अमेरिकेतील दहावी बारावी ची वर्षे

पारुबाई's picture
पारुबाई in जनातलं, मनातलं
15 Jul 2010 - 6:10 am

भारतामधील शिक्षण पद्धती ही अमेरिकेतील शिक्षण पद्धतीपेक्षा अनेक बाबतीत निराळी आहे.भारतामध्ये ज्याप्रमाणे दहावी आणि बारावीची वर्षे आयुष्याला दिशा देतात तशी इथे नववीपासून बारावीपर्यंतची चार वर्षे आयुष्याला दिशा देणारी असतात.अमेरिके मधला विद्यार्थी कोण कोणत्या आघाड्यावर लढत असतो? कशी असतात ही नववी ते बारावी ची चार वर्षे ? ह्याची ही तोंड ओळख.

भारतामध्ये पहिली ते चौथी प्राथमिक,मग पाचवी ते सातवी माध्यमिक,आठवी ते दहावी हायस्कूल,अकरावी बारावी जुनिअर कॉलेज आणि मग ३ वर्ष पुढे कॉलेज ची असतात.
अमेरिकेमध्ये पहिली ते पाचवी प्राथमिक,सहावी ते आठवी माध्यमिक,नववी ते बारावी हाय स्कूल ,मग पुढे ४ वर्षे under graduate ( ज्याला आपण कॉलेज म्हणतो )असे असते.

अमेरिके मध्ये नववी ला विषय निवडी पासून सुरुवात होते.कॉलेज मध्ये गेल्यावर कोणत्या शाखेचा अभ्यास करणार असाल त्याला अनुसरून पूरक विषय घेता यावेत म्हणून नववी पासून अनेक ऐच्छिक विषय घेण्याच्या संधी उपलब्ध असतात.असंख्य पर्याय असतात निवडायला.नववी ते बारावी असे दर वर्षी विषय निवडत निवडत पुढे जायचे असते. इंग्लिश आणि गणित मात्र घ्यावेच लागतात.

प्रत्येक शाळेमध्ये counseling ची सोय असते.ज्या विषयात करिअर करायचे आहे त्या विषयाला संबंधित कोणते पूरक विषय घायचे याकरता पालक आणि विद्यार्थी सल्ला मागू शकतात.शिवाय दर सहा महिन्यांनी या विषयावर पालकांच्या सभा देखील भरवल्या जातात.
अधिक हुशार मुलांना AP आणि HONORS असे प्रत्येक विषयामधील कॉलेजच्या दर्ज्याचे अभ्यासक्रम घेता येतात. हे अभ्यास क्रम निवडलेल्या मुलांना कॉलेज अडमिशनला फायदा होतो.मग कॉलेज मध्ये तो विषय पुन्हा शिकायला लागत नाही ज्यामुळे पैसा आणि वेळ दोन्ही वाचते.

भारता मध्ये जसे दहावी आणि बारावी चे वर्ष हे कॉलेज मध्ये अडमिशन मिळण्याच्या दृष्टीने महत्वाचे असते तसे इथे नववी पासून बारावी पर्यंत सगळी च वर्षे महत्वाची असतात. याचे मुख्य कारण म्हणजे नववी पासून ते बारावी पर्यंत चे सगळ्या लहान मोठ्या परीक्षांचे मार्क हे कॉलेज च्या अडमिशन करता धरले जातात. शाळेमध्ये सतत वर्ष भर कोणत्या न कोणत्या परीक्षा सुरूच असतात.आणि शिवाय एक वार्षिक परीक्षा असते. अनेक प्रोजेक्ट्स आणि प्रेझेन्टेशन याचे पण मार्क्स महत्वाचे ठरतात.त्यामुळे मुलांना सतत अभ्यासात सतर्क राहावे लागते.आणि मग या सर्व मार्कांची सरासरी काढून जो आकडा येतो तो म्हणजे GPA. (सर्व साधारणपणे १००%= ४.० GPA.)
कॉलेजच्या प्रवेशा करता हा आकडा अर्थातच अतिशय महत्वाचा असतो.

ज्यांना आपला हा GPA वाढवायचा असती त्यांना दर वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये SUMMER SCHOOL सारखे पर्याय उपलब्ध असतात.
त्यामुळे बरीचशी मुले सुट्टीमध्ये शाळेत जातात.SUMMER SCHOOL मध्ये पुढच्या वर्षाचा अंदाज यावा इतपतच अभ्यास शिकवला जातो.संपूर्ण वर्षाचा अभ्यास क्रम पूर्ण करण्याकडे भर नसतो. Summer school मध्ये परीक्षा नसते. आणि त्याचा कालावधी फक्त ६ आठवडे इतकाच असतो.

GPA च्या च जोडीला अजून एक आकडा इथे महत्वाचा समजला जाते आणि तो म्हणजे SAT.SAT is Standardized Test for College Admission
SAT ची परीक्षा द्यायची असते अकरावी मध्ये .या मध्ये ENGLISH WRITING,ENGLISH READING,MATHS या ३ विषयांची परीक्षा घेतली जाते.सगळे मिळून २४०० मार्कांची परीक्षा असते.

SAT प्रमाणेच ACT अशी देखील एक परीक्षा असते.काही कॉलेजेस ACT चा रिझल्ट पाहतात तर काही SAT चा.

SAT SUBJECT TESTS अशी अजून एक परीक्षा असते जी एखाद्या विषयाशी निगडीत असते. जो विषय घेवून UNDER GRAD/College करणार असता त्या विषयाची सब्जेक्ट टेस्ट मुले देतात.

आणि दहावी मध्ये असते P-SAT. म्हणजे pre-SAT.ह्या परीक्षेचे मार्क मात्र कशा मध्ये धरत नाहीत. ही SAT च्या सरावा करता असलेली परीक्षा आहे.

अमेरिके मध्ये कॉलेजला अडमिशन देताना मार्कांच्या इतकेच त्या विद्यार्थ्याचे इतर व्यक्तिमत्व कसे आहे याला देखील अनन्य साधारण महत्व असते.
ह्या करता सगळ्यात प्रथम पाहिले जाते कि त्या मुलाचे खेळ किंवा कला या क्षेत्रात काही वाखाणण्या जोगे काम आहे का.
त्यामुळे इथे मुले सहावी सातवी पासून एक खेळ आणि एक कला निवडून त्या त्या गोष्टी मध्ये जास्तीत जास्त वर्ष शिक्षण घेवून प्राविण्य मिळवतात.

हायस्कूल मध्ये व्यक्तिमत्व विकसित करण्याच्या हेतूने वेगवेगळे असंख्य क्लब्ज असतात. उदा. रोबोटिक्स,enviornment club,बुक क्लब,जर्नालिझम क्लब .मुलांनी या अश्या (कमीत कमी २) क्लब्स मध्ये भाग घेणे अपेक्षित असते. हे क्लब्ज मुलेच चालवत असतात.त्या क्लब्ज द्वारे अनेक स्पर्धांमधून भाग घेत असतात.आणि या सगळ्या मुळे त्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. लीडर शिप गुण वाढीला लागतात.समाजात एकत्रित पणे काम करण्याची सवय होते.निर्णय क्षमता वाढीला लागते.

त्या नंतर नंबर लागतो ते म्हणजे त्या विद्यार्थ्याने समाजसेवा किती केली आहे.community serice/volunteering.समाज सेवा करण्याकरता वयाची १५ वर्षे पूर्ण झालेली असावी लागतात. मुले नववी पास झाल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये हे volunteering तास मिळवतात. बारावीचे शैक्षणिक वर्ष पूर्ण होई पर्यंत ह्या मुलांना ६० तास समाजसेवा पूर्ण करायची असते. पण या मध्ये सुद्धा स्पर्धा असते. त्यामुळे मुले २०० तास तरी समज सेवा करतात आणि आपला अडमिशन चा फॉर्म अधिकाधिक वजनदार करतात.

कोठे करता येते समाज सेवा ? त्या करता इथे समाजात अनेक संधी उपलब्ध असतात. पब्लिक लायब्ररी मध्ये,किंवा म्युझीअम्स,हॉस्पिटल्स मध्ये मुलांकरता खास पोझिशन्स असतात.काम हलके फुलके असते. मुलांना समाजाचे ऋण मान्य करायची सवय हवी या करता ही अट असते.इथे कोठेही मुलांना बदल्यात पैसे मिळत नाहीत. फक्त किती तास काम केले याची लेखी नोंद मिळते.जो विषय घेवून under graduate करणार असाल त्या विषयाशी संबधित जर समाजसेवा केली तर अर्थात च त्याचा कॉलेज अडमिशनला जास्त प्रभाव पडतो. उदा.जर मेडिकल ला जाणार असाल तर हॉस्पिटल मध्ये समाज सेवा केल्याने फायदा होतो.

अडमिशन करता पुढची गरज म्हणजे मुलांना एक एस्से ( निबंध ) लिहून द्यायचा असतो कि तुम्हाला ह्या च कॉलेज मध्ये अडमिशन का हवी आहे आणि तुम्ही करिअर करता हाच विषय का निवडला आहे या संदर्भात. पैसे घेवून एस्से लिहून देणारी किती तरी लोक आहेत.खरे तर हा एस्सी मुलांनी स्वतः लिहिणे अपेक्षित असते.

कॉलेज अप्लिकेशनला विद्यार्थी जोड देतात ते म्हणजे शिक्षकांचे शिफारस पत्र . इथे वशिले बाजी कोठेच चालत नाही. शिक्षक सुद्धा खिरापत वाटल्यासारखी ही पत्रे देत नाहीत. अगदी विशेष कामगिरी केली असेल तर च हे शिफारस पत्र मिळते आणि शिक्षक सुद्धा अगदी मोजक्याच शब्दात लिहून हे पत्र देतात. त्यामुळे मुले अगदी नववी पासून नीट व्यवस्थित पणे वागून शिक्षकांच्या मर्जीला उतरण्याकरता धडपड करत असतात.

शाळेची वेळ असते सकाळी ८ ते ३ आणि नंतर बहुतांशी मुळे ३ ते ५ खेळाची प्रक्टिस करतात. शनिवार रविवारी community service किंवा SAT ची तयारी किंवा इतर EXTRA CARRRICULAR ACTIVITIES. ह्या सगळ्या मुळे अमेरिके मधील मुलांना नववी पासूनच अनेक प्रकारची व्यवधाने असतात ती बारावी संपे पर्यंत. अकरावी ची एकदा SAT परीक्षा दिली कि खरे तर बारावी म्हणजे इथे आराम असतो. मुले अगदी मनसोक्त मजा करत असतात.

पण ही मजा फार काळ टिकत नाही.कारण बारावी चे वर्ष म्हणजे कॉलेज ची अडमिशन घायचे दिवस. अडमिशन काही १-२ महिने आधी मिळत नाही. ती सुरुवात होते बारावीच्या डिसेंबर महिन्यापासून.

शिक्षणलेखमाहिती

प्रतिक्रिया

रेवती's picture

15 Jul 2010 - 6:18 am | रेवती

पारूबाई,
सोप्या शब्दात छान माहिती.
यातल्या काही बाबी महितीच्या तरी काही नवीनच समजल्या.
आपल्याला बारावीपर्यंतच माहिती द्यायची आहे कि हा लेख क्रमश: आहे?
आपली लेखनशैली चांगली आहे.

रेवती

पारुबाई's picture

15 Jul 2010 - 6:25 am | पारुबाई

धन्यवाद.

माहिती क्रमश: आहे.
अमेरिकेतील कॉलेज अडमिशन असा पुढील विषय आहे.

स्वाती२'s picture

15 Jul 2010 - 6:23 pm | स्वाती२

पुढील लेखाची वाट पाहातेय. माझा मुलगा १०वी ला आहे.

प्रियाली's picture

15 Jul 2010 - 6:27 am | प्रियाली

साधी सरळ पण उपयुक्त माहिती. :-) अशाप्रकारच्या माहितीचे स्वागत आहे. वाचनखुणेत टाकली आहे.

आमचे घोडामैदान जवळ आहे. हळू हळू आमचे टेन्शन वाढू लागले आहे.

अमेरिकेमध्ये पहिली ते पाचवी प्राथमिक,सहावी ते आठवी माध्यमिक,नववी ते बारावी हाय स्कूल ,मग पुढे ४ वर्षे under graduate ( ज्याला आपण कॉलेज म्हणतो )असे असते.

आमच्या गावात (खरे म्हणजे काउंटीत) वेगळीच कथा आहे. पहिली ते चौथी प्राथमिक, पाचवी-सहावी माध्यमिक, सातवी-आठवी ज्यु. हायस्कूल आणि नववी ते बारावी हायस्कूल.

बाजूच्या गावांत मात्र उद्धृत केल्याप्रमाणे शिक्षणव्यवस्था आहे.

सहज's picture

15 Jul 2010 - 6:46 am | सहज

साधी सरळ पण उपयुक्त माहिती. अशाप्रकारच्या माहितीचे स्वागत आहे. वाचनखुणेत टाकली आहे.

असेच म्हणतो.

भाऊ पाटील's picture

15 Jul 2010 - 1:07 pm | भाऊ पाटील

साधी सरळ + विंट्रेष्टींग माहिती

चक्रमकैलास's picture

15 Jul 2010 - 9:33 am | चक्रमकैलास

SAT = Scholastic Aptitude Test अस ऐकलं होतं..........

--नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

अभिरत भिरभि-या's picture

15 Jul 2010 - 10:14 am | अभिरत भिरभि-या

शिक्षणपद्धत आणि तोंडओळख दोन्ही आवडले .. धन्यवाद

Dhananjay Borgaonkar's picture

15 Jul 2010 - 11:27 am | Dhananjay Borgaonkar

पारुबाई अमेरीकेतील शिक्षण पद्धतीची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
एक प्रश्ण,

तिकडे १२ वी पर्यंतचे शि़क्षणाचा खर्च खुप महाग असतो का?
भारतामधे जसा कोचिंग क्लासेस चा बाऊ माजवला जातो तसाच तिकडे पण आहे का?

पारुबाई's picture

15 Jul 2010 - 11:39 am | पारुबाई

SAT म्हणजे Scholastic Aptitude Test हे बरोबर च आहे.

अधिक माहितीसाठी वाचा.http://en.wikipedia.org/wiki/SAT

*****************************

अमेरिके मध्ये पब्लिक स्कूल आणि प्रायव्हेट स्कूल असे २ प्रकार आहेत.
पब्लिक स्कूल ला अर्थात च पैसे पडत नाहीत.इथे अशा शाळांचा दर्जा खूप च चांगला असतो.

आणि प्रायव्हेट स्कूल महाग असते.
*********************************

इथे कोचीग क्लास अशी भारता मधील क्लासेस प्रमाणे कोणतीच पद्धत नाही.

काही अपवाद वगळता.पण ते फक्त अपवाद च आहेत.

त्यामुळे सर्व साधारण पणे मुले कोणत्याही क्लास ला जात नाहीत. इथे गाईड ,अपेक्षित,असला कोणताच प्रकार नाही.

पब्लिक स्कूल ला अर्थात च पैसे पडत नाहीत. इथे अशा शाळांचा दर्जा खूप च चांगला असतो.

पब्लिक स्कूलला पैसे पडत नाहीत म्हणजे, प्रत्यक्ष फी द्यावी लागत नाही. अप्रत्यक्षपणे, तुम्ही राहता त्या भागातल्या स्थानिक करांमधून (मुख्यतः तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भरता त्या वार्षिक मालमत्ताकरावर) शाळांचा खर्च चालतो. (प्रत्यक्ष = तुमचे स्वतःच्या मालकीचे घर असल्यास त्यावर तुम्ही भरता तो मालमत्ताकर. तसेच वाहनकर. अप्रत्यक्ष = तुम्ही भाड्याच्या घरात राहत असल्यास तुमचा घरमालक भरतो तो मालमत्ताकर. त्याची वसुली तुमच्याकडून अप्रत्यक्षपणे तुम्ही भरता त्या घरभाड्याच्या काही हिश्श्यातून होतच असते.)

(थोडक्यात, पब्लिक स्कूल म्हणजे 'सरकारी शाळा'. काउंटी पातळीवरच्या (साधारणतः भारतातील जिल्हापातळीसमान) स्थानिक प्रशासनाने चालवलेल्या.)

पब्लिक स्कूलच्या दर्जाचे म्हणाल, तर ते तुम्ही कोठे राहता त्यावर अवलंबून राहते. काही ठिकाणी दर्जा खूप चांगला असू शकतो, तर काही ठिकाणी खूप वाईटही असू शकतो. मुख्य म्हणजे, तुम्ही ज्या भागात राहता, त्या भागातील एका ठराविक (प्राथमिक, माध्यमिक आणि हायस्कूल) शाळेशी तुम्ही बांधील असता. जवळपासच्या दुसर्‍या भागात थोड्या अधिक अंतरावर दुसरी कदाचित अधिक चांगली शाळा जरी उपलब्ध असली, तरी सहसा अशा दुसर्‍या शाळेत बदली ही फार क्वचित, अपवादात्मक परिस्थितीतच मिळू शकते. (बदली मिळालीच तरी मग बस-सुविधा मिळत नाही.) त्यामुळे शाळा बदलण्याचा जवळजवळ एकमेव मार्ग म्हणजे घर बदलून दुसर्‍या भागात राहायला जाणे. (तुम्ही स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असाल तर ते तेवढेही सोपे नाही. शिवाय स्थानिक शाळेच्या दर्जाप्रमाणे घरांच्या किमतीही बदलतात.) त्यामुळे राहण्याची जागा निवडताना (विशेषत: घर विकत घेताना) ती जागा कोणत्या शाळेच्या कक्षेत येते, त्या शाळेचा दर्जा काय, याचा काळजीपूर्वक विचार करणे प्राप्त असते.

खाजगी शाळांच्या बाबतीत अर्थात तुम्ही हवी ती शाळा निवडू शकता, आणि दर्जाही चांगला असतो. पण फीचा खर्च काहीच्याकाही असतो. (शिवाय बस सुविधेबद्दल थोडा साशंक आहे.)

इथे कोचीग क्लास अशी भारता मधील क्लासेस प्रमाणे कोणतीच पद्धत नाही.

एक शंका: 'कूमॉन' काय प्रकार आहे? (पण ते खूळ भारताइतक्याही प्रमाणात फोफावले नसावे.)

- पंडित गागाभट्ट.

रेवती's picture

15 Jul 2010 - 5:49 pm | रेवती

बस सुविधेबद्दल थोडा साशंक आहे
बसची सुविधा सर्व ठिकाणांसाठी मिळत नाही.
माझा मुलगा जेंव्हा खासगी शाळेत जायचा तेंव्हा त्यांच्या बसेस होत्या पण ठरावीक टाउन्स मध्येच त्यांची सर्व्हीस होती.
कुमॉन ही गणित शिकवण्याची जपानी पद्धत आहे. आमच्या मुलाचे बरेच मित्र या क्लासला जातात (मला वाटते त्यांचा रिडिंगचाही क्लास आहे.). जवळजवळ सगळे पालक या पद्धतीवर खूष आहेत असे त्यांच्या बोलण्यावरून वाटते.

रेवती

अश्विनीका's picture

15 Jul 2010 - 11:53 am | अश्विनीका

फारच छान माहिती. धन्यवाद.

कोचिंग क्लास नसले तरी कुमॉन, ब्रेन चाईल्ड वगैरे क्लासेसचेही फॅड वाढत आहे. आमच्या भागातील बरीच मुले बहुसंख्य चायनीज आणि भारतीय (आणि इतर आशियाई ...पाकिस्तानी वगैरे) ह्या क्लासेस ना जातात. साधारण पहिली पासुन हे क्लास लावले जातात. मुख्यत्वे मॅथ्स आणि भाषा या विषयांसाठी क्लासेस लावतात. क्लास मध्ये फारसे शिकवत नाही. अडलेले प्रश्न समजावून देतात आणि होम वर्क मात्र भरपुर असतो. तो पुर्ण करावाच लागतो. तो पूर्ण करून क्लास मध्ये जाउन तपासून घ्यायचा, चुकलेल्या गोष्टी समजावून घ्यायच्या आणि पुढच्या दिवसाचा होमवर्क आणायाचा .

अजून एक म्हणजे प्राथमिक / माध्यमिक शाळेत पाठ्यपुस्तके (टेक्स्ट बुक्स) अशी काही अभ्यासाला नाहियेत. एक अभ्यास्क्रम ठरवलेला असतो त्याप्रमाणे शाळेत शिकवले जाते. तर असेच हायस्कूल ला ही असते का?
- अश्विनी

पारुबाई's picture

16 Jul 2010 - 12:15 am | पारुबाई

Kumon,Sylavan अश्या सारखे क्लास म्हणजे एक supporting system आहे. याची तुलना आपल्या भारता मधील कोचिंग क्लास शी होवू शकत नाही.

पक्या's picture

15 Jul 2010 - 12:58 pm | पक्या

>> 'कूमॉन' काय प्रकार आहे?
Kumon.com वर सर्व माहिती आहे..त्यातील अबाऊट कूमॉन हा विभाग बघा.

पारूबाई, खूपच उपयुक्त माहिती दिलीत, धन्यवाद.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

स्वाती२'s picture

15 Jul 2010 - 3:18 pm | स्वाती२

छान माहिती.
एक दुरुस्ती.
>>समाज सेवा करण्याकरता वयाची १५ वर्षे पूर्ण झालेली असावी लागतात.>>
समाजसेवेसाठी वयाची अट नाही. वयाची अट ही तुम्ही कुठे समाजसेवा करता त्या संस्थेची असते. उदा. हॉस्पिटल सारख्या ठिकाणी जरा मोठी मुले घेतात पण इतर अनेक ठिकाणी मिडल स्कूल मधली मुले घेतात.

पारुबाई's picture

16 Jul 2010 - 12:26 am | पारुबाई

समाजसेवेसाठी वयाची अट नाही. वयाची अट ही तुम्ही कुठे समाजसेवा करता त्या संस्थेची असते.....

कॉलेज अडमिशन करता जे समाज सेवेचे तास ग्राह्य धरले जातात त्या करता वयाची १५ वर्षे पूर्ण झालेली असावी लागतात.अशी माहिती मला मिळाली होती.पण एखादे वेळेस तुम्ही म्हणता तसे ही असेल.तुमच्या माहिती बद्दल धन्यवाद.

स्वाती२'s picture

15 Jul 2010 - 3:26 pm | स्वाती२

नॅशनल ऑनर सोसायटीतली मुले शाळेत आठवड्यातून दोनदा इतर मुलांना फ्री ट्युटर करतात. तसेच शाळा जरी दुपारी ३ ला सुटत असली तरी बहुतेक शिक्षक ५ वाजेपर्यंत शाळेतच असतात. एखादा भाग समजला नसेल तर शाळा सुटल्यावर परत समजावून सांगतात. बहुतेक राज्यात विद्यापिठाची होमवर्क हॉटलाईन असते. आमच्या इथे रोझ हालमन ची आहे.

चतुरंग's picture

15 Jul 2010 - 5:46 pm | चतुरंग

मला ह्यातली काहीकाहीच माहिती उडत उडत कानावरुन गेलेली होती. आता तुमच्या लेखामुळे नीट आढावा घेता आला.

संपूर्ण ४ वर्षांचे (९ वी ते १२ वी) मार्क्स महत्त्वाचे असणे, खेळ, समाजसेवा, एकूण व्यक्तिमत्त्व विकास ह्या सगळ्या बाबी लक्षात घेतल्याने विद्यार्थी परिपूर्ण व्हायला मदत होत असावी.

(अजून ह्या विषयावर लिहाल का? पब्लिक स्कूल संपून खर्चाचे खाते कुठल्या वर्षी सुरु होते? साधारण दरवर्षीचा खर्च काय असतो? इ. माहिती दिलीत तर आवडेल.)

चतुरंग

स्वाती२'s picture

15 Jul 2010 - 6:18 pm | स्वाती२

हायस्कूल मधे dual credit घेतली तर ११-१२वी पासुन नाहितर कॉलेज पासुन खर्च सुरु!
दोन उपयुक्त वेबसाईट
http://www.collegeboard.com/student/pay/add-it-up/4494.html
http://www.savingforcollege.com/

रेवती's picture

15 Jul 2010 - 7:36 pm | रेवती

बघते या वेब्साईटस्!
धन्यवाद!
तशी खर्चाची तयारी चालू असते पण काहीच्या काही खर्चाचे आकडे ऐकू येतात असे जे वाटत होते ते तसे नाही. फिया भरपूरच आहेत. आत्ताच तू दिलेल्यापैकी एका साईटवरचा कॅल्क्युलेटर बघितला आणी खर्चाचा आकडा अंदाजे असला तरी मोठा आहे.
नुकतीच समारंभात एका भारतीय कुटुंबाशी ओळख झाली. ते तीन वर्षांपूर्वी आलेत या देशात! आणि मुलगा या वर्षी कॉलेजला जाणार आहे. त्यांची अवस्था केविलवाणी झालिये. एकदम तरी पैसे कसे जमणार?

रेवती

प्रियाली's picture

15 Jul 2010 - 5:49 pm | प्रियाली

यांतले काही विषय सांगाल का? त्यांचे वर्गीकरण असते का? पुढे जाऊन कोणती शाखा घ्यावी त्यावर विषय ठरवले जातात का?

~X( :SS टेन्शन! टेन्शन!! ;)

स्वाती२'s picture

15 Jul 2010 - 6:11 pm | स्वाती२

प्रियाली,
उगाच टेन्शन घेऊ नका. ७-८वीत असताना हायस्कूल चे काउंसेलर मुलांशी बोलून छान मार्गदर्शन करतात. हायस्कूलची काही क्रेडिट ८वी त घेता येतात. माझ्या मुलाने बायो-१ ऑनर्स आणि अल्जिब्रा -१ आठवीत घेतले होतं. तुमची हॅमिल्टन ना मग तर काळजीच नको.

प्रियाली's picture

15 Jul 2010 - 6:25 pm | प्रियाली

७-८वीत असताना हायस्कूल चे काउंसेलर मुलांशी बोलून छान मार्गदर्शन करतात. हायस्कूलची काही क्रेडिट ८वी त घेता येतात. माझ्या मुलाने बायो-१ ऑनर्स आणि अल्जिब्रा -१ आठवीत घेतले होतं.

स्वाती, या काउंसिलिंगसाठी पालकांनाही बोलावले जाते का? पोरांपेक्षा आम्हा पालकांनाच अमेरिकन शिक्षणाच्या काउंसिलिंगची अधिक गरज आहे असे वाटते. अगदीच अनभिज्ञ आहोत आम्ही.

तुमची हॅमिल्टन ना मग तर काळजीच नको.

हो! :)

क्रेमर's picture

15 Jul 2010 - 8:49 pm | क्रेमर

तुमची हॅमिल्टन ना मग तर काळजीच नको.

तुमची हॅमिल्टन म्हणजे नक्की काय?
_________________
बाकी चालू द्या.

प्रियाली's picture

15 Jul 2010 - 8:51 pm | प्रियाली

हॅमिल्टन आणि बून काउंटीच्या स्कूल्स ४ स्टार्स आहेत म्हणून काळजी नको असे त्या म्हणत असाव्या.

क्रेमर's picture

15 Jul 2010 - 9:00 pm | क्रेमर

धन्यवाद. हॅमिल्टन काउंटीतल्या शाळा चांगल्या आहेत ही माहिती मिळाली.

_________________
बाकी चालू द्या.

प्रभो's picture

15 Jul 2010 - 6:21 pm | प्रभो

मस्त माहिती...

अरुंधती's picture

15 Jul 2010 - 9:34 pm | अरुंधती

छान उपयुक्त आहे माहिती! मिसळपाववर पहिल्यांदाच लिखाण करत असलात तरी मस्त आत्मविश्वासाने केलेले लेखन जाणवते. अजून अशीच उत्तमोत्तम माहिती पुढे येऊ देत. तुम्हाला लिखाणासाठी शुभेच्छा! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मीनल's picture

15 Jul 2010 - 10:13 pm | मीनल

अमेरिकेत १२ नंतर कॉलेज सुरू होताना पहिल्या वर्षीचे काही विषयांचे क्रेडिट्स आधीच मिळू शकतात. त्याला ए. पी कोर्सेस म्हणतात. ९वी पासून ए. पी कोर्सेस घेउ शकतो . पण त्यासाठी ८ पर्यंत खूपच मार्क लागतात. ते नसतील तर १० / ११/ किंवा १२ वीत सुध्दा हे ए.पी. कोर्सेस घेई शकतो. कॉलेज बोर्ड ह्या परीक्षा घेतात. आपल्या भारतात बोर्ड असते तसेच सेंटर्स असतात. एक्टर्नली पेपर सेट, अ‍ॅसेस केले जाता. त्यात २ गुणाला नापास. ३ आणि त्यावर गुण असतील तरच ते कॉलेज मधे ग्राह्य धरतात. त्यानुसार पुढील कोर्सेस घेता येतात. ५ गुण मिळणे अतिशय कठिण असते. पण ते मिळाले तर कॉलेजच्या पहिल्या वर्षी ऐवजी दुस-या नाही तर तिस-या वर्षीचा कोर्स घेऊ शकतो. थोडक्यात मेहनत आणि बुध्दीमत्तेवर अक्सलरेटेड ( जलद) अभ्यास. समर कोर्सेस ही करून अधिकाधिक क्रेडिट आणि कोर्सेस संपवता येतात. याचा फायदा काय? -- तर पदवीच्या शेवट्या वर्षी विद्यार्थी बराचसा मोकळा असतो. पदवी जवळ जवळ पदरात असतेच .त्यामुळे नोकरी /पोस्ट ग्रॅज्युएशनची तयारी सुरू करता येते. जेव्हा बाकीचे सर्व विद्यार्थी अभ्यासात गुंतलेले असतात तेव्हा त्याच्या कडून नोकरीसाठी असलेली स्पर्धा कमी होते.

जलद अभ्यासाची सोय भारतात फारशी नाही. म्हणूनच अमेरिकेत शिक्षण सोपे किंवा सोयीचे असते असे म्हटले जाते. शिवाय जगभरात रेकग्नाईज्ड आहेच. ते उत्तम आहे किंवा नाही हा मुद्दा नाही. ते जगभरात उच्च प्रतिचे मानले जाते हे सत्य.

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

नाटक्या's picture

16 Jul 2010 - 3:06 am | नाटक्या

उच्च प्रतिचे मानले जाते हे बरोबर. परंतू बर्‍याचश्या पुढारलेल्या जगात अमेरिकेचा क्रमांक काही फार वरचा नाही. २००९ साली केलेल्या सर्वेक्षणातून आलेली आकडेवारी ईथे आहे. अर्थात भारताच्या मानाने तुलना केली तर नक्कीच फार वर नंबर लागतो.

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

चित्रा's picture

15 Jul 2010 - 10:24 pm | चित्रा

माहिती चांगलीच दिली आहे.

धन्यवाद. पुढील लेखांची वाट पाहते.