मदत -मिपावर फोटो चिकटवणे.

गणपा's picture
गणपा in जनातलं, मनातलं
4 Aug 2010 - 4:14 am

नविन सदस्यांना बरेच वेळा भेडसावणारा प्रश्न म्हणजे फोटो (प्रकाशचित्रं ) कसा टाकावा.
संपादक मंडळ बरेच वेळा मदत करते, आणि वाविप्र मध्ये ही याचा उलगडा केलाय.
पण प्रत्येला का ते वाचुन जमतच असं नाही.

जे आपण पहातो ते ऐकण्या पेक्षा जास्त चांगल लक्षात रहात, हा माझा स्वानुभव असल्याने या धाग्यात टप्या टप्याने फोटो कसा टाकावा ते सांगत आहे.

गरजुंना याचा लाभ होईल अशी आशा करतो.

पायरी १.

प्रथम पिकासा/फ्लिकर वा तत्सम फोटो चढवण्याची सोय असलेल्या साईटवर आपल्याला हवा असलेला फोटो चढवावा.

येथे पिकासाचे उदाहरण देत आहे. Upload वर क्लिकावे.

पायरी २.
हवा तो अल्बम निवडुन Browse या बटणावर क्लिकावे.
तुमच्या संगणाकावरुन हवातो फोटो निवडावा.

Start Upload क्लिकावे.

पायरी ३.

फोटो चढवुन झाल्यावर. त्याच फोटोवर क्लिकावे.

पायरी ४.
फोटो मोठा दिसायला लागल्यावर, त्यावर माउसचे उजवे बटण क्लिकुन आणि Properties वर क्लिकावे.

पायरी ७.

URL चा पत्ता कॉपी करावा.

पायरी ६.
मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा.
हवी असलेली साईझ द्यावी.

पायरी ७.
पुर्वपरिक्षण करुन प्रकाशित करावे.

शिक्षणमाहिती

प्रतिक्रिया

प्रथम शेअरिंग झाले पाहिजे. लिंक काढून फोटो आला नाही तर नंतर शेअरिंग केले तरीही ती अगोदरची लिंक फोटो देणार नाही. नवीन लिंक काढावी लागेल.

चौथा कोनाडा's picture

4 Nov 2022 - 1:21 pm | चौथा कोनाडा

बरोबर कंजूस सर.

सभासदांची शेअरिंग करताना गडबड होते... आणि शेअरिंग नीट झाले आहे की नाही हे लॉग आऊट करून खात्री करून घेणे गरजेचे असते... ते ही केले जात नाही घाईत, त्यामुळे प्रचि दिसत नाहीत आणि गोंधळून जायला होते. वेळ देऊन आणि शांतपणे करण्याचे हे काम आहे.

कंजूस's picture

4 Nov 2022 - 1:50 pm | कंजूस

मी गूगल फोटोसाठी जे जीमेल अकाऊंट वापरतो ते मोबाईलच्या सेंटिंग्ज/सेटपमध्ये लावलेल्या जीमेल पेक्षा निराळे आहे. त्यामुळे दुसऱ्या ब्राऊझरमध्ये लिंक अड्रेसबारमध्ये टाकून फोटो आला नाही की मला समजते की शेअरिंग बरोबर झालेले नाही.

सुजित जाधव's picture

13 Mar 2023 - 4:44 pm | सुजित जाधव

sh

सुजित जाधव's picture

13 Mar 2023 - 4:47 pm | सुजित जाधव

Gg

चौथा कोनाडा's picture

23 Mar 2023 - 5:34 pm | चौथा कोनाडा

अरे व्वा, फोटो अपलोड करायला जमला .... ग्रेट !

कविता तर खुपच सुंदर आहे !

चौथा कोनाडा's picture

23 Mar 2023 - 5:44 pm | चौथा कोनाडा

MKVJ023