त्या विषयी तिला काही माहीत नव्हते. तिला म्हटले, चल बाहेर बसून सगळ्यांमधे गप्पा मारू. तर एक विषादाची छटा तिच्या डोळ्यांत तरंगून गेली. “नही भाभिजी. हम यही मेरे कमरे में बातचित करेंगे. जनानों का मर्दों के साथ बैठना इन्हे पसंत नही आएगा. चलो आपको मेरा कशिदा काम दिखाती हूं” ती मला ओढतच तिच्या खोलीत घेऊन गेली. ह्या काळात, अमेरिकेत राहून देखील बायकांनी बाहेरच्या खोलीत यायचे नाही! केव्हा हे लोक सुधारणार आहेत कोण जाणे! जेवणाच्या वेळीस देखील, आग्रह करून शमा आमच्या बरोबर जेवायला बसली नाही. “भाभिजी, छोडीयें. वह नही माननेवाली. मेहमानों के पहले कभी खाती ही नही.” शबीरनेच तिच्या तर्फ़े सांगून टाकले. “तो फ़िर मैं रुक जाती हुं उसके साथ.” मी उठायला लागले, तर शबीर म्हणतो- “भाभिजी हमसे ऐसी गुस्तांखी न करवाईयें. वैसे भी उसे आपको खिलाने में बडी खुशी होंगी.” संकेतने मला डोळ्याने इशारा करून खाली बसवले. ह्यांच्या परंपरेनुसार होऊ दे असे तो म्हणत असावा. शमा आम्हाला पाहिजे ते वाढत, जुन्या जमान्यातल्या बायकांसारखी स्वयंपाक घराच्या दारात डोक्यावरून ओढणी घेऊन खालच्या मानेने उभी होती. जेवणानंतर ती टेबल आवरत असतांना मी तिला मदत केली. आतमधे आवराआवर करतांना आम्ही थोडा वेळ बोलत होतो. शबीरने करड्या आवाजात फ़टकारले- “शमा कबतक बातें करती रहेंगी? जल्दी से आईसक्रीम ले आंओ.”

असल्या मेल शौहानिस्ट पीग समवेत आणखी वेळ घालवण्याची माझी मुळीच ईच्छा नव्हती. ह्यांच्या बायका हे कसे काय सहन करतात कोण जाणे. संकेतला चलण्याची घाई करून काढता पाय घेतला. नंतर एकदा शमाला घरी बोलावले. आधी ती यायला तयार नव्हती. शबीरची परवानगी घ्यावी लागेल म्हणाली. म्हटलं, मग घे की. आली. येतांना खीर घेऊन आली. चांगल्या दोन तास गप्पा मारल्या. शबीरचा अन तिचा प्रेमविवाह. तो देखील दोन्ही घरचा विरोध सहन करून. तिच्या घरचे लोक सगळे खूप शिकलेले, आई नोकरी करणारी. अगदी आधुनिक विचारांची फ़ॅमिली. शबीरच्या घरी ह्याच्या उलट. बायकांनी शिकणे, नोकरी करणे म्हणजे महापाप. नखशिखांत बुरख्याशिवाय बाईमाणूस घराबाहेर पडू शकणार नाही. त्याच्या घरून विरोध झाला, पण निकाह नंतर शमा सगळे धर्माप्रमाणे वागेल ह्या कबुलीवर. शमाच्या घरच्यांनी मात्र शेवट पर्यंत संमती दिली नव्हती. शेवटी पळून जाऊन निकाह केला. “मायकेसे सारे रिश्ते तोडने पडे.” शमाच्या डोळ्यात टचकन पाणी आले. “शबीर मियां भी पुराने खयालात के. शुकर है, यहां पर नकाब की सक्ती नही करते. लेकीन औरतों ने मर्दों से बातचित करना वगैराह उन्हे भी गवांरा नही होता. आपने तो देखा ही है घर पर कैसा माहोल है!”
“अमरिका में रहकर इस तरह का सलुख! बडी अचरज की बात है. शमा, आप शबीर के खयालात बदलने की कोशिश क्यों नही करती?”
“उनके खयालात कभी नही बदलने वाले. क्या बताउ आपको! अब तक तो मुझे मेरे अम्मी से भी ताल्लुक रखने की इजाजत नही है.” अशाच दुख:भऱ्या कहाण्या सुनावून ती निघून गेली. हे सगळे ऐकवले तर संकेतला खूप चिड आली. “अजुनही मध्य युगात रहातात हे लोक!”
“संकेत, त्या दिवशी त्यांच्याकडे साधे आपल्या बरोबर जेऊ दिले नाही तिला त्या माणसाने. ते काही नाही. मी त्यांना आपल्याकडे बोलावणार आणि उट्टे काढणार.” मी त्या तावातावात एका संध्याकाळचा बेत केला. मुद्दाम सुंदरसा मॉडर्न ड्रेस घातला. जेवणा आधी वाईन विचारली. संकेतनेच ग्लास भरून मला व शबीरला दिले. त्यानंतर त्याने शमाला सहजपणे म्हटले “आप भी लिजीए ना थोडी, पुर्वा को कंपनी दिजीए.” शबीरच्या डोळ्यातून अंगाराचा जळजळीत लोळ तिच्या दिशेने गेला. तिने नजर झुकवून नाही म्हटले. नंतर मी आणि शमा त्या दोघांबरोबर बाहेरच्या खोलीतच बोलत बसलो. जेवण देखील एकत्रच केले. ते लोक गेल्यावर मी संकेतला म्हटले, “घरी गेल्यावर उगाच बिचारीला छळेल तो.” “हे पहा, त्यांच्या घरी त्यांची पद्धत, आपल्या घरी आपली.” त्याने ताडकन उत्तर दिले.

एकदा स्टोअर मधून मी परत येत होते, तर मागून हाक ऐकू आली. “पुर्वा बहन.... पुर्वा बहन...” मागे वळून पाहिले तर शमा. जवळ आली, अन इकडे तिकडे चोरून बघत बघत मला म्हणते- “बहनजी, एक गुजारिश है आपसे.” “हां, बोलो ना.” “अम्मी मेरे लिये एक तोहफ़ा भेजना चाहती है.” नंतरचे तिचे मौन पाहून मीच म्हटले “फ़ीर?” “जी शबीर साहब ने उनसे किसी भी तरह की ताल्लुकात से मना किया है. अब घर पर कुरीयर आएंगा, उन्हे पता तो चलेंगा? घर सें काम करते है.” मी ऐकते आहे हे पाहून पुढे म्हणाली, “इसलिये मैने सोचा, यदि आप की इजाजत हों तो, आप के पते पर कुरियर मंगवा सकुंगी.” तिचे टपोरे काळे डोळे विनवणी करित होते. “अरे बिलकुल! इस में कौनसी बडी बात पुछी आपने? बेशक मंगवाईये.” मी तिला माझा पत्ता दिला. डझनभर शुक्रियां देऊन ती लगबगीने गेली. हे मी संकेतला सांगितले. त्याने काही लक्ष दिले नाही. पुढे पंधरा दिवसांनी तिचे एक पार्सल आमच्या घरी आले. मीच सही करून घेतले, आणि शमाच्या हवाली केले. मी खूप मोठे काम काम केले असल्यासारखे भारावून जाऊन तिने आभार मानले. “क्या भेजा है अम्मीने?” ह्या प्रश्नावर तिचा चेहरा खुलला. “बहेनजी, मैं मेरी पसंदिदा ड्रेस खरीद तो नही सकती. इसलिये अम्मी ने कुछ भेजा है. आपको दिखाउंगी पहन कर.” मला आश्चर्य वाटले. आणि काळजी देखील. “अरे, लेकीन शबीर भाईसाब ने कभी ये देख लिया तो?” “उन से छिपाने के मेरे भी कुछ तरीके हैं!” ती मिष्कीलपणे म्हणाली. अरे वाह! ही बाई वाटते तेवढी साधी नाही! मला जरा बरे वाटले. एकदा शबीर नसल्याची संधी साधून तिने मला घरी बोलावले. पाहते तर ही बाई चक्क मिनी मधे होती! “कैसे लगती हुं?” तिने एखाद्या अल्लड बालिकेसारखे विचारले. “अरे बहोत खुबसुरत! चलो ना कही बाहर घुमने चलते है.” मी तिला कवचातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. “अजी तोबा तोबा! कही किसीने देख लिया, या, शबीर साहब ही अचानक आ गये तो? मैं तो कही की न रहुंगी”

पुढे आणखीही दोनदा तिची पार्सले मी घेतली. एकदा अशीच काहितरी गीफ़्ट होती. एकदा “भाईजान ने मिठाई भेजी हैं” म्हणाली. पाकिस्थानात बनलेली मिठाई तिने मला आवर्जून खायला दिली संकेतसाठी पण दिली. पण सारखी सारखी अशी कुरियर येणे त्याला काही पटले नाही. “पाकिस्थानातून येते आहे हे! उद्या काही भानगडी झाल्या तर कोण निस्तरणार? तिला म्हणावं, तुझ्या दुसऱ्या एखाद्या मैत्रिणीकडे बोलाव.” जरा विचार केला, तर मलाही पटलं. वरवर कितीही चांगले वाटले, तरी कोणाचा काय भरोसा देणार? ही कुठे कुठे होणारी टेरेरिस्टची प्रकरणे! बाई गं. मी जरा सटपटलेच. लगेच तिला सांगूनही टाकले. “शमा, आप गलत नही समझनां. लेकीन आपकी कोई और सहेली होगी तो उसकी पते पर आप बुला सकती है नां?” “तिच्या डोळ्यात उदासीची छटा तरळली. “बहेनजी आप तो जानती ही हैं. मै यहा आपके सिवा किसीको जानती तक नही. लेकीन हां मैं समझ सकती हुं. आप यदि नही चाहती तो अगली बार नही मंगवाउंगी. हमारे लिये आजकल माहोल ही बडा खराब हैं. सभी लोग शक करते हैं. शबीर साहब की दाढी देख कर ही लोग न जाने क्या क्या पुछते रहते हैं. कैसे जियेंगे? करे भी तो क्या करे?” तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आले. मला कसेसेच झाले. “अजी आप तो बुरा मान गयी. आप पर हम कोई शक थोडी ना कर रहे हैं? लेकीन बाहर से कुरियर आता है. वहां का हमे क्या पता? इसलिये मेरे हजबंड थोडे परेशान हैं.” मी हजबंडचे, तिला पटेल असे कारण दिले. “कोई बात नही बहनजी! अबसे नही मंगवाउंगी.” तिने साधेपणाने म्हटले. चला हा नाजूक विषय जास्त अडचणीत न येता हाताळता आला. मी सुटकेचा निश्वास टाकला. संकेतला हे ऐकून खूप बरे वाटले.

शमाचे अपार्टमेन्ट आमच्या समोरच्याच बिल्डींगमधे आहे, व बरोबर आमच्या मजल्याच्या लेव्हलवर. माझ्या बाल्कनीतून तिचे घर, प्रवेशदार वगैरे छान दिसते. ह्या लोकांकडे आमच्या शिवाय कधी कोणी येत-जात असलेले पाहिले नाही. त्यामुळे, आज तिच्या दारासमोर सकाळी सकाळी काही गडबड उडालेली पाहून खूप आश्चर्य वाटले. अगदी युनिफ़ॉर्मवाले दोन पोलीसच बंद दारासमोर उभे होते. बेल वाजवून दार लवकर उघडले नाही तेव्हा इंपेशंटली “Mr Ahemad, open the door now. This is police” अशा अधिकारवाणीत हाका ऐकू आल्या. शेवटी पाच मिनटांनी शबीरनेच दार उघडले. त्या पोलिसांनी सरळ आतमधे शिरकाव केला. अन काय सांगितले कोण जाणे. पण थोड्या वेळाने ते बाहेर आले. त्यांच्या बरोबर शबीर देखील होता. शमाने दाराचे कुलूप लावले आणि ही सगळी वरात पोलिसांच्या गाडीतून गेली. मला काही सुचेना. पोलिसांनी अटक केली, की नुसते चौकशीला नेले? काही कळायला मार्ग नव्हता. हे भलतेच झाले होते. नुकत्याच शमा बरोबर झालेल्या गोष्टी आठवून घसा कोरडा पडला. ह्या लोकांचा टेररिस्ट बरोबर संबंध असेल? की शबीर हाच टेररिस्ट होता? आणि मग माझ्या कडे आलेली ती पार्सल्स? काय होते त्यात? पण शमाने तर ड्रेस, मिठाई वगैरे दाखवली होती! नुसते दाखवायला काय? काहीही दाखवता येते! मी मटकन खालीच बसले. डोळ्यासमोर अंधेरी आली. संकेतचा फ़ोन नंबर पण आठवेना.

पाणी पिऊन संकेतला फ़ोन लावला. तो बीझी होता. म्हणाला थोड्या वेळाने फ़ोन कर. मी रडायलाच लागले. ते ऐकून संकेतला गंभीरतेची जाणीव झाली. मी तर आधी म्हणाले, “आपल्या कडे पोलिसांची धाड येईल का रे?” “अग काय वेड्या सारखे बरळते आहे? काय झाले, नीट सांग. मी आपली काही बाहीच सांगत राहिले. पण त्याने माझ्या कडून नीट विचारून सगळी माहीती काढली. “हे बघ, आधी तू शांत हो बर. पोलिसांनी त्याला कशा साठी नेले हे जो पर्यंत आपल्याला माहित नाही तो पर्यंत उगाच वेडेवाकडे विचार करू नकोस. मी लवकर परत येतो. तो पर्यंत काही झाले तर लगेच मला फ़ोन कर.” दुपार अशीच घालमेल मधे गेली. शमा किंवा शबीर देखील परत आले नव्हते. सारखी मी आपली तिच्या दारावर लक्ष ठेवून होते. तोच बेल वाजली. माझ्या पोटात गोळाच आला. “who is it?” मी धीर करून विचारले. “कुरीयर सर्विस” उत्तर आले. नेमके शमाकडून आलेलेच कुरीयर. आता हेच राहिले होते. मी त्याला म्हटले, “Can you wait a moment please? I must call my husband” तो थांबला. मी लगेच संकेतला फ़ोन लावून काय करू म्हणून विचारले. “काय काय करू? सांग त्याला आमचे नाही, आम्ही नाही घेत म्हणून.” पण नंतर त्याला काय वाटले कोण जाणे, तोच पुन्हा म्हणाला “नाहीतर थांब. मला वाटते, हीच संधी आहे. तू घेऊनच टाक. आपणही पाहूच काय आहे त्यात ते.” “अरे पण, आणखीन गोत्यात आलो तर?” “तर काय? तसे असेल, तर आधीच गोत्यात आलेले असू! निदान गोता कोणता ते तर पाहून घेऊ? अंधारात गोता मारण्यापेक्षा ते बरे!” कसे ह्याला असले स्मार्ट विचार सुचतात कोण जाणे. मी कुरीयर घेतले. आणि शेपटीने मेलेला साप धरावा तसे धरून टेबलवर ठेवून दिले. थोडा फ़रक जाणवला. या आधीची पार्सल पाकिस्थानातून आली होती. हे फ़्रान्स मधून आलेले दिसत होते. काय काय विचार येत होते मनात! फ़्रान्स मधे देखील मुस्लीम नेटवर्क आहे हे मी ऐकून होते. काय असेल? प्लॅस्टीक डिटोनेटर? पैशांच्या गड्ड्या? पुढच्या बॉम्ब स्फ़ोटाचा प्लॅन? ड्रग्ज? “होने को तो कुछ भी हो सकता है. क्या हुआ है यह देखो” संकेतच्या गुरूंचे- गुप्ताजींचे वचन कानात गुणगुणत होते. क्या हुआ होगा सच में? सगळे साफ़ दिसत होते. ही पार्सले आणण्यासाठीच ह्या लोकांनी आपला उपयोग करून घेतला. शबीरने स्विमींग पूल वर मुद्दाम करून घेतलेली ओळख. पहिल्याच ओळखीत घरी जेवायला बोलावणे. शमा विषयी आम्हाला सहानुभुती तयार व्हावी म्हणून तिच्याशी शबीरचे कठोर वागणे. तिने “शबीर मला घरच्यांशी संबंध ठेवू देत नाही” ही रचलेली स्टोरी सांगणे. शेवटी त्या निमित्याने आमच्या पत्यावर न जाणे काय काय बोलावणे. मी जड पावलांनी बसून राहिले.

समीर म्हटल्या प्रमाणे लवकरच घरी आला. आल्यावर पुन्हा खूप चर्चा. शेवटी ते पार्सल आपण उघडू नाही असा निश्कर्ष निघाला. काही विपरीत दृष्य बघायची माणसाची ताकद नसते. इतक्यात शमाची खिडकी उघडी दिसली. आलेले दिसताहेत. लगेच तिला फ़ोन केला. शमानेच उचलला. “कहा थे तुम? सब ठीक तो है?” मी विचारले. “अजी कुछ नही. शबीर साहब जरा बाहर गये है.” काही लपवत असल्यासारखा तिचा आवाज म्लान वाटला. मी फ़ोन वर असतांनाच संकेतला खुणांनी “शबीर घरी नाही आहे असे सांगितले.” तोही मला खुणांनी सुचवू लागला, पार्सल आले आहे, आम्ही तुझ्याकडे घेऊन येतो आहे असे सांग. “बहनजी, आपका एक पार्सल आया है. लेकीन मैने तो बताया था आपको, अभी और पार्सल नही मंगवाना. फ़िर यह कैसे?” “अजी आपने मना करने के बाद तुरंत ही मैने अम्मी जांन को बताया था. लेकिन यह उसके पहले ही उन्होने भेजा था. आप अभी आ सकते है तो ले कर आयीएंगा प्लीज.” मला तेच हवे होते. आम्ही दोघेही लगोलग पिशवीत पार्सल घेऊन तिच्याकडे गेलो.

शमाने दार उघडले. सुजलेले डोळे. अस्ताव्यस्त केस, ओढणी भरकटलेली. “क्या हुआ हैं यहां? आप ठीक ठीक बताइए. हमने सबेरे कुछ देखा है.” पार्सलची पिशवी हातात घट्ट धरून मी सरळ सरळच सवाल केला. “कुछ नही, कुछ नही.” तिचे तेच सुरू. “कुछ नही तो शबीर भाई साब कहां गए है इस वक्त?” “अजी बस उनके दोस्त से मिलने गए है.” “शमा अब बहोत हुआ. शबीर को पोलिस ले गई, मैने देखा है. और उपर से इतने सारे पार्सल्स, मेरे दस्तखत से मेरे पते पर भेजे गये. देखिये. आप जिस भी झमेले में खेल रही है, हमें मत फ़सांओ. हमने आपका क्या बिगाडा है? हमने तो बस एक पडोसी होने के नाते आपकी मदत की....” पडोसी वर जोर देत मी आता पर्यंत दाबलेली सगळी भडास काढली.

ती एकदम खुर्चीवर बसून रडायलाच लागली. “देखो, रोने से कुछ नही होगा. आप साफ़ साफ़ बताएंगे की आपने क्या किया है, तो शायद कुछ सोच सकते है.” संकेतने तिला विचारले. “क्या किया है शबीरने? क्यो पुलिस उसे पकड कर ले गयी?” शमा एका तिरमिरीतच उठली. माझ्या हातातली पार्सलची पिशवी तिने ओढून घेतली. “हम गला फ़ाड कर चिल्लाते रहेंगे. हमने कुछ नही किया. हमने कुछ नही किया. फ़िर भी सिर्फ़ यह मुसलमान है, यह नकाब पहानती है, यह दाढी रखता है, इन वजहों से हमारी तरफ़ शक से देखते है. आपको मै कितना भी बताउं, आपके दिल में शक तो रहेंगा ही. यह पार्सल. आपको शक है, इसमें कुछ होगा. आप ही खुद खोल कर देख लिजीये जो भी है.” शमा थोडे टॅन्ट्रम करीत आहे असे मला वाटले. संकेतला देखील तसेच वाटले असावे. त्याने “मेरा ऐसा मतलब नही था..” म्हणत म्हणत पार्सल उघडलेच. त्या पार्सलमधे सलमान रशदीचे एक पुस्तक होते. शमाने ते हातात घेतले. देखीये. यदी मै जिहादी होती, तो इस को हाथ लगाती?” “लेकीन शबीर भाईसाब तो पाक मुस्लीम है. यह किताब कैसे उन के घर में?” “जी दुरुस्त फ़र्माया आपने. उनके और मेरे खयालात मिलते नही, ईसीलिये मै मेरी पसंद की चिजे उनसे बताए बिना मंगवाती थी. इसी में आपने मेरी मदत की.” “तो फ़िर पोलिस से उनका क्या वास्ता?” मी मूळ प्रश्न धरून ठेवला.

हताश होऊन शमा खुर्चीवर बसली. “यही तो रोना है. शबीर साहब एक पाक मुसलमान है. यही एक सबसे बडा सबूत उनके खिलाफ़ बन गया है. उनका दिन मे पांच बार नमाज अदा करना, औरतों की तरफ़ कुराण शरीफ़ में बताया हुआ रवय्यां अपनाना, और तो और दाढी रखना वगैराह फ़ालतू वजह देकर उन्हे फ़साया जाता है. And this is Amerika, where all are suppossed to be equal. भाभीजी, मै मॉडर्न जरूर हुं, लेकीन कुराण शरीफ़ को मै बहोत मानती हुं. खुदा मुझसे कभी झुट नही बुलवाएंगा. शबीर साहब बडे ही नेक इन्सान है. हा उनके खयालात जरूर पुराने है. लेकीन इन्सानियत के खिलाफ़ वह ख्वाब में भी नही सोच सकते. बदकिस्मतीसे उनका एक दोस्त गलत राह पर चल रहा था. उसे समझाने के लिए उससे मिलना जुलना था. बस यही बात पता चलने से उनकी एनक्वायरी हो गयी. भाईसाब, आपकी कुछ जान पहचान होगी तो आप उन्हे छुडाने की कोशीस करेंगे?”

तशाही अवस्थेत तिची ती दयनीय हाक ऐकून आम्हाला दोघांना काही सुचेना. ही सांगतेय ते खरे, की, आपण घेतलेल्या शंका खऱ्या? तिचे सत्य काहीही असो. सरहदी पल्याडच्या या असल्या मदतीच्या हाकेला जाणे आम्हाला कुठल्याच दृष्टीने परडवणारे नव्हते. तिला कसेबसे समजावले. मान खाली घालून, तरीही चोरून, आपल्यावर कोणाचे लक्ष तर नाही ना हे बघत, आम्ही घरी आलो. घरा बाहेरून आतला अंधार जास्तच गडद वाटत होता.
******

कथावाङ्मयसमाज

प्रतिक्रिया

पैसा's picture

18 Sep 2010 - 8:23 am | पैसा

प्रश्नच प्रश्न. खरं काय खोटं काय? माणुसकी कुठपर्यंत? आपला कोणी गैरफायदा घेतोय का, परदेशात एकटे असताना कसं ठरवाव?
छान लिहिलंय.

नगरीनिरंजन's picture

18 Sep 2010 - 8:27 am | नगरीनिरंजन

हम्म्म्म्म, ज्वलंत विषयावरचं जळजळीत भाष्य! वाईट वाटतं अशा निष्पाप लोकांबद्दल आणि दूषित नजरांची चीडही येते.
पण 'गलत राह' वर चालणार्‍या लोकांना समजावण्यापेक्षा पकडून का देत नाहीत ते असाही प्रश्न पडतो.
हे सगळे विचार आणि भावना पुन्हा निर्माण करण्याचं सामर्थ्य तुमच्या लेखनाचं.

सहज's picture

18 Sep 2010 - 9:02 am | सहज

फार छान लिहले आहे.

मिपाकरांना एक विनंती, ही एक कथा आहे काथ्याकूटचा विषय नाही.

कृपया एक कथा, ललित कथा म्हणून वाचावी. उगाच जहाल काथ्याकूट सुरु करु नये.

जाताजाता: एक दुवा फक्त विशिष्ट नाव व वेश असला पाहीजे असे नाही अशी वेळ संशयावरुन येउ शकते. शेवटी असे होत असते, ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल. बरेचदा सुरक्षा यंत्रणा खर्‍या गुन्हेगाराला पकडण्यात यशस्वी होतातही तेव्हा फारसा काथ्याकूट होत नाही जरी अगदी मुळ संशयाची / कारवाईची कारणे अशीच असली तरी. असो.

अप्पा जोगळेकर's picture

18 Sep 2010 - 10:25 am | अप्पा जोगळेकर

लिखाण आवडलं. सह्ही लिहिलंय.
सातवीत असताना 'हे डाळिंबाचे दाणे वेड्या घात तुझा करिती' नावाची कविता होती. त्याची आठवण झाली. प्रेमविवाह असूनसुद्धा अशी गुलामी म्हणजे कमाल आहे.

“तर काय? तसे असेल, तर आधीच गोत्यात आलेले असू! निदान गोता कोणता ते तर पाहून घेऊ? अंधारात गोता मारण्यापेक्षा ते बरे!”

हे भारी होतं.

चिगो's picture

18 Sep 2010 - 10:37 am | चिगो

पकड घेणारं लिखाण..

आनंदयात्री's picture

18 Sep 2010 - 1:45 pm | आनंदयात्री

बापरे !! गोष्ट जळजळीत आहे. आपण कथापण खुप छान खुलवली आहे.

बाकी वास्तवात अश्या कहाण्या विरळाच असाव्यात.

चिरोटा's picture

18 Sep 2010 - 2:55 pm | चिरोटा

छान कथा.पोलिसांनी चौकशी करता नेणे(ते ही अमेरिकेत) ह्यावरुन शमाने(जी मुळची पाकिस्तानी आहे) केलेला गदारोळ जरा खटकला.

कथेचं नाव , पाकीस्तानी भाषा, ओघ, कथेची पकड अनेक पैलू कौतुकास्पद आहेत. खरच इतका जीव लागलेल्या व्यक्तीवर असा प्रसंग येत असेल तेव्हा आपण काही करू शकत नाहे ही हतबलता, परत त्याच व्यक्तीवर येणारा सूक्ष्म संशय कितीतरी छटा इतक्या समर्थपणे उतरवल्या आहेत.

विसुनाना's picture

18 Sep 2010 - 5:22 pm | विसुनाना

स्वच्छ कथा. (आजच्या पार्श्वभूमीवर) मानवी स्वभावाचे चित्रण करणारी कथा. कथा आवडली.

मान खाली घालून, तरीही चोरून, आपल्यावर कोणाचे लक्ष तर नाही ना हे बघत, आम्ही घरी आलो. घरा बाहेरून आतला अंधार जास्तच गडद वाटत होता.

-या शेवटच्या वाक्यानी जोरदार दणका बसला.

मस्त कलंदर's picture

18 Sep 2010 - 5:43 pm | मस्त कलंदर

विसुनानांशी सहमत.

तिमा's picture

18 Sep 2010 - 9:13 pm | तिमा

पकड घेणारी कथा. सत्यकथा असेल तर तुम्हाला संशय आला त्याबद्दल संकोचण्याचे कारण नाही. प्रत्येक जण आपापली सुरक्षा बघणारच!

शिल्पा ब's picture

18 Sep 2010 - 9:37 pm | शिल्पा ब

कथा छान लिहिली आहे..
आता धर्मांध मुसलमानांनी इतके काही केले आहे कि संशय हा येणारच....नाईलाज आहे...कशावरून विश्वास ठेवणार..असो.
पण अशा सर्वसामान्य लोकांबद्दल सहानुभूती मात्र वाटते...तेवढेच.

अनिल हटेला's picture

18 Sep 2010 - 11:30 pm | अनिल हटेला

कथा अर्थातच आवडली...

:-)

मदनबाण's picture

19 Sep 2010 - 9:49 am | मदनबाण

कथा आवडली... :)

छान कथा.

>>समीर म्हटल्या प्रमाणे लवकरच घरी आला.

इथे समीर एवजी संकेत हे नाव हवयं ना.

अविनाशकुलकर्णी's picture

19 Sep 2010 - 10:25 am | अविनाशकुलकर्णी

लिखाण आवडलं. सह्ही लिहिलंय.....

स्वाती२'s picture

19 Sep 2010 - 5:33 pm | स्वाती२

कथा आवडली.

ज्ञानेश...'s picture

19 Sep 2010 - 5:57 pm | ज्ञानेश...

कथा आवडली. कथेतून कसलाही निष्कर्ष काढला नाही, हे त्याहून आवडले !
पुढील लिखाणास शुभेच्छा.

सुनील's picture

19 Sep 2010 - 7:33 pm | सुनील

कथा छान.

श्रावण मोडक's picture

19 Sep 2010 - 7:34 pm | श्रावण मोडक

कथन छान.
पतीचा उल्लेख साहेब असा केला जातोय हे रूढ आहे का? पाकिस्तानी पद्धत वगैरे?

अरुण मनोहर's picture

19 Sep 2010 - 8:38 pm | अरुण मनोहर

राजस्थानात (किंवा उत्तर भारतातच म्हणाना!) पतीचा उल्लेख 'साहब' असा सर्रास केला जातो, ते आठवून हे लिहीले होते. बहुदा मुस्लीमांत देखील ही पद्धत असावी. चु.भु.दे.घे.

अवांतर- नवीन लग्न झाल्या झाल्या आम्ही दोघे महाराष्ट्रातून कोटा इथे होतो. तेव्हा तिथल्या बायका हिला विचारायच्या ''आपके साब नही आये?" पहिल्यांदा तिने निरागसपणे "मेरे कोई साहब वाहब नही है, मै नौकरी नही करती" असे उत्तर दिले होते.!

सुवर्णमयी's picture

19 Sep 2010 - 7:52 pm | सुवर्णमयी

लेखन आवडले, शेवट तर खूपच

स्पंदना's picture

19 Sep 2010 - 9:30 pm | स्पंदना

मस्त!

गणेशा's picture

20 Sep 2010 - 1:06 pm | गणेशा

आपला लेख मनापासुन आवडला.
"मुसलमान" असलेले माझे मित्र आठवले सगळे.
मी अतिरेकाबद्दल बोलत नाहिये .. पण त्यानी जी वागणुक त्याच्या बायकोला दिली ती खरी असु वा खोटी सगळे तसेच वागतात भारतात ही असा अनुभव आहे.

एक मित्र मी दिल्ली ला असताना माझ्या रूम मध्ये होता, एकुन चार जन होतो आम्ही. मी उठुन चहा वगैरे करायचो .. जेवन बनवता याय्चे पण भात .. पोहे नाश्टा कराय्चो.
सगळॅ काही ना काही हातभार लावयचो ,, या माझ्या मित्राला चहा पण हातात द्यावा लागयचा ..शेवटी मी बोललोच नंतर काय तरे तु काही तरी मदत तर कर ना. आणि काय हे आयते रे.
तर म्हणतो मला असली सवय नाही .. आम्च्यात बायका कशाला हात लावुन देत नाही .. साधे चहा प्यालेला कप ही झाडुन घेणारी बाई उचलायच्या.

माणुस म्हणुन ते कीतीही चांगले सहकारी असले तरी पती म्हणुन पण त्यांची काही जबाबदारी .. नैतिकता हवी .

--
बाकी तुम्ही ते पार्सल बंद केले हे चांगले केले. कारण कोण कोणाचा कसा उपोयोग करुन घेइल सांगता येत नाही . भले त्यांनी चांगल्यासाठी सर्व केले असेल पण कशावरुन ?

असो .. लिखान विचार चक्राला गती देते आहे ..
लिहित रहा .. वाचत आहे