कोणीच ना पहाते...

स्वानंद मारुलकर's picture
स्वानंद मारुलकर in जे न देखे रवी...
6 Sep 2010 - 10:52 pm

कोणीच ना पहाते माझ्याकडे अताशा
नजरेत काय माझ्या दिसते अता निराशा ?

ढुंकून पाहण्याला नाही उसंत कोणा
जो तो पुढे निघाला बडवीत ढोलताशा

संघर्ष भावनांचा इतुका मनात होतो
गेली उडून माझ्या ओठावरील भाषा

माझे अबोलणेही भासे मला विषारी
कारण ठरे विखारी माझ्याच ते विनाशा

आनंद वा सुखांचे नसती प्रदेश ज्याला
माझा अनाम साथी असला सुना नकाशा

तू आंधळा प्रवासी तुज भूल मृगजळाची
तोडून चल पुढे तू भोगा, विलास, पाशा

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

करुणकवितागझल

प्रतिक्रिया

दत्ता काळे's picture

7 Sep 2010 - 8:54 am | दत्ता काळे

गझल आवडली.

शेवटच्या द्विपदीने मात्र गझल अगदी ओढून ताणून वाढवल्यासारखी वाटते. बाकी द्विपदी अप्रतिम.

स्वानंद मारुलकर's picture

7 Sep 2010 - 7:11 pm | स्वानंद मारुलकर

दत्ता,
प्रतिसादासाठी आभार.

एक अनामी's picture

7 Sep 2010 - 8:37 pm | एक अनामी

कविता आवडली...

सुरेख!!

ढुंकून पाहण्याला नाही उसंत कोणा
जो तो पुढे निघाला बडवीत ढोलताशा

संघर्ष भावनांचा इतुका मनात होतो
गेली उडून माझ्या ओठावरील भाषा

या द्विपदी आवडल्या. :)

मिसळभोक्ता's picture

7 Sep 2010 - 11:26 pm | मिसळभोक्ता

कळते अरे मला हा माझा वसंत नाही

ह्या एका साध्या शिंपल ओळीतून व्यक्त होणारी निराशा पूर्ण गजलेत दिसत नाही.

तुम्ही साधेपणाच्या बुरख्यतून फोटू काढलात, पण बुरख्या आडचा चेहरा नाही, बुरखाच दिसला.

क्षमस्व. (प्रयत्ने वाळुचे ... हे तुम्हाला माहिती असेल्च.)

अविनाशकुलकर्णी's picture

7 Sep 2010 - 11:29 pm | अविनाशकुलकर्णी

छान आहे

स्वानंद मारुलकर's picture

7 Sep 2010 - 11:52 pm | स्वानंद मारुलकर

अनामी, प्राजु, अविनाश
आपले मनापासून आभार.

मिभो,
आपलेही मनापासून आभार.
शेवटी तसे भट साहेबच लिहू जाणेत.
प्रयत्न करेन.

मिसळभोक्ता's picture

7 Sep 2010 - 11:57 pm | मिसळभोक्ता

शेवटी तसे भट साहेबच लिहू जाणेत.

घातलीत शेपटी ?

अहो शेवटी भटसाहेब देखील आपल्यासारखेच दोन पाय - दोन हाताचे माणुस होते ना ?

मग इतके लगेच, मोठ्या माणसांनी लिहिले आहे, त्यापेक्षा आपण निम्न दर्जाचेच करायला हवे, असा भारतीय ट्रेडमार्क शेपूटघालूपणा कशाला ?

प्रयत्न तर करा !

पोटेन्शियल आहे, प्रयत्नाने यश मिळेल. पण प्रयत्नांना असा अडसर घालू नका.

संघर्ष भावनांचा इतुका मनात होतो
गेली उडून माझ्या ओठावरील भाषा

सुंदर... :)